Home Blog Page 349

आलमारी फोडून ४० हजार रुपायाचे सोन्या चांदीचे दागिने चोरी २ आरोपी अटक नविन भोन येथील घटना

0

 

 

पातुर्डा फाटा [ प्रतिनिधी ] तालुक्यातील नविन भोन येथील नातलगाच्या घरी गावात तेरविच्या कार्यक्रम असल्याने व घरी कोणी नसल्याचे संधी साधुन दोन चोरट्यांनी दरवाजा उघडून घरात आत प्रवेश व लोखंडी आलमारीचे लॉकर तोडून त्यातील १० ग्रम सोन्याची पोत अंदाजे किं ३५ हजार रुपये अर्धा ग्रम सोन्याचा ओम अंदाजे किं १५०० शे रुपये , चांदीच्या तोरड्या किं २००० रुपये , नगदी ७५० रु एकुन ३९२५० रुपयाचा माल लंपास केल्याची घटना तेरवीचा कार्यक्रम आटपुन घरी आल्या नंतर उघडकीस आली
या बाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि तालुक्यातील नविन भोन येथील रहिवासी दुर्गा विठ्ठल ठाकरे यांच्या नातलगाच्या घरी तेरवीचा कार्यक्रम असल्याने संधी साधुन गावातीलच दोघे घराचा दरवाजा उघडून घरातील लोखंडी आलमारीचे लॉकर तोडून त्यातील सोन्याची पोत , सोन्याचा ओम , चांदीच्या तोरड्या , नगदी असे एकुन ३९२५० रुपयाचा मुद्देमाल दोघांनी चोरल्याचा संशय असुन या बाबत शेजाऱ्याकडे चौकशी केली असता गावातील दोघे संशयीत घरातुन निघतांना निदर्शनास आले शेजाऱ्यांनी पाहिल्याचे घर मालक विठ्ठल ठाकरे यांना सांगितले दोन संश्यीत चोरट्यानी गावात चोऱ्या केल्याने दोन्ही संश्यीत आरोपी विरुद्ध लेखी तक्रार
दुर्गा विठ्ठल ठाकरे यांनी तामगाव पोस्टेला दिलेल्या फिर्यादी वरुन गावातील आरोपी रविन्द्र उर्फ शिवा नारायण ठाकरे व रामेश्वर मनोहर मांजरे दोघे रा नविन भोन यांना तामगाव पोलीसांनी अटक करुन दोन्ही आरोपी विरुद्ध कलम ४५४ , ३८० भादवि प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे तामगाव पोस्टेचे ठाणेदार उलेमाले यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास बीट जमादार मेहेश्रे करित आहे

यावल ओमायक्रॉन व कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर पोलीस व नगर परिषद प्रशासनाच्या संयुक्त कार्यवाहीत विना मास्क फ़िरणाऱ्यांवर दंड

0

 

कार्यकारी संपादक विकी वानखेडे

देशात व राज्यात ओमायक्रॉन आणी कोरोना संसर्गाच्या वेगाने वाढत्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर आरोग्य प्रशासना सर्तक झाले असुन , जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांच्या आदेशान्वये यावल नगर परिषद प्रशासनाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने संयुक्तपणे कोवीड१९चे नियम न पाडण्याऱ्यांवर नागरीकांवर कार्यवाहीस सुरूवात केली आहे . यावल शहरातील बुरूज चौकात आज सकाळ पासुन जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांच्या आदेशान्वये नगर परिषदचे मुख्यधिकारी अविनाश गांगोडे यांच्या व पोलीस निरिक्षक सुधीर पाटील , पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले व स्थानिक पोलीस कर्मचारी भुषण चव्हाण, राहुल चौधरी , निलेश वाघ , के पी पवार, पोलीस वाहनचालक सिकंदर तडवी तथा नगर परिषदचे प्रशासनाचे कर्मचारी यांनी शहरातील विना मास्क वाहनचालक व व्यवसायीकांवर कार्यवाहीला सुरूवात केली असुन , सकाळच्या सत्रात सुमारे ३०ते ३५ विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई आतापर्यंत करण्यात आल्याचे दिसुन येत आहे. आरोग्य प्रशासनाकडुन वारंवार कोरोना संसर्गा संदर्भात जनजागृती व्हावी याकरीता विविध माध्यमातुन कोवीड१९च्या प्रसार थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असतांना ही बरेच नागरीक हे गाफील असल्याचे दिसुन येत आहे .

