Home Blog Page 350

चुंचाळे गावात एका तरूणाने गळफास आत्महत्या

0

 

यावल प्रतिनिधी विकी। वानखेडे

तालुक्यातील चुंचाळे गावात राहणाऱ्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, असलम सायबु तडवी (वय३०) असे मृत तरुणाचे नाव असून असलम याने आज (दि.१४) रोजी सकाळी १० ते १०:३० वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घरातील इतर सदस्य बसले असता तडवी यांचा सहा वर्षाचा आशु नावाचा मुलगा हा घरात आपल्या वडीलांना पाहण्यासाठी गेला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. असलम यांना तात्काळ खाली उतरवले असून उपचारासाठी जळगाव येथे घेवुन जात असतांना वाहन जळगाव शहरात पोहोचताच त्या तरूणास मृत्युने गाठले व त्यांची प्राणज्योत मावळली. मयत तरूण असलम तडवी हा मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरर्निवाह करीत होता. त्यास दारूचे व्यसन असल्याचे वृत्त आहे. मयत तडवी याच्या मृतदेहावर जळगाव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे.

निमगाव रोडवर सकाळीच एका वयोवृद्ध व्याक्तीस दोन अज्ञात भामट्यांकडुन अडवुन लुट केल्याची घटना

0

 

यावल तालुक्यातील निमगाव रोडवर अज्ञात दोन जणांनी पोलीस असल्याचे सांगत दुचाकी आडवून वृध्दाच्या हातातील १० ग्रॅमची अंगठी जबरी हिसकावून दुचाकीने पसार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की, दिलीप पुरूषोत्तम बऱ्हाटे (वय-६८) रा. पाडळसे ता. यावल हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार १३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता कामाच्या निमित्ताने निमगाव येथे दुचाकीने जात असतांना त्यांच्या मागून अज्ञात दोन जण दुचाकीवरून येवून त्यांची दुचाकी अडविली. आपण दोघे पोलीस असल्याचे सांगत दिलीप बऱ्हाटे यांच्या हातातील १० ग्रॅमची सोन्याची अंगठी जबरी हिसकावून दुचाकीने भुसावळकडे पसार झाले. दिलीप बऱ्हाटे यांनी यावल पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजमल पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

थोरगव्हाण ग्रामपंचायतच्या अपात्र झालेल्या सरपंचपदावर प्रभारी सरपंचपदी ज्योति पाटील यांची निवड

0

 

यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील थोरगव्हाण येथील ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी ज्योति केवल पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
यावल तालुक्यातील थोरगव्हाण ग्रामपंचायतचे लोकनियूक्त सरपंच म्हणुन निवडुन आलेले उमेश सोनवणे यांना जिल्हाधिकारी डॉ . अभिजीत राऊत जळगाव यांनी जातीच्या दाखला वैद्यता वेळेत सादर केला नसल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आल्यानंतर रीक्त झालेल्या सरपंचपदावर उपसरपंच ज्योति केवळ पाटील यांची प्रभारी सरपंचपदी निवड मासिक सभेत करण्यात आली. थोरगव्हाण ग्रामपंचायतची मासिक सभा उपसरपंच ज्योति पाटील याचा अध्यक्षतेखाली घेण्यात आली ग्रामपंचायतचे ग्रामसेविका सौ.कविता बावीस्कर यांनी सभेला सुरुवात करुन अजेंडा वरील विषय वाचन करुन सविस्तर माहीती दिली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्यं गोपाल चौधरी ,हिरालाल चौधरी, अनिल भालेराव, पदमाबाई पाटील, मनोहर पाटील, सिध्दुबाई पाटील, यशोदाबाई भालेराव, मथुराबाई पाटील उपस्थित होते.

