Home Blog Page 342

आठवडी बाजार दुकानासमोरील उघड्यावर मटन विक्री करणाऱ्यावर कारवाई करा

0

 

 

शेगाव, ता.३१ आठवडी बाजार दुकानासमोरील उघड्यावर करणाऱ्या अतिक्रमण धारकांवर करवाई करा अशी मागणी
आठवडी बाजार येथील आ.क्र. ३५ मधील सर्व १९ दुकानदार यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. पालिकेने करवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे. निवेदनात नमूद आहे की दिलेल्या दि. ११/०४/२०१८ च्या नोटीस नूसार आम्ही आ.क्र.३५ मधील दुकानांचा आगाऊ ताबा चाबी देवून घेतला आहे. सदर दुकानांचा ताबा घेतल्यावर जेव्हा आम्ही तिथे नविन व्यवसायास प्रारंभ करण्यास गेलो तेव्हा दुकानांसमोर खुल्यावर मास विक्रीची अंदाजे ३० ते ४० दुकाने आहेत.मास विक्री ही अवैध व उघड्यावर होत आहे. दुकानांसमोरील मांस विक्रीची दुकाने हटवावी दुकानांमध्ये येणाऱ्या दुर्गंधीमुळे कोणीही ग्राहक फिरकत नाही व आम्ही पण आमच्या दुकानात बसु शकत नाही.याबाबत पालिकेने २५ फेब्रुवरी २०२१ रोजी सर्वानुमते आरोग्याच्या तसेच कायदा व सुव्यवथेच्या प्रश्न निर्माण होण्याच्या दृष्टिने शहरातील मलनिस्सारण केंद्राच्या बाजूला खुल्या जागेत मटण विक्रेत्यांची व्यवस्था करण्यांत यावी. याबाबत येणा-या खर्चात ही सभा आर्थिक व प्रशासकीय मान्यता प्रदान करीत आहे. पुढील नियमानुसार कार्यवाही मुख्याधिकारी यांनी करावी. असा ठराव सुद्धा पारित केला होता.पण त्यावर कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे अवैध मांस विक्रीमुळे आमच्या दुकानदाऱ्या ठप्प झाल्या आहेत. उघड्यावर असलेली मास विक्रीची अवैध दुकाने ही कायमस्वरुपी बंद करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.निवेदनावर मोहन नावकार,संजय नावकार, संजय राजुस्कर,फिरोज सैफुद्दीन बुरहाणी,राजेश गणेश,दिलीप निकुळे,असमोल हक्क, मुरलीधर काळे,विजय कराळे,संतोष खंडारे,राजेंद्र तायडे,अनुराधा पाटील,संजय धनोकार,रत्नप्रभाबाई मसने, उज्वला मसने,जिजाबाई दिंडोकार आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

वाईन सोबतच शेतकऱ्यांना गांज्याची शेती करण्यास परवानगी द्या

0

 

करनी सेनेची मूख्यमंत्र्याकडे मागणी

संग्रामपूरः- राज्य सरकारने माॅल, किराणा दुकानावर वाईन विक्रीची परवानगी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्याच प्रकारे शेतकऱ्यांना गांजा, अफू तसेच मोहाची शेती करण्यास परवानगी देण्याची मागणी करनी सेनेतर्फे संग्रामपूर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सोमवारी राजपूत करनी सेनेचे विदर्भ अध्यक्ष सागर उर्फ दादा ठाकूर यांनी निवेदन देऊन केली. संग्रामपूर तालुक्यात निसर्गाचा लहरीपणा तसेच सततच्या नापिकीमुळे येथील शेतकरी आर्थिकदृष्ट्या डबघाईस आला आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना कवडीचीही मदत न केल्याने जगाला पोसणाऱ्या जगाच्या पोशिंद्यावर आज उपाशी पोटी झोपण्याची वेळ आली आहे. निसर्गापुढे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्याची गरज असतांना शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे निसर्गाचा संकटाचा झेलण्याय्रा बळीराजाला सूल्तानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी राज्य सरकारने वाईन सोबत गांजा अफू तसेच मोहाची शेतीच्या परवानगी सह हातभट्टीची दारू पाडण्याची परवानगी देण्याची मागणी राजपूत करनी सेनेच्या विदर्भ युवा अध्यक्ष सागर उर्फ दादा ठाकूर यांनी मूख्यमंत्र्याकडे केली आहे.

मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नेत्ररुग्णांची सातवी तुकडी सेवाग्रामला रवाना

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

रविवार 30 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता घुग्घुस येथील मा.आ.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्रतर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात तथा भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बबनराव बोढे यांच्या मार्गदर्शनात वयोवृद्ध नागरिकांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी घुग्घुस परिसरातील नेत्ररुग्णांची सातवी तुकडी सेवाग्रामला रवाना करण्यात आली.
याप्रसंगी बोलतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले की घुग्घुस येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात परिसरातील गोरगरीब गरजू रुग्णांची सेवा करने सुरु आहे. सातवी तुकडी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी सेवाग्रामच्या नेत्ररुग्णालयात पाठविण्यात येत आहे. घुग्घुस व पोंभुर्णा येथे लोकनेते मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत होते परंतु दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे गर्दी करता येत नसल्याने महाआरोग्य शिबीर थांबले. तरी सुद्धा गोरगरिब जनतेची आरोग्य विषयक सेवा करण्याचे कार्य निरंतर चालू आहे. त्याअनुषंगाने परिसरातील गोर गरीब गरजू लोकांना आरोग्याची सुविधा मोफत देत आहोत. भविष्यात गोर गरीब गरजू लोकांना आरोग्याच्या संदर्भात अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्रची स्थापना करण्यात आली आहे. केंद्राचे संचालक श्री. विवेक बोढे यांच्या नेतृत्वात गोर गरिबांची सेवा अविरत पणे सुरु आहे.
घुग्घुस परिसरातील अमराई वार्ड, बँक ऑफ इंडिया, इंदिरा नगर, आंबेडकर नगर, शांती नगर, विद्या टॉकीज, शास्त्रीनगर, श्रीराम वार्ड, साखरा व शेणगाव येथील 20 रुग्णांना मोती बिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी आज पाठविण्यात आले.
यावेळी भाजपाचे धनराज पारखी, श्रीनिवास कोत्तूर, सुशील डांगे व अजय लेंडे उपस्थित होते.

जळगाव जिल्हाता १०१गावां माध्ये तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायतची अटल भूजल योजनेत निवड

0

 

तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

बोराळे येथील अटल भूजल सर्वेर्क्षण विभाग यंत्रणा यांच्यावतीने शासनाने निवडलेल्या जळगाव जिल्हाता १o१गावां माध्ये तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायतची अटल भूजल योजनेत निवड झाल्यामुळे गावात एक दिवशीय कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले यावेळी सरपंच वंदना विनोद चौधरी, यांच्या अध्यक्ष खाली घेण्यात आली यावेळी अटल भूजल योजने विषयी भूजल सर्वेक्षण विभाग जळगाव व श्री अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ जळगाव यांचे मास्टर ट्रेनर श्री दीपक शिंपी, रियाज तडवी ,समीर तडवी ,यांनी प्रशिक्षण दिले बोराळे गावचे उपसरपंच उज्जैन सिंग राजपूत, ग्रामसेवक राजू तडवी ,आशा वर्कर सुनयना राजपूत ,पोलीस पाटील माधुरी राजपूत, मोना राजपूत, तंटामुक्ती अध्यक्ष कैलास सिंग राजपूत, ग्रामपंचायत विमलबाई चौधरी, उषाबाई राजपूत, पूनम सिंग राजपूत, सुरेश राजपूत, मोना बाई राजपूत विनोद चौधरी कुंदा सिंह राजपूत मायाबाई राजपूत ,यांची उपस्थिती होती कार्यशाळेत पाणीची बचत भविष्यात साठी किती महत्वाचे आहे याबाबत प्रोजेक्टर द्रारे प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी यांनी सहकार्य विकी वानखेडे पत्रकार, व अमर वानखेडे, गणेश राजपूत ,यांनी केले