एकल कलाकार अर्थसहाय्य अनुदान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कलाकारांनी अर्ज करावे जिल्हाधिकारी डॉ . अभिजीत राऊत यांचे आवाहन

0

 

कार्यकारी संपादक विकी वानखेडे

सद्याच्या परिस्थितीला व दोन वर्षापासुन संपुर्ण राज्यात कोरोना विषाणु संसर्गाचा प्रार्दूभाव तिसऱ्या लाटेच्या रूपात आले असुन , कोरोना संकटकाळात संचारबंदीमुळे अनेक सांस्कृतीक कार्यक्रमांना बंदी आली असल्याने अशा कलाकारांना अर्थसहाय्य करण्यासाठी एकल कलाकार अनुदान योजना सुरू केली असुन ,या योजनेचा लाभ मिळवण्या करीता अर्ज पंचायत समितीत द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ . अभिजीत राऊत यांनी केले आहे . या संदर्भात सांस्कृतिक व कला क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील कलाकारांसाठी ही राज्य शासनने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर एकल कलाकार एकरकमी अर्थ सहाय्य योजना सुरू केली असुन , याकरिता तालुक्यातील विविध क्षेत्रातील कलाकारांनी यावल पंचायत समितीच्या माध्यमातुन अर्थसहाय्य योजनेचे अर्ज प्राप्त करावे आणी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करून या समितीचे तालुका पातळीवरील अध्यक्ष तहसीलदार महेश पवार , पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ . मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) , समितीचे सचिव सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांच्याकडे छाननी समितीकडे द्यावे लागणार असुन , तालुक्यातील कोरोना संकट काळात आर्थीक संकटात ओढवलेल्या कलाकारांनी या योजनेचा अर्थसहाय्य लाभ मिळवण्यासाठी अर्ज करावे असे आवाहन एकल कलाकार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. अभिजीत राऊत यांनी केले आहे .

दलित वस्तीवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात घुग्गूस भाजपातर्फे उपोषण व विविध आंदोलने

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

रविवार 16 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता घुग्घुस येथील बस स्थानक समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दलित वस्तीवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात घुग्घुस भाजपातर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात व भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात उपोषण सुरु करण्यात आले.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी माल्यार्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.
घुग्घुस नगर परिषदेने घुग्घुस दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत वार्ड क्र. 4 व वार्ड क्र. 5 व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरला सरसकट वगळल्यामुळे वार्डातील सिमेंट रस्ते व अंडरग्राउंड नाली बांधकामासाठी 3.5 करोड रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकला नाही. या वार्डातील सर्व दलित बांधवांवर हेतूपुरस्पर अन्याय करण्यात येत आहे.
जोपर्यंत वार्ड क्र. 04 व 05 ला निधी मिळत नाही व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत हे उपोषण असेच सुरू राहणार आहे.


पहिल्या दिवशी उपोषणाला माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी पं.स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच राजकुमार गोडसेलवार, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, पूजा दुर्गम व माजी तंमुस अध्यक्ष मल्लेश बल्ला सोबत असंख्य कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी सरपंच संतोष नुने, जेष्ठ नेते पूनम शंकर, माजी ग्रामपंचायत सदस्य वैशाली ढवस,महेश लठ्ठा, विक्की सारसर, दीपक मिसाला, गुरूदास तग्रपवार, विकास बारसागडे, योगेश सारसर, गणेश मोहुर्ले, रवी बडगुलवार उपस्थित होते.

वलगाव नवसारी रिंग रोड चौकाचे छत्रपती संभाजी राजे चौक नामकरण

0

 

उषा पानसरे असदपूर

आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्याहस्ते नामफलकाचे अनावर
अपराजित योद्धा क्षात्रवीर संभाजी राजे यांचा राज्याभिषेक दिन साजरा

मराठा सेवा संघ व इतर कक्षाचे आयोजन

*अमरावती १६ जानेवारी* : वलगाव नवसारी रिंग रोड चौक ला छत्रपती संभाजी राजे चौक फलक अनावरण कार्यक्रम रविवार दिनांक १६ जानेवारी २०२२ रोजी पार पडला. १६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता.. या दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजी राजे चौक फलक अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोणत्याही संकटा शिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो. पण अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवितो. या शब्दांना सार्थ ठरवित छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार हा तेवढाच कार्यकुशल व पराक्रमी आहे. हे त्यांनी प्रत्येक बाबतीत सिध्द केले.त्यांचे कर्तृत्व व नेतृत्व हे सर्वांनाच प्रेरणादायी ठरणारे आहे.
त्यामुळेच वलगाव नवसारी रिंग रोड चौक ला छत्रपती संभाजी राजे चौक फलक अनावरण कार्यक्रम हा अल्पायुषी आयुष्यात २०१ लढाई लढलेल्या आणि एकही पराभूत न होणारा अपराजित योद्धा म्हणून ओळखले जाणारे छत्रपती संभाजी राजे यांना खऱ्या अर्थाने आदरांजली अर्पण करणारा ठरणारा आहे. या शब्दात आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी उपस्थितांना संबोधित केले. सर्वप्रथम छत्रपती संभाजी राजे यांचे प्रतिमपूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. तदनंतर आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी फित कापूत छत्रपती संभाजी राजे चौक नामफलकाचे जाहीर उद्याटन केले. यावेळी आमदार महोदय यांचे मराठा सेवा संघ जिल्हा शाखेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने यावेळी जिजाऊ वंदना सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दरम्यान नगरसेवक प्रशांत डवरे यांनी आपण मनपाच्या विधी समितीचे द्वारे मंजुरात प्राप्त करीत मनपाच्या आमसभेत सुद्धा छत्रपती संभाजी राजे चौक नामकरण करण्यासाठी मंजुरात मिळविली. असल्याचे सांगितले.
मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष— अश्विन चौधरी यांनी आपल्या संबोधनात संस्कृत चे ज्ञानी, निर्णयक्षमता असणारे, प्रचंड शौर्यशाली नेतृत्व म्हणजे छत्रपती संभाजी राजे होय. असे सांगितले. तर वयाच्या १४ व्या वर्षी बुद्धभूषणम नावाचा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहून त्यांनी आपले संस्कृतचे ज्ञानाचे दर्शन सर्वांना त्याकाळी घडवून आणले असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडकेंसमवेत नगरसेविका निलिमा काळे, प्रदेश पदाधिकारी शिवमती कांचन उल्हे, किर्तीमाला चौधरी, जिजाऊ ब्रिगेड च्या प्रदेश प्रसिद्धी प्रमुख शिवमती क्षिप्रा मानकर, यांच्यासह मनाली तायडे, मैथिली पाटील, श्रद्धा पाटील , सुषमा बर्वे, मंजुषा ठाकरे, शुभांगी वसू , प्रा. डॉ. वैशाली गुडधे, हर्षा ढोक, कांचन मुरके, वृषाली जाधव, श्रद्धा गाले, वैशाली