Home Blog Page 353

वन अधिकारी दिपकराव हिगणीकर सेवानीवृत्त अचलपूर,

0

 

उषा पानसरे मूख्य कार्यकारी
संपादिका मो.9921400542

दिपकराव हिगणीकर
हे सेवेत असतांना सामान्य माणसांशी संबंध ठेवणे हा त्यांचा स्वभाव, त्यांना शक्य असेल तेवढी मदत करणे हा त्यांचा छंद , आहे येवता या लहानशा गावात दररोज योग वर्गात म्हातारे, तरुण,अधिक संख्येने स्त्रिया, पुरुष येऊन अणेक व्याधीपासुन मुक्ती मीळवत आहेत, आरोग्य विषयक येवढी जागृतता लहानशा गावात कोणी निर्माण केली, हे पाहण्यासाठी ते स्वतः येवता येथे सकाळी 5 ला वर्गाला भेट दिली असता तेथील वर्ग संचालक श्री रामेश्वरभाऊ वानखडे याच्या कार्याची दखल घेत त्यांनी स्वता दिपश्री मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून, वजन मोजायचे यंत्र, सर्व रुमला खिडकी दाराला पडदे व पूर्ण रुम मधे योग आसनांचे फ्लेक्स दिलेत त्यांचे आभार मनापासून सर्व गावकर्यांनी मानले,

 

त्यांच्या या कार्यापासून ईतरांनी सुध्दा प्रेरणा घेऊन समाजाकरीता फुल नाही फुलाची पाकळी मदत करावी या उद्देशाने हा लेख लिहीला आहे या ग्रामीण भागात निःशुल्क वर्गाला बर्याच मंडळीनी मदत केली आहे सर्वात मोठे योगदान श्रीधर गावडे सावळी याचे राहीले या छोटया खेडयात महीला पूरूष योगा करतात तेही निःशूक खूप मोठी बात आहे वन अधिकारी श्री दिपकराव हिगणीकर अचलपूर याचे सूध्दा खूप मोठे योगदान राहले त्याचे कार्य समाजा साठी योग्य श्रीधर गावडे व सर्व येवता नागरिकानी आभार व्यत्त केले

ग्रामपंचायत कार्यालय सूनगाव येथे पत्रकारांचा सन्मान कार्यक्रम संपन्न

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जामोद जळगाव जा

तालुक्यातील ग्रामपंचायत असलेल्या सुनगाव ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन निमित्त सुनगाव येथील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय येथे भाजपा जिल्हाउपाध्यक्ष गुणवंतराव कपले जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई काळपांडे पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे सरपंच रामेश्वर अंबडकार यांनी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय येथे सन्मान करीत त्यांना पेन व डायरी भेटवस्तू दिली यावेळी पत्रकार दिन का साजरा केल्या जातो याविषयी मातृभूमीचे तालुका प्रतिनिधी अश्विन राजपूत यांनी आपल्या भाषणातून माहिती दिली यावेळी सुनगाव येथील ज्येष्ठ पत्रकार राजकुमार भड शिवदास सोनोने गणेश भड अनिल भगत गजानन सोनटक्के गजानन खिरोडकार अश्विन राजपूत इत्यादी पत्रकार व सुंनगाव ग्रामपंचायत सदस्य विमलताई काळपांडे बळीराम धुळे व इतर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी हजर होते

अंशतः अनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण देणार-आ. बाळाराम पाटील

0

 