शेगावात गुडखा माफीयांच्या मुसक्या आवळल्या….दीड लाखाचा गुडखा पकडला,दोघांना अटक

0

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

शेगांव शहरात मा. अप्पर पोलीस अधिक्षक सा खामगांव यांचं पथकाची शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा विक्री करणाऱ्या दोघांवर कार्यवाही एक लाख पन्नास हजार चारशे अडतीस रुपयाचा मुद्येमाल जप्त

दि. 13/01/2022 रोजी मा. अप्पर पोलीस अधिक्षक सा. खामगांव यांचे पथकाची व गुन्हे शोध पथक शेगांव यांची शेगांव शहरातील गुटखा विक्री करणारे 1) प्रितम कमलकिशोर टिवडेवाल वय 36 वर्ष 2) सौरभ कमलकिशोर टिबडेवाल वय 36 वर्ष दोन्ही रा. लखपती गल्ली, अप्रेसन चौक शेगांव या दोन्ही बंधुवर कार्यवाही करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, दिनांक 13/01/2022 रोजी सदर गुन्हयातील फिर्यादी ना.पो.को संदीप टाकसाळ नेमणुक पथक अप्पर पोलीस अधिक्षक सा.खामगांव हे मा. कार्यालयात हजर असतांना गोषणीय वातमी दाराकडून खात्रीलायक खवर मिळाली की प्रितम कमलकिशोर टिवडेवाल हा त्याचे अप्रसेन चौकातील प्रितम ट्रेडर्स शेगाव येथे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला मानवी आरोग्यास अपायकारक मानवी निवास हाणीकारक व दुखापत होईल असा गुटखा विक्रो करीत आहे. अशा खात्रीलायक खबरेची माहिती मा. अपर पोलीस अधीक्षक सा खामगाव यांना देवून त्यांचे आदेशा प्रमाणे पो.स्टे. खामगांव शहर येथील गुन्हे शोध पथक प्रमुख पो.स्टाफ, पोउपनि पंकज सपकाळे, व पो.स्टॉप पोहेको अशोक सुर्वे, ना.पो. को रघुनाथ जाधव, गजानन आहेर, नेशसिंग इंगळे पोको राम धामोडे, दिपक राठोड, प्रफुल्लन टेकाळे, मका निगुर्णा सानेटक्के, अनिता गायके असे पोलीस स्टेशन रोगाव शहर येथे पोहचुन पोस्टे शेगाव शहर पंथील गुन्हे शोध पथक प्रमुख पोउपनि नितीन इंगोले, पो.कॉ विजय साळवे, तसेच पो.स्टे. शेगांव ग्रामीण येथील पोउपनि निलेश डावेराव यांना सोबत येवून माहिती प्रमाणे अग्रसेन चौकातील प्रितम ट्रेडर्स शेगाव यावर छापा टाकला असता प्रितम कमलकिशोर टिवडेवाल वय 36 वर्ष रा. लखपती गल्ली अग्रसेन चौक शेगाव हा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला मानवी आरोग्यास अपायकारक, मानवी जिवीतास हाणीकारक व दुखापत होईल असा गुटखा विक्री करीत असतांना दिसला त्याचे दुकानाची झडती घेतली असता दुकानामध्ये खालील प्रमाणे सुगंधीत पान मसाला गुटखा मिळून आला

1) केसर युक्त विमल पान मसाला 60 POUCHES INSIDE बोलो जुवा केसरी असे लिहलेले सुगंधीत पान मसाला एकुण 139 प्लॉस्टीक पाकिट प्रत्येको किंमत 150/-रु प्रमाणे एकूण किंमत 20850/-रु. 2 1fx – 1 तंबाखु 60 POUCHES INSIDE असे लिहलेले एकुण 142 प्लास्टीक पाकिट प्रत्येकी किमत 30/-रु प्रमाणे एकुण किंमत 4260/- असा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला मानवी आरोग्यास अपायकारक, मानवी जिवीतास हाणीकारक व दुखापत होईल असा एकूण 25110/-रू गुटखा मिळून आला तसेच प्रितम कमलकिशोर टिवळेवाल वय 36 वर्ष याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता अंगझडतीमध्ये नगदी 19040/ रु व एक जुना वापरता सँगसँग कंपणीचा मोबाईल कि.1000/-रु असा एकूण 45150/-रु मुद्देमाल मिळुन आला प्रितम कमलकिशोर टिबडेवाल यास पंचासमक्ष माल कुठे ठेवलेला आहे असे विचारले असता त्याने अग्रसेन चौकातील लखपती गल्ली येथील राहते आख घरी ठेवलेला असल्याचे सांगीतले त्या प्रमाणे प्रितम कमलकिशोर टिवळेवाल याचे अग्रसेन चौकातील लखपती गल्ली येथील राहते घरी जावन छापा टाकला असता सौरभ कमलकिशोर टिवडेवाल वय 29 वर्ष त्यांचे घरात खालील प्रमाणे थेमाल मिळून 1) प्रिमियम राज निवास सुगन्धित पान मसाला असे लिहलेले सुगंधीत पान मसाला एकुण 103 प्लॉस्टीक पाकिट

