Home Blog Page 377

शुल्लक कारणावरून अश्लील शिवीगाळ व चापटाबुक्क्यांनी मारहाण.

0

 

शेगाव: शुल्लक कारणावरून अश्लील शिवीगाळ व चाप्ता बुक्क्यांनी मारहाण तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेगाव ग्रामीण पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळा बुद्रुक येथील उघड्यावर मटण विक्री व तंबाखूजन्य पदार्थ वेधरित्या विक्री बाबत गोपाल हरिभाऊ कान्हेरकर वय 26 वर्ष यांनी त्यांच्या मोबाईलवर स्टेटस ठेवले होते आरोपी विनोद ध्रुव सावदेकर त्यांच्या घरासमोर आला व त्याने आमची बाई सरपंच आहे तू सरपंच व उपसरपंच यांची बदनामी का करत आहे असे म्हणून अश्लील शिवीगाळ केली व चाप्ता बुक्क्यांनी मारहाण करून तुला पाहून घेतो अशी धमकी दिली फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट व मेडिकल सर्टिफिकेट वरून आरोपी विनोद सावदेकर विरुद्ध कलम 294 323 506 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पीएसआय निलेश डाबेराव करीत आहेत

रोहिले बु येथे संविधान आर्मी नामफलकावरील डिजिटल बोर्ड फाडुन विटंबना केली.

0

 

नांदगाव  तालुक्यातील रोहिले बु येथील येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळे चे जवळ असलेल्या लोखंडी पाटीवरील डिजिटल संविधान आर्मी शाखेचा बोर्ड गावातील समाज कंटक यांनी फाडला असुन एक प्रकारची संविधानाची विटंबना केलीआसल्य ची घटना दिनांक 4 नोव्हेंबर 2021रोजी गुरुवारी घडली आसुन 5 नोव्हेंबर 2021रोजी शुक्रवारी नांदगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.
मौजे रोहिले बु पो बोलठाण ता.नांदगाव जि नाशिक येथे संविधान आर्मी शाखेचे नामफलकाचे उदघाटन संविधान
आर्मी चे संस्थापक अध्यक्ष जगण भाई सोनवणे यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले होते. येथे एक ते दोन महीने होते ना होते तोच दिनांक 4 नोव्हेंबर 2021रोजी गुरुवारी गावतील समाज कंटकानी रात्री अंधाराचा फायदा घेऊन संविधान आर्मी चे लोखंडी पाटीवरील डिजिटल बोर्ड फाडला आहे. याचाच अर्थ असा होतो की संविधानाची अपमान (विटंबना) झाले सारखे होते. गावातील समाज कंटकाना अटक करण्यात येवुन कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी नांदगाव पोलिस स्टेशन मध्ये गेले असता नांदगाव पोलिस यांनी निवेदन स्विकारले नाही. तक्रार दाखल करुन घेतली असुन दिनांक 5नोव्हेंबर 2021रोजी शुक्रवारी सायंकाळी उशिरा 5 ते 6वाजेचे सुमारास भा.द.वि.कलम
427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन नांदगाव पोलिस स्टेशन मध्ये रजिस्टर नंबर 1067 असा आहे. व पुढील तपास बोलठाण पोलिस औट पोस्ट चे गागुरडे दादा करत आहेत आशी माहिती नांदगाव पोलिस स्टेशन यांनी दिली.

