Home Blog Page 337

नगर पालिकेचा कारभार , तहसिल कार्यालय , भूमी अभिलेख विभागात होत असलेले भोंगळ कारभार

0

 

हिंगणघाट :- शिवसेनेकडून 11 फेब्रुवारी निवेदन मा. तहसीलदार साहेब यांना देण्यात आले. काही अति महत्त्वाचे विषयावर सुचना केल्या जसे नगर परिषद तसेच तहसील कार्यालयातील विषय या प्रमाणे-१)नगर परिषद च्या कर विभागातील कर अधीक्षकाच्या कामा मुळे शहरातील नागरिकांना फेरफार, दाखल खारीज, कुटूंबातील आपसी फेरफार मध्ये कोणतेही कारण सांगून पैश्याची मागणी करून त्रास देने.२)नगर रचनाकार विभागातील बांधकाम नकाशा मंजुरी साठी त्या विभागातील अधिकारी सुद्धा लोकांना त्रास देत आहे काहीही करण सांगून तसेच घर बांधणी नकाशा मध्ये चुका कडून लोकांना अडचणी अटकाऊन पैसे ची मागणी करणे.३)टॉवर चे पॅनल, केबल अंडर ग्राउंड करणे या साठी कोणत्या नियमावली अनुसार परवानगी दिली,आणि त्या टॉवर वाल्यानी डिपॉझिट रक्कम किती भरली आणि नगर परिषदनी कोणत्या अटी शर्तीवर मंजुरी देऊन खोद काम करण्यास सांगितले करण त्यांच्या या खोदकामामुळे शहरातील पाणी पुरवठा खंडित झाली, नागरिकांना घाण पाणी पुरवठा झाला तरी नगर परिषद प्रशासन जागृत नाही.हिच परिस्थिती प्रशासन लागण्या पूर्वी सुद्धा होते पण आता तर प्रशासन लागले आहे ना, म्हणून या शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी नगर परिषद प्रशासन नी गंभीर व्हावे. तसेच तहसील कार्यालयात हिंगणघाट १)शहर व ग्रामीण भागातील संजय गांधी निराधार योजना, वाल्मिकी योजना, बाहेर गावातून येणाऱ्या लोकांना उत्पन्न दाखला न देणे,त्यांना पैश्याची मागणी करणे.२)भूमी अभिलेख विभागातील प्रमुख अधिकारी पासून साधारण कर्मचारी पर्यंत ची मंडळी पैसे घेतल्या शिवाय काम करीत नाही या मुळे सर्व त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी आहे. या वर सुद्धा आपण कार्यवाही करावी.३)या संपूर्ण शहरात अवैध रित्या रेती चा व्यवसाय होत असतांना प्रशासन कडून हातमिळवणी केली कि काय असे दिसू लागले.४)या अवैधरित्या चोरी करणाऱ्या लोकांशी R I, आणि काही पटवारी या चोरीत मिळून असल्याचे दिसून येत आहे.५)यात काही RI आणि पटवाऱ्याला स्थानिक आमदार यांचे दबाव आहे कारण आमदाराच्या काही मंडळी या अवैध रेतीच्या व्यवसायात आहे या बाबत काही अधिकारी कडून दबत्या आवाजात सांगण्यात आले आहे, काही अधिकारी या स्थानिक आमदार पासून या रेतीचोरी च्या कारणावरून त्रासून आहे असे आम्हाला तहसिल कार्यल्यातून काही कर्मचाऱ्या कडून सांगण्यात आले आहे.६) या शहराला उन्हाळ्यात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात होत असते,आणि त्यावेळी सुद्धा डंकिन येथून मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत असते आणि आता सुद्धा चालू आहे.६) चोरून आणलेली रेती लोकांना जास्त भावात विकल्या जात आहे आणि म्हणून कुठे तरी तहसिल विभाग आणि पोलीस प्रशाशन जवाबदार आहे असे दिसून येत आहे. आणि म्हणून या सर्व विषयावर आपण कार्यवाही करावी अन्यथा शिव सेना मोठ्या स्वरूपात आंदोलन करेल व पुढे येणाऱ्या प्रसंगाला दोषी प्रशासन राहील,या सर्व समस्यांवर कार्यवाही व्हावी या साठी जिल्हा उप प्रमुख राजेंद्र खुपसरे, तालुका प्रमुख सतीश धोबे, शहर प्रमुख सतीश ढोमने,उप तालुका प्रमुख प्रकाश अनासाने, माजी नगरसेवक मनीष देवडे, भास्कर ठवरे, मनोज वरघणे, शंकर मोहमारे, देवेंद्र पडोळे, बंटी वाघमारे, शहर उप प्रमुख जय रोहनकार, गजानन काटवले,राजू माडेवार,शंकर झाडे, दिलीप चौधरी, हिरामण आवारी, मुन्ना त्रेवेदी, बलराज डेकाटे,अनंता गलांडे,दिनेश धोबे इत्यादी प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्तीत निवेदन देण्यात आले.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

यावल तालुक्यातील चुंचाळे बोराळे गावासह चोपडा मतदारसंघात आ .सौ. लताताई सोनवणेच्या प्रयत्नातुन दोन कोटी ५० लाख रूपये निधींच्या कामांचे भुमिपुजन संपन्न

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे, ( चोपडा विधानसभा मतदार संघ ) यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामांचे भूमिपूजन सोहळा दिनांक ११ फेब्रुवारी २०२२ रोजी भूमिपूजन हस्ते करण्यात आले . आमदार लताताई सोनवणे , माजी आमदार प्रा चंद्रकांत बळीराम सोनवणे शिवसेना सहसंपर्कप्रमुख रावेर लोकसभा मतदारसंघ यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या विकास कामांच्या भुमिपुुजन कार्यक्रमा अंतर्गत १) बोराळे तालुका यावल येथे पेव्हर ब्लॉक बसविणे २)चुंचाळे तालुका यावल येथे पेवर ब्लॉक बसवणे ३)शिरसाड तालुका यावल येथे काँक्रीटीकरण व डांबरीकरण करणे ४)वडोदे तालुका यावल येथे पेवर ब्लॉक बसवणे ५)दहिगाव येथे पेव्हर ब्लॉक बसविणे वरील दोन कोटी ५० लाख रुपये निधीच्या कामांचा भुमिपुजन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला .
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख रवी सोनवणे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख योगेश भाऊ, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख विनायक आप्पा ,उपसरपंच पराग महाजन, जयंत पाटील, गोकुळ कोळी, समाधान सोनवणे ,दिनू साळुंके, भरत राजपूत ,प्रदीप वानखेडे ,विकी वानखेडे ,सरपंच वंदना चौधरी ,उपसरपंच उज्जैनसिंग राजपूत ,ग्रामपंचायत सदस्य मोना बाई राजपूत, माजी पोलीस पाटील हिंमत राजपूत, युवराज राजपूत ,अशोक वानखेडे, नेहमीचंद राजपूत, सुहास सिंग राजपूत, सुनील पंडित ,पुनम राजपूत, , संदीप वानखेडे, सुमित राजपूत, विश्वासराव पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष कैलास सिंग राजपूत , विनोद चौधरी, आशा राजपूत, संध्या राजपूत संदीप चौधरी लताबाई राजपूत पतळी चे सरपंच प्रतापदादा सोनवणे गोविंद आप्पा यांच्यासह ग्रामस्थ मडंळी सह आदी मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

आजाद समाज पार्टी भीम आर्मीचे सहायक अभयंत्याला निवेदन।

0

 

अनिलसिंग चव्हाण सह विकी वानखेड़े

आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र मुख्य महासचिव मनीष भाऊ साठे यांच्या मार्गदर्शनात व अम, जिल्हा मुख्य महा सचिव दिपक मेटांगे व अम, शहर अध्यक्ष प्रवीण वाकोडे यांच्या नेतृत्वात मा, सहायक अभियंता याना निवेदन देण्यात आले गेल्या कोरोना काळा मध्ये आधी केंद्र सरकारने व नंतर महाराष्ट्र सरकारने एकंदरीत दोन वर्षे लॉक डाऊन लावण्यात आले तरी सर्व लोकांना मोल मजुरी बंद करून घरी बसावे लागले ज्या कुटुंबाला हातावर आणने व हातावर खाणे ही परिस्थिती असलेल्या अनेक कुटुंबावर उपास मारीची पाळी आली होती अशा परिस्थिती मध्ये पोट भरणे कठीण झाले तर बीज कसे भरणार म्हणून त्यांचे वीज बिल थकीत राहिले व आता त्यांची भरण्याची ही परिस्थिती राहली नाही वरून महावितरण कर्मचारी रंगदारी करून वीज बिल भरण्या साठी सक्ती करतात आता सांगा महाराष्ट्र काय भारत देशाच्या बाहेर आहे काय जेंव्हा दिल्ली सरकार प्रत्येक ग्राहकाला 100 युनिट माफ करतात तर महाराष्ट्रात नाही 100 युनिट अखंड काळा करीता तर कमसे कम कोरोना काळातले बिल तरी माफ करा कारण मोल मजुरी करणारे लोक अव्या च्या सव्या बिल भरू शकत नाही तरी तरी त्यांना बिल माफ करावे अन्यता जर असे नाही झाले तर आजाद समाज पार्टी भीम आर्मी शहर नवे तर जिल्हाभर तीव्र असे आंदोलन करू याची संपूर्ण जबाबदारी महावितरण व महाराष्ट्र सरकारची राहील।

घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात पं. दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन

0

 

पं. दीनदयाल उपाध्याय यांचा अंत्योदयचा विचार सदैव अंगिकारून कार्य करणार – विवेक बोढे

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

शुक्रवार 11 फेब्रुवारी रोजी येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात *भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात* एकात्म मानवदर्शनाचे प्रणेते, भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
मनोगत व्यक्त करतांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले पं. दीनदयाल उपाध्याय अंत्योदयाचा विचार भारत वासीयांपर्यंत पोहचवीणारे, भाजपाचे प्रेरक व जनसंघाची स्थापना करणारे होते. त्यांचा अंत्योदयचा विचार घेऊन आम्ही कार्य करणार आहोत. मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्रच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सेवाग्राम येथे बुधवारला पाठविण्यात येत आहे.
त्यांच्या स्मृतिदिनी गोर गरीब रुग्णांची सेवा करून पंडितजींना आम्ही अभिवादन करतो.
उपस्थित कार्यकर्त्यांना भाजपातर्फे राबवण्यात येणाऱ्या मायक्रो डोनेशन या उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली. अनेक कार्यकर्त्यांनी मायक्रो डोनेशन केले.
यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे विनोद चौधरी, रत्नेश सिंग, सुरेंद्र जोगी, अनंता बहादे, मल्लेश बल्ला, मानस सिंग, गुरूदास तग्रपवार, राजा रेड्डी, अतिश मेळावार, येरला भीमय्या, गणराज सोनेकर, नामदेव धांडे, अमृत बरडे, पांडुरंग मडकवार, मुत्तबाला नलभोगा, सोनू रॉय उपस्थित होते.

शिवजयंती निमित्त गडकिल्ले बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन

0

सुनील पवार. नांदुरा. ता.प्र.

