Home Blog Page 340

विदर्भवीर शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्राचे नेते मा_आमदार_कै_भाई_के_आर. पाटील_यांची_जयंती_निमित्त

0

 

त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन तसेच भाई के आर पाटील यांचे खंदे समर्थक स्व. भाई वासुदेवराव मानखैर पाटील माजी जिल्हाध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष यांचे पुण्यस्मरण निमित्त अभिवादन करताना जि. प. मा. उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ(राजू पाटील) मा.जी प अध्यक्ष प्रकाशभाऊ पाटील,रा कॉ सरचिटणीस प्रसेनजीत अंजलीताई टापरे, कॉग्रेस तालुकाध्यक्ष राजूभाऊ वानखडे, भाजपचे जानराव देशमुख,तेजराव मारोडे, काँग्रेस जळगाव जामोद तालुकाध्यक्ष अविनाशभाऊ एड भालेराव, गणेश मानखैर, भगवान वानरे, नानाभाऊ पाटील, बाळासाहेब डोसे, श्याम अकोटकर ,राजूभाऊ राठोड,संतोषभाऊ टाकळकर ,सोपान पाटील असे सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांनी भाई के आर पाटील यांच्या आठवणींना उजाळा देऊन जयंती साजरी करण्यात आली

शेतकऱ्यांना लुबाडणार्या सुरेश पाईकराव विरोधात पोलीसात तक्रार दाखल ; घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांनी दर्शविला विरोध

0

 

(चंद्रपूर घुग्घूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घूस (चंद्रपूर) : बि.आर.एस.पी जिल्हा महासचिवआणि सफेदझेंडा कामगार संघटनेचे अध्यक्ष व घुग्घूस रहवासी सुरेश पाईकराव यांच्या विरोधात 03 फेब्रुवारी रोजी राजुरा तालुक्यातील सूब्बई (चिंचोली) येथील साठ – सत्तरच्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी तीन वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशनवर धडकले. पाईकराव यांच्यावर शेतकऱ्यांची लुबाडणूक व फसवणूक केल्या प्रकरणी भादंवी 420 नुसार गुन्हा दाखल करण्याचे निवेदन पो.उप – निरीक्षक संजय सिंग यांना दिले.शेकडो कि.मी.चा प्रवास करून आलेल्या शेतकऱ्यांनी
बि.आर.एस.पी नेता सुरेश पाईकराव यांचा भंडाफोड केला.
राजुरा तालुक्यातील विरुर पो.स्टेशन अंतर्गत येणारे सूब्बई व चिंचोली गावातील 87 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा सोबत वेकोली तर्फे शेतीचा मोबदला व नोकरी मिळवून देतो अशी भूलथापा देऊन चार लाख पस्तीस हजार रुपये लंपास केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.या प्रकरणात 21 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांनी विरुर पो. स्टे.ला तक्रार दाखल केली होती.दहा दिवसां नंतरही कुठल्याही प्रकारे कारवाई होत नसतांना शेतकऱ्यांना फसविणारा पाईकराव आता कामगारांना न्याय मिळवून देण्याचा सोंग करीत असल्याचे निर्दशनास येताच संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट घुग्गूस येथेच येऊन हल्लाबोल केला.

प्रकल्पग्रस्तां सोबत धोखा कशासाठी ?

गेल्या आठवड्या पासून एसीसी कंपनीच्या न्यू पॅकिंग हाऊस प्लांटच्या कामगारांच्या मागण्यांना घेऊन पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन शुरु आहे. कंपनीवर पी.एफ चोरीचा आरोप लावून कारवाईची मागणी करीत असलेल्या पाईकरावने तक्रार दाखल झाल्याच्या दहा दिवसानंतर ही शेतकऱ्यांचे चार लाख पस्तीस हजार रुपये परत केले नाही.जो कामगारांच्या पि.एफला घेऊन मोठ्या – मोठ्या गोष्टी करत आहे.
त्यानेच लाखो रुपयाने शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्याच्यावर कारवाई होत नसल्याने नेता व पोलिसांच्या हातमिळवणीनेच सदर प्रकार घडत असल्याचा आरोप ही शेतकऱ्यांनी केला.तसेच या प्रकरणात क्षेत्राच्या खासदारांनी शेतकऱ्यांची बाजू संसदेत उचलून धरावी असे आवाहन केले. पाईकराववर 420 चा गुन्हा दाखल न झाल्यास पाईकराव करीत असलेल्या आंदोलन मंडप शेजारीच आंदोलन शुरू करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

