Home Blog Page 364

नायगाव येथील लाभार्थ्यांना तलाठी व ग्रामसेवक यांच्याकडून संजय गांधी योजनेसाठी बनावट सह्या व शिक्का मारून पैसे घेण्यात आल्याचे गंभीर प्रकार उघडकीला आले आहे. याप्रकरणी तहसीलदारांनी लाभार्थ्यांना नोटीसा बजावल्या आहेत.

0

 

यावल, (प्रतिनिधी )विकी वानखेडे

 

याबाबत वृत्त असे की, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत श्रावण बाळ योजनेच्या लाभ घेण्यासाठी तालुक्यातील नायगाव येथील बत्तीस लाभार्थ्यांची प्रकरणे तहसील कार्यालयामध्ये दप्तरी सादर करण्यात आले. ही प्रकरणे तपासणी व पडताळणीसाठी नायगावच्या तलाठीकडे पाठविले असता सदर प्रकरणांवरील सह्या व शिक्के बनावट असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान ही प्रकरणे बनावट असल्याचे निदर्शनास आल्याने तहसीलदार महेश पवार यांनी सदर बाब गांभीर्याने घेत संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान सदर प्रकरणे कोणत्या ई-सेवा केंद्रामार्फत तयार करण्यात आली, बनावट शिक्के व सह्या कोणी मारल्या यासह , तालुक्यातील अन्य कोणत्या गावातील अशी बनावट प्रकरणे कार्यालयात सादर झाली आहे. याबाबतही चौकशी व्हावी अशी मागणी ठिकठिकाणाहून करण्यात येत आहे.

घाटाखालील पाचशे कार्यकर्त्यांचा ‘प्रहार’मध्ये प्रवेश जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांच्या नेतृत्वात कार्यक्रम

0

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक)

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांच्या नेतृत्वात संग्रामपूर, जळगाव जामोद व शेगाव या तीन तालुक्यांतील पाचशे कार्यकत्यांनी ‘प्रहार’मध्ये प्रवेश घेतला. पक्षाचे राज्य सचिव गणेश पुरोहित, सहसचिव रविंद्र सुर्यवंशी, ज्येष्ठ नेते गजानन लोखंडकार, सुरज खारोडे, उपजिल्हाप्रमुख अजय टप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
‘प्रहार’चे संस्थापक अध्यक्ष तथा राज्य मंत्री ना. बच्चू कडू यांनी पक्षसंघटन वाढविण्यासह ग्रामीण भागात पक्षाच्या शाखा स्थापन करण्याचे आदेश दिले आहे. त्याच अनुषंगाने बुलडाणा जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांनी २ डिसेंबर रोजी घाटाखालील शेगाव, संग्रामपूर व जळगाव जामोद या तीन तालुक्यांचा दौरा केला. या तीन तालुक्यांत सोनाळा, टुनकी, वरवट बकाल, संग्रामपूर, जळगाव जामोद, जानोरी यासह विविध ठिकाणी बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांचा समन्वय साधण्यासह ‘प्रहार’मध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पक्षाचे ध्येय धोरणे आणि विचार तळागळापर्यंत पोहचून ना. बच्चू कडू यांनी जनसेवेचा दिलेले व्रत ‘प्रहार’च्या माध्यमातून प्रामाणिकपणे पुढे नेण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा, असे आवाहन यावेळी बोलताना वैभवराजे मोहिते यांनी केले. दिव्यांग बांधव, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले तसेच निराधार, निराश्रीत, गरजुंच्या मदतीसाठी सर्वात आधी धाऊन येणारी संघटना आणि पक्ष म्हणून ‘प्रहार’कडे पाहिले जाते आणि हीच खरी आपली ओळख आहे. ही ओळख यापुढेही कायम ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी राजकारणाला दुय्यमस्थान देऊन जनसेवेला महत्व द्यावे, अशी शिकवण ना. बच्चू कडुंची आहे आणि हाच विचार घेऊन प्रहारचा प्रत्येक कार्यकर्ता कार्यरत असल्याचेही यावेळी वैभवराजे माहिते यांनी सांगितले. या तीनही तालुक्यातील सुमारे पाचशे कार्यकर्त्यांनी वैभवराजे माहिते यांच्या नेतृत्वात ‘प्रहार’मध्ये प्रवेश घेतला. यावेळी संग्रामपूर मित्र परिवाराचे शंकर पुरोहित, बाळू वहितकार, मो. तोसीब जमदार, अर्जून सोळंके, पंकज पाटकर, अक्षय देशमुख, दीपक बोयाखे, गजानन शिरोडकर, विकास बागतकर, प्रशांत येले, गणेश इंगळे, सुभाष डोमाळे, राहुल तायडे, आकाश वानखडे, आनंद काटे, पंजाब घाटपवार, सुमित तायडे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी ‘प्रहार’मध्ये प्रवेश घेतला.

