Home Blog Page 358

काँग्रेस स्थापना दिवस उत्साहात साजरा

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस शहर काँग्रेस तर्फे शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या माध्यमातून आज काँग्रेस* *कार्यलयात पक्षाचा 137 वा स्थापना दिवस केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला*
पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते नववर्षाच्या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले याप्रसंगी पक्षाचे सर्वश्री सैय्यद अनवर, स्टीवन* *गुंडेटी,किशोर* *बोबडे,अनिल* मोरपाका,अलीम शेख,रोशन दंतालवार,इर्शाद कुरेशी,अनुप भंडारी,विजय माटला,रोहित डाकूर,श्रीहरी शेंगारप,बल्ली भाई, देव भंडारी,आकाश चिलका,शाहरुख शेख,साहिल सैय्यद,कपिल गोगला,सुकुमार गुंडेटी,सचिन कोंडावार,रफिक शेख,संजय कोवे, अंकुश सपाटे,बालकिशन कुळसंगे,प्रदीप आसेकर,सुनील पाटील,आरिफ शेख,सुमेश रंगारी,विशाल नागपुरे,खादीम शेख,संजीत यादव,

समृध्दी महामार्गामुळे अमरावती जिल्ह्यातील खराब झालेल्या 26 रस्त्यांची दयनीय अवस्था,दुरुस्ती कधी

0

 

उषा पानसरे  कार्यकारी संपदिका मो. 9921400542

होणार,रस्ते खराब करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर शासन काय कार्यवाही करणार?आमदार रवी राणा यांचा विधानसभेत संतप्त सवाल*
*समृद्धी महामार्गाच्या विकासासाठी जमिनी दिलेल्या काही शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला नाही,अनेक शेतकरयांच्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे,असे शेकडो शेतकरी मुंबई येथील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत, सरकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री याची दखल घेऊन या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना न्याय देणार का?आमदार रवी राणा यांचा विधानसभेत खडा सवाल*
या खराब झालेल्या 26 रस्त्यांपैकी काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग तर काही जिल्हा परिषद अंतर्गत येणारे आहेत,संबंधित कंत्राटदाराकडून ही रक्कम घेऊन ती संबंधित विभागाकडे तात्काळ वळती करावी जेणेकरून या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करता येईल व नागरिकांना होणारा त्रास आणि वाहनांचे होणारे नुकसान वाचेल -आमदार रवी राणा यांची सभागृहात सूचना
सार्वजनिक बांधकाम व रस्ते विकास मंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रवी राणा यांच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन आजच सदर रस्ते तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश देत असल्याचे सभागृहात जाहीर केले व ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत किंवा ज्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झालेले आहे अश्या सर्व शेतकऱयांना घेऊन आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात आपल्या दालनात तात्काळ बैठक लावून या शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे अभिवचन सुद्धा यावेळी मंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सभागृहात दिले
आमदार रवी राणा यांनी समृद्धी महामार्ग निर्मितीमुळे 26 रस्त्यांच्या झालेल्या नुकसानीचा व शेतकरी हिताचा प्रश्न उपस्थित केल्याने आंदोलक शेतकरी व नुकसानग्रस्त नागरिकांना न्याय मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत,संबंधित शेतकरी व नागरिकांनी आमदार रवी राणा यांचे आभार मानले आहे.

दुचाकी ताबा सुटल्याने दोन जखमीं

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

 

यावल तालुक्यातील जामून झिरा येथील संजू अक्कल सिंग बारेला व संदीप बारेला हे दोघे यावल येथून चोपडा जात असताना सायंकाळच्या सुमारास चुंचाळे फाट्यावर जवळ त्यांच्या दुचाकींचा ताबा सुटल्याने गाडी घसरून दोघे जखमीं अवस्येत पडले असतांना, त्यांच्या मदतीला
शिवसेनेचे स्वराज फाउंडेशन चे अध्यक्ष भरत सर चौधरी ,आरी पाटील दीपक कोळी निसान तडवी,यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णवाहिनीका उपलब्ध करून त्याना पुढील उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात असून त्यांच्यवर वैद्यकीय अधिकारी डॉ बी बी, बारेला, व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी जखमींना औषधो उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव सामन्य रुग्णालयात हलविण्यात आले असल्यचे वैद्यकीय सुत्रांकलून सांगण्यात आले,

महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथे विद्यार्थी पालक मेळावा.

