Home Blog Page 363

यावल तहसिलदार महेश पवार दिव्यांग बांधवांकडून सन्मानीत

0

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

: दिव्यांग दिना निमित्त तालुक्यातील दिव्यांग बांधवांना रेशन कार्ड वितरण करीत त्यांना धान्य उपलब्ध करण्या करीता पुढाकार घेणाऱ्या तहसिलदारांचा सोमवारी दिव्यांग सेने कडून सन्मान करण्यात आला दिव्यांग बांधवांनी तहसिल कार्यालयात येवुन त्यांचा गौरव केला
तालुक्यातील दिव्यांग बांधवांची माहिती काढून त्यांना दिव्यांग दिनी रेशन कार्ड वितरण करीत यावल तहसिलदार महेश पवार यांनी दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा दिला होता तसेच या सर्व दिव्यांग बांधवांना रेशन धान्या देखील उपलब्ध करून देण्या करीता तहसिलदारांनी पुढाकार घेतला व दिव्यांग दिनी सर्व दिव्यांग बांधवांना बोलावून त्यांच्या समस्या व अडचणी जाणुन घेतल्या व त्यां सोडवण्या करीता त्यांनी पुढाकार घेतला तेव्हा सोमवारी तहसिलदार महेश पवार यांनी दिव्यांग बांधवांकरीता घेतलेल्या या परिश्रमा बद्दल त्यांना यावल तालुका दिव्यांग सेनेच्या वतीने सन्मानीत करण्यात आले तहसिल कार्यालयात एका छोटे खानी कार्यक्रमाचे आयोजन करीत यावल तालुका अध्यक्ष योगेश उर्फ मुन्ना चौधरी, दिव्यांग सेना जिल्हा सल्लागार राहुल कोल्हे, तालुका सचिव चेतन तळेले, दिव्यांग सेना फैजपूर शहराध्यक्ष नितीन महाजन,विशाल दांडगे, पराग वारके, दिव्यांग सेना फैजपूर उपाध्यक्ष ललित वाघुळदे, जलाल फारुकी सह आदींनी त्यांना शाल,पुष्प व भेट वस्तु देवुन सन्मानीत केले.-पुर्ण—फोटो आहे

भगवान बाब महाविद्यालयात पुस्तक प्रकाशन व कविसंमेलन थाटात पार पडले.

0

 

 

सतीश मुलंगे सह जगन मोरे

लोणार येथील भगवान बाबा महाविद्यालय येथे दि. १२/१२/२०२१ वार रविवारला प्रा. पुरुषोत्तम चव्हाण लिखित ” हे बंध रेशमाचे ” या चारोळी संग्रहाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते कवी व साहित्यिकांच्या उपस्तितीत उत्साहात संपन्न झाला. या चारोळी संग्रहाचे प्रकाशन मा. श्री वामनराव सांगळे (से.नि.न्यायाधीश) यांच्या हस्ते जेष्ठ साहित्यिक उषाताई फड, श्री प्रा. गजानन खरात (नगरसेवक), डॉ.एस.जी.बडे (प्राचार्य, भ.बा. महाविद्यालय) श्री सा.ना.इंगळे (अध्यक्ष, अंकुर साहित्य संघ शाखा लोणार) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. पहिल्या सत्राचे सुत्रसंचालन श्री. प्रविण इंगळे सर आभारप्रदर्शन दत्ता पवार यांनी केले.

कार्यक्रमाचे दुसरे संत्र म्हणजे कविसंमेलनाला अध्यक्ष म्हणून अॅड. विजयकुमार कस्तुरे, तर प्रमुख अतिथी म्हणून उषाताई फड, पा.मा. गायकवाड, प्राचार्य पंढरीनाथ शेळके, रामदास कोरडे, अभिमन्यू मगर उपस्थित होते.

