Home Blog Page 352

मनमानी कारभाराने स्टेट बॅंकेचे ग्राहक त्रस्त.

0

 

शेगांव प्रतिनिधी अर्जुन कराळे

शेगांव दि.९शहरातील एस बी आय बँकेच्या कारभार मनमाणी पद्धतीने चालू असून याकडे बँकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यातील नागरीक त्रस्त झाले आहेत.शेगांव शहरासह तालुक्यातील नागरीकांनासाठी ही बँक असल्याने येथे खातेदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यात बँकेत दोन काऊंटर असल्याने मोठ्या रांगा लागतात. या बँकेतील कर्मचारी यांच्या मनमानी कारभार चालू आहे.नागरीक गरज असल्याने बँक सुरु होण्या अगोदरच बँके बाहेर गर्दी असते व बँक ११ वाजता सुरू होते व बँकेत दोन काँउटर असल्यानंतर दोन्ही कांउडरवरी कर्मचारी पैसे भरणे, व पैसे काढणे यासाठी नागरिक व वयोवृद्ध नागरिक बँकेच्या आता मघ्ये एक ते दोन तास रांगेत बसले असतात व नंबर आला कि कँशकाउडर वरील कर्मचारी या ठिकाणी बँकेतील सी एस पी पाँईट ठिकाणाहून शिलीपवर शिका मारुन आणावे असे सागीतेल जाते या पाँईटवर असेलेल्या कर्मचारी नागरिक व वयोवृद्ध महिला पुरुष यांना अरेरावाची भाषा करीत असतो परंतु बँकेचे व्यवस्थापक याकडे दुर्लक्ष करीत असतात याबाबत ग्राहकांनी बँक कर्मचाऱ्यास विचारले असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. गेल्या अनेक दिवसापासून बँकेचा कर्मचारी यांच्या मनमानी कारभार चालू असून नागरिक नाहक त्रास होत आहे तालुक्यातील नागरिकांना त्यामुळे पैशाची देवाणघेवाण करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.नवीन खाते उघडणार्‍यांना आठ ते दहा दिवस काम धंदा सोडून चकरा माराव्या लागत आहेत. त्याबाबत बँकेकडून सहकार्य केले जात नाही. परिणामी ग्राहकांना फॉर्म भरण्यासाठी फिरावे लागते. सदर बँकेची पार्किंग नसल्याने येणारी वाहने रस्त्यावर उभी राहत असून अनेक छोटे मोठेअपघात नेहमीच येथे घडत आहे.
बँकेच्या बाजूला असलेल्या एटीएमची दुर्दशा…
एटीएम असल्याने पैसे काढण्यासाठी येथे गर्दी होते. परंतु अनेक वेळा ह्या एटीएम मध्ये पैसे नसतात त्यामुळे अनेक ग्राहकांची गैरसोय होते.वरिष्ठांनी याकडे लक्ष घालून बँकेच्या कांमात सुधारणा करावे अशी मागणी ग्राहकांच्या वतीने होत आहे.

सी.एस टि पाँईट कर्मचारी अरेरावी
बँकेच्या काम निमित्त आलेल्या नागरिकांना हा
पाँईटर पैसे देणे, घेणे व केवायशी संबंधीत कामे दिलेले असतात व वयोवृद्ध नागरिकांना एक ते दोन तास उभे राहून नागरिक त्रास सहण करावे लागते या ठिकाणी आलेल्या नागरिक पाँईटर अरेरावाची भाषा करुन त्रास देत आहे बँकेचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहे तर बँकेच्या आता मघ्ये बाहेरील पाँईटरला आत जागा कशी दिली. यामध्ये बँकेचे अधिकारी यांना काही आर्थिक देवाण घेवाण तर नाही ना.असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष घ्यावे अशी मागणी बँकेचे ग्राहक करीत आहे.

