Home Blog Page 346

शेख सज्जाद शेख करामत यांचा आॅल इंडिया जमीयतुल कुरैश च्या वतीने सत्कार करण्यात आला.

0

 

जगन मोरेे  लोणार. तालुका प्रतिनिधी

लोणार संजय गांधी निराधारयोजना तालुका समीती चे नव नियुक्त सदस्य शेख सज्जाद शेख करामत यांचा सत्कार आॅल इंडिया जमीयतुल कुरैश चे जिल्हाध्यक्ष प्रा लुकमान कुरेशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विश्वगामी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष उद्धव आटोळे. विजय मापारी. प्रकाश नागरे. जगन मोरे. मयूर सरकटे. विजय महाजन. परमेश्वर मापारी. कासीम कुरेशी. मोहसीन कुरेशी. वसीम कुरेशी. फुरकान कुरेशी. गुफरान कुरेशी. इरफान कुरेशी. गफ्फार कुरेशी. ईस्माईल कुरेशी. व अन्य सदस्य उपस्थित होते

दलित वस्तीवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात साखळी उपोषणाचा सातवा दिवस

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

रविवार 16 डिसेंबर पासून घुग्घुस येथील बस स्थानक समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दलित वस्तीवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात घुग्घुस भाजपातर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात व भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात साखळी उपोषण सुरु करण्यात आले होते. सातव्या दिवशीही साखळी उपोषणा सुरु होते. घुग्घुस नगर परिषदेने घुग्घुस दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत वार्ड क्र. 4 व वार्ड क्र. 5 व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरला सरसकट वगळल्यामुळे वार्डातील सिमेंट रस्ते व अंडरग्राउंड नाली बांधकामासाठी 3.5 करोड रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकला नाही. या वार्डातील सर्व दलित बांधवांवर हेतूपुरस्पर अन्याय करण्यात येत आहे. जोपर्यंत वार्ड क्र. 04 व 05 ला निधी मिळत नाही व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत हे उपोषण असेच सुरू राहणार असून दोन दिवसात मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, नकोडा जिप सदस्य ब्रिजभूषण पाझारे, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, नकोडा माजी सरपंच ऋषी कोवे, माजी ग्रामपंचायत सदस्य पूजा दुर्गम, भाजपाचे प्रवीण सोदारी, संतोष कोंडपेल्लीवार उपस्थित होते.

प्रधानमंत्री ग्रामसड़क योजनेंतर्गत रस्ते विकासासाठी ४८२.६३ लक्ष रुपये निधी..

0

 

खा.तड़स व आ.कुणावार यांचे उपस्थितित भूमिपूजन संपन्न

हिंगणघाट दि.२२ जानेवारी
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या तिसऱ्या टप्पायातील मंजुरीनुसार शहालंगड़ी ते जुनोना,आजंती ते शेगाव (कुंड) तसेच कुंड येथून राज्य महामार्ग क्र.३२२ पर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरणाच्या विकासकामाचे भूमिपूजन आज दि.२२ जानेवारी रोजी वर्धा लोकसभा मतदारक्षेत्राचे खासदार रामदास तडस तसेच विधानसभा क्षेत्राचे आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.सदर रस्ता ७.६३ किलोमीटर लांबीचा असून या विकासकामावर सुमारे ४८२.६३ लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहे,तालुक्यातील हा प्रमुख मार्ग असून या रस्त्याचे मजबुती करणाची जनतेची मागणी होती.
खासदार रामदास तड़स यांचे अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात आज विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
उपरोक्त कार्यक्रमप्रसंगी भाजपा महामंत्री किशोर दिघे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, जिल्हा परिषद सदस्य शरद सहारे, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, पंचायत समिती सदस्य संभाजी देवडे, भाजपा तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे, कंत्राटदार शाम भिमनवार, उद्योजक जगदीश मिहानी , आजंती ग्रामपंचायतच्या सरपंचा सौ. सीमाताई देवडे, शेगाव कुंड सरपंच राजु नगराळे , उपसरपंच मधुसूदन हरणे , सातेफळचे सरपंच श्रीराम मेश्राम, सचिव नगराळे, विनोद विटाळे, हरिदास बोरकर ,अमोल बोरकर, किशोर वंजारी, अरुण किनाके, संजय चौधरी, ठाणेश्वर, सुनील गुडदे इत्यादी गणमान्य मंडळीसह ग्रामपंचायत सदस्य, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी तसेच गावकरी मंडळी सदर भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित होते.

निमगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ता.अध्यक्ष भागवत उगले यांच्या वाढदिवसानिमित्त१००हुन अधिक रुग्णानी घेतला नेत्र शिबिराचा लाभ

0

 

सुनील पवार. नांदुरा. ता.प्र.