सुनगाव वासियांचे पाण्यासाठी हाल ग्रामपंचायत पाणीपुरवठा 8 ते 10 दिवसांपासून बंद

0

 

गावकरी पित आहेत बोअरचे धोकादायक पाणी

140गाव पाणीपुरवठा योजना कागदावरच

गजानन सोनटक्के
ता.प्र./जळगाव जा

/दि1फेब्रु
तालुक्यातील सुनगाव चे नागरिक सध्या पाण्यासाठी वणवण फिरत असुन आठवडाभर पासुन ग्रामपंचायत ग्रामवासियानां पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरत आहे.
त्यामूळे गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत व प्राधिकरण कार्यालय गाठुन पत्रकारासमवेत आपली समस्या मांडली .
सविस्तर वृत्त असे की,
सद्य स्थितीत कागदपत्रे तपासले असता 2017 च्या करारानुसार सुनगाव हे प्रादेशिक 140 गाव पाणीपुरवठा योजना मधे समाविष्ट असून येथे करारानुसार वारी हनुमान चे पाणी पोचायला पाहिजे परंतु प्रत्यक्ष जाणून घेतले असता आजही140गाव योजना वारी हनुमानचे पाणी सुनगाव करांच्या नशिबात नसून गावच्या विविध दिशेने वेगवेगळ्या बोर मधून चार-पाच ठिकाणचे आरोग्यास धोकादायक पाणी जमा करून ते वितरित केल्या जात आहे आणि हे पाणी वितरण करीत असतांना सुद्धा त्यामध्ये नियमितता नाही ,
चार पाच दिवसातून नळ येतात त्यातही महिन्यातून एक-दोन वेळा पाइपलाइन फुटून पाणीपुरवठा मध्ये खंड पडतो हीच परिस्थिती सतत दोन वर्षापासून आहे याविषयी सरपंच व प्रभारी ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधला असता त्यांच्या म्हटल्यानुसार एकशे चाळीस गाव योजनेच्या पाईपलाईन मधून पुरेसा पाणीपुरवठा होत नाही व आम्ही आजपर्यंत कधीही पूर्ण टाकी भरून हे पाणी वितरित केले नाही ,ही योजना टाकी भरण्यास असमर्थ असुन त्यामूळे आम्ही जुने योजनेतून पाणीपुरवठा करतो असे संगितले,त्याचप्रमाणे जे पाणी आम्ही वापरलेच नही त्याचे 32 लाख रुपये बिल कसे काय दिले असा प्रश्न उपस्थित केला. नागरिकांनी पत्रकारांसह प्राधिकरण ऑफिस गाठले असता ,
शाखा अभियंता यांच्याशी संवाद केल्यावर त्यांच्या माहितीनुसार 2017 पासून नियमित सूनगावला पाणी पुरवठा सुरू असून ग्रामपंचायतचे कोणत्या कारणाने हे पाणी वापरत नसावी व पर्यायी पाणीपुरवठा करत असावी याविषयी आश्चर्य व्यक्त केले तसेच आमच्या योजनेत कुठलाही दोष नसून सुनगावला पाणी पुरवण्यास ही योजना समर्थ आहे ,
मात्र मागील तीन महिन्यापासून बिल न भरल्यामुळे आम्ही हे कनेक्शन बंद केले आहे .
ग्रामपंचायतीने बिल भरल्यास आम्ही पाणी नियमित करू असे सांगितले.
ग्रामपंचायत व प्राधिकरण यांनी ही परस्पर विरोधी मते व्यक्त केल्याने सर्वसामान्य नागरिक मात्र तहानेने व्याकूळ होत कसेतरी मिळेल त्या धोकादायक पाण्याने आपली तहान भागवत आहे,तरी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी व जल योद्धा म्हणून प्रसिद्धी पावलेले माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे यामध्ये लक्ष घालतील काय ? व सुनगाव वासियांना वारी हनुमान चे 140 गाव योजनेचे शुद्ध पाणी मिळवून देतील काय?
ही मागणी जोर धरत आहे!
विशेष म्हणजे गावातून पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य स्थानिक असताना यांचे मौन का त्यांनीही मागील तीन वर्षात हा प्रश्न सोडवण्यासाठी मागील ग्रामपंचायत समिती सह कोणतेच प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही,
नवीन आलेले सरपंच व ग्रामसेवक यांच्यापुढे हे 32 लाख रुपये बिल कसे भरावे हे संकट उभे असून लवकरच ते काय तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
====================
लक्षवेधक मुद्दे
*2017पासुन गावात 140गाव योजना लागू आहे तर आजपर्यंत नियमित पाणी का मिळाले नाही?
*पाणी मिळाले नाही तर ग्रामपंचायत ने ही योजना परत का केली नाही?
*प्राधिकरणात 87600रु अनामत रक्कम भरल्यावरही पाणी न मिळाल्याने वेळेवर प्राधिकरणास का कळवले नाही.
*पाणी च येत नाही तर 32लाख रुपये बिल कसे आले?
*गावकरी नागरिकांनी भरलेले पाणी कर चे पैसे कोणत्या कामात वापरले गेले?
*बोअर चे आरोग्यास धोकादायक पाणी पिउन गावात कीडणी पेशण्ट वाढल्यास जबाबदार कोण?
*सुनगाव कराना वारी हनुमानचे शुध्द पाणी केव्हा मिळनार?
====================
###################
मी पदावर आल्यापासून एक ही दिवस 140गाव योजनेच्या पाण्याने टाकी भरु शकली नाही,कमी प्रेशर असल्याने व वारंवार पाईपलाईन फुटल्यने आम्ही ही योजना वापरत नाही ,जर प्राधिकरण चमुने 8 दिवस सतत टाकी भरुन दाखवल्यास आम्ही ट्प्याने बिल भरुन या योजनेचा स्विकार करू
-रामेश्वर अंबड़कार सरपंच सुनगाव
##################
ग्रामपंचायत सुनगावला आम्ही 2017पासुन योजना कार्यान्वीत असून,आमची पाईपलाईन व्यवस्था व पुरवठा सज्ज असुन आम्ही गावापर्यंत पाणी पोचवुन ठेवलं आहे,तसेच त्याची ट्रायल देखील ड़ेमो देऊन केलेली आहे,आज रोजी व्याजासह सदर सुनगाव ग्रामपंचायत वर आमचे विभागाचे 31,96,891रु थकित आहेत. त्यामूळे 3 महिन्याने पाणि रोखण्यात आले आहे,जर आम्हाला ट्प्याने जरी बिल मिळाले तरी आम्ही पूर्ववत पाणी सूरु करू.
-मुकेश वैद्य
शाखा अभियंता
140 गाव प्रादेशीक पाणीपुरवठा योजना जळगाव जामोद
===================

भर दिवसा धूर्यावरून दुचाकी लंपास

0

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

शेगाव : कांदा पिकाबद्दल
मार्गदर्शन करण्यासाठी धुऱ्यावर मोटारसायकल लावून शेतात गेलेल्या सुमिटूमो केमिकल्स कंपनीच्या मार्केटिंग कर्मचाऱ्याची दुचाकी चोरट्याने गायब केली. शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल गुलाबराव गाडगे (२८, रा. पाटील मंडळी पातूर जि.) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. मनसगाव (ता. शेगाव) शिवारातील कैलास वाकर यांच्या शेतातील धुऱ्यावर ही घटना २८ जानेवारीला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे.

गाडगे हे सुमिटूमो कंपनीच्या शेतकी विभागात मार्केटिंगचे काम करतात. ते हीरो कंपनीच्या एचएफ डिलक्स मोटारसायकलीने (MH 30 AW9965, किंमत २५ हजार रुपये) अमोल पाटील (रा. काजीखेड ) यांच्या शेतात आले होते. कैलास वाकर (रा. काजीखेड) यांच्या मनसगाव शिवारातील शेताच्या धुऱ्याजवळ मोटारसायकल लावून ते पाटील यांच्या शेतात कांदा पिकाचे मार्गदर्शन करण्यासाठी गेले. थोड्या वेळाने परत मोटारसायकलजवळ आले असता मोटारसायकल दिसली नाही. आजूबाजूला परिसरात शोध घेऊनही मिळाली नाही. त्यामुळे काल, ३० जानेवारीला शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार गाडगे यांनी केली. तपास ASI शुल्का साहेब करत आहेत.

जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी! आर्वी अवैध गर्भपात प्रकरण

0

 

अनिलसिंग चव्हाण सह विकी वानखेड़े

वर्धा : एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात अटकेत असलेल्या डॉ. कदम दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सोमवारी 31 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. आर्वी येथील अल्पवयीन गर्भपात प्रकरणाच्या चौकशीत 11 मानवी कवट्या आणि 54 हाडे सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती. याशिवाय डॉ. नीरज कदमच्या घरीकाळवीटाची कातडी सापडली. त्यानंतरही त्यांच्या घरातून 97 लाख रुपयांची रोख रक्‍कम पोलिसांकडून जप्त करण्यात आली.

या घटनाक्रमात अनेक खळबळजनक खुलासे पुढे आले. मागील तीन ते चार दशकांपासून कदम रुग्णालयात अवैध गर्भपाताचा गोरखधंदा सरू असल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांकडून मिळाली आहे. यादिशेनेही पोलिस यंत्रणा तपास करणार आहे. दुसरीकडे वन विभाग डॉ. नीरज कदम यांना ताब्यात घेण्याची शक्‍यता आहे. काळवीटाच्या कातडीचा नमुना सध्या प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आला आहे. त्यासंदर्भातील अहवाल प्राप्त झाल्यानंतर वनविभागाकडून डॉ. नीरज कदम यांना अटक केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

अंबुलगा (बुं.) जिल्हा परिषदेच्या गटातील १९ गावांच्या विकासाला चालना दिली. माजी मंत्री तथा आमदार श्री. संभाजीभैय्या पाटील निलंगेकर

0

 

( लातूर/निलंगा ) प्रतिनिधी
डी.एस. पिंगळे

माजी मंत्री तथा आमदार श्री. संभाजीभैय्या पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून अंबुलगा (बुं) येथील जिल्हा परिषद गटातील १९ गावांमध्ये २ कोटी २७ लाख रुपये निधीचे. विकासकामे तसेच भूमीपूजन करण्यात आले असून तातडीने कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
अंबुलगा (बुं) येथील जिल्हा परिषद शाळेतील २८ लाख रु. सांस्कृतिक सभागृह आणि १४ लाख रु. शाळांच्या दुरुस्तीसाठी. ८ लाख रु. शाळेच्या एका खोलीच्या बांधकामासाठी एकूण ५० लाख. रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
केदारपूर ते काटेजवळगा आणि केदारपूर येथील हनुमान पाटी पर्यंत ४० लाख रु. निधी. केदारपूर येथे दोन किलोमीटरचा रस्ता आणि जिल्हा परिषद शाळेच्या दोन नवीन खोल्या १४. लाख. रु खर्चून बांधण्यात येणार आहेत. जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठ्यासाठी १५ लाख रूपये निधी उपलब्ध करून दिल्या.
काटेजवळगा येथील मुस्लिम स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतीसाठी ४ लाख रु. अंबुलगा जिल्हा परिषद गटाकडून १ कोटी २८ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
तळीखेड येथील जिल्हा परिषद शाळेसाठी १७ लाख. रुपये. तसेच नवीन ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी १० लाख रुपये निधी. आणि
दलित वस्तीमध्ये समाज मंदिर साठी ८ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्या आहे.
जाजनूर ते आंबुलगा (बु.) रस्त्यांसाठी ४० लाख रु. आणि आंबेवाडी येथील जिल्हा परिषद शाळांसाठी १४ लाख रूपये निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच १५ व्या वित्त आयोगातून पाण्याचा टाकीसाठी १० लाख रूपये निधी मंजूर केला आहे. या गावातील विकासकामांना भर पडली आहे.

घुग्घुस येथील जनतेला स्थायीपट्टे द्या भाजपाची निवेदनातून मागणी

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

गुरुवार 27 जानेवारी रोजी घुग्घुस भाजपातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन घुग्घुस येथील तिलक नगर, अमराई वार्ड, नवीन वस्ती, बँक ऑफ इंडिया, शांती नगर, शास्त्री नगर, शिवनगर, आंबेडकर नगर, शालिकराम नगर, इंदिरा नगर, बंगाली कॅम्प येथील गरीब जनता अनेक वर्षा पासून नझुलच्या जागेवर स्वतःचे घर बांधून राहत आहे. तसेच काही लोक सरकारी जागेवर घर बांधून राहत आहे तर लोक झूडपी जंगलाच्या जागेवर घर बांधून राहत आहे व लोक वन विभागाच्या जागेवर घर बांधून राहत आहे येथील जनतेला स्थायीपट्टे देण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
यावेळी संजय तिवारी उत्तरभारतीय मोर्चा प्रदेश सचिव,भा ज यू मो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, , माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप मलेश बल्ला अमोल थेरे उपस्थित होते.

वडणेर भोलजी PHC ला ताला ठोको

0

 

(नांदूरा) ता. प्रतिनिधि
सुनील पवार

नांदुरा तालुक्यात 4 प्राथ आरोग्य केद्र असून त्यापैकी वडणेर भोलजी हे महत्त्वाचे प्राथमिक आरोग्य केद्र आहे. हे प्राथमिक आरोग्य केद्र नँशनल हायवे 6 वर असल्याने या ठिकाणी अपघात खूप होतात म्हणून येथे डॉ, नर्स , चपराशी हा स्टाँप परीपूर्ण पाहिजे. *जिल्ह्यातील सर्व प्राथ. आरोग्य केद्र व्यवस्थित चालले पाहिजे. रूग्णांना चागली सर्वीस भेटली पाहिजे नागरीकांच्या तक्रारी कमीतकमी झाल्या पाहिजेत ही जबाबदारी पदाधिकारी याची आहे त्यापेक्षा ही जि प च्या अधिकारी वर्गाची आहे* परंतु दुर्दैवाने बुलढाणा जि प मधील हरामखोर अधिकारी कोणाताही मागचा पुढचा विचार न करता कर्मचाऱ्यांच्या पैसे घेवून बदल्या करतात. मागील वर्षी तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकार्यांने पैसे खावून एकाच झटक्यात वडणेर भोलजी प्राथमिक आरोग्य केद्रात अकरा कर्मचारी कमी असताना पुन्हा अकरा कर्मचाऱ्यांच्या पैसे घेवून बदल्या केल्या होत्या. व त्या अकराच्या बदल्यात एकही कर्मचाऱ्यांची येथे बदली केली नव्हती.
आता सुध्दा वडणेर भोलजी येथे फक्त 3 ANM कार्यरत आहेत व 9 ऊपकेद्र या PHC अंतर्गत आहेत असे असताना कोण्या मादरचोद अधिकार्यांने त्याचे पत्र देवून त्या 3 ANM पैकी एका ANM ला याच्या अधिकारात सोडण्यास सागीतले व तो बोराखेडी चा हरामखोर M O त्यांने सुध्दा कोणत्या पत्रावर कर्मचाऱ्यांना जाईन करू न घ्या ही अक्कल बहुतेक त्याला नसावी. कारण एखादा कर्मचारी सोडायचा असला तर त्याला MO च कार्यमुक्त करु शकतो DHO नाही
असो जे कोणी DHO , अधिकारी, MO ,या सबंधित असतील त्यांनी रितसर कागदपत्रे असतील तर आणि तरच जाँईन करुन घ्यावे अन्यथा त्या कर्मचाऱ्यांना वापस पाठवावे नाहीतर बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या अवैध प्रतिनीयुक्ती मधे हात टाकून त्या व अन्य बाबतीत आंदोलन करावे लागेल व वडणेर भोलजी गावकऱ्यांना सोबत घेवून ,संतोष दिघे सरपंच व सर्व ग्रा प सदस्यांना सोबत घेवुन वडणेर भोलजी PHC ला कर्मचारी वापस मिळेपर्यंत ताला ठोको आदोलन करावे लागेल. व या नंतरची पोस्ट या पेक्षाही खराब भाषेत येईल याची अधिकार्यांनी नोंद घ्यावी
वसंतराव भोजने
शिवसेना जिल्हा ऊप प्रमुख
9822039799