Home Blog Page 373

भाजपा व अन्य हिन्दूत्ववादी संघटना तर्फे घोषित परतवाड़ा बंद ला शंबर टक्के यश

0

 

परतवाड़ा (अशोक वास्तानी)

त्रिपुरात घडलेल्या घटनेचे पड़साद म्हणून महाराष्ट्रतील नांदेड़, मालेगाव, व, अमरावतीत देखील तोड़फोड़, जलपोल,
जा ली त्या अनुशंगाने आज भाजपा व इतर हिंदुत्ववादी संघटने परतवाड़ा बंद सी घोषणा केली होती परन्तु येथील हिन्दू, मुसलमान समाजातील जनतेने समंजसयाने वागून व एकतेचे प्रमाण देत prtwada बंदला शम्भूर टक्के यशस्वी करून दाखवून दिले की परतवाड़ाचे चारही ही दिशेने कोणतीही अप्रिय घटना घड़ो आम्ही आमचे परतवाड़ा शहरत अश्या घटनेना प्रवेश करूच देणार नाही
आज सकाल पासूनच स्वयं सफुर्तीने सर्व दुकाने बंद ठेवण्यात आले तर ठीकठिकाणी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आले असल्याने रस्ते देखील सुनसान जाले होते
याबंद ला अभूतपूर्व यशस्वी करण्यात जितके प्रमाणत पोलिसची सतर्कता होती तेवढया च प्रमाणत शांतता समितिचे सर्व सदस्य, हाजी मो. रफीक सेठ,हाजी मो. इरफ़ान भाई,ओमप्रकाश दीक्षित, मो साजिद फुलारी, नरेंद्र फिसके, पप्पूसेठ चन्दनानी,संजय केजडी वाल,राजनीती जायसवाल, पन्नालललजी अग्रवाल, रंगलालजी नंदवंशी, मनोज नंदवंशी, गजानन कोल्हे, नीलेश सतपुते, गजु महाराज, अन्नू मिश्रा, विजय थवानी बंटी केजड़ीवाल, सर्व पत्रकारानी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपत
शह रात शांतता ठेवण्यात मो लाचे सहकार्य करून आम्हीसर्व एक आहोत चा परिचय दिला येथील प्परतवाड़ा बंद ला मिळालेल्या या अभूतपूर्व यशाचे खरे मानकरी पोलिस, मुस्लिम व् हिन्दू जनतेची एकताच आहेत

आदिवासी बांधवांच्या सोबतची एक दरवर्षीची भाऊबीज

0

 

अनिलसिंग चव्हाण( मुख्य संपादक)

SURYA MARATHI NEWS

दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दि.13 नोव्हेंबर रोजी संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल ग्राम वसाळी येथे आदिवासी बांधवां सोबत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटी च्या सचिव डॉ.स्वातीताई वाकेकर यांनी भाऊबीज साजरी केली.

यावेळी ग्राम वसाळी मध्ये जेव्हा ताईची गाडी उभी राहते तेव्हा कोणाला न बोलवीता सर्वच बांधव लगेच उपस्थित राहतात व सर्व एकत्र येतात. आपली बहीण आपणास ओवळ्याला आली म्हणून आपल्या पत्नीस सुध्दा या भाऊबीज कार्यक्रमाला उपस्थित ठेवतात. त्यावेळी प्रत्येक आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य जणू भावनिक क्षणात जाते.
अश्यातच एका बांधवांना ओवळतांना तो बांधव आपसूकपणे म्हणतो ताई मागे तुम्ही निवडणूक ला पडल्या ते दुःख मनात असतांना पण दुसऱ्याच दिवशी भाऊबीज ला आल्या व आमची भाऊबीज केली. तेव्हा आदिवासी बांधवांच्या मनातील रडू ताई आपसूक सावरतात हा क्षण खरंच खूपच काही सांगून जातो.
या भाऊबीज कार्यक्रमास बहुसंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते. यावेळी शेला टोपी नारळ व फराळाचं देवून भाऊबीज साजरी केली.

