Home Blog Page 375

ट्रकवर भरधाव येणारी कार आदळून महिला ठार; जखमींना रुग्णालयात केले दाखल, अमरावतीमधील घटना

0

 

अचलपुर (अशोक वस्तानी )

ट्रकवरविरुद्ध दिशेने भरधाव येणारी कार आदळल्याने एक महिला जागीच ठार झाली, तर अन्य एक गंभीर जखमी झाल्याची घटना अंजनगांव तालुक्यातील पथ्रोट नजीकच्या पांढरी रस्त्यावर स्मशानभूमीजवळ बुधवारी दुपारी दीड वाजतादरम्यान घडली. जखमींला रिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची प्राथमिक माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार, अंजनगाव सुर्जी येथील एम.एच.२७ बीव्ही २०१२ क्रमांकाच्या कारने समाजसेवक प्रमोद निपाने आणि अंगणवाडी सेविका ललिता चव्हाण हे जात होते. पांढरी रस्त्यावर स्मशानभूमीजवळ वळण रस्त्यावर अचानक ट्रकमध्ये घुसल्याने भीषण अपघात झाला. यात ललिता चव्हाण या जागीच ठार झाल्या, तर प्रमोद निपाणे हे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता.

ऑनलाइन ऑर्डरचा फटका ३०० रुपयांचा केक पडला ४० हजारांत

0

 

 

अचलपुर (अशोक वस्तानी )

ऑनलाइन केक ऑर्डर करणे,अमरावती येथील एका महिलेला तब्बल ३९ हजार ९२६ रुपयांमध्ये पडले. स्थानिक न्यू प्रभात कॉलनी येथे १ ऑगस्ट रोजी सायंकाळी अवघ्या एका तासात ही फसवणूक करण्यात आली.

ऑनलाइन शॉपिंग करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्यासोबतच सायबर गुन्हेगारीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. असाच एक प्रकार अमरावतीत उघडकीस आला असून ऑनलाइन केक ऑर्डर करून रक्कम रिफंड करण्यासाठी पाठवलेल्या क्यूआर कोडच्या माध्यमातून महिलेची हजारोंनी फसवणूक झाली आहे.

न्यू प्रभात कॉलनीमधील रहिवासी महिलेने केक ऑर्डर करण्यासाठी गुगलवर सर्च केले. गुगलवर मिळालेल्या एका मोबाईल क्रमांकावर त्यांनी कॉल लावला, तर पलिकडून केकची ऑर्डर करण्यासाठी व रक्कम रिफंड करण्यासाठी क्युआर कोड पाठविण्यात येऊन तो स्कॅन करण्यास सांगितले गेले. तो स्कॅन केला असता त्या महिलेच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने ३९ हजार ९२६ रुपये कपात झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी ८ नोव्हेंबर रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी ९५४७१७९६८१ या मोबाईलधारकाविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या संपाला मातृशक्ती संघटनेचा जाहीर पाठिंबा..

0

 

शेगाव: राज्य परिवहन महामंडळ एसटी बसच्या चालक वाहक सहसर्व कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे या व इतर मागण्यांकरिता बेमुदत संप पुकारला आहे आज नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय स्तरावर महिलांसाठी कार्यरत असलेल्या मातृशक्ती संघटनेच्यावतीने राष्ट्रीय अध्यक्ष सौ वैशाली ताई तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या कडून न्यायोचित मागण्यांसाठी सुरू असलेल्या संपाला पूर्णपणे पाठिंबा जाहीर करण्यात आला मातृशक्ती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष वैशाली तायडे यांच्यासह राष्ट्रीय कोषाध्यक्ष मुक्ताताई ठाकूर राष्ट्रीय संघटक सौ. लीना भारंबे पाटील, मातृशक्ती संघटनेच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सौ रजनी ताई चव्हाण, ज्येष्ठ सदस्य सो मीराताई माळी, सौ अर्चना ताई कंकाळे यांनी आज बुधवार 10 नोव्हेंबर रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या शेगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या शेगाव बस स्थानकासमोरील आंदोलन स्थळावर भेटी देऊन संघटनेच्यावतीने पाठिंब्याचे लेखी पत्र शेगाव बस आगारातील कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेश बुरुंगले महिला कर्मचारी कुमारी विद्या गिरी, शीतल कोगदे, संध्या गवळी ललिता अरुळकर, सरिता फुके ,रूपाली ताथोड, प्रिया ताथोड, प्रतिभा बोधे, सुशीला गवई उज्वला शिरसाट छायाताई पुणवे, यांच्या उपस्थितीमध्ये पाठिंब्याचे पत्र सोपविण्यात आले राज्य परिवहन महामंडळाच्या शेगाव आगारातील संपकरी कर्मचाऱ्यांनी मातृशक्ती संघटनेचे या पाठिंबा बद्दल आभार व्यक्त केले यावेळी मातृशक्ती संघटनेच्या सर्व मुक्ताताई ठाकूर व सो मीराताई माळी यांनी राज्य शासनाने परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा न्यायोचित मागण्या त्वरित मंजूर करून महामंडळाला राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे अशी मागणी केली आहे व श्री संत गजानन महाराज राज्यकर्त्यांना तशी सदबुद्धी देवो अशी प्रार्थना केली