निमगाव येथील सुपो महाराज मंदिर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ता.अध्यक्ष. भागवत उगले यांच्या वाढदिवसानिमित्त१००हुन अथिकरुग्णानि घेतला नेत्र शिबिराचा लाभ या शिबिरामध्ये नांदुरा येथील स्व.जुबेदा बाई कलि मोहम्मद देवानि चँरिटेबल यांच्या माथ्यमातुन मोफत नेत्र तपासणी शिबीर वमोतिबिंदु आँपरेशन शिबिर पार पडले या वेळी मनशे ता.अध्यक्ष भावत उगले. शहर अध्यक्ष सागर जगदाळे. अजय बेलोकार.. सौरव इंगळे सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी तेसाठी राजनकार यांनी परिसरम घेतले

गटविकास अधिकारी, IAS नेहा भोसले यांनी बजावलेल्या नोटीस . ग्रामसेवक व सरपंच यांना तात्काळ कारवाई दलित वस्ती निधीचा गैरवापर

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

हिंगोणा ग्रामपंचायतमध्ये ‘दलित वस्ती सुधार योजने’च्या निविदा गोंधळाविषयी जिल्हा रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून त्यानुसार सरपंच व ग्रामसेवकास यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे.

तालुक्यातील हिंगोणा ग्रामपंचायत अंतर्गत दलित वस्ती निधीचा गैरवापर आणि ऑनलाईन टेंडरमध्ये हस्तक्षेप करून आर्थिक व्यवहाराने टेंडर प्रक्रीयेत काळाबाजार करणारे ग्रामसेवक व ग्रामपंचायत सरपंच आणी ग्रामपंचायत सदस्य यांच्या विरूद्ध कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट ) जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी यांनी गटविकास अधिकारी,IAS नेहा भोसले यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात दिलेल्या लिखित तक्रार निवेदनात राजू सुर्यवंशी यांनी म्हटले आहे की , हिंगोणा तालुका यावल या ग्रामपंचायतमध्ये दलीत वस्ती सुधार या योजने अंतर्गत होणाऱ्या कामांची निविदा ही ऑनलाईन काढण्यात आली होते , परन्तु ग्रामसेवक व ग्राम पंचायतचे सरपंच आणि सदस्य आर्थिक मोहातून टक्केवारीची रक्कम मागत असल्याने सदरची निविदा रद्द केलेली आहे.

या निविदा प्रक्रीयेत संबधीत ठेकेदारास कोणतीही नोटीस न देता किंवा जिल्हा परिषद पातळीवर वरिष्ठांकडून मार्गदर्शन न मागवता सर्व ग्राम पंचायतच्या सदस्यानी सदरची निविदा रद्द केली असल्याचे राजू सुर्यवंशी यांनी म्हटले असून, शासनाच्या वतीने मिळणाऱ्या गावाच्या विकास निधीची ग्रामपंचायतच्या कारभारीच्या टक्केवारीच्या मोहापोटी मिळणाऱ्या निधीची उधळपट्टी करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे .

सदरचे निवेदनावरुन गटविकास अधिकारी,IAS नेहा भोसले यांनी तात्काळ कारवाई करीत हिंगोणा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणि सरपंच यांना आज शुक्रवार, दि.२१ जानेवारी २०२२ रोजीयांना कारणे दाखवा नोटीस बजावली असुन , सरपंच व ग्रामसेवक हे गैरहजर राहील्यास त्यांच्या विरूद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा ( शिस्त व अपील ) अधिनियम१९६४तरदुतीनुसार तसेच महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम१९५८चे कलम ३९ (१ ) नुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येवुन प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येइल असे ही गटविकास अधिकारी IAS नेहा भोसले यांनी बजावलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे.

मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीसाठी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या झाल्या आक्रमक.

0

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

शेगाव. मुख्याधिकाऱ्यांच्या फोटोला बांगड्या चढवल्या.
शेगाव. शेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांची बदली करावी म्हणून काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण बाप्पू देशमुख यांनी गेल्या पाच दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. शासन स्तरावर पाच दिवसातही काही निर्णय होत नसल्याचे बघून आता काँग्रेसच्या महिला आघाडीने आक्रमकता दाखवीत या आंदोलनात उडी घेतली आहे शेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांना भेटून त्यांचा निषेध करण्याची योजना महीला काँग्रेसने आखली होती डॉ प्रशांत शेळके यांना भेटण्यासाठी महिला काँग्रेसचे पथक नगरपालिकेत आले असता मुख्याधिकारी बाहेरगावी गेल्याची माहिती त्यांना मिळाली आमच्या आंदोलनाची माहिती मिळाल्यानेच मुख्याधिकारी पळून गेल्याचा आरोप यावेळी महिलांनी केला यानंतर कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनला मुख्याधिकाऱ्यांच्या फोटो लावून त्यावर बांगड्या चढवल्या मुख्याधिकारी हाय हाय अशा घोषणाही यावेळी त्यांनी दिल्या. मुख्याधिकाऱ्याचा निषेध असो आदी घोषणांनी नगरपालिका परिसर दुमदुमून गेले होते महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सविता झाडोकार डॉक्टर शबनम शेख सुनीता कलोरे मीराताई माळी कविता राजवैद्य, स्नेहलता दाभाडे, लीना भारंबे,मिरा माळी, सुनिता कलोरे,लिना भारंबे, , माधुरी संतोष ठाकूर, आदी महिला कार्यकर्ता यावेळी मुख्याधिकाऱ्यांच्या कॅमे-यासमोर आंदोलन करीत होत्या.

