Home Blog Page 345

वर्धा के पास हायवे पर भीषण हादसा झायलो कार नदी में गिरने से मेडिकल कॉलेज के 7 छात्रो की मौत

0

 

मृतको में एक बीजेपी विधायक का पुत्र

वर्धा के सांसद रामदास तडस ने दि घटनास्थल को भेंट

अनिलसिंग चव्हाण  सह विकी वानखेड़े

नागपूर-तुलजापूर फोरलेन हायवे 361 पर सोमवार की रात वर्धा जिले के देवली शहर के निकट एक कार 30 फिट नदी में गिरने से कार में सवार 7 मेडिकल छात्रो की दर्दनाक मौत हो गयी. जिसमें भंडारा जिले के तिरोडा के विधायक विजय रहांगडाले का पुत्र 21 वर्षीय अविष्कार रहांगडाले का समावेश है.इस हादसे में मृत सभी छात्र समीप के ही सांवगी स्थित आचार्य विनोबा भावे मेडिकल कॉलेज में अध्ययनरत थे.

मिली जानकारी के अनुसार यह सभी छात्र यवतमाल से रात को झायलो कार क्र.OD 23 B 1117 से सांवगी कॉलेज लौट रहे थे. कार से नियंत्रण छुटने पर देवली के समीप सेलसुरा स्थित भदाडी नदी के पुलिया के दिवार से टकराई. 30 फिट नीचे नदी में कार गिरने से कार में सवार सभी छात्रो की मौत हो गयी. सभी के शव पोस्टमार्टम के लिये वर्धा सिव्हिल अस्पताल में भिजवाये गये.

घटनास्थल को वर्धा के सांसद रामदास तडस ने भेंट दे कर घटना के लिये दुःख जताया तथा मदद कार्य का जायजा लिया.

 

भारताचे आयध्य दैवत विर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या स्मारकास विरोध करणाऱ्या खा . इम्तीयाज जलील यांचा जाहीर निषेध

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

देशाचे विर शिरोमणी क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांच्या स्मारकास विरोध करणाऱ्या संभाजी नगर एमआयएम या पक्षाचे खासदार इम्तीयाज जलील यांचा अखिल भारतीय क्षेत्रीय महासभाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करून धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या विरूद्ध कार्यवाही करण्यात यावी या मागणीचे एक लिखित निवेदन यावलचे तहसीदार महेश पवार यांना देण्यात आले आहे . या संदर्भात अखिल भारतीय क्षेत्रिय महासभा ने दिलेल्या निवेदना म्हटले आहे की , छ्त्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद ) येथे स्वातंत्र्याची मशाल पेटवली असे विर शिरोमणी महापुरुषाच्या अश्वरूढ पुतळयास जिल्हा नियोजन समितीच्या दिनांक ८ / १o / २०२१ अनुपालन अहवाल मुद्दा क्रमांक२८मध्ये मंजुर झालेल्या निधी दुसऱ्या कार्यास लावावा असे पत्रव्यवहार जिल्ह्याचे पालकमत्री यांना देवुन पुतळ्यास विरोध केला असुन , खासदार इम्तीयाज जलील यांनी केलेल्या हिंदुसुर्य विर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या स्मारकास विरोध केल्यामुळे देशाच्या संपुर्ण राजपुत समाजाच्या भावना दुखावल्या असुन , अशा प्रकारे समाजात तेढ निर्माण करून आपल्या राजकारणाची पोळी भाजणाऱ्या लोकप्रतिनिधींचा समस्त राजपुत समाजाकडुन जाहीर निषेध व्यक्त करण्यात येवुन एमआयएमपक्षाचे औरंगाबाद ( संभाजी नगर ) चे खासदार इम्तीयाज जलील यांनी संपुर्ण समाजाशी जाहीर माफी मागुन आपले शब्द आणि स्मारक उभारणी संदर्भात विरोधात दिलेले पत्र मागे घ्यावेत अन्यथा त्यांच्या विरूद्ध राजपुत समाजबांधवांच्या वतीने निव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येवुन त्यांना धडा शिकवला जाईल असा ईशारा ही निवेदनाद्वारे देण्यात आला असुन, या निवेदनावर अखिल भारतीय क्षत्रिय महासभाचे जिल्हा संघटक निलेशसिंह पाटील , यावल तालुका अध्यक्ष तुषारसिंह परदेशी, युवा अध्यक्ष विशाल सिंह पाटील , अखिल भारतीय क्षत्रिप महासभा महीला मोर्चा तालुका अध्यक्ष विद्याताई पाटील , उज्जैनसिंह राजपुत, कृष्णा पाटील , यशपाल सुनिलसिंह वर्मा , मंगलसिंह कैलाससिंह पाटील , ललीत परदेशी , निलेश परदेशी , प्रज्वल पाटील, जगदीश पाटील ,ईश्वर पाटील आदी समाज बांधवांच्या स्वाक्षरी आहेत.

