Home Blog Page 347

मुख्याधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ शेगाव नगरपालिका कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलन..

0

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

शेगाव: एकीकडे काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण बापू देशमुख हे शेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांची बदली करण्याच्या मागणीसाठी शेगाव तहसील कार्यालयासमोर 17 जानेवारीपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत तर दुसरीकडे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांच्या समर्थनार्थ शेगाव नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून त्यांना पूर्णपणे पाठिंबा दर्शविला आहे. शेगाव येथे नगरपालिकेचे मुख्य प्रशासक मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांच्या पक्षपाती भूमिके विरुद्ध त्यांची शेगाव येथून तत्काळ बदली किंवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या मागणीसाठी शहर काँग्रेस अध्यक्षांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून पाठिंबा दर्शविण्यात येत आहे तर शेगाव नगरपालिकेच्या कर्मचारी संघटनेने सुद्धा नगरपालिका प्रशासन प्रशांत शेळके यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्णय घेऊन नगरपालिकेतील लेडीज मोबाईल नंबर 62 अधिकारी-कर्मचारी व 80 सफाई कर्मचारी अशा एकूण 142 कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेचे प्रशासक डॉक्टर प्रशांत शेळके यांची कोणत्याही परिस्थितीत शेगाव येथून बदली करण्यात येऊ नये या मागणीसाठी व त्यांच्या समर्थनार्थ आज 20 जानेवारी गुरुवारी एक दिवसीय काम बंद आंदोलन करून कशा प्रकारचे निवेदन पत्रसुद्धा बुलढाणा येथे जाऊन जिल्हाधिकारी यांना सोपविण्यात आले.. त्यामुळे आता काँग्रेस विरुद्ध नगरपालिका अशी लढत आगामी काळात शहरवासीयांना पाहावयास मिळेल अशी चर्चा रंगू लागली आहे. यामध्ये कोण कोणावर भारी पडतो याकडे सर्व शहरवासीयांचे लक्ष लागून राहिलेले आहे

मतदारांना सशक्त बनवण्यासाठी कू अँपनं नव्या फीचर्ससोबत सुरू केलं जागृती अभियान

0

 

कूवर आता मिळवा चॅट रूम, लाइव्ह फीचर्स आणि खास निवडणुक बातम्यांच्या अपडेट्स

मतदारांना त्यांच्या अधिकारांबद्दल शिक्षित करण्यासह माहिती देत

निवडणुक प्रक्रियेबाबत विश्वास जागवण्यासाठी भारतीय भाषांमध्ये जागरूकता अभियान

मुंबई : येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसंदर्भाने मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कूने खास घोषणा केली आहे. आता कूचा मंच आता विविध भाषांमध्ये अनेक हायपरलोकल स्वरूपाचे प्रयोग करणार आहे.

या पुढाकार घेऊन केलेल्या प्रयोगांचा उद्देश असेल, मतदारांना मतदानाआधी सशक्त बनवणे, संघटीत ठेवणे आणि त्यांना गरजेची माहिती पुरवत राहणे.
भारतीय भाषांमध्ये ऑनलाइन अभिव्यक्तीला सक्षम करणारा सर्वात मोठा मंच म्हणून कू अँपकाही आगळे उपक्रम राबवणार आहे. निवडणुक प्रक्रियेवरचा मतदारांचा विश्वास वाढवण्यासाठी विशेष फीचर्स सादर करण्यासह कूजागृती अभियानही चालवणार आहे. हा मंच मतदारांना आपला मताधिकार वापरण्यासाठी सजग निर्णय घेण्याबाबत मार्गदर्शन करेल.

निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या राज्यांच्या मतदारांसाठी कू अँपएक डेडिकेटेड सेक्शन उभारणार आहे. यात हिंदी, पंजाबी, मराठी इ. भाषामध्ये लाइव्ह अपडेट्स, उमेदवार आणि पक्षांबाबतच्या बातम्या आणि मतदारसंघासंबंधीच्या घोषणा और निर्वाचन क्षेत्र के स्तर की घोषणाओं उपलब्ध असतील. याशिवाय निवडणुकांशी जोडलेल्या विषयांवर खुल्या चर्चेसाठी कूरीयल टाइममध्ये देसी भाषांमध्ये चॅट रूमसुद्धा सादर करेल. यादरम्यान मंचावर उपलब्ध लाइव फीचर्स यूजर्सना सेशन्स बनवणे, आपल्या कम्यूनिटीला सहभागासाठी आमंत्रित करणे आणि इंटरफेसच्या माध्यमातून घटना-घडामोडींबाबत लगेचच माहिती मिळवण्याची संधी देईल.