कविता सादरीकरणामध्ये विद्याताई सरपाते, अशोक भालेराव सर, बांगर साहेब, एजाज खान, रामदास कोरडे,प्रदिप इक्कर, दत्ता खुळे, कातिब लोणारवी, अभिमन्यु मगर, प्रा.सोडनर, राजेश्वर चव्हाण, प्रा. अशोक सारडा, प्रशांत डोंगरदिवे, जगदिश नरवाडे, प्रा. पंढरीनाथ शेळके, सा.ना.इंगळे, रतन डोंगरे, शत्रुघ्न कुसंबे, विजय दळवी, कु. सपना दळवी, दत्ता पवार, विद्याधर चिपडे, रमेश थोरात, कैलास शिवणकर, वैशाली देशमुख मॅडम, तेजनकर सर, पा.मा. गायकवाड, शेख इरफान, ज्ञानेश पंचागे, रमेश थोरात (कविरेश), जगन अवचार, व सोनाली दळवी, आदी कविंनी आपला सहभाग नोंदवला. अॅड. कस्तुरे साहेब यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये साहित्यिक हा समाजाचा आरसा असल्यामुळे बदलत्या समाजाच्या बदलत्या समस्या समाजापुढे मांडण्याचे व त्यांना वाचा फोडण्याचे काम आपल्या लेखानातून व साहित्यातून करावे असा साहित्यिकांना मोलाचा संदेश दिला. या कार्यक्रमाचे आभार श्री रमेश थोरात सर यांनी केले. तर सुत्रसंचालन प्रा.पुरुषोत्तम चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक अंकुर साहित्य संघाचे सचिव श्री विद्याधर चिपडे व पदाधिकारी तसेच भगवान बाबा महाविद्यालयाचे कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले. सदर कार्यक्रम हा जेष्ठ साहित्यिक पाचपावलीकार मा.ज.ह. खरात (भाऊसाहेब) यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

मा, खा, पद्माविभूषण अधरणीय शरदचंद्र जी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रम घुग्घुस येथे मोठे जलोश ने साजरा कारणायत आला

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

दिनांक 12/12/21 रोज गाँधीचौक घुग्घुस येथे अधरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्य गरजु लोकना 170 कम्बल वाटप तसेच श्रम कार्ड 135 बनवन्यत आला ,कोरणा e पास 50 कडून दिले पैन कार्ड 5 बनवन्यत आला कोरणा मुडे मृत्यु पवलेला कुटुंब सदस्य याना पनास हजार महाराष्ट्र सरकार कडून मदत करण्यात आहे त्याची नोद करुण देण्यात आला, या कार्यक्रमा चे अध्यक्ष दीपक भाऊ जैस्वाल नगरसेवक चंद्रपुर मनपाआणि माजी नगराध्यक्ष या कार्यक्रमा चे उद्घाटक मा, नितीन भाऊ भटरकर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस ,मा दीपक भाऊ आणि ,मा नितिन भाऊ यानी पवार साहेब या देशासाठी आणि या राज्या साठी काय केला आणि आपले मनोगत मांडले व प्रस्त्विक घुग्घुस शहर अध्यक्ष श्रीनिवास गोसकुला यानी केला तसेच सुरेश पाटिल बोबडे यानी आपली मनोगत व्यक्त केला आणि या कार्यक्रम यशवी साठी घुग्घुस शहर सचिव रवि दिकोंडा ,रितिक मड़ावी सत्यनारायण डाकरे मनोज सोनुरले ईबदुल सिद्दीकी गोविंद झाड़े विजय वैरागड़े, रतिताई जैस्वाल महिला शहर अध्यक्ष सुशीला ताई डाकरे ,तसेच या कार्यक्रमा सटी उपस्थित इस्लाम अब्बासी भीमराव चंदेकर, रामनरेश काश्यप, सतीश जैस्वाल, बापूजी श्रीसागर रवि भाऊ मड़ावी उपस्थित होते

नामदार विजय वड्डेटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस तर्फे तीन चाकी सायकल, शालेय साहित्य,व शाल वाटप

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : राज्याचे बहुजन कल्याण मंत्री, ओबीसी नेते, पालकमंत्री चंद्रपूर यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस काँग्रेस तर्फे सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

शास्त्री नगर निवासी समीर ताजुद्दीन शेख,अमराई निवासी जयंत बुरांडे दिव्यांग बांधवाना तीन चाकी सायकल वितरित करण्यात आली.