नांदुरा . येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवरायांच्या किल्ल्यांची प्रतिकृती बनविण्याची स्पर्धा आयोजित केली आहे.यामाध्यमातून युवा पिढी गडकिल्ल्यांचे महत्त्व समजून त्याबद्दल इतिहास जाणून घेऊन किल्ल्यांची प्रतिकृती तयार करतील व यातून त्यांना किल्ल्याबद्दल इतिहास माहीत व्हावा या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.यामधे किल्ला बनवून किल्ल्याबद्दल विस्तृत माहिती,किल्ला कसा आहे?त्याचा मुख्य दरवाजा कोणता?,गडाच्या वाटा,मावळे,शिवराय यांची प्रतिकृती माहिती फलकासह दिसावी.हे किल्ले मातीचे बनविलेले असावेत आपल्याला जमले किंव्हा उपलब्ध होईल त्या वस्तूंनी बनवून सजवावे.शक्यतोवर नैसर्गिकरीत्या आणि हुबेहूब प्रतिकृतीला प्राधान्य देण्यात येईल.यामधे वय वर्ष २० पर्यंतचे मुलं,मुली सहभाग नोंदवू शकतात.करिता आपण आपले संपूर्ण नाव,पत्ता,संपर्क क्रमांक नोंदवून या स्पर्धेत भाग घेऊ शकता. यामधे आपण कुठलाही किल्ला बनवू शकता. उदाहरणार्थ फोटो सोबत पाठवत आहे.हे किल्ले आपल्याला आपापल्या घरीच बनवायचे आहे.किल्ला तयार झाल्यावर सार्वजनिक शिवजयंतीची उत्सव समिती आपल्या घरीच येऊन किल्ल्यांची पाहणी करून फोटो घेऊन जाईल. व यामधून योग्य व्यक्तींची निवड करून प्रथम,द्वितीय,तृतीय पारितोषिक देण्यात येईल.यामधे प्रथम येणाऱ्यास रोख पारितोषिक ७१०० रुपये,प्रमनपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल,द्वितीय क्रमांक पटकविनाऱ्याला ५१०० रुपयांचे रोख रक्कम,प्रामनपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येईल,तृतीय येणाऱ्यास ३१०० रुपये रोख रक्कम,प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येईल.तसेच यांच्या खालोखाल असणाऱ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार असल्याचे शिवजयंती समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सार्वजनिक शिवजयंतीचे तालुका कार्याध्यक्ष अमर रमेश पाटील व शहर कार्याध्यक्ष जितू मोरे यांच्या सोबत संपर्क साधून आपली नावे द्यावी.१६ फेब्रुवारी रोजी या स्पर्धकांच्या घरी शिवजयंती समितीचे पदाधिकारी येऊन किल्ल्यांची पाहणी करून जातील व १८ जानेवारीला निकाल जाहीर करून रोख पारितोषिक,प्रमाणपत्र व सन्मानचिन्हांचे वाटप करण्यात येईल अशी माहिती शिवजयंती समितीकडून जाहीर करण्यात आली आहे.
सहभागासाठी संपर्क
अमर रमेश पाटील
तालुका कार्याध्यक्ष
संपर्क:- 9595086366

जितू मोरे शहर कार्याध्यक्ष
संपर्क:- 8625875672

हिंगणघाट न्यायालयाचा पहिलाच ऐतिहासिक निर्णय विक्की उर्फ विकेश नगराळेला आजन्म कारावासाची शिक्षा

0

 