0

 

 

डी. एस. पिंगळे
निलंगा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथे B Pharm प्रथम वर्ष , B Pharm द्वितीय वर्ष (Direct Second yr), M Pharm प्रथम वर्षातील शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थी व पालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. बी. एन. पौळ सर , कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील सर व महाविद्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित राहून विध्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला

0

 

SURYA MARATHI NEWS

विक्की वानखेड़े जळगाव जिल्ह्या प्रतिनिधि

चांगदेवजवळ (ता. मुक्ताईनगर) अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला आहे. आज रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

या हल्ल्यात रोहिणी खडसे (rohini khadse) यांना दुखापत झाली नसून कारवर रॉडने काचा फोडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जळगाव पोलीस घटनास्थळाकडे रवाना झाले असून हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर ( Rupali chaknkar) यांनी या घटनेचा निषेध केला आहे. रोहिणीताई खडसे यांच्या गाडीवर थोड्या वेळापुर्वी प्राणघातक हल्ला हल्लेखोरांनी केला, एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये ,मग ते कोणीही असो .जळगाव पोलिस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करुन कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली

या गेल्या दोन दिवसात शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील व खडसे यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. एकनाथ खडसे eknath khadse आणि रोहिणी खडसे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला होता. त्यानंतर आज रोहिणी खडसे यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. Surya marathi news

घुग्घुस दलित वस्ती सुधार योजनेत वार्ड क्र. चार व पाच समाविष्ट करा.

0

 

अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा वॉर्ड वासियांचा इशारा

(चंद्रपूर घुग्घुस )प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत कामाची काढलेली ई-निविदा नवीन तयार करून वार्ड क्र. चार व पाच येथील दलित वस्ती परिसर समाविष्ट करून पुनर्नियोजन करून काम करण्याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी अर्शीया जुही यांना येथील वार्ड वासियांनी दिले.
घुग्घुस नगर परिषद अंतर्गत दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत चुकीच्या कामाचे नियोजन करून काम ठरविण्यात आले. वार्ड क्र. पाच येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर आंबेडकर नगर दलित वस्ती आहे या दलित वस्तीला विकासा पासून वंचित करून चुकीचे नियोजन केले आहे. तसेच शालिकराम नगर, शिवनगर, राधा कृष्ण मंदिर परिसरालाही विकासापासून वंचित ठेवण्यात आले आहे.
घुग्घुस शहरातील वार्ड क्र. चार व पाच मध्ये दलित लोकांची संख्या सर्वाधिक आहे. सन 2015 या वर्षी घुग्घुस ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या दलित लोकवस्तीच्या आधारावर एससी उमेदवारांच्या दोन जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. घुग्घुस नगर परिषदेने वार्ड क्र. चार व पाच मधील दलित वस्तीच्या लोकांना नजर अंदाज करून दलित वस्ती सुधार योजनेच्या चुकीच्या कामाचे नियोजन केले.
ही चूक दुरुस्त करून वार्ड क्र. चार व पाच मध्ये राहणाऱ्या दलित लोकांचा विकास व न्याय मिळण्याकरिता दलित सुधार योजनेचे नवीन नियोजन करून काढण्यात आलेली ई-निविदा नवीन तयार करून शहरातील सर्व वार्डाचे अंदाज पत्रक तयार करून नवीन ई-निविदा काढून घुग्घुस दलित सुधार योजनेचे काम करण्यात यावे अशी वार्ड वासियांनी निवेदनातून केली आहे.
निवेदन देतांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी सरपंच संतोष नुने, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, माजी तंमुस अध्यक्ष मल्लेश बल्ला, विक्की सारसर, प्रशांत लेंडगुरे, रवी बडगुलवार, विक्की भंडारी, योगेश सारसर, अमोल हस्ते, अमन वनकर, शुभम कात्तुलवार, गणेश मोहुर्ले, दिलीप लेंडगुरे, मंगेश मुंजेवार, रुदय तांड्रा, नागेंद्र गिरी, रामनरेश कश्यप, दामोदर मुंजेवार व वार्ड वासीय उपस्थित होते.
जिल्हाधिकारी चंद्रपूर व तहसीलदार यांनासुद्धा निवेदन देण्यात आले.