प्रत्येकी किंमत 198/-रु प्रमाणे एकूण किंमत 20394/-रु. 2) केसर युक्त विमल पान मसाला | POUCHES INSIDE बोलो जुवा कंसरी असे लिहलेले सुगंधीत पान मसाला एकुण 130 प्लॉस्टीक पाकिट प्रत्येको किमत 198/-रु प्रमाणे एकूण किंमत 25740/-रु

3) वि. 1 तंबाखु 22 POUCHES INSIDE असे लिहलेले एकूण 114 प्लास्टीक पाकिट प्रत्येको किंमत 33 प्रमाणे एकूण किंमत 3762/

4) प्रीमियम एक्स एल 01 जाफरानी जर्दा लिहलेले एकूण 20 प्लास्टीक पाकिट प्रत्येको किंमत 50-रु प्रमाणे एकूण किंमत 1000/ 5) प्रीमियम एक्स एल 01 जाफरानी जर्दा लिहलेले एकुण 50 प्लास्टीक पार्किट प्रत्येको किंमत 22/-रु प्रमाणे एकुण किंमत 1100/

 

6) fa – 1 तंबाखु 11 POUCHES INSIDE असे लिहलेले एकुण 159 प्लास्टीक पाकिट प्रत्येकी किंमत 22/-रु

प्रमाणे एकुण किंमत 3498/ 7) PREMIUM NAZAR असे लिहलेले सुगंधीत पान मसाला एकुण 08 प्लॉस्टीक पाकिट प्रत्येकी किंमत 190/-रु

• प्रमाणे एकुण किंमत 1520/-रु 8) केसर युक्त विमल पान मसाला 30 POUCHES INSIDE बोलो जुबा केसरी असे लिहलेले सुगंधीत पान मसाला एकूण 47 प्लॉस्टीक पाकिट प्रत्येकी किंमत 120/-रु प्रमाणे एकुण किंमत 5640/-रु.

9) Double Maza सितार असे लिहलेले सुगंधीत पान मसाला एकुण 09 प्लॉस्टीक पाकिट प्रत्येकी किंमत 150/-रु

प्रमाणे एकुण किंमत 1350/-रु 10) केसर युक्त विमल पान मसाला 22 POUCHES INSIDE बोलो जुबा केसरी असे लिहलेले सुगंधीत पान मसाला एकूण 22 22 प्लॉस्टीक पाकिट प्रत्येकी किंमत 187/-रु प्रमाणे एकुण किंमत 4114/.5

11) करमचंद प्रीमियम ऊंचे लोग ऊचा स्वाद असे लिहलेले सुगंधीत पान मसाला एकुण 115 प्लॉस्टीक पाकिट प्रत्येकी किमत 120/-रु प्रमाणे एकुण किंमत 13800/-रु

12) KC 1000 Zafrani Zarda असे लिहलेले एकूण 104 प्लास्टीक पाकिट प्रत्येकी किंमत 20/-रु

प्रमाणे underline 13 fa-1 किंमत 2080/ 1 तंबाखु 30 POUCHES INSIDE असे लिहलेले एकुण 43 प्लास्टीक पाकिट प्रत्येकी किंमत 30/-रु प्रमाणे

