Home Blog Page 338

मनपा आयूक्त आष्टीकर च्या अंगावर शिवप्रेमी महीलाने फेकली स्याही

0

 

उषा पानसरे असदपूर
अमरावती दिनाक 9 फेब्रूवारी

महानगरपालिका आयुक्त यांच्या अंगावर स्याही फेकली

अमरावती शहरातील राजापेठ येथील उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याने आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दिवसें दिवस वेगळी आक्रमक आंदोलने करीत असल्याने या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत असताना आज युवा स्वाभिमान महिला संघटनेच्या पदाधिकारी साक्षी उमक यांनी महानगरपालिका आयुक्त यांच्या अंगावर शाई फेकण्याचा धक्कादायक प्रकार आज राजा पेठ येथे घडला साक्षी उमक महानगरपालिका आयूक्ता यांचा अंगावर स्याही फेकण्याचा धक्कादायक प्रकरण राजा पेठ रेल्वे अंडरपास मधे ही धक्कादायक घटना घडली घटना स्थळी पोलीसांनी शिवपप्रेमी महीलांना ताब्यात घेण्यात आहे

सुपर मार्केट मॉलमधे “वाईन” विक्रीचा निर्णय रद्द करण्याची मागणी.

0

 

तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

ज्येष्ठ समाजसेवक
अण्णा हजारे प्रणित भ्र.वि.जन आंदोलन न्यासचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.

जळगाव दि.9
महाराष्ट्र शासनाने किराणा दुकान सुपर मार्केट व मॉलमधून “वाइन” विक्रीचा निर्णय घेतला आहे तो निर्णय महाराष्ट्र सरकारने तातडीने रद्द करावा अशी मागणी करणारे निवेदन समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जळगाव जिल्हा यांच्यातर्फे जिल्हाधिकारी जळगाव यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना दि.8 फेब्रुवारी2022 रोजी देण्यात आले.
सदरचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांना दिले आहे या निवेदनामध्ये नवीन युवा पिढी,सामान्य जनता व्यसनाधीन होण्याचे वाढते प्रमाण झाल्या शिवाय राहणार नाही त्यामुळे हा निर्णय अतिशय चुकीचा आहे त्यामुळे राज्य शासनाने रद्द करावा अन्यथा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जळगाव जिल्ह्याच्या वतीने तालुका आणि जिल्हा स्तरावर विविध प्रकारचे आंदोलन छेडण्यात जाईल असा इशारा सुद्धा या वेळी देण्यात आला.
निवेदन देताना कोरोना नियम पाळून जळगाव जिल्हा अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष,सदस्य उपस्थित होते,वाईन दारू सुपर मार्केट मॉल मध्ये विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने राज्यात 90 टक्के स्री-पुरुष,तरुण मुलं-मुली,विद्यार्थी,विद्यार्थिनी समाज सेवक पुरुष व महिला मंडळ,बचत गटातील महिला सदस्यांमधून राज्य सरकार यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.राज्य सरकारने हा निर्णय तात्काळ रद्द न केल्यास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणास आणि आंदोलनात सर्व स्तरातून पाठिंबा दिला जाणार असल्याची बोलले जात आहे.

महाराष्ट्र शासन हे किराणा दुकानात वाईन विकण्यास परवानगी देत असून हा निर्णय अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उद्धवस्त करणारा आहे : भीम आर्मीची संविधान रक्षक दल मागणी