कायदेविषयक महाशिबीर यावल तहसील कार्यालयात शुक्रवारी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान होणार आहे

0

 

 

यावल, प्रतिनिधी विकी वानखेडे

यावल तहसील कार्यालयात जिल्हा विधी प्राधिकरण आणि यावल तालुका विधी सेवा समिती व यावल वकील संघातर्फे शुक्रवारी १२ नोव्हेंबर रोजी कायदेविषयक महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती यावल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्या.एम.एस .बनचरे यांनी बुधवारी १० नोव्हेंबर रोजी दुपारी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

आयोजित केलेले कायदेविषयक महाशिबीर यावल तहसील कार्यालयात शुक्रवारी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायमुर्ती एस.डी. जगमलानी, जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव ए.ए. शेख यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहे. शिबीरात विविध प्रकारचे शासकीय कार्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांबाबत सर्वसामान्य नागरीकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. यावेळी शासकीय विभागाचे अधिकारीवर्ग राहणार आहे.

महाशिबीर यशस्वी होण्यासाठी विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग,तहसीलदार महेश पवार ,जिल्हा आदीवासी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, , यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी विलास भाटकर, सहाय्यक गट अविकारी किशोर सपकाळे , नगरपरिषदचे प्रभारी मुख्यधिकारी अविनाश गांगोडे, यावलचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. धीरज चौधरी, सचिव अॅड. एन. पी. मोरे यांच्या वकील संघाचे सदस्य परिश्रम घेणार आहे. नागरीकांनी शिबीराचा सर्वनागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्या.एम.एस .बनचरे यांनी केले आहे .

शिकाऊ डॉक्टरचा मृतदेह महाविद्यालयाच्या परिसरातच आढळला.

0

 

SURYA MARATHI NEWS

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची हत्या करण्यात आली असून व त्याचे नाव डॉ. अशोक पाल असे आहे. व या वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातच ही हत्या करण्यात आलीय. व बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली असून हत्येचे नेमके कारण काय हे अद्याप अद्याप समजू शकलेले नाही.
महाविद्यालयाच्या परिसरातच हत्या
यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. अशोक पाल मागील काही दिवसांपासून शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करत होते. मात्र बुधवारी मध्यरात्री त्यांची अमानुषपणे हत्या झाली. ही हत्या अज्ञात व्यक्तीने केली असून शिकाऊ डॉक्टरचा मृतदेह महाविद्यालयाच्या परिसरातच आढळला. सदर या घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पंचनामा केला असून तपास सुरु केलाय.
महाविद्यालय प्रशासन, डीनविरोधात घोषणाबाजी शिकाऊ डॉक्टरची हत्या का झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, हत्या प्रकरणानंतर रुग्णालय परिसरात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. त्यांनी महाविद्यालय प्रशासन व डीनविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केलं असून राज्यत एकच खळबळ उडाली आहे. तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेवर प्रश्न विचारला जात आहे.
आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू
दरम्यान, ऑगस्ट महिन्यात आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये एकाद्यार्थी डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाला होता. स्वप्नील शिंदे असं या मयत डॉक्टरचं नाव होतं. मृत विद्यार्थी डॉक्टर स्वप्नील शिंदे याने याआधी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तसेच या विद्यार्थी डॉक्टरवर मानसोपचारदेखील सुरु होते. तर दुसरीकडे आमच्या मुलाचा मृत्यू हा रॅगिंगमुळेच झाला आहे, असा आरोप मृत डॉक्टरच्या नातेवाईकांनी केला होता. व या प्रकरणामध्ये एक सुसाईड नोटदेखील आढळून आली होती. सुसाईड नोटमध्ये मला काही वरिष्ठ मुलींचा त्रास होता असे मयत डॉक्टरने नमूद केलं होतं. पुढील तपास सुरु आहे. Surya marathi news

जिगाव प्रकल्पबाधीत शेतकर्यांचे प्रश्र्न निकाली काढा :- अक्षय पाटील

0

 

शेगाव:- जिगाव प्रकल्पाचे काम चालू झाले तेव्हापासून जळगाव जा. तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांची शेती ही जिगाव प्रकल्पामध्ये बाधीत म्हणुन येते.