नगर पंचायत निवडणुकीसाठी गजानन लोखंडकार ‘प्रहार’चे निरीक्षक

0

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक)
……………………………..
संग्रामपूर व मोताळा नगर पंचायतीच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने ‘प्रहार’ जनशक्ती पक्षात गेल्या १५ वर्षांपासून सक्रीयपणे कार्यरत असलेले गजानन लोखंडकार यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ना. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात ‘प्रहार’ गेल्या २० वषांपासून जनसेवेत कार्यरत आहे. दिव्यांग, विधवा, निराधार, गरजुंना न्याय मिळवून देण्याचे काम ‘प्रहार’ करीत आहे. दरम्यान समाजकारणासोबतच राजकारणात देखील ‘प्रहार’ आता सक्रीय झाली असून संग्रामपूर व मोताळा नगर पंचायतीच्या निवडुकीत प्रहार जनशक्ती पक्षही मोठ्या ताकदीने उतरला आहे. त्याच अनुषंगाने २ डिसेंबर रोजी पक्षाचे राज्य सचिव गणेश पुरोहीत, सहसचिव रविंद्र सुर्यवंशी, जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते, उपजिल्हाप्रमुख अजय टप यांच्या प्रमुख उपस्थितीत संग्रामपूर येथे पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत गजानन लोखंडकार यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रहारचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांनी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ना. बच्चू कडू, कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ यांच्या आदेशान्वये सदरची नियुक्ती केली आहे.

९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार प्रकरणी , त्या कुत्र्याला का केली अटक..

0

 

अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक)

SURYA MARATHI NEWS

अमेरिकेत त्या एका महिलेने आपलेच घरातील पाळीव कुत्र्यावर तिच्या नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. व त्यामुळे पोलीस आणि पशुवैद्यकीय विभागाने या चक्क त्या कुत्र्याला ‘अटक’ केली. व पुढील तपास पथकाला महिलेची थिअरी पटली नसली तरी आता मुलीच्या डीएनए नमुन्यावरून बलात्कार प्रकरणाची उकल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही महिला आपल्या दुसऱ्या पतीला वाचवण्यासाठी हा बनाव रचत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

महिलेने कुत्र्यावर आरोप केला

‘द सन यूके’च्या वृत्तानुसार, मेक्सिकोतील एका महिलेने तिच्या नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर कुटुंबातील पाळीव कुत्र्याला दोषी ठरवले आणि त्याला तपास पथकाच्या ताब्यात दिले. चौकशीदरम्यान, महिलेने वारंवार कुत्र्याला दोष दिला आणि दावा केला की, त्यावेळी अल्पवयीन मुलीसोबत कुत्रा एकटाच होता.

तपास पथकाने पाळीव कुत्र्याला ताब्यात घेतले तर मुलीवर डॉक्टरांनी उपचार केले. परंतु अधिकाऱ्यांना महिलेच्या बतावणीवर संशय आला आणि त्यांनी मुलीच्या सावत्र वडिलांना अटक केली. त्याची चौकशी सुरू आहे. आपल्या दुसऱ्या पतीला वाचवण्यासाठी महिलेने ही बतावणी केल्याचं पोलिसांचे मत आहे. या प्रकरणाला कोण जबाबदार आहे हे ठरवण्यासाठी सध्या मुलीच्या डीएनए नमुन्याचे विश्लेषण करण्यात येत आहे.त्याचबरोबर महिलेचीही चौकशी सुरू आहे. व तिची मानसिक स्थितीही तपासली जात आहे. व या प्रकारणाच सध्या डीएनए रिपोर्ट आल्यानंतरच प्रकरण समोर येईल व पुढील तपास सुरु आहे. surya marathi news

बनावट कागदपत्र तयार करून मनुदेवी संस्थानची फसवणूक; बाबा महाहंस महाराज यांच्यावर गुन्हा

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील सातपुडा निवासीनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानच्या जागा नसल्याचे भासवून बनावट कागदपत्र तयार करून नवीन ट्रस्टच्या नावाने जागा हडप करून संस्थानची फसवणूक करणाऱ्या बाबा महाहंस महाराज याला शुक्रवार ३ डिसेंबर रोजी सायंकाळी अटक केली असून यावल पोलीसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातपुडा निवासीनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम राजाराम पाटील (वय-६२) रा. आडगाव ता. यावल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, प्रकाश मार्तंड पाटील उर्फ श्री बाबा महाहंस जी महाराज रा. आडगाव ता. यावल यांनी सातपुडा निवासीनी श्री. मुनदेवी मंदीर सेवा प्रतिष्ठान ही जागा वनविभागा कक्ष नं. १४९ गट नं. ३५३ मध्ये ०.२४ आर ही जागा ही वनविभागात येते. परंतू बाबा महाहंस यांना जागा वनविभागाची असल्याचे माहिती असतांना बनावट दस्तऐवज तयार केले आणि ही जागा मंदीराची नसल्याचे दाखवून त्या ठिकाणी नवीन मुनदेवी चॅरिटेबल स्ट्रस्ट या नावाने नव्याने संस्था स्थापन करून फसवणूक केली. यासंदर्भात यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रार आणि न्यायालयाच्या आदेशान्वये संशयित आरोपी बाबा महाहंस महाराज यांच्यावर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात संशयित आरोपी बाबा महाहंस महाराज यांना अटक केली आहे.

मनूदेवी संस्थानचे सचिव निळकंठ डिगंबर चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वनविभागाच्या मालकीची जागा १९९१ पासून ही सातपुडा निवासीनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानच्या मंदीराच्या विकासासाठी ही ०.२४ आर जागा वनविभागाने दिली होती. याबाबत सर्व पुरावे व नोंदणी संदर्भात कागदपत्रे संस्थाकडे आहे. असे असतांना संशयित आरोपी बाबा महाहंस महाराज यांनी बनावट कागदपत्रे तयार करून नवीन मुनदेवी चॅरिटेबल स्ट्रस्ट नावाने संस्था स्थापन करून मनुदेवी संस्थानची फसवणूक केली असल्याचे सांगितले.

कंत्राटी वीज कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

शेतकऱ्याच्या कृषिपंपाचे विजकनेक्शन जोडताना महावितरणच्या जामोद उपकेंद्रातील कंत्राटी वायरमन तरुणाला विजेचा शॉक लागला. त्‍याची प्रकृती गंभीर बनली. उपचाराला नेतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला. आज, ३ डिसेंबरला दुपारी तीनच्या सुमारास जळगाव जामोद तालुक्यातील शिवापूर शिवारात ही घटना घडली. विलास रामकृष्ण बोडखे (३२, रा. जामोद) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

विलास बोडखे हा महावितरणच्या जळगाव जामोद उपकेंद्रात आऊटसोर्सिंग कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होता. आज शिवापूर शिवारात कृषी पंपांचे कनेक्शन जोडत असताना अचानक गावठाणामधील विद्युत पुरवठा सुरू झाल्याने तो कोसळला. गंभीर जखमी झाल्याने त्याला जामोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथून पुढील उपचारासाठी हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका असूनही चालक उपस्थित नसल्याने खासगी वाहनाने जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दीड महिन्यापूर्वीच विलासच्या वडिलांचे अपघाती निधन झाले होते, तर त्याची आईसुद्धा त्या अपघातात गंभीर जखमी झाली होती. सर्वांशी मनमिळावू व शांत स्वभाव असलेला विलास रात्री बेरात्री शेतातील वीजपुरवठा खंडित झाल्यास सुरळीत करून देत होता. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जागतीक अपंग दिनानिमित्ताने तालुक्यातील अपंग कुटुंब प्रमुखांना पुरवठा विभागाच्या माध्यमातुन अंत्योदय शिधापत्रीकांचे वाटप तहसीलदार महेश पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

यावल येथे आयोजीत तहसीलदार यांच्या कार्यालयात आज दुपारी जागतीक अपंग दिनानिमित्त तालुक्यातील गोपाळ खाचणे, सुभाष सोनवणे, पंडीत पाटील, शंकर खाचणे, जिजाबाई सोनवणे, मिनाबाई बऱ्हाटे, जितेन्द्र कपले, मनिषा खाचणे, पोपट चौधरी, सोमेश सोनवणे, दत्तात्रय चौधरी, सतिष सोनवणे, गणेश भारंबे, कल्पना चौधरी, सुहासनी चौधरी, हसन तडवी, फारूकी नसीरोद्दीन, संजय वानखेडे, प्रभाकर सोनार, ललीत वाघुळदे अशा एकुण ३२ अपंग बांधव व भगीनींना शासनाच्या अंत्योदय योजने अंतर्गत धान्य मिळावे, या करीता यावलचे तहसीलदार महेश पवार यांच्या प्रयत्नातुन शिधापत्रीका वाटप करण्यात आली असुन या योजनेअंतर्गत प्रत्येक शिधापत्रीका धारक लाभार्थ्यांस ३५ किलो धान्य मिळणार आहे.