एकुण किंमत 1290/- असा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला मानवी आरोग्यास अपायकारक, मानवी जिवीतास हाणीकारक व दुखापत होईल असा एकूण 85288/-रु गुटखा मिळुन आला तसेच सौरभ कमलकिशोर टिबडेवाल याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता अंगझडतीमध्ये एक जुना वापरता One PLUS कंपणीचा मोबाईल कि.20000/-रु असा एकुण 110398/- रु गुटखा नगदी 19040/-रु दोन मोबाईल कि. 21000/-रु असा एकुण 1,50,438/-रु मुद्देमाल मिळून आल्याने मिळालेला माल हा जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपीतांना अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. श्री. श्रवणकुमार दत्त (भा.पो.से.) अप्पर पोलीस अधिक्षक सा. खामगांव व शेगांव शहर पो.स्टे. चे टाणेदार श्री. अनिल गोपाळ यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि.नितीन इंगोले पो.स्टे. शेगांव शहर हे करीत आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या वेगाने वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उद्या आठवडे बाजार बंद

0

 

यावल, प्रतिनिधी विकी वानखेडे

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या वेगाने वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावल येथे शुक्रवारी भरणारा बाजारसह शहरात दैनंदिन भरणारे बाजार देखील बंद राहणार असल्याचे, नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

 

गुरुवार दि. १३ जानेवारी रोजी नगरपरिषदच्या वतीने आठवडे बंद राहणार असल्या संदर्भात शहरात आज दवंडी फिरवण्यात आली आहे. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात अतिश्य वेगाने वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी दिलेल्या आदेशान्वये यावल शहरात शुक्रवारच्या दिवशी भरणारा आठवडी बाजारासह शहरात भरणारा दैनंदिन बाजार ही उद्या शुक्रवार दि. १४ जानेवारी पासून पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रभारी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी कळविले आहे. बाजार बंद करण्यात येत असल्याचे तालुक्यातील व्यापारी, शेतकरी व नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे नगर परिषदच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

मराठा सेवा संघ व इतर कक्षाचे आयोजन

0

 

उषा पानसरे असदपूर

अमरावती १३ जानेवारी कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक निर्बंध लावण्यात आले असून गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे केवळ महाराष्ट्राचं नाही तर देशभरातील एक अभूतपूर्व जयंती उत्सव म्हणून साजरा होणाऱ्या सिंदखेड राजा येथील मातृतीर्थावरील माँ साहेब राजमाता जिजाऊ उत्सव सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला असला तरी अमरावती मधील जिजाऊ चौकातील मानवंदना कार्यक्रमाचा नजारा हा मातृतीर्थावरील जिजाऊ सृष्टीप्रमाणेच भासत असल्याचे मनोगत आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केले . बुधवार दिनांक १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांच्या ४२४ व्या जन्मोत्सवानिमित्त मराठा सेवा संघ , संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने स्थानिक आरटीओ चौक स्थित जिजाऊ स्मारक परिसरात आयोजित मानवंदना कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या .
कोरोना पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पध्दतीने जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम प्रकल्प संचालक,ग्रामीण विकास यंत्रणा,अमरावती शिवमती प्रितीताई देशमुख ( चौधरी) यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले. तसेच सामूहिक जिजाऊ वंदना गाऊन अभिवादन केल्या गेले. सर्वसामान्य जनतेचे, रयतेचे, लोक कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी लढा देणाऱ्या जिजाऊ माँ साहेब यांचे १२ जानेवारी जयंती दिनी जिजाऊ च्या प्रेरणादायी जीवनकार्याचीही उपस्थितांना माहिती देण्यात आली. जनतेच्या उद्धाराकरिता, राजसत्ता मिळविण्यासाठी, शोषित, पीडित समाजाला न्याय देण्याकरिता जिजाऊंनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. सर्व जाती धर्मातील लोकांना प्रशासनात सहभागी करून त्यांच्या जीवनात क्रांती घडविली. म्हणूनच त्या राजमाता, राष्ट्रमाता ठरल्या. जिजाऊंच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांचा प्रचंड आदर व सन्मान केला गेला. स्वातंत्र्य, समता, बंधुता, आणि न्याय ह्या तत्वांवर आधारीत व्यवस्था व राज्य त्यांनी निर्माण केले. शिवरायांमध्ये ही मूल्य रुजविली आणि याचाच वापर करून शिवरायांचे , रयतेचे कल्याणकारी राज्य निर्माण केले.म्हणूनच त्यांचा उल्लेख लोककल्याणकारी राष्ट्रमाता जिजाऊ करणे योग्य ठरतो. या शब्दात आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी त्यांना मनाचा मुजरा अर्पण केला . दरम्यान या प्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अश्विन चौधरी यांनी आमदार सुलभाताई खोडके यांना जिजाऊ स्मारक विकास आराखडा सादर केला. यावेळी आमदार सुलभाताई खोडके यांनी जिजाऊ जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत नुकताच वरुड येथे झालेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हास्तरीय अधिवेशना प्रमाणेच अमरावती शहरामध्ये सुद्धा विदर्भस्तरीय अधिवेशन व्हावे व त्याकरीता आपले पूर्ण सहकार्य राहील असा मानस सुद्धा आमदार महोदयांनी व्यक्त केला . याप्रसंगी मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष शिवश्री आश्विन चौधरी, प्रवक्ते चंद्रकांत मोहिते ,सिंधू संस्थेचे प्रदेश अध्यक्ष शिवश्री प्रफुल्ल गुडधे ,जिजाऊ ब्रिगेड महानगर अध्यक्षा शिवमती हर्षा ढोक यांनीही जिजाऊ माँ साहेब यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती विशेष प्रसंगी ॲड. आशिषजी हाडके व शिवमती वर्षा धाबे यांचे संकलन, संपादन, लेखन असलेल्या सांस्कृतिक कक्ष व्यवस्थापन व कार्यपद्धती नामक मार्गदर्शक पुस्तिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्ञान , चातुर्य, चारित्र्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त सर्वांचे वतीने यावेळी उपस्थितांचे वतीने अभिवादन करण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने मराठा सेवा संघ प्रदेश उपाध्यक्ष शिवश्री अरविंद गावंडे, जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड शिवमती मनाली तायडे, शिवमती किर्तीमाला चौधरी, शिवमती शिला पाटील , शिवमती प्रा . शोभना देशमुख, शिवश्री चंद्रकांत मोहिते , अश्विन चौधरी, यश खोडके , नगरसेविका सुरेखा लुंगारे , अंजली चौधरी, भाग्यश्री मोहिते ,प्राचार्य डॉ . अंजली ठाकरे ,यांच्यासह , जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, मराठा उद्योजक कक्ष, संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद, शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद व समस्त ३३ कक्ष संघटनेतील कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. तुमचं आमच नात काय जय जिजाऊ- जय शिवराय, यासोबतच रक्ता रक्तात भिनलय काय- जय जिजाऊ – जय शिवराय चा एकच जयघोष करण्यात आला.