राष्ट्रीय विषवगामी पत्रकार संघ लोणारच्या वतीने तहसीलदारांना निवेदन शहर प्रतिनिधी जगन मोरे लोणार

0

 

जगन मोरे लोणार

नागपूर येथील पत्रकारावर हल्ल्याच्या निषेधार्थ आज लोणार तहसिल ार्यालयावर निषेध म्हणून राष्ट्रीय विश्र्वगामी पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले . निवेदन देताना रा . वी. पत्रकार संघटनेचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते रा.वी.संघाचे जी.अध्यक्ष शेक सज्जाद.सर.ता.अध्यक्ष.उधवराव आटोळे. शहर अध्यक्ष भूषण शेटे.कोष्याधुक्ष मयूर सरकटे.प्रसिध्दी प्रमुख परमेश्वर मपरी .विजय मापरीं लोणार ता.सचिव जगन मोरे लोणार .विजय महाजन . सतीश मुलगे. सालार पठाण गणेश कुटे, लुकमन सर ,असे सर्वच रा
.वी. पत्रकार संघाचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

देशी दारूच्या नवीन दुकानाला दिलेली परवानगी रद्द करा : काँग्रेस

0

 

नगरपरिषदे विरोधात काँग्रेस छेळणार आंदोलन

(चंद्रपूर घुग्गूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : जिल्यातील औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध कामगार नगरीत कामगारांचा मोठा भरणा आहे.
सात वर्षाच्या बंदी नंतर आता जिल्ह्यात रीतसर दारू विक्री शुरू झाल्याने शहरात देशी – विदेशी दारू धंद्याला उत आलेला आहे.
शहरात आधी पासून जवळपास सतरा वाईन बार व तीन देशी दारू भट्टी असतांना विलास भिकाजी टेंभूणे संचालक में.चिर्यस प्रा.लि.उल्हासनगर जि. ठाणा यांच्या स्थलांतरित दुकानास नगर परिषदेने परवानगी दिली असून
सदर दुकान हे घुग्गूस येथील आनंद वाईन बारच्या बाजूला स्थलांतरित करण्यात येत आहे.
याठिकाणीच दहा ते पंधरा मीटर अंतरावर दिक्षा भूमी व भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व स्मारक आहे.
व तीस मीटर अंतरावर माता माऊलीचे मंदिर आहे.
याच ठिकाणी आठवडी बाजार भरतो याच परिसरात नागरिकांसाठी प्रस्तावित बगीचा व वीस फुट रस्ता आहे.
करिता सदर देशी दारूच्या विरोधात घुग्गूस शहरातील सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला होता व गेल्या वर्षी आगस्ट महिन्यात दारू दुकानाला परवानगी देऊ नये याकरिता निवेदन देण्यात आले होते.
असे असतांना ही सदर देशी दारू दुकानाला परवानगी देण्यात आली सदर तातळीने रद्द करावी या करिता किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौ. अर्शिया जुही यांना निवेदन देण्यात आले व परवानगी रद्द न केल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही काँग्रेसने दिला.
याप्रसंगी घुग्गूस शहर अध्यक्ष राजूरेड्डी, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, प्रशांत सारोकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

नांदुरा येथे महान स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांची १२५वी जयंती साजरी.

