Home Blog Page 354

अनाथांची माय सिंदुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन.

0

 

अनिलसिंग चव्हाण सह विक्की वानखेड़े

मुंबई : महाराष्ट्राची मदर तेरेसा अशी ओळख असणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचे निधन झाले असून त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधूताईचं जीवन अत्यंत खडतर होतं. बालविवाह झालेल्या सपकाळ यांनी नवऱ्याने केलेल्या अत्याचारांनंतर घर सोडलं. त्यानंतर अत्यंत अनाथांचा सांभाळ करणं हे त्यांनी आयुष्याचं ध्येय बनवलं. (Latest News on Sidhutai Sapkal)

आज त्यांचे पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. महिना भरापूर्वी त्यांचे हर्निया चे ऑपरेशन झाले होते, त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते, आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गॅलक्झी केअर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर म्हणाले, “सिंधुताई यांना छातीचा हार्निया झाला होता. त्याच्यावर दीड महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होतो. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.”

हजारो अनाथ मुला-मुलींना आश्रय देत त्यांची माय बनलेल्या सिंधुताई (Sindhutai) यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याच्या आरंभीस केले.

सिंधुताई सपकाळ यांनी 1994 साली पुण्यातील पुरंदर तालुक्यात अनाथ मुलांसाठी ‘ममता बाल सदन’ नावाची संस्था स्थापन केली. अनाथ मुलांसाठी त्यांनी केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रासह देशभरात त्या ‘अनाथांची माय’ म्हणून परिचित झाल्या.

सिंधुताई सपकाळ या गेली 40 वर्षे सामाजिक कार्य करत होत्या. त्यांना आजवर 750 हून अधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. अनाथ मुलांना आईसारखी माया देणाऱ्या सिंधुताई नेहमी अभिमानाने सांगायच्या की, मी हजारहून अधिक मुलांची आई आहे.

र्पैश्यांसाठी गहाण ठेवलेली दुचाकी चक्क अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार..

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

र्पैश्यांसाठी गहाण ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार यावल -चोपडा रोडवरील साई हॉटेल येथे २५ डिसेंबर रोजी उघडकीला आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, समीर जहाँगीर तडवी (वय-२९) रा. हरीओम नगर यावल ह.मु. तडवी कॉलनी रावेर जि.जळगाव हे खासगी नोकरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे एमएच १९ डीसी १८७५ क्रमांकाच मोपेड दुचाकी आहे. त्यांना पैश्यांची आवश्यकता असल्याने यावल-चोपडा रोडवरील साई हॉटेलचे मालक धिरज पाटील यांच्याकडून १५ हजार रूपये घेवून ९ सप्टेंबर २०२१ रोजी दुचाकी गहाण ठेवली व दुचाकी हॉटेलजवळ पार्किंगला लावली होती. दरम्यान २५ डिसेंबर २०२१ रोजी त्यांची ८० हजार रूपये किंमतीचा दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतू दुचाकी आढळून आली नाही. अखेर आठ दिवसानंतर ३ जानेवारी रोजी दुपारी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे.

मौजे जांब व मौंढाळा येथे मा जालिंधर बुधवत यांनी दिली भेट. गावातील समस्यांबाबत केली चर्चा.

0

 

मौजे जांब व मौंढाळा येथे मा जालिंधर बुधवत शिवसेना जिल्हा प्रमुख बुलडाणा यांनी आज दि ४/१/२०२२ रोजी भेट दिली. जांब व मौंढाळा येथील गावकऱ्यांनी गावातील अंतर्गत रस्ते, शाळा खोली, शेतरस्ते, स्मशानभूमी बाबत समस्या, आरोग्य विषयक समस्याबाबत मा जालिंधर बुधवत यांच्याशी आपल्या व्यथा मांडल्या. मा जालिंधर बुधवत यांनी गावातील रस्ते, शाळा खोली, शेतरस्ते याबाबत आपण लवकरच जिल्हा परिषदेमार्फत निधी उपलब्ध करून कामे मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी दिले.
यावेळी तालुका प्रमुख लखन गाडेकर, राजु मुळे, दिनेश काळे, अनिल सुसर यांच्यासह जांब व मौंढाळा येथील गावकरी मंडळी उपस्थित होते.

