Home Blog Page 341

पंचायत समिती देवणी येथील शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान बांधकामास मंजुरी

0

 

(लातुर/निलंगा)प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

देवणी येथे पंचायत समितीची नुतन व सुसज्‍ज इमारत तयार झालेली आहे. मात्र पंचायत समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्‍थान नसल्‍याने त्‍यांची गैरसोय होत होती.
ही बाब लक्षात येताच आमदार श्री.संभाजीभैय्या पाटील निलंगेकर यांनी देवणी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्‍या निवासस्‍थानासाठी प्रशासकीय मान्‍यता द्यावी व निधी उपलब्‍ध करून दयावा अशी मागणी ग्रामविकास मंत्री ना.श्री.हसन मुश्रीफ यांच्‍याकडे पत्राद्वारे केली.
एवढ्या वरच न थांबता संभाजीभैय्यांनी सातत्याने पाठपुरावा करून या कार्यासाठी १३ कोटी ३ लाख रूपयांच्या निधीसह प्रशासकीय मान्‍यता मिळवली. त्यामुळे देवणी पंचायत समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आता एकुण २६ निवासस्‍थाने या निधीच्‍या माध्‍यमातून उभारली जाणार आहेत.अशी माहिती देण्यात आली.

जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था ,जिल्हा शिक्षण विभाग बैठक अमरावती कैवल्य एजूकेशन फाँडेशन बैठक

0

 

उषा पानसरे असदपूर मूख्य कार्यकारी संपादक
9921400542

याचीसंयूत्त विधमाने जिल्हा गूणवत्ता बैठक घेण्यात आली बैठकीची सूरूवात रूबिना सैफ कार्यक्रम व्यवस्थापक ,कैवल्य संस्था यांनी संस्थेची त्याचा कामाची ओळख करूण दिली कैवल्य एजूकेशन फाँउनडेशन ही संस्था ही शैक्षणित क्षेत्रा मध्ये दोन हजार आठ पासून देशात कार्यरत आहे संस्थेचा उद्देश शैक्षणित गूणवत्ता वाढ महीला सक्षमीकरण तसेच तांत्रीच सहकार्यातून शैक्षणित यंत्रणा ना सक्षम करण्या करिता सहकार्य या अनूषगाने हि संस्था काम करित आहे पवन कूमार यांनी या संस्थेच्या उपक्रमांची मांडणी केली तर मिलींद कूबडे प्राचार्य यानी सूरूवात उपक्रमाने ता. शिक्षण अधिकारी फेलो यांचे समन्वाने गाव पातळी वर शिक्षक ,मूख्यध्यापक यांच्या सोबत पारदर्शकता ठेवून कार्य करता येवु शकते या बैठकीला मिलींद कूबडे प्राचार्य जिल्हा प्रशिक्षण संस्था अमरावती श्री गंगाधर मोहने उपशिक्षण अधिकारी ,जिल्ह परिषद अमरावती श्री प्राशांत डवरे जेष्ठ अधिव्याख्याता प्रविण राठोड अधिव्याख्याता पवन मानकर अधिव्याख्याता रूबिना सैफ प्रकल्य व्यवस्थापक कैवल्य संस्था ई मान्यवर उपस्थित होते तसेच 14 तालूक्यातील करूणा फेलोज पवन कूमार श्री स्वप्निल बनसोड, सिमा खान !जोत्याना मेहकरे प्रोग्राम लीडर सहभागी

यापूर्वीच्या अर्थसंकल्पांप्रमाणे यंदाचा अर्थसंकल्पही ‘अर्थहीन’ आहे. :-अजित पवार

0

 

SURYA MARATHI NEWS

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक) सह विकी वानखड़े (संपादक)

दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन पूर्णपणे फसल्यानंतर यंदा साठ लाख नोकऱ्यांचं नवं गाजर दाखवण्यात आलं आहे. ‘एलआयसी’च्या आयपीओची घोषणा ही नफ्यातील शासकीय कंपनीच्या खासगीकरणाच्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे. हा अर्थसंकल्प पुढच्या २५ वर्षांच्या विकासाची ब्ल्यूप्रिन्ट असल्याचा दावा निरर्थक असून निवडणूका असलेल्या पाच राज्यांमधल्या जनतेची मनधरणी करण्याचा अयशस्वी प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर करण्याची घोषणा करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी गेल्या आठ वर्षात या दिशेनं केंद्र सरकारनं काय केलं याच उत्तर आता तरी द्यावं. ‘मेक इन् इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ या घोषणांप्रमाणे यंदाच्या अर्थसंकल्पातील घोषणाही हवेत विरुन जातील, असं दिसतं. महागाईवाढ कमी करण्यासाठी आणि रोजगार वाढीसाठी या अर्थसंकल्पात कोणतीही ठोस घोषणा नाही.कॉर्पोरेट टॅक्स १८ % वरून १५ % केला. मात्र, प्राप्तिकराची मर्यादा वाढवणं आणि कराचा दर कमी करण्याबाबत कोणतीही घोषणा नसल्यानं मध्यमवर्गीय नोकरदारांची, सामान्य करदात्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. अर्थसंकल्पात मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्त करण्याची घोषणा झाली. हिऱ्यांचे दागिने स्वस्त झाले. पण, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस या जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी करायला केंद्र सरकार सोयीस्कर विसरलं. यातून त्यांचा प्राधान्यक्रम दिसतो. गरिबांना दिल्या जाणाऱ्या अन्नधान्यावरील तसंच शेतकऱ्यांच्या खतावरील अनुदानाची रक्कम कमी करण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. गरीब, वंचित घटकांना, शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. सध्याचं केंद्रातलं सरकार हे प्रसिद्धीवर चालतं, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. केंद्र सरकारच्या एका कार्यक्रमासाठी साठ-पासष्ट कॅमेऱ्यांचा सेटअप लावला जात असल्याचं आपण बघितलं आहे. या पार्श्वभूमीवर कॅमेऱ्याच्या लेन्सवरील कर कमी करण्याचा केंद्रीय अर्थमंत्र्यांचा निर्णय संयुक्तिक वाटतो. शेतकऱ्यांकडून थेट धान्य खरेदीसाठी नवी केंद्र उभारण्याची घोषणा करताना सध्याच्या केंद्राच्या बळकटीकरणासाठी काय करणार, याबाबतही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे. यंदाच्या अर्थसंकल्पातील घोषणा चालू वर्षातंच नाही तर पुढच्या तीन वर्षांत तरी मार्गी लागतील का, याबाबत शंका आहे. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे आणि सर्वसाधारण बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. आवास योजनेसाठी ४८ हजार कोटींची तरतूद अपूरी आहे. अहमदाबादला ‘गिफ्ट सिटी’ची गिफ्ट किती वर्ष सुरु राहणार आणि केव्हा संपणार हे समजून येत नाही. अर्थसंकल्पात किमान आधारभूत किंमतीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जातील या बाबींव्यतिरिक्त शेतकऱ्यांसाठी कोणत्याही सवलती देण्यात आल्या नाहीत. वंचित घटकांसाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही. व्हर्च्युअल डिजिटल अॅसेट म्हणजे क्रिप्टो करन्सीवर ३० टक्के कर आकारण्यात आल्यानं देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील आर्थिक उद्योगाला फटका बसणार आहे. राज्यांना भांडवली खर्चासाठी देण्यात येणाऱ्या व्याजमुक्त ५० वर्षाच्या कर्जामध्ये केंद्र सरकारने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय तरतूद दहा हजार कोटींवरुन १५ हजार कोटी करण्याच्या तसंच पुढील वर्षासाठी ही तरतूद १ लाख कोटी करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचं स्वागत आहे. हे कर्जवाटप करताना अनावश्यक जाचक अटी लावू नये, अन्यथा राज्यांना याचा फायदा मिळणार नाही. अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जानेवारी २०२२ मध्ये जीएसटीची वसूली सर्वोच्च झाली असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. याचा फायदा राज्यांना देण्याबाबत अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा नाही. वस्तू व सेवाकराची वसूली वाढल्यामुळे राज्यांचा केंद्रीय करातील हिस्सा वाढवणं आवश्यक आहे. वस्तू व सेवाकराच्या वसुलीतील नुकसान भरपाई राज्यांना मिळण्यास पुढील ५ वर्षे मुदतवाढ देण्याची विनंती राज्यांनी केंद्र शासनाकडे केली आहे. त्याबाबत अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा नाही; यानंही राज्यांची निराशा झालेली आहे. राज्याची वस्तू व सेवाकर नुकसान भरपाईची थकबाकी राज्याला त्वरित मिळावी.

अखेर वादग्रस्त ठाणेदार किशोर तायडे शिकायत कर्ता सोबत उददंड व्यवहार !शेवट बदली

0

 

उषा पानसरे असदपूर
दि.1 /फेब्रूवारी

आसेंगाव पूर्णा पोलिस स्टेशन ठाणेदार किशोर गोरख तावडे सहायक पोलीस निरिक्षक याची बदली करण्यात आली वादग्रस्त ठाणेदार फिर्यादी सोबत उद्धट वागणूक ,करून ठाण्यातून तक्रार दाखन , न करता हाकलून देत असल्यास ,व अवैद धंदे वाल्याना श्रेय देत असल्या , फिर्यादी याची बाजू न घेता आरोपी ची बाजू घेवून फिर्यादी ला पोलीस पाटील च्या मदतीने फिर्यादीलाच खोटया गून्हाची फाईल तयार करूण गून्हा दाखल करणार्‍या ठाणेदाराची ची शेवट बदली आम नागरिकांचा आरोप गरिब जनता खूश आसेगाव चे नविन ठाणेदार सहायक पोलीस निरिक्षक मिलन बाळकृष्ण कोयल पोस्टे आसेंगाव येथे आले पोलीस अधिक्षक ग्रामीण श्री अविनाश बारगळ अमरावती प्रत मार्फत उपविभागिय पोलीस अधिकारी,उपविभाग अमरावती ग्रामीण प्रत माहितीस अपर पोलीस अधिक्षक पोलीस उप अधिक्षक उपविभागिय पोलीस अधिकारी अमरावती ग्रामीण प्रभारी अधिकारी पोस्टे आसेगाव / सी,आर,ओ / पी,आर ,ओ स्थागूशा जिवीशा अम ग्रा
प्रत सविनय सादर मा. पोलीस उप महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र अमरावती कार्यवाही साठी प्रभारी अधिकारी पोस्टे सायबर अमरावती ग्रामीण सदर आदेश उपरोक्त संबंधितास ईमेल द्रारे आजच प्रसारित केले

जि, प,पूर्व माध्यमिक उर्दू शाळा पूर्णा नगर येथे 73, वा प्रजा सत्ताक दिन उत्साहात साजरा

0

 

उषा पानसरे असदपूर

जि,प.पूर्व माध्यमिक उर्दू शाळा पूर्णा नगर येथे 73 वा प्रजासत्ताक दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला,, पूर्णा नगर, प, स, भातकुली अंतर्गत येणाऱ्या पूर्णा नगर येथील मुख्यधयपाक, मो, अशफाक अ, रज्जाक सर यांच्या हस्ते ध्वजा रोहण करण्यात आले, व पूर्णा नगर येथील श्री, गजेंद्र सिंह गहरवार, सरपंच, अ, अलीम अ, तमीज शेख, शाळा समिति अध्यक्ष, मो, नाज़िम काजी, शेख, महबूब, सदयस व नाजमीन बाजी यांनी आपले मनोगत व्यक्तत केले, तसेस शाळेतील शिक्षक, व शिक्षिका, अ, फारूक सर नवेद इक़बाल सर, नगमा बाजी,, नूरजहाँ बाजी, नाजिया बाजी, सायरा बाजी शबाना बाजी, उपस्थित होते, नवेद सर यांनी आभर प्र दशन केले,

नेहरू युवा केंद्राच्या वतीने…शेगावात युवक – युवती सक्षमीकरण एकदिवसीय कार्यशाळा

0

 

शेगाव : युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी नेहरू युवा केंद्राची भूमिका फार महत्वाची असून युवकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी नेहरू युवा केंद्राची वाटचाल आहे त्यामुळे युवक युवतींनी सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी नेहरू युवा केंद्र मध्यम करावे असावे असे मत तहसीलदार समाधान सोनवणे यांनी १ फेब्रुवारी रोजी केले आहे.
नेहरू युवा केंद्राच्या वतीने आयोजित सकारात्मक जीवनशैली व युवक युवती सक्षमीकरण एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन पंपंचायत समिती सभागृहात करण्यात आले होते. दिपप्रज्वलन व गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार समाधान सोनवणे तर परिविक्षाधीन तहसीलदार पवन पाटिल, विस्तार अधिकारी संदिप दळवी, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश चिंचोलकर, नानाराव इंगळे, युवा विकास केंद्र अध्यक्ष लक्ष्मणराव गवई, शीला मोहोड यांची प्रमुख उपस्थिती होती. पंचायत समितीत ग्रामीण भागाचे कामकाज कशाप्रकारे चालते याचे अवलोकन उपस्थितांनी प्रत्यक्ष केले त्यानंतर सखोल मार्गदर्शन विस्तार अधिकारी संदिप दळवी यांनी केले त्यानंतर कोरोना विषयावर जनजागृती आपल्या मनोगतातून डॉ.प्रकाश चिंचोलकर यांनी केली. तर शीला मोहोड व नानाराव इंगळे यांनी महिला सक्षमीकरण ही काळाची गरज असून महिलांसाठी असलेल्या योजनां सांगून लाभ घेण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक कोमल बेडेकर, द्वितीय अंकिता झाडोकार व तृतीय गीतांजली शास्त्री यांनी पटकवल्याबद्दल त्यांना तहसीलदार समाधान सोनावणे यांच्याहस्ते सन्मानचिन्ह देण्यात आले. यावेळी नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक सुरज बोरसे, निशा हागे, शिवाजी हावरे, सुमित वाकोडे, दर्शन गवई मातृशक्ती संघटनेच्या वैशाली तायडे, मुक्ता ठाकूर, वर्षा भोंडेकर, नारीशक्तीच्या निता पाटिल, रिपाई गटाच्या राजकन्या रेवसकर, सामाजिक कार्यकर्ते दत्ता भोंडेकर यांच्यासह युवक युवती उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्तावित लक्ष्मणराव गवई तर संचालन पत्रकार अमर बोरसे यांनी व आभार स्वयंसेवक सुरज बोरसे यांनी मानले.
# नेहरू युवा केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र तहसीलदार समाधान सोनवणे, पवन पाटिल, विस्तार अधिकारी संदिप दळवी यांच्याहस्ते देण्यात आले.

नायगाव येथील पंतप्रधान आवास योजना ( ड यादी )यात पात्र लाभार्थ्यांना डावलण्यात येवुन अपात्र लाभार्थ्यांची घरकुल मंजुर ग्रामस्थांची बिडीओकडे तक्रार

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

 

तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायती अंतर्गत मंजूर करण्यात आलेली पंतप्रधान आवास योजनेची ड यादीत खऱ्या लाभार्थ्यांना वगळण्यात आले असून त्यांना तात्काळ यादीत समाविष्ट करण्यात यावे. तसेच अपात्र लाभार्थ्यांचा यादीत समावेश करणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा नायगाव ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

 

या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा की, नायगाव ग्राम पंचामतच्यावतीने दि. १ मे २०१६ रोजी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी गावातील लाभार्थ्यांचा सर्व्हे करून एकुण ४३६ घरकुलच्या पात्र लाभार्थ्यांची यादी मजूर करण्यात आली होती. परंतु, दि. २८ जानेवारीच्या झालेल्या ग्रामसभेत एकुण २०२ घरकुल मजूर करण्यात आले असल्याची माहीती समोर आली आहे. यातील २३४ पात्र लाभार्थ्यांची नांवे मात्र प्रतिक्षा यादी ठेवण्यात आल्याने गावात ग्रामस्थांमध्ये प्रचंड असे नाराजीचे वातावरण पसरले आहे. सदरची मंजुर झालेली घरकुलांच्या यादीत जे खरे व पात्र व लाभार्थी आहेत त्यांची कच्ची , कुळाची घरे , झोपडी अशी घरे आहेत त्यांच्या घरांना सर्वेक्षणात घरकुल पक्की टु रूम किचन अशी पक्की घरे असल्याचे दर्शविण्यात आली आहेत. ज्यांची पक्की घरे आहेत अशांना लाभार्थी दाखण्यात आले आहे. त्यांची घरकुल मंजूर करण्यात आली आहे . पंतप्रधान आवास योजने अंतर्गत खरे लाभार्थ्याना डावण्यात आले असल्याने गरजु लाभार्थ्यांवर हा अन्याय होत असल्याने तात्काळ २३४ पात्र व खरे विधवा, अपंग आणि बेघर तसेच कच्ची घरे असलेल्या लाभार्थ्यांंचे नांव समाविष्ठ करण्यात यावे व वशिलेबाजीने मंजूर करण्यात आलेल्या घरकुल लाभार्थ्यांंची तात्काळ चौकशी करण्यात यावी. गावातील पात्र घरकुल लाभार्थ्यांवरील झालेला अन्याय दुर करावा तसे न झाल्यास सर्व ग्रामस्थ पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर मुस्तफा हैदर तडवी, विनोद बाबु तडवी, लुकमान महारू तडवी, सुभान इमाम तडवी, छबु खुदयारखा तडवी, फकीरा सुभान तडवी, सिकंदर ईमाम तडवी, राबीया राजु तडवी, हमीद ईकबाल तडवी, रशीद निजाम तडवी, फिरोज कलींदर तडवी , निजाम बक्षु तडवी आदीच्या स्वाक्षरी आहेत.

आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा नायगाव ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी,IAS नेहा भोसले यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

 

तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायती अंतर्गत मंजूर करण्यात आलेली पंतप्रधान आवास योजनेची ड यादीत खऱ्या लाभार्थ्यांना वगळण्यात आले असून त्यांना तात्काळ यादीत समाविष्ट करण्यात यावे. तसेच अपात्र लाभार्थ्यांचा यादीत समावेश करणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा नायगाव ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

 

या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा की, नायगाव ग्राम पंचामतच्यावतीने दि. १ मे २०१६ रोजी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी गावातील लाभार्थ्यांचा सर्व्हे करून एकुण ४३६ घरकुलच्या पात्र लाभार्थ्यांची यादी मजूर करण्यात आली होती. परंतु, दि. २८ जानेवारीच्या झालेल्या ग्रामसभेत एकुण २०२ घरकुल मजूर करण्यात आले असल्याची माहीती समोर आली आहे. यातील २३४ पात्र लाभार्थ्यांची नांवे मात्र प्रतिक्षा यादी ठेवण्यात आल्याने गावात ग्रामस्थांमध्ये प्रचंड असे नाराजीचे वातावरण पसरले आहे. सदरची मंजुर झालेली घरकुलांच्या यादीत जे खरे व पात्र व लाभार्थी आहेत त्यांची कच्ची , कुळाची घरे , झोपडी अशी घरे आहेत त्यांच्या घरांना सर्वेक्षणात घरकुल पक्की टु रूम किचन अशी पक्की घरे असल्याचे दर्शविण्यात आली आहेत. ज्यांची पक्की घरे आहेत अशांना लाभार्थी दाखण्यात आले आहे. त्यांची घरकुल मंजूर करण्यात आली आहे . पंतप्रधान आवास योजने अंतर्गत खरे लाभार्थ्याना डावण्यात आले असल्याने गरजु लाभार्थ्यांवर हा अन्याय होत असल्याने तात्काळ २३४ पात्र व खरे विधवा, अपंग आणि बेघर तसेच कच्ची घरे असलेल्या लाभार्थ्यांंचे नांव समाविष्ठ करण्यात यावे व वशिलेबाजीने मंजूर करण्यात आलेल्या घरकुल लाभार्थ्यांंची तात्काळ चौकशी करण्यात यावी. गावातील पात्र घरकुल लाभार्थ्यांवरील झालेला अन्याय दुर करावा तसे न झाल्यास सर्व ग्रामस्थ पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर मुस्तफा हैदर तडवी, विनोद बाबु तडवी, लुकमान महारू तडवी, सुभान इमाम तडवी, छबु खुदयारखा तडवी, फकीरा सुभान तडवी, सिकंदर ईमाम तडवी, राबीया राजु तडवी, हमीद ईकबाल तडवी, रशीद निजाम तडवी, फिरोज कलींदर तडवी , निजाम बक्षु तडवी आदीच्या स्वाक्षरी आहेत.

कृषिपंपाची वीज बंद केल्याने शेतकरी आक्रमक वीज बिल घ्या पण लाईन द्या शेतकऱ्यांची मागणी

0

 

अर्जुन कराळे शेगांव

शेगाव : तालुक्यातील वरखेड बुद्रुक जवळा टाकळी नागझरी परिसरातील कृषिपंपाची वीज पुरवठा बंद केल्याने शेतकरी आक्रमक होऊन शेगाव येथील वीज कार्यालयावर धडकले सुरू करा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी लावून धरले
शेगाव तालुक्यातील वरखेड बुद्रुक जवळा नागझरी टाकळी शिवारात यांचे कृषी पंप आहेत सध्या रब्बी पिके जोरात असून पाण्याची आवश्यकता आहे त्यासाठी वीज पुरवठा गरजेचा असून द्यायला तयार आहोत मात्र वीज पुरवठा बंद करू नका वीज पुरवठा सुरू ठेवा अशी मागणी शेतकऱ्यांनी उप विभागीय अभियंता शरद भोसले यांच्याकडे केली परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी पंप धारक शेतकऱ्यांनी वीज बिल न भरल्यामुळे प्रथम शुक्रवारी एका डीपीवरील बंद केला नंतर दुसऱ्या डिलिव्हरी बंद पुरवठा बंद करण्यात आला त्यावर सोमवारी परिसरातील शेतकरी एकत्र येऊन आम्ही विज बिल भरण्यास तयार आहोत मात्र आमचे वीज पुरवठा बंद करू नका अशी मागणी करत आम्हाला बिल द्या आम्ही बिल भरतो असे असे सांगून त्यावर उपविभागीय अभियंता यांनी ग्रामीण विभागाच्या कार्यालयात येऊन त्यांना दिलं दोन हात बिल भरणा करून घेतो करून घेत करून घेतला तत्पूर्वी कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरळीत केला यावेळी काँग्रेस नेते केशवराव हिंगणे यानी शेतकर्याची व्यथा उपविभागीय अभियंता शरद पोतले यांना समजावून सांगितली.
यावेळी बंडू पाटील,अशोक पाटील, गोपाळ पाटील,सिध्दार्थ इगळे,प्रसाद सावरकर,वासुदेव हिंगणे,विलास थोंबे,प्रशांत ठाकरे,निलेश हिंगणे,विनायक हिंगणे,गजानन ठाकरे,नवल सावळे आदीसह 150 चे जवळपास शेतकरी उपस्थित होते.
@ विज बिल नियमित भरल्यास ताण कमी होतो.त्यामुळे विज पुरवठा बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.विज पुरवठा नियमित करणे हे कर्तव्य आहे. शेतकरी अन्नदाता आहे.त्यांच्या सेवेत विज कार्यालय सदैव तत्पर आहे.नियमानुसार  बिल भरणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
– शरद पोतले
उपविभागीय अभियंता
@ सतत नापिकी अतिवृष्टी नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला मात्र सद्यस्थितीत रब्बी पिकाला पोषक वातावरण असून पिकेही चांगले आहेत पाणी पुरेसा आहे तेव्हा वीज पुरवठा आवश्यक असून वीज बिल भरून घ्या,शेतकरी बिल भरण्यास तयार आहे मात्र एकही दिवस विज पुरवठा बंद करू नका.
– केशवराव हिगणे
शेतकरी नेते,

पिळोदा बु॥ ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक व सरपंचानी खोटा ठराव करून गायरान जमीन दिली भाडयाने चौकशीची निळे निशान संघटनेची मागणी

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

Iतालुक्यातील पिळोदा बु॥ ग्रामपंचायतच्या मालकी हक्काची गायरान जमीन खोटा ठराव करून विक्री करण्यात आली असुन , या सर्व कारभाराची तात्काळ चौकशी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन निळे निशान सामाजीक संघटनेच्या वतीने संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी यावलच्या गटविकास अधिकारी नेहा भोसले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे . निळे निशान या सामाजीक संघटनेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी यावलच्या गटविकास अधिकारी नेहा भोसले यांना दिनांक १फेब्रुवारी रोजी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , यावल तालुक्यातील पिळोदा बु॥ ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणी सरपंच यांनी संगनमताने ग्रामपंचायतच्या मालकी हक्काची गायरान जमीन गट क्रमांक व उपविभाग५६८हे बाहेरील सदस्यायांना भाडे कराराने दिली आहे . सदरचा हा प्रकार ग्रामसेवक आणी सरपंच यांनी गावकऱ्यांना अंधारात ठेवुन खोटा प्रोसेडींग बुक नंतर लिहुन खोटा ठराव करण्यात आल्याचे तक्रार निवेदनात म्हटले आहे या प्रकारामुळे पिळोदा बु॥चे ग्रामस्थ हे अडचणीत आले आहे . याशिवाय ग्रामपंचायत अंतर्गत दलीत वस्तीची कामे हे इतर ठीकाणी अत्यंत निकृष्ठ प्रति ची करण्यात येत असल्याची ही ग्रामस्थांची ओरड आहे .पिळोदा बु॥ ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणी सरपंच यांच्या मनमानी कारभाराने गावातील ग्रामस्थांना शासनाच्या योजनापासुन वंचीत राहावे लागत आहे . ग्रामपंचायतीने गायरानची जमीन विक्री केल्याने गावातील मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या काही जणांकडे बकऱ्या , गायी, म्हशी असे पाळीव जनावरे असुन ,या जनावरांना लागणारा चारा हा गायरान नसल्यामुळे गुराढोरांच्या चाऱ्यांची टंचाई झाली आहे . तरी ग्रामपंचायतीने केलेला गायरान जमीनी बाबत विक्री बाबतचा घेतलेला खोटा ठराव आणी ग्रामसेवक व सरपंच यांनी व ग्राम पंचायत विस्तार अधिकारी यांची संगनमताने केलेल्या कारभार करून आपल्या पदाचा दुरुपयोग करणाऱ्यांची तात्काळ ७ दिवसाच्या आत चौकशी करण्यात येवुन संबधीतांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे तसे न झाल्यास आपण आपल्या पंचायत समिती कार्यालया समोर आमरण उपोषणास करणार आहे असा ईशारा निवेदनाद्वारे दिला आहे .