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

राज्यसरकारने नुकतीच किराणा दुकानात वाईन विकण्यास परवानगी दिली आहे,मात्र ह्या अवसानघातकी तुघलकी निर्णयाने अनेक परिवार उघड्यावर येतील ,विद्यार्थ्यांच्या भविष्यावर भयंकर दुष्परिणाम होतील , ह्या सर्व बाबींचा कोणताही विचार न करता केवळ महसूल मिळवण्याच्या नादात केंद्र सरकार इथे खुलेआम मरणाला विकण्याचीच परवानगी देत असून ,हा तद्दन अविवेकी विचार सरकारने ताबडतोब रहित करावा , अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात संवैधानिक आंदोलन छेडावे लागेल असा गर्भित इशारा भीम आर्मी संविधान रक्षक दल महाराष्ट्र राज्याचे सचिव व उत्तर महाराष्ट्राचे प्रचार प्रसिद्धी प्रमुख सुपडू संदानशिव यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे.
राज्यसचिव सुपडू संदानशिव यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले की ,अगोदरच खेडोपाडी,ग्रामीण भागात अनेक परिवारांचे दारूच्या व्यसनामुळे कुटुंब उध्वस्त झाले आहेत,आज सुद्धा दारूच्या आहारी जावून अनेकांचे कौटुंबीक वाद आपण रस्त्यावरती होतांना दिसतात, ग्रामीण क्षेत्रात संध्याकाळी सहा वाजेच्या नंतर गावात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांची संख्या मोठी आहे . असे असतांना त्यात भर म्हणून की काय , राज्य शासनाने किराणा दुकानात वाईन विकण्यास परवानगी दिल्याने भर पडली आहे,त्यामुळे ग्रामीण भागात,गरिबांच्या घरी दुःखाचा स्फोट होण्यास कोणी अडवू शकत नाही. त्याच बरोबर ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांनी ही जागरूक होणे गरजेचे आहे,जर किराणा दुकानात वाईन सहज उपलब्ध झाली तर मुलांवर याचा काय दुष्परिणाम होईल याचा सारासार विचार करून ह्यावर आज आवाज उठवला नाही तर येणाऱ्या काळात दारूपीडित परिवाराचे व पाल्यांचे भविष्य उध्वस्त होईल,म्हणून राज्य सरकारने हा तुघलकी निर्णय तत्काळ मागे घ्यावा , असा निर्वाणीचा इशारा भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे राज्य सचिव सुपडू संदानशिव यांनी दिला आहे.

शेतरस्ता मोकळा करून देण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

0

 

लोणार/जगन मोरे

लोणार तालुक्यातील चिंचोली सांगळे येथील अडवलेला शेत रस्त्याची मागील वर्षी मोका पाहाणी झाली आहे तरी सदर रस्ता लवकरात लवकर खुला करून द्यावा अशी मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक आघाडी तालुकाध्यक्ष संजय चाटे यांनी तहसिलदारांना निवेदन दिले असल्याची माहिती 9 फेब्रुवारी रोजी देण्यात आली आहे
चिंचोली सांगळे येथील गट नंबर 318 ते गट नंबर 270 पर्यंतचा संपूर्ण रस्ता काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेला आहे या दोन्ही गटांमधुन जाणारा शेत रस्ता नकाशाप्रमाणे सरकारी आहे सदर रस्त्यावरून किमान 50 ते 70 शेतकऱ्यांना ये-जा करावी लागते रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे शेतामध्ये जनवारे, बैलगाडी, पेरणीसाठी खते बी-बियाणे, इतर शेती संबंधी अवजारे,नेण्यास शेतकऱ्यांना फार त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याची मागील वर्षी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून पाहणी झालेली आहे यावर्षी सदर रस्ता मोकळा करून रसत्याचे पांदन रस्ता योजनेमध्ये समावेश करून रस्ता करून द्यावा ही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक आघाडी तालुकाध्यक्ष संजय चाटे सह या शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावरुन पेटला वाद;

0

 

शेगांव प्रतिनिधी अर्जुन कराळे

शेगांव. बुलढाणा जिल्ह्यात मोदींविरोधात विरोधात काँग्रेसची निदर्शने
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
काँग्रेस कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसवर टीका केल्यानंतर राज्यात काँग्रेस आक्रमक झाली आहे. आज राज्यभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी निदर्शने सुरू आहेत शेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नरेंद्र मोदींनी माफी मागावी अशी मागणी करत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केलीत. आणि जोरदार घोषणाबाजी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत काँग्रेसने देशभरात कोरोना पसरवण्याचे काम केल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर देशभरात आणि राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून आज भाजपच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस पक्ष आंदोलन करणार असल्याचे काल सांगण्यात आले होते. दरम्यान आज बुधवारी शेगाव शहरासह जिल्हा भरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील वक्तव्याविरुद्ध शेगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. . मोदी यांनी जनतेची माफी मागावी कारण त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली. दरम्यान या ठिकाणीही पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.