अंकिता जळीत हत्याकांड

अनिलसिंग चव्हाण, विकी वानखेड़े  प्रतिनिधि

हिंगणघाट-संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या अंकिता पिसुड्डे जळीत हत्याकांड प्रकरणी आज जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आर बी भागवत यांनी आज या प्रकरणात काल दोषी ठरविलेला आरोपी विकी उर्फ विकेश नगराळे याला आजन्म कारावासाची शिक्षा व पाच हजार रु दंड ठोठावला आहे.
आज सायनकाली 5 वाजता न्यायालयाने या बहुचर्चित प्रकरणात आपला निर्णय जाहीर केला.या निर्णयाची माहिती विशेष सरकारी वकील एड उज्वल निकम यांनी न्यायालयाचे बाहेर येऊन प्रसार माध्यमाना दिली.
दरम्यान आज सकाळी 11 वाजता न्यायालयाचे कामकाजाला सुरुवात झाली.त्यांनंतर विशेष सरकारी वकील एड उजवल निकम यांनी आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी यासाठी जोर देऊन मच्छी सिंग विरुद्ध पंजाब सरकार व बच्चन सिंग विरुद्ध पंजाब सरकार या मागील निर्णयाचा दाखल देत आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी विंनती केली.
आरोपीचे वकील एड भुपेंद्र सोने यांनी यावेळी युक्तिवाद करतांना दावा केला की खरा गुन्हेगार हा मोकाट फिरत असून एका निर्दोष युवकाला दोषी ठरविण्यात येत आहे.त्यामुळे सदर प्रकरणी या अभियुक्ताला शिक्षा देतांना सहानुभूतीने विचार करावा अशी विनंती न्यायालयासमोर केली.
या दोन्ही बाजूचा युक्तिवाद एकूण घेतल्या नन्तर जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायाधीश राहुल भागवत यांनी आरोपीला जन्मठेपची शिक्षा सुनावली.
आज या प्रकरणाला दोन वर्षे सात दिवस पूर्ण झाले व दोन वर्षांपूर्वी आजच्या 10 फेब्रुवारीला उपचारा दरम्यान अंकिताची प्राणज्योत मावळली होती.व आज तिच्या दुसऱ्या स्मृती दिनी आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे ( वय ३२) याला न्यायालयाने शिक्षा सूनावली हा दुर्दैवी योगायोग आहे.
आज या प्रकरणाचा निकाल असल्याने न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.स्वतः जिल्हा पोलिस अधीक्षक श्री प्रशांत होळकर हे जातीने या बंदोबस्तावर नजर ठेवून होते.अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोलनकी,येथील उपविभागीय अधिकारी दिनेश कदम,ठाणेदार संपत चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.न्यायालय परिसराकडे येणारे सर्व मार्ग बंद ठेवण्यात आले होते. जवळपास 15 पोलीस अधिकारी व 125 पोलीस न्यायालय परिसरात बंदोबस्तासाठी होते.या शिवाय न्यायालय परिसरात क्यूआरटीचे चार कमांडो तैनात होते.व दंगल निरोधक पथक तैनात ठेवण्यात आले होते.सकाळी 11 वाजता न्यायाधीश श्री आर बी भागवत हे आपल्या आसनावर स्थानापन्न झाले.त्याआधी 10 वाजून 58 मिनिटांनी विशेष सरकारी वकील एड उजवल निकम यांचे आगमन झाले.त्या पाठोपाठ आरोपीचे वकील एड भुपेंद्र सोने हे न्यायालयात उपस्थित झाले.त्यांनतर प्रचंड पोलीस संरक्षणात आरोपी विकेश नगराळे याला नागपूर येथून घेऊन पोलीस आले.जवळपास चार गाड्यांचा ताफा त्याच्या मागेपुढे होता.आरोपी न्यायालयाच्या समोर उपस्थित झाल्यानन्तर ११ वाजून ३० मिनिटांनी न्यायालयाचे कामकाजाला सुरुवात झाली.यावेळी न्यायालयाने 3 फेब्रुवारी 2020 ला अंकिता पिसुड्डे हिच्या अंगावर सकाळी पेट्रोल टाकून जाळण्याच्या प्रकरणी दोषी असल्याचे सांगितले होते.
आज या खटल्याचा औत्सुकपूर्ण निकाल ऐकण्यासाठी प्रसार माध्यमानी न्यायालय परिसरात एकच गर्दी केलेली होती.न्यायालयानचे आजचे कामकाज सकाळी पहिल्या सत्रात 11 ते 12.30 पर्यन्त चालले. सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाने साय 5 वाजेपर्यन्त निकाल राखून ठेवला होता.साय 5 वाजता न्यायाधीश राहुल भागवत यांनी आरोपी व दोन्ही वकील यांच्या समक्ष निकालाचे वाचन करून शिक्षेची घोषणा केली.त्यांनतर सरकार पक्षा तर्फे एड उजवल निकम यांनी सकाळी 11 वाजे पासून व्यायालयाचे प्रांगणात तिष्ठत उभे असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना शिक्षेची माहिती दिली.
****************

विकेश वर घोर अन्याय झाला

एड भुपेद्र सोने

हा खटला सर्वात आधी मिडियासमोर चालला होता.मीडियाने हा निकाल दिला होता व मिडीयाचा निकाल न्यायालयाने कायम ठेवलेला आहे याचे मला अत्यन्त दुःख होत आहे. जे साक्षीदार तपासण्यात आले त्या पैकी सर्वांचे बयान लिखित फॉर्म मध्ये आहे त्या आधारे निर्णय लागत असेल ते हा घोर अन्याय आहे. एका निर्दोष व्यक्तीला यात गोवण्यात आले असून उद्या या कोर्टात मी या विषयावर आर्ग्युमेंट करणार नाही मी हायकोर्टात या विरुद्ध दाद मागणार असल्याचे आरोपीचे वकील एड भुपेंद्र सोने यांनी सांगितले.(तभा वृत्तसेवा)

नांदुरा खामगाव महामार्गावरिल नवीन बांधलेल्या पुलाच्या भिंती पडल्या

0

 