उषा पानसरे मूख्य कार्यकारी संपादीका मो.9921400542

तळा-रायगड : कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री बाळाराम पाटील यांनी अंशतः अनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण देणार असल्याचा विश्वास दिला आहे. महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री बाळाराम पाटील यांचा तळा तालुका शिक्षक संवाद दौरा बोरघर हायस्कूल येथे दिनांक ७ जानेवारी, २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करणे, अंशतः अनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण मिळवून देणे, घोषित व अघोषित शाळेंचे प्रश्न मार्गी लावणे, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे, पात्र, अपात्र शाळेंचे प्रश्न, प्राथमिक शाळा बंद न पडू देणे, ४० टक्के टप्प्यातील शाळेचे मागील वेतन अदा करणे, अंशतः अनुदानित शिक्षकांचे समायोजन करणे आदी प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री दिपक रसाळ, शेतकरी कामगार पक्षाचे तळा तालुका सरचिटणीस श्री धनराज गायकवाड, निवृत्त प्राचार्य श्री आर के म्हात्रे, निवृत्त मुख्याध्यापक श्री बी पी म्हात्रे,पुरोगामी शिक्षक संघटनेचे युवाध्यक्ष देवा पाटील, श्री बबन म्हात्रे, श्री रा गो पाटील, बोरघर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम, पत्रकार कृष्णा भोसले, तळा तालुक्यातील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. विशेष भेट म्हणून तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गो.म. वेदक विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजला भेट देऊन विविध समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे, सचिव श्री मंगेशशेठ देशमुख यांनी कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री बाळाराम पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मुख्याध्यापक श्री धुमाळ सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

सहा वर्षीय मुलाचा गळा दाबून खून करत बापाची गळफास घेवून आत्महत्या

0

 

 

यावल/ फैजपूर प्रतिनिधी विकी वानखेडे

फैजपूर शहरातील बसस्थानाच्या मागे असलेल्या मिरची ग्राऊंड येथे सहा वर्षीय मुलाचा गळा दाबून खून करत बापाची गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, निलेश घनश्याम बखाल (वय-३५) रा. विवरे ता. रावेर ह.मु. बसस्थानकच्या मागे मिरची ग्राऊंड, फैजपूर ता. यावल हे आपल्या पत्नी व सहा वर्षाचा मुलगा आर्यन सोबत वास्तव्याला आहे. फैजपूर शहरातील बापू डेअरीचे संचालक आहेत. शुक्रवार ७ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास त्यांनी पत्नीला बाजार व किराणा आणण्यासाठी बाजारात सोडले. त्यानंतर ते घरी गेले. दरम्यान ११.३० ते १२ वाजेच्या सुमारास त्यांनी घराचा दरवाजा आतून बंद केला. निलेश बखाल यांनी त्यांचा सहा वर्षाचा मुलगा आर्यन याचा गळा दाबून खून केला आणि स्वत: दोरी गळफास घेवून आत्महत्या केली.

त्यांची पत्नी घरी आल्यावर घराचा दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. दरवाजा ठोठावून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेजारचांच्या मदतीने दरवाजा उघडला असता दोघांचे मृतदेह आढळून आल्याने पत्नीचा जबर धक्का बसला आहे. या घटनेमुळे फैजपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. तातडीने दोघांना यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिळके यांनी मयत घोषीत केले. या घटनेमागचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती.

केंद्र शासनाच्या किमान ‘आधारभूत किंमत भरड धान्य योजने’अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची फसवणूक होवू नये, धान्य खरेदीत पारदर्शकता असावी.” यासह विविध मागण्यांसाठी यावल शिवसेनेच्या वतीने यावलचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

यावल तालुका शिवसेना शाखाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख रविन्द्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवार, दि. ६ जानेवारी रोजी. निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात, “केंद्र शासनाच्या किमान ‘आधारभूत किंमत भरड धान्य योजने’अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची फसवणूक होवू नये, धान्य खरेदीत पारदर्शकता असावी म्हणून खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून सूचना व माहीती मिळावी याकरीता भरडधान्य खरेदी करतांना घट्टी किती लागेल? शेतकऱ्याच्या धान्यास प्रतवारी अनुसार भाव कसा दिला जाणार ? यात सरकारी हमाली फी प्रतिकिलो /क्विंटल किती लागेल ?, शेतकऱ्यांनी त्यांचे स्वत:चे पोते (बारदान ) आणले असल्यास प्रति बारदान किती रूपये त्यास तातडीने मिळतील ? आदी शंकाचे समाधान व्हावे”