लोणार येथे मुख्य रस्त्यावरील जय कमळजा आटोमोबाईल्स फोडून केली लाखोंची चोरी

0

 

जगन मोरे लोणार प्रतिनिधि

लोणार शहरा मध्ये दिनांक २० जानेवारी पहाटे दोन ते पाच दरम्यान अज्ञात चार ते पाच दरोडेखोरांनी एक ऑटोमोबाईल दुकान फोडत दुकानातील साडेतीन लाख रुपये वर डल्ला मारत इतर हॉटेल व विविध प्रतिष्ठान शहरातील तीन दुचाकी चोरून नेल्याची घटना पहाटे उघडीस आल्याने एकच खळबळउडाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेली जय कमळजा स्पेअर पार्ट चे दुकानाचे कुलूप व शटर वाकवून गल्यातील साडेतीन लाख रुपये व १२ हजार किमतीच्या डीव्हीआर चोरून नेला त्याचबरोबर बायपासवरील कपिल विजय खिवसरा यांचे हॉटेल फिस्टा फोडून गल्यातील नगदी ३२ हजार पाचशे रुपये व ९ हजार रुपये किमतीचा डी व्ही आर तसेच पटेल नगर मधील विजय उत्तमराव सानप यांची दुचाकी नंबर एम एच २८ ए जी ५२६५ किमती अंदाजे चाळीस हजार रुपयांची तसेच ओम प्रकाश मंगलदास मुवाल राहणार लोणार यांची हिरोहोंडा स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच २८ ए ७८१८ किमती पंचवीस हजार रुपये व स्टार सिटी कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच २८ ए टी ८४८० किमती २० हजार रुपये अशा एकूण तीन मोटरसायकल ८५ हजार रुपयाच्या एकूण ०४,८२०००/ रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी दिनांक १९ जानेवारी रोजी रात्री आठ ते दिनांक २० जानेवारी सकाळ च्या दरम्यान चोरून नेले आहे पुढील तपास फिर्यादी पंकज वसंतराव मापारी यांच्या फिर्यादीवरून लोणार पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक ४६१/३८०/३७९ भादवि नुसार गुन्हा दाखल केला असून केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक सूरज काळे बीट जमादार रामकिसन गीते पो का जगदीश सानप करीत आहे यावेळी फिंगरप्रिंट एक्सपर्ट आर एच गाढवे तपासणीस पीएस वैद्य फोटोग्राफर एपी चित्ते स्वान पथकाचे गजानन राजपूत यांनी घटनास्थळी भेट देत सूक्ष्म निरीक्षण करत महत्त्वाचे धागेदोरे जमा केले आहे.

लॉयड्स मेटल कंपनीतुन होणारी ओल्डम डस्टची वाहतूक बंद करा

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस येथील लॉयड्स मेटल कंपनीतून होणारी ओल्डम डस्टची वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी. चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात व युवासेना जिल्हाप्रमुख निलेश बेलखेडे यांच्या. मार्गदर्शनात युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे घुग्घुस येथील लॉयड्स मेटल कंपनीतुन दररोज 100 ते 150 ट्रकाद्वारे कंपनीच्या आतील ओल्डम डस्टची वाहतूक करून बाहेर निघत आहे व तो डस्ट ट्रका द्वारे विमला सायंडींग व वणी सायडींगच्या दिशेने भरून जात आहे आणि तो कोळश्यात मिसळवीला जात आहे. त्यामुळे याचा भविष्यात पावर प्लांटला फटका बसू शकतो. व लोडशेडींग होऊ शकते. याचा सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागू शकतो. या प्रकरणात कंपनीच्या अधिकाऱ्यांचा ही हात असू शकतो. त्यामुळे ओल्डम डस्टची वाहतूक तात्काळ बंद करून दोषीवर कारवाही करावी अन्यथा कंपनी गेट समोर शिवसेने तर्फे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देतांना शिवसेना उप तालुका प्रमुख गणेश भाऊ शेंडे, राज सोपर, नागार्जुन नगराळे, पियुष कांबळे, साहिल आमटे, बलराज सरोज व शिवसैनिक उपस्थित होते.

सोमवारपासून लातूर जिल्ह्यात शाळा- कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.- पालकमंत्री ना अमित विलासराव देशमुख यांचे निर्देश

0

 

डी. एस. पिंगळे लातूर /निलंगा(प्रतिनिधी):

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या शाळा- कनिष्ठ महाविद्यालय सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे या अनुषंगाने शिक्षणाचे माहेरघर असलेल्या लातूर जिल्ह्यात सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून विद्यार्थ्यांची काळजी घेत शैक्षणिक उपक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी करावी असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी प्रशासन व संबंधित विभागांना दिले आहेत.
कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल लागल्यानंतर दक्षतेचा उपाय म्हणून राज्यातील शाळा कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता, या तिसऱ्या लाटेत प्रादुर्भाव झपाट्याने वाढला, मात्र या प्रादुर्भावाचे परिणाम सौम्य असल्याचे लक्षात आल्याने शाळा, कनिष्ठ महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य स्तरावरून घेण्यात आला आहे, प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील परिस्थिती विचारात घेऊन तेथील प्रशासनाने याबाबत निर्णय घ्यावेत असे सांगण्यात आलेले आहे.
लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत आणखी वाढ कायम आहे, मात्र या प्रादुर्भावाची लक्षणे सौम्य आहेत आणि त्यातून फारसा धोका नसल्याचे लक्षात आले आहे, एकंदरीत ही परिस्थिती लक्षात घेता शैक्षणिक दृष्ट्या जागरूक आणि दक्ष असलेल्या या जिल्ह्यात शैक्षणिक व्यवस्था लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे आहे ही बाब लक्षात घेऊन, जिल्हाधिकारी मनपा आयुक्त
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांना जिल्ह्यातील शैक्षणिक व्यवस्था तातडीने सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालक मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत,
शिक्षण संस्थांचे परिसर स्वच्छ व निर्जंतुक करून घ्या
शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी सर्व वर्गखोल्या, शाळेचा परिसर येथील कार्यालये, स्वच्छ व निर्जंतुक करून करून घ्यावा, शाळांमध्ये मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था अनिवार्य करावी, शाळांमधून गरजेनुसार उपचारांच्या सुविधा उभाराव्या त्याचबरोबर जवळपासच्या रुग्णालयाची यासाठी मदत घ्यावी सर्वात महत्वाचे म्हणजे शिक्षण संस्था चालक, गाव पातळीवर शिक्षण समित्या, शिक्षक, पालक, आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जागृती निर्माण करून त्यांना योग्य ती काळजी घेण्यास सांगावे. अशा सूचनाही पालकमंत्री देशमुख यांनी दिल्या आहेत,

देखरेखीसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारावी
शिक्षणसंस्थांमध्ये प्रत्यक्ष शैक्षणिक उपक्रम सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी योग्य प्रकारची काळजी घेतली जाते की नाही याची देखरेख करणारी एखादी व्यवस्था निर्माण करावी असेही निर्देश त्यांनी दिले आहेत.

आजीचा खून करणार्‍या नातवाला आजिवन कारावास शिक्षा ।

0

 

उषा पानसरे असदपूर ( कार्यकारी संपादीका मो. 9921400542

दिनाक 21 जानेवारी अमरावती जिल्हात सत्र न्यायालयाने आजीची हत्या करणार्‍या नातवाला जन्मठेप ची शिक्षा सूनावली ।जिल्हा व सत्र न्यायाधिश ( क्रमांक 1) एस.एस. अडकर याच्या न्यायलयाने दिलेल्या सूनावणीत आरोपी नातवाला जन्मठेप व दहा हजार रूपये दंड तसेच न भरल्यास एक वर्ष कारावास अंमलात येईल अशी शिक्षा सूनावली आहे 27 आँक्टोबर 2019 रोजी सायंकाळी गाडगेनगर पोलिस स्टेशन हद्दीत राठी नगर या भागात सदर हत्या ची घटना घडली होती आरोपी स्वपिल उर्फ संतोष तुळशीराम कोडापे वय तिस रा बांदेकर प्लाँट राठी नगर अमरावती असे आरोपी चे नाव या यूवकाने आपल्याच आजीची हत्या केली होती शांताबाई चांदेकर वय 75 आरोपी ला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप सूनावली सरकार पक्षाच्यां बाजूने जिल्हा सरकारी वकील अँड परिक्षीत गणोरकर यांनी यूत्त्कीवाद केला पैरवी अधिकारी बाबाराव मेश्राम ,अरूण हटवार यांनी कामकाज त सहकार्य केले गाडगेनगर पोलीस स्टेशन चे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक मनिष वाकोडे एवम पी एस आय पंखज ढोके यानी तपास पुर्ण केला