Home Blog Page 351

शहरी भागातील नवीन पाईप लाईन जोडणी ,देखभाल व दुरुस्तीच्या कामांना गती द्या

0

 

उषा पानसरे असदपूर दि.12/1
मूख्य कार्यकारी संपादीका मो. 9921400542

आ.सौ . सुलभाताई खोडके यांची मजीप्रा प्रशासनाला सूचना
अमृत अभियाना अंतर्गत अमरावती पाणी पुरवठा योजनेच्या विविध कामांचा घेतला आढावा
*अमरावती १२ जानेवारी* : अमृत अभियाना अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा मार्फत अमरावतीमधील पाणीपुरवठा योजनेसंदर्भातील कामांचा व सद्यास्थितीबाबतचा आ.सौ .सुलभाताई खोडके यांनी आढावा घेतला. मालटेकडी स्थित मजीप्रा कार्यालयातील सभागृहात झालेल्या या बैठकीत अमरावती पाणी पुरवठा योजनेंतर्गत सुरु असलेल्या नवीन जलवाहिनी जोडणी , नवीन भागातील जलकुंभाची निर्मिती तसेच जलव्यवस्थापनच्या अन्य देखभाल व दुरुस्तीच्या कामांना गती देण्याची सूचना आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी मजीप्रा प्रशासनाला केली .
बैठकीच्या सुरुवातीला आ.सौ. सुलभाताई खोडके यांचे मुख्य अभियंता मजीप्रा प्रादेशिक विभाग संतोष गव्हाणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
बैठकीमध्ये सुरुवातीला आमदार महोदयांनी अमृत अभियानांतर्गत अमरावती पाणी पुरवठा योजनेच्या सद्यस्थिती बाबत विचारणा केली, त्यावर कार्यकारी अभियंता निवृत्ती रक्ताडे यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली. अमृत योजना पूढील ३० वर्षांचे नियोजन करून सन २०४८ पर्यंत योजना संकल्पित असून या योजने अंतर्गत ६१ दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र ,पाण्याच्या ११ उंच टाक्या,व ४६८ किलोमीटर लांबीची वितरण व्यवस्था नव्याने टाकणे तसेच नवीन भागातील नागरिकांसाठी ४२ किलोमीटर पाईपलाईन नव्याने टाकणे अशी एकूण ५१० किलोमीटर लांबीची पाईप लाईन नव्याने टाकण्याचा समावेश असल्याचे सांगितले . यापैकी संबंधित कंत्राटदाराने ४३२ किलो मीटर इतक्या लांबीचे पाईप्स अंथरले असून अजून ७९ किलोमीटर लांबीचे पाईप्स अंथरने बाकी असल्याबाबत देखील आमदार महोदयांना अवगत करण्यात आले . परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदर कामे अत्यंत संथ गतीने सुरु असल्याची बाबही आमदार महोदयांच्या निदर्शनास आणून दिली . यावर आ. सुलभाताई खोडके यांनी अमरावती मधील अमृत योजनेच्या कामांना गती देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली . शहरात अनेक भागातील अर्धवट कामांमुळे वाहतुकीची समस्या उद्भवली आहे. तर पाईपलाइनच्या लिकेज मुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून याबाबतच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत . त्यामुळे मजीप्रा प्रशासनाने सामाजिक बांधिलकीचे भान राखीत व आपली जबाबदारी ओळखून अमृत योजने अंतर्गत नवीन पाईप लाईन जोडणी , जलकुंभ निर्मिती तसेच जलव्यवस्थापनच्या अन्य देखभाल व दुरुस्तीच्या कामांची प्राधान्याने पूर्तता करण्याची सूचना सुद्धा आमदार महोद्यायच्या महोदयांच्या वतीने करण्यात आली . शहरातील असम नगर , असीम नगर , सहारा नगर, अस्मा कॉलनी, अरमान नगर इत्यादी भागात अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु असल्याचे तसेच वेळी – अवेळा रात्री १२ च्या पुढे पाणी पुरवठा करण्यात येत असल्यासंदर्भात आ. सौ सुलभाताई खोडके यांनी आतापर्यंत टाकलेल्या नवीन पाईपलाईनवर जुन्या नळ कनेक्शन्सचे स्थानांतरण बाबत मजीप्रा अभियंत्यांना विचारणा केली . त्याच बरोबर शहरातील अभियंता कॉलनी, श्रमसाफल्य कॉलनी, गाडगे नगर या भागातील पाईप लाईन वारंवार उच्च दाबामुळे फुटते. परिणामी पाण्याचा बराच अपव्यय होतो. शिवाय त्याचा विपरित परिणाम त्या भागातील पाणी पुरवठ्यावर होऊन अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. याबाबत तक्रारी वाढत असल्याने मजीप्रा करून या संदर्भात काय हालचाली करण्यात आल्यात , यावर सुद्धा आमदार महोदयांनी संबंधित अभियंत्याना स्पष्टीकरण मागितले .