कोरोना चे पार्श्वभूमीवर 

0

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

शेगाव तालुक्यात आता ऑनलाईन शिकवणी
गटविकास अधिकारी सतिष देशमुख यांचे आदेश

शेगाव :शाळा बंद असल्यामुळे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पंचायत समिती अंतर्गत सर्व शिक्षकांना नियमीतपणे वर्गात फळयावर शिकवून त्याचे ऑनलाईन मोवाईलव्दारे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत प्रसारण करण्याच्या सुचना  गटविकास अधिकारी सतिष देशमुख यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बुलढाणा यांचे आदेश क्रमांक गृहविभाग कक्ष -4-2- कावि/13/2022 दिनांक 9/1/2022 नुसार वाढत्या कोविड प्रार्दुभावामुळे तालुक्या अंतर्गत सर्व शाळा दिनांक 10/1/22 पासुन विद्यार्थ्याकरीता बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिकवणी नियमित सुरू ठेवण्याचे दृष्टीने सुचना करण्यात आली आहे.
तरी सर्व पालकानी आपले पाल्यास मोवाईलची सुवीधा उपलब्ध करुन दयावी. मोबाईलची सुवीधा उपलब्ध होत नसल्यास ज्यांचेकडे मोवाईल उपलब्ध आहे अश्याठिकाणी कोवीड नियमाचे पालन करुन, दोन किंवा तिन पाल्यास एकत्र वसवून तशा प्रकारे ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे.विद्यार्थी व पालक यांचेसुध्दा सहकार्य अपेक्षीत आहे.असेही आवाहन पं स चे गटविकास अधिकारी सतिष देशमुख यांनी केले आहे.

पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी देशसेवेसोबत समाजसेवेतही अग्रेसर राहून देश घडवावा – किशोर जोरगेवार

0

 

डॉ. आंबेडकर महाविद्यालय येथे पदवी वितरण समारंभ

(चंद्रपूर घुग्घुस )प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिक्षा दिलेल्या पवित्र भुमितून भविष्यातील अधिकारी वर्ग घडत आहे. शिक्षणासाठी पूरक असे वातावरण या शिक्षण संस्थेच्या वतीने निर्माण करण्यात आले आहे. याचाच प्रत्यय आज पदवी वितरण कार्यक्रमात पून्हा एकदा आला असून आज पदवी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी उद्या देशसेवेसह त्यांना या महाविद्यालयातून मिळालेला समाजसेवेचा वसा पूढे नेत समाजसेवत अग्रेसर राहून देश घडवावा असे प्रतीपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. सोबतच येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण घेता यावे या करिता आपण येथील अभ्यासीकेसाठी 50 लक्ष रुपये देणार असल्याची घोषणाही आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूर द्वारा संचालीत डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत सत्र 2020 – 21 पदवी प्रमाणपत्र वितरण तथा गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन डॉ. आंबेडकर महाविद्यालयात करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, दिक्षाभुमी चंद्रपूरचे सहसचिव कुणाल घोटेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, दिक्षाभुमी चंद्रपूरचे सदस्य राहुल घोटेकर, प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूरातील विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात आपले आणि आपल्या जिल्ह्याचे नाव लौकीक करत आहे. यु.पी.एस.सी. मध्येही चंद्रपूरच्या चार विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत चंद्रपूर जिल्ह्याचे नाव देश पातळीवर उंचावले आहे. शिक्षणाच्या कमी संसाधनातही हे विद्यार्थी प्रामाणीकतेने प्रयत्न करत यश संपादीत करत आहे. आपणही विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे याकरिता प्रयत्न करत आहोत. याचाच एक भाग म्हणून मतदार संघात सर्व सोयी सुविधायुक्त 11 अभ्यासीका साकारण्याचा संकल्प केला आहे. यातील पाच अभ्यासिकांचे काम युध्द पातळीवर सुरु असल्याचे ते यावेळी म्हणाले,
गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे दिक्षांत समारंभ हा घेण्यात आलेला नव्हता मात्र आज हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आता महाविद्यालयातून पदवी प्राप्त विद्यार्थी पदवी घेऊन विविध क्षेत्रात नौकरीकरिता बाहेर पडतील. विविध क्षेत्रात कार्य करत असतांना त्यांनी समाजाच्याही हितासाठी कार्य करावे, कारण आजचा युवा हाच या देशाच्या उत्तम परिवर्तनाला साधक असल्याचे ते यावेळी म्हणाले. डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यानाही आवश्यक त्या सर्व पुस्तकांचे वाचण करता यावे ते पुस्तके त्यांना सहज उपलब्ध व्हावीत या करिता आपण या महाविद्यालयाला अभ्यासीका तयार करण्यासाठी 50 लक्ष रुपये निधी देणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या निधीतून महाविद्यालय व्यवस्थापण उत्तम अभ्यासीका तयार करतील अशी आशाही यावेळी त्यांनी व्यक्त केली. या दिक्षांत कार्यक्रमात पदविप्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवीचे वितरण करण्यात आले तसेच यावेळी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या या कार्यक्रमात सत्कारही करण्यात आला. सदर कार्यक्रमाला पदविप्राप्त आणि गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