Wcl वेकोली कॉलनी चे दुरुस्ती करा. अन्यथा उपोषण करणार ..संजय तिवारी

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस भारतीय जनता पार्टी चा महाराष्ट्र उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश सचिव संजय तिवारी याने वेकोली कॉलोनीचा दुर्दशा व दुरव्यवस्था मुळे गुरुवारी 27 जानेवारीला क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावले यांना निवेदन दिले आहे, निवेदनत शास्त्रीनगर, रामनगर, गांधी नगर ,सुभाश नगर ,इंद्रा नगर, बंगाली कॅम्प, मुख्य सडक आणि रोड शेतीग्रस्त आहे जागा जागी खड्डे असल्याने खूप परेशानी होत आहे.


किती वेडा वेकोलि ला निवेदन देऊनही आज पर्यंत काम केलेले नाही. पावसाळ्यात कॉटर्स ची छत, पाणी टपकत राहते खिडकी व दरवाजे शतीग्रस्त होऊन आहे केव्हाही दुर्घटना होण्याची शक्यता आहे .कॉटर मध्ये राहणाऱ्या वेकोली कर्मचारी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.संजय तिवारी यांनी निवेदन केले की लवकरात लवकर कामे पूर्ण करावे .नाही तर उपोषण करणार . यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा विवेक बोडे , सिनु ईसारफ,मल्लेश बल्ला, उपस्थित होते.

आडगाव येथे उधारीचे पैसे परत मागील्याच्या रागात एकाला लाकडी दांडाने बेदम मारहाण पोलीसात गुन्हा दाखल

0

 

कार्यकारी ( संपादक)विकी वानखेडे

तालुक्यातील आडगाव येथे उसनवार दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाला कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली सविस्तर माहिती अशी की, सुरेश मकडू पाटील (वय-५०) रा. आडगाव ता. यावल जि.जळगाव हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी गावातील योगेश मुरलीधर पाटील याला उसनवारीने पैसे दिले होते. बुधवारी २ फेब्रुवारी रोजी सकाळी सुरेश पाटील यांनी उसनवारीने दिलेले पैसे योगेशकडे मागितले होते. याचा राग योगेशला आल्याने त्याने कुऱ्हाडीच्या दांड्याने सुरेश पाटील यांना बेदम मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांनी यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. याप्रकरणी दुपारी २ वाजता सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी योगेश पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप सुर्यवंशी करीत आहे.

नावाने 8 अ असून ग्रा.प .सचिवाने बेकायदेशीर गोठा पाडला ..

0

 

प्रतिनिधी जगन मोरे

श्री गजानन प्रल्हाद कोकाटे यांनी मुख्य कार्यकारि अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे आज दि .02/02/2022 ला तक्रार दिली आहे .त्या तक्रारी मध्ये त्याने असे नमूद केले कि माझ्या नावाने 4 ते 5 वर्षपासून सदरहू अतिक्रमण ग्रा .प .टिटवी येथे नोंदणीकृत आहे .त्या ठिकाणी माझा गुरांचा गोठा होता .ग्रामसेवक दीपक डोंगरदिवे ग्रा .प .टिटवी यांनी कोणतेही कारण नसताना किन्वा लेखी किंवा तोंडी नोटीस न देता सदरहू अतिक्रमण जागेत समशानभूमीची संरक्षण भिंत बांधायची आहे म्हुणुन हि जागा विशाल श्रीहरी राऊत यांची जे सी बी लावून बेकायदेशीरपणे माझ्या गुरांचा गोठा तोडला .याबाबत विचारले असता अरेरावीची भाषा वापरून उडवाउडवीची उत्तरे दिली .त्यामुळे माझे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे .
ग्रामसेवक दीपक डोंगरदिवे ग्रा .प .टिटवी यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असून त्यांच्यावर त्वरित निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी व माझे आर्थिक नुकसान भरपाई भरून देण्यात यावी .अशी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे केली

आ.समिर कुणावार यांचे पुढाकाराने आदिवासी बांधवांना शेतजमीनीचे पट्टे वितरित..

0

 

हिंगणघाट प्रतिनिधी, दि.०३
आदिवासी बांधवांचे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित शेतजमिनीचे पट्टे विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांच्या अथक प्रयत्नामुळे आता आदिवासी बांधवांना मिळाले असून गावातील आदिवासी तसेच पारधी समाजाच्या नागरीकांनासुद्धा घरकुलासाठी पट्टे मिळालेले आहेत, यातील काही प्रलंबित प्रकरणात तात्काळ पट्टे देण्यात यावे,यासाठी आ. समीर कुणावार हे प्रयत्नशील असल्याचे दिसुन येत आहे.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील जिल्ह्यातील सेलु तालुक्याअंतर्गत जुनोना येथील वनविभागाअंतर्गत येणाऱ्या शेतजमीनीचे पट्टे नुकतेच वितरित करण्यात आल्याने या पट्टेधारकांनी आनंद व्यक्त करीत आ. समीर कुणावार यांचे आभार व्यक्त केले आहे.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सर्वच अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमाकुल करण्यात यासाठी आ. समीर कुणावार हे जिल्हाधिकारी तसेच वनविभागाचे अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात असून अतिक्रमणधारकास वनजमीनी तसेच रहिवासी भूखंडाच्या अधिकाराचे पट्टे मिळवून देण्याचे कारवाईत हिंगणघाट विधानसभा क्षेत्र अग्रेसर असल्याचे निदर्शनास येत आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

मॉंटेरिया व्हिलेज, एक अभिनव प्रयोगशील ठिकाण, शहरी प्रवाशांच्या स्वागताकरिता सज्ज

0

 

मुंबई आणि पुण्याबाहेर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी एक नवीन पर्याय – ‘द व्हिलेज’

व्हिलेजमध्ये एक दिवस राहून तेथील कला, लोककला सादरीकरण तसेच अन्य पर्यायांसोबत समृद्ध संस्कृतीची मजा घ्या एक दिवस शेतकऱ्याचे जीवन जगून व्यापक अनुभव घ्या निसर्गासोबत नाळ जोडा आणि मुळांशी नाते दृढ करा

03 फेब्रुवारी 2022 : रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे सुमारे 35 एकर विस्तारलेल्या जागेत, मुंबई आणि पुण्यापासून अगदी दोनच तासांच्या अंतरावर मॉंटेरिया व्हिलेज नव्याने सुरू करण्यात आले आहे.
हा ब्रँड सर्वच वयोगटातील पाहुण्यांसाठी दिवसभर नवीन-डे-आऊटींग डेस्टीनेशन ठरतो आहे. एका गावात येणारे सगळेच अनुभव इथे येऊन घेता येतात. पाण्यात डुंबण्याकरिता तलाव, डोळे मिटून पडून राहण्यासाठी टांगण्यात आलेला झूला, लोकसंगीताचा आनंद देणारे सादरीकरण, आरोग्यदायी देशी आहार, मन रमवणाऱ्या बांबू आणि खाट विणकाम कलांची अनुभूती किंवा नेम धरायला लावणारा लगोरीचा खेळ अशी गंमत इथे अनुभवायला मिळणार आहे.

आठवड्याच्या धकाधकीतून क्षणभर वेळ काढून शहरालगत विकएंडची धमाल करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. इथे येऊन ग्राम संस्कृतीचा आनंद कला, संस्कृतीच्या माध्यमातून घेत, शेतातील पारंपरिक कामासोबत निसर्गाच्या संगतीत राहायला मिळते.
मॉंटेरिया रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापक संचालिका राही वाघाणी म्हणाल्या की, “मॉंटेरिया व्हिलेजमध्ये प्रवेश करताच क्षणी पाहुणे गावच्या आठवणीत रममाण होतात. दिवसभर शेतकऱ्याचे जीवन जगण्याची संधी त्यांना मिळते, शिवाय घरगुती जेवणाची लज्जत चाखता येते. लगोरीचा डाव, झुल्यावर झोके घेण्याचा आनंद, तलावात पोहणे आणि तणावमुक्त जीवन निसर्गाच्या सानिध्यात जगता येणार आहे. त्यातच कौशल्यपूर्ण कारागीर आणि कामगारांच्या हाताखाली सर्जनशीलता जपण्याचा अनुभवही घेता येईल. शहराच्या वेगातून ‘फुरसत’ मिळवून दोन क्षणाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी, आपल्या जीवलगांसोबत एकत्र क्वालिटी टाईम व्यतित करण्यासाठी हा उत्तम पर्याय ठरतो.”