सुनील पवार. नांदुरा. ता.प्र

नांदुरा खामगाव राष्ट्रीय महामार्ग ग्राम.आमसरी येथील हनुमान मंदिर जवळील नवीनच बाधकाम होऊन जडवाहतुकीसाठी सुरु केला होता या पुलाच्या दोन्ही बाजूकडील भिंती व सोबतच अरधा रस्ता खचला ही.घटना दि.9फेब्रुवारी रोजी12वाजता घडली या दरम्यान दोन्ही कडिल वाहतूक चार तास ठप्प झाली होती याबाबत सविस्तर माहिती असे की सदर महामार्ग वरील पुलाच्या बाजुस.दुसऱ्या पुलासाठि जेसीबी दवारे माती खोदकाम सुरु होते यावेळी वरिष्ठ अधिकारी व अभियंताचे दुर्लक्षनामुळे कोनतेहि नियंत्रण नसल्याने अशिक्षित यंत्र चालकाने पुलाचे दोन्ही भिंती व अरधा रस्ता अचानक खचला सुदैवाने प्रानहानि झाली नाही या .गैरप्रकार मुळे महामार्ग वरिल जड वाहतूक काही तास बंद पडली होती दरम्यान दुपारी12वाजता या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी दक्षपने घटनास्थळी पोहचून वाहतुक सुरळीत केली काही तास खोळंलेने काही वाहने पि.राजा. मार्गाने वळविण्यात आली

सुनगाव येथील सी आय एस एफ जवानाचा अपघातात दुर्देवी मृत्य

0

 

सूनगाव गावावर पसरली शोककळा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पडला पार

गजानन सोनटक्के
जळगाव जा

चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या सीआयएसएफ जवानाचा टिप्परच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर रोडवरील ऊर्जानगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली कैलास नारायण कापरे असे मृत जवानाचे नाव आहे कैलास कापरे हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव चे रहिवासी आहेत मागील काही वर्षापासून ते औष्णिक विद्युत केंद्रात सीआयएसएफ जवान म्हणून कार्यरत होते मंगळवारी सायंकाळी ते आपल्या दुचाकीने लखमापूर कडे जात होते दरम्यान त्यांच्या मागून भरधाव येणाऱ्या टिप्पर क्रमांक एम एच 34 एम 41 62 ने त्याच्या दुचाकीला मागून धडक दिली यामध्ये ते गंभीर जखमी झाले परिसरातील नागरिकांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या बातमीने सुनगाव परिसरात शोककळा पसरली त्यानंतर त्यांचे पार्थिव शरीर हे सुनगाव येथे काल रात्री नऊच्या सुमारास आणण्यात आले त्या वेळी लोकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती व त्यानंतर स्वर्ग रथ हार फुलांनी सजवून या जवानाची वाजत गाजत मिरवणूक यावेळी गावातील रस्त्यांवर स्त्रियांनी सुंदर अशा रांगोळ्या काढल्या होत्या यावेळी सुनगाव हे अश्रुंच्या पुरात न्हाऊन निघाल्यासारखे झाले व सुनगाव गावावर मोठी शोककळा पसरली आहे गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली व सुनगाव ते जळगाव रोडवरील त्यांच्या स्वतःच्या मळ्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडला यावेळी बुलढाणा येथील जवानांनी आपल्या तालासुरात जवानाला अखेरची सलामी दिली व हवेत फैरी झाडल्या यावेळी जळगाव जामोद महसूल मंडळ कर्मचारी आमदार डॉ संजय कुटे,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रसेंनजित पाटील, शिवसेनेचे दत्ताभाऊ पाटील, कॉग्रेसचे अविनाश उमरकर, जिल्हापरिषद सदस्य रूपालिताई काळपांडे पंचायत समिती सभापती रामेश्वर राउत, उपसभापती महादेवराव धुर्डे, माजी पंचायत समिती सदस्य गावचे सरपंच रामेश्वर अंबडकार, गरमपंचायत सदस्य माजी सरपंच पुंडलिक पाटील याच्यासह तालुक्यातील हजारो नागरिकांची यावेळी उपस्थिती होती. त्यांच्या पश्चात आई वडील एक भाऊ पत्नी दोन मुले असा आप्त परिवार आहे

वेकोलीच्या कोटनका कंपनी विरोधात उद्यापासून काँग्रेसचे बेमुद्दत कामबंद आंदोलन

0

 

तीन वर्षांपासून वेतनात वाढ नाही
कामगारांचे शोषन: राजु रेड्डी

(चंद्रपूर घुग्गूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : वेकोली सब एरिया अंतर्गत कार्यरत कोळसा सॅम्पलिंगचे कार्य करणारी कोटेनका (सिम्फर) या कंपनीने कामगारांना वेकोली निर्धारित हाय पॉवर कमिटीने दिशा निर्धारित केलेले किमान वेतन द्यायला हवे होते.
वेकोलीतर्फे सॅम्पलिंगचे टेंडर सिम्फर कंपनीने घेतले व कोटनका कंपनीला परस्पर काम देऊन टाकले मात्र कोटनका कंपनी हे गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांचे शोषण करत आहे.
कामगारांना नियमानुसार वेतन दिल्या जात नाही
कुठल्याही प्रकारे सुरक्षा साधने उपलब्ध केल्या जात नाही.
कामगारांच्या हक्कासाठी घुग्गूस शहर काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली उद्या दिनांक 11 फेब्रुवारी पासून बेमुद्दत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले असून या अन्यायकारक कंपनी सोबत वेकोलीची देखील हात मिळवणी असून कामगारांचे शोषण करणाऱ्या कोटनका कंपनीवर कुठलीच कारवाई केली नसल्याचे निषेधार्थ वेकोली अधिकाऱ्यांना देखील घेराव घातला जाणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.

दुसखेडा ग्रामसेवकाने नमुना नं.8 व नमूना 9चे वाचन केले भुसावळ शासकीय विश्रामगृहात ?

0

 

गटविकास अधिकार्‍यांकडे तक्रार.

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

तालुक्यातील दुसखेडा ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सरपंच यांचा मुलगा यांनी भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात यावल तालुक्यातील दुसखेडा ग्रामपंचायत मधील नमुना नंबर 8 व 9 चे वाचन करून शासकीय कामकाजाचा नवीन विक्रम केला असल्याची तक्रार दुसखेडा ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्यांनी यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
दि.9फेब्रुवारी2022 रोजी यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, यावल तालुक्यातील दुसखेडा येथील घरकुलाची “ड” यादी ही शासनाकडून मंजुर झाली आहे. मंजूर घरकुलांच्या यादीचे वाचन हे ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेऊन करावी लागते परंतु विद्यमान ग्रामसेवक हे आज सुटीवर असून सुद्धा दुसखेड़ा ग्रामपंचायतीचे दप्तर नमुना नंबर आठ व नमुना नंबर नऊ हे भुसावळ शासकीय विश्रामगृहात घेऊन गेले व सरपंच यांचा मुलगा व ग्रामसेवक यांनी विश्रामगृहात त्या मंजूर घरकुल यादीचे वाचन केले,म्हणजे घरकुल यादीचे वाचन हे ग्रामपंचायत मध्ये आणि ग्रामसभेत न करता आपल्या सोईनुसार मनमानी करून अनाधिकृत ठिकाणी यादीचे वाचन केले याची आम्हाला माहिती झाल्यावर आम्ही खालील सह्या करणारे भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात गेले असता त्या ठिकाणी ग्रामसेवक व सरपंच यांचा मुलगा मंजुर घरकुल यादी ची छाननी करीत असताना आम्ही प्रत्यक्ष बघितले.तरी यांनी शासकीय सर्व नियम धाब्यावर ठेवून घरकुल यादीचे वाचन दुसखेडा ग्रामपंचायत येथे न करता दुसऱ्या तालुक्यात म्हणजे भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात केले असे दिलेल्या तक्रार अर्जात दुसखेडा ग्रामपंचायत उपसरपंच जगन्नाथ धुडकु पाटील,ग्रामपंचायत सदस्य सुभाष दगडू सोनवणे,महेंद्र गंगाराम बारे यांनी नमूद केले आहे त्यामुळे आता यावल पंचायत समितीच्या कर्तव्यदक्ष गटविकास IAS अधिकारी नेहा भोसले काय कार्यवाही करतात याकडे यावल तालुक्यातील संपूर्ण ग्रामसेवकांचे,राजकारणाचे,दुसखेडा ग्रामस्थांचे लक्ष वेधून आहे.