Home Blog Page 374

घुग्घुस वाहतूक पोलिस कौतुकास्पद काम

0

 

(चंद्रपूर घुग्घुस प्रतिनिधी)
रमेश सुध्दाला

घुग्घुस येथील राजीव रतनजवळील रेल्वे क्रॉसिंगवर जाम झाल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी संध्याकाळी कोळसा मालगाडी गेल्यानंतर रेल्वे फाटक बंद झाले, जे सुमारे 30 मिनिटे बंद होते. यादरम्यान रेल्वे क्रॉसिंगच्या दोन्ही बाजूचे फाटक बंद केल्याने लोक जाममध्ये अडकले होते.

रेल्वे क्रॉसिंग ही लोकांची डोकेदुखी बनली आहे. घुग्घुस रेल्वे साईडिंगवरून दररोज 40 हून अधिक कोळसा रेल गाड्यांची येन-जाना होत असते रेल्वे फाटक बंद असल्याने वाहतूक ठप्प होतो. दर तासाला 10 ते 15 मिनिटे फाटक बंद असल्याने गाड्यांच्या पासिंगमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात हि परिस्थिती आहे.

गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मालगाडीसाठी रेल्वे फाटक बंद करण्यात आले. ट्रेन गेल्यानंतर बराच वेळ होऊनही फाटक उघडता आले नाही. रेल्वे फाटकात बसवण्यात आलेला पाईप खराब झाल्याने जवळपास 30 मिनिटे ते बंदच राहिले दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तीन वाहतूक पोलीस हवालदार विनोद लोखंडे, पोलिस नाईक गजानन झाडे, पोलीस अमलदार माणिकचंद चौधरी यांनी पुढाकार घेऊन रेल्वे फाटकाची तात्पुरती व्यवस्था केली, रेल्वे फाटकात बसवलेले लोखंडी पाईप खराब झाल्याने बराच वेळ लागले. वाहने सुरळीत चालावीत यासाठी प्रयत्न करत वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सांभाळून आपली जबाबदारी पार पाडल्याचे दिसून येत आहे.

विदर्भातील नावलौकिक व सर्वांत मोठी यात्रा महोत्सव असलेल्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शेकडो वर्षापासूनची सोनाळा येथील श्री संत सोनाजी महारांजाची यात्रा रद्द ; भाविक भक्तामध्ये हिरमोड

0

 

अनिलसिंग  चव्हाण, (मुख्य संपादक)

संग्रामपूर. विदर्भातील नावलौकिक व सर्वांत मोठी यात्रा महोत्सव असलेल्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सोनाळा परिसरातील आरध्य दैवत समजल्या जाणाऱ्या श्री संत सोनाजी महाराजांचा रथोत्सव,व यात्रा महोत्सव मोठ्या प्रमाणात होत असतो.परंतु मागील वर्षाप्रमाणे कोरोनामुळे यावर्षीही हा उत्सव रद्द करण्यात आला.त्यामुळे हजारो भक्तांचे हिरमोड झाली आहे.
शासनाने सर्व धार्मिक स्थळे नियमाचे पालन करीत उघडण्याचे आदेश दिले.सर्वत्र मंदिरे खुली करण्यात आल्याने भक्तांमध्ये उत्साह आला.दिवाळी नंतर पोर्णीमेच्या दिवशी पासून सोनाळा येथे रथपूजन ,पालखी सोहळा,रथ मिरवणूक ,काला होवून शेकडो क्विंटल चा महाप्रसाद शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार आयोजित केले जात आहे. यावर्षी सुद्धा भागावत व प्रवचन,किर्तनासह सात दिवस आणि .१९/नोव्हेंबर ते २१नोव्हेंबार पर्यंत साजरा करण्यात येत होता,यासाठी आमदारासह ईतर राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व धार्मिक नागरिक भाविक भक्तांनी शासनाकडे परवानगी साठी प्रयत्न केलेत.परंतु असफल झाले. कोरोना महामारीचा वाढता प्रभाव लक्षात घेत या वर्षीचा यात्रामहोत्सव शासनाच्या आदेशानुसार परंपरा खंडीत झाली आहे.व संतनगरीत येणाऱ्या भाविकांना गर्दी न करण्याचे आवाहन केल्याने परिसरातील व इतर जिल्ह्यातील भाविक भक्तांमध्ये नाराजी होत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे सोनाळा गावातील व परिसरातील लग्न झालेल्या वयस्कर महिलांसह नव विवाहित मुली,व इतर नातेवाइक,नोकरीसाठी बाहेर असलेले सर्वच दिवाळीला भाऊबिजेच्या दिवशी माहेरी न येता श्री संत सोनाजी महाराजांचे रथ यात्रा महोत्सवाचे वेळी भाऊबीज ला येवून दिवाळी व यात्रा साजरी करुन सासरी जातात.त्यांच्यामध्ये सुद्धा नाराजी झाली आहे.
—————————————–
ग्रामीण भागातील सोनाळा व बावनबीर येथील श्री संत सोनाजी महाराज रथोउत्सव,पूजन,पालखी मिरवणूक दहिहांडी काला व महाप्रसादला आमदारासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी,धार्मिक व सामाजिक पदाधिकारी ,कार्यकर्ते ,नागरिकांनी विनंती निवेदन देवूनही परवानगी मिळाली नाही.मिळाली ती फक्त मोजक्याच २०ते २५ लोकांसाठी हा सर्व सामान्य जनता व भाविक भक्तांवर अन्याय आहे. श्री संत सोनाजी महाराज यात्रेत विदर्भ सह इतर ठिकानवरून भाविक मोठ्या संख्येने येत असतात .यात्रा रद्द झाल्याने सर्व धर्मीय व भक्तांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

पोलिसांची गाडी फोडली , शेख रफीक यांच्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न

0

 

SURYA MARATHI NEWS

तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण

गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेले तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन चिघळले आहे. प्रशासनाकडून अंादोलनाची कुठलीच दखल घेतली जात नसल्याने तुपकरांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी थोड्या वेळापूर्वी (संध्याकाळी ६ वाजेदरम्यान) पोलिसांची गाडी फोडली. तर त्यापूर्वी शेख रफिक या पदाधिकार्‍याने अंगावर डिझेल घेवून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच रोखल्यामुळे रफिक यांचा आत्मदहनाचा प्रयत्न अयशस्वी राहिला. परंतु त्यानंतर मात्र कार्यकर्त्यांचा संयम सुटला. काही कार्यकर्त्यांनी येथील चिखली रोड बंद केला. रस्त्यावर बसून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यादरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला असता कुणीतरी कार्यकर्त्याने पोलिसांची गाडी फोडली. तर रफिक यांना घेण्यासाठी आलेली ऍम्बुलन्सही फोडण्यात आली. ‘जिल्हाधिकारी अद्यापही चर्चेसाठी का आले नाहीत ? प्रशासन अजूनही सोयाबीन-कापूस प्रश्‍नी सरकारला आंदोलनाबाबत का माहिती देत नाही ?’, असा सवाल तुपकरांनी केला आहे. विशेष म्हणजे यावेळी आंदोलनमंडपातून तुपकरही रस्त्यावर आले होते. ‘माझ्या अंगावर गाडी घाला.. मला मारून टाका’, या शब्दांत ते आक्रोश व्यक्त करीत होते.
Surya marathi news

यावल येथे भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे प्रदेश संयोजक यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील सामाजीक कार्यकर्ते , सामाजीक क्षेत्रा अग्रेसर असलेली आश्रय फाउंडेशन या संघटनेचे अध्यक्ष तथा नगर परिषदचे युवा नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे वैद्यकीय आघाडीचे निमंत्रक डॉ कुंदन फेगडे यांच्या वतीने डॉ.अजितजी गोपछडे यांच्या वादिवसानिमित्ताने रूग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला . यावल येथे आज त्यांना यावल येथे फळ वाटपआज दिनांक १९-११- २०२१ शुक्रवार रोजी यावल येथे भाजपा वैद्यकीय आघाडी चे डॉ.कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक डॉ. अजित गोपछडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आई हॉस्पिटल व जावळे हॉस्पिटलच्या रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला या वेळी वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी तथा युवा नगरसेवक डॉ कुंदन फेगडे,डॉ पराग पाटील,डॉ. प्रशांत जावळे, विशाल बारी, सागर लोहार आदींनी उपस्थित राहुन कार्यक्रमास यशस्वी केले.

मागण्या मान्य न झाल्यास शासनाचा दहावा घालणार : आमदार निलंगेकर

0

 

डी. एस. पिंगळे निलंगा प्रतिनिधी

सतत संकटात सापडणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुळावर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उठले असून वीज बिल वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा वीजपुरवठा तोडून अघोरी अन्याय करणाऱ्या राज्य शासनाच्या निषेधार्थ माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली निलंगा लातुर येथे आज (गुरुवार) राज्य शासनाची प्रतिकात्मक अंतयात्रा काढून जाहीर निषेध करण्यात आला.
अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट असताना शासनाने मदत करणे अपेक्षित होते. मात्र मदत तर दूरच परंतु वीज बिल वसुलीच्या नावाखाली वीज पुरवठा तोडण्याचा अन्यायकारक प्रयत्न राज्य शासनाकडून सुरू आहे. बहुतांशी शेतकऱ्यांकडे चांगल्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या रब्बी पिकाला पाणी देण्याची योग्य वेळ असताना बिलासाठी वीज पुरवठा खंडित करणारा काळा जीआर काढून शेतकऱ्यांना संकटात टाकणारा दुर्दैवी निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