वणा नदीच्या संवर्धन आणि सौंदर्यीकरणासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा -श्री.अनिल जवादे यांचे आवाहन

0

(हिंगणघाट)

एके काळी वणा नदीचे पात्र स्वच्छ आणि सुंदर असायचे. नदीचा प्रवाह अंखडीत वाहत राहायचा.पाणी स्वच्छ ,निळसर आणि काळेभोर असायचे.नदी पात्रात भरपूर वाळू असायची. त्यामुळे शहरातील आणि परिसरातील अनेक लोक आनंद घेण्यासाठी नदीच्या सहवासात यायची.नदी पात्रात बसून मित्र मंडळीसह , कुटुंबासह भोजन करायची आणि नदीच स्वच्छ ,निर्मळ असं पाणी प्राशन करून नदी सहवासतल्या आठवणी आपल्या मनात साठवून मोठ्या आनंदाने घरी परतायची .पण आज परिस्थिती बदललेली आहे. गाव शहरातून येणारे दुषीत पाणी,त्यात येणारा कचरा,कारखाण्यातून येणारे रसायनमिश्रीत पाणी ,रेती माफीयांकडून नदी पात्रात झालेले खड्डे यामुळे हिंगणघाट तालुक्याची जीवनदायीनी असलेली वणा नदीचे स्वास्थ धोक्यात आलेले आहे.या वणा नदीच्या पाण्याच्या भरोश्यावर आपण लहानाचे मोठे झालो आहे. इथले उद्योजक मोठे झाले आहेत, श्रीमंत झाले आहेत. वणा नदीचे आपणावर एवढे मोठे उपकार आहेत.एखाद्याने आपल्यावर उपकार केले तर आपण त्याच्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो .पण आपल्यावर उपकार करणारी ही जीवनदायीनी आज संकटात असतांना जीच्या पाण्यावर जी मंडळी श्रीमंत झाली त्या मंडळीने मात्र नदीचे स्वास्थ ठिक करण्याकरीता पाठ फिरवीली आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनतेनी,विद्यार्थ्यांनी ,युवकांनी पुढाकार घेऊन वणा नदीच्या संवर्धन आणि सौंदर्यीकरणासाठी पुढाकार घ्यावा ; नाही तर भविष्यात आपणाला फार मोठी किंमत मोजावी लागेल असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते आणि निसर्ग मित्र हौशी सायकल क्लबचे संस्थापक अनिल जवादे यांनी व्यक्त केले. वणा नदी तीरावर चला वणा नदीचे संवर्धन आणि सौंदर्यीकरण करु या या निसर्ग मित्र हौशी सायकल क्लब द्वारे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.वणा नदी संवर्धन समितीचे रूपेश लाजूरकर,मच्छिमार संघटनेचे अशोक मोरे यांचीही समायोचीत भाषणे झाली.प्रारंभी निसर्ग मित्रच्या सर्व सदस्यांनी नदी पात्राची स्वच्छता केली. या उपक्रमात शहरातील काही समाजसेवी संघटनांच्या प्रतीनिधीसह डाॕ.बी.आर.आंबेडकर विद्यालयाचे बहुसंख्य विद्यार्थीही समाविष्ट झाली होती.
..

लुम्बिनी नगर स्पोर्ट्सचे ” डे'” नाईट शॉर्ट क्रिकेटचे आयोजन

0

 

युवकांनो आरोग्य रक्षणासाठी मैदानी खेळात सहभागी व्हा : राजूरेड्डी

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
(रमेश सुध्दाला

घुग्घुस : लुम्बिनी नगर स्पोर्ट्स क्लब द्वारे दिनांक 25 डिसेंम्बर ते 28 डिसेंम्बर पर्यंत “डे” नाईट शॉर्ट सर्कल क्रिकेटचे आयोजन करण्यात आले.

स्पर्धेचे उदघाटन काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी व युवक अध्यक्ष तौफिक शेख यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी परिसरातील जवळपास पंचवीस ते तीस चमूने सहभाग नोंदविला उपस्थित युवकांना

काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी संबोधित करतांना सांगितले की आजच्या प्रतिस्पधेच्या काळात आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे असून आरोग्यासाठी मैदानी खेळ हे सर्वात लाभदायक आहे.

यासोबतच जीवनात यश – अपयश येत असतात जीवनात कुठलेच यश किंवा अपयश हे शेवटचे नसतात म्हणून यशा – अपयशाने खचून जाऊ नये.
अपयश आल्यास पुढील लढ्या साठी सज्ज रहावे

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कामगार नेते सैय्यद अनवर,मदन डाकूर,सुरेश आस्कर,अलीम शेख, मोसीम शेख,विशाल मादर,नुरुल सिद्दिकी,अनुप भंडारी,रफिक शेख, हे उपस्थित होते.

स्पर्धेचे आयोजक रोहित डाकूर,राकेश डाकूर,सुबोध आवळे,श्रीकर डाकूर,शंकर ठाकरे,राजू वेमुला,ओम साई झाडी,रितीक मून यांनी केले.

भव्य नागरी सत्कार

0

डी एस. पिंगळे
निलंगा तालुका प्रतिनिधी

मागे झालेल्या उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या निवडणूकीत मा.वसंतराव संभाजीराव नागदे साहेब यांचे पॅनल भरघोस मतांनी निवडून आलेले आहे.
त्या निमित्ताने उस्मानाबाद जनता सहकारी बँक शाखा निलंगा यांच्या वतीने नूतन चेरमन मा. वसंतराव संभाजीराव नागदे साहेबांचे व सर्व नूतन संचालकांचा भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी निलंगा नगरीचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडीत धुमाळ, हरिभजन पौळ, उस्मानाबाद जनता सहकारी बँक निलंगा येथील सर्व कर्मचारी वर्ग आणि निलंगा नगरीतील प्रतिष्ठीत नागरिक व व्यापारी उपस्थित होते.

घुग्घुस भाजपातर्फे नाताळ निमित्त ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

शनिवार 25 डिसेंबर रोजी नाताळ निमित्त घुग्घुस भाजपातर्फे ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.
घुग्घुस शहरातील अनेक चर्चला भाजपा पदाधिकाऱ्यांनी भेट दिली व ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या.
ख्रिश्चन धर्मात प्रभू येशू मसिह यांचा जन्मदिवस नाताळ हा उत्साहात साजरा केला जातो.
त्याअनुषंगाने घुग्घुस भाजपा पदाधिकाऱ्यांनी अनेक चर्चला भेट देऊन ख्रिस्ती बांधवासह केक कापून नाताळच्या शुभेच्छा दिल्या.
नाताळ निमित्त घुग्घुस शहरातील चर्च रोषणाईने सजविण्यात आले होते. ख्रिस्ती बांधवांनी चर्च मध्ये एकत्रित येऊन प्रार्थना केली व एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जिप सभापती नितु चौधरी, माजी सरपंच संतोष नुने, भाजपाचे नामदेव डाहुले, विनोद चौधरी, सिनू इसारप, साजन गोहने, नितीन काळे, सिनू कोत्तूर, अनिल मंत्रिवार, उपस्थित होते.