फ्रीज, टीव्ही व होम थिएटर घरातून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीसठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

मुद्दलची रक्कम व्याजासह देवूनही पुन्हा पैश्यांची मागणी करत घरातील फ्रीज, टीव्ही व होम थिएटर घरातून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, गुलाब कडू मिस्त्री (वय-४६) रा. दहिगाव ता. यावल हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सुतार काम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. घराच्या किरकोळ कामासाठी गुलाब मिस्त्री यांनी यावल शहरातील रहिवाशी सुमित युवराज घारू यांच्याकडून ५० हजार रूपये २४ जुलै २०२० रोजी उसनवारीने घेतले होते. दरम्यान गुलाब मिस्त्री यांनी वेळोवळी व्याजासह मुद्दल असा एकुण १ लाख ३५ हजार रूपये दिले. त्यानंतर पुन्हा सुमित घारू याने पैश्यांची मागणी केली. याला देण्यास नकार दिल्याने ३० नोव्हेंबर रोजी गुलाब मिस्त्री यांच्या घरातील फ्रिज, टिव्ही आणि होम थिएटर अश्या वस्तू सुमित घारू जबरदस्तीने घरातून घेवून गेला आणि पुन्हा ५० हजार रूपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुलाब मिस्त्री यांनी बुधवार १२ जानेवारी रोजी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सुमित घारू याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.

स्नेहा फूड & फीड कंपनी वर कारवाई करा व ५ कोटी दंड देण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

०८ जानेवारी २०२२ रोजी चंद्रपूर मार्गावरील अंतूर्ला गावा लगतच्या स्नेहा फूड & फीड प्रा.ली. कंपनी मध्ये करंट लागून तीस वर्षीय कामगार हरगुन कुमार सैनी याचा मृत्यू झाला. या मजुराला मानवीय दृष्टिकोनातून मदत करायला पाहिजे होती परंतु या मजुराच्या शवाला शासकीय रुग्णालयात ठेऊन अधिकाऱ्यांनी पळ काढला. या घटनेवरून असे स्पष्ट होते की स्नेहा फूड ही कंपनी सुरक्षा नियमांचे पालन करत नाही त्यामुळे मजुरांच्या जीवाला हानी होते. सदर करंट लागण्या मागच कारण कंपनी द्वारा योग्य त्या सुरक्षा नियमांचे पालन केले नसल्यामुळे कामगार वर्गाचा जीव धोक्यात आहे.
या गोष्टीची दखल घेत आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा जिल्हाधिकारी चंद्रपूर, पोलिस अधीक्षक चंद्रपूर, सुरक्षा अधिकारी चंद्रपूर, पोलिस स्टेशन घुग्घुस, स्नेहा फूड & फीड प्रा.ली. कं. ला निवेदन देण्यात आले व मृतकाच्या परिवाराला भरपाई म्हणून ५० लाख देण्यात यावे व परिवारातील एका सदस्यास एक नौकरी देण्यात यावी. सोबतच कंपनीने सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे कमीत कमी ०५ कोटी रुपयांचे दंड ठोठावण्यात यावे. जेणेकरून अशा प्रकारच्या घटना येणाऱ्या काळात कंपनीमध्ये होणार नाही. ही मागणी पूर्ण न झाल्यास आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा देण्यात आला.
यावेळी घुग्घुस आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, विकास खाडे, आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, सागर बिऱ्हाडे, दिनेश पिंपलकर, निखिल कामतवार , सारंग पिदुरकर, सोनू शेट्टियार, स्वप्नील आवळे, अभिषेक तालापेल्ली व अन्य उपस्थित होते.