शांती नगर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित करण्यात आले.
थंडीचे दिवस असल्याने गरजवंत माय माऊलींना शाल वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी,किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,एस.सी.सेल जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या तर्फे करण्यात आले.

याप्रसंगी रोशन दंतालवार,विशाल मादर, स्टीवन गुंडेटी,सुकुमार गुंडेटी,अलीम शेख,मोसीम शेख,थॉमस अर्नाकोंडा,रोहित डाकूर,विजय माटला,बालकिशन कुळसंगे,श्रीहरी सेंगारुप,सुनील मादर,अंजय्या कलवल,सिनू गुडला,राजू शेट्टी,प्रेम कालापेलली,अंकुश सपाटे,येशुदास आरमुला,सुनील पाटील,पिंटू शर्मा,अनुग्रह तालापल्ली,रमेश गुंडेटी,रंजित राखुंडे,दीपक पेंदोर,गणेश किनाके,विक्की मादर,चिरु तालापेल्ली,अमन रामिल्ला,प्रदीप आसेकर,योहान येगुराला,भैया भाई,व मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

खामगाव तहसील कार्यालयात लिपिक असलेल्या महिलेच्या घरी घरफोडी.. सोन्या चांदी सह एक लाख 20 हजाराचा मुद्देमाल लंपास…

0

 

शेगाव: खामगाव येथील तहसील कार्यालयात लिपिक असलेल्या महिलेच्या बंद घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने कपाटातील नगदी 25000 सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना येथील देवकी नगर परिसरात आज 12 रोजी उघडकीस आली. याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील देवकी नगर परिसरात राहणारे संदीप साहेबराव बोर्डे हे त्यांच्या खामगाव तहसील मध्ये लिपिक असलेल्या पत्नीला दाताचा त्रास होत असल्याने अकोला येथील डॉक्टरकडे 11 डिसेंबर रोजी घेऊन गेले होते. त्या ठिकाणी उशीर झाल्यामुळे त्यांनी रात्री अकोला येथे राहणारे त्यांच्या आई-वडिलांकडे त्यांनी पत्नीसह मुक्काम केला. आज 12 डिसेंबर रोजी सकाळी अकोला येथून घरी शेगावला परत आल्यावर त्यांना त्यांच्या घरात तील मागील बाजूचा दरवाजाचा कडी कोंडा तुटलेला दिसला. त्यांनी आज घरात शिरून पाहिले असता त्यांच्या कपाटात चे दार उघडे होते व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले त्यांनी निरीक्षण केले असता कपाटात ठेवलेले सोन्या-चे दागिने व नगदी पंचवीस हजार असा एकूण एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले त्यामुळे त्यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला येऊन वरील प्रमाणे तक्रार दाखल केली या तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 454 457 380 भादवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. शेगाव शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून चोरीच्या घटना वाढलेल्या दिसत आहेत एकाही चोरी प्रकरणातील आरोपीला अद्याप अटक करण्यात न आल्याने शेगाव शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेगाव शहरातून सायकल व दुचाकी चोरीचे ही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे पोलीस विभागाने या बाबीची दखल घेऊन शहरांमध्ये होत असलेल्या चोरीच्या घटने वापरीत पायबंद घालण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी शहरवासीय कडून करण्यात येत आहे

शिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांनी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी दिला पक्षाला दिला जोरदार धक्का

0

 

डी. एस. पिंगळे
निलंगा तालुका प्रतिनिधी

आदरणीय संभाजी भैय्यांच्या या विकासाने प्रेरित होऊन अरविंदभैय्यांच्या नेतृत्वाखालील जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी
शिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांनी ‘असंख्य’ कार्यकर्त्यांनी पक्षाला जोरदार धक्का देत शिवसेना व युवासेना च्या श्री.आकाश मसाने, श्री. प्रदीप सूर्यवंशी, श्री. राम उतळे, श्री. सुनील बावगे, श्री. मल्लिकार्जुन टोण्णे, श्री.गणेश वंजारे, श्री. प्रेम घोलप, श्री. मुकेश सातपुते, श्री. आदी मेंढले, श्री. योगेश चामे, श्री. राहूल कांकुले, श्री. बाळू सूर्यवंशी, श्री. राजू बावगे, श्री अक्षय बावगे इत्यादी
कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

वेकोलि वणी परिसरातील घुग्घुस खदान संकुलात बांधण्यात आलेल्या नवीन बायपास रोडवर अपघात

0

 

ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिल्याने दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी

(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

झाल्याची घटना घडली, जखमीला उपचारासाठी चंद्रपूर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
एमएच 34-5080 या ट्रॅक्टरला 18 चाकी ट्रक क्रमांक एमएच 34 एबी 9362 ने जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रॅक्टर चालक मनोज, हेल्पर रूपेश बारसागडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य एक गंभीर जखमी आहे. जखमीला उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे. घटनेची माहीती मिळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठले. पुढील तपास घुग्घूस पोलीस करीत आहेत.

घटनास्थळी कॉंग्रेस नेते राजूरेड्डी, रोशन पचारे, पवन आगदारी, सैय्यद अनवर व भाजप नेते विवेक बोढे घटनास्थळी दाखल झाले.

चितोडा गावाजवळ मोटर सायकलला मालवाहू ॲपे रिक्षाची धडक .

0

 

यावल(प्रतिनिधी)विकीवानखेडे

यावल येथील सहाय्यक तलाठी आपले दैनंदिन कामकाज आटोपून फैजपूरकडे जात असताना चितोडा गावाजवळ त्यांच्या मोटर सायकलला मालवाहू ॲपे रिक्षाची धडस झाली. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत यावल ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक औषधोपचार करून गोदावरी हॉस्पिटल येथे औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची शनिवार दि. ११ डिसेंबर रोजी अखेर प्राणज्योत मालवली.

 

यावल शहराचे सहाय्यक तलाठी राजेंद्र शांताराम झांबरे हे फैजपूरहुन यावल येथे तलाठी कार्यालयामध्ये ये जा करतात. संध्याकाळी दिवसभराचे कामकाज आटोपून घरी परतीच्या प्रवासावर असताना चितोडा गावाजवळ त्यांची मोटरसायकलला ( क्र. एमएच १९-६२१७) समोरून येणारी मालवाहू ॲपे रिक्षा (क्र. एमएच १९ -२५७७) ची समोरासमोर जोरदार धडक बसली. या भिषण अपघातात राजेंद्र झांबरे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होवुन ते गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्यांचे सहकारी तलाठी यांच्या सहकार्याने तात्काळ गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. राजेन्द्र भारंबे यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना ऑक्सीजनवर ठेवण्यात आले होते. मोठया प्रमाणावर सक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले होते, या भिषण अपघातात त्यांच्या गाडीचा पुर्णपणे चुराडा झाला. ॲपे रिक्षा ही पुढच्या साईडला चांगलीच ठोकली गेली. या भिषण अपघातात गंभीर जखमी असलेले तलाठी राजेंद्र शांताराम झांबरे (रा. लक्ष्मीनगर फैजपुर) यांच्यावर गोदावरी हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयामध्ये औषधोपचार सुरू असताना अखेर शनिवार दि. ११ डिसेंबर रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर फैजपूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले. याप्रसंगी महसूल खात्याचे सर्व तलाठी, मंडळ अधिकारी व कर्मचारी अंत्ययात्रेच्या वेळी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

सावखेडासिम येथे पशुवैद्यकीय विभाग व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पशुरोग लसीकरण शिबिर आज उत्साहात संपन्न झाला.

0

 

यावल, प्रतिनिधी विकी वानखेडे

 


तालुक्यातील सावखेडासिम येथे आज पंचायत समितीच्या सभापती पल्लवी पुरुजीत चौधरी , पंचायत समितीचे उपसभापती योगेश दिलीप भंगाळे ,पंचायत समितीचे कॉंग्रेस गटनेते व संजय गांधी निराधार समितीचे तालुका अध्यक्ष शेखर सोपान पाटील , जिल्हा परिषदच्या सदस्या सविता अतुल भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सावखेडा सिमच्या सरपंच बेबीताई विकास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती यावल व प . वै . श्रे१ दहिगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पशुरोग लसीकरण व सर्व चिकीत्सा शिबीर आयोजीत करण्यात आले होते . सदरच्या शिबीरात गुराढोरांना लसीकरण , जंत निर्मुलन, गोचिड निर्मुलन, खच्चीकरण , गर्भतपासणी, वंध्यत्व तपासणी व इतर उपचार आणि तपासणी करण्यात आली . शिबीरात डॉ. एस एन बढे , डॉ प्रविण कोळंबे , डॉ .आर सी भगुरे, डॉ. सि. एन. पाटील , वाय. जी. नेवे, डी. एस. निकम, नंददीप पाटील , मेहरबान तडवी आदी उपस्थित होते. शिबिर यशस्वेसाठी विकास पाटील , विनोद पाटील , मिलींद भोगे व सावखेडासिम ग्रामपंचायत उपसरपंच व सर्वसन्मानिय सदस्य आदींनी परिश्रम घेतले .

मोबाइल चे चाइनीज खेळा पासुन दूर राहने करता विरावली गावतिल श्रीराम ग्रुप मार्फत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

मोबाईल चे चाईनीज खेळा पासून दूर राहने करता विरावली गावतिल श्री राम ग्रुप मार्फत क्रिकेट स्पर्धाचे आयोजन दिनांक 10/12/2021 पासुन म्हणजेच आज पासून विरावली येथे आयोजन केले आहे यात परिसरातिल यावल दहिगांव, सौखेदा, कोरपावली व गावातील टीम शामिल झाले आहेत व आयोजक यानी आवाहन केले आहे की आनखी हि ज्या टिम शामिल होऊ इच्छुक आहेत त्यान्नी सहभाग घ्यावा ही स्पर्धा 01 आठवडा चालानार आहे असे आवाहन आयोजक यान्नी कड़वले आहे। या स्पर्धा चे उटघाटन सैनिक सुरेश धनगर (सीआरपीएफ जवान) सैनिक महेंद्र पाटील (ग्वालियर हुन ऑनलाइन), पत्रकार शेखर पटेल, डेनिम चे संचालक स्वप्निल बोरसे, कार्तिक कलेक्शन चे संचालक नीलेश पाटिल, कोळवदकर व साई ज्वेलर्स चे संचालक प्रशांत रणधीरेे यांच्या हस्ते उद्या १०/१२/२१२१ ला सकाळी 10.30 मिं. विरावालि ला होनार आहे तरी सारे क्रिकेट प्रेमिनी खेळाळु ना प्रोत्साहन देने करता हजर रहावे
आपल्या आपल्या गावातिल टीम जरूर पाठवा आणि ज्या गरीब मुला कड़े इंट्री फी नसेल त्यानी कॉल करा टेंशन घेऊ नका फक्त मैदानी खेळ चे आयोजन झाले पाहिजे व (तसे मैदान खूप कमिच आहेत आजचा युगांत) आजचे युवकांचा मोबाईल गेम पासुन सुटकारा झाला पाहिजे हेच श्री रामराज्य ग्रुप व आम्हा यावल तालुका सैनिकांचे उद्दिष्ठ आहे चला लवकर आजच सहभाग नोंदवा