घुग्घुस येथील मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

0

 

लतादीदींच्या जाण्याने स्वरसुरांचा अस्त- विवेक बोढे

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

सोमवार 7 फेब्रुवारीला घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी लतादीदींच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले तसेच दोन मिनिट मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
रविवारला सकाळी स्वरलता, गानकोकिळा, गानसरस्वती अशा अशा अनेक विशेषणांनी नावाजलेल्या महान गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने देश शोकसागरात बुडाला.
याप्रसंगी बोलतांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले लतादीदींनी संगीतजगताला आपल्या सुरांनी सजविले आपल्या आवाजामुळे रसिकांना मंत्रमुग्ध केले अवघ्या वयाच्या १३ व्या वर्षा पासून गायनाला सुरुवात केली. त्यांना भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, फिल्मफेयर, नॅशनल फिल्मफेअर, असे अनेक पुरस्कार मिळाले. लतादीदींच्या जाण्याने स्वरसुरांचा अस्त झाला.
यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जिप सभापती नितु चौधरी, माजी पंस.उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी उपसरपंच संजय तिवारी, भाजपाचे विनोद चौधरी, अमोल थेरे, संजय भोंगळे, मल्लेश बल्ला, शरद गेडाम, गणेश खुटेमाटे, सिनू कोत्तूर, सुशील डांगे, पियुष भोंगळे, राजेंद्र लुटे, मधुकर धांडे, मंगेश राजूरकर, सय्यद मुस्तफा, प्रयास सखी मंचच्या मार्गदर्शिका अर्चना भोंगळे, अध्यक्षा किरण बोढे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुचिता लुटे, निशा उरकुडे, प्रीती धोटे, लता आवारी, सुनंदा लिहीतकर, शीतल कामतवार, भरती परते, खुशबू मेश्राम, अजय लेंडे, उमेश दडमल उपस्थित होते.

घुग्घूस चे पद्मशाली समाज चा वतीने शिवमार्कंडा जयंती निमित्त महामुनी मार्कंडय्या ची मुर्ती स्थापना करण्यात आली ।

0

 

या निमित्त घुग्घूस ची पद्मशाली समाज चा वतीने मुर्ती स्थापना कार्यक्रम आयोजित करण्यात आला । या कार्यक्रम मधे घुग्घूस चे सर्व पद्मशाली समाज मोठ्या संखेने लोग उपस्थिती होते । याच कार्यक्रम मध्ये दि. 6 फरवरी रोजी, चंद्रपूर विधानसभा चे लोकप्रिय आमदार मा. किशोरभाऊ जोरगेवार जी यांची उपस्थित दर्शूहून कार्यक्रमाची शोभा वडविली।प्रेम गंगाधरे,इम्रान खान,पंकज धोटे या कार्यक्रमाचे आयोजन घुग्घूस चे पद्मशाली समाजाचे अध्यक्ष श्रीनिवासजी गुडला, कोषाध्यक्ष श्रीरामलुजी मामीडाला, अशोकजी गुंटुकवार, विलासजी कत्तुलवार, राजुजी चिप्पावार, मुशम रवीजी, कुमारस्वामीजी गुडला, सिनुजी ताला, पोलू राजेशमजी एवं घुग्घूस के सर्व्ह पद्मशाली समाज बांधव उपस्थित होते.

जानोरी ग्रामपंचायत चा उपक्रम स्वनिधीतून 26 दिव्यांगांना सौर कंदील वाटप

0

 