१९ वर्षीय महिलेचा विनयभंग, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

 

शेगांव : येथील जुन्या महादेव मंदिरासमोरून जाणाऱ्या १९ वर्षीय महिलेचा वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केल्या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील  डोबाळवेस भागात राहणाऱ्या १९ वर्षीय विवाहितेने तक्रार दिली की, मी दोन जानेवारीच्या रात्री नऊ वाजेदरम्यान जुना महादेव मंदिरा जवळून जात असताना अनिल दिंडोकार यांच्या दुकानासमोर राजेश गजानन घाटोळ हा इतर मुलांसोबत उभा होता. त्यावेळी मला पाहून त्याने एका मुलाला बाजूला करून वाईट उद्देशाने माझा डावा हात धरला आणि शिवीगाळ करुन केस मागे घे अशी धमकी दिली. यावेळी मी माझ्या पतीला फोन करून बोलावून घेतले. तेव्हा तो तिथून निघून गेला होता मी आणि माझे पती त्याच्या घरी आई-वडिलांना समजून सांगण्यात गेलो असता गजानन घाटोळने मला आणि माझ्या पतिला शिवीगाळ करून राजेश घाटोळ तसेच शिवा घाटोळ यांनी मला आणि माझ्या पतिला विट मारून जखमी केले. यावेळी माझा दीर हा सोडविण्यासाठी आला असता त्याला सुद्धा खुर्ची ने मारहाण करण्यात आली. त्यामुळे माझ्या पतीचे उजव्या डोळ्यावर आणि उजव्या हाताला मार लागला माझ्या दिराच्या दोन्ही हातावर कपाळावर मार लागून जखमी केले. यावेळी आरोपींनी जीवाने मारुन टाकू अशा धमक्या दिल्या. या तक्रारीवरून राजेश गजानन घाटोळ, शिवा गजानन घाटोळ,गजानन घाटोळ सर्व राहणार डोबाळवेस यांच्याविरुद्ध कलम ३५४,३२४,३२३,५०४,५०६,३४ भादंवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष गवई हे करीत आहेत.

संग्रामपूर येथे घराला आग लागुन घरातील साहित्याचे नुकसान.

0

 

संग्रामपूर मित्र परिवाराच्या वतीने 1 तासातच दिली रोख 21 हजाराची मदत.
———————————————–
संग्रामपूर –  वार्ड क्र 11 मधे दि. 2/ जानेवारी रोजी रात्री 11 वा.सुमारास अचानक शॉट सर्किट झाल्याने प्रदिप सोनोने यांच्या घरातील साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे. घटना घडताच रात्रीच 12 वा. एका तासात संग्रामपूर मित्र परिवाराच्या वतीने 21 हजार रुपयाची रोख मदत देण्यात आली.

संग्रामपूर शहरातील वॉर्ड क्र.11 मधील रहिवाशी प्रदिप श्रीरंग सोनोने यांच्या घराला दि.2/जानेवारी रोजी रात्री 11 वा.सुमारास शाॅटसर्किट मुळे आग लागुन घरातील फ्रिज, मिक्सर सह इतर सहित्य जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ह्याची माहिती समजताच रात्री 12वाजता संग्रामपूर मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष शंकर पुरोहित व सहकारी मित्र धावून गेलेत. सोनोने दाम्पंत्याला 21 हजार रु.ची रोख मदत देण्यात आली.
प्रत्येक वेळी काही नैसर्गिक घटना घडून आपत्ती निर्माण होवून नुकसान झाल्यास संग्रामपूर मित्र परिवाराचे सहकारी सदस्य हे धावून जातात.व वेळीच संबंधिताला , व परिवाराला आधार मिळावा म्हणून सहकार्य करुन आर्थिक मदतही करतात.त्यामुळे त्यांचे कौतुक करुन आभार मानतात.

