Home Blog Page 362

शेगाव येथून वरवट साठी पोलीस संरक्षणात सोडण्यात आली बस..

0

 

शेगाव: आज मंगळवार सात डिसेंबर रोजी पोलीस संरक्षणामध्ये शेगाव बस स्थानकावरून वरवट साठी बस सोडण्यात आली. दिवाळीनंतर राज्यभरातील राज्य परिवहन महामंडळाच्या चालक वाहकासह कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने राज्यभरातील लाल परीचे चाक थांबलेले होते. राज्य शासनाने राज्य परिवहन महामंडळाला सरकारमध्ये सामील करावे या मागणीसाठी हा बेमुदत संप सुरू असल्याने ग्रामीण भागातील जनतेची मोठ्याप्रमाणात गैरसोय होत आहे आज मंगळवार सात डिसेंबर रोजी शेगाव बस आगाराचे प्रमुख सुभाष दिवटे यांनी शेगाव येथून वरवट साठी बस सोडण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्यांनी शेगाव पोलिस संरक्षण मागितले होते त्यानुसार शेगाव शहर पोलिस विभागाने येण्याच्या वेळेस पोलीस संरक्षण उपलब्ध करून दिले यावेळी बस क्रमांक 59 31 ही बस 29 प्रवाशांना घेऊन वरवट साठी रवाना झाली सर्वप्रथम शेगाव आगार प्रमुख सुभाष भिवटे सर यांनी विधिवत या बसचे पूजन केले या बसवर चालक म्हणून मोहन राऊत तर वाहक म्हणून संदीप ठेले होते. वरवर तिथून सदर बस 47 प्रवाशांना घेऊन आली होती या बसच्या जाण्याच्या वेळेस व येण्याच्या वेळेस सोबत पोलिसांची गाडी सुद्धा संरक्षणासाठी असल्याने कोणतीही आडकाठी न आणता व्यवस्थित रित्या शेगाव प्रवास पार पडला या बसमधून राज्य परिवहन महामंडळाला एकूण सोळाशे 95 रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले अशी माहिती शेगाव बस स्थानकाचे नियंत्रक मुसळे साहेब यांनी दिली.

आर्ट आँफ लिव्हिंगचे निवासी कर्मयोग शिबिराचे आयोजन

0

 

सुनील पवार. नांदुरा. ता.प्र.

लाँकडाऊन प्रदीर्घ कालावधी नंतर पहिल्यादाच नांदुरा शहरामध्ये आर्ट आँफ लिविग निवासी करमयोग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर शिबिर गुरुदेव सेवा आशरम नांदुरा खुर्द येथे दि१२डिसेंबर ते१८डीसेंबर या कालावधी मध्ये होनार असून सदर शिबिरामध्ये युवा नेतृत्व प्रशिक्षण संघटन कौशल्य नेतृत्व संभाषण. करमयोगा. योगा. प्रानायम. ध्यान. सुदरशन .शिकविल्या जातिल सदर शिबिरामध्ये फक्त मर्यादित पन्नास जागा उपलब्ध असून त्वरित रजिस्टेशन करून घ्यावे शिबिरासाठी रजिस्टेशन करने अनिवार्य आहे वेळेवर रजिस्टेशन होनार नाही असे आयोजकाकडुन करण्यात आलेले आहे तरी इच्छुकांनि संपर्क साधावा
9421774567/8857015453

सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सगांमताने नगझरी समस्यांच्या विळख्यात गावकऱ्यांचा आरोप

0

 

शेगाव येथून जवळ असलेल्या श्रीक्षेत्र नागझरी गावात सरपंच ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या संगनमताने विकास कामासाठी आलेल्या निधीचा दुरुपयोग करण्यात येत असून त्यामुळे नागरीक समस्यांच्या विळख्यात सापडलेले दिसत आहे याबाबत मंगळवार दिनांक सात डिसेंबर रोजी शेगाव तहसील कार्यालयात तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासनाच्या निधीतून गावांमध्ये आरो लावण्यात येणार होते मात्र सदर प्लांट लावण्यात आलेले नाही. साशनाकडून मिळालेला निधी गमन करण्यात आला. अशी शंका गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे त्याचप्रमाणे गावांमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे याबाबत त्वरित कारवाई करून शुद्ध पाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करून स्वच्छता उपलब्ध करून देण्याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

पालकमंत्री वड्डेटीवारांच्या नेतृत्वाखाली विविध पक्ष व संघटनेच्या युवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

0

 

(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : राज्यातील बहुजन कल्याण मंत्री व जिल्ह्यातील पालकमंत्री विजय वड्डेटीवार आणि खासदार बाळु धानोरकर यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच शहर काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन मागील काही दिवसांपासून काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची रांगच लागलेली आहे.