तसेच दोन्ही भागातील पाईपलाईनच्या लिकेजेस बाबत प्रत्यक्ष साईटवर अभियंता यांना पाठवून ताबडतोब दुरुस्ती करण्याबाबतच्या सूचना सुद्धा आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या वतीने मजीप्रा अभियंत्यांना करण्यात आल्या . त्याच बरोबर अमृत अभियानातील अमरावती पाणीपुरवठा योजनेंतर्गत नवीन पाईपलाईन सर्व नळ ग्राहकांचे कनेक्शन हे कंत्राटकाराकडूनच शिफ्ट करण्यात यावे. यासाठी ग्राहकांकडून शिफ्टिंग चार्जेसची मागणी करण्यात येवू नये, तसेच शिफ्टिंगची कामे पूर्ण झाल्याशिवाय कंत्राटदारास आरए (RA ) बीलांची अदायगी करण्यात येऊ नये, अशी स्पष्ट सूचना आमदार महोदयांच्या वतीने बैठकीदरम्यान करण्यात आली .
दरम्यान शहरातील अनेक प्रलंबित व अर्धवट कामांचा आढावा घेत असतांना आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी शहरातील काही भागात जुन्या पाईप लाईन मधून आणि नव्याने टाकलेल्या पाईप लाईन मधून असे दोन्ही पाईप लाईन मधून पाणी पुरवठा होत असल्यामुळे पाण्याचा दाब अतिशय कमी स्वरूपाचा आहे. त्यामुळे जुन्या पाईप लाईन मधून पाणी पुरवठा त्वरित बंद करून नवीन पाईप लाईनवर शिफ्ट करण्यात यावा. व जुन्या नळ जोडणी ग्राहकांना नवीन जोडणी त्वरित देण्यात यावी, याबाबतही आमदार महोदयांनी मजीप्रा प्रशासनाला सूचना केली .अमरावती पाणी पुरवठा योजनेची कामे वर्ष २०२२ पर्यंत पूर्ण करून शहराला नियमित व मुबलक पाणी पुरवठा करण्याचे नियोजन होते. मात्र दोन वर्षाचा कालावधी लोटल्यावर देखील अद्याप पर्यंत योजनेची कामे प्रलंबित असल्याने त्याचा परिणाम योजनेच्या किमतीवर देखील झाला आहे. याबाबत नाराजी व्यक्त करीत आमदार महोदयांनी आगामी दिवसात या संदर्भात योजनेचे कंत्राटदार व मजीप्राचे संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक लावण्यात यावी . तसेच अमरावती पाणी पुरवठा योजना तथा अमृत अभियाना अंतर्गत असलेली अमृत भुयारी गटार योजनेच्या कामांबाबत सुद्धा सविस्तर आढावा बैठक लावण्यात यावी , या संदर्भात संबंधित यंत्रणेने योजनेची सर्व
अद्यावत माहिती संकलित करून बैठकीत सादर करावी अशी सूचना सुद्धा आ. सौ सुलभाताई खोडके यांच्या वतीने करण्यात आली .
या बैठकीला राष्टवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके , मुख्य अभियंता (प्र.) मजीप्रा प्रादेशिक विभाग अमरावती संतोष गव्हाणकर , अमरावती, अधीक्षक अभियंता (प्र.) मजीप्रा मंडळ, अमरावती विवेक सोळंके , कार्यकारी अभियंता (प्र.) मजीप्रा जलव्यवस्थापन विभाग, अमरावती निवृत्ती रक्ताळे , सहा. मुख्य अभियंता (प्र.) मजीप्रा प्रादे, विभाग, अमरावती गजानन दानवे , उप अभियंता (प्र.) मजीप्रा उपविभाग क्र. १, अमरावती एस . पी . लेवरकर , उप अभियंता (यांत्रिकी ) मजीप्रा मंडळ, अमरावती भारती परब यांच्या समवेत माजी महापौर ऍड. किशोर शेळके,माजी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, नगरसेवक प्रशांत डवरे, अशोक हजारे, प्रमोद महल्ले, संदीप आवारे, सुनील रायटे, यश खोडके, प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे, निलेश शर्मा, गजानन बरडे, संजय बोबडे, ऍड. सुनील बोळे, मनीष देशमुख, जितेंद्रसिंह ठाकूर, किशोर भुयार, किशोर देशमुख, प्रा. अजय बोन्डे, योगेश सवई, प्रशांत पेठे, बंडू निंभोरकर, आकाश वडनेरकर, सुयोग तायडे, महेश साहू, श्रीकांत झंवर, आनंद मिश्रा, संजय मडणकर, शक्ती तिडके, माजी नगरसेवक भूषण बनसोड, प्रवीण मेश्राम, विजय बाभुळकर, मनीष बजाज, शुभम पारोदे, जयकुमार उर्फ बाळा नागे, गणेश तंबोले, राजेंद्र खोरगडे, नदीम खान, ऍड. शोएब खान, सय्यद साबीर, अफसर बेग, अफजल चौधरी, फारुखभाई मंडपवाले, अबरार भाई, मोईन खान आदी उपस्थित होते.

काँग्रेस कार्यलयात राजमाता जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : स्वराज्य स्थापक शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या 424 वी जयंती घुग्घुस शहर काँग्रेस कार्यलयात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस मालार्पण करून उत्साहाने साजरा करण्यात आला.
12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे जिजाऊ यांचा जन्म झाला बाल शिवाजीना संगोपनातच दिन – दुबळ्या, शोषित,वंचित,कष्टकरी प्रजेसाठी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली.
माँ जिजाऊ यांनी दिलेल्या प्रेरणेनेच शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य प्रस्थापित केले.
आज घेतलेल्या जन्मोत्सव कार्यक्रमात शहर अध्यक्ष राजूरेड्डी,कामगार नेते सैय्यद अनवर,नुरुल सिद्दिकी,रोशन दंतलवार,इर्शाद कुरेशी,विजय माटला,रोहित डाकूर,कुमार रुद्रारप,बालकिशन कुळसंगे,संजय कोवे,आरिफ शेख,सचिन नागपुरे,सुनील पाटील,रंजित राखुंडे,सचिन कोंडावार,अंकुश सपाटे,सुबोध आवळे, प्रदिप आसेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

घुग्घुस येथील आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

0

 

राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याच्या जननी- सौ. किरणताई बोढे

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

बुधवार 12 जानेवारी रोजी घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात राजमाता जिजाऊ माँसाहेब भोसले यांची जयंती तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस मल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.
मनोगत व्यक्त करतांना घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई बोढे म्हणाल्या राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड जवळील देऊळगाव येथे झाला. हिंदवी स्वराज्याची संकल्पना साकार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना पराक्रम, चारित्र्य, चातुर्य व संघटन हे सर्व गुण देणाऱ्या राजमाता जिजाऊ होय राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याच्या जननी होय.
यावेळी माजी जिप सभापती नितु चौधरी, माजी पं.स.उपसभापती निरीक्षण तांड्रा, भाजपाचे साजन गोहने मल्लेश बल्ला, बबलू सातपुते, भारत साळवे, प्रवीण सोदारी, शंकर सिद्दम, तुलसीदास ढवस, वैशाली ढवस, सुनीता पाटील, लता झाडे, चंद्रकला धानोरकर, ललिता अर्जुनकर, बंडू झाडे, राम रणदिवे, लिलादेवी पाठक, तनुजा कनकम, संगीता गोंगाडे, लता कुम्मरवार उपस्थित होते.

पहिले भाड़े न खोली घेतली,मग भाड़ेकरू तरुणाने चक्क घर मालकिणीवर केला बलात्कार,,

0

 

SURYA MARATHI NEWS

अनिलसिंग चव्हाण सह विकी वानखेड़े

भाडेकरु न आपलेच मानलेल्या भावाला घराच्या टेरेसवरील खोलीत भाड्याने राहू दिले. व मग त्यानंतर भाडेकरू मानलेल्या भावाने या घर मालकिणीवर लैंगिक अत्याचार केला. व ही घटना चिखली येथे 21 डिसेंबर रोजी घडली.रामहरी वगरे (वय 31, रा. असंगी, ता. जत, जि. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या आहै व या आरोपीचे नाव आहे. व याबाबत असे सविस्तर 31 वर्षीय महिलेने सोमवारी (दि. 10) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व या आरोपी विरुद्ध पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रामहरी हा फिर्यादी यांच्या ओळखीचा होता. व तसेच फिर्यादी यांनी त्याला चुलत भाऊ मानले होते. पन ओळखीचा असल्याने आरोपी रामहरी याला फिर्यादी यांनी त्यांच्या घराच्या टेरेसवरील खोली भाड्यानेही दिली होती. व या फिर्यादी कामानिमित्त टेरेसवर गेल्या असता आरोपीने त्यांच्याशी गप्पा मारत त्यांच्यासोबत मोबाईलमध्ये पहिले फोटोही काढले.मग

21 डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास फिर्यादी या पाण्याच्या टाकीचा कॉक सुरु करण्यासाठी टेरेसवर गेल्या असताना फिर्यादी या एकट्याच असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने त्यांना टेरेसवरील खोलीत ओढत नेले. व रूमची आतून कडी लावून फिर्यादी यांना ‘तुझे व माझे फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवेल आणि तुझा नवरा काही बोललाच तर त्याला तेथेच मारून टाकीन. मी सांगेल तसं कर’, असे म्हणून धमकी दिली. व या फिर्यादी त्यांच्यावर आरोपीने लैंगिक अत्याचार केला. असून या घटनेच्या पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद तपास करीत आहेत. सुर्या मराठी न्यूज़

स्नेहा फूड व्यवस्थापकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

0

 

मृतक कुटुंबाला 50 लाख मोबदला द्या : घुग्गूस काँग्रेस

(चंद्रपूर घुग्गूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस – 08 जानेवरी रोजी स्नेहा फूड कंपनीत करंट लागून तीस वर्षीय कामगार हरगुण कुमार सैनी याचा मृत्यू झाला मृतकाला पन्नास लाख मोबदला व कंपनी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणी करिता काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर घुग्गूस पोलीस स्टेशनला निवेदन देऊन स्नेहा फूड कंपनीला घेराव टाकला.
चंद्रपूर महामार्गावरील अंतुरला गावालगतच्या स्नेहा फूड या कंपनीत परप्रांतीय कामगारांचा भरणा केला आहे.
या कंपनीत एकशे अंशी कामगार असून यात स्थानिक कामगारांची संख्या केवळ साठ असून एकशे वीस परप्रांतीय कामगार आहे.
परप्रांतीय कामगार मेले तरी गुपचूप रित्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी हे कंपनी परप्रांतीयाना रोजगार देत असते.
दिनांक 08 जानेवारी रोजी कंपनीत कार्यरत कर्मचारी बिहार निवासी हरगुण कुमार सैनी या तीस वर्षीय युवकांचा करंट लागून मृत्यू झाला.
या मजुराला मानवीय दृष्टीकोनातून मदद करायला पाहिजे होती मात्र या मजुरांच्या शवाला शासकीय रुग्णालयात ठेवून कंपनी अधिकाऱ्यांनी पळ काढला या घटनेचा निषेध करीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कंपनीला
घेराव घातला.
संतप्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी कंपनी अधिकारी सागर तांडरा यांनी चर्चा केली.
व मृतक कुटुंबियांना वीस लाख रुपये देण्याचे मान्य केले
मात्र काँग्रेस नेत्यांनी मृतक कुटूंबियांना पन्नास लाख रुपयांची मागणी धरून लावली मृतक कुटुंबियांना मोबदला व अधिकाऱ्यांन वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी शहर काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस अध्यक्षाने दिला आहे.
शिष्टमंडळात कामगार नेते सैय्यद अनवर,थॉमस अर्नाकोंडा,रोशन दंतालवार, अंकुश सपाटे, व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते

पंतप्रधान मोदी यांचे दिर्घायुष्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी केला जप.मूक प्रदर्शने करीत केला काँग्रेसप्रणीत पंजाब सरकारचाही निषेध

0

 

हिंगणघाट दि.११ जानेवारी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब पंजाब दौऱ्याच्या वेळी तेथील राज्य सरकारने पुरेशी सुरक्षा न दिल्यामुळे पंतप्रधान मोदी त्यांचा ताफा तब्बल २० मिनिटे थांबविण्यात आला,सुरक्षाव्यवस्थेत अडथळा निर्माण झाल्यामुळे शेवटी पंतप्रधानांना नाइलाजाने का होइना त्यांचा दौरा रद्द करणे रद्द करावा लागला, पंजाब सरकारच्या नाकर्तेपणामुळे पंतप्रधानांना मधेच आटोपता घ्यावा लागला.
परंतु दैवयोगाने यावेळी कोणताही अनुचित प्रकार न घडल्यामुळे पंतप्रधान मोदी सुरक्षित परतले,यापुढे असा अनुचित प्रकार घडू नये तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिर्घायुष्य लाभावे यासाठी भाजपाच्यावतीने शहरातील पुरातन राम मंदिरात यज्ञाचे आयोजन करीत जप करण्यात आला.याप्रसंगी उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांना सुदृढ व दिर्घायुष्य लाभो यासाठी प्रभुचरणी साकडे घातले.
उपरोक्त घटनेचा हिंगणघाट -समुद्रपुर-सिंदि (रेल्वे) विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी मूक प्रदर्शने करीत निषेध नोंदवित धरणे आंदोलनसुद्धा आयोजित केले.
या मूक निषेध आंदोलनात नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, भाजपाचे जिल्हा महामंत्री किशोर दिघे, सुभाष कुंटेवार, समुद्रपूर तालुका अध्यक्ष संजय डेहने, शहर अध्यक्ष आशिष पर्बत, नगरसेविका सौ.छाया सातपुते,रविला आखाड़े,सौ. अनिता मावळे, सुनीता मावळे, नगरसेवक नरेश इवनाथे,दिनेश वर्मा,नानू करवा, नितीन माडेवार, पंकज देशपांडे, शिवाजी आखाडे, वामन चंदनखेडे इत्यादि कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी पंजाब राज्यातील कांग्रेसप्रणीत सरकारचा मूकप्रदर्शने करीत निषेध नोंदविला.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

यावल येथे शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यासाठीचे कॉंग्रेस सेवा फाउंडेशनचे आयोजीत आमरण उपोषण महसुलच्या आश्वासनाने मागे

0

 

यावल ( कार्यकारी संपादक) विकी वानखेडे

तहसील कार्यालय समोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात जळगाव जिल्हा काँग्रेस ग्रामीण सेवा फौंडेशनच्या वतीने आयोजीत आमरण उपोषण हे उपोषण कर्त्यांना लिखित आश्वासन मिळाल्याने उपोषण मागे घेण्यात आले आहे . कॉंग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार होते ,परंतु यावल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या मध्यस्थीने व राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात व तसेच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी चर्चा करून जळगाव जिल्ह्यातील १० तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाचे पैसे आणि पीक विम्याचे पैसे मिळाले असून, याबाबत यावल तालुक्यावर अन्याय झाला असल्याचे सांगितले व आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी देखील या विषयात जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे . जळगाव जिल्हाधिकारी कार्यालया कडून मिळालेल्या माहितीनुसार यावल तालुक्यासाठी सरासरी २ दिवस पाऊस झाल्याने जवळपास १६ कोटी रुपयांचे शेतकरी बांधवांचे नुकसान झाल्याने या संदर्भातील महसुल प्रशासनाच्या वतीने पंचनामे करून अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला असून , तहसील कार्यलय यावल जिल्हाधिकारी कार्यालय टंचाई शाखा यांना आज प्रशासनाच्या वतीने स्मरण पत्र पाठवले असून लवकरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल असे लेखी आश्वासन नायब तहसीलदार आर. डी. पाटील यांनी उपोषण सोडवले यावेळी वढोदे सरपंच संदीपभैय्या प्रभाकर सोनवणे, कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल, पिंपरुडचे सरपंच योगेश कोळी,उमेश जावळे,शहराध्यक्ष नईमभाई शेख, जिल्हा सरचिटणीस भूषण निंबायत, तलाठी मुकेश तायडे, कोतवाल धनराज महाजन, रामलाल कोळी,अकलुदचे ग्राप सदस्य अजय पाटील, सह शेतकरी उपस्थित होते.

आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून यावल तालुक्यात पावणे तीन कोटीचा निधी मंजूर

0

 

यावल (कार्यकारी संपादक) विकी वानखेडे

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे व ना. आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या विशेष सहकार्यातून आणि चोपडा विधानसभा क्षेत्राचे आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून यावल तालुक्यातील चोपडा विधानसभा क्षेत्रातील असलेल्या गावांना पेवर ब्लॉक रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण या कामासाठी पावणे तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या कामाचे प्रत्यक्ष भूमिपूजन १४ जानेवारी २२ शुक्रवार रोजी संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या शुभहस्ते व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे

आ .सौ लताताई सोनवणे व मा . आ . प्रा . चंद्रकांत सोनवणे यांनी या विधानसभा क्षेत्रांमध्ये “गाव तिथे विकास काम “ही अंगिकारले असून दहीगाव ते विरावली फाटा पाच किलोमीटर रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण व डांबरीकरण करणे व विरावली गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे या कामासाठी १ कोटी ८o लक्ष रुपये मंजूर केले आहे

तर सावखेडा सिम, मोहराळा, विरा वली ,महेलखेडी या गावांसाठी २५ लक्ष रुपये तसेच विरावली गावात लहान पुलाचे काम ५० लक्ष ग्रामपंचायत कार्यालय बांधणीसाठी २० लक्ष असे पावणेतीन कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आ . सौ लताताई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे

या प्रसंगी तालुक्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व दहिगाव, विरावली ,महेलखेडी, मोहराळा गावातील सर्वपक्षीय ग्रामस्थ बंधू-भगिनी उपस्थिती द्यावी आणि कोराणाचे नियम पाळावेत असे आवाहन शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना भाऊ पाटील तसेच शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणे यांच्यासह आदींनी केले आहे

विनापरवाना रेतीची वाहतूक करत असताना भोन येथे ट्रॅक्टर पकडले

0

 

SURYA MARATHI NEWS

अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक

तालुक्यातील भोन येथील नदीपात्रात विनापरवाना रेतिची वाहतूक करीत असताना विना नंबर क्रमांकाचे ट्रॅक्टर पकडल्याची कारवाई मंडळ अधिकारी राऊत यांनी 10 जानेवारी रोजी केली

तालुक्यातील नदीपात्रात दिवसाढवळ्या रेतीची वाहतूक सुरू आहे ही वाहतूक सुरू असताना 10 जानेवारी रोजी मंडळअधिकारी राऊत व तलाठी जगताप हे भोन येथे जात असताना त्यांना विना नंबरचे ट्रॅक्टर रेतीची अवैध वाहतूक करत असताना निदर्शनास आले याबाबत वाहन चालकाला रेतीची वाहतूक करीत असल्याचा परवाना असल्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कुठलाही परवाना नव्हता त्यामुळे ट्रॅक्टर मालक नंदाबाई बळीराम काकड राहणार जानोरी तालुका शेगाव यांना अवैध रेती वाहतूक प्रकरणी 1लाख 22 हजार 100 रूपयाचा दंड ठोठावण्यात आला.या कारवाई मुळे रेतीची अवैध वाहतूक करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

शेगावात  तहसीलदार, पोलीस व पालिका प्रशासन रस्त्यावर

0

 

कोविड नियमाचे उल्लंघन करणार्या 54 जणाविरूध्द कारवाई 10 हजार 200 रू दंड वसुल

शेगाव : शहरात तहसीलदार, पोलीस व पालिका प्रशासन रस्त्यावर उतरले. कोविड नियंत्रणासाठी विना मास्क फिरणारे आणि कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 54 लोकांना 10200 दंड करण्यात आला आहे.

तहसीलदार समाधान सोनवणे यांचेसह पोलीस, पालिका अधिकारी शहरातील रस्त्यावर तसेच गर्दीचे ठिकाणी जावून कोविडचे नियंत्रणाबाबत जनजागृती केली.त्याचप्रमाणे नियमाचे उल्लंघन करणार्या नागरिकांवर दंडात्मक करवाई करण्यात आली.तहसिलदार , ठाणेदार शेगाव शहर , नगरपालिका प्रशासन यांनी संयुक्त करवाई केली.

स्वतःची तसेच आपल्या परिवाराची सुरक्षा राखणे,आपआपले कर्तव्य आहे. कोविड नियंत्रणासाठी प्रत्येकानी जागरूक राहून नियम पाळले पाहिजे. स्वतः नियम पाळत दुसर्यानाही नियम सांगावे.आपली सुरक्षा आपल्या हातात आहे,असे आवाहन तहसीलदार समाधान सोनवणे यांनी केले आहे .