त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या स्वतःच्या मालकीची शेती ही दुःख सुखाच्या प्रसंगांना विकता येत नाही.

तसेच शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा फायदा सुद्धा घेता येत नाही.

या प्रश्र्नांना प्रकल्पाचे काम चालू झाले तेव्हापासून शेतकऱ्यांना ह्या सर्व अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

त्यामुळे प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ निकाली काढावे.

या मागणी करता आज उपकार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग ( जिगाव ) शेगाव यांच्याशी चर्चा केली.

यावेळी अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

घुग्घुस परिसरात छट पूजा पर्व उत्साहात साजरा

0

 

घुग्घुस प्रतिनिधि
रमेश सूद्धाला

बुधवार 10 व गुरवार 11नोव्हेंबर रोजी सकाळी व सायंकाळी दरम्यान नकोडा येथील वर्धा नदीच्या तिरावर उत्तर भारतीय बांधवातर्फे छट पूजेच्या पर्वाचे दोन दिवस आयोजन करण्यात आले आहे.

घुग्घुस परिसरातील उत्तर भारतीय बांधव दर वर्षी छट पूजेचा पर्व उत्साहात साजरा करतात मागील पाच वर्षा पासून याठिकाणी छट पूजा पर्वाचे आयोजन करण्यात येत आहे.

सकाळी उगवत्या सूर्याला व सायंकाळी मावळत्या सूर्याला अर्क वाहून हा पर्व साजरा करण्यात येतो तसेच माता ही आपल्या मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते.
नदीच्या तिरावर दिवे लावण्यात आले तसेच खेळणीचे दुकाने थाटण्यात आली होती.

याप्रसंगी भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, नकोडा जिप सदस्य बिरजू पाझारे, नकोडा सरपंच किरण बांदूरकर यांनी भेट देऊन उत्तर भारतीय बांधवाना छट पूजा पर्वाची शुभेच्छा दिली.

यावेळी उत्तर भारतीय मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रत्नेश सिंग, डॉ. सुनील राम, अनिल वर्मा, कुबेर वर्मा, रविश सिंग,गोपाल वर्मा, रामजी सिंग, राजकुमार सिंग, अश्विनी सिंग, अरविंद गुप्ता, मानस सिंग, विवेक तिवारी, कृष्णा शाह, रवी सिंग, सुमेर सिंग, प्रीतम शर्मा, अभिजित सिंग, सुरज सिंग, विनय व मोठया संख्येत पुरुष, महिला, मुलं,मुली तसेच वयोवृद्ध सहभागी झाले होते.

सैराट फेम सल्ला ,बबन फेम प्रांजलीच्या उपस्थितीत पूरस्कार पूजा पानसरे असदपूर

0

 

उषा पानसरे  कार्यकारी संपादक

मो 9921400542 अमरावती

सैराट फिल्म चे अभिनेता सल्ला उर्फ अरबाज शेख व बबन फिल्म ची अभिनेत्री प्रांजलीच्या उपस्थितीत पूरस्कार सोहळा दि.३१,११,२१गूरू माउली प्रोडक्शन शिव छत्रपती साम्राज्य बहूउद्देशिय सेवाभावी शिक्षण संस्था आकोट दारा आयोजित सम्मान पत्र कूमारी पूजा गोकूल पानसरे रा.असदपूर पूजा पानसरे ला सैराट चे अभिनेता संल्ला उर्फ अरबाज शेख अभिनेत्री प्रांजली फिल्म बबन याच्या हस्ते सन्मान पत्र देण्यात आले शिव छत्रपती एज्यूकेशन सोसायटी सातारा अध्यक्ष सूयोग देशमूख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती उदयनराजे भोसले महाराज याचे निकटवर्नीय आशीष भोसले तसेच यूवा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेश गणगणे अभिनेत्री शेख मूस्कान ,तेल्हारा. नायब तहसिलदार राजेश गूरव याची प्रमूख उपस्थिती यावेळी मान्यवर संतोष खवले निर्माता व गूरूजी ईतर उपस्थित होते तसेच पूजा ( गोकूल ) पानसरे हिने यशवंतराव चौव्हाण महाराष्ट ओपन ईनंर्वसिटी . शिवाजी काॅलेज आकोट वरून बि.काॅम फंस्टीयर मधून एटी .टू. 82 टक्के मार्क्स प्रात्य केले । पूजा उर्फ पिंकी हिने आपल्या मंम्मी आजारी असता सात आठ महीण्या पासून पूजाने व तिचा लहान भावू सागर या दोघानी दूखात खूप सेवा करून व घर संभाळून बिना टूशन ची पूजाने बि.काॅम .फंस्टीयर मधून 82 टक्के गूण मिळून दाखविली पूजा ला लहान पणा पासून कूठल्याही विषयाची टूशन नसताना देखिल दरवर्षी चागल्या गूणाने पास झाली असून पूजा वसागर दोघावर सर्वाना गर्व आहे मंम्मी उषा पानसरे पत्रकार व संपादक ) भावु सागर कडून खूप खूप अभिनंदन व सूर्या न्यूज टिम व दै दंडाधिकार कडून हार्दीक अभिनंद अशी मूल नसिबवान ला मिळतो ।