नुकताच काही दिवसांपूर्वी खासदार बाळु भाऊ धानोरकर तसेच आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली वेकोली गांधी नगर परिसरातील शेकडो महिला – पुरुष व युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
त्यापूर्वी भाजप – सेना व अन्य पक्षाचे अनेक नेते हे काँग्रेस पक्षात सामील झाले.

06 डिसेंम्बर रोजी ग्रामीण रुग्णालयाच्या भूमीपूजना करिता आलेले पालकमंत्री विजय वड्डेटीवार,ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या हस्ते, शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या माध्यमातून किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, एस सी सेल जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर,काँग्रेस नेते अनिल मोरपाका,स्टीवन गुंडेटी, यांच्या उपस्थितीत अनुप भंडारी समर्थक व विशाल मादर समर्थक यांनी काँग्रेस पक्षाचे दुप्पटे घालून अधिकृत प्रवेश घेतला

प्रवेश घेणाऱ्यात अनुप भंडारी,आकाश चिलका,रफिक शेख,फैय्याज शेख,संजीत यादव,प्रणय कणकुठंला,राकेश कोयचाळे,विनीत इप्पावार,जितू कोमट,राहुल घोगुर्ले,प्रणय तालापेल्ली,अनोक चिलकावार,सरफराज अहमद, आशिष चिलकावार,वंशी सल्लूरी,जतीन संतुरी,बबलू बोल्ली, अखिलेश तगरम,धरम सपडी,तालिब सिद्दिकी,तौसिफ शेख,अफसर शेख,कमर भाई, हौसाफ बेग,अजेश निचकोला,महेश, चेतन लीडर,शालोम शेंगारप,रवी रहिदास,रोशन कलवल,पिंटू शर्मा,साहिल,गौरव,हृदय तांडरा,शुभम कातूलवार,युसूफ शेख,रुपेश पचारे,गौरव तोडासे,इमू खोब्रागडे,प्रेम गंगोनी,अभिशेष सुर्यवंशी,अलमाज शेख,सुमेध डंबारे, बाबू शर्मा,पुरुषोत्तम बोबडे,अतुल पारखी,वामशी शिदोरी,पिंटू शर्मा,बनी रामचंद्र,स्वप्नील खवसे,सागर बोबडे,हनुमान कुबडे,कुंदन पवार,स्वप्नील झाडे,रोहित मिलविले,अमित झाडे,नंदू मासिरकर,सुमेर सिन्हा,सुमित सोनटक्के,हर्षद भोयर,यांच्या सह अन्य युवकांनी प्रवेश घेतला याप्रसंगी मोसीम शेख,रोशन दंतालवार, नुरुल सिद्दिकी, विशाल मादर,इर्शाद कुरेशी,रोहित डाकूर,बालकिशन कुळसंगे,सुमेश रंगारी,थॉमस अर्नाकोंडा,जाफर शेख,सचिन कोंडावार,आरिफ शेख,अंकुश सपाटे,सुनील पाटील, जुबेर शेख,संजय कोवे,खादीम शेख,रंजित राखुंडे,व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

युवा सामाजिक कार्यकर्त अनिल जंजाळे व अमोल भिरूड यांची आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालीकास्तरिय दक्षता समितीच्या अशासकीय सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

0

 

 

यावल, (प्रतिनिधी)विकी वानखेडे

राज्य शासनाच्या नियमानुसार जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यावल नगरपालिकास्तरिय समिती जाहीर केली आहे.

यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालीका स्तरिय दक्षता समितीच्या अशासकीय सदस्यांची पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शिफारशी वरून अशासकीय सदस्यपदी अनिल निळ्कंठ जंजाळे , खरेदी विक्री सहकारी संघाचे संचालक अमोल सुर्यकांत भिरूड, शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश रत्नाकर कवडीवाले, निलेश काशिनाथ बेलदार ,यांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले , कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, शिवसेना तालुका प्रमुख रविन्द्र सोनवणे यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांनी या निवडीचे स्वागत केले आहे .