तल्लीन करणारा कला अनुभव
याठिकाणी सुतार, फर्निचर घडवणारे, शिंपी, कुंभार, धातू तसेच दगडी काम करणारे कारागिर, बांबू आणि खाट विणकाम करणारे, लोहार, कातडी कमावणारे आणि सोनारांसोबत काम करता येईल. स्वत: कामाचा अनुभव घेऊन इथे तयार करण्यात आलेली कलाकृती सोबत नेता येणार आहे. त्याशिवाय न्हाव्याकडून केसांचा छानसा हेअर कट करता येईल, चंपी, मसाज करून घेता येईल. याठिकाणी महिला गृहउद्योगाद्वारे विक्रेत्यांनी तयार केलेल्या चविष्ट आणि लज्जतदार पापड, लोणची तसेच श्रीखंडाचा आनंद घेता येणार आहे.

शेतात वेळ घालवणे
मॉंटेरिया व्हिलेजचा कृषी भविष्यावर विश्वास आहे आणि त्यांनी शेतीच्या जुन्या पद्धतींसोबत हायड्रोपॉनिक्ससारख्या आधुनिक तंत्राचा अवलंबही केला आहे. पारंपरिक ग्राम तंत्रात बायोगॅस, गांडूळखत निर्मिती, शेण्या थापणे, गोमूत्र गोळा करणे तसेच ग्रीनहाऊसमध्ये फुलांची शेतीचा समावेश आहे. पर्यटकांना सर्वसमावेशक पद्धतीच्या धन्वंतरी गार्डनसारख्या शेतीविषयक अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल किंवा शेतातील ताज्या उत्पादनाचा गंध अनुभवण्यासाठी फेरफटका मारता येणार आहे.

अन्नपदार्थ आणि पेयपान
इथल्या मोकळ्या हवेत भटकंती करताना भूकेची जाणीव झाल्यास स्थानिक ठेल्यांवर चवदार पाणी पुरी, तोंडाला पाणी आणणारे चपटे चणे आणि चटकदार चाटप्रकार चाखता येतील. बर्फाचा गोळा आणि मडक्यातील दही मौज गारेगार करतील. तर तहान भागवण्यासाठी नारळपाणी, बडीशोप पाणी, कोकम सरबत, गोटी/मार्बल सोडा, ताक किंवा कटींग चहा/कॉफीचा पर्यायही असेल.

रेस्टॉरंट साबराजमध्ये घरगुती चवीचे शाकाहारी आणि मांसाहारी जेवण घेता येईल. त्यासाठी शेतात पिकवलेल्या भाज्या किंवा मांस, गहू-बाजरी/ज्वारी आणि तांदळाच्या पोळ्या/भाकऱ्या, डाळ-भात, कढी-भात व पारंपरिक गोड पदार्थ ताटात वाढले जातील.

येथील मुख्य आकर्षण
याठिकाणी असलेली नक्षत्र बाग डोळ्यांना भुलवणारी आहे. अवकाशातील 12 नक्षत्रे किंवा राशी चिन्हांवर आधारलेली आहे. इथे प्रत्येक पाहुण्यांना निसर्गातील सकारात्मक स्पंदने अनुभवता येतील.

दीर्घ प्रवासाच्या आठवणीत नेणारी ग्रीन ट्रेन, स्विंग सर्कल आणि जायंट हारनेसची धमाल पोटात फुलपाखरं उडत असल्याचा भास निर्माण करतील, शिवाय बुलेट चकडोची रपेट मन प्रफुल्लित करेल. इथे फिरत असताना गुंफेतून भटकंती करता येईल. शिवाय बांबूच्या मचाणावर शांतीचा आनंद मिळेल. इथे लक्ष्मण झुल्याची प्रतिकृती देखील पाहता येईल.