जाधव, प्रज्ञा राठोड, रीना राठोड, लक्ष्मी उमेकर, शिल्पा काळे, श्वेता मानकर, रेखा जाणे, सविता भुयार, विद्या देशमुख, संजीवनी देशमुख, प्रतिभा पुंडकर, मंगला बोडके, प्रिया घोंगडे, अर्चना इंगोले, क्षमा इंगोले, प्रणाली घाटे, लीना देशमुख, संगीता इंगोले, अर्चना देशमुख, रेखा तट्टे, शुभांगी देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, मराठा सेवा संघाचे शिवश्री अरविंद गावंडे, चंद्रकांत मोहिते, अश्विन चौधरी, नगरसेवक प्रशांत डवरे, प्रशांत महल्ले , यश खोडके, संजय ठाकरे, संजय ढोरे, राजेंद्र अढाऊ, हरिभाऊ लुंगे, बंडुपंत भुयार, हरिदास उल्हे, इंजिनिअर प्रदीप अंधारे, रवी मोहोड, गजानन चौधरी, विजय चौधरी, श्रीकृष्ण बोचे, सतीश काळमेघ, एम. व्ही. देशमुख, भाष्करराव ठाकरे, प्रकाश राऊत, विशाल भगत, प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे, प्रा. सुधाकर विघे, एन. एम. मोरे, वैभव निचळ, उदय काकडे, निखिल घुरडे, महेंद्र गाडेकर, एच. जी मांडवे, प्रा. जयंत इंगोले, दीपक कोरपे, प्रा. विजय काळे, प्रा. नरेश पाटील, भोजराज काळे, वामनराव शेंडे, निलेश ठाकरे, राजेंद्र कुर्हेकर, के. बी. पाटील, दिनकरराव काळे, तुळशीराम माने, ऍड. सुनील बोळे, नंदकिशोर काळस्कार, अविनाश कडू, गणेशराव वसू, मोहन पुंडकर, दिगंबर टोळे, मनीष पाटील पथ्रोटकर, अरुण चौधरी, नंदकुमार चौधरी, इंजि. आनंद जवंजाळ, प्रशांत गावंडे, प्रा. डॉ. प्रफुल गुडधे, राजेश बर्वे, शिवाजी बुरंगे, विलास देठे, राजेश कोरडे, संतोष चिंचलकार, संतोष गाळे, विनोद ढोलवाडे, दत्ता कथिलकर, कैलास देशमुख, दत्तात्रय बागल, सुरेश भेटाळू, योगेश सवई, सुयोग्य तायडे, दिलीप साखरे, आर. एन. भटकर, आर. एस. चर्पे, रवींद्र इंगोले, सुनील कुकडे, गोपाळ पळस्कार, नंदकिशोर रडके, नितीन तट्टे, अविनाश राठोड, नितीन तायडे, श्याम मानकर, संदीप वानखडे, सुरेंद्र गावंडे, हरिहर केने, पुरुषोत्तम गावंडे, रवी देशमुख, बबलू ढोरे, छोटू खंडारे, सचिन दळवी, गजानन पागृत, रामेश्वर चर्पे, निलेश लबडे, पिंटू मानकर, माजी नगरसेवक प्रवीण मेश्राम, सचिन शाह, प्रदीप दिवाण, अभिषेक धुरजड, आकाश हिवसे, श्रेयस पेठे, शुभम गवई, अजिंक्य मोरे, वेदांत गावंडे, दिनेश देशमुख, बंडू निंभोरकर, प्रशांत पेठे, राजेश कोरडे, निलेश शर्मा, प्रशांत काळपांडे, श्रीराम पानसरे, प्रशांत यावले, अनंत जगताप, आकाश वडनेरकर, राजेंद्र ठाकरे, प्रशांत इंगोले, श्याम मानकर, राजेश उमेकर, निरंजन राठोड, महेश देशमुख, राजेंद्र देशमुख, श्रीपाद टोहरे आदींसहित मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड सह अन्य पक्षाचे सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांसह स्थानीय परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी व युवक बांधव प्रामुख्याने उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज चौक फलक अनावरण सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभार मराठा सेवा संघ चे प्रवक्ता चंद्रकांत मोहिते यांनी मानले. यावेळी तुमचं आमचं नातं काय- जय जिजाऊ जय शिवराय ,….. रक्तारक्तात भिनलंय काय -जय जिजाऊ जय शिवराय च्या जयघोषाने यावेळी आसमंत दणाणून गेला होता ..

राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

0

 

डी. एस. पिंगळे
निलंगा तालुका प्रतिनिधी

श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे छत्रपती श्री संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यावेळी प्रदेश अध्यक्ष मा.विजयकुमार भैय्या घाडगे पाटील,राज्य सल्लागारमा.भगवान दादा माकणे, मार्गदर्शक मा.सुधाकर दाजी पाटील ,छावा संघटनेचे युवराज मा. सत्यजित अण्णासाहेब जावळे पाटील,संपर्क प्रमुख मा.प्रकाश भाऊ गोमसाळे पाटील, तालुका संघटक मा.किरण भैय्या पाटील, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष मा.वैभव गोमसाळे,मा.बबन राजे,मा.राजकुमार सांळुके,संजय पौळ, धनराज बिराजदार,आदित धुमाळ, चैतन्य माकणे ,,शुभम डोंगरे,विकास जाधव,पवन मैत्रे,अमर माळी,अभिनव धुमाळ,आशिश येळीकर, हर्ष निला,आकाश मुळे,रूषी पुटेवार,विशाल कदम,नितिन माने,दिगंबर कदम,व छावा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावल येथे कायद्याशीर बंदी असतांना मांजाची विक्री करणाऱ्या एकावर पोलीसांनी केला गुन्हा दाखल

0

 

कार्यकारी संपादक विकी वानखेडे

यावल । शहरातील खिर्नीपुरा भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असतांना मांजा विक्री करणाऱ्या एकास घेतले ताब्यात १ हजार ८२० रूपये किंमतीचा मांजा केला जप्त करण्यात आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल शहरातील खिरनीपुरा भागात नायलॉन मांजा विक्री कायद्याशीर बंदी असतांना सदरचा नायलॉनचा धोकादायक मांजा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली असता या माहीतीच्या आधारा वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने असलम टेन्ट हाऊस येथून १८२० रुपये किमतीचा विक्रीसाठी आणलेला नायलॉनचा मांजा जप्त केला आहे. या प्रकरणी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या शेख असलम शेख जहिरोद्दीन याचे विरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास करीत आहे

पातुडर्यात राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या महाआरोग्य शिबीरात तेराशे रुग्णांची विविध आजाराची तपासणी तर विविध आजाराने त्रस्त ४५० पात्र रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया होणार

0

 