कू अँपमतदारांना त्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्यांबाबत शिक्षित करण्यासाठी भारतीय भाषामध्ये माहिती देणारे अभियानही चालवेल. यातून जनमानसाचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास वाढवण्यासह जागृती करण्याला बळकटी मिळेल. या अभियानांतर्गत कूयूजर्सना अनोखा अनुभव देण्यासाठी प्रश्नोत्तरंही आयोजित करेल. यात मतदार नोंदणी, EPIC कार्ड डाउनलोड इत्यादी विषय असतील. एवढेच नाही, तर मंचावर अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्वं आणि प्रख्यात लोक मतदाता जागरूकता अभियानाशी उत्स्फूर्तपणे जोडून घेतील. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी कटिबद्ध मंच कूआपल्या समर्पित ‘निवडणूक स्वयंसेवकां’च्या माध्यमातून मतदार नोंदणीचा वेग वाढवण्यातही मदत करेल. या स्वयंसेवकांवर प्रत्येक निवडणूक क्षेत्रात मतदारांची नोंदणी करण्याची जबाबदारी आहे.
या मेड-इन-इंडिया प्लेटफॉर्मने याआधीच इंटरनेट अॅड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) च्या द्वारे ‘स्वैच्छिक आचारसंहिता’ अवलंबली आहे. यामाध्यमातून निवडणुकांच्या दरम्यान सोशल मीडियाच्या पारदर्शक वापरासाठी आहे. याशिवाय अयोग्य मजकुर ओळखत त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कू अँपने प्लेटफॉर्मवर येणाऱ्या फीडबॅकला प्रभावी नियोजन करण्याचे एक सशक्त तंत्रही स्थापन केले आहे.
कू अँपचे सह-संस्थापक आणि सीईओ अप्रमेय राधाकृष्ण म्हणाले, “भारतीयांच्या आवाजाचे लोकशाहीकरण करणारा एक बहुभाषी मंच या रूपात कू अँपनिवडणुकांदरम्यान काम करेल. कूवरचे विशेष फीचर्स यूजर्सना त्यांच्या मातृभाषेत रीयल टाइम अनुभव देतील. सोबतच यामाध्यमातून त्यांना निवडणुकांशी संबंधित विषयांवर पर समान विचारधारेच्या लोकांशी जोडून घेता येईल.
स्थानिक भाषामध्ये होणारे आमचे जागृती अभियान मतदारांचे ज्ञान वाढवणे, त्यांच्यात विश्वास जागवण्यासह डोळस निर्णय घेण्यात त्यांची मदद करतील. आम्ही एक निष्पक्ष, खुला आणि विश्वसनीय मंच म्हणून भारताच्या निवडणूक आयोगाद्वारा निर्धारित मार्गदर्शक तत्वांचे पालन करू. समाजात सकारात्मक आणि पुरोगामी परिवर्तन घडवण्यासाठी कू अँपचा सर्वोत्कृष्ट उपयोग केला जावा हेसुद्धा आम्ही खात्रीने पाहू.”

आरा मशीन मधील विनापरवाना माल व अवैध वृक्षतोडीची ची पूर्ण चौकशी व्हावी

0

 

अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू महाराष्ट्र आझाद हिंद संघटनेचा इशारा .

अनिलसिंग चव्हाण( मुख्य संपादक)

संग्रामपूरः- मोताळा तालुक्यातील सर्व आरा मशीन वरील माल व अवैध वृक्ष तोडीची पूर्ण चौकशी व्हावी. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा महाराष्ट्र आजाद हिंद संघटनेच्या जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ वर्षा गिरधर साथारकर यांनी आज दिनांक 19/ जानेवारी रोजी उपवनसंरक्षक वन विभाग बुलढाणा यांना निवेदन देऊन दिला आहे.

