Home Blog Page 37

Relvenews / हिंगणघाट येथे भारतीय रेल्वेचा १७१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Relvenews:हिंगणघाट :- भारतीय रेल्वेच्या गौरवशाली इतिहासाला १७१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वर्धा-बल्लारशाह यात्री संघाचे वतीने हिंगणघाट रेल्वे स्थानकावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

त्यांनी भारतीय रेल्वेच्या समृद्ध परंपरेला उजाळा देत भविष्यातील प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागपूर विभागाचे विभागीय वाणिज्य निरीक्षक मंगेश तितीरमारे होते तर प्रमुख अतिथी म्हणून हिंगणघाट रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर बसंतकुमार बल, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. किरण वैद्य, नारायण सेवा मित्र परिवाराचे महेश अग्रवाल, आर.पी.एफ. ठाणेदार हरीवंशसिंग,

RevenueNews /अवैध रेती माफिया विरोधात पुरावे! अधिकारी कार्यवाही करणार का ?

विनोद पोतदार, युनुस भाई आणि वर्धा-बल्लारशाह यात्री संघाचे संघटक राजेश अ. कोचर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार रेल्वे लाईन ची पूजा करून झाली. रेल्वे ची लाइन ही केवळ लोखंडाचे रूळ नसून ती भारतीय रेल्वेच्या कार्याचा आणि कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आधारस्तंभ आहे, ही भावना या पूजेतून व्यक्त करण्यात आली.

यानंतर वर्धा-बल्लारशाह यात्री संघाच्या सदस्यांनी प्रमुख पाहुण्यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन यथोचित स्वागत केले. याप्रसंगी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले आणि रेल्वे सुविधा तसेच गाड्यांच्या थांब्यांसंबंधी महत्त्वपूर्ण माहिती दिली.
प्रास्ताविक अध्यक्ष दिलीप बालपांडे यांनी तर संचालन बाबुसिंग गहेरवार यांनी केले.

Relvenews:उपस्थितांचे आभार डी.के. गुरुनुले यांनी मानले. या कार्यक्रमाला लिलाधर मडावी, रवी जुमडे, राष्ट्रपाल कांबळे, चंद्रशेखर खापरे, सचिन वाघे अब्दुल कदिर बख्श, वर्धा-बल्लारशाह यात्री संघाचे सदस्य आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RevenueNews /अवैध रेती माफिया विरोधात पुरावे! अधिकारी कार्यवाही करणार का ?

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

RevenueNews:वर्धा :- नावेद पठाण यांनी आज दिनांक 16 अप्रेल रोजी संदीप पूंडेकर तहसीलदार तथा तालुका दंडधिकारी यांना निवेदनातुन कळविले की वर्धा लगत असेलेल्या सालोड हीरापुर परिषरात अवैध रेती उतखनन मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

सध्या संपूर्ण महारास्ट्रा मधे रेती घाट चे लीलाव झालेले नाही आहे. ज्या कारणाने सालोड हीरापुर लगत असलेले पड़ेगाव सेलसूरा शिवार मधे असेलेलीं नदी पात्रातून अवैध रेती उपसा सुरु आहे.

sambhaji raje chhatrapati/ शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रश्नावर संभाजीराजे छत्रपती आक्रमक महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची राज्यव्यापी आंदोलनाची तयारी

RevenueNews /अवैध रेती माफिया विरोधात पुरावे! अधिकारी कार्यवाही करणार का ?

सालोड गांवाच्या आजु बाजू ला जे नदी नाले गेलेले आहे त्या नदी नाल्या मधून सुद्धा रात्रि मोठया प्रमानात रेती उतखनन सुरु आहे.