मॉंटेरिया व्हिलेज आपल्याला लहानपणीच्या आठवणीत रममाण करेल. त्याचप्रमाणे लगोरी, गोट्या खेळणे किंवा टायरमागून पळणे भूतकाळात घेऊन जाईल.
संध्याकाळच्या रम्य वातावरणासाठी इथे आनंद मेळ्याचा आनंद घेता येईल. लोकसंस्कृतीचे दर्शन सोबतच मनोरंजन करणारे क्रियाकलाप दिवस साजरा करतील. येथील अँफी थिएटरमध्ये लोककलेचे सादरीकरण होते, ज्यामध्ये लोकसंगीतासोबत, नृत्य आणि रंगमंचीय कलांचा आनंद घेता येईल. हा सामाजिक संवादाचा, घरच्या मायेची ऊब देणारा सोहळा आहे.

प्रेक्षक- लक्ष्य
मॉंटेरिया व्हिलेजमध्ये प्रत्येकासाठी काहीतरी आहे. ही ठिकाण प्रत्येक वयोगटाच्या दृष्टीने साजेसे आहे. इथल्या खुल्या वातावरणात मुलांसाठी बरेच क्रियाकलाप, झोपाळे, फिरण्याचे ट्रॅक आणि ज्येष्ठ नागरिकांना गुंतवून ठेवणारे, आरामदायक पर्याय आहेत. हे ठिकाण कॉर्पोरेट पार्टी, चर्चासत्रे आणि ऑफ-साईट भटकंतीकरिता योग्य आहे. इथे अभिनव पद्धतीने संकल्पना राबविण्यात आली असून व्यक्तिगत वेळेची सुसूत्र आखणी टीम-बिल्डिंगला प्रोत्साहन मिळते. या ऑफबीट ठिकाणी जोडप्यांना परस्पर नाते दृढ करण्याची संधी मिळते. खुल्या वातावरणात पारंपरिक आहार उपलब्ध असून एकावेळी 1500 पर्यटक लाभ घेऊ शकतात.

स्वच्छता
सध्याचा महासाथीचा काळ लक्षात घेता, याठिकाणी स्वच्छता विषयक सर्व खबरदारी घेण्यात आलेली असून पाहुण्यांच्या सुरक्षेची हमी राहते. येथील सर्व कर्मचारी वर्गाने लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. पर्यटकांना प्रवेश घेताना, बुकिंग दरम्यान लसीकरण प्रमाणपत्रे सादर करावे लागेल. सर्वच थांब्यांवर हात निर्जंतुक करण्याची सुविधा आहे.
इथल्या परिसरात प्रवेश घेताच क्षणी तुम्ही या गावाचा एक भाग होऊन जाता..

आम्ही तुमच्यासाठी सज्ज आहोत.
मॉंटेरिया व्हिलेजमध्ये सर्व-समावेशक पॅकेजची सुविधा असून त्यात सकळचा नाश्ता, दुपारचे जेवण, चहा आणि मॉंटेरिया व्हिलेज अनुभवाची सुविधा आहे. प्रती दिवस माशी खर्च रु 999 (मूल), रु 1499 (ज्येष्ठ नागरीक) आणि रु 1699 (प्रौढ) याप्रमाणे दर आहेत.
नोंदणीची माहिती: www.monteriavillage.com

मॉंटेरिया व्हिलेजविषयी
मॉंटेरिया व्हिलेज हे एक पर्यटकांना अभूतपूर्व अनुभव देण्यासाठी निर्माण करण्यात आलेले आदर्श ग्राम जीवनावर आधारलेले ठिकाण आहे. हे रायगड जिल्ह्यातील खालापूर शहरात सुमारे 36 एकरवर विस्तारलेले आहे. इथे निसर्गाच्या सानिध्यात पर्यटकांना भारतीय गावातील नियमित जीवनासोबत संस्कृती, आहार वैविध्य, मनोरंजन, कला आणि परंपरेचा आनंद घेता येईल. इथे येऊन प्रत्येक वयोगटातील व्यक्ती पुन्हा बालपणात रमेल आणि मुळाशी जोडली जाईल. मॉंटेरिया व्हिलेज हा मुख्य हॉस्पिटलिटी फर्म Monteria Resort Pvt. Ltd. चा भाग असून मुंबईलगत असलेल्या लोकप्रिय रिसॉर्टपैकी एक आहे.

 

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या सामाजिक कार्यकर्त्यांन सह विद्यार्थ्यांची मागणी .

0

 

अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक

कारंजा (घा ) /प्रतिनिधी :इयत्ता 10 वी व 12 वी ची परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घेण्यात यावी अशी मागणी आज तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली .तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनामध्ये वर्धा जिल्ह्यातील वर्ग 10 व वर्ग 12 हे कोरोना संसर्गजन्य आजारामुळे मागील दोन वर्षांपासून ऑनलाईन भरविण्यात आले आहे .सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले .ही बाब लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या पालकांची इच्छा पाहता वर्ग 10 व 12 वी ची परीक्षा ऑफलाईन घेण्याऐवजी ऑनलाईन घेण्यात यावी .त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील कोरोना विषयक भीती दूर होईल कोरोना चा प्रादुर्भाव कमी करता येईल .या बाबी लक्षात घेता परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घेण्यात याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांसह विद्यार्थ्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली .यावेळी सामाजिक कार्यकर्ते पियुष रेवतकर , राणा सिंग बावरी ,संकेत बानाइतकर ,प्रज्वल कडू ,रिपल डोंगरे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बांधकाम कामगारांसाठी मध्यान्य भोजन योजना मदतनीस – राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू परतवाडा येथे मध्यान्य भोजन योजनेचा शुभारंभ

0

 

 

उषा पानसरे( कार्यकारी संपादिका) विकी वानखड़े (कार्यकारी संपादक)

बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणीच जेवणाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली मध्यान्य भोजन योजना कामगारांना निश्चितच मदतनीस ठरणार, असा विश्वास कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज व्यक्त केला.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी अटल आहार योजनेंतर्गत मध्यान्य भोजन योजना राबविण्यात येते. अचलपूर उपविभागीय अधिकारी प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात मध्यान्य भोजन योजनेचा शुभारंभ राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. अचलपूर उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसिलदार मदन जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अभयकुमार बारब्दे, सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे आदी यावेळी उपस्थित होते.

मजूरांना पूर्ण व सकस अन्न उपलब्ध व्हावे यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून श्री. कडू म्हणाले की, बांधकाम क्षेत्रातील मजूर रोजगारासाठी इतर जिल्ह्यात येतात. कामानिमित्त मजूरांचे स्थलांतरण मोठ्या प्रमाणावर होते. कामाच्या अनिश्चिततेचा परीणाम त्यांच्या जेवणावर होतो. याचा परीणाम कामगारांच्या शारिरिक क्षमतेवर होतो. यासाठी कामगारांना रोज सकस आहार मिळावा, यासाठी ही योजना राबविण्यात येते. कोरोना काळ असल्यामुळे सध्या मध्यान्य भोजन योजनेत कामगारांना मोफत भोजन देण्यात येत आहे. नोंदणीकृत मजूरांची संख्या लक्षात घेऊन भोजनाची व्यवस्था करण्यात येते. परंतु नोंदणी अभावी एकही बांधकाम कामगार उपाशी राहू नये, याची दक्षता संबधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. नोंदणी न झालेल्या बांधकाम कामगारांची त्वरित नोंदणी करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

मध्यान्य भोजन योजनेमध्ये कामगारांना एका वेळच्या भोजनात बाराशे कॅलरीज मिळतील एवढा आहार देण्यात येतो. या आहारात पोळी, दोन भाज्या, डाळ, भात व इतर आहाराचा समावेश आहे. या योजनेमुळे कामगारांच्या स्थलांतरावर आळा बसून कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण निश्चितच कमी होण्यास मदत होणार आहे. परतवाडा येथे प्रथमच कामागारांसाठी मध्यान्य भोजन योजना सुरु होत असल्याबद्दल राज्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

मध्यान्य भोजन योजना सध्या अचलपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात सुरु राहील. गरजेप्रमाणे प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी जाऊन मजूरांना भोजन उपलब्ध करुन दिले जाईल, अशी माहिती राहुल काळे यांनी यावेळी दिली.

जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयाला लवकरच नवीन इमारत

जिल्हा व अप्पर जिल्हा सत्र न्यायालयातील वकील संघामार्फत राज्यमंत्री श्री. कडू यांचा सत्कार करण्यात आला. वकील संघासाठी नवीन इमारत बांधकामाचा प्रश्न त्वरित मार्गी लागण्यासाठी संघामार्फत त्यांना निवेदन सादर करण्यात आले. न्यायालयीन कामांना वेग येऊन प्रलंबित कामांचा तात्काळ निपटारा व्हावा, यासाठी न्याय व्यवस्था महत्त्वपूर्ण आहे. न्यायदानाची इमारत सर्व सोयींनी सुसज्ज असावी. विधीज्ञांना बसण्यासाठी उत्तम आसन व्यवस्था, प्रशासकीय कामकाजासाठी स्वतंत्र कक्षांचा त्यात समावेश करण्यात येईल. तसेच आजूबाजूच्या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येऊन न्यायालय इमारतीचे बांधकाम लवकरच सुरु करण्यात येईल, असे आश्वासन श्री. कडू यांनी यावेळी दिले. वरिष्ठ विधिज्ञ ॲङ सुरेश गुलक्षे, संघाचे अध्यक्ष ॲङ विजय गोडबोले, उपाध्यक्ष ॲङ. मोहम्मद सलिम, सचिव ॲङ आशिष अग्रवाल तसेच विधिज्ञ यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संतोष हिवराळे तर आभार श्री. सलिम यांनी मानले.

श्री सिध्दीक्षेत्र वाघामाता उद्यान परीसरातील रस्ते बांधकामाचा शुभारंभ

परतवाडा येथील श्री सिध्दीक्षेत्र वाघामाता उद्यान परिसरात रस्ते बांधकाम, सौंदर्यीकरण आणि विद्युतीकरण कामाचे उद्घाटन राज्यमंत्री श्री. कडू यांच्या हस्ते करण्यात आले. वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत हे विकास काम करण्यात येणार असून यासाठी 51 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. श्री सिध्दीक्षेत्र वाघामाता संस्थानामार्फत श्री. कडू यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
मिश्रा चौक येथील गणपती सभागृह बांधकाम, टिळक चौकाचे डांबरीकरण, आठवडी बाजार ते पोलीस स्टेशन रोड डांबरीकरण तसेच शहरातील विविध रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचे उद्घाटन व लोकार्पण राज्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

Bacchu Kadu

पुष्पा सिनेमा स्टाईलने चंदन तस्करी करण्याचा डाव फसला सुलतानपूर ते बोरखेडी रस्त्यावर चंदनाची तस्करी करताना

0

 

एकास अटक 55 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोणार /सतीश मुलंगे:

| सध्या सुरू असलेल्या पुष्पा सिनेमा ने धुमाकूळ | घातला आहे. त्याच स्टाईलने चंदन तस्करी | करण्याचा डाव सुलतापुर बोरखेडी रस्त्यावर फसला. सुलतापूर ते बोरखेडी रस्त्यावरून काही | लोक सुगंधित चंदनाची चोरून वाहतूक करत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून | उपविभागीय पोलीस विलास यामावार यांना मिळाली होती.

त्यानुसार उपविभागीय पोलीस | अधिकाऱ्यांनी त्यांच्या पथकाला कारवाई | करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने | सुलतानपूर बोरखेडी रस्त्यावर पथकाने सापळा

रचला. बोरखेडीकडून सुलतानपूरकडे पोलिसांना सह कलम २६ (१ (इ) भारतीय वनअधिनियम एक मोटारसायकल ट्रिपल सीट येताना दिसली मात्र पोलीस दिसताच मोटरसायकलवरील दोन जण हातातील पांढरे पोते टाकून पळून गेले तर मोटारसायकल चालक आसिफ खान फिरोज खान याला पोलिसांनी पकडले.

त्याच्याकडून १ किलो २०० ग्रॅम सुगंधित चंदनाचा गाभा ( किंमत ३६०० रुपये ) सुगंधित चंदनाचा गाभा असलेली ७ लाकडेमेहकरच्या उपविभागीय पोलीस ( किंमत २३ हजार रुपये). एक मोटारसायकल दोन मोबाइल व लाकूड तोडीची अवजारे असा एकूण ५५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विरुध्द कलम ३७९, ३४भादवी

१९२७ प्रमाणे सह कलम १२८/१७७.३/१८१, १५८/१७७ गुन्हा दाखल केला आहे. आसिफ खानची चौकशी केली असता त्याच्याच गावचा मनोज उत्तम गवई व शेख शोएब शेख ईसा ( रा. नवीन घरकुल, लोणार) फरार झाल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी आसिफ, मनोज आणि शोएबविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अधिकाऱ्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक मदन गीते पोहेकाँ खालिद खान पो. ना. कैलास मुदळकर, पोकों समाधान पवार, चालक पोकाँ विलास जायभाये यांनी केली.