Home Blog Page 343

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने अनाथ आश्रमात प्रजासत्ताक दिन साजरा

0

 

उषा पानसरे असदपूर
मूख्य कार्यकारी संपादीका मो.9921400542

पुणे, पिंपरी चिंचवड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने अनाथ आश्रमात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. लहान मुले म्हणजे देशाचे भविष्य घडवणारी पिढी या अनुषंगाने प्रजासत्ताक दिनाचे महत्व जाणून बालगोपालांसमवेत आनंदाचे वातावरण निर्मिती करण्याच्या उद्देशाने हा प्रजासत्ताक दिन चिखली येथील विकास अनाथ आश्रमात आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री राजन नायर, पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्षा सौ. मंदाताई बनसोडे, डॉ. संगीता उके, मंगला जैन, कु. बिना जैन, मनोज कुमार ठाकूर आणि प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडचे पदाधिकारी उपस्थित होते.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलांना प्रजासत्ताक दिनाची माहिती सांगण्यात आली. खेळीमेळीच्या वातावरणासह मुलांना बिस्किटे, फळ देऊन आश्रमातील मुलांबरोबर हा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुलांशी हितगुज करण्यात आले.
यावेळी स्टार बुक ऑफ रेकॉर्ड म्युझीक मध्ये नोंद झालेली (दिव्यांग) बिना जैन हिने वाद्यवृंदावर (सिंथेसायझर) गाणी वाजवून वातावरण संगीतमय केले. तसेच देश भक्ती गीतांवर सर्वांना मंत्रमुग्ध केले. ‘देवा श्री गणेशा’ या गाण्याने गणेशाला नमन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. “हे मेरे वतन के लोगो जरा आखो मे भरलो पाणी” या देशभक्तीपर गाण्यांसह, सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध गाणे पल पल दिल के पास तसेच लकडी की काठी सारखे बालगीतांसह अनेक गाण्यांने वातावरण मंत्रमुग्ध झाले तसेच झिंगाट गाण्यावर आनंदमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

सांगवी खुर्द अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार गुन्ह्यातील दोन अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहात तर एकाला चार दिवसाची पोलीस कोठडी

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

दोन दिवसापुर्वी समाजमनाला काळीमा लावणारी धक्कादायक अशी घटना तालुक्यातील सांगवी खुर्द येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामुहीक अत्याचाराच्या गुन्ह्यातील अटक असलेला तिसरा आरोपी यास आज न्यायलयात हजर केले असता त्यास चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे . यावल तालुक्यातील सांगवी खुर्द या गावातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन अल्पवयीन मुलासह एकाने सांगवी खुर्द शिवारात बळजबरीने आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना घडली असुन, यासंदर्भात पिडीत अल्पवयीन मुलीने यावल पोलीसात तिघा आरोपींच्या विरोधात फिर्याद दाखल केल्याने बाललैंगीक अत्याचार व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येवुन त्यांना अटक करण्यात आली होती . या घटनेतील दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांना जळगाव येथील बालसुधारगृहात पाठविण्यात आले असुन , यातील तिसरा अटक असलेल्या आरोपी सतिष धनगर वय२४ वर्ष यास आज भुसावळ न्यायलयात हजर केले असता न्या .आर .एम. जाधव यांनी त्यास१ फेब्रुवारी २०२२पर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे . या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर व पोलीस करीत आहे .

डॉ. कुंदन फेगडेंच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोफत ई -श्रम कार्ड नोंदणी महाअभियान तिसरे सत्र पोचले अतिदुर्गम भागात

0

 

यावल ( प्रतिनिधी विकी वानखेडे

येथील युवा सामाजीक कार्यकर्त डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेले मोफत ई -श्रम कार्ड वितरणाचे अभीयान हे तिसऱ्या सत्रातील टप्प्यात अतिदुर्गम आदीवासी क्षेत्रात पहोचले असुन या ठिकाणी देखील या कार्यक्रमास नागरीकांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे . यावल तालुक्यातील अतिदुर्गम व आदीवासी ग्रामीण क्षेत्रातील नागरीकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा तात्काळ लाभ मिळावा, याकरीता श्रमजिवी कुटुंबास अत्यआवश्यक असणारे ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियानास तिसऱ्या सत्राला सुरुवात करण्यात आली हे अभियानाचे तिसरे सत्र अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवानी सुद्धा या अभियानाला उत्तम प्रतिसाद दिला . या अभियानास हरीपुरा व मोहरला असे दोन गावातील नागरिकांचा समावेश होता सदर अभियान ग्रामपंचायत कार्यालय समोर मोहरळा तालुका यावल येथे आदिवासी बांधवांचे निशुल्क ई श्रम कार्ड नोंदणी महाअभियानास तिसऱ्या टप्यात पोचले. सदर अभियानास एकूण 369 लाभार्थ्यांच्या नांवाची नोंदणी करण्यात येवुन नागरीकांनी या अभियानाचा लाभ घेतला ,यावेळी मोहराळा गावातील सरपंच सौ नंदा महाजन यांनी व उपसरपंच जहाँगीर तडवी यांनी गावाचे प्रथम नागरीक म्हणुन डॉ कुंदन फेगडे यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार केला. यावेळी मोफत ई -श्रम कार्ड अभियानाचे उद्घाटन डॉ कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले, या प्रसंगी मोहराळा गावाचे सरपंच सौ .नंदा गोपाळ महाजन, उपसरपंच जहागीर तडवी, लहू पाटील, ग्राम पंचायत सदस्य यशवंत पाटील, प्रमोद महाजन, अनिल अडकमोल, भरत महाजन, सौ . भावना महाजन, शबाना तडवी, सुलेभान तडवी सुलतान तडवी, गफार तडवी, सुनील पाटील, धनराज पाटील, ज्ञानेश्वर पाटील, शरीफ तडवी किरण पाटील आदींची उपस्थिती होती.
मा महा अभियानास यशस्वी करण्यासाठी रितेश बारी, सागर लोहार ,मनोज बारी, विशाल बारी, जयवंत माळी, चेतन कापुरे अक्षय राजपूत यांचे महत्वपुर्ण सहकार्य लाभले.

थंडीचा जोर वाढल्याने बचावासाठी नागरिकांकडून विविध उपाय योजना..

0

 

शेगाव: शेगाव परिसरात मागील तीन चार दिवसापासून थंडीचा जोर वाढल्याने या थंडीपासून बचाव करण्याकरिता नागरिकांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.”आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा मला लागलाय खोकला”असे एक प्रसिद्ध मराठी गीत आहे या गीताची आठवण करून देणारा हा थंडीचा महिना विविध आजारांना निमंत्रण देताना दिसत आहे. भागिले तीन चार दिवसापासून शेगाव शहर व परिसरात थंडीचा जोर वाढल्याने लहानांपासून वृद्धापर्यंत सर्वच वयोगटातील नागरिक थंडीपासून बचाव व्हावा याकरिता विविध उपाययोजना करताना दिसत आहेत नागरिकही थंडीमुळे घराबाहेर उशिरा निघत आहेत. त्यामुळे सकाळी ग्राहकांची वाट पाहत दुकाने उघडून बसलेले दुकानदार थंडीपासून बचाव करिता दुकानासमोरच शेकोटी पेटवून आंग शेकतांना दिसत आहेत. वाढत्या थंडीमुळे शहर व परिसरात सर्दी-खोकला ताप इत्यादी आजाराने पाय पसरलेले दिसत असून घरोघरी या आजाराने ग्रस्त रुग्ण वाढत आहेत एकीकडे सर्दी खोकला ताप याचा प्रभाव वाढताना दिसत आहे तर दुसरीकडे ओमॅक्रोन कोरोना महामारी ची भिती सुद्धा नागरिकांमध्ये दिसत आहे त्यामुळे बहुतेक नागरिक दवाखान्यामध्ये जाणे टाळत असून थंडीचा सर्वाधिक जास्त प्रभाव वृद्ध नागरिक विशेषता: ज्यांना दम्याचा विकार आहे असे नागरिक,लहान मुलं नवजात शिशु, यांच्यावर जास्त होताना दिसत आहे. सर्दी खोकला ताप वाढल्याने खाजगी रुग्णालय हाऊसफुल झाल्याचे दिसून येत आहेत

मनसे च्या घाणीचे साम्राज्य उपोषणाचा आज ४ था दिवस

0

 

सुनील पवार नांदुरा

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गेल्या ६ महिन्या पासून सुरू असलेल्या घानीच्ये साम्राज्य आंदोलन कर्त्यांचा आज उपोषणाचा ४ था दिवस गेल्या ४ दिवसा पासून उपोषण मंडपास विविध संघटना , पक्ष ,आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे आज ४ थ्या दिवसा पर्यंत नगर पालिकेच्या वतीने उपोषण माघे घेण्याकरिता तीन वेळा पत्र पाठवून दिनांक २८/१/२०२२पासून पोलिस बंदोबस्त सहित अतिक्रमण हटविण्यात येतील करिता आपण मागे घ्यावे करिता पत्र देण्यात आले मात्र जो पर्यंत अतिक्रमण पूर्ण पणे निघत नाही आणि संपूर्ण परिसर घान मुक्त होत नाही तो पर्यंत उपोषण मागे घेणार नाही ठाम निर्धार मनसे उपोषणास बसलेल्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे*

अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण १ लाख ५७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेले.

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

तालुक्यातील मनवेल येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण १ लाख ५७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेले. घरातील व्यक्ती उठल्याचे पाहून चोरटे पसार झाले. याप्रकरणी शुक्रवारी २८ जानेवारी रोजी सकाळी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की, अरूण कालुसिंग पाटील रा. मनवेल ता. यावल जि.जळगाव हे दोन मुले आणि सुन यांच्यासह वास्तव्याला आहे. शेती काम करून उदरनिर्वाह करतात. गुरूवार २७ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता सर्वजण जेवण करून झोपले. मध्यरात्री अज्ञात दोन चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरात घुसून अरूण पाटील यांच्या बेडरूममध्ये असलेल्या कपाटात चोरी करत होते. शुक्रवार २८ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास  कपाटाचा खळखळ आवाज आल्याने अरूण पाटील हे झोपेतून जागे झाले तर दोन चोरटे डोक्यात टोपी घालून चोरी करत होते. अरूण पाटील यांना पाहून चोरटे सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण १ लाख ५७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी अरूण पाटील याचा मुलगा तेजभान अरूण पाटील यांनी सकाळी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र खैरनार करीत आहे.

टिटवी ते नांद्रा रोडवर मोटरसायकलचा भीषण अपघात एक जण ठार

0

 

शहर प्रतिनिधी जगन मोरे लोणार

लोणार तालुक्यातील टिटवी ते नांद्रा रोडवर मोटरसायकलचा भीषण अपघात होऊन एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज २७ जानेवारी रोजी घडली आहे.
सावरगाव मुंढे येथील अनिरुद्ध रामकिसन मुंढे यांनी लोणार पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की टिटवी ते नांद्रा रोडवरील नांद्रा शिवारात अरुण भगवान कुटे राहणार देऊळगाव वायसा यांनी त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम. एच. १९ बी. एस. ६४८९ भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवून पाठीमागून जोरदार धडक दिल्याने राजू ज्ञानबा मुंढे यांच्या मोटरसायकलला धडक बसल्याने राजु ज्ञानोबा मुंढे गंभीर जखमी झाले तर मोटरसायकलवर पाठीमागून बसलेले एकनाथ ज्ञानोबा मुंढे हे जखमी होऊन मृत झाले. अनिरुद्ध रामकिसन मुंढे यांच्या फिर्यादीवरून अरुण भगवान कुटे यांच्याविरुद्ध लोणार पोलीस स्टेशनला अप क्रमांक
२४/२०२२ कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ अ, ४२७ भादवी नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार प्रदिप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बन्शी पवार करीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मरणानंतरही हाल! निलंगा तालुक्यातील हणमंतवाडी (हा)ग्रामपंचायतीसमोर मृतदेहावर अंत्यसंस्कार

0

 

लातूर/निलंगा प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

गेल्या अनेक वर्षापासून अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नाही. वेळोवेळी मागणी करून देखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे मृत महिलेच्या नातेवाईकांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयासमोर अत्यंस्कार केले.
निलंगा तालूक्यातील हाणमंतवाडी येथील सोजरबाई रामचंद्र निकम (वय ७०) यांचा बुधवारी मृत्यू झाला. हणमंतवाडी हे गाव चार हजार लोकवस्तीचे असून अध्याप गावात स्मशानभूमी नाही. गेल्या विस वर्षापासून हणमंतवाडी येथील गावकरी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी मागणी करत आहेत. परंतू जागेचा वाद हा न्यायप्रविष्ट असल्याने प्रेताची अव्हेलना होत आहे. त्यामुळे गावात मयत झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी करायचा कुठे असा मोठा प्रश्न कायमच निर्माण होत असतो. परंतु शासन गावाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करत नसल्याने गावातील संपूर्ण ग्रामस्थांनी गावाच्या भर चौकातील ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अंत्यविधी करावा लागला आहे.

डाएट गडचिरोलीच्या वतीने “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” निमित्त कवी संमेलन संपन्न.

0

 

मराठी विभागाचा पुढाकार.

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

गडचिरोली:-आज दिनांक २७ जानेवारी रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील निवडक कवींनी स्वरचित रचलेल्या कवितांना चालना देण्यासाठी मराठी विभागाच्या पुढाकारातून कवि सम्मेलन आयोजित करण्यात आले होते.
गडचिरोली जिल्ह्यातील २२ कविंनी कौटुंबिक,सामाजिक, आर्थिक,राजकीय,सांस्कृतिक भौगोलिक,कृषी,कला,क्रीडा, प्रेरणादायी,शिक्षण,प्रेम,निसर्ग,भावस्पर्शी,ऐतिहासिक महत्त्व पटवून देणाऱ्या अशा कवितांचे सादरीकरण केले.
ऑनलाइन कविसंमेलनात उत्कृष्ट सूत्रसंचालन मराठी विभागाचे विषय सहाय्यक डॉ.विजय रामटेके,निळकंठ शिंदे यांनी केले तर कविंना प्रोत्साहन अधिव्याख्याता डाॅ. प्रदिप नाकतोडे,मिलिंद अघोर यांनी केले.
ऑनलाइन कविसंमेलनाचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली चे प्राचार्य डॉ.विनित मत्ते हे होते. त्यांनी सर्व सहभागी कविंना मार्गदर्शन करून भविष्यात प्रत्येकांनी आपल्या लेखनितून उत्कृष्ट कविता,लेख लिहावे व मराठी भाषा संवर्धन करावी यासाठी शुभेच्छा दिल्या.
कवि सम्मेलनचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक,विषय साधनव्यक्ती यांनी घेतला. सोबतच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथील विषय सहाय्यक,समुपदेशक हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे व उपस्थित कविंचे आभार श्री प्रभाकर साखरे समुपदेशक यांनी केले.

घराचे रस्त्यासाठी आमरण उपोषण

0

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

शेगाव : तालुक्यातील पाळोदी येथील घराचे रस्त्यासाठी चिमुकल्या मुलीसह बापलेकांनी पंचायत समिती समोर आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे.
उपोषणकर्ते विलासराव ज्ञानदेव जवंजाळ वय ६९ वर्ष रा. पालोदी पो. झाडेगांव ता. शेगांव हे परिवारातील सदस्य दिवाकर विलासराव जवंजाळ वय ३२ वर्ष कु. भक्ती दिवाकर जवंजाळ वय वर्ष.3 वर्ष, कु. कृष्णाली दिवाकर जवंजाळ वय ४ वर्य व आमरण उपोषण दि.२६/१/२०२२ प्रजाकसत्ता दिना पासुन
पंचायत समीती, शेगांव येथे आमरण उपोषणाला बसले आहेत.
मौजे पाळोदी येथील उपोषणकर्त्याच्या घराच्या पूर्व व पाश्चेम बाजुला गैर अर्जदार शंकर त्र्यंबक भेंडे व सारंगधर महादेव भेंडे यांनी सरकारी रस्त्या मध्ये केलेल्या अतिक्रमाणा मुळे उपोषणकर्त्याला प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मिळालल्या घरकुलाचे बांधकामत अडथळा निर्माण होत आहे, उपोषण कर्त्याच्या पुर्वापार च्या सरकारी रस्त्या मध्ये केलेला उडथळा हटविण्याची मागणी आहे. उपोषण कर्त्यानी केलेल्या विविध कार्यालया मधे विविध तक्रारी वरून आपण वेळोवेळी संबंधीत यंत्रणाना अतिक्रमण हटविण्या बाबतच्या आदेशाची पूर्तता झाल्याचे खोटे अहवाल आपणा कडे सादर करून आपल्या यंत्रणानी नमुद अतिक्रमण न हटविता सदरचे अतीक्रमण आज रोजी सुध्दा कायम ठेवून अडथळा कायम असल्या बाबत व आपल्या आदेशाची पायमल्ली झाल्या बाबतच्या आरोप उपोषणकर्ते जवंजाळ यांनी केला आहे.

गटविकास अधिकारी सतिष देशमुख ,सहाय्यक गटविकास अधिकारी चव्हाण,
काॅग्रेस शहराध्यक्ष किरणबाप्पू देशमुख ,ग्रामसेवक बोबडे यांनी उपोषणकर्त्याची भेट घेवून रस्ता मोकळा करून देण्याची ग्वाही दिली.त्याचप्रमाणे एका बाजूचा रस्ता मोकळा सुध्दा करून दिल्याची माहीती ग्रामसेवक बोबडे यानी दिली.