सुने सोबत येणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची दादागीरी, घटस्फोटा करीता २५ लाखांची मागणी व कोर्टातील केसेसला कंटाळुन मुलाची आत्महत्या

0

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

 

यावल : तालुक्यातील किनगाव येथुन रविवार ३२ वर्षीय विवाहित तरूण बेपत्ता झाला होता व मंगळवारी शेत विहिरीत मृतदेह आढळुन आला. तर या प्रकरणी मयत तरूणाच्या आईने सुन व तिच्या कुटुंबीय आणी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप करीता सतत जळगावातील काही संघटने कडून मुलाला आपच्या कुटुंबास दादागीरीची भाषा केली जात होती व या दबवामुळेचं आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप केला असुन या प्रकरणी चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल असे पोलिस निरिक्षकांनी सांगीतले आहे. तेव्हा कौटुंबीक वादाने त्रस्त अशा झालेल्या तरूणाच्या अशा मृत्यू मुळे गावातुन हळहळ व्यक्त केली जात आहे.
किनगाव ता. यावल येथील तुषार गोपाळ राणे वय ३२ हा रविवारी मध्यरात्री पासुन बेपत्ता होता त्याची पत्नी रत्ना तुषार राणे यांच्यात वाद असल्याने ते विभक्त राहत होते व या कौटुंबीक वादामुळे नैराश्यापोटी तो घरातुन निघुन गेल्याची तक्रार आशाबाई गोपाळ राणे वय ६८ या वृध्द महिलेने केली होती दरम्यान मंगळवारी सकाळी गावालगत असलेल्या जितेंद्र राणे यांच्या शेत विहिरीत तुषार राणे याचा मृतदेह आढळुन आला तेव्हा तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली व मृतदेह यावल ग्रामिण रूग्णालयात आणण्यात आला येथे वैद्यकिय अधिकारी डॉ. बी.बी. बारेला, डॉ. शुभम तिडके यांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला तर या प्रकारणी बाळु गोपाळ राणे यांनी दिलेल्या खबरी वरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.
सुनचे जाच..
गेल्या सहा महिन्यांपासुन सुन व तिचे कुटुंबीय आणी विविध संघटनेच्या पदाधिकारी किनगावात वारंवार येवून दमदाटी करायचे, कोर्टात विविध ठिकाणी केसेस केल्या आहेत घटस्पोट करीता २५ लाखांची मागणी केली होती व पैसे लवकर उपलब्ध करावे म्हणुन नेहेमीच विविध संघटनेच्या तरूणांना सोबत घेवून सुन रत्ना ही मुलास व आम्हास त्रास द्यायची याचं जाचास कंटाळुन त्याने आत्महत्या केली असे मयत यांची आई अशाबाई राणे यांनी आरोप केला.
सीसीटीव्ही पुटेज बघा..
जळगावातील विविध संघटनेच्या तरूणांना सोबत घेवुन किनगावात येवुन घरासमोर अनेक वेळा तिने वाद विवाद केले याचे सीसीटीव्ही पुटेज या भागातील दुकानात मिळतील, अनेक खोट्या केसेस केल्या, आम्ही मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला पण २५ लाख द्या अशी मागणी करीत ती सतत दम द्यायची व मागे आपल्या भाचीला देखील तिने त्रास दिला होता
बाळु राणे, मयत याचा भाऊ.
चौकशी करून निर्णय
या घटनेत आधी हरवल्याची तक्रार व नंतर मृतदेह मिळून आल्याने अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे दोन्ही तक्रारीत कौटुंबीक वादाचे कारण नमुद असुन या प्रकरणी सखोल चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल असे पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांनी सांगीतले आहे.-पुर्ण-फोटो आहे

6 डिसेंबरला रडणे 14 एप्रिल ला नाचणे म्हणजे बाबासाहेबांना मानवंदना नव्हे,विद्या राईकवार