संग्रामपूर न्यायालयाचे लिपिक डोसे यांचे सेवानिवृत्ती निमित्त निरोप व सत्कार.

0

 

अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक

दिवाणी व फौजदारी न्यायालय संग्रामपुर मधील लिपिक ए.डी.डोसे हे सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांना न्यायालयाचे कर्मचारी व संग्रामपूर तालुका वकील संघाच्या वतीने त्यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तर दि. 1/ जानेवारी रोजी नववर्ष दिनानिमित्त तसेच न्यायालयाच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले त्याबद्दल ए.डी.डोसे क. लिपीक यांचा वकील संघाचे बार रुम मध्ये त्यांचे सहकारी मित्र यांचेसह ज्येष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात येवून निरोप देण्यात आला. यावेळी संग्रामपुर तालुका वकील संघाचे अॕड.बी.पी.खंडेराव, अॕड.व्ही.पी.वानखडे ,अॕड. किर्तने,अॕड जी.ए.क्षीरसागर,व इतर तसेच दस्तऐवज लेखक देवानंद इंगळे ,पत्रकार दयालसिंग चव्हाण ,गोकुल गावंडे व सहकारी मित्र उपस्थित होते.

आता व्हॉट्सअ‍ॅपवर वर्तमानपत्रे शेअर करायला बंदी; उच्च न्यायालयाने दिले हे आदेश!

0

 

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने व्हॉट्सअ‍ॅपला नवे निर्देश दिले आहेत. व्हॉट्सअॅप ग्रुपवर वर्तमानपत्रांच्या ऑनलाईन एडिशन अर्थात ई-वर्तमानपत्रे शेअर करणारे ग्रुप बंद करण्यात यावेत, अशी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली होती. व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मेसेजिंग अ‍ॅपवर पोस्ट होणारा मजकूर आणि त्याची सत्यासत्यता या मुद्द्यावरून गेल्या काही महिन्यांमध्ये मोठी चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यासोबतच केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीमुळे लागू होणाऱ्या निर्बंधांचीही जोरदार चर्चा झाली. त्यानंतर आता या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं व्हॉट्सअ‍ॅपला हे निर्देश दिले आहेत.

ई-वर्तमानपत्रे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर
“बेकादेशीरपणे आणि त्यासंदर्भातले अधिकार नसतानाही अशा प्रकारे ई-वर्तमानपत्रे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर करण्यास मनाई करण्यात आली आहे”, असं न्यायमूर्ती संजीव नरूला यांनी आदेशामध्ये नमूद केलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यावर २४ डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने निर्देश दिले.

ग्रुपची माहिती न्यायालयात
या याचिकेमध्ये एकूण ८५ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची माहिती दिलेली आहे. तसेच, याशिवाय असे अनेक ग्रुप असतील जिथे ई-वर्तमानपत्रे बेकायदेशीररीत्या शेअर केली जातात, असंही याचिकेत म्हटलं आहे. यासंदर्भात पुढील सुनावणी २ मे २०२२ रोजी होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपला हवे होते न्यायालयाचे आदेश!
काही वर्तमानपत्रांनी यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कोणतेही अधिकार नसताना अशा प्रकारे ई-वर्तमानपत्रे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर केली जात असताना त्याविरोधात त्यांनी दाद मागितली होती. यासंदर्भात न्यायालयाचे आदेश सादर करा असं व्हॉट्सअ‍ॅपकडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. वाचकांना या पद्धतीने दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करावी लागते. तसेच, वर्तमानपत्रांचा खप वाढण्यासाठी देखील ही बाब महत्त्वाची ठरते. वाचक निश्चित असे शुल्क भरून ई-वर्तमानपत्रांचं हे सबस्क्रिप्शन घेत असतात. यामध्ये वाचकांना ई-वर्तमानपत्र डाऊनलोड करण्याचा किंवा ते इतरांना पाठवण्याचा अधिकार नसतो”, असं याचिकेमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

क्रांतीज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

0

डी. एस. पिंगळे
निलंगा तालुका प्रतिनिधी

आज ३ जानेवारी क्रांतीज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती महाराष्ट्र विद्यालय लांबोटा इथे साजरी करताना शाळेचे मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि चिमुकली मुलं इत्यादी उपस्थित होते.
अंधरात जन्मलेल्यांना डोळे झाकुन आणि मनाची कवाडे बंद करून जगण्याचीच सवय लागते हा इतिहास होता.
पण, जन्माला येताच हक्काची सृष्टी पाहण्याचा ध्यास घेणारी माऊली जन्माला आली आणि परंपरांच्या बुरूजांना सुरूंग लागले. उंबरठ्या बाहेरची माती कपाळी लाउन मराठी स्त्री मुक्ततेच्या वाटेवर स्वच्छंद भरारी घेऊ लागली.
आडाणीपणाचा अंधार नाकारून ज्ञानप्रकाशाला जीवनाचे ध्येय बनविणार्या त्या “विद्येच्या देवतेचे नावं सावित्रीबाई फुले”.

क्रांतीज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

0

डी. एस. पिंगळे
निलंगा तालुका प्रतिनिधी

आज ३ जानेवारी क्रांतीज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती महाराष्ट्र विद्यालय , मुदगड (ए.) इथे साजरी करताना शाळेचे मुख्याध्यापक ,श्री नटवे सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि चिमुकली मुलं इत्यादी उपस्थित होते.
अंधरात जन्मलेल्यांना डोळे झाकुन आणि मनाची कवाडे बंद करून जगण्याचीच सवय लागते हा इतिहास होता.
पण, जन्माला येताच हक्काची सृष्टी पाहण्याचा ध्यास घेणारी माऊली जन्माला आली आणि परंपरांच्या बुरूजांना सुरूंग लागले. उंबरठ्या बाहेरची माती कपाळी लाउन मराठी स्त्री मुक्ततेच्या वाटेवर स्वच्छंद भरारी घेऊ लागली.
आडाणीपणाचा अंधार नाकारून ज्ञानप्रकाशाला जीवनाचे ध्येय बनविणार्या त्या “विद्येच्या देवतेचे नावं सावित्रीबाई फुले”.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न

0

डी एस पिंगळे
निलंगा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शेडोळ येथील विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९१ जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती उषादेवी बस्वराज स्वामी प्रमुख पाहुणे,श्री गुणवंत जाधव,श्री.बस्वराज स्वामी, विद्यालयाचे प्राचार्य श्री एस बी कदम सर,यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर श्री पाटील सर श्री जाधव सर श्री कुनाळे सर, श्री डी एन सुर्यवंशी सर श्रीमती तुगावे मॅडम,श्रीमती बरदाळे मॅडम, होते, याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर कविता सादर केली, तसेच ओव्या, एकांकिका व नाटकांच्या माध्यमातून सावित्रीबाईंच्या जीवनावर प्रकाश टाकला व स्वच्छतेचे महत्त्व, हुंडा बळी, महिलांचे शिक्षण यावर सुंदर नाटिका प्रस्तुत केली.
याप्रसंगी विद्यालयातील ९२ विद्यार्थिनींनी सावित्रीबाई ची वेशभूषा परिधान करून मुलांनी विनोबाजी फुले यांची वेशभूषा परिधान करून शाळेत आगमन केले होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री पाटील सर,सूत्रसंचालन श्री काळे सर व आभार प्रदर्शन श्री सय्यद सर यांनी मांडले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले..