Home Blog Page 356

घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात ई-श्रम कार्ड नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद 1437लाभार्थ्यांची नोंदणी

0

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात लाभार्थ्यांना मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी करून तसेच बनवून देण्यात येत असल्याने नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
केंद्र शासनाच्या असंघटित व श्रमिक कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी ई-श्रम कार्ड नोंदणी सुरु करण्यात आली आहे या योजने अंतर्गत कामगारास दोन लक्ष रुपयांचा अपघात विमा, पंजीकृत कामगाराचा अपघात झाल्यास त्यात कामगार मरण पावल्यास किंवा पूर्णतः अपंग झाल्यास दोन लक्ष रुपयांची मदत आणि आंशिक अपंगत्व आल्यास एक लक्ष रुपयांच्या मदतीसाठी पात्र ठरतो .
मागील काही दिवसापासून मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी सुरु असल्याने दररोज शेकडो लाभार्थी केंद्रात येऊन आपली नोंदणी करीत आहे. या केंद्रातून 1,437 लाभार्थ्यांना मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी करून व ई-श्रम कार्ड बनवून देण्यात आले.
ई-श्रम कार्ड नोंदणीचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी केले आहे.

लोणार येथे पत्रकार संघाच्या कार्यकारणीचे गठण

0

 

लोणार ( जगन् मोरे सह सतीश मुलंगे) – पत्रकार संघ पदग्रहण सोहळा दि. २० डिसेंबर २०२१ रोजी शासकीय विश्राम गृह येथे सकाळी अकरा वाजता | राष्ट्रीय विश्व गामी पत्रकार संघ च्या | तालुका व जिल्हा कार्यकारणी चे गठीत करण्यात आली असून | बुलढाणा जिल्हा वकील संघ जिल्हा अध्यक्ष पदासाठी ऑ. फोजिया शेख. तसलीम यांची नियुक्ती करण्यात आली असून, पत्रकार संघाच्या कार्यकारणी मध्ये पश्चिम विदर्भ प्रमुख शेख सज्जाद, बुलढाणा जिल्हा उपाध्क्षपदी प्रा. लूकमान कुरेशी तर लोणार तालुकाध्यक्ष पदी उद्धव आटोळे, तालुका उपाध्यक्ष रिंडे सर, तालुका उपाध्यक्ष विजय मापारी, तालुका सचिव जगन मोरे, शहराध्यक्ष भूषण शेटे, शहर उपाध्यक्ष सतीश मुलंगे, शहर उपाध्यक्ष मयूर सरकटे, शहर प्रसिद्धीप्रमुख जंबू सिंगी, तालुका कार्याध्यक्ष बाबाराव मुंडे, शहर कार्याध्यक्ष नरेश खरात, शहर कोषाध्यक्ष विजय महाजन, तालुका प्रसिद्धीप्रमुख शेख अन्सार, सहसचिव सालार पठाण,सहसचिव रवी नागरे, सदस्य प्रकाश नागरे, गणेश कूटे, परमेश्वर

मापारी, निलेश छलानी, यांची वरील प्रमाणे कार्यकारणी गठित करण्यात आली असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम सर आणी प्रमुख उपस्थिती साहेबराव जी पाटोळे, नगर उपाध्यक्ष बादशहा खान, सभापती आबेद खान, नगर सेवक कंकाळ सर, नगर सेवक तोफिक कुरेशी, नगर सेवक गजानन खरात सर, भाजप तालुकाध्यक्ष बाबाराव मुंडे, गजू भाऊ मापारी, समाज सेवक एजास खान, प्रकाश नागरे, सोनुने साहेब, संघाचे इतर कार्यकर्ते उपस्थीत होते, आणी कार्यक्रमांमध्ये शमीम सर, माजीद सर, अकील सर, कदम सर, राम काग्ने सर, घायाळ सर, शिवदास वानखेडे सर, मदन उव्हाळे, तोफिक सर, शारिक सर, एफ एल कुरेशी सर, इतरही शिक्षकाना आदर्श शिक्षक सन्मान प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. आलेल्या समाजसेवक व प्रमुख पाहुण्यांनी नवनिर्वाचित झालेल्या राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ लोणार कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी व सदस्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

घुग्घुस येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

0

 