0

संग्रामपूरः- ज्यांनी भारत स्वातंत्र्य होण्यासाठी आणि सन्मानाचे जीवन जगण्यासाठी स्वतःला वचनबद्ध केले.असे महान स्वातंत्र्य सेनानी व आझाद हिंद संघटनेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती दि.२३/जानेवारी रोजी नांदुरा येथे रेल्वे स्टेशन चौकात कोरोनाचे नियम पाळून मोजक्याच उपस्थितीत साध्या स्वरुपात साजरी करण्यात आली.
ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आझाद हिंद संघटना विदर्भ संपर्क प्रमुख शेख सईदभाई होते.तर प्रमुख अतिथी म्हणून महिला जिल्हा उपाध्यक्षा सौ.वर्षा ताथरकर ,जेष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी, अनिलसिंग चव्हाण होते. प्रथम रेल्वे स्टेशन चौकातील सुभाषचंद्र बोस यांचे अर्ध पुतळ्याचे पूजन करुन पुष्पहार घालून आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने उपस्थितीतांनी विनम्र अभिवादन केले. त्यानंतर कु.वैष्णवी सुसर ह्या तरुण युवतीने क्रातीकारी सेनानी सुभाषचंद्र बोस यांचे जीवनावर प्रकाशझोत टाकून त्यांचेजीवनपट बद्दल माहिती दिली.त्यानंतर जेष्ठ पत्रकार यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, आझाद हिंद सेना म्हणताच डोळ्यापुढे उभे राहतात ते देश्याच्या स्वातंत्र्याची जगाला गवसणी घालण्याचे कार्य करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस.नेताजींच्या विचारात एक वेगळीच उर्जा व शक्ती होती.यापुळे अनेक देशप्रेमी तरुणांच्या मनात जोश निर्माण झाला तो केवळ भारतासाठीच नव्हे तरजगासाठी प्रेरणा स्थान होते.”तुम मुझे खून दो!मै तुम्हे आजादी दुंगाॕ ह्या घोषणेने भारतीयांच्या मनात त्यांनी राष्ट्र प्रेमाची ज्योत फडकावली.त्याप्रमाणे आपण किमान ज्यांचेवर अन्याय होतो व गुलामगिरी केल्या जाते अश्यांना न्याय द्यावा.असे सांगितले . तर अध्यक्षीय भाषणातून आझाद हिंद सेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख शेख सईद भाई यांनी एकजुटीने राहून संघर्ष करुन गरीबांना न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले. ह्यावेळी आझाद हिंद सेना शेतकरी संटनेचे नांदुरा तालुका अध्यक्ष शे.मझरभाई,  व नागरिक ,महिला पदाधिकारी प्रामुख्याने हजर होत्या.

विद्यार्थ्यांचे शालेय पोषण आहार बिस्कीटच्या पुड्यात आढळली अळी, दोषीवर कारवाईची पालकाची मागणी..!

0

 

अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक)

संग्रामपूर तालुक्यातील पळशी (झाशी )येथील ८ व्या वर्गातील विद्यार्थ्यांचे शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत मिळालेल्या बिस्किट पुड्यात अळी आढळली याबाबत विजय विठ्ठल ठाकरे विद्यार्थ्यांच्या पालकाने संग्रमपूर पंचायत समिती शिक्षण विभागाकडे दिनांक 22 जानेवारी रोजी माहिती देऊन तक्रार दिली,त्यावरून दुसऱ्या दिवशी दिनांक 23 /जानेवारी रोजी पळशी झाशी येथे अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला.

संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील विद्यार्थी अमोल विजय ठाकरे हा जिल्हा परिषद.हायस्कूल संग्रामपूर येथील ८ व्या वर्गात शिकत असून त्याला शालेय पोषण आहार योजनेचे बिस्टिक खाण्याकरता दिले, त्यामध्ये अळी आढळून आल्याची तक्रार विद्यार्थ्यांचे पालक विजय ठाकरे यांनी दिली असता दुसऱ्या दिवशी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पळशी झाःशी येथे जाऊन पंचनामा केला असता त्यामध्ये बिस्किट कोरलेली आढळून आले व त्यामध्ये अळी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे .सदर बाबीचा पंचनामा करुन सिलबंद केले. या प्रकरणी संबंधितावर सखोल चौकशी करून कारवाई करावी. अशी मागणी पालक विजय ठाकरे यांनी केली आहे.

 

पूर्णानगर येलकी पूर्णा येथिल रोड दूरस्ती करा! अली हेल्प ग्रूपची मागणी

0

 

उषा पानसरे असदपूर
मूख्य कार्यकारी संपादीका मो.9921400542

अली हेल्प ग्रूप पुर्णानगर यांनी बबलू भावु देशमूख अमरावती जिल्हा अध्यक्ष याना निवेदन देण्यात आले झोपडपट्टी पूर्णानगर ते येलकी पुर्णा पर्यत अतिवृष्टी पावसा मूळे रोड रखडलेले असून दूरस्ती करण्यात यावे ! या रोड वरून येलकी ,पुर्णा,सावळापूर, येसूर्णा,असदपूर ,कोल्हा काकडा, अंजनगाव सूर्जी दर्यापूर ईतर गावाचे वाहन या मार्गाने रात्र दिवस चालु असतात पावसामुळे दोन ते तिन फूटाचे खंडे बाजूला पडले आहे त्या मूळे या रस्तावर अनेक दूचाकी वाहणाचा अपघात होवून जखमी झाले तसेच कित्येक वेळा अपघात होवून दूरघाटना मध्ये मरण पावले !या रस्तावरिल होत असल्यामूळे प्रशासन कूंभकर्णीचे झोप घेत आहे मोठ्या अपघाताची वाट बघत प्रशासन दूर लक्ष करत आहे या अगोदर पुर्णानगर ग्राम पंचायत यांनी जिल्हा परिषद अध्यक्षाकडे दि.22 /12 /2017 मधे या रस्ताची मागणी केली होती दहा ते बारा वर्षा पासून कोणत्याही प्रकारचे काम झालेले नाही पूर्णा नागरिकांनी जिल्हा अधिकारी कार्यालय , अभियंता सार्वजिक बांधकाम विभाग अचलपूर याना निवेदन देवून मागणी केली होती अली हेल्प ग्रूप पूर्णानगर या संघटने ने निवेदन देवुन मागणी केली या विषयावर लवकरात लवकर मार्ग शोधून रोड ची दूरस्थी करण्यात यावी जेणे करूण नागरिकांना परिशानी चा सामना करावा लागणार नाही अली हेल्प ग्रेप ची मागणी श्रीधरावजी काळे (उपसभापती पंचायत समिती अचलपूर मूकद्दर भाई पठान भातकूली तालूका काँग्रेस कमेटी अध्यक्ष अ. अलीम अ. तमीज समाज सेवक ईक्रामोद्दीन ,देवेंद्र ठाकरे ,अनसार भाई कूरेसी जावेद सौदागर आबीद काजी

घुग्घुस भाजपाच्या उपोषणापुढे नगर परिषद प्रशासन नमले

0

 

तब्बल 01 कोटी 40 लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस दलित वस्ती सुधार योजनेतून वार्ड क्र. 4 व 5 ला सरसकट वगळल्यामुळे रविवार 16 जानेवारी पासून घुग्घुस येथील बस स्थानक समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घुग्घुस भाजपातर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात व भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात साखळी उपोषण सुरु करण्यात आले होते. या उपोषणाला शहरातून मोठा प्रतिसाद मिळाला.
सलग आठ दिवस चाललेल्या उपोषणात शेकडो कार्यकर्ते रोज उपोषण स्थळी उपस्थित राहत होते. 24 डिसेंबर रोजी निवेदनाद्वारे नगर परिषद मुख्याधिकारी अर्शीया जुही यांना घुग्घुस नगर परिषदेने घुग्घुस दलित वस्ती सुधार योजनेतून वार्ड क्र. 4 व वार्ड क्र. 5 व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरला सरसकट वगळल्यामुळे वार्डातील सिमेंट रस्ते व अंडरग्राउंड नाली बांधकामासाठी 3.5 करोड रुपयांमधील निधी उपलब्ध होऊ शकला नाही. या वार्डातील सर्व दलित बांधवांवर हेतूपुरस्पर अन्याय करण्यात आला आहे. वार्ड क्र. 04 व 05 ला विकास निधी द्या व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा उपोषण करू असा इशारा देण्यात आला होता.
परंतु मुख्याधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे उपोषण सुरू करण्यात आले होते.
मुख्याधिकारी अर्शीया जुही व सहा. पो. नि. संजय सिंग यांनी उपोषण स्थळी भेट दिली. मुख्याधिकारी यांनी लेखी स्वरुपात मागण्या मान्य झाल्याचे पत्र दिले. पत्रात वार्ड क्रमांक 4 व 5 ला 1 कोटी 40 लाख रुपयाचा निधी विविध विकासकामांसाठी देण्यात आला आहे. दिलेली कामे तातडीने मंजूर करण्यात आली आहेत, तसेच दोषी अधिकाऱ्यावर चौकशी करून कारवाई करण्याचे नमूद करण्यात आले आहे.
मुख्याधिकारी अर्शिया जुई यांनी उपोषणकर्त्यांना निंबु पाणी देऊन उपोषणाची सांगता केली.
यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, संजय तिवारी राजकुमार गोडसेलवार सिनू इसारप, निरीक्षण तांड्रा, संतोष नुने, विनोद चौधरी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थिती होती.

सूनगाव व उसरा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाळासाहेब ठाकरे व सुभाष चंद्र बोस जयंती साजरी

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

आज दिनांक 23 /1 /2022 रोजी सूनगाव व उसरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे या थोर महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सूनगाव शाळा समिती अध्यक्षा सुनीताताई सोनटक्के यांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना हार अर्पण केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ताडे सर बुटे सर सारोकार सर व इतर शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते तसेच उसरा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये या दोन्ही महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी शाळेचे राठोड सर वेरुळकार सर म्हसाळ सर राठोड सर राजकुमार पाटील उमेश पाटील पाटील प्रभू पाटील पोलीस पाटील अंगणवाडी सेविका शाळेतील शिक्षक वृंद कर्मचारी उपस्थित होते

टूनकी येथील पत्रकाराची मोटरसायकल चोरी ; सोनाळा पोलीसात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल..!

0

 

संग्रामपूर – संग्रामपूर तालुक्यातील टूनकी येथील पत्रकाराची होंडा कंपनीची मोटरसायकल शाईन MH 28 BM 3190 ग्रे कलर असलेली दुचाकी
दि 18 /जानेवारी च्या रात्री 8 वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरी झाल्याचे तक्रारीवरून सोनाळा पोलिसात 20/ जानेवरी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,
संग्रामपूर तालुक्यातील टूनकी येथील पत्रकार प्रभूदास नारायण पारस्कार यांची मोटरसायकल दि 18 जानेवारी रात्री 8 वाजता च्या दरम्यान त्यांच्या राहत्या घराच्या काही अंतरावर असलेल्या बंडू गावंडे यांच्या शेतात कामानिमित्त गेले असता रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी केली होती.मात्र शेतातुन परत आल्यावर मोटरसायकल दिसली नाही त्यांनी दोन दिवस परिसरात शोध घेतला मात्र कुठेही मिळुन आली नाही, त्यामुळे पत्रकार प्रभूदास पारस्कार यांनी सोनाळा पोलीस स्टेशन ला तक्रारी दिली, कोणीतरी अज्ञात इसमाने होंडा शाईन कंपनीची ग्रे कलरची मोटरसायकल MH 28 BM 3190 किंमत अंदाजे 80 हजार रु . मोटरसायकल चोरी गेली आहे. यावरून सोनाळा पोलीसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सोनाळा पोलिस करत आहे.