Zapuk Zupuk trailer/ लवकरच येणार ‘झापुक झुपूक’ सूरज चव्हाणच्या प्रेम, अॅक्शन आणि ड्रामाच्या रंगात रंगवणा

 

RevenueNews:येत्या 7 दिवसा च्या आता वाळू ( रेती ) तस्करी करनाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी कार्यवाही न झाल्यास आम्ही जिल्हाधिकारी म्याडम वान्मथी सी. व पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या कड़े तक्रार करणार.असा इशाराच नावेद पठाण यांनी तहसीलदार यांना दिलेला आहे.

sambhaji raje chhatrapati/ शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रश्नावर संभाजीराजे छत्रपती आक्रमक महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची राज्यव्यापी आंदोलनाची तयारी

0

 

sambhaji raje chhatrapati:पुणे : कर्जमाफी मुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. सरकारने निवडणुकीच्या पुर्वी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते परंतु सत्तेत आल्यानंतर सरकारला कर्जमाफी चा विसर पडला आहे. कर्जमाफी च्या प्रश्नावर संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, याबाबत पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ऑनलाईन बैठक बुधवार, दि.१६ एप्रिल २०२५ रोजी पार पडली.

राज्यातील चारशे पेक्षा अधिक प्रमुख पदाधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे मते ऐकुन घेत संपूर्ण राज्यातील परिस्थिती जाणून घेतली.

Zapuk Zupuk trailer/ लवकरच येणार ‘झापुक झुपूक’ सूरज चव्हाणच्या प्रेम, अॅक्शन आणि ड्रामाच्या रंगात रंगवणा

विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आता सत्तेवर असलेल्या सरकारने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन शेतकऱ्यांना मारक ठरले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे, याला पुर्णपणे सरकारच जबाबदार आहे. कर्जमाफीचा प्रश्न सरकारने गांभीर्याने सोडवला नाही तर स्वराज्य पक्ष राज्यात मोठे आंदोलन उभे करणार असल्याचे बैठकीत जाहीर करण्यात आले.

स्वराज्य पक्षाच्या वतीने करण्यात येणारे आंदोलन सरकारच्या आटोक्याच्या बाहेर असल्याचा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी बैठकीत बोलतांना दिला.

कर्जमाफी प्रश्नासोबतच पिक विमा, अवकाळी पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले त्याची भरपाई, रासायनिक खते, किटकनाशके व बी बियाण्याचे वाढलेले भाव या करीता आंदोलनाची दिशा जाहिर करणार असल्याचे सुतोवाच यावेळी देण्यात आले.

महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना एकत्रित आणुन सरकारला गुडघे टेकवायला भाग पाडु तरी सुद्धा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती केल्या शिवाय स्वराज्य पक्ष आता थांबणार नाही. दोन दिवस सरकारच्या निर्णयाची वाट पाहु अन्यथा भुमिका जाहीर करु असे रांजेंनी बैठकीत बोलतांना सांगितले.

sambhaji raje chhatrapati:या बैठकीकरिता स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, स्वराज्य किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर, उपाध्यक्ष आप्पासाहेब कुढेकर, माधव देवसरकर, अंकुश कदम, रघुनाथ चित्रे, केशव गोसावी, ज्ञानेश्वर थोरात, रुपेश नाठे, महेश गवळी, निलेश पवार, रोशन खैरे, सचिन पाटील, मेतकर पाटील, सागर पवार, खंडु पवार यांचे सह राज्यभरातील चारशेहून अधिक प्रमुख पदाधिकारी बैठकीत सहभागी होते.

Zapuk Zupuk trailer/ लवकरच येणार ‘झापुक झुपूक’ सूरज चव्हाणच्या प्रेम, अॅक्शन आणि ड्रामाच्या रंगात रंगवणा

0

 

Zapuk Zupuk trailer:मुंबईत 14 एप्रिल रोजी लाँच केलेल्या “झापुक झुपूक” चित्रपटाचा ट्रेलर पूर्ण महाराष्ट्रात गाजतो आहे. रितेश देशमुख यांच्या हस्ते ट्रेलर लाँच करण्यात आल्याने या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

सूरज चव्हाण यांच्या अॅक्शन अवताराची झलक या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. प्रेम, अॅक्शन आणि ड्रामाच्या मिश्रणाने हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे.