थोर समाज सुधारक गाडगे बाबांचे विचार अमलात आणल्याशिवाय समाज प्रगती करू शकणार नाही – किरणताई बोढे

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

सोमवार 20 डिसेंबर रोजी घुग्घुस येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई विवेक बोढे म्हणाल्या संत गाडगे बाबा महाराष्ट्राचे थोर समाज सुधारक होते. कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या एका हातात खराटा व दुसऱ्या हातात मडके होते त्याने ते गावात स्वच्छता करायचे सामाजिक न्याय देण्यासाठी व स्वच्छता करण्यासाठी ते गावोगावी भटकत असत. समाज सुधारणा व स्वच्छता करण्यात त्यांना जास्त रुची होती. प्राण्यांची हत्या करू नका समाजात अस्पृश्यता पाळू नका असा संदेश ते देत असत संत गाडगे बाबा दिन दुबळे, अनाथ, अपंगाची सेवा करणारे कर्मयोगी होते. बाबांचे विचार अमलात आणल्याशिवाय समाज प्रगती करू शकणार नाही.
उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई विवेक बोढे, माजी ग्रामपंचायत सदस्य पूजा दुर्गम, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मधुकर मालेकर, ज्योत्सना मडावी, किरण केळझरकर, संजना पाटील, मोनिका यादव, सीता कोलीयन, रश्मी यादव, सुनीता सातघरे, शोभा कैथल, शारदा राखुंडे, बीबी चिंचोलकर, वर्षा धोतरे, संगीता राखुंडे, सिंधू कामतवार, कल्पना निवलकर, साहीन शेख, सुनंदा लिहीतकर, शीतल कामतवार, पायल मांदाडे, भरती पर्ते, खुशबू मेश्राम उपस्थित होते.

जलंब ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीमध्ये राडा. तुफान हाणामारी नंतर चार जण जखमी

0

 

 

शेगाव. जलंब येथील प्रभाग क्रमांक 1 मधील पोटनिवडणूक पार पडत असतांना मतदान केंद्राजवळ शुल्लक कारणावरून बोलचाल झाली नंतर बोलचालीचे रुपांतर हे हाणामारीत झाले. हाणामारीत नरेंद्र तेलगोटे व शोभा तेलगोटे रा जलंब हे दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शेगाव येथील सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.नंतर त्याना अकोला येथे रेफर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

वृत्त लिहे पर्यंत पोलीस कारवाई झाली नहोती.

अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतातील विज तोडणीविरुद्ध महावितरण कार्यालयावर भव्य आंदोलन

0

 

डी.एस. पिंगळे
निलंगा तालुका प्रतिनिधी

आज निलंगा येथेअखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतातील विज तोडणीविरुद्ध महावितरण कार्यालयावर भव्य आंदोलन करण्यात आले. यावेळी
शेतकऱ्यांसह प्रदेश अध्यक्ष मा.विजयकुमार घाडगे पाटील,राज्य सल्लागार मा.भगवान दादा माकणे, संपर्क प्रमुख मा.प्रकाश भाऊ गोमसाळे पाटील, तालुका अध्यक्ष मा.दास सांळूकें, तालुका संघटक मा.किरण भैय्या पाटील, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष मा.वैभव गोमसाळे व छावा संघटनेचे पदाधिकारी यांनी महावितरणकडुन होणाऱ्या विज तोडणी संदर्भात अधीकाऱ्यासोबंत चर्चा करुन सरकार व महावितरण प्रशासन यानां शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देऊन विज तोडनी थांबवावी अन्यथा छावा संघटना आक्रमक पवित्रा घेऊन शेतकऱ्यानां न्याय देईल असा इशारा करत भव्यआंदोलन करण्यात आले.

संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त प्रेस क्लब तर्फे अभिवादन

0

 

शेगाव : वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त प्रेस क्लब शेगाव चे वतीने श्री गजानन महाराज मंदिर परिसरातील गाडगेबाबा पुतळ्याजवळ अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष दिनेश साळुंखे प्रहारचे शहराध्यक्ष राजु मसने,प्रेस क्लब चे संस्थापक संजय सोनोने,उपाध्यक्ष नंदु कुळकर्णी यांच्या हस्ते संत गाडगेबाबांचे पुतळ्याला हार अर्पण करण्यात आले. तर सेवानिवृत्त मंडळ अधिकारी अशोक कडूकार, संत गाडगेबाबा समाज संघटनेचे जिल्हा सचिव महादेव इदोकार, शिवशंकर निंबोळकार,सहदेव वाकेकर,ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष
सचिन कडूकार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
याप्रसंगी प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल उंबरकार, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश चौधरी, उपाध्यक्ष नंदू कुलकर्णी धनराज ससाने, संजय त्रिवेदी, नारायण दाभाडे, दिनेश घाटोळ आदीसह पत्रकार बांधव उपस्थित होते.

शेगाव : अभिवादनप्रसंगी प्रेस क्लब चे पदाधिकारी व मान्यवर

लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या तालुका उपाध्यक्ष पदी वैभव विश्वासराव देशमुख

0

 

खामगांव:- लोकशाही मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा श्री सचिनजी बोंबले साहेब व उपाध्यक्ष मा श्री अमोलजी पाटील सर यांच्या आदेशाने विदर्भ अध्यक्ष मा श्री कैलास मोरे सर विदर्भ संपर्क प्रमुख उत्तम वानखडे यांच्या मार्गदर्शनात बुलडाणा जिल्हा अध्यक्ष प्रशांतभैय्या डोंगरदिवे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बुलढाणा जिल्ह्या मधील पत्रकार बांधवांना न्याय देण्यासाठी संघटना मजबूत करीत आहे. याचाच एकभाग म्हणुन खामगाव येथिल वैभव विश्वासराव देशमुख संपादक साप्ता. सिल्वर सिटी न्युज यांची खामगांव तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. दी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांना सर्वच स्तरावरुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा देण्यात येत आहे.

डांभुर्णी येथे मामाच्या गावी यात्रा पाहण्यासाठी आलेल्या दहा वर्षीय बालकाचा दुदैवी मृत्यु सर्वत्र हळहळ

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील डांभुर्णी येथे मामाच्या गावी यात्रा पाहण्यासाठी आलेल्या एक दहा वर्षीय बालक विद्युत शॉक लागून दगावला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (ता.१७) दुपारी घडली. भडगाव येथील भावेश साईनाथ बागुल हा दहा वर्षीय बालक यात्रे निमित्त आजोबा अशोक नामदेव सपकाळे यांच्याकडे डांभूर्णी गावी आला होता. शुक्रवारी दुपारी डांभुणी येथे नळांना पाणी आले होते. व अशोक सपकाळे यांच्या घरात देखील इलेक्ट्रिकल मोटर लावून पाणी भरण्याचं काम सुरू होते. मोटरला लावण्यात आलेली वायर घरातून बाहेर मोटारपर्यंत ओट्यावर पसरली होती,त्या ठिकाणी पाणी भरत असताना ओटा संपूर्ण ओला झाला होता. दरम्यान खेळायला बाहेर निघालेल्या दहा वर्षीय भावेश साईनाथ बागुलचे पायात चप्पल नसताना ओटावर आला असता त्याला अचानक विजेचा झटका लागला. आणि तो ओट्यावरून खाली कोसळला. तो बेशुद्ध अवस्थेत पडला तेव्हा त्यास तातडीन जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आले.आणि डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई ,वडील ,मोठा भाऊ असा परिवार आहे. भावेच्या अशा या दुर्दैवी मृत्यूमुळे भडगाव आणि यावल तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

यावल तालुका दक्षता समितीच्या अशासकीय सदस्यपदी सरफराज तडवी व चंद्रकला इंगळे यांची निवड

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्या आदेशान्वये तालुका पातळीवरिल दक्षता समितीवर अनुसुचित जमातीचे प्रतिनिधी म्हणुन अशासकीय सदस्यपदी यावल पंचायत समितीचे सदस्य सरफराज सिकंदर तडवी आणी अनुसुचित जातीच्या प्रतिनिधी म्हणुन अशासकीय सदस्य म्हणुन कॉंग्रेस कमेटीच्या जळगाव जिल्हा अनुसुचित जाती सेलच्या उपाध्यक्ष चंद्रकला इंगळे यांची निवड करण्यात आली आहे .