समाजकार्याच्या नावाखाली विवाहितेवर बलात्कार

0

 

ब्लॅकमेलकरून केली मारहाण

घरात घुसून जबरदस्तीने बलात्कार

अनिलसिंग चव्हाण सह विक्की वानखेड़े 

अकोला : शहरातील खदान परिसरातील एका 39 वर्षीय विवाहितेशी सामाजिक कार्यात ओळखीने घरात घुसून जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी खदान पोलिस स्टेशन येथे मारहाण, विनयभंग, ब्लॅक मिलिंग, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून खदान पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

खदान पोलिस स्टेशनला 39 वर्षीय विवाहित पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडितेची आरोपी राहुल श्रावण मस्के रा. न्यू खेतान नगर याच्याशी सामाजिक कार्यातून ओळख झाली. आरोपीने विविध सामाजिक विषयावर चर्चा करण्यासाठी पीडितेला मार्च 2021 मध्ये घरी बोलावून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. यादरम्यान पीडितेला  ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार करणे सुरू ठेवले. यामध्ये नवऱ्याला सांगू नको म्हणून 50 हजार रुपयांची मागणी सुद्धा केली. आरोपीचा अत्याचार दिवसेंदिवस वाढत असल्याने याप्रकरणी पीडितेने खदान पोलिस स्टेशन गाठून अखेर तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राहुल श्रावण मस्के रा. न्यू खेतान नगर याच्या विरोधात भादवि कलम 323, 342, 354, 376, 384, 504, 506 34 नुसार गुन्हा दाखल केले. याप्रकरणी खदान पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीरंग सनस यांच्या मार्गदर्शनात पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.

शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुन्हा संघर्ष करणार- माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा इशारा..

0

 

डी एस पिंगळे
निलंगा तालुका प्रतिनिधी

खरीप हंगामातील सोयाबीन पीकांसह अन्य पीके अतिवृृष्टीच्या आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे तेरणा,मांजरा,तावरजा नदीकाठच्या शेतकर्‍यांच्या पीकांच्या बनिमी वाहून गेल्याने अतोनात नुकसान झाल्याने भरीव मदत अद्यापही राज्य सरकारने दिले नसल्याने संतापाची लाठ निर्माण झाली आहे.त्यामुळे आपण येणार्‍या काळात सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या हितासाठी नदीकाठच्या शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाल्याने भरीव मदत प्राप्त होण्यासाठी संघर्ष करून न्याय देणार असल्याचे सांगितले.तसेच, माजी मुख्यमंञी तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दौरा करून शेतकर्‍यांच्या व्यथा ऐकून घेऊन आपण पाठीशी असल्याचे नमुद केले.शेतकर्‍यांच्या न्यायहक्कासाठी यापुठेही नुकसानीची मोबदला भरीव मदत अद्यापही शेतकर्‍याला प्राप्त झाली नसल्याने आपण प्रत्येक गावात जाऊन शेतकर्‍यांशी संवाद साधून पुढील न्यायहक्कासाठी संघर्षाची दिशा ढरवण्यात येईल असे माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या बैढकीत कार्यकर्त्यां समावेत बोलताना व्यक्त केले.

यावल तालुक्यातील जिल्हा परिषद व सार्वजनिक बंधकाम अंतर्गत असलेल्या अनेक रस्त्यांचे दयनिय अवस्था

0

 

यावल, प्रतिनिधी विकी वानखेडे

यावल ते विरावली व विरावली ते दहीगाव या मार्गावरील वर्दळीच्या रस्त्याची ठीक ठीकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता अशी दयनिय अवस्था झाली आहे. वाहनाधारकांना या अत्यंत खराब झालेल्या रस्त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

यावल तालुक्यातील जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणाऱ्या अनेक रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. यावल ते विरावली व विरावली ते दहिगाव काही मार्ग तसेच हिंगोणा ते भालोद व भालोद ते बामणोद व चुंचाळे फाटा ते चुंचाळे गाव, यावल ते भुसावळ, यावल ते चोपडा काही मार्ग तसेच किनगाव ते दोनगाव यांच्यासह आदी रस्त्याची मागील काही दिवसापासुन रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना अपघातासह विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या मार्गांवर झालेल्या अपघातात काही निरपराध लोकांना आपला जिव देखील गमावला आहे. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता या पैकी काही रस्त्यांना दुरूस्ती व डांबरीकरणासाठी निधी मिळाल्याचे वृत्त असुन , या कामांना मात्र अद्याप सुरूवात झाली नसल्याने तालुक्यातील नागरीकांमध्ये लोकप्रतिनिधींच्या कारभारा विषयी नाराजी व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधींनी तात्काळ दखल घेवुन या मार्गावरील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी नागरीक करीत आहे.