यावेळी बालक दिनाच्या पूर्व संध्येला लहान बाल गोपालां सोबत अल्पोपहार घेतला. यावेळी बालगोपालांच्या चेहर्यावरचे हसू व मोठ्यांच्या डोळ्यातील आनंद मनाला मानसिक समाधान देवून जातात. यावेळी संग्रामपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.राजुभाऊ वानखडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री.रमेश लोणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयमाल भाऊ, डॉ.संदिपजी वाकेकर, वसालीचे संरपच पती हुसैन पालकर, उपसंरपच झामसिग सुलिया, धर्मेंद्रभाऊ इंगळे, मारोती कडसकार,हिम्मतराव धांदेकर, अशोक पालकर, कपिल पालकर, रेवरसिंग सूलिया, कुमार जमरा,साजिद पठाण ,गोपाल इंगळे, पंकज तायडे ,नितीन जाधव,अमोल मानकर जूनेद शेख, प्रशांत वंडाळे तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते व गावकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते….

अल्पवयींन मुलीवर बलात्कार, गरोदर केल्या बद्दल त्या नराधमास 10 वर्षाची शिक्षा,

0

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक)

SURYA MARATHI NEWS

पुणे : येथील १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर पाणी मागण्याचा बहाण्याने घरात बोलावून आरोपिने तिच्यावर बलात्कार करुन तिला 6 महिंयाची गरोदर केल्याबद्दल विशेष न्यायालयाने ५२ वर्षाच्या नराधमाला १० वर्षे सक्तमजुरी व १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.अप्पा यशंवंत साळवे (वय ५२, रा. कुसगाव, लोणावळा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पॉक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला. अप्पा साळवे हा रेल्वेमध्ये सिनियर मेकॅनिक आहे. व या
पिडित मुलीचे आईवडिल मृत्यू पावले असल्याने ती आजीकडे रहात होती. पन टिक आरोपी तेथेच रेल्वे वसाहतीमध्ये रिकाम्या बंगल्यात राहत होता. व फेब्रुवारी २०१७ मध्ये आरोपीने पिडित मुलीला हाक मारुन घरात पाणी घेऊन बोलावले.व तिच्यावर वारंवार बलात्कार केला. ही घटना कोणाला सांगितल्यास तिला व तिच्या लहान भावाला मारुन टाकण्याची धमकी दिली. व त्यानंतर त्याने हा प्रकार पुन्हा केला. व काही महिन्यांनी तिचे पोट दुखू लागल्याने तिला डॉक्टरांकडे नेले. ती गरोदर असल्याचे डॉक्टर तपासणीत आढळून आल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. लोणावळा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक राधीका मुंडे व उपनिरीक्षक एस जी दरेकर यांनी या गुन्ह्याचा तपास केला. दरम्यानच्या काळात या मुलीने बाळाला जन्म दिला. पोलिसांनी पिडिता, आरोपी व तिच्या बाळाचे डी एन ए नमुने घेतले. त्याचा अहवाल सकारात्मक आला.
या खटल्यात सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी ७ साक्षीदार तपासले. पिडिता ही या प्रकरणाची महत्वाची साक्षीदार होती. पिडिता व तिचा लहान भाऊ यांचे जानेवारी २०२१ मध्ये निधन झाले. त्यामुळे तिची साक्ष नोंदविता आली नाही. पिडिता हिच्या मृत्युमुळे आरोपीला कोणताही फायदा देता येणार नाही. उपलब्ध तोंडी व लेखी पुरावा आरोपीचा गुन्हा शाबीत होण्यासाठी पुरेसा आहे. तसेच डी एन ए अहवालामध्ये आरोपी हा पिडितेच्या बाळाचा जनक पिता असल्याचा उल्लेख असल्याचा युक्तीवाद ॲड. प्रेमकुमार अगरवाल यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. व या खटल्यात लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदेश बावकर आणि कोर्ट पैरवी अल्ताफ हवालदार यांनी सरकार पक्षाला सहाय्य केले. व आरोपिला अटक करण्यात आली. Surya marathi news

आमदार पटेल चे परम्परिक आदिवासी “गदली सूसून नृत्य करून जनतेला केले आकर्षित

0

 

परतवाड़ा (अशोक वस्तानी )