चंद्रकला इंगळे

सरफराज तडवी आणी चंद्रकला इंगळे यांच्या या निवडी बद्दल पंचायत समितीचे काँग्रेस गटनेते तथा संजय गांधी समितीचे तालुका अध्यक्ष शेखर सोपान पाटील , जिल्हा परिषद गटनेते व काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे , पंचायत समिती सदस्य कलीमा सायबु तडवी , उमाकांत रामराव पाटील , वढोदे सरपंच संदीप सोनवणे , कोरपावली सरपंच विलास अडकमोल, दहिगाव सरपंच अजय अडकमोल, दहिगावचे उपसरपंच किशोर महाजन , मारूळ सरपंच सैय्यद असद जावेद अली, काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदीर खान , उपाध्यक्ष अनिल जंजाळे, यावल नगरसेवक मनोहर सोनवणे , शिला सोनवणे , नगरसेवक सैय्यद युनुस सैय्यद युसुफ , नगरसेवक अस्लम शेख नबी, समिर शेख मोमीन यांनी स्वागत करून अभीनंदन केले आहे .

तालुक्यातील विरावली येथील जवान महेंद्र पाटील पाळधी येथे आयोजित सेवारत, माजी सैनिक यांच्या परिवाराला सेवा देणाऱ्या डॉक्टर, प्राध्यापक, सैनिक यांच्या सत्कार कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

0

 

यावल, (प्रतिनिधी)विकी वानखेडे

जळगाव जिल्ह्यातील शहीद झालेले अर्ध सैनिक दलाचे जवान यांच्या परिवाराचा सन्मान सोहळा व निवृत्त जवान यांच्या विविध समस्या याबाबत चर्चासत्र तसेच सेवारत व निवृत्त सैनिक परिवाराकरीता शिक्षण, चिकित्सा सेवा दिलेल्या डॉक्टर,प्राध्यापक, सैनिक यांचा सत्कार काँनफेडरेशन ऑफ एक्स पॅरामिलिटरी फोर्ससेस असोसिएशन व जळगाव जिल्हा निवृत्त अर्धसैनिक बलतर्फे पाळधी येथे करण्यात आला. या कार्यक्रमाला जि. प. सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, काँनफेडरेशन ऑफ एक्स पॅरामिलिटरी फोर्ससेस असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष-व्ही के शर्मा- हिमाचाल(DIG/Rtd)असोसिएशनचे वरीष्ठ पदाधिकारी देवेंद्र बक्षी-(दिल्ली), मनोज तेवतीया-(उत्तर प्रदेश) मोहन राव-(आंध्र प्रदेश), किरण पाल सिंग, एस. एस. संधू, मनबीर काटोच, दिलीप शार्दुल यांच्यासह धूळे/नंदुरबार जिल्ह्यातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी शाहिद परिवाराचा सन्मान करण्यात आला तसेच देश सेवेसाठी तैनात सैनिक तसेच शहीद जवानांच्या पाल्याना विविध करिअर मार्गदर्शन आणि कोर्स व शिबिराला निःशुल्क व अत्यलप फि घेवून प्रवेश दिल्याबद्दल स्वयंदीप प्रतिष्ठान डांभुर्णीचे संस्थापक सचिव प्रा. संदीप पाटील(सोनवणे) तसेच माउली हॉस्पिटल रावेरचे संचालक डॉ. संदीप पाटील व डॉ. योगिता पाटील हे दोघे सैनिक आणि त्याचे परिवारला निशुल्क चिकित्सा सेवा विनामूल्य देत आहेत. या महान कार्यकरिता आणि सोबत वीरावलीचे सैनिक महेंद्र पाटील ह्यानी मागिल दोन वर्षांत सैनिक, शहीद सैनिक परिवारचे कारिता केलेल्या कार्याची ही यावेळी जिल्हा माजी सैनिक असोसिएशनद्वारा दखल घेतली गेली. सैनिक महेंद्र पुंडलिक पाटील यांचा ही सत्कार दिल्लीचे असोसिएशन व आयोजक यानी केला याप्रसंगी विजय सपकाळे (निवृत्ती जवान बी एस एफ) असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष, बाळू पाटील उपअध्यक्ष आहेत. निवृत्त जवान रफिक शेख जिल्हा सचिव, रत्नाकर चौधरी उप सचिव हे उपस्थित होते. तर अल फैज पटेल याने सूत्रसंचालन केले.