शेगांव प्रतिनिधी अर्जुन कराळे

शेगाव : तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतच्या वतीने स्वनिधीतून स्वामी रामभारती महाराज यांचेहस्ते गावातील 26 दिव्यांगांना सौरकंदील वितरित करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ अर्चना मंगेश ढोले ह्या होत्या
यावेळी उपसरपंच शंकर रामदास सोळंके , ग्रा प सदस्य नंदाकिशोर गावंडे, रमेश डांगे, सौ लता घेंगे , सौ सुरेखा घेंगे, सौ दुर्गा बोरसे, सौ दिक्षा भोजने, शेख रेहाना यांच्या उपस्थिती होती.
दीन दुबळ्यांची व गरजूंची सेवा हीच खरी ईश्वरी सेवा असून ग्रामपंचायत प्रशासनाकडून असेच लोकहितार्थ उपक्रम गावात सातत्याने राबवायला हवे,लोकहित साधणे हेच लोकप्रतिनिधी चे कार्य असल्याचा उपदेश करून ग्रा प च्या उपक्रमांची प्रशंसाही स्वामी रामभारती महाराज यानी यावेळी मनोगतातून केली.आभार ग्रा प सचिव आर पी गावडे मानले.

यावल येथे उद्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजीत शरद युवा संवाद यात्रेचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आगमन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उद्या यावल शहरात ” शरद युवा संवाद यात्रा “चे आयोजन करण्यात आले असुन , या कार्यक्रमास तालुक्यातील युवकांनी मोठया संख्येत सहभागी होण्याचे आवाहन युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष ऍड देवकांत पाटील व शहर अध्यक्ष हितेश गजरे यांनी केले आहे .

उद्या दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सोमवारी यावल युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने यावलच्या खरेदी विक्री सहकारी संघाच्या परिसरात सकाळी १o वाजेला शरद युवा संवाद यात्रा चे आयोजन केले आहे . राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा . शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, यांच्या सोबत ‘शरद युवा संवाद यात्रा’ आयोजित करण्यात आलेली आहे.
या यात्रेची सुरुवात जळगांव जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जन्मस्थान मौजे आसोदा ता.जि.जळगांव येथून दिनांक ४ फेब्रुवारी २०२२ संध्याकाळी ५ वाजता झाली ही यात्रा सर्व जळगांव जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पोहचत असून, यावल तालुक्यात ही यात्रेचे दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सोमवारी सकाळी १० वाजेला यावलच्या खरेदी विक्री संघातील परिसरात आगमन व आयोजन करण्यात येत आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगांव जिल्हाध्यक्ष सह सर्व आजी- माजी आमदार, सर्व सेलचे सन्माननीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत राहणार आहेत . यात्रेच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातील युवकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांशी जोडण्याचा मानस आहे. नव्याने राजकारणात येऊ पाहणारी युवकांची संख्या लक्षणीय आहे! त्यांना राजकीय प्रक्रियेच्या सोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तरुणांची ‘राष्ट्रवादी विचारांची’ व विकासात्मक दृष्टिकोन असणारी फळी महाराष्ट्रात नव्या जोमाने निर्माण करण्याच्या दृष्टीने आम्ही संवाद साधणार आहोत! या शरद युवा संवाद यात्रेच्या माध्यमातून नव्या ऊर्जेने युवकांच्या सोबत संवाद साधणार आहेत.. यावल तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन यावल तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे.

पातुडाँ येथील विशाल जम्मा जगरण संपन्न

0

 