निवेदनात असे नमूद केले आहे की कंडारी , फुले रोड चांदुर बिस्वा रोड, व नांदुरा, मोताळा तालुक्यामध्ये विनापरवाना वृक्षतोड होत असून त्या मालाची सर्रास वाहतूक दोन्ही तालुक्यांमध्ये होत असून हा माल दोन्ही तालुक्यातील सर्व आरा मशीन वर माल विनापरवाना कटाईचा आहे. तरी आर एफ.ओ. यांनी जातीने लक्ष देऊन दोन्ही तालुक्यातील आरा मशीन वर जाऊन सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी. याबाबत दिनांक 21 डिसेंबर 2021 रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग मोताळा यांना अर्ज दिले. तरी सुद्धा अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, तरी दोन्ही अर्जाचा विचार करून लवकरात लवकर कारवाई करावी .अन्यथा लोकशाही मार्गाने आला हिंद संघटनेच्यावतीने नांदुरा मोताळा तालुक्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा उपाध्यक्ष वर्षा ताथरकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

चामोर्शीचे पथक पोहोचले शाळा बाह्य व स्थलांतरित कुटुंबातील पालकांच्या जथ्थ्यावर. शिक्षणाचा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

चामोर्शी:-दिनांक २० जानेवारी, आज चामोर्शी तालुक्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोध मोहिम अंतर्गत पथक क्रमांक १ ने शाळाबाह्य व स्थलांतरित कुटुंबाच्या पालक-विद्यार्थी यांच्या जथ्थ्यावर जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन शोध मोहीम राबविली.शोध मोहिमेअंतर्गत covid-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आपल्या उदरनिर्वाहाच्या कारणामुळे काही कुटुंबाचे स्थलांतरण चामोर्शी तालुक्यात झालेले आहे.त्यामध्ये गडचांदूर व कोदामेढी या गावांतील मोलमजुरी करणाऱ्या पालकांचा समावेश आहे.सदर कुटुंब हि आपल्या पाल्यांना सोबत घेऊन आल्याचे दिसून आले.
शाळा बाह्य विद्यार्थी शोध मोहीमेत चामोर्शीचे गटसमन्वक तथा केंद्र प्रमुख हिम्मतराव आभारे,विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते, विवेके केमेकर,घनश्याम वांढरे,कु वंदना चलाख,विशेष तज्ञ सुशील गजघाटे व संसाधन शिक्षक रवी खेवले यांचा समावेश होता.

दुचाकीवरून महिलेची पर्स चोरून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकुण ७२ हजार ५०० रूपये किंमतीचा माल पसार

0

 

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

दुचाकीवरून महिलेची पर्स चोरून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकुण ७२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार किनगाव रोडवर घडला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, मनीषा विजय खंबायत (वय-३०) रा. किनगाव ता. यावल हल्ली मुक्काम उपनगर, नाशिक या महिला बुधवारी १९ जानेवारी रोजी सायंकाळी नंदोई भाऊ दिनेश दिगंबर लिंबायत यांच्यासोबत दुचाकीने किनगाव येथे जात असताना त्यांच्या दुचाकीला लावलेल्या पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेली. यात सोन्याचे ब्रेसलेट, सोन्याच्या रिंगा आणि रोकड असा एकुण ७२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल पर्ससहित चोरून नेला आहे. याप्रकरणी मनीषा खंबायत यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या रात्री ८ वाजता यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार अजिज हमीद शेख करीत आहे.

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेडोळ*. येथे व्यवसाय मार्गदर्शन शिबिर संपन्न…….

0

 

डी एस पिंगळे
निलंगा तालुका प्रतिनिधी

इयत्ता दहावी वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आले होते. व्यवसाय मार्गदर्शन शिबिरा मध्ये मार्गदर्शन करण्यासाठी शासकीय महिला तंत्रनिकेतन लातूर येथून मार्गदर्शक सोनाली हरताळकर व अंजली भंडारे या उपस्थित होत्या, यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना तंत्र व अभियांत्रिकी शिक्षण याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले, यामध्ये असणारे विविध कोर्स, अभ्यासक्रम त्याची आवश्यकता काळाची गरज अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मिळणारी संधी महिलांसाठी सुरक्षित जॉब याविषयी अतिशय चांगल्या पद्धतीची मार्गदर्शन केले. याप्रसंगी मंचावर मुख्याध्यापक श्री एस बी कदम सर, श्री.एम डी सय्यद सर श्रीमती पी.पी बरदाळे मॅडम, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

वरिष्ठ पत्रकाराचां प्रयत्नाला यश घुग्घुस म्हातारदेवी रोडचे गड्डे बुजवले.

