Home Blog Page 348

असदपुर येथिन पशू वैधकिय दवाखाण्याला दिली भेट- उषा पानसरे

0

 

उषा पानसरे असदपूर

असदपूर येथिल पशू वैधकिय दवाखाना ला दिली भेट काही नागरिकांना सम्मस्या जानून डाॅ.जावेद खान पशू वैधकिय अधिकारी यांची बदली संप्टेबंर मध्ये चिखलदरा या परिसात झाली असता नागरिकांना काही परिशानी चा सामना करावा लागतो ।डाॅ.खान याचा जागेवर डाॅ.मूकेश खैरकार यांनी नोव्हेंबर मधे पद भार सांभाळले ,पशु वैधकिय अधिकारी डाॅ.मूकेश खैरकार याना लगभग दहा गाव बघावे लागतात असदपूर सेन्टर पशु वैधकिय दवाखाना असून या सेन्टर मध्ये येणारे गाव कोल्हा,नरसिंगपूर.सावळी वडगाव सावळी खूर्द, निभांरी रंगारवासनी ,शहापुर. रायपुर असे काही गाव बघावे लागतात त्या मूळे डाॅ. मूकेश याना आठवड्या तून केवल दोन दिवस शनिवार बूधवार दयावे लागतो त्या मूळे नागरिकानां परिशानीचा सामना करावा लागत आहे! डाॅ. जावेद खान हे अधिकारी डेली दरोरज दवाखान्यात येत होते त्या मूळे नागरिकाना अडचण जात नोहती परंतु असदपूर सेन्टंर असून सूध्दा या ठिकानी डाॅ. केवल आठवडयात दोन दिवस सूविधा मिळतात बाकी दिवस परिशानी भोगावी लागतो तसेच पशू वैधकिय कर्मचारी सूरेश राठोड हे डाॅ. नसून सूध्दा अगदी मनोभावे पशू जनावराला ते 24 तास सेवा देतात पशु च्या प्रती त्याचे प्रेम भावना एक कर्मचारी असून सूध्दा दवाखाना संभारळतो
सेन्टर असून पाण्याची व्यवस्था नाही ,पाठी मागे व डावी बाजूला सर्व भिंती पडल्येला असून वाल कंपाॅउन्ट नाही ,सफाई कर्मचारी सूध्दा नाही !पंचायत समिती अचलपूर अधिकारी व जिल्हा परिषद अमरावती अधिकारी यांनी असदपूर पशू वैधकिय सेन्टर कडे लक्ष देवून सर्व सोई मंजूर करुन देण्यात याव्या जेने करून नागरिकांना पशु उपचार करिता त्रास होणार नाही । सूरेश राठोड स्वःता दवाखान्याची सफाई करतात पंचायत समिती अचलपुर व जिल्हा परिषद यानी या कडे लक्ष देण्यात यावे
उषा पानसरे प्रेस संपादक पत्रकार सेवा महीला जि. अध्यक्ष
व सुर्या न्यूज मु.का. संपादीका

अवैध वृक्षतोड कधी थांबणार? वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केले वरती हात.जंगल होणार भुईसपाट.

0

 

जंगल हा प्राणी,पक्षी,कीटक आणि मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.वनविभाच्या संरक्षण करण्यासाठी वनविभागाची निर्मिती करण्यात आली आहे.त्या वनविभागात बऱ्याच महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदारी सोपवली गेली आहे.आणि उत्तम, प्रामाणिक,कर्तृत्वाची ठिणगी निर्माण करून समाजासाठी आणि शासनासाठी काम करण्याची संधी मिळाली आहे.
त्यामुळे त्यांच्याकडून वनविभागाच्या माहितीच्या संदर्भात अपेक्षा सुद्धा केल्या आहेत.परंतू बुलढाणा जिल्यातील मोताळा वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात होणा-या अवैध वृक्ष तोडी च्या संबधाने आमच्या पत्रकाराने आपला जीव धोक्यात आणुन तेथील वनरक्षक दादगाव बिट बावने मैडम ह्याना दुरध्वनी वरुन अवैध वृक्षतोड संदर्भात माहिती दिली.
त्यावर उचित कारवाई करतो असे तात्पुरती आश्वासन महिला अधिकाऱ्यांकडुन त्या पत्रकाराला थातुरमातुर उत्तर मिळाले. पन चौथी दिवस परत काय कारवाई झाली?ह्या बाबत माहिती घेण्याचा प्रयत्न पत्रकाराने केली असता पत्रकारालाच अधिकारी महिला अधिकाऱ्यांच्या नाहक रोषाला बळी पडावे लागले .
आम्ही महीला आहोत, आमच्यावर कुणी दबाव टाकू शकत नाही?आम्हाला जसे काम करायचे तसे काम आम्ही आमच्या मनमर्जीने करणार, संपूर्ण वृक्षतोड झाली तरी तुम्हाला काय करायचे आहे?अशी मल्लीनाथी ह्या वनपरिक्षेञ व वनरक्षक या दोन्ही महिला अधिकाऱ्यांच्या तोंडी कर्तव्यदक्षपणा दिसून आला.रक्षक तर भक्षक होणार नाही ना?असे चित्र तर निर्माण होणार नाही ना?असा प्रश्न उपस्थित होत आहे. पत्रकाराला अवैध वुक्ष तोडून पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यांच्या रोषाचा बळी ठरविण्यात आले.वनविभागात अशा महिला अधिकारी जर असतील तर कसे काय वनांचे संरक्षण होईल?याची चिंता पर्यावरण विभागाला भेडसावण्याचे दृश्य पहायला मिळत आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्यासाठी लोणार तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन

0

 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील सुकळी येथील सभेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी या आशयाचे निवेदन आज १८ जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टीचे बुलढाणा जिल्हा सचिव निर्मल संचेती यांच्या नेतृत्वात लोणार तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आली यावेळी माजी शहराध्यक्ष अविनाश शुक्ल, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुंदर संचेती, मोर्चा तालुका अध्यक्ष शुभम बनमेरू, प्रधानमंत्री जनकल्याण योजना तालुकाध्यक्ष विनोद थोरवे, युवा मोर्चा शहराध्यक्ष दीपक चौधरी, विषाल सोनाग्रा, रवी नागरे,विशाल वर्मा, खरात व इतर भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी

0

 

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व जिल्हा भंडारा येथील साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. नाना पटोले यांनी दिनांक १६ जानेवारी २०२२ रोजी भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बोलताना “आता आपली ताकद वाढली असून, आपण पंतप्रधान मोदी यांना मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो.” अशा वल्गना करत मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
नाना पटोलेंच्या या घृणास्पद वक्तव्याबद्दल व देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केल्याबद्दल त्यांच्या विरोधात आज मंगळवार 18 जानेवारी रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी घुग्घुस येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची विनंती केली.
यावेळी माजी सरपंच संतोष नुने, राजकुमार गोडसेलवार, विनोद चौधरी, श्रीकांत पांडे, नरेंद्र कांबळे यांसह अनेक मंडळी सोबत उपस्थित होते.
काही दिवसांआधी, पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या जीवाशी खेळ करण्याची सडकी मानसिकता काँग्रेसची होती मा. नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल कॉंग्रेसी नेत्यांमध्ये किती असूया भरली आहे. हे अशा निंदनीय घटनांमधून वारंवार सिद्ध होते.
भारताचे पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे नेतृत्व करतात. पंतप्रधान पदावरची व्यक्ती कोणत्याही विशिष्ट राजकिय पक्षापुरती मर्यादित राहत नाही. देशाच्या पंतप्रधानांचा सन्मान करणे. हे प्रत्येकाचं कर्त्तव्य आहे. असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी IAS नेहा भोसले यांची नियुक्ती

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी नेहा भोसले यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदाचा पदभार स्विकारला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, यावल पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी निलेश पाटील यांची चार महिन्यापुर्वी नाशिक येथील कळवण येथे शासकीय बदली करण्यात आली होती. तेव्हा पासून कायमस्वरूपी गटविकास अधिकारी हे पद रिक्त होते. तेव्हापासून सहाय्यक गटविकास अधिकारी मंजूश्री गायकवाड यांची प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी नेहा भोसले यांची नियुक्ती केले आहे. मंगळवारी १८ जानेवारी रोजी नेहा भोसले यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदाचा पदभार सकाळी १० वाजता स्विकारला. नेहा भोसले ह्या आयएएस अधिकारी असून आगामी काळात शासकीय योजनांच्या माध्यमातुन ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकासाचे लक्ष गाठणे हे आपले प्रमुख लक्ष राहणारचे नेहा भोसले यांनी सांगितले.

नाना पटोले यांच्या बेताल वक्तव्य मुळे लोणार भा, ज, प, चे वतीने नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करणे बाबत ची तक्रार

0

 

 

लोणार पोलिस स्टशनमध्ये देण्यात आली तक्रारीवरून नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भा, ज, प,शहर अध्यक्ष गजानन मापरि, विजय मापरी , उद्ध वराव आटोळे, शे,निसार भाई बाबाराव मुंडे सानप साहेब भा, ज, प, चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हा परिषद सदस्यांची आढावा बैठक.

0

डी. एस. पिंगळे
निलंगा तालुका प्रतिनिधी

भाजपा प्रदेश सचिव श्री. अरविंद भैय्या पाटील निलंगेकर यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हा परिषद सदस्यांची आढावा बैठक घेण्यात आली.
जिल्हा परिषद हे लोकांच्या समस्या सोडवण्याचे आणि विकासकामांचे एक उत्तम व्यासपीठ आहे आणि मतदारांनी या व्यासपीठावर सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली आहे, सक्रियपणे काम करणे आवश्यक आहे.
निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना, सदस्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मतदारसंघात नियमितपणे पोहोचण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. संपर्काच्या या काळात गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेली विकासकामे आणि त्याचा लाभ सर्वसामान्यांना देणे आपल्या पक्षाच्या नेत्यांनी आवश्यक आहे.
राज्यात सत्ता नसताना आपले केलेले कार्य आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेल्या जनहिताच्या कामासोबतच सर्वसामान्यांना झालेला फायदा हेच आगामी निवडणुकीत त्यांच्या निवडीचे रहस्य आहे. अधिकाधिक लोकांनी संपर्क मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा प्रदेश सचिव श्री. अरविंद भैय्या पाटील निलंगेकर यांनी केले आहे.

जिल्हा परिषद सदस्या सविता ताई अतुल भालेराव यांच्या प्रयत्नातून गटात एक कोटी तीन लाख पन्नास हजार रुपयांचे निधी उपलब्ध

0

 

यावल, प्रतिनिधी विकी वानखेडे

 

तालुक्यातील सावखेडा- हिंगोणा येथे जिल्हा परिषद सदस्या सविता अतुल भालेराव यांच्या प्रयत्नातून गटात एक कोटी तीन लाख पन्नास हजार रुपयांचे नीधी उपलब्ध झाल्याने मान्यवरांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन सोहळा सोमवारी पार पडला.

यावल तालुक्यातील हिंगोणा- सावखेडा जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सविता अतुल भालेराव यांचे विकास निधीतून सावखेडासीम येथे जिल्हा परिषद शाळा खोल्या बांधण्यासाठी 17 लक्ष रुपये ,शाळेच्या आवारात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी पाच लक्ष रुपये, अंगणवाडीसाठी 8.5 लक्ष रुपये, मोहराळे ग्रामपंचायत अंतर्गत जामुनझीरा अंगणवाडीसाठी 8.5 लक्ष, पांढरी वस्ती अंगणवाडीसाठी बांधकाम 8.5 लक्ष वड्री येथील शाळेच्या नवीन खोल्या बांधकामासाठी 17 लक्ष, वड्री ईदगाह कॉंक्रिटीकरण तीन लक्ष रुपये, वड्री येथील कॉंक्रिटीकरण व गटार बांधकाम साठी 9 लक्ष रूपये वड्री ते मावळा रस्ता डांबरीकरण पंधरा लक्ष रुपये कोळवद-कोरपावली रस्ता बारा लक्ष असे जिल्हा परिषद गटात विविध गावातील 103.5 लक्ष रुपयाच्या विकास कामाचे भूमिपूजन आज सोमवारी १७ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
सदर भुमिपुजन हे पंचायत समिती सभापती पल्लवी पुरूजीत चौधरी, उपसभापती योगेश भंगाळे, हिरालाल चौधरी, जिल्हा परिषदच्या सदस्या सविता अतुल भालेराव,भाजपाचे यावल तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांचे हस्ते पार पडले.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कृषी भुषण नारायण शशीकांत चौधरी, डांभुर्णीचे माजी सरपंच परिषदचे जिल्हाध्यक्ष पुरूजीत चौधरी ,कांचन फालक, पंचायत समितीचे सदस्य दीपक अण्णा पाटील, भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, देवीदास धांगो पाटील , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राकेश वसंत फेगडे ,लहू पाटील, अतुल भालेराव ,लक्ष्मण बडगुजर ,सावखेडा सरपंच बेबाबाई पाटील, मुबारक तडवी ,दिनेश पाटील, भुषण पाटील ,कमलाकर पाटील, बाजार समितीचे उपसभापती उमेश पाटील, नथ्थु पाटील, मोहराळे सरपंच नंदा गोपाळ महाजन, उपसरपंच जहागीर तडवी ,संजीव महाराज ,गोपाळ महाजन, अकिल तडवी, प्रमोद महाजन, अनिल अडकमोल, राजू तडवी ,यशवंत पाटील ,वड्री सरपंच अजय भालेराव, उपसरपंच पंकज चौधरी ,नवाब तडवी, उमाकांत पाटील, ललित चौधरी, सरदार तडवी, फिजा तडवी ,नयना चौधरी, वैशाली चौधरी, आर .के .चौधरी, सागर कोळी गोविंदा सुरवाडे, सुनील पाटील व आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोळन्हावी जिल्हा परिषदच्या शाळेत समग्र शिक्षा अभीयांना अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न