 

वीज विभागाने काढलेला काळा जीआर तात्काळ रद्द करण्यात यावा. तीन एचपीसाठी १६ हजार रुपये आणि पाच एचपीसाठी २५ हजार रुपये ही वीज बिलाची सक्ती थांबवावी. शेतकऱ्यांची तोडलेले वीज कनेक्शन पूर्ववत करावे या मागणीसाठी शेतकरी विरोधी महाविकास आघाडी सरकारला भानावर आणण्यासाठी आज सरकारची प्रतिकात्मक अंतयात्रा काढली आहे. सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर दहावा साजरा करू असा इशारा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिला आहे. यावेळी आमदार रमेशप्पा कराड यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घुग्घुस येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

0

 

सतत 17 वर्षांपासून घुग्घुसमध्ये भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

(चंद्रपूर घुग्घुस )प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस येथील गांधी चौकात रविवार 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जि.प. अध्यक्ष चंद्रपूर *श्री. देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त* आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत *रक्तदान आहे जीवनदान ते वाचवते दुसऱ्याचे प्राण* हे ब्रीदवाक्य घेऊन श्री. देवरावदादा भोंगळे मित्र परिवार घुग्घुसतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील 17 वर्षांपासून घुग्घुस येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. मागील 17 वर्षांपासून घुग्घुसमध्ये हा रक्तदानासारखा श्रेष्ठ उपक्रम राबविण्यात येत आहे. मागील वर्षी जिल्ह्यात 1007 दात्यांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले तर घुग्घुस येथे 719 दात्यांनी रक्तदान करून एक विक्रम केला होता.

रक्तदान करून देशसेवा करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन देवरावदादा भोंगळे मित्र परिवार घुग्घुसतर्फे करण्यात आले आहे.

औरंगाबाद, नागपूर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा रोड मेहकर येथे स्वाभिमानीचा रस्ता रोको.

0

 

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक)

कापूस आणि सोयाबीन तसेच विविध शेतकऱ्यांच्या मागण्या साठी रविकांत तुपकर तीन दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत असून त्यांची प्रकृती खालावत चालली असून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक पवित्र्या घेणार आहे.डॉ.ज्ञानेश्वर टाले

आज दिनांक १९ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ठिक ११ वाजता खंडाळा बायपास मेहकर औंरगाबाद,नागपूर राष्ट्रीय महामार्गावर माननीय राजू शेट्टी साहेब संस्थापक अध्यक्ष व राज्याचे नेते मा.रविकांत तुपकर यांनी केलेल्या घोषणेनुसार जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वाखाली व यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी बहुसंख्यंने उपस्थितीत होते.सदर आंदोलनाच्या दरम्यान संपूर्ण रस्ता आडवून सरकारच्या चुकीच्या धोरणाचा विरोधात घोषणाबाजी करत जाहीर निषेध केला. सोयाबीन ला प्रतिक्विंटल आठ हजार रुपये भाव कपाशीला प्रति क्विंटल 12 हजार रुपये भाव व गेल्या दोन वर्षीचा शंभर टक्के विमा देणे. शेतकऱ्यांचे विज कनेक्शन न कापने, शेतकऱ्यांना दिवसा लाईट देणे, व शेतकऱ्यांना फसवणा-या पिक विमा कंपनीवर कायदेशीररीत्या कठोर कारवाई करावी, व इतर मागण्यासह आज खंडाळा बायपस मेहकर येथे राष्ट्रीय महामार्गावर सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत रस्ता रोको करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड,तालुका अध्यक्ष प्रफुल्ल देशमुख,अफरोज खान,सुरेश ढोणे, निलेश सदावर्ते,डिंगाबर सरकटे,पप्पु देशमुख, सतिष वाघ,विजय आंधळे,गोतम सदावर्ते देवेंद्र आखाडे,अमोल घनवट,अस्लमभाई,फयाज भाई राजु शेख,जावेद शहा,अनिल लांडगे,विकास मुळे,डॉ.गजानन बाजड,कैलास उतपुरे,सुरेश खरात,उत्तम खरात प्रभाकर आवारे,मिथुन साळवे,राधेश्याम मानघाले,मेहकर तालुक्यातील सर्व स्वाभिमानीचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी शेतमजूर बहुसंख्यने उपस्थित होते.पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता.आंदोलनाच्या दरम्यान सर्वांना ताब्यात घेण्यात आले व नंतर सर्वांची सुटका केली.