Policenews / प्राण्यांची निर्दयतेने वाहतुक करणा-यांवर धडक कार्यवाही

25 एप्रिल रोजी प्रदर्शन होणाऱ्या “झापुक झुपूक” चित्रपटाचा ट्रेलर सध्या चांगलाच गाजत आहे. केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर आणि मिलिंद गवळी हे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत.

Zapuk Zupuk trailer :जिओ स्टुडिओ आणि ज्योती देशपांडे यांच्या सहकार्याने हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.

ट्रेलरमध्ये सूरजच्या लव्हस्टोरी, अॅक्शन आणि ड्रामाची उत्सुकता निर्माण होते.

Policenews / प्राण्यांची निर्दयतेने वाहतुक करणा-यांवर धडक कार्यवाही

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Policenews:हिंगणघाट :- 14/04/25 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक उपविभाग हिंगणघाट परीसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती बंदोबस्त निमित्त पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे कलोडे चौक हिंगणघाट येथे कंटेनर क्र. HR-73/B-0056 वर सापळा रचुन कार्यवाही केली असता

, सदर कंटेनर मध्ये एकुण 53 म्हशीचे बछडे यांना ईजा होईल अशा पध्दतीने आखुड दोरीने बांधुन, कत्तल करण्याच्या उद्देशाने क्रुरतेने डांबुन चारापाण्याची व वैद्यकीय अशी कोणतीही उपलब्धता न ठेवता, प्राण्यांची वाहतुक करण्याबाबतचे नियम व अटींचे पालन न करता,

Policenews / हिंगणघाट बसस्टॉप वर गर्दीचा फायदा घेवून दागिने व पैसे चोरी करणारी महिला हिंगणघाट पोलीसांच्या जाळयात

वाहतुक करीत असतांना मिळून आल्याने जागीचं मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरोपीतांचे ताब्यातुन 1) म्हशीचे नर जातीचे काळया रंगाचे एकुण 52 बछडे प्रती बछडा अंदाजे किं 20,000 रु. प्रमाणे अंदाजे एकुण किं 10,40,000 रू. 2) म्हशीचे मादि जातीची एक काळया रंगाची बछडी अंदाजे किं 20,000 रु. 3) आखुड दो-याचे एकुण 53 तुकडे प्रती तुकडा अंदाजे कि. 50 रू प्रमाणे किं 2,650 रू 4) एक 10 चक्का टाटा कंपनीचा कंटेनर क्र. HR-73/B-0056 कि. 30,00,000 रू असा ज.ुकि. 40,62,650 रू. चा मुद्देमाल जप्त करून, आरोपी नामे 1) नासिर जुबेर खान, वय 23 वर्ष, रा. घासेडा जि. नुह,

हरियाणा, 2) जिलफान जुबेर खान, वय 20 वर्ष, रा. घासेडा जि. नुह, हरियाणा, 3) रजि जोसफ रजि, वय 53 वर्ष, रा. पिची, जि. त्रिशुल, केरळ 4) रिहान साफिक अली, वय 28 वर्ष, रा. बागपथ, उत्तर प्रदेश, 5) सादान साफिक अली, वय 20 वर्ष, रा. बागपथ उत्तर प्रदेश यांचेविरूध्द पो.स्टे.

Hingnghat :एचपीएल २०२५ ग्रँड फायनल: आशा कायनेटिक ग्रीनवर दणदणीत विजय मिळवत दीपवंदनने विजेतेपद पटकावले

हिंगणघाट येथे प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम व महाराष्ट्र पशु सरंक्षण अधिनियम चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन, 53 म्हशीचे बछडे त्यांच्या चारापाण्याच्या सोईकरीता व सुरक्षिततेच्या दृष्टीने श्री गौरक्षण संस्था संत कबीर वार्ड हिंगणघाट येथे दाखल करण्यात आले आहे.

Policenews:सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक डॉ सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांचे निर्देशाप्रमाणे, पो.उप.नी. प्रकाश लसुंते, पो.अं. मनोज धात्रक, शेखर डोंगरे, अरविंद येनुरकर, विनोद कापसे, सुगम चौधरी, शुभम राउत सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

Policenews / हिंगणघाट बसस्टॉप वर गर्दीचा फायदा घेवून दागिने व पैसे चोरी करणारी महिला हिंगणघाट पोलीसांच्या जाळयात

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Policenews:हिंगणघाट :- पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे श्रीमती वच्छला गोपालराव बोरधरे वय 65 वर्ष रा.वार्ड क्र.06 बुटटीबोरी जि.नागपुर यांनी तोंडी रिपोर्ट दिली की, दि. 14/04/2025 चे 11.30 वा दरम्यान फिर्यादी ही वाढदिवसाकरीता बुटटीबोरी येथुन हिंगणघाट येथे येत.

असताना हिंगणघाट येथील नंदोरी चौकात बसमधुन उतरत असताना फिर्यादी ही टिकीटचे पैसे घेण्यासाठी टिकीट काढण्याकरीता बॅगमधे टिकीट काढायला लागली असता तिला बॅगमधे असलेले दोन लहान पर्समधील 1)सोन्याची पोत अंदाजे 03 तोळे वजनाची कि 2,10,000रू 2)तीन तोळे सोन्याचा पोहेहार कि.2,10,000 रू.3) रोख 5000 रू. एकुन जु.कि.4,25,000 रू.दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेले. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून अज्ञात

Hingnghat :एचपीएल २०२५ ग्रँड फायनल: आशा कायनेटिक ग्रीनवर दणदणीत विजय मिळवत दीपवंदनने विजेतेपद पटकावले

आरोपीविरूध्द सदरचा गुन्हा नोंद असून सदर गुन्हयांतील आरोपी शोध कामी मा. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक सा. वर्धा, मा.डॉ.सागरकुमार कवडे अप्पर पोलीस अधीक्षक सा. वर्धा यांच्या मार्गदर्शनात मा.रोशन पंडीत, उपविभागीय पोलीस अधीकारी सा, हिंगणघाट व मा. देवेंद्र ठाकुर, पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे इंचार्ज पोउपनि भारत वर्मा, पोलीस हवालदार प्रशांत ठोबरे बक्र 1234,पोहवा/1291 यशवंत गोल्हर,

पो.हवा/746 विनोद बुरीले,पो.ना राहुल साठे बक्र 859, पोना/1497 राकेश आष्टनकर, पोना/1490 विकास अवचट, पोना/606 नरेंद्र आरकेर, पोना/1514 विशाल बंगाले, पोशि/187 आशिष नेवारे, पोशि/794 मंगेश वाघमारे, महिला पोलीस अंमलदार/659 सुषमा कावळे हे त्याचे पथकासह फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनाचे बाईचा पोस्टे परिसरात पेट्रेलिंग करीत असता शोध घेतला असता.

नंदूरी चौक, हिंगणघाट येथे एक महिला लहान मुलांसह संशयीत रित्या फिरतांनी मिळून आल्याने तिला महिला पोलीस अंमलदार/659 सुषमा कावळे हिचे मदतीने ताब्यात घेवून तिला तिचे नाव, पत्ता विचारले असता तिने तिचे नाव सौ. दिपा अनिल लोंढे वय 23 वर्ष रा. रहाटे नगर टोली, व्हीटीस पार्वती नगर, पोस्ट पार्वती नगर, ता. जि. नागपूर असे सांगितल्याने हिला ताब्यात घेवून तिचे जवळ असलेल्या हॅन्डबॅगची पाहणी केली असता तिचे हॅन्डबॅग मध्ये हिरव्या रंगाचे छोटी कापडी पिशवी मिळून आल्याने पिशवीची पाहणी केली

Accdent news/ बुलढाण्यात भीषण बस अपघात, चार जणांचा जागेवरच मृत्यू, १५ जण जखमी

Policenews:असता त्यामध्ये 1) एक पिवळसर धातू असलेली अंदाजे 3 तोळयाची पोत ज्याच कंठी, काळे मनी व गोफ असलेली किं. 2,10,000 रू 2) अंदाजे 3 तोळे पिवळसर धातूची पोहेहार किं. 2,10,000 रू 3) रोख 5,000 रू असा एकुण 4,25,000 रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला. असुन सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.