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी व गोदावरी फॉन्डेशन जळगाव खां यांच्या सयुक्त विद्माने आज जिल्हा परिषद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयच्या प्रांगणात भव्य महाआरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण ढगे होते तर शिबीराचे उदघाटन हभप दहिकर महाराज, राष्ट्रवादी प्रदेश प्रतिनिधी विश्वनाथ झाडोकार , माजी पं स सभापती लिलाताई दामधर, यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व ध्नवंतरी दैवत प्रतिमेचे पुजन करण्यात आले व्यासपीठावर आयोजक माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ , जेष्ठनेते विश्वनाथ झाडोकार , माजी सभापती लिलाताई दामधर , माजी नगराध्यक्ष तुकाराम घाटे , रामदास धर्माळ , विनायक वानखडे, दुर्गासिंग सोळंके, पंजाब वानखडे, बिस्मिल्लाह खान, राजु दाभाडे , नंदु अढाव , राजु आमटे , हरिभाऊ पुंडे , पातुर्डा खुर्द सरपंच विलास मानकर , गणेश धर्माळ , गोविंदा इंगळे , आदी मान्यवरांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला या महा आरोग्य तपासणी शिबीरात हूदय रोग , २ डि इको ईसीजी , कान नाक घरा , शुगर , सर्व तपासणी मोफत महिलांच्या सर्व आजाराची मोफत तपासणी गोदावरी फॉन्डेशन च्या डॉक्टर वैभव फडके डॉक्टर रत्नाकर जैन , डॉ शेख मुजाहिद , डॉक्टर सुशील दांडगे डॉक्टर आदित्य नांदेडकर डॉक्टर संपदा मुंडे डॉक्टर सुमित जैन डॉक्टर आदिती , विशाल शेजवळ (जनसंपर्क अधिकारी ) तज्ञ डॉक्टर कडून विविध आजाराच्या तेराशे रुग्णांची तपासणी केली ४५० पात्र विविध आजाराने त्रस्त गरजु रुग्णांची व नेत तज्ञ डॉक्टरा करवी मोतीबिंदु शस्त्रक्रिया सर्व प्रकारच्या आजारा वरिल पात्र रुग्णांची शस्त्रक्रिया डॉ उल्लास पाटील वैधकिय महाविद्यालय व रुग्णालयात मोफत होणार असल्याने १७ जानेवारी सोमवार रोजी रुग्णांची रुग्णवाहिका रवाना होणार आहे पातुर्डा परिसरातील विविध आजाराने त्रस्त रुग्णांनी महाआरोग्य शिबीर आयोजक माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांचे आभार मानले
संचालन शिवकुमार भातखडे सर यांनी केले तर पंजाब वानखडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

आ सौ श्वेताताई महाले यांनी महाराष्ट्र बँकेच्या व्यवस्थापकास घातला घेराव

0

 

 

अनिलसिंग चव्हाण( मुख्य संपादक)

चांडोळ ÷ अतिवृष्टीची मिळालेली मदत व पिकविम्याची आलेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना न देता परस्पर पीक कर्ज खात्यात वळती करून किंवा त्या खात्याला होल्ड लावणाऱ्या चांडोळ येथील बँक व्यवस्थापकास आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या खात्याला लावलेला होल्ड काढण्यास भाग पाडल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे .
चांडोळ येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापका यांच्या विरुध्द अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या मनमानी व उद्धट वागणूकी बद्दल तक्रारी केलेल्या आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मिळालेली मदत आणि पीक विम्याचे आलेले पैसे न देता त्यांचे पैसे शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे परस्पर कर्ज खात्यात जमा केल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरत चालला होता . सदर बँक व्यवस्थापकास अनेकदा फोन करून समज दिली . त्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या . जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांना सांगून ही सदर बँक व्यवस्थापकाचा कारभार सुधारला नसल्याने आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी दि 13 / 1/2022 रोजी सदर बँक व्यवस्थापकास घेराव घालून जाब विचारला .
घेराव घालताच होल्ड काढला
आ सौ श्वेताताई महाले
आ सौ श्वेताताई महाले यांनी शेतकऱ्यांसह घेराव घालताच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेल्या पैशाला लावलेला होल्ड काढण्यात आला .त्यामुळे आज जे शेतकरी बँकेत गेले त्या शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली होती.

भविष्यात पुन्हा असे घडल्यास FIR दाखल करा
आ सौ श्वेताताई महाले पाटील
शेतकऱ्यांना मिळालेले शासकीय अनुदान , अतिवृष्टी , नैसर्गिक किंवा इतर आपत्तीची आर्थिक मदत किंवा पीक विम्याची मिळालेली नुकसान भरपाई कोणत्याही परिस्थितीत होल्ड न करता शेतकऱ्यांकडे कर्ज थकबाकी असली तरी कर्ज खात्यात जमा करू नये असे शासनाचे नियम आहे . सदर मदत कर्जखात्यात जमा करणे किंवा त्या रकमेला होल्ड करणे हे बेकायदेशीर असल्याने भविष्यात कोणत्याही बँक व्यवस्थापनाकडून अशी बेकायदेशीर कृती झाल्यास त्यांच्यावर FIR दाखल करण्यात यावा अशी मागणी आ सौ श्वेताताई महाले यांनी यावेळी बोलताना केली .

यावेळी उपस्थित भाजपा जिल्हाउपाध्यक्ष श्री.देवीदास पाटील जाधव, श्री.प्रकाश पडोळ पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सुनीलभाऊ देशमुख, पंचायत समिती सदस्य श्री.संदीप पाटील उगले, श्री.समाधान आघाव, श्री.समाधान इप्पर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री.योगेश राजपूत,किरण सरोदे तालुका कोषाध्यक्ष भाजप,
योगेश राजपूत तालुका अध्यक्ष युवा मोर्चा ,अरुण पाटील ,जयेश पडोळ, अर्जुन लांडे जिल्हा सचिव युवा मोर्चा , जितेंद्र जैन सरचिटणीस, मंगेश जाधव , ,सरपंच सौ सावित्रीबाई बोर्डे ,अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष श्री.सूर्यदेव काकडे गावचे ,उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष श्री.किरण पाटील धंदर,डॉ विजय काटोले वैदेकीय आघाडी ता. अध्यक्ष शरद देहमुख ज्ञानेश्वर गुळवे, अर्जुन उत्तम लांडे युवा मोर्चा जिल्हा सचिव संजूबाप्पू देशमुख रामेश्वर आल्हाट तुळशीराम आल्हाट बबन आल्हाट बाबुराव आल्हाट रमेश आल्हाट समाधान सिनकर रमेश नरवाडे अरुण बोडखे अनिल गुळवे ज्ञानेश्वर पवार शुभम नरवाडे शिवराम नरवाडे तंटामुक्ती अध्यक्ष गुलाबराव शिंदे देविदास काटोले नारायण सावले अंकुश सावळे गणेश बोडखे संतोष भगत दिलीप पाखरे बाबुराव पवार शालिकराम आसवलं हिरालाल सिनकर सुरेश आस्वाल
, श्री.विलास पालकर, श्री.समाधान पालकर, श्री.शैलेश राजपूत, श्री.शामदादा शिंबरे,
कल्याणराव कानडजे , शालीकराव कानडजे,
विठ्ठल मोरे सरपंच , राजेंद्र कानडजे, शेषराव कानडजे, गजानन देशमुख ,गजानन जाधव , राजू चांदा ,गजानन सपकळ , सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते..!

मोताळा वनपरिक्षेत्र अंतर्गत नांदुरा -चांदूर बिस्वा रोडवर मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड. वनअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

0

 

SURYA MARATHI NEWS

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक ) सह निलेश चिपडे

पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीने वृक्ष लावा वृक्ष जगवा असे म्हटले जाते त्याकरता लाखो रुपये खर्च करून वृक्ष लागवड केली आहे व केल्या जात आहे. तर दुसऱ्या बाजूने मोताळा वनपरिक्षेत्र अंतर्गत मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असून स्वतःचे चांगले करीत असल्याची चर्चा आहे.

 

याबाबत थोडक्यात माहिती अशी की मोताळा वनपरिक्षेत्र अंतर्गत आर.एफ.ओ.   दादगाव  बिट जमदार– यांच्या कृपा आशीर्वादाने नांदुरा -चांदूर बिस्वा रोडवर व काही भागात दररोज मोठ्या प्रमाणात तीही मोठ मोठ्या वृक्षांची व कोणतीही परवानगी न घेता अवैधरित्या खुलेआम वृक्षतोड सुरू आहे.यावर कोणताही कारवाई नाही. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी मोताळा, नांदुरा, तालुक्यातील व इतर  आरा मशीन वर जाऊन धाड टाकून पाहणी केली तर हजारो घनफूट लाकूड साठा मिळून येईल. त्याकरता संबंधित विभागाने यावर कारवाई करणे आवश्यक आहे असे जनतेतून बोलल्या जात आहे.