निर्माता आणि चित्रपट व्यावसायिकांनां व महाराष्ट्र कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले साहेबानी मराठी चित्रपट निर्मात्याची समश्याची तात्काळ सोडवणुक व्हावी असे आदेश सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना दिला निवेदन

0

 

उषा पानसरे  कार्यकारी संपादक असदपूर मो.9921400542

कोरोना प्रादुर्भाव नंतर सर्वच क्षेत्रातील कामकाज सुरळीत होत आहेत. मुंबई आणि महाराष्ट्र ही कला सांस्कृति संपन्न भूमि आहे.परंतु मागील काही वर्षांपासून मराठी चित्रपट सृष्टीला महाराष्ट्र सरकारकडून कोणतेही सहकार्य होत नाही.विविध प्रश्न सोडविण्यासाठी मदत करू शकतात.यात चार वर्षांपासून प्रलंबित चितपटांचे अनुदान देणे,मल्टिप्लेक्स चित्रपट गृहातील काही नियम,डिजिटल प्लॅटफॉर्म इ.महाराष्ट्र शासनाच्या बिगर शासकीय सदस्य सांस्कृतिक समितीमधे अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाची नियुक्ती व्हावी. तसेच सभासदांना अनुदान मिळावे.पु.ल.देशपांडे कला अकादमी येथे ऑफिस साठी जागा मिळावी,डबिंग बंद करावी, चित्रपट कलाकारांची नोंदणी,मराठी सिंगल स्क्रिन चित्रपट गृहांना सवलत द्यावी. अश्या अनेक मागण्यांसाठी मा.ना.अमितजी देशमुख साहेब, मा.सांस्कृतिक मंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी टिळक भवन दादर पश्चिम मुंबई येथे चित्रपट व्यावसायिकांनी अर्ज दिला आहे. या अर्जावर बाळासाहेब गोरे म.हा अध्यक्ष,तजेला बगाडे महिला अध्यक्षा देवेंद्र मोरे संस्थापक अध्यक्ष ,आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ आध्यक्ष महाराष्ट्र निर्माता प्रोडूसर बाळासाहेब गोरे, विजय शिंदे प.म.अध्यक्ष,अशोक सुर्यवंशि म.रा संघटक,शिरिष राने,राजेद्र बोराडे ,विजय भाऊ पाटिल,विजय राने,राजु शेवाळे,रमेश झेंडे ज्योति,निसल अशोक सवने, शितल कांबळे रंगराव कोटकर,गजानन हेंद्रे अडव्होकेट मनीष व्हटकर,मनिष व्हटकर आखिल भारतीय चित्रपट निर्माता महामंडळ उप आध्यक्ष महाराष्ट्र राज्य संपादक सुनिल ज्ञानदेव भोसले

आमदार निलंगेकर, कराडांसह अडीचशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

0

 

डी एस पिंगळे निलंगा प्रतिनिधी

निलंगा येथे महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ गुरूवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासह हजारो नागरिकांनी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. या प्रकरणी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आमदार रमेश कराड यांच्यासह इतर अडीचशे कार्यकर्त्यांवर निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी की, महाविकास आघाडी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देणारे आंदोलनकर्ते निलंगेकर व कराड यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून आंदोलन केले. यामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले होते.
पोलिस नाईक प्रणव काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निलंगेकर, कराड, समाज कल्याणचे माजी सभापती संजय दोरवे, दगडू सोळुंके, पंचायत समिती सभापती राधा बिराजदार, अप्पाराव सोळुंके, शाहूराज थेटे, विरभद्र स्वामी, शाहूराज पाटील यासह अडीचशे कार्यकर्त्यांवर बेकायदेशीर मंडळी जमवून राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवल्या प्रकरणी निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस विभागाकडून कोणती कारवाई होणार याकडे संपूर्ण लातूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँंक पंचवार्षिक निवडणुकीसंर्दभात- 2021 सुसंवाद बैठक

0

 

डी.एस. पिंगळे निलंगा प्रतिनिधी

निलंगा येथील संगमेश्वर मंगल कार्यालयात, लातूर जिल्हा बँंकेच्या 09 जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीसंर्दभात सुसंवाद मतदार बैठकीचे आयोजन आदरणीय. दिलीपराव देशमुख साहेब ( माजी मंत्री तथा सहकारमहर्षी ) यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले..
यावेळी मा.श्री.अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब ( सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँंग्रेस कमिटी ), मा.आ.धिरज विलासराव देशमुख साहेब यांच्यासह सर्व ऊमेदवार, निलंगा तालुक्यातील चेअरमन, मतदार बंधु, कार्येकर्ते यावेळी ऊपस्थीत होते…