संग्रामपुर तालुक्यातील पातुडाँ बु येथे रामदेवबाबा यांच्या जीवन पाटावर जम्मा जागरण संपन्न झाला असून हजारो भक्तांनी यांचा लाभ घेतला
राजस्थान राज्यातील रामदेवरा नगरी मध्ये रामदेवबाबा बाबा याचे भव्य मंदिर आहे रामदेव बाबा याना माननारा वर्ग देशातील कान्या कोपऱ्यात असून पातुरडाँ येथे पण आहे,पातुडाँ येथील रामदेवबाबा सेवा समिती कडून माघ महिन्याच्या वसंत पंचमी निमित्य दि 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता पासून बालाजी मंदिर मध्ये विशाल जम्मा जागरण चे आयोजन प्रसिद्ध जम्मा गायक गोपाल शर्मा हारे अकोला यांच्या मधुर वाणीतून करण्यात आले होते सर्वप्रथम सकाळी बालाजी मंदिर मध्ये अभिषेक,पूजा अर्चना,मंत्रोउच्च्यार सह पंडीत यांच्या कडून करण्यात आले तर राजस्थानी महिला मंडळ यांनी सुदरकांड चे आयोजन केले होतें या कार्यक्रम ला आलेल्या भक्तांना सकाळी व सायंकाळी महाप्रसाद देण्यात आला अखंड ज्योत चे भक्तांनी दर्शन घेतले
या जम्मा जागरण चा हजारो भक्तांनी लाभ घेतला,जम्मा जागरण मध्ये अखंड ज्योत,भजन संध्या,अखंड होम,रामदेव बाबा यांचे चमत्कार हे सर्व दाखविण्यात आले या जम्मा जागरण ला आलेले प्रसिद्ध गायक गोपाल शर्मा हारे यांचा व त्यांच्या सर्व टीम चा रामदेवबाबा समिती पातुडाँ बु कडून शाल,श्रीफळ व हार टाकून सत्कार करण्यात आला या जम्मा जागरण मध्ये वानखेड, कवठल,सगोडा, शेगाव, खामगाव, वरवट बकाल, संग्रामपुर, खेरडा, जळगावजामोद,आसलगाव,तेल्हारा,अडगाव बु,अकोट, अकोला,यवतमाळ, माटरंगाव,काटोल,मोर्शी,अअश्या बऱ्याच शहरातून भक्त आले होते,गोपाल शर्मा यांनी सांगितले की रामदेवबाबा या कलयुगातील सर्व धर्म,जात पंतांचे देव आहेत,त्यांना आसा कोणताही समाज नाही जो मानत नाही प्रत्येक समजातील घरात त्याचा फोटो आहे व दररोज त्याच्या फोटोची पूजा करतो सर्व समाज,रामदेवबाबानी आपल्या जीवनात कोण कोण ला साक्षात चमत्कार दिला त्याचे सर्व किस्से सांगितले व सोबतच भजन संध्या करून भक्तांना त्याच्या गाण्यावर थिरकविले व त्याची आरती करून जम्मा जागरण संपन्न केला

कार्यक्रम मधील झाकीया

मदन तापडिया व सौ कांचन तापडिया(रामदेव बाबा चे आई,वडील) कु समर्थ न्यानेश्वर धर्माळ(लहान रामदेव बाबा),अक्षय अग्रवाल सौ शिवानी अग्रवाल(मोठे रामदेवबाबा व त्यांच्या पत्नी नेतलबाई),सौ शीखा निलेश चांडक व सौ उजवला संजय चांडक(ला छाबाई,सुगनाबाई,रामदेवबाबा च्या बहीनी),अनुष्का व्यास(डालीबाई),पियुष चांडक(भानू),विधी राठी-स्वरस्वती,रिया गांधी-लक्ष्मी,गौराग भुतडा-गणेश या प्रकारच्या झाकी तयार करण्यात आल्या होत्या व गणेश राठी,लोकेश राठी,शरद राठी,प्रदीप राठीं,दामोदर राठी, कमल राठी,विष्णू गांधी,मुन्ना गांधी,सुरेश अग्रवाल,हरीश तापडिया, मदन तापडिया, प्रकाश दवे,अजय व्यास,सतीश शर्मा,निखिल चांडक,रमेश चांडक,आईदान चांडक,शिवकुमार चांडक,लतीश भूतडा,दामोदर भुतडा, हेमंत भुतडा, आनंद वर्मा,मनीष शर्मा,कृष्णा भुतडा, रमण सेवक, संजय चांडक,रामचंद्र राठी, निलेश चांडक,भगवान राठी,महेश गोयल,मनीष पालिवाल, सुरेश पालिवाल, कृष्णा चांडक, दिनेश चांडक, सुरेश चांडक,आकाश पालिवाल,लोकेश पालिवाल याच्या सहकार्यने कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला

नरेश बाबा यांची विशेष उपस्थिती
पांढरी धाम येथील रामदेव बाबा यांच्या मंदिर चे मुख्य व महंत श्री नरेश बाबा यांची पातुडाँ येथील जम्मा जागरण ला विशेष उपस्थिती लाभली होती त्याचा रामदेवबाबा सेवा समिती कडून सत्कार करण्यात आला व भक्तांना दर्शनाचा लाभ भेटला