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस म्हातारदेवी रस्त्यावर जड वाहनांमुळे खूप मोठ्या मोठ्या खड्डे पडलेले होते स्थानिक नागरिकांना लुंबिनी नगर, महाकाली नगरी,
म्हातारदेवी, तडाली, कडे जाणारे लोकांना खूप परेशानी होती मोठ-
मोठे खड्ड्यांमुळे होणारे त्रास आणि एक्सीडेंट खूप प्रमाणे वाढले होते. या विषयावर घुग्घुस चे वरिष्ठ पत्रकार दयाशंकर तिवारी, मनोज कनकम, गजानन साखरकर , श्रीकांत माहुलकर, प्रणय बंडी, ने लॉईड्स मेटल कंपनीकडून खड्डे बुजवण्यात निवेदन देण्यात आले. पत्रकारोंची निवेदनत संज्ञान घेत लयड्स मेटल कंपनी गड्डे बुज्वनात अले. जे काम स्थानीय प्रशासन आणि राजकीय नेते केले पाहिजे ते काम पत्रकार उभे राहुन करता येत. या अगोदर राजीव रतन रेल्वे गेट च्या ट्राफिक जाम च्या समस्या होता वारंवार पत्रकाराने आपला वृत्तपत्र द्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले त्यामुळे आज रेल्वे ब्रिज च्या काम सुरू झाले. चांगला काम करणारे निर्भिड पत्रकारावर काहि लोक कोठे आरोप लावत असतात. आणखी काही नवीन नेते आपली राजनीतिक नाव चमकविण्यासाठी प्रयत्न करत असतात.

रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन एक हात गमवावा लागला तरीही पीडित मजूर महिलेला वनविभागाकडून शासकीय तरतुदीनुसार आर्थिक मदत देण्यास दिरंगाई -प्रांजली धोरण

0

 

मलकापूर :- रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन एक हात गमवावा लागला तरीही पीडित मजूर महिलेला वनविभागाकडून शासकीय तरतुदीनुसार आर्थिक मदत देण्यास दिरंगाई का होत आहे असा सवाल करताच मोताळा वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे कडून तांत्रिक कारण समोर करण्यात येऊन पीडितेच्या प्रस्तावावर तातडीने आजच कार्यवाही अशी हमी देण्यात आल्याने जाणीव फाउंडेशनचे प्रयत्न सार्थकी ठरल्याचे दिसून आले.
मलकापूर तालुक्यातील मौजे बेलाड येथील सुनिता अर्जुन संबारे यांचा प्रस्ताव दाखल होऊन सहा महिन्याचा कालावधी लोटला तरीही अद्याप पावेतो त्यांना शासकीय तरतुदीनुसार आर्थिक साहाय्य मिळाले नाही यासंदर्भात यापूर्वी तसेच १६ जानेवारी रोजी पुण्यनगरीने वृत्त प्रकाशित करून वास्तव परिस्थिती मांडली होती. या वृत्ताची दखल घेत जाणीव बहुउद्देशीय फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा प्रांजली धोरण यांनी थेट मोताळा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयावर धडक देत वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिरंगाईबाबत जाब विचारला. दरम्यान अमाऊंट रिफेलेक्ट होत असल्यामुळे वेळ लगत होता परंतु आज सदर मदतीची रक्कम पीडित महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया केली जाईल असे आश्वासन देत रक्कम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तांत्रिक अडचण येत होती. त्यामुळे थोडा उशीर झाला असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी मान्य केले. दरम्यान प्रांजली धोरण यांनी आपल्या विभागांतर्गत असलेल्या इतर पीडित प्रस्ताव धारकांच्या बाबत सुद्धा माहिती मागितली असता सदर माहिती सुद्धा आपल्याला देण्यात येईल असे आश्‍वासन देण्यात आले. यावेळी जाणीव बहुद्देशीय फाउंडेशनचे नितीन गवई, मनोज यादव, सचिन ढोण, मंगेश तायडे, गणेश वाघ आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