निर्वस्त्र अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

0

 

SURYA MARATHI NEWS

नालासोपारा : विरारच्या कारगिलनगरमधील एका इमारतीमध्ये राहणाऱ्या २८ वर्षीय नवविवाहितेचा निर्वस्त्र अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह सापडल्याने संपूर्ण विरार परिसरात खळबळ उडाली आहे. व या महिलेच्या हाताची नस कापलेली आहे. घटनेची माहिती मिळताच विरार पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले असून, पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. विरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पुढील तपास करत आहे.
विरारच्या कारगिलनगरमधील जय तुळजा भवानी संकुल बिल्डिंग नंबर ६ मध्ये राहणाऱ्या प्रिया कांबळे (२८) या महिलेचा हाताची नस कापलेल्या अवस्थेतील रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह सापडला आहे. तिचा पती हा शुक्रवारी रात्रपाळीला कामावर गेला होता. शनिवारी सकाळी कामावरून घरी परतल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. व या महिलेचे एक महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. व तिच्या पतीने विरार पोलिसांना घडलेल्या घटनेची सम्पूर्ण माहिती दिली आहे. Surya marathi news

राठोवा येथील अनेक युवकाचा एमआयएम पक्षात प्रवेश

0

 

दगडू पिंगळे निलंगा प्रतिनिधी

मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन एम आय ॲम पक्षाचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या कार्याला प्रभावित होऊन निलंगा तालुका एम आय एम पक्षाचे अध्यक्ष सय्यद शाहरूख यांच्या उपस्थितीमध्ये आज निलंगा येथे राठोडा येथील अनेक युवकाचा एम आय ॲम पक्षात प्रवेश झाला आहे
यामुळे निलंगा तालुक्यात यमाय पक्षाला आणखी बळ मिळाले आहे यामध्ये प्रवेश करणारे शुभम कांबळे वाघ अंबर कांबळे आरिफ शेख संदीप कांबळे अमर सूर्यवंशी अहमद शेख दीपक कांबळे, लक्ष्मण कांबळे पप्पू कांबळे महबूब शेख आशीष कांबळे ओमकार कांबळे गिरीधर कांबळे घनश्याम कांबळे लालासाहेब कांबळे पप्पू कांबळे सह अनेक युवा कार्यकर्त्यांचा एम आय ॲम पक्षांमध्ये तालुकाध्यक्ष सय्यद शाहरुख यांच्या हस्ते प्रवेश

Breking news Anil deshmukh देशमुखांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठरी

0

 

SURYA MARATHI NEWS

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.अनेक दिवसांपासून गायब असलेले अनिल देशमुख अचानक ईडी कार्यालयात हजर झाले होते.व त्यांनंतर त्यांची तब्बल तेरा तास चौकशी झाली होती.व त्यानंतर त्यांना ईडी कडून अटक करण्यात आली होती. १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या या आरोपांनंतर गेली अनेक दिवस देशमुख हे गायब झाले होते. व सोबतच याच काळात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व ज्यांनी देशमुखांवर हे गंभीर आरोप केले ते, व परमवीर सिंग हे देखील गेल्या अनेक दिवसांपासून गायब आहेत. पन काही दिवसांपुर्वी परमबीर सिंग यांनी एक पत्र लिहीलं होतं त्यात ते म्हणाले होते अनिल देशमुखांविरोधात माझ्याकडे कोणताही पुरावा नाही. व
तब्बल तेरा तास चौकशी चालल्यानंतर ईडीकडून देशमुख यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे येत्या काळात देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले होते. आजच देशमुख यांनी खुले पत्र लिहीत परमवीर सिंग यांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे या पत्रात म्हटले होते. या पत्रातून त्यांनी सचिन वाझे ( sachin vajhe) व परमवीर सिंग यांना लक्ष्य केले होते. व तसेच मी संविधान मानणारा भारताचा नागरिक असून ईडीकडून करण्यात येणाऱ्या चौकशीला सामोरे जाऊन ईडीच्या तपासाला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे म्हटले होते. व तसेच हि चौकशी निष्पक्षपणे व्हावी अशी अपेक्षा देखील त्यांनी या खुल्या पत्रात व्यक्त केली होती. Surya marathi news

कर्जाला कंटाळून व्यावसायकाची आत्महत्या,

0

 

SURYA MARATHI NEWS

जळगाव ,भुसावळ येथील विजय साऊंड सर्व्हिसच्या संचालक अशोक रामकृष्ण चौधरी यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी पहाटे उघडकीस आली आहे. तर या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तरी या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी ताबड़तोब धाव घेत पंचनामा केला. व या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
याबाबत असे की, अशोक चौधरी यांच्या मृत्यूमुळे परीसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. चौधरी यांच्यावर पतसंस्थांचे सुमारे 20 लाखांचे कर्ज झाले होते शिवाय कोरोना काळात व्यवसायही ठप्प झाल्याने कर्जाचे हप्ते थकल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा कठीण काळ सुरू असल्याने कार्यक्रमांना बंदी असल्याने साऊंड सर्व्हिस व्यवसाय चालवणेही कठीण झाले होते. त्यातच अशोक चौधरी यांनी व्यवसायासाठी सुमारे 20 लाखांचे कर्ज काढल्यानंतर या कर्जाचे सुमा हप्ते भरणेही जिकिरीचे जात असल्याने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घरातच पोर्चच्या बंगळीला दोरीने त्यांनी गळफास घेत जीवनयात्रा संपवली. पहाटे कुटुंब उठल्यानंतर त्यांना ही घटना दिसताच कुटूंबियांनी आक्रोश केला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. Surya marathi news

सेलु रोडवर असलेले गिट्टी क्रेशर मधून चालणाऱ्या वाहनांमुळे रस्त्याची दुरवस्था

0

 

वर्धा:- हिंगणघाट तालुक्यातील सावली वाघ येथे असलेले गिट्टी क्रेशर मुळे गावातील लोक त्रस्त झाले आहे गिट्टी क्रेशर मधून चालणाऱ्या जड वाहनांमुळे सावली वाघ येथील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे
अनेकवेळा जिल्हाधिकरी, तहसीलदार व लोकप्रतिनिधीकडे निवेदनाच्या माध्यमातून रस्त्याची दुरुस्ती व जड वाहनाची बंदी करण्याबाबत मागणी केली. परंतु, त्याचा कुठलाच फायदा झाला नसल्याने, दिवसेंनदिवस या गिट्टी खदान मधून चालणाऱ्या जड वाहनांमुळे रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे कधीही मोठा अपघात होणाची शक्यता नाकारता येत नाही. गावाला लागुन असलेल्या खदानमधून मुरूम, गिट्टीची क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात नियमित वाहतूक होत आहे. तसेच खदानी मधून गौणखनिज उत्खनन होते.
त्याशिवाय स्टोन क्रेशर, डांबर प्लांट आहेत. त्यामुळे जड वाहनाची ये-जा चालू राहते म्हणून रस्त्यावर मोठमोठ खड्डे पडले आहेत. त्यामुळे चारचाकी किंवा दुचाकीने प्रवास करणे कठीण झाले आहे. रसत्याने अनेक वेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
तसेच विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आलेला आहे सावली सेलू पोथरा परिसरातील गावामधून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी मार्ग सावली हिंगणघाट ला जातात आणि त्याच रस्त्याने मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत असल्याने अनेकवेळा छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या गिट्टीखदान मधून चालणाऱ्या जड वाहनांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आजूबाजू गावातील नागरिक व विद्यार्थी करीत आहे
जोपर्यंत काही मोठा अपघात होत नाही तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांचे डोळे उघडणार नाहीत का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

81 वर्षीय वृद्धाकडून 35 वर्षीय महिलेचा विनयभंग

0

 

SURYA MARATHI NEWS

जळगांव जामोद येथील 81 वर्षीय वृद्धाकडून एका 35 वर्षीय महिलेस दिनांक 31 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान घरी भेटण्यास बोलावून वाईट उद्देशाने तिचे साडीचा पदर ओढून कवठ्यात धरून विनयभंग केला व तू जर कुणाला सांगितले तर तुझे बरे वाईट करेल अशी धमकी दिली सदर महीलेचा विनयभंग झाल्याने पिडीत महीलेने जळगांव जा. पो स्टे ला जाऊन रिपोर्ट दिल्यावरून जळगांव जा पो. स