0

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कारंजा घा. जि .वर्धा येथे त्रिरत्न बौद्ध महासंघ , बुद्धिष्ट एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन , डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन समिती व शालवन बहुउद्देशीय संस्था कारंजा च्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन समारोह संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष धम्म मित्र एस. पी. गाडगे , प्रमुख मार्गदर्शक विद्या राईकवार सामाजिक कार्यकर्ता वर्धा तसेच प्रमुख पाहुणे ,कारंजा नागरी संघर्ष समितीचे सदस्य विनोद चापले आणि मोहन राईकवार, राजेंद्र इंगळे , तुलाराम गायकवाड , प्रमिला बोरकर आणि रामदास तायडे हे विचार मंचावर उपस्थित होते .
याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक विद्या राईकवार म्हणाल्या 6 डिसेंबरला रडणे आणि 14 एप्रिल ला नाचणे म्हणजे महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना नव्हे तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गानुसार समाज हितासाठी प्रत्येकाने कार्य केले पाहिजे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी केवळ दुखवटा न करता किंवा जयंतीदिनी जय-जयकार न करता त्यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न केला पाहिजे . हा या महापरिनिर्वाण दिनी संकल्प करणे म्हणजे खरी श्रद्धांजली ठरेल .अशाप्रकारे विद्या राईकवार यांनी श्रद्धांजलीपर उद्गार काढले .तसेच याप्रसंगी संगीता पाटील आणि त्यांचा संच यांनी अभिनय कलेतून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्म मित्र मंदा नागले यांनी केले. प्रास्ताविक डॉ. युवराज तायडे यांनी केले तर विजय कांबळे यांनी उपस्थितांचे ,पाहुण्यांचे तसेच श्रद्धेच्या भावनेतून कार्यक्रमासाठी आर्थिक मदत करणाऱ्या समाज बांधवांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयु.अशोक नागले, राजेश दहीवडे, गौतम गवई ,गजानन बोरकर , रमेश मनवर, नंदा गौरखेडे ,चंद्रशेखर येसनकर , संजय गाडगे ,निष्कर्ष नागले ,पियुष रेवतकर,उमेश पाचपोहर ,राजेंद्र इंगळे यांनी सहकार्य केले.🙏🏼

पिकांचा पंचनामा केला असे खोटे सांगितल्याने शेतकरी नेते गजानन बिलेवार यांनी रिलायन्स विमा कंपनी च्या जिल्हा व्यवस्थापकाला धरले धारेवर..

0

 

शेगाव: पिक विमा काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतामधील पीक नुकसानीचा पंचनामा न करताच पंचनामा केल्याचे खोटेच सांगितल्याचे समजताच शेतकरी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असलेले गजाननराव बिलेवार यांनी तहसील कार्यालय मध्ये झालेल्या बैठकीत आक्रमक भूमिका घेऊन रिलायन्स पिक विमा कंपनीच्या जिल्हा व्यवस्थापकाला दूरध्वनीवरून भर बैठकीतच धारेवर धरले त्यामुळे एकच खळबळ निर्माण झाली होती. शेगाव येथील तहसील कार्यालयात शेगाव तालुक्यातील माटरगाव व मनसगावपरिसरातील 2020 चा पीक विमा काढलेल्या परंतु मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या बाबत तहसीलदार समाधान सोनवणे तालुका कृषी अधिकारी गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये शेगाव तहसील कार्यालयामध्ये आज 6 डिसेंबर रोजी दुपारी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये शेतकरी क्रांती संघटनेचे संस्थापक असलेले गजाननराव बिलेवार यांनी रिलायन्स पिक विमा कंपनीचे बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक शर्मान राबरी यांना विचारणा केली की नुकसानीचा पंचनामा कोणी कधी केला त्याची प्रत का देत नाहीत्याचे नाव सांगा मात्र रिलायन्स पिक विमाकंपनीच्या व्यवस्थापकाने टाळाटाळ केल्यामुळे दिलेल्या खोट्या माहितीमुळे संतप्त होऊन गजानन बिलेवार यांनी विमा कंपनीच्या जिल्हा व्यवस्थापकाला त्याच बैठकीच्या ठिकाणी चांगलेच धारेवर धरले ्यामुळे या बैठकीला उपस्थित असलेले शेतकरी आणि सर्व अधिकार्‍यांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली होती यावेळी तहसीलदार समाधान सोनवणे व तालुका कृषी अधिकारी गायकवाड यांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण निवळले. बैठकीला शेतकरी क्रांती संघटनेचे संस्थापक गजानन बिलेवार, राजू पाटील शेळके, अरुण पाटील उन्हाळे, भारत भाऊ कंकाळ राजू पाटील कराळे नामदेवराव कराळे या शेतकर्‍यासह शेगाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार पवार ,मंडळ अधिकारी राठोड ,तहसील कार्यालयाचे बाबू वानखडे ,यांच्यासह शेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी होते

कृषियोद्धा संघटनेचे ज्ञानेश्वर खरात पाटील यांचे शेतकऱ्यांसह कृषिधन सिड्स जालना या कंपनीवर मुक्कामी ठिय्या आंदोलन

0

 

गेल्या खरीफ हंगामात शेतकऱ्यांनी कृषिधन सिड्स या कंपनीचे बियाणे खरेदी केले.ते बियाणे उगले पण त्याला शेंगा लागल्याचं नाही त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन झालेच नाही.
संबंधित प्रकरणाची शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी लोणार जि.बुलडाणा यांच्याकडे तक्रार केली.तालुका कृषि अधिकाऱ्यांनी या बाबीची तपासणी केली असता त्यामध्ये 74 % पेक्षा जास्त भेसळ आहे असं लेखी निरीक्षण नोंदवले.
हा संबंधित प्रकार लक्षात घेता कृषिधन कंपनीने सर्टीफाईड बियाणे म्हणून हे बियाणे विकले परंतु शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे. की जर ह्यामध्ये 74 % भेसळ आहे तर मग हे बियाणे सर्टीफाईड कसे असेल कारण सर्टीफाईड बियाण्याला आनुवंशिक आणि भौतिक शुद्धता ही 98 ते 99 % पाहिजे.
म्हणून ज्ञानेश्वर खरात पाटील यांनी कृषिधन या कंपनीच लायसन्स कॅन्सल करावे, कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, आणि बीज प्रमाणीकरण एजन्सी मध्ये ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करून बोगस बियाण्याला सर्टीफाईड ची मान्यता दिली त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी.

राज्याची तिजोरीच तुमच्या हातात असतांना रुग्णालयाला निधी का दिला नाही : मा. विजय वड्डेटीवार

0

 

बाबासाहेबांच्या स्मारकास आदरांजली वाहुन भूमिपूजन केले

(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : औद्योगिक शहर असलेल्या घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्राला 2014 साली तीस खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी देण्यात आली होती.

त्या अनुषंगाने आज 06 डिसेंम्बर रोजी ग्रामीण रुग्णालयाच्या नवनिर्माणाधिंन इमारतीचे भूमिपूजन सोहळा रुग्णालय परिसरात सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्यावतीने आयोजित करण्यात आले होते.

ग्रामीण रुग्णालयाचे विधीवत भूमिपूजन पालकमंत्री विजय वड्डेटीवार, आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पार पडला.

पालकमंत्र्यानी आपल्या संबोधनात विरोधी पक्षांना धारेवर धरले रुग्णालयाची आवश्यकता असतांना गावाबाहेर कोट्यवधी रुपयांचे बगीचे बांधले गरज नसतांना बस स्टँड बांधले 2014 ला मंजूर झालेला रुग्णालय 2019 पर्यंत निधी उपलब्ध न करता अडवून ठेवला आणि आता आम्हीच केला आम्हीच केला असा ढोंग करत जनतेला मूर्ख बनवीत आहे.

तर आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या घुग्घुस नगरपरिषद, ग्रामीण रुग्णालय हे पालकमंत्री यांचेच श्रेय असून येणाऱ्या काळात उड्डाणपूल निर्मिती, चार कोटी रुपयांचे विकासकामे, बाबासाहेब स्मारकाचे सौंदर्यकरण, रुग्णालय निवासस्थान, प्रदूषण नियंत्रण सारख्या अनेक विकासाचे कार्य हे विजय भाऊच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे सांगितले.

याप्रसंगी मंचावर जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन बी. राठोड, ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे
काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी,इंटक नेते लक्ष्मण सादलावार, महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. विजया बंडीवार,कामगार नेते सैय्यद अनवर,माजी सरपंच शेषराव ठाकरे,माजी जिप सदस्य जयंता जोगी,युवक नेते सुरज कन्नूर, युवक अध्यक्ष तौफिक शेख,शामराव बोबडे,स्टीवन गुंडेटी,तिरुपती महाकाली,अलीम शेख,मोसीम कुरेशी,कामगार नेते अनिल मोरपाका, शेख शमीउद्दीन,विशाल मादर,नुरुल सिद्दिकी,रोशन दंतालवार,इर्शाद कुरेशी,सुकमार गुंडेटी, थॉमस अर्नाकोडा,देव भंडारी,साहिल सैय्यद,अंकुश सपाटे,सचिन कोंडावार,कपिल गोगला,संजय कोवे,बालकिशन कुळसंगे,सुनील पाटील,आरिफ शेख,अय्यूब कुरेशी,जुबेर शेख,खादीम शेख, सौ.पदमा त्रिवेणी,श्रीमती अमिना बेगम,संध्या मंडल, दुर्गा पाटील,सौ.पुष्पां नाक्षीने,व मोठ्या संख्येने आरोग्य विभाग कर्मचारी, गावातील सन्मानीय नागरिक उपस्थित होते