स्नेहा फूड व्यवस्थापकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

0

 

मृतक कुटुंबाला 50 लाख मोबदला द्या : घुग्गूस काँग्रेस

(चंद्रपूर घुग्गूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस – 08 जानेवरी रोजी स्नेहा फूड कंपनीत करंट लागून तीस वर्षीय कामगार हरगुण कुमार सैनी याचा मृत्यू झाला मृतकाला पन्नास लाख मोबदला व कंपनी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणी करिता काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर घुग्गूस पोलीस स्टेशनला निवेदन देऊन स्नेहा फूड कंपनीला घेराव टाकला.
चंद्रपूर महामार्गावरील अंतुरला गावालगतच्या स्नेहा फूड या कंपनीत परप्रांतीय कामगारांचा भरणा केला आहे.
या कंपनीत एकशे अंशी कामगार असून यात स्थानिक कामगारांची संख्या केवळ साठ असून एकशे वीस परप्रांतीय कामगार आहे.
परप्रांतीय कामगार मेले तरी गुपचूप रित्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी हे कंपनी परप्रांतीयाना रोजगार देत असते.
दिनांक 08 जानेवारी रोजी कंपनीत कार्यरत कर्मचारी बिहार निवासी हरगुण कुमार सैनी या तीस वर्षीय युवकांचा करंट लागून मृत्यू झाला.
या मजुराला मानवीय दृष्टीकोनातून मदद करायला पाहिजे होती मात्र या मजुरांच्या शवाला शासकीय रुग्णालयात ठेवून कंपनी अधिकाऱ्यांनी पळ काढला या घटनेचा निषेध करीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कंपनीला
घेराव घातला.
संतप्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी कंपनी अधिकारी सागर तांडरा यांनी चर्चा केली.
व मृतक कुटुंबियांना वीस लाख रुपये देण्याचे मान्य केले
मात्र काँग्रेस नेत्यांनी मृतक कुटूंबियांना पन्नास लाख रुपयांची मागणी धरून लावली मृतक कुटुंबियांना मोबदला व अधिकाऱ्यांन वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी शहर काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस अध्यक्षाने दिला आहे.
शिष्टमंडळात कामगार नेते सैय्यद अनवर,थॉमस अर्नाकोंडा,रोशन दंतालवार, अंकुश सपाटे, व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते

घुग्गूस शहर अध्यक्षपदी राजूरेड्डी यांची दुसऱ्यांदा निवड

0

 

कार्यकर्त्यांनी जल्लोषात केले स्वागत

(चंद्रपूर घुग्गूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : काँग्रेस पक्ष सत्तेत नसतांना राजूरेड्डी यांना शहराची अध्यक्षपदाची जवाबदारी देण्यात आली.
हा काळ होता जेव्हा पक्षातर्फे निवडून आलेले उपसरपंचा सह सदस्य व पदाधिकारी पक्ष सोडून भाजपात प्रवेश करीत होते.
क्षेत्रात पक्षाचे आमदार खासदार नसतांना सोबतीला असलेल्या कार्यकर्त्यांना धीर देत रेड्डी यांनी पक्षाची मोट बांधली शहरातील ज्वलंत असलेल्या पाणी समस्येची दखल घेत स्वतःच्या पाणी टँकरने मोफत पाणी पुरवठा शुरु केला तो अजूनपर्यंत सुरूच आहे.
विद्यार्थ्यांना,गरजवंताना,युवकांना,महिलांना शक्य ती मदतीचा हात देत राजकारणात राहून आपल्या सामाजिक कार्याने
शहरात वेगळाच ठसा निर्माण करणारे राजूरेड्डी यांच्या कामाची दखल घेत पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले, पालकमंत्री ना. विजय भाऊ वड्डेटीवार, खासदार बाळु भाऊ धानोरकर,ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळेजी यांनी दुसऱ्यांदा राजूरेड्डी यांच्यावर विश्वास करीत शहर अध्यक्षपदाची जवाबदारी दिली.
शहरअध्यक्ष पद मिळाल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यलय व बस स्थानक परिसरात तुफानी आतिषबाजी लाडू वाटप करीत जल्लोष साजरा केला.
याप्रसंगी मोठ्या संख्येने पक्षातील महिला, युवक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपा घुग्घुसतर्फे पंजाब काँग्रेस सरकारचा निषेध.