Hingnghat :एचपीएल २०२५ ग्रँड फायनल: आशा कायनेटिक ग्रीनवर दणदणीत विजय मिळवत दीपवंदनने विजेतेपद पटकावले

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- १२ एप्रिल:पॅसिफिक क्रिकेट क्लबने आयोजित केलेल्या रोमांचक हिंगणघाट प्रीमियर लीग (एचपीएल) २०२५ चा अंतिम सामना काल बसंत विहार मैदानाच्या चमकदार फ्लडलाइट्सखाली भव्य शैलीत संपला. खचाखच भरलेले स्टँड, लाईव्ह व्हिडिओ कव्हरेज, कॉमेंट्री, स्कोअरिंग आणि उत्साही प्रेक्षकांच्या सहभागासह, अंतिम सामना हा अॅक्शनने भरलेल्या हंगामाचा परिपूर्ण शेवट होता.

अंतिम सामना: आशा कायनेटिक ग्रीन विरुद्ध दीपवंदन
उच्च-दबावाच्या लढतीत, दीपवंदनने संधी साधली आणि आशा कायनेटिक ग्रीनवर विजय मिळवत विजेतेपद पटकावले.

Sharadpawar :भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी..

 

सामनावीर: आशु (दीपवंदन)

सर्वोत्तम फलंदाज: गौरांग ढगे (दीपवंदन)

सर्वोत्तम गोलंदाज: आशु (दीपवंदन)

Hingnghat :स्पर्धेने हिंगणघाट शहरात उच्च दर्जाची क्रिकेट प्रतिभा, उत्साही सामन्याचे वातावरण आणि क्रीडा भावना यशस्वीरित्या एकत्र आणल्या. एचपीएल २०२५ चे विजेते दीपवंदन यांचे अभिनंदन!

Sharadpawar :भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी..

0

 

शहरात निघालेल्या शोभायात्रेचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून सन्मानचिन्ह देऊन भव्य स्वागत…

प्रतिनिधी सचिन वाघे

Sharadpawar:हिंगणघाट : – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त राष्ट्रवादी चौक येथे *प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले* यांच्या नेतृत्वात भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Accdent news/ बुलढाण्यात भीषण बस अपघात, चार जणांचा जागेवरच मृत्यू, १५ जण जखमी

या कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, सहकार नेते वासुदेव गौळकार, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शहराध्यक्ष बालू वानखेडे, समाजसेवक सुनील डोंगरे यांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी शहरात एकूण १३ शोभायात्रा काढण्यात आल्या सर्व शोभायात्रेचे अध्यक्ष व सदस्यांना यांना शाल श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी स्वागत केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा बूथ अध्यक्ष अमोल बोरकर, विजय तामगाडगे, गुड्डू घवघवे, ॲड दिनेश झिलटे, सिद्धार्थ मस्के, रवी डेकाटे, रवी गिरसावले, सुनील भुते, राजू मेसेकर, मिना सोनटक्के, दिपाली रंगारी,

Sharadpawar:-आंचल वकील, किशोर चांभारे, जितेंद्र रघाटाटे, परम बावणे, सुनिल घोडखांदे, प्रवीण भूते, बच्चू कलोडे, कुणाल येसंबरे, नितीन भुते, सुभाष सोयाम, करीम खान पत्रकार, नदीम , गजू महाकालकर, बबलु शेख, अनिल भुते,पंकज भट, राजू मुडे, सुशिल घोडे, गोलू भूते, मो.शाहिद, नदीम अली, अमित रंगारी, राहुल जाधव, आकाश हुरले, सौरभ घोडखांदे, कुणाल घोल्हर, विपुल वाढई, अभिजीत साबळे, कुणाल भूते, मनीष मुडे, स्वप्नील पांडे, दिलीप जाधव आदी उपस्थित होते.