दर वर्षी प्रमाने यडाही दिवाली नंतर मिलघाटतील परंपारीक भोगड़ू बाजारचे आयोजन करण्यात आले होते ज्याची सांगता शकरवरी गदली सूसून
नृ त्य द्वारे करण्यात आली या परम्परिक नृ त्य मधे थाटिया चे वेशभूशेत मेलघाट चे आमदार राजकुमापटेल ने देखील बासुरी वजवून नृ त्य केले यावेळी आमदार पटेल ने लाल फेता, पीवलाकुर्ता व काली जैकीट घालून अस्सl थाटिया बनूंन लोकाची गर्दी जमविण्यात व जनतेला आकर्षित करण्यात यश मिलविले हा भोंगड़ू बाजार एका आठवड्याचा असून शुक्रवारी यांचे समापन करण्यात आले होते आमदार पटेल ने बोलताना म्हटले की या दिवसाची सर्व आदिवासी बंधवात आतुरता असते सम्पूर्ण मिलघाटतून जनता हा बाजार वही नृ त्य पाहन्यास येथे येतात त्याकृता प्रशाशनने देखील आम्हाला भरपूर सहकार्य केले आहेत

शृंगारे साहेब…लोकसभेची  पुढची उमेदवारी पुन्हा तुम्हालाच : निलंगेकरांंनी भरसभेत दिली ग्वाही

0

 

दगडू पिंगळे निलंगा प्रतिनिधी

निलंगा : लोकसभा निवडणुकीला आणखी कालावधी बाकी असला तरी काही उत्साही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भावी खासदार म्हणून कार्यकर्त्यांकडून उल्लेख होत आहे, त्यामुळे निलंगा येथील विकास कामाच्या लोकार्पण कार्यक्रमात माजी मंत्री, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी भरकार्यक्रमात शृंगारे साहेब… येत्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी तुम्हालाच आहे. चांगले काम करा, केंद्रात मंत्रीही म्हणून जाल, असा उल्लेख करून विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले, यामुळे सध्या तरी उमेदवारीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
निलंगा शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण दोन दिवसांपासून सुरू असून या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनीधी उपस्थिती राहत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्याचे खासदार सुधाकर शृंगारेही संत तुकाराम महाराज मंदीर सभागृह व ‘अटल वाॕक वे’ च्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित होते. लोकसभा निवडणुका दूर असल्या तरी भारतीय जनता पक्षामध्ये अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना ‘खासदारकीचे’ स्वप्न पडू लागले आहे. काही पदाधिकाऱ्यांना, तर चक्क भावी खासदार म्हणून संबोधले जात आहे. ही बाब माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासह विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांच्याही कानावर पडत आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे यांचेकडुन नव्या वळण मार्गाची पाहणी.

0

 

(चंद्रपूर घुग्घुस ) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

आता जडवाहतुकिसाठी शहरातून नव्हे, तर बहिरमबाबा मंदिराच्या मागुन बायपास.

शनिवार 13 नोव्हेंबर. घुग्घुस शहरातून होणारी जडवाहतुक टाळण्यासाठी वेकोलीकडून नव्याने निर्माण केलेल्या पर्यायी वळणमार्गाची भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आणि वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे यांनी आज एकत्रित पाहणी केली.
यावेळी, भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, वेकोलीचे संजय विरमलवार, पिसारेड्डी, ओमप्रकाश फुलारे, संजय वैरागडे, सुदर्शन बल्लेवार हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते.

घुग्घुस परिसरातील वेकोलीकडून नव्याने निर्माण केलेल्या जिओसी कोळसा खाण ते बहिरमबाबा मंदिराच्या मागुन बेलोरा पुलापर्यन्त निघणाऱ्या पर्यायी नवीन वळणमार्गाचे निर्माण कार्य पूर्ण होऊन आता जडवाहतूकिसाठी हा रस्ता सज्ज झाला आहे.
याआधी शहरातून कोळशाच्या जडवाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू होती त्यामुळे नागरिकांना प्रदूषणाचा त्रास तर होताच परंतु दिवसेंदिवस अपघाताची शक्यता बढावत चालली होती.
त्यामुळे ही वाहतूक शहराच्या बाहेरून व्हावी, अशी घुग्घुसवासीयांची बहुप्रतीक्षित मागणी होती.
यासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत 27 सप्टेंबर ला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक, वेकोलीचे अधिकारी आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांत एक बैठक पार पडली. आणि वेकोलीने पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी, असा निर्णय झाला. त्यानुसार वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक श्री. उदय कावळे साहेब यांचेशी सकारात्मक चर्चा होऊन पर्यायी रस्त्याची शोधाशोध होऊन कामाला सुरवात झाली.
यादरम्यान जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वेकोलीचे महाप्रबंधक उदयजी कावळे यांचेसह दोनदा तर भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी वेकोलीच्या अधिकार्‍यांसह स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांसमवेत अनेकदा याठिकाणी भेटी देऊन कामाचा आढावा घेतला. आता हा नवा पर्यायी रस्ता तयार झाला असून यामार्गे कोळशाच्या जडवाहनांची वाहतूक सुरु झाली आहे.
हा पर्यायी रस्ता तयार झाल्याने घुग्घुसवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार व वेकोलीचे महाप्रबंधक उदय कावळे यांचे आभार भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी मानले.

महाराष्ट्र विद्यालय निटूर येथील नीट परीक्षेत यश प्राप्त केल्याबद्दल विद्यार्थिनीचा सत्कार

0

 

दगडू पिंगळे निलंगा प्रतिनिधी

महाराष्ट्र विद्यालय निटूर येथील नीट परीक्षेत यश प्राप्त
केल्याबद्दल कु.शेख यास्मिन बिलाल या विद्यार्थिनीचा महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयात शिक्षण घेऊन आज मेडिकल कॉलेज औरंगाबाद येथे फिजिओ थेरपी करणाऱ्या जमादार वैष्णवी राजकुमार व संतोषी राजकुमार जमादार बाई साहेब सावंत महाविद्यालय सावंत वाडी जिल्हा रत्नागिरी या भगिनींचा हि यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र शिक्षण समितीचे समन्वयक श्री. दिलीप धुमाळ सर. पालक बिलाल शेख, राजकुमार जमादार, पत्रकार राजाभाऊ सोनी, राजाभाऊ तापडिया, दिनकर नाना निटुरे, सूर्यकांत निटुरे, नंदकुमार हासबे, प्राचार्य अनिल पाटील सर दिलीप हुलसुरे सुभाष पाटील, सुशांत घाटके, लक्ष्मण मगर, रमेश लांबोटे, रमेश शिंदे, नामदेव तेलंगे, रवी पिंड, अशोक बापू निटुरे, मुख्याध्यापक श्री सुरेंद्र धुमाळसर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री स्व.शिवाजीराव पाटील निलंगेकर सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण

0

 

दगडू पिंगळे निलंगा प्रतिनिधी

निलंगा येथील मेन रोडवरील शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या माजी मुख्यमंत्री स्व.शिवाजीराव पाटील निलंगेकर सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण
भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मा आ संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या शुभ हस्ते झाले.
स्व.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे कार्य आणि जपलेली सांस्कृतिक मूल्ये ही अनेक पिढ्यांसाठी लाभदायक ठरतील अशी आहेत. त्यांच्या निलंगा शहरातील ही अत्याधुनिक भव्य वास्तू देखील पुढील अनेक पिढ्यांसाठी उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रमाचे व विचारांच्या आदान प्रदान करण्याचे दालन ठरेल, असा विश्वास वाटतो. या सभागृहात कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम आयोजित होऊ नये असा ठराव घेण्यात यावा असे नगरपालिकेला आवाहन केले.
त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ या भव्य सभागृहाचे नामाभिधान ठरविणे ही त्यांच्या विशाल कार्यास निलंगावासियांची अल्पशी मानवंदना ठरेल. त्यांच्या विकास केंद्रित विचारांचे पाईक होऊन कार्य करण्याचा प्रयत्न कायम आहे.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव श्री.अरविंदजी पाटील निलंगेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. राहुलजी केंद्रे, नगराध्यक्ष श्री.बाळासाहेबजी शिंगाडे, उपनगराध्यक्ष श्री.मनोजजी कोळ्ळे, शहर अध्यक्ष ॲड.श्री.वीरभद्रजी स्वामी, श्री.शेषरावजी ममाले सर, सभापती सौ.राधाताई बिराजदार, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री.प्रल्हादजी बाहेती, डॉ.भागवतजी पोळ सर, श्री.दिलीपजी धुमाळ सर, श्री.शिरमले सर, डॉ.लालासाहेब देशमुख, मुख्य अधिकारी श्री.सुंदरजी बोंदर आदी मान्यवरांसह नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर साधला निशाना…

0

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोनाकाळात काम नव्हे तर खाली मान करून पैसे मोजत होते, स्वतःच्या बायकोचे  19 बेकायदेशीर बंगले वाचवण्यात व्यस्त होते असा निशाना किरीट सोमय्या यांनी साधला आहे…
कोरोनाच्या संपूर्ण काळात आपल्याला वर मान करायलाही वेळ मिळाला नाही एवढे काम होते, आणि त्यामुळेच मानेचा त्रास सुरू झाला असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते , या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना किरीट सोमय्या बोलत होते… उद्धव ठाकरे हे काम करण्यात नव्हे तर कोरोनाकाळात पैसे मोजण्यात व्यस्त होते, स्वतःच्या बायकोचे 19 बेकायदेशीर असलेले बंगले वाचवण्यात व्यस्त होते, अनिल परब यांना मदत करण्यात व्यस्त होते, असा टोला सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे… सोबतच आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली त्यामुळे महाराष्ट्राचे वर्तमान मुख्यमंत्री म्हणून मी एकटाच नव्हे तर देशातील जनता देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे…भारतीय जनतेला हिंदुत्वाचा अभिमान असल्याने ते उद्धव ठाकरेंची प्रकृती बरी होण्याची देवाकडे प्रार्थना करत आहेत, भलेही ते हिरवेधारी झाले असले तरी… असा चिमटाही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना घेतला आहे…
बुलडाणा अर्बन पतसंस्था मध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांचे कोट्यवधी रुपये असल्याचा आरोप करत किरीट सोमय्या याबाबतीत पाठपुरावा करण्यासाठी बुलडाण्यात आले होते, त्यांनी यावेळी बुलडाणा अर्बन पतसंस्थेच्या मुख्य शाखेत जाऊन संचालकांशी चर्चा केली आणि चर्चे दरम्यान बुलडाणा अर्बन हे चांगल्या पद्धतीने आयकर विभागाच्या चौकशीला सहकार्य करत आहे आणि पुढेही करणार असल्याचे सांगत , बुलडाणा अर्बन पतसंस्थेच्या पारदर्शी व्यवहाराची अप्रत्यक्षरीत्या सोमय्या यांनी स्तुतीच केली आहे..

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावल येथील शासकीय योजनांच्या मेळाव्याचा हजारों नागरीकांनी घेतला लाभ

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्यानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा वकील संघ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय, यावल येथे आयोजित शासकीय योजनांच्या मेळाव्यास यावल, चोपडा, फैजपूरसह इतर भागातील हजारो नागरीकांनी उपस्थित राहून शासकीय योजनांची माहिती करुन घेतली, त्याचबरोबर शेकडो नागरीकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणही करुन घेतले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्यानिमित्त ग्रामीण भागातील नागरीकांना शासकीय योजनांची माहिती व्हावी, या योजनांचा लाभ मिळावा, नागरीकांमध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी याकरीता, या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन जळगावचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण न्या. एस. डी. जगमलानी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष दिलीप बोरसे, सचिव श्री. ए.ए.के.शेख, फैजपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलग, यावलचे तहसीलदार महेश पवार, गटविकास अधिकारी भाटकर, यावल तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे चेअरमन एम. एस भारंचे, यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील आदि उपस्थित होते. याठिकाणी शासनाच्या महसुल, नगरपालिका, क्रीडा, महिला व बालविकास, कृषि, आरोग्य, ग्रामीण विकास यंत्रणा, शिक्षण, विविध राष्ट्रीयकृत बँका, आपत्ती निवारण कक्ष, जिल्हा पोलीस दल, घरकुल विभाग, वाहतुक शाखा, परिवहन विभाग, आदिवासी विकास विभाग, समाजकल्याण विभागासह इतर ३० विविध विभागांचे माहितीपूर्ण स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलला भेट देणाऱ्या नागरीकांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येत होती. त्याचबरोबर पात्र लाभार्थ्यांना आवश्यक दाखले त्याचठिकाणी देण्यात आले. या मेळाव्यात आरोग्य विभागामार्फत कोविड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते याचा शेकडो नागरीकांनी लाभ घेतला. या मेळाव्यास विविध तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता नायब तहसिलदार आर के पवार नायब तहसीलदार आर. डी. पाटील, न्यायालयाचे के. के. लोंढे, व्ही. आर. तायडे, एस. एम. तेली, आर. व्ही. आमोदकर, जी. एस. लाड, डी. ए. गावंडे, एच. जी. सूर्यवंशी, पी. डी. पाटील, एस. जे. ठाकुर,एम. डी. जोशी, एम. एस. सपकाळे, एस. बी. काठोके, कार्यक्रमाचे सूत्रसंचालक यांनी केले आदींनी परिश्रम घेतले