उजड देणाऱ्या मेंणबत्तीनेच घराची केली राख- रांगोळी

0

 

काँग्रेसने केली आर्थिक मदद

(चंद्रपूर घुग्गूस )प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : येथील वॉर्ड क्रं. 02 येथे राहणाऱ्या मीना अजय आमटे ह्या अत्यंत हलाखीचे दिवस काढत असून उपजीविकेचे साधन म्हणून चहाची छोटीशी दुकान चालवितात त्यांना एक मुलगा असून तो मानसिक व शारीरिक रित्या कमकुवत आहे.
मुलगा घरी एकटा असतांना त्याने उजेडा करिता मेंणबत्ती पेटवली व घराच्या बाहेर गेला असता मेंणबत्तीने पेट घेतला व यात संपूर्ण घरच जळून राख झाला
आग एवढी भीषण होती की आगीत अन्न – धान्य, कपडे – लत्ते बिछाना सर्वच जळून गेल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली.
सदर घटनेची माहिती काँग्रेस महिला नेत्यां सौ. संगीता बोबडे यांनी तात्काळ शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांना दिली असता आज सकाळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
व पीडित कुटूंबाला अन्न – धान्य, साडी, व नगदी स्वरूपात मदद दिली याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी,ज्येष्ठ नेते किशोर बोबडे, सौ. संगीताताई बोबडे, कामगार नेते सैय्यद अनवर, विजय माटला, सुनील पाटील, अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते

यावल तालुका माजी सेवारत अर्धसैनिक कल्याण असोशिएसनच्या अध्यक्षपदी राजेश जगताप तर उपाध्यक्षपदी अय्युब तडवी यांची निवड

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी। वानखेडे

तालुका माजी/सेवारत अर्धसैनिक कल्याण एसोशियशन चे अध्यक्षपदी दहिगांव चे माजी सैनिक राजेश जगताप याची तर उपाध्यक्ष पदी सौखेडा सिमचे माजी सैनिक अय्युब तडवी यांची निवड करण्यात आली आहे . अर्धसैनिक सेवानिवृत/सेवारत सैनिक यांचे सुविधा व न्याय मिडवुन देने करिता दिल्ली येथील कोणफेडरेशन ऑफ एक्स पैरामिलेट्री फोर्स वेलफेयर एसोसिएशन व जलगांव जिला एसोशियशन यांचे कडून यावल तालुका सेवानिवृत/सेवारत अर्द्ध सैनिक यांचे समस्या चे निवारण करीता यावल तालुका अर्धसैनिक कल्याण एसोशियशन चे अध्यक्ष पदी दहिगांव तालुका यावल चे माजी सैनिक राजेश जगताप याची निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्ष पदी माजी सैनिक अय्यूब तडवी, सौखेडा तर सचिवपदी माजी सैनिक मोहन येऊल यावल, व उपसचिवपदी माजी सैनिक सुनील कदम यावल, तर कॉर्डिनेटर पदी यावल चे माजी सैनिक राजेश बाबूराव बारी याची निवड झाली आहे. दहीगांवचे माजी सैनिक राजेंद्र जगताप व सौखेडा चे माजी सैनिक अय्यूब तडवी याची ही निवड झालेने दहीगांव/सौखेडा/कोरपावली येथील सारे नागरिक यानी शुभेच्या दिल्या आहे सोबतच परिसरतिल माजी सैनिक/सैनिक यानीही शूभेच्या दिल्या आहेत यात विरावली चे माजी सैनिक मुकेश पाटिल, सैनिक महेंद्र पुंडलिक पाटिल, प्रदीप अड़कमोल, अमोल अड़कमोल, प्रशांत अड़कमोल , संकेत अड़कमोल व दहीगांव येथिल सैनिक चंद्रकांत साळूके,
तुषार सरोदे व मोहन अशोक चौधरी तसेच कोरपावली चे माजी सैनिक महेंद्र पाटिल व उज्ज्वल महाजन यानी कार्यकारणीचे स्वागत केल आहे.