गेवराई चा आमदार सुनिल ठोसर होणार. रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अँड. रविप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख

0

 

अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक

धोंडराई या ठिकाणी रयत शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी मेळावा आयोजित केलेला होता सदर मेळाव्यास जिल्ह्यातील पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणा मध्ये बोलताना रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख म्हणाले की, गेवराई तालुक्याची अवस्था अतिशय वाईट झालेली असून संपूर्ण तालुक्यामध्ये रस्ते खराब झालेले आहेत, नागरिकांना आरोग्य सेवा पुरवली जात नाही, पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती बऱ्याच गावांमध्ये निर्माण झालेली आहे, कोविढ काळामध्ये गोरगरिबांना कुठल्याही पद्धतीची सुविधा मिळाली नाही, शेतकऱ्यांच्या मुलांना अद्यापपर्यंत रोजगार उपलब्ध करुन दिलेला नाही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना बाबत जाणून-बुजून राजकारण करून बँकांचे कर्ज उपलब्ध करून दिले जात नाही, हे जर चित्र बदलायचे असेल तर तुमच्या आमच्यातील शेतकऱ्याचा मुलगा तालुक्याचा आमदार होणे गरजेचे आहे. म्हणून येणाऱ्या विधानसभेला मी सुनील ठोसर याला रयत शेतकरी संघटना माध्यमातून विधानसभेला उभा करणार आहे. मला खात्री आहे की सर्व गोरगरीब जनता सुनील च्या पाठीमागे ठामपणे उभे राहील व येणाऱ्या विधानसभेला त्याला निवडून देईल.
या सभेस रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर ,पुणे जिल्हा अध्यक्ष रामदास कोतवाल , पुणे जिल्हा कार्यअध्यक्ष हेमंत चौधरी,सहचिटणीस अंकुश हंबीर, तालुका अध्यक्ष राजेंद्र मोरे, युवक आघाडी तालुका प्रमुख गुरु हतागळे, बंडू सगळे बीड जिल्हा संपर्क प्रमुख, बाबुराव भोईटे सर तालुका प्रमुख, बाळराजे जाधव बीड जिल्हा कार्याध्यक्ष, प्रदीप झोडगे उप जिल्हा प्रमुख, सोनाली येवले महिला आघाडी जिल्हा प्रमुख, अर्जुन भाऊ चाटे अंबेजोगाई तालुका प्रमुख, महेश शेळके बीड तालुका प्रमुख, प्रमोद सर डोंगरे बीड जिल्हा सचिव सह विविध मान्यवर व्यक्ती, शेतकरी व मित्र परिवार आदी मान्यवर उपस्थित होते

तलवारीने वाढदिवसाचा केक कापणे भोवले

0

 

शेगाव: वाढदिवसाचा जल्लोष साजरा करण्यासाठी शेगांव शहरातील शिवनेरी चौक येथील रहीवाशी देवराज रघुनाथ साहु वय ४६ यांनी काही दिवसांपुर्वी वाढदिवसाचा केक तलवारीने कापल्या प्रकरणी तलवार जप्त करुन आरोपी यास अटक करण्यात आली आहे.

याबाबत शेगांव शहर पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १० वाजताच्या दरम्यान आरोपी देवराज रघुनाथ साहू वय ४६ वर्ष यांनी काही दिवसांपूर्वी वाढदिवसाचा केक तलवारीने कापल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानुसार बालाजी फास्ट फुडचे चायनीज दुकान गांधी चौक या ठिकाणी शहर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली असता त्याच्या ताब्यातून २ हजार रुपये किंमतीची विनापरवाना एक लोखंडी तलवार मिळून आली. यावरून तलवार जप्त करून आरोपी यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नरेश तायडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध कलम ४,२५ शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ हे करीत आहेत.