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

शनिवार, दि. ८ जानेवारी.
घुग्घुस येथील गांधी चौकात सकाळी ११ वाजता देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी हे पंजाब दौर्‍यावर असताना त्यांच्या सुरक्षा यंत्रणेत जाणीवपूर्वक त्रुटी निर्माण करून त्यांचा जीवाला धोका निर्माण करण्याऱ्या पंजाबमधील सत्ताधारी काँग्रेस सरकारचा भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी घुग्घुस शहराच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
पंजाब सरकार हाय हाय, पंजाब सरकार मुर्दाबाद, पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी करणाऱ्या पंजाब काँग्रेस सरकारचा निषेध असो अशी निषेधपुर्ण नारेबाजी यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी बोलतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, पंजाब येथील फिरोजपूरच्या दौऱ्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले असता पंजाब काँग्रेस सरकारने त्यांच्या सुरक्षेत जाणीवपूर्वक त्रुटी निर्माण केली. पंतप्रधान ज्या रॅली साठी गेले होते त्या रॅलीचा मार्ग बंद केला नाही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा जीव धोक्यात घालण्याचे काम काँग्रेस सरकारने केले. सुमारे वीस मिनिटे पुलावर पंतप्रधानांच्या ताफ्याला थांबावे लागले. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.
आज देशाचे पंतप्रधान कोणत्या एका राजकिय पक्षाचे नसतात, ते संपूर्ण देशाचे नेतृत्व करतात. त्यांच्या दौर्‍याची पूर्वकल्पना असून सुद्धा पंजाबमधील कॉंग्रेस सरकारने मोदीजींच्या सुरक्षा यंत्रणेत जाणिवपुर्वक त्रुटी निर्माण करून त्यांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न केला. याची आम्ही निंदा करतो.
निषेध आंदोलनानंतर, जवळील शिव मंदिरात जाऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी दुधाचा अभिषेक करून प्रार्थना करण्यात आली

 


यावेळी माजी जि. प. सभापती नितु चौधरी, माजी पं. स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, भाजपाचे जेष्ठ नेते संजय तिवारी, माजी सरपंच संतोष नुने, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, भाजपाचे विनोद चौधरी, रत्नेश सिंग,पारस पिंपलकर माजी ग्रामपंचायत सदस्य साजन गोहने, सिनू इसारप, प्रकाश बोबडे, पूजा दुर्गम, सुचिता लुटे, नंदा कांबळे, वैशाली ढवस, जेष्ठ नागरिक मधुकर
मालेकर, प्रेमलाल पारधी, शैलेंद्र कक्कड, हसन शेख, मल्लेश बल्ला, शाम आगदारी, राजेश मोरपाका, मानस सिंग, सुनील राम, श्रीकांत सावे, महेश लठ्ठा, रंजित डवरे, निळा चिवंडे, सुनीता वर्मा, सुनंदा लिहीतकर, विक्की सारसर अनिल मंत्रिवार अजय आमटे, संजय भोंगळे, रवी चुने प्रवीण सोदारी हेमंत पाझरे सुशील डांगे हेमंत कुमार विनोद जंजर्ला, सुरेन्द्र जोगी सीनु आडे गणेश खुटेमाटे उपस्थित होते.