0

 

विकी वानखेडे यावल

तालुक्यातील कोळन्हावी येथील जिल्हा परिषदच्या मराठी शाळेत शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शाळेतील२१५ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले . कोळन्हावी येथील जिल्हा परिषदच्या मराठी शाळेत आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोळन्हावीच्या प्रथम नागरीक सरपंच सौ.मंजुषाताई विकास सोळंके ह्या होत्या. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोळंके , उपाध्यक्ष अश्विनी सोळंके , सदस्य पितांबर सोळंके , ज्योती सोळंके , विद्या सोळंके , ललिता सोळंके , सरला सपकाळे , माजी अध्यक्ष शेखर सोळंके , ग्राम पंचायत सदस्य विकास (गोटू भाऊ) सोळंके , जगदीश सोळंके , कैलास सोळंके , राजू सोळंके , दिपक सोळंके (ग्रा.प.संगणक परिचालक), रतन सोनवणे . उपस्थित होते. शाळेचे माजी अध्यक्ष शेखर सोळंके आणी मुख्याध्यापक लालचंद सोळंके यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक लालचंद साळुंखे , शिक्षक गंगाधर सपकाळे , राजेंद्र साळुंखे , नारायण कुंभार , प्रमोद राणेराजपुत , शीतल बाविस्कर , शहाजी चौधरी यांनी प्रयत्न केले.सूत्रसंचालन नारायण कुंभार यांनी तर कार्यक्रमास उपस्थितांचे आभार प्रदर्शन राजेंद्र साळुंखे यांनी मानले .

मुख्याधिकारी डाॅ प्रशांत शेळके यांचे विरोधात काँग्रेस शहराध्यक्ष किरणबाप्पू देशमुख यांचे आमरण उपोषण सुरु

0

 

शेगाव : पक्षपाती भूमिकेमुळे येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांची तत्काळ बदली करावी या मागणीसाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष किरणबापू देशमुख यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे .
उपोषणाच्या पहिल्या दिवशी मलकापूर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार राजेश एकडे यांनी भेट दिली व उपोषणकर्ते काँग्रेस शहराध्यक्ष किरण देशमुख यांच्याशी विस्तृत चर्चा केली व मागणीची दखल घेत लवकर योग्य ती कारवाई करणे बाबत नगर विकास मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार राजेश काकडे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले तसेच वंचित बहुजन आघाडी चे युवा नेते प्रभाकर पहूरकर यांनी काँग्रेस शहराध्यक्ष देशमुख यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला यावेळी डॉक्टर जयंतराव खेडकर बुढन जमादार मोतीराम खवले,अशोक गडकर,नाहसं अध्यक्ष विजय ढगे, युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस पवन पचेरवाल, सेवादल तालुका अध्यक्ष अनिल सावळे,
चंद्रकांत माने, गौलखेड चे उपसरपंच ज्ञानेश्वर शेजोळे, आळसणा चे माजी सरपंच गोपाल उज्जैनकार, निकुंज देशमुख, दिलीप दहीकर आदीसह कार्यकर्ते भेटीसाठी येत होते आता उपोषणातून काय मार्ग निघतो, याकडे राजकीय मंडळी व शहरवासीयांचे लक्ष लागले आहे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांची बदली होते की नाही याबाबत चर्चा शहरात रंगत आहे.