Shivsena / शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :-१४ एप्रिल २०२५ रोज सोमवारला सायंकाळी ठिक ०७:०० वाजता
*विश्वरत्न..!!*भारतरत्न..!बोधिसत्व..!!*परमपुज्य..!!*
महामानव..!!*युगपुरूष..!!*
महाविदवान..!!*स्त्रीउध्दारक..!!**
युगप्रवर्तक..!!*क्रांतीसुर्य..!!*
विश्ववंदनीय..!!*महान अर्थशास्त्री..!!महान इतिहासकार..!!*भारताचे कैवारी..!!*भारत भाग्य विधाता..!!*सिंबाॅल आफॅ नाॅलेज..!!*ज्ञानाचा अथांग सागर..!!!*कायदेपंडित..!!!*
विश्वभूषण..!!!*कामगारांचे नेते..!!!*महानायक..!!!*भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार..!!!*महान इतिहासकार..!!!*बँरिस्टर..!!!*
विश्वरत्न *डाॅ.बाबासाहेब आंबेडकर* *यांच्या १३४ व्या जयंती दिना निमीत्त प्रतिमेचे दिप प्रज्वलन करून पूजा करण्यात आली. सर्वांनी नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन केले. सतिश धो‌बे यांनी उपस्थित सर्व शिवसैनिक, यूवासैनिक तथा पदाधिकारी यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला औरंगाबाद येथून आलेले प्रमुख पाहुणे ऍड भुजंग कुमार धाबर्डे प्रामुख्याने उपस्थित होते. त्याप्रसंगी थोडक्यात परमपूज्य *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर सतीश धोबे, ऍड भुजंग धाबर्डे, प्रकाश अनासाने यांनी माहिती विशद केली*.
“”*औरो को मिला हे वो मुक्कद्दर से मिला होंगा,*
*लेकिन हमे तो मुक्कद्दर भी आपके संविधान से मिला है*”” *_ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन..!!_
सदर कार्यक्रमात प्रकाश अनासाणे, मनोज वरघणे, शंकर मोहमारे, भास्कर ठवरे,गजानन काटवले, सौरभ कांबळे, पप्पू घवघवे, अनंता गलांडे, शितल चौधरी, भास्कर मानकर,नितीन वैद्य, दिलीप वैद्य ,अविनाश धोटे,चंदू भुते,अभिजित शिंगारे, धीरज धोटे, अमोल वादाफळे, दिनेश धोबे, उमेश धोंडे, विजय कोरडे, प्रशांत कांबळे ,नरेश तामगाडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाळाभाऊ टेंभुर्णे, भास्कर भिसे, हिरामण आवारी,राजू मंडलवार ,नरेश खुरपुढे,आशिष वाघ ,उमेश धोबे, विलास धोबे,शकील अहमद, संजय तराळे,फिरोज पठाण,घनश्याम वाघमारे,विजय कोरडे, हेमंत भोयर,सचिन मुळे,संदेश मानकर,…. इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

Accdent news/ बुलढाण्यात भीषण बस अपघात, चार जणांचा जागेवरच मृत्यू, १५ जण जखमी

0

 

Accdent news:सकाळच्या वेळी बुलढाण्यातील खामगाव ते नांदुरा महामार्गावर आमसरी फाट्याजवळ जोरदार बस अपघात घडला.

मध्यप्रदेश परिवहन महामंडळाच्या बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या वाहनाची समोरासमोर अघळपघळ धडक झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

तर जवळपास १० ते १५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Walmikkarad / वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरसाठी ५० कोटींची ऑफर; रणजीत कासले यांच्या दाव्याने बीडमध्ये खळबळ

अपघाताच्या वेळी दोन्ही वाहने प्रचंड वेगात होती, त्यामुळे बस आणि वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे (चक्काचूर) झाला. रस्त्यावर काचांचा खच पडला आणि विटा गवतात पसरल्या होत्या.

जखमी प्रवाशांचा आक्रोश आणि गोंधळामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या अपघाताची माहिती मिळताच खामगाव पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.

जखमींना तात्काळ खामगाव येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे आणि मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Accdent news:अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना नेऊन रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांचे मदतकार्य सुरूच आहे.