Home Blog Page 376

सामाजिक कार्याची दखल घेत न्यू अपोस्टलीक चर्च तर्फे काँग्रेस अध्यक्षाचा सत्कार कार्यक्रम संपन्न

0

 

घुग्घुस प्रतिनिधि
रमेश सूद्धाला

घुग्घुस : येथील शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष राजूरेड्डी हे गेल्या अनेक वर्षांपासून निरंतर समाजसेवा करीत आहे यात संपूर्ण शहरात खाजगी टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा, कोरोना काळात गरजवंत नागरिकांना अन्नधान्य पुरवठा, समाजातील वंचित घटकांना आर्थिक मदद, मेरा शहर मेरी जवाबदारी या स्वच्छता अभियाना अंतर्गत शहरात केलेल्या स्वच्छता कार्याची दखल घेत आज रविवार रोजी शालीकराम नगर येथील न्यू अपोस्टलीक चर्च येथे पास्टर व सन्माननीय सदस्यगण यांच्यातर्फे शहर अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर यांच्यासह संपूर्ण काँग्रेस टीमचे शाल व पुष्पगुच्छ द्वारे स्वागत करून टीम साठी प्रार्थना करण्यात आली.
याप्रसंगी काँग्रेस कमिटीचे रोशन दंतलवार, विशाल मादर, सुकुमार गुंडेटी, बालकिशन कुळसंगे, आरिफ शेख,संजय कोवे, सुनील पाटील व मोठ्या संख्येने ईसाई समाज बांधव उपस्थित होते.

रविकांत तुपकरांच्या प्रयत्नाने वन्यप्राण्यांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकनुकसानीसाठी ३ कोटी ३० लाखांची मदत मिळाली

0

 

वन्य प्राण्यांमुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची, पशुधनाची तसेच मनुष्यहानी होऊन झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली होती. यासाठी त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता दरम्यान त्यांनी केलेला पाठपुरावा आणि आंदोलनाचा दणका पाहता बुलडाणा जिल्ह्याला वनप्राण्यांनी केलेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी ३ कोटी ३० लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील काही भागात वन्यप्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होते, काही ठिकाणी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी, शेतमजूर गंभीर जखमी होतात तर काही ठिकाणी मनुष्यहानी देखील होते. शिवाय वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशुधन दगावल्याच्याही मोठ्या घटना आहेत. सदरची नुकसानभरपाई एका महिन्यात देणे बंधनकारक असते परंतु जिल्ह्यातील सन २०१९ – २० आणि २०२० – २१ या दोन वर्षांमधील नुकसानभरपाईचे सर्व प्रकरणे प्रलंबित होते. सदर झालेल्या नुकसानीचे पंचनामे देखील करण्यात आलेले होते परंतु शासनाकडून मदत देण्यात आली नव्हती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या पाठपुराव्यामुळे सदर नुकसान भरपाइची रक्कम जिल्ह्याला प्राप्त झाली असून गेल्या दोन वर्षांपासून मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे.

यावल येथील विवाहितेचा शेगाव येथील सासरच्या मंडळीचा छळ; पतीसह आठ जणांवर गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

वराच्या मंडळीस लग्नात व्यवस्थित हुंडा व पैसे दिले नाही म्हणून विवाहितेला मारहाण करून छळ करणाऱ्या पतीसह आठ जणांविरोधात यावल पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी ८ नोव्हेंबर रेाजी सायंकाळी ६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, यावल येथील माहेर असलेल्या मोनिका मिलींद ताडे (वय-२६) रा. माटरगाव ता. शेगाव जि. बुलढाणा यांचा विवाह मिलींद अनिल ताडे यांच्याशी रितीरिवानुसार झाला. काही दिवस चांगले गेल्यानंतर पती मिलींद याने विवाहितेला लग्नात व्यवस्थित हुंडा व पैसे दिली नाही. या कारणावरून शिवीगाळ करणे व मारहाण करणे सुरू केले. तसेच सासू, आजल सासू, मावस सासू यांनी देखील विवाहितेला शिवीगाळ केली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता यावल येथील माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून सोमवारी ८ नोव्हेंबर रेाजी सायंकाळी ६ वाजता यावल पोलीस ठाण्यात पती मिलींद अनिल ताडे, सासू राजकन्या अनिल ताडे, मामे भाऊ सुमित प्रल्हाद विधाते, गैनिनाथा श्रीराम विधाते, आजल सासू कमलबाई श्रीराम विधाते, सुमित्रा विलासराव सौदागरे, रविंद्र भोजकर आणि मिरा भोजकर सर्व रा. माटरगाव ता. शेगाव जि. बुलढाणा यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉँस्टेबल असलम खान हे करीत आहे .

ग्रामसेवकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आ. शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल करा ग्रामसेवक संघटना आक्रमक; तहसीलदारांना निवेदन

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

ग्रामसेवकांना चिथावणीखोर अपशब्दाचा वापर करणारे औरंगाबाद येथील आमदार संजय शिरसाट यांचा निषेध करत त्यांच्या गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावल येथील महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने तहसीलदार महेश पवार व प्रभारी गटविकास अधिकारी विलास भाटकर आणी यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, औरंगाबाद येथील आमदार संजय शिरसाट यांनी औरंगाबाद येथे झालेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत भाषण करतांना शासकीय व्यासपीठावरून ग्रामसेवकांना भामटा व हारामखोर असे अपशब्द वापरून ग्रामसेवकांची बदनामी केली. त्याचप्रमाणे चिथावणीखोर शब्दाचा वापर करून ग्रामविकासात सरपंच व ग्रामसेवक यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामसेवक हा तुमचा नोकर आहे. तो तुमच्या हाताखाली काम करतो, त्यांचे ऐकू नका असे बेजबाबदार वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे राज्यातील ग्रामसेवकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आमदार संजय शिरसाट यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी आज ग्रामसेवकांनी एक दिवसीय कामबंद आंदोलन पुकारले आहे. या संदर्भात यावल तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष रूबाब तडवी, तालुका सचिव पुरूषोत्तम व्ही तळेले , सहसचिव हितेंद्र महाजन ,राजू तडवी प्रविण कोळी , दीपक तायडे, यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य या प्रसंगी मोठया संख्येने उपस्थित होते .

अतिवृष्टी व ढगफुटीतुन वगळन्यात आलेले गावे समाविष्ट करा व हलगर्जी करण्याऱ्या अधिकारी वर कारवाई करा

0

अन्यथा आंदोलन करण्यात येईल
भाजप चे मुख्यमंत्री याना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन

ढगफुटी व अतिवृष्टी च्या यादीतून जी गावे वगळण्यात आली ती पुन्हा समाविष्ट करा व हलगर्जी करणाऱ्या तलाठी,मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही आंदोलन करू असे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री याना संग्रामपूर तालुका भाजप च्या वतीने दि 9 नोव्हेंबर रोजी देण्यात आले
सप्टेंबर महिन्यात संग्रामपूर तालुक्यातील बऱ्याच गावात ढगफुटी व अतिवृष्टी सारखा पाऊस झाला त्या मुळे नदी नाल्याला पूर आल्यामुळे शेतात पाणी घुसले व शेती खरडून गेली व या परिसरातील सर्व उद्वस्त झाली याच्या वृत्तपत्र मध्ये बातम्या प्रकाशित पण झाल्या त्या नंतर महसूल मंडळ कामावर लागले व त्या नुकसान झालेल्या शतीचे व पिकाचे पंचनामे केले मात्र ज्या वेळेस नुकसानभरपाई आली त्या यादीत व त्या निधीत बऱ्याच गावाला वगळण्यात आले या मध्ये टाकळी पंच,आसवंद,पातुरडा खुर्द,पातुरडा बु,कुंडेगावं गावे वगळन्यात आली हे सर्व करत आसताना मंडळ अधिकारी व तलाठी यांनी हलगर्जी पणा केला त्या मुळे या यादीतून वगळण्यात आले त्या मुळे शेतकरी या मदतीपासून वंचित राहिले त्या मुळे पातूरडा सर्कल त्या निष्क्रिय अधिकारी वर ताबडतोब कारवाई करण्यात यावी अन्यथा भारतीय जनता पार्टी शेतकरी याना सोबत घेऊन आपल्या जिल्हाधिकारी च्या दालनात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल याची सर्वस्वी जवाबदारी प्रशासन ची राहील निवेदनवर संग्रामपूर तालुका अध्यक्ष भाजप लोकेश राठी,भारत वाघ, रामदास म्हसाळ, गोपाल वाकडे,अविनाश धर्माळ, दत्ता डिक्कर,संजय मेंहगे,सुनिल मेंहगे,पराग घोराड, विठ्ठल वानखडे, रामदास ठाकरे ऊकर्डा कुरवाळे, नारायण अवचार या सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते

तृतीयपंथीयांचे चेहर्यावर हास्य फुलले तृतीयपंथीयांना साडी चोळी,मिठाई व भेटवस्तू देवून केली दिवाळी साजरी

0

 

शेगाव :   दिवाळी म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन आनंद लुटण्याचा सण, परंतु समाजाने कायम दुर्लक्षित केलेला घटक म्हणजे तृतीयपंथीयांना सुद्धा दिवाळीचा आनंद घेता यावा व त्यांची सुद्धा दिवाळी गोड व्हावी या हेतूने येथील नव्याने रूजू झालेले तहसीलदार समाधान सोनवणे यांनी शहरातील  तृतीयपंथी समाजसोबत दिवाळी साजरी केली. प्रत्येकाला साडी चोळी, मिठाई आणि भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्यात.
तहसीलदार समाधान सोनवणे म्हणाले की, साक्षात भगवान शंकर सुद्धा आपणांस अर्धनारीनटेश्वर रुपात पाहायला मिळतात. असे असूनही समाज यांच्याकडे कायम दुर्लक्ष करत आला आहे. परंतु सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी व या सर्वांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून मी आपणा सर्वांसोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या काळात अनेक तृतीयपंथी लोकांनी यशाची अनेक शिखरे सर केली आहेत. काही राज्यांच्या विधिमंडळात सुद्धा ते प्रतिनिधित्व करतात. त्यांचा आम्हाला अभिमान आहे. आपणासही आपल्या भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा. आपणास काहीही अडचण आल्यास अथवा मदत लागल्यास मला केव्हाही संपर्क करू शकता.’ असेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.
या नाविन्यपूर्ण उपक्रमाने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसत होते. ‘एवढ्या वर्षात प्रथमच कोणीतरी आमचाही विचार केला आणि आमच्यासोबत दिवाळी साजरी केली. आम्हाला खूप आनंद झाला. तहसीलदार समाधान सोनवणे यांच्याप्रमाणेच बाकी समाजाने सुद्धा आम्हाला सामील करून घ्यावे. ‘ या शब्दात तृतीयपंथीयांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे आयोजन तहसीलदार समाधान सोनवणे व मित्र परिवारातील सदस्यांनी केले होते.
तृतीयपंथी हा समाजातील उपेक्षित घटक असून  समाजाने त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, तृतीयपंथी यांच्यातही मानवाचा जीव आहे.जन्म – मृत्यू कोणाचे हातात नाही.जन्म कुठे आणि स्री, पुरूष किंवा तृतीयपंथीय म्हणून झाला तर दोष त्या व्यक्तींचा नाही.त्यामुळे त्या जिवालाही जगवणे,जगू देणं ,त्यासाठी त्यांना समान संधी,समान वागणूक समाजाने दिली पाहिजे.असेही आवाहन त्यांनी केले.
@ कोविड लसीकरणासाठी हातभार लावावा…..
कोविड लसीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहीत करून राष्ट्रीय कार्यात सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी तहसीलदार समाधान सोनवणे यांनी तृतीयपंथीयांना केले.
यावेळी नारायण पाटील संचालक  ज्ञान अर्णव अकॅडमी जळगाव खान्देश, अनिल सुर्वे संचालक चैतन्य फाउंडेशन जळगाव खानदेश, किरण जाधव, कल्पेश चौधरी,ओम तायडे,जिल्हा पत्रकार संघाचे माजी कोषाध्यक्ष संजय सोनोने, प्रेस क्लब अध्यक्ष अनिल उंबरकार,शेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश चौधरी,अमर बोरसे,मंगेश ढोले, विजय नामदास आदींची प्रामुख्याने  उपस्थिती होती.

रोटी ते भो टा रस्त्याचे काम त्वरित सुरू करा मनसेची मागणी मनसेचे आग्रही मागणी

0

 

सुनिल पवार नांदुरा ता.प्रतिनिधि

वेळोवेळी निवेदन देऊनही जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा परिषद समोर आंदोलन करूनही अजूनही रस्त्याचे काम सुरू झालेले नाही सुरू झालेले काम अर्ध्यातच बंद पडल्यामुळे त्वरित रस्त्याचे काम चालू करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मलकापूर यांच्याशी निवेदनाद्वारे ही मागणी केलेली आहे की रोटी ते भोटा या रस्त्याचे रोडच्या कामाला सुरुवात झाली होती परंतु दोन दिवस काम करून आज रोजी रस्त्याचे काम जैसे थे त्याच स्थितीत असून बंद पडले आहे कित्येक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना काम बंद असल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे पण आपल्या खात्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यामुळे काम बंद झाले आहे या रस्त्याचे टेंडर व सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तरी पण काम बंद पडल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या प्रति तुमच्याबद्दल व तुमच्या खात्याबद्दल व्यक्त होत आहे तरी लवकरात लवकर या रोजच्या कामाला सुरुवात करून जलद गतीने काम करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नांदुरा तालुका अध्यक्ष भागवत उगले यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्याकडे केली आहे आता हा अंतिम इशारा असून यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे तालुकाध्यक्ष भागवत उगले यांनी बोलताना सांगितले….

कोरोना ची लस घेतली नसेल तर कुठल्याही शासकीय ऑफिस मध्ये प्रवेश नाही

0

 

शेगाव: दिनांक ८/११/ २०२१ पासून नवीन नियम लागू सर्व शासकीय कार्यालयामध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही कोरोना ची लस घेतली असेल तर त्याचे प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय प्रवेश घेता येणार नाही.त्यामध्ये तहसील कार्यालय ,तलाठी कार्यालय ,तुमच्याजवळ जर लसीचे चे प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला तलाठी कार्यालयामधून उत्पन्न दाखला मिळणार नाही किंवा तहसील मधून तुम्हाला जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर किंवा उत्पन्नाचा दाखला हा सुविधा सर्व कागदपत्र सोबत तुम्हाला लस घेतल्याचे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे असा आदेश तहसीलदार तहसीलदार यांनी तहसील कार्यालयामध्ये असे फलक लावले आहेत. तरी सर्व नागरिकांनी लस घेणे आवश्यक आहे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते घेतलेल्या व्यक्तींना प्रमाणपत्राचे वाटप

0

 

आज दिनांक 7 11 2019 रोजी रोहणा ता. खामगाव येथे जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये करोना लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते सदर लसीकरण कॅम्पमध्ये 18 वर्षावरील नागरिकांनी करोना लसीकरणाचा फायदा घेतला सदर लसीकरण कॅम्पला
जिल्हाधिकारी साहेब , उपविभागीय अधिकारी जाधव साहेब ,
तहसीलदार श्री पाटोळे साहेब,
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री राजपूत साहेब, तालुका आरोग्य अधिकारी श्री खंडारे साहेब, मंडळाधिकारी श्री बोराखडे साहेब ,तलाठी श्री उबरहंडे साहेब, सचिव पवार साहेब, सरपंच कैलास सावंग,जिल्हा परिषद हायस्कूल चे सर्व शिक्षक कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सर्व कर्मचारी वर्ग तसेच ग्रामपंचायत कर्मचारी कोतवाल व संचालक महा ई सेवा केंद्र रोहणा हे उपस्थित होते
महा ई-सेवा केंद्र रोहणा
यांच्याकडून लस घेतलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र काढून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले,

तालुक्यातील उंटावद येथील महेश पाटील यांची उत्तर महाराष्ट्र पत्रकार संघाच्या विभागीय उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. याबाबत त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

0

 

यावल,(प्रतिनिधी)विकी वानखेडे

किनगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समीतीत नुकतीच भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अय्युब पटेल हे होते. बैठकीत महेश पाटील यांच्या उत्तर महाराष्ट्र विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड केल्याचे निवडपत्र संस्थापक अध्यक्ष अय्युब पटेल यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी भारतीय पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भागवत चौधरी , उपाध्यक्ष सचिन नायदे , सचिव शब्बीर खान , जिल्हा सहकार्यवाहक नितिन बडगुजर, विभागीय संघटक मनोज नेवे , सदस्य सुनिल पिंजारी , विक्की वानखेडे , दिपक नेवे, अरूण अजमेरा आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांच्या विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. या चर्चेत अय्युब पटेल , महेश भागवत पाटील , प्रकाश चौधरी यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले.