Home Blog Page 344

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी शेतात अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी शेतात अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यावल तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय मुलगी आपल्या नातेवाईक व कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार २६ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही शौचालयासाठी गावातील रोडवर एकटी गेली होती. त्यावेळी गावातील संशयित आरोपी आणि यांनी अल्पवयीन मुलीचे तोंड दाबुन शेजारच्या शेतात ओढून नेले. त्याठिकाणी दोघांनी आळीपाळीने अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. कुणाला सांगितले तर ठार मारण्याची धमकी दिली. अल्पवयीन मुलगीने घरी गेल्यावर हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. अल्पवयीन मुलीसह नातेवाईकांनी यावल पोलीस ठाण्यात रात्री ८ वाजता धाव घेवून दोन्ही संशयित आरोपींविरोधात तक्रार दिली. पीडीत मुलीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर करीत आहेत.

73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त निलंगा शिवसेना शाखाप्रमुखच्या वतीने हळदी कुंकूवाचा कार्यक्रम

0

 

लातूर/निलंगा प्रतिनिधी
डी एस पिंगळे

पेठ सोनामाता नगर येथे 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त निलंगा शिवसेना शाखाप्रमुखच्या वतीने महिला शहर संघटक यांच्या अध्यक्षतेखाली व जयश्री विनोद आर्य यांच्या हळदी कुंकूवाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे.
यावेळी महिला तालुका संघटक रेखा पुजारी, महिला उपशहार संघटक दैवा सगर, मीना बिराजदार, रंजना गवळी,मीरा नाईकवाडे,स्वाती नाईकवाडे,मुक्ता म्हेत्रे,शुभांगी गवळी,रेखा सुर्यवंशी,सुगलाबाई राजमाने,दैवता चांदूरे,लता पवार,स्मिता फटाले,भरुणा वरवटे,छबाबाई जाधव, प्रिया राजमाने,बसम्मा राजमाने, तसेच सोनामाता नगरितील महिला इत्यादी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

निलंगा तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात ७३ व्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्सहात साजरा

0

 

(लातूर /निलंगा)प्रतिनिधी
डी. एस. पिंगळे

७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त
निलंगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निलंगा तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात
दि.२६ जानेवारी रोजी सकाळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा.श्री.अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मा.श्री.अशोकराव पाटील मित्र मंडळ जिल्हाअध्यक्ष,दयानंद चोपणे, शिवसेने चे अविनाश रेशमे,राष्ट्रवादी काँग्रेसचे धम्मानंद काळे, देवीदास पतंगे, अजय काबंळे, शेषराव कांबळे, बालाजी कांबळे, बी एम पाखरसागंवे, गोविंद पेटकर, ईसमाइल लदाफ, अणासाहेब मिरगाळे, दादाराव जाधव, उतमराव माने, पत्रकार अस्लम झारेकर,लाला पटेल,अशोक शेटकार,सिराज देशमुख, ॲड.जगदीश सूर्यवंशी,झरकर सर,विक्रांत सूर्यवंशी,मोहम्मद पठाण, मुगळे सर , रामचंद्र नाईक, अजगर अन्सारी , रोहन सूर्यवंशी, गोविंदराव सूर्यवंशी,अंजुम शेख, तुषार सोमवंशी, महादेव झरकर, गणेश कांबळे,आदी मान्यवर उपस्थित होते.

ओम गणेश तांगडे यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान

0

 

अनिलसिंग चव्हाण( मुख्य संपादक)

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा पुणे शहरातील टिळक स्मारक मंदिर सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रातून पुरस्कारासाठी निवडलेल्या या सोहळ्यात मेहकर तालुक्यातील कळपविहिर गावातील ओम गणेश तांगडे यांना राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमा चे प्रमुख पाहुणे असलेले सुप्रसिद्ध राष्ट्रीय किर्तनकार, लेखक,वक्ता ह.भ.प. श्री. श्यामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर सोबतच कार्यक्रमा चे अध्यक्ष मा.श्री.रमेश आव्हाड (सुप्रसिद्ध साहित्यिक) यांनी ओम तांगडे यांच्या गळ्यात गौरव पदक घालून व तसेच मानाचा फेटा,मानकरी बॅच, महावस्त्र, सन्मानचिन्ह,आणि मानपत्र देऊन राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान केला. सदरील पुरस्कारा बद्दल समाजाच्या विविध स्तरावरून त्यांच्या वर अभिनंदनाचा आणि शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.
ओम तांगडे हे छात्रभारती विद्यार्थि संघटने च्या माध्यमातून समाज कार्य करीत असतात. छात्र भारती संघटना संपूर्ण महाराष्ट्रात अखंड पने कुढल्याही राजकीय पाठबळा शिवाय लढत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत या अगोदर च ओम तांगडे ला तालुका अध्यक्ष पद देण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मिनाक्षीताई गवळी यांनी केले.तर गुनिजन परिवाराचे अध्यक्ष अडव्होकेट श्री. कृष्णाजी जगदाळे यांनी उपस्थितांना गूनिजन शपथ प्रदान केली आणि गुनिजान संसदेत पुरस्कार प्राप्त मानकऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.हजारो टाळ्यांच्या साक्षीने हा ठराव मंजूर झाला.हा कार्यक्रम शासनाच्या कोरोना दक्षता निवमावली नुसार अत्यंत काटेकोर पणे व शांततेत पार पडला. सोहळ्याच्या समारोपाला तमाम महिला वर्गाने राष्ट्रवंदना सादर करून उत्साहात समारंभाची सांगता केली.

मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे यांच्या मार्गदर्शनात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी *भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.* संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. राष्ट्रगीत गाऊन तिरंगा झेंड्यास सलामी देण्यात आली. या प्रसंगी भारत साळवे व शंकर नागपुरे यांनी देशभक्तीपर गीत गायले.
याप्रसंगी सेवानिवृत्त माजी सैनिक राजेंद्र किनाके यांनी ध्वजास मानवंदना दिली.
यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जिप सभापती नितु चौधरी, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी सरपंच संतोष नुने, माजी जिप सदस्य चिन्नाजी नलभोगा,, नंदा कांबळे, सुचिता लुटे, वैशाली ढवस, प्रयास सखी मंच अध्यक्ष किरण बोढे, अर्चना मुळेवार, जेष्ठ नागरिक संघाचे मधुकर मालेकर, नीलकंठ नांदे, भाऊराव मोहजे, पुंडलिक खनके, जंजर्ला, वमशी महाकाली, आभार प्रदर्शन कुसुमताई सातपुते यांनी केले.

मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे यांच्या मार्गदर्शनात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.* संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. राष्ट्रगीत गाऊन तिरंगा झेंड्यास सलामी देण्यात आली. या प्रसंगी भारत साळवे व शंकर नागपुरे यांनी देशभक्तीपर गीत गायले.
याप्रसंगी सेवानिवृत्त माजी सैनिक राजेंद्र किनाके यांनी ध्वजास मानवंदना दिली.
यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जिप सभापती नितु चौधरी, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी सरपंच संतोष नुने, माजी जिप सदस्य चिन्नाजी नलभोगा,, नंदा कांबळे, सुचिता लुटे, वैशाली ढवस, प्रयास सखी मंच अध्यक्ष किरण बोढे, अर्चना मुळेवार, जेष्ठ नागरिक संघाचे मधुकर मालेकर, नीलकंठ नांदे, भाऊराव मोहजे, पुंडलिक खनके, जंजर्ला, वमशी महाकाली, आभार प्रदर्शन कुसुमताई सातपुते यांनी केले.

सईबाई मोटे रुग्णालय शेगाव यांच्याकडून गणराज्यदिनानिमित्त समाजसेवक आशिष सावळे यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित

0

—————————————-
दिनांक 26 जानेवारी 2022 शेगाव सईबाई मोटे सामान्य रुग्णालय येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.पंडित सर यांच्या हस्ते समाजसेवक आशिष सावळे यांना सन्मानचिन्ह देऊन करोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला व सावळे यांच्या अथक प्रयत्नाने कोविड सेंटरला रुग्णांसाठी व हॉस्पिटलला उपयोगी पडणारे साहित्य आणि भरीव मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल सईबाई मोटे रुग्णालयाकडून कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल उपस्थितांना डॉ.पंडित सर आपल्या भाषणातून सांगत होते या प्रसंगी रुग्णालयातील सर्व स्टाप कर्मचारी व सिक्युरिटी गार्ड कार्यक्रमाला उपस्थित होते

महाविकास आघाडी सरकार सर्व शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांच्या न्यायीक आणि धोरणात्मक समस्यांचे निराकरण करणार काय?

0

 

२० वर्षांनंतरही कंत्राटीच सेवा.

अनिल सिंग चव्हाण  सह विकी वानखेड़े

मुंबई:-महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या स्वायत्त संस्थे द्वारा केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त अनुदानातून सन २००० पासून सर्व शिक्षा अभियान नावाचे शैक्षणिक उपक्रम हाती घेण्यात आले आहे.
अभियान काळापासूनच राज्यातील विद्यार्थी-शिक्षक व शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी जवळपास सहा हजार करार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.त्यामध्ये शाखा अभियंता,प्रोग्रामर,कनिष्ठ अभियंता,वरिष्ठ लेखा लिपिक, विषय साधनव्यक्ती,दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य करण्यासाठी संसाधन शिक्षक, विशेषतज्ञ,डाटा एंट्री ऑपरेटर सारखे पद निर्माण करून परिक्षा पद्धतीने जिल्हा निवड समितीमार्फत रितसर पदे भरून त्यांच्याकडून कंत्राटी स्वरूपात महत्त्वाची कामे करून घेतली जातात.
जसे-माहितीचे संगणकीकरण, अनुदानाचे समायोजन,सर्व प्रकारचे शिक्षकांचे प्रशिक्षण,मोफत पाठ्यपुस्तके,गणवेश योजना, विद्यार्थी गुणवत्ता,शाळांच्या दर्जात सुधारणा,माता प्रशिक्षण,पालक प्रशिक्षण, अंगणवाड्यांना मदत,शाळा व्यवस्थापन समितीचे प्रशिक्षण आणि सक्षमीकरण,दिव्यांग विद्यार्थ्यांच्या योजना,विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या इत्यादी महत्वपूर्ण कामे करवून घेतले जातात.
परंतु विस वर्ष लोटली तरी अजून कोणत्याही सरकारला संवेदणात्मक संवेदनशीलता निर्माण झाली नाही.या कर्मचाऱ्यांविषयी किती निष्ठुरता असू शकते?हे कल्पनेच्या पलीकडे आहे.हे कामे करीत असतांना किती तरी करार कर्मचारी मृत्यू पावले असून आज त्यांचा संसार उघड्यावर पडून पुर्णपणे उद्धवस्त झाले आहेत.
अजून किती आणि कशाची प्रतिक्षा करता हो सरकार मायबाप?अशी आर्त हाक करार कर्मचारी मारतांना दिसून येत आहेत.
महाविकास आघाडी सरकार हे न्यायीक आणि धोरणात्मक निर्णय घेऊन सर्व शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांच्या जीवनाच्या समस्या सोडवेल काय?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे‌.

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा शिवसेना तालुका उपप्रमुख रामेश्वर थारकर यांच्या हस्ते सत्कार

0

 

अर्जुन कराळे शेगांव

शेगाव : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चींचखेड येथे कार्यरत श्री. प्रमोद इंगळे, तसेच जि. प. म. प्रा. शाळा टाकळी नागझरी येथे कार्यरत श्री डिगांबर काकड शिक्षक यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल जि.परिषद उच्च प्राथमिक शाळा बोंडगाव येथे शिवसेना तालुका उपप्रमुख रामेश्वर थारकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, पुरस्कार मिळाल्या बाबत विनोद डाबेराव केंद्रप्रमुख मनसगाव, सौ कात्रे मॅडम खातखेड, श्री. घुले सर, श्री.सोनटक्के सर ई. त्यांचे अभिनंदन केले ,

तर एक उत्तम विद्यार्थी घडविणे हे शिक्षकांचे काम आहे. त्यांचे उज्ज्वल भविष्य हीच शिक्षकांच्या कार्याची पोचपावती आहे. पुरस्काराचा विचार न करता विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे. विशेष मुलांचे शिक्षक याच भावनेतून मुलांना शिकवीत असल्याने श्री. काकड सर आणि श्री. प्रमोद इंगळे सरांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मत शिवसेना तालुका उपप्रमुख रामेश्वर थारकर यांनी व्यक्त केले.
प्रसंगी सागर थारकर, आकाश थारकर, योगेश थारकर, सुभाष कळसकर,
नंदू घोराडे,अजय अंदूरकर, ऋतिक इलामे ई. उपस्थित होते.

देशी दारू नाहरकत परवाना रद्द करण्यात यावे – शिवसेना घुग्घूस

0

 

(चंद्रपूर घुग्घूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

आज दिनांक:25.01.2022 मंगळवार ला शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री.संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या आदेशानुसार घुग्घूस येथील नगरपरिषद येथे मा. मुख्याधिकारी नगरपरिषद घुग्घूस यांना निवेदनाद्वारे मागणी केली की मे.चिअर्स.प्रायव्हेट लिमिटेड यांच्या अंतर्गत देशी दारू सुरु करण्याची नाहरकत परवाना रद्द करण्यात यावे अन्यथा शिवसेना घुगुस तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.निवेदन देताना शिवसेना शहर प्रमुख सतीश भाऊ बोंडे , उपतालुका प्रमुख गणेशजी शेंडे, चेतन बोबडे , सतीश गोहोकार आणि शिवसैनिक उपस्थित होते.