यासह निवेदनात, ”मागील काही वर्षात भरडधान्य खरेदी केलेल्या धान्याच्या बारदानाचे पैसे शेतकरी बांधवांना अद्यापपर्यंत मिळालेले नसल्याचे तक्रार निवेदनात म्हटले असून, या सर्व विषयाची माहीती शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर उपलब्ध व्हावी. खरेदी केलेले भरडधान्य हे शेतकऱ्यांचेच असावे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याच्या ‘७ /१२’वर नोंद करून विक्री केलेली नसावी. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या धान्याची रक्कम खरेदी दराप्रमाणे तातडीने धनादेशव्दारे देण्यात यावी. या विषयावर केंद्र संचालकांनी विशेष लक्ष द्यावे” अशा मागण्यांचे निवेदन यावल तालुका शिवसेना शाखाच्या वतीने निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनावर शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील, तालुकाप्रमुख रविन्द्र सोनवणे, यावल शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, तालुका उपप्रमुख शरद कोळी, सेनेचे माजी तालुकाप्रमुख कडु पाटील, शहर उपप्रमुख संतोष धोबी, आदिवासी सेनेचे तालुका प्रमुख हुसैन तडवी, सागर देवांग, अजहर खाटीक, पप्पू जोशी, संतोष वाघ, योगेश चौधरी, प्रदिप लोणारी, भरत चौधरी, प्रविण अडकमोल, अनिल पाटील, किरण बारी, योगेश पाटील, नामदेव अडकमोल, सुधाकर धनगर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कै.राजाबाई धानोरकर विद्यालयाचे 92.31% लसीकरण पूर्ण

0

 

डी एस पिंगळे
निलंगा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्रात कोरोनाची दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे प्रशाशनाच्या वतीने लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे. निलंगा तालुक्यातील धानोरा गावातील कै. राजाबाई धानोरकर विद्यालय धानोरा शाळेतील विद्यार्थ्यांना कोवॅक्सिनचे लसीकरण करण्यात आले आहे कै.राजाबाई धानोरकर विद्यालयाचे 92.31% लसीकरण करण्यात आले आहे विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश माने यांच्या प्रयत्नाने 92.31% लसीकरण शक्य झाले आहे मुख्याध्यापक गणेश माने यांच्यावर गावातून कौतुकाचा वर्षाव होत आहे यावेळी श्रीमती डॉ.चिवरे, काळे सिस्टर आशा वर्कर स्वामीताई, शिक्षक श्रीमती पवार, आरोग्यसेवक वाघमारे, मुख्याध्यापक गणेश माने, पाटील, शिंदे, मोरे शाळेतील कर्मचारी व विद्यार्थी आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या पत्रकार दिन सोहळ्यास उपस्थित रहावे- भाऊ भोजने

0

 

उद्या तानुबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्कार वितरण व व्याख्यान

संग्रामपूर : महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या जिल्हा शाखेच्या वतीने पत्रकार दिनाचा सोहळा 7 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता वरवट बकाल येथे आयोजित करण्यात आला आहे

महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वतीने यावर्षी घाटाखालील जळगाव जामोद, खामगाव आणि मलकापूर मतदारसंघात उत्कृष्ठ पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार बांधवांना तानुबाई बिर्जे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2022 देऊन गौरवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष भाऊ भोजने यांच्या निवासस्थानी पार पडेल. त्यावेळी मॅक्स महाराष्ट्र मुंबईचे पॉलिटिकल एडिटर राहुल पहूरकर हे ‘पत्रकारिता आज काल आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र बहुजन महासंघाचे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष भाऊ भोजने यांची उपस्थिती राहील तर जानराव देशमुख जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, लोकेश राठी तालुका अध्यक्ष भाजपा, शंकर पुरोहित संस्थापक-अध्यक्ष मित्र परिवार, सुनील वाकोडे वनपरिक्षेत्र अधिकारी सोनाळा, श्रीकांत विखे पोलीस उपनिरीक्षक तामगाव हे सुध्दा उपस्थित राहील. कार्यक्रमानंतर पत्रकारांसाठी स्नेहा भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे तरी पत्रकार बांधवांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष भाऊ भोजने यांनी केले आहे.

बाळ शास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव खंडेश्वर येथे मराठी पत्रकार संघाचे वतीने पत्रकार दिन साजरा

0

——————————-
नांदगाव खंडेश्वर तालुका मराठी पत्रकार संघ च्या वतीने आज दिनांक ६जानेवारी २०२२ ला स्वराज्य टिव्ही न्युज महाराष्ट्र कार्यालय येथे मराठी पत्रकार संघ व स्वराज्य टिव्ही न्युज महाराष्ट्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला नांदगाव खंडेश्वर चे पोलिस निरीक्षक हेमंत ठाकरे,व खांन्नदे साहेब गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर देशमुख विस्तार अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते सुरवातीला बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाला नांदगाव खंडेश्वर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर इंगळे यांच्या उपस्थितीत पार पडला विविध न्यूज चॅनल व वृत्तपत्रा मध्ये काम करणारे पत्रकार उपस्थित होते व मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी यावेळी हजर होते या कार्यक्रमाला सुनिल भाऊ तायडे स्वराज्य टिव्ही न्युज महाराष्ट्र मुख्य संपादक व मराठी पत्रकार संघ जिल्हा प्रतिनिधी सुनिल भाऊ बंनसोड मराठी पत्रकार संघ तालुका सचिव, गणेश शिंगणजुडे उपाध्यक्ष जितेंद्र आखरे प्रसिद्धी प्रमुख व सदस्य हंसराज उके सुर्या न्यूज अमरावती जिल्हा प्रतिनिधी संजय मंडवधरे रविभाऊ मारोटकार किशोर कणसे तुषार तायडे स्वराज्य टिव्ही न्युज महाराष्ट्र चे कार्यकारी संपादक पत्रकारिता करित असताना पत्रकारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते व शासन दरबारी ग्रामीण भागातील पत्रकार ला नोंद नाहीं तळागाळातील लोकांपर्यंत पोहचुन बातमी संकलन करण्याचे काम हा ग्रामीण भागातील पत्रकारच करु शकतो तरी पण शासन दप्तरी नोंद नाही या करिता सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन शासनाला कायदा करण्याची गरज आहे असे उदगार मंडवधरे व्यक्त केले व आभार प्रदर्शन नंदकिशोर इंगळे तालुका अध्यक्ष यांनी मानले

घुग्घुस येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना आदरांजली

0

 

असंख्य अनाथांचे छत्र हरपले – सौ. किरणताई बोढे

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्याअनुषंगाने येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या पावन स्मृतीला आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या प्रतिमेस मल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई बोढे म्हणाल्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी आपल्या कर्तृत्वाने अनाथांची माय अशी ओळख निर्माण केली.
त्यांच्या निधनाने असंख्य अनाथांचे छत्र हरपले आहे.त्यांनी अनाथांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले त्यांचे आयुष्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांचे कार्य अतिशय मोलाचे आहे.
यावेळी माजी जिप सभापती सौ. नितुताई चौधरी, माजी सरपंच संतोष नुने, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, साजन गोहने, कुसुम सातपुते, भाजपाचे संजय तिवारी, विनोद चौधरी, मल्लेश बल्ला, बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, तुलसीदास ढवस, सुरेंद्र जोगी, आनंद आसमपेल्ली, मधुकर धांडे, पियुष भोंगळे उपस्थित होते.

अमरावती विभागात पहिल्यांदाच प्री-कास्ट काँक्रीट पॅनल पद्धतीतून रस्ता निर्मिती

0

 

उषा पानसरे .कार्यकारी संपादीका मो.9921400542

आ.सौ .सुलभाताई खोडके यांच्या दूरदृष्टीतून शहर विकासाला तंत्रज्ञानाची जोड

प्रायोगिक तत्वावर पठाण चौक ते भातकुली मार्गावर रस्ता निर्मितीला सुरुवात

अमरावती ३० डिसेंबर: विकासाच्या संकल्पनेत सुसज्ज रस्त्यांचे विस्तीर्ण जाळे निर्माण करणे महत्वपूर्ण असून यातूनच सुरक्षित वाहतूक व अपघात विरहित अवागमनाला चालना मिळते. त्यामुळे शहरातील अनेक लहान-मोठे रस्ते एकमेकांना जोडून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रस्त्यांचे काँक्रीट जाळे पसरविण्याला घेऊन आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी पुढाकार घेतल्याने शहरातील मुख्य रस्ते त्याचबरोबर शहरातून जाणारे जिल्हा प्रमुख मार्ग, राज्यमार्ग, महामार्ग तसेच लोकवसाहतीमधील अंतर्गत रस्ते आदी मार्गांचा कायापालट झाला आहे . याच शृंखलेत महानगरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता व पुढे भातकुली तालुक्याला जोडणाऱ्या पठाण चौक ते भातकुली रस्ता प्री-कास्ट काँक्रीट पॅनल पद्धतीतून कात टाकणार आहे. बुधवार दिनांक २९ डिसेंबर २०२१ रोजी आ. सौ सुलभाताई खोडके यांनी पाहणी केली असता या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. .
अमरावती – भातकुली रस्ता राज्यमार्ग २८० हा मार्ग शहरातील पठाण चौक मधून गेलेला आहे. या मार्गावर अमरावती महानगर क्षेत्रातील लोकवसाहती , वाणिज्य क्षेत्र असून भातकुली रस्त्यावरील अनेक गावांमधील शेतकरी , दूध विक्रेते , कामगार , कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना अमरावती शहरामध्ये येण्याकरिता याच मार्गाचा अवलंब करावा लागतो . मात्र या अतिवर्दळीच्या व बहूपर्यायी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने येथून अवागमन करतांना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच जड व अवजड वाहतूक करतांनाही मोठी कोंडी उद्भवत असल्याने या मार्गावर सुरक्षित वाहतुकीला घेऊन अनेक समस्या उद्भवत आहे. दरम्यान या रस्त्याचे निर्मिती कार्य सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले असता काँक्रिटीकरणाच्या
कामाला २८ दिवसांचा क्युरिंग पिरेड लागणार होता.. या मार्गावर संभाव्य धोका व वाहतुकीची समस्या टाळता यावी व नागरिकांना सुरक्षित अवागमन करता यावे , यासाठी आ . सौ. सुलभाताई खोडके यांनी जातीने लक्ष घालून या मार्गाच्या कायापालट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सदर काम हे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या असता आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी रस्ता काँक्रिटीकरण कामास्थळी प्रत्यक्ष भेट व पाहणी करून सदर रस्त्याचे काम हे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक करण्याच्या सूचना केल्यात . विशेष म्हणजे आ .सौ .सुलभाताई खोडके यांच्या दूरदृष्टीतून शहर विकासाला तंत्रज्ञानाहीची जोड मिळत असल्याने शहराचा कायापालट होत आहे. अमरावती प्रादेशिक विभागात पहिल्यांदाच प्री-कास्ट काँक्रीट पॅनल पद्धतीचा प्रयोग करून अल्पावधीतच हा रस्ता पूर्ण होऊन नागरिकांना सुरक्षित अवागमनाची सुविधा मिळणार आहे. याच दरम्यान भूमिगत गटार योजनेचे उर्वरित काम तत्काळ करणे बाबतच्या सूचना सुद्धा मजीप्राचे सहाय्यक उपअभियंता शिवहरी कुलट यांना देण्यात आल्या . यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या समवेत राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष – संजय खोडके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे – कार्यकारी अभियंता एस.पी. थोटांगे, उपविभागीय अभियंता – तुषार काळे, शाखा अभियंता – सुनिल जाधव, महानगरपालीकेचे उपविभागीय अभियंता – प्रदिप वानखडे, भुयारी गटार योजनेचे – शिवहरी कुलट, वेलस्पन प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी जफरूद्दीन सय्यद , कुमार बिल्डर – डॉ . अमीन सय्यद , सनाउल्ला खान ठेकेदार, यश खोडके, हाजी रफीक, ऍड. शोएब खान, आहद अली, सनाउल्ला सर, गाजी जहरोष, हबीब खान ठेकेदार, अफसर बेग, अफझल चाैधरी, सादीक रजा, हाजी इरफान सेठ, कन्नुभाई ठेकेदार, दिलबर शाह, राजु पहेलवान, अफसर भाई, सत्तार राराणी, सैय्यद साबिर, समिउल्ला खाॅ पठाण, फहीम मॅकेनिक, फारुक मंडप, मोईन खान, अबरार साबिर, आरीफ मेमन, सैय्यद वसिम, हमीद खान, जाहीद खान, फिरोज अहमद, शेख सलिम, शेख शकील, शफीक शाह, युनुस भाई, जहीर भाई, नाजीम सर, ईलीयास खान, नसिम पठाण, फिरोज अहमद, जाहीद खान आदींसह स्थानिक नागरिक व कार्यकर्ता उपस्थित होते .