महाराष्ट्रातील कोरोना योद्धा वर अन्याय

0

 

 

डी एस पिंगळे
निलंगा तालुका प्रतिनिधी

आज आपण सर्वांना माहीतच आहे की covid-19 चा प्रसार वाढत चालला आहे,
आणि शासन / प्रशासन यांनी covid-19 ची नवीन भरती चालु केली आहे.
ते ही आपण सर्व जण covid-19 मध्ये जे कामे केले त्यांना न घेता आपला विचार न करता नवीन covid-19 कंत्राटी भरती घेत आहे.
हे किती पद योग्य निर्णय आहे, या भरती ला सर्वाचा विरोध झाला पाहिजे,
तरी आपल्या सर्व कोविड कर्मचारी यांना विनंती करतो.
हे भरती थांबवून जे या अगोदर कामे केले आहे त्यांना सर्व प्रथम कामावर रुजू करावे,
अन्यथा संपुर्ण महाराष्ट्र भर तिव्र आंदोलन छेडण्यात येईल,
असे अहवान कोरोना योध्दा कर्मचारी परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा. श्री योगेश स्वामी यांनी केले आहे

साई स्पोर्टीग क्लब तर्फे व्हॉलीबॉल पुरुष खुले सामन्याचे आयोजन

0

 

काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

(चंद्रपूर घुग्गूस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्गूस : कोरोना महामारीने मागील दोन वर्षे युवकांना मैदानी खेळ खेळता आले नाही.
आपल्या जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक थोडा कमी झाल्याने युवक आता हळूहळू मैदानाकडे वळत आहे.
अमराई वॉर्ड नं.01 येथील बहादे प्लॉट याठिकाणी साई स्पोर्टिंग क्लब तर्फे पुरुषांचे खुले सामने आयोजित करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे उदघाटन काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या हस्ते पार पडले.
उपस्थितांना संबोधित करतांना राजूरेड्डी यांनी युवकांना मैदानी खेळासाठी हवी ती मदद आपण देण्यास सदैव तत्पर असून येणाऱ्या काळात वस्ती भागातील युवकान साठी शक्य तितक्या लवकर सुसज्जीत अश्या स्टेडियमची (क्रीडांगणा)ची निर्मितीला आपले प्राधान्य राहील
याप्रसंगी माजी जिप सदस्य जयंता जोगी,रोशन पचारे किसान जिल्हाध्यक्ष,पवन आगदारी एस.सी.सेल जिल्हाध्यक्ष, नागेश पथाडे, सैय्यद अनवर कामगार नेते, समाजसेवी सरिता मालू, अमित बोरकर, शरद पाईकरव बी.आर.एस.पी अध्यक्ष, व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन आशिष जंगम,राजू पथाडे,योगराज पाझारे,व अन्य पदाधिकाऱ्यांनी केले.

पत्रकाराची एकजूट ही काळाची गरज – राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकार्यांचा शेगावात सत्कार

0

शेगांव प्रतिनिधी अर्जुन कराळे

शेगाव : पत्रकारांवरील अन्यायाविरोधात पत्रकारांनी एकसंघ होण्याची गरज आहे. व प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल होण्यासाठी विकासाभिमुख पत्रकारीता गरजेची आहे.
पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवून त्याना न्याय मिळवून देण्यासाठी मराठी पत्रकार परिषद सदैव पाठीशी उभी असल्याची ग्वाही राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांनी शेगाव भेटीप्रसंगी दिली.
मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे, नवनियुक्त जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे,मावळते अध्यक्ष अरूण जैन,नितिन सिरसाट, सिध्दार्थ आराख यांचा शेगावात आगमनप्रसंगी शेगाव तालुका पत्रकार संघाचे वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे माजी कोषाध्यक्ष संजय सोनोने,शेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश चौधरी, प्रेस क्लब अध्यक्ष अनिल उंबरकार,धनराज ससाने,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनोदकुमार साळुंके यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकारी यांचा सत्कार केला.