या प्रसंगी यावल तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे अव्वल कारकुन राजेश भंगाळे यांच्यासह आदी कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

घुग्घुस येथील ग्रामीण रुग्णालयाचे काम तात्काळ सुरु करा

0

 

सोमवार पर्यंत बांधकाम सुरु न केल्यास उपोषण – विवेक बोढे यांचा इशारा

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस सारख्या औद्योगिक शहरात ग्रामीण रुग्णालय व्हावे याकरिता मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थ व नियोजन मंत्री, महाराष्ट्र शासन तथा तत्कालीन पालकमंत्री असतांना घुग्घुस येथे ग्रामीण रुग्णालयास मंजुरी देण्यात आली. घुग्घुस येथील ग्रामीण रुग्णालयाकरिता आवश्यक निधी अर्थसंकल्पात मंजुर करण्यात आला होता. नंतर सत्ता परिवर्तन झाले व महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले नंतर कोरोनाचे कारण देत सरकारने घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाची निविदा काढण्यास नकार दिला आता निविदा झाली आहे.
दिनांक 11/11/2021 ला नवीन मंजूर ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरु करण्यात आले. परंतु हे सुरु झालेले काम भूमिपूजन करण्यासाठी बंद करण्यात आले. मागील 23 दिवसांपासून रुग्णालयाचे बांधकाम बंद आहे.

घुग्घुस हे औद्योगिक शहर असल्याने लोकसंख्या 40 ते 50 हजाराच्या जवळपास आहे. कोविडचे संक्रमण सुरू आहे. या काळात आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. शासन यंत्रणा वाढवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. ग्रामीण रुग्णालायचा विषय घुग्घुस वासियांच्या स्वास्थ व आरोग्याशी संबंधित निगडित आहे. घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाचे सुरु झालेले काम राजकीय हेतूने बंद करणे हे घुग्घुस वासियांच्या जीवाशी खेळणे आहे. असे कृत्य सामान्य नागरिक खपवून घेणार नाही. नवीन मंजूर झालेल्या घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाचे काम सोमवार दिनांक 6/12/2021 पर्यंत सुरु न केल्यास भाजपातर्फे उपोषण करण्यात येईल असा इशारा *भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार* भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना निवेदनातून दिला आहे.
निवेदन देतांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी सरपंच संतोष नुने, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, साजन गोहने भाजपाचे अनंता बहादे उपस्थित होते.

खंडोबा उत्सवाच्या निमित्ताने आनंद नगर दापका येथील खंडोबा मंदिरास माजी खाजदार मा. डॉ.श्री सुनीलजी गायकवाड यांची भेट

0

 

डी.एस. पिंगळे
निलंगा तालुका प्रतिनिधी

प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आनंद नगर दापका येथील खंडोबा मंदीराच्या ठिकाणी उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो
तसेच या वर्षी खंडोबा उत्सवाच्या निमित्ताने आनंद नगर दापका येथील खंडोबा मंदिरास माजी खाजदार मा. डॉ.श्री सुनीलजी गायकवाड यांनी उत्सवास भेट दिल्यामुळे आनंद नगर दापका येथील नागरिकांनी प्रतिवर्षी पेक्षा जास्त आनंदात उत्सव साजरा केले.
यावेळी माजी खाजदार मा. डॉ.श्री सुनीलजी गायकवाड, अमोल आर्य, अजित माने, शिवसेना महिला तालुका प्रमुख सॊ. रेखा पुजारी आणि सर्व भाविक भक्त इत्यादी उपस्थित होते.

पत्नीने मुलांच्या साथीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

0

 

SURYA MARATHI NEWS

अनिलसिंग चव्हाण( मुख्य संपादक)

हिंगोली : धक्कादायक आहे ही घटना पत्नीने स्वतःचा मुलांच्या साथीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर वडिलांचा मृतदेह मुलांनी शेतात नेऊन जाळून टाकला. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात हा नात्यांची लक्तरं मांडणारा प्रकार घडला आहे.हत्येनंतर पळून जाण्याच्या तयारीत असताना तिन्ही आरोपींना पोलिसांनी काही तासांच्या आतच जेरबंद केलं.

काय आहे प्रकरण?

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ येथे पत्नी आणि मुलांनी पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. पुरावा नष्ट करण्यासाठी पत्नी आणि दोन मुलांनी खून केल्यानंतर मृतदेह शेतात नेऊन जाळून टाकला. अवधूत मुधोळ असं मयत व्यक्तीचं नाव आहे.
शेतीच्या कारणावरुन घरगुती वाद
अवधूत मुधोळ आणि त्यांची दोन मुले-पत्नी यांच्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून शेतीच्या कारणावरुन घरगुती वाद सुरु होता. हा वाद इतका विकोपाला गेला, की पत्नी आणि मुलांनी पतीचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतात जाळून टाकला. शेतात मृतदेह जाळला
सकाळी शेतात जाताना ही बाब गावातील काही नागरिकांना लक्षात आली.
त्यानंतर या घटनेची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर खुनाचा उडगला झाला. या प्रकरण मधेल तिन्ही आरोपी पळून जाण्याचा तयारीत असताना पोलिसांनी त्यांना काही तासांच्या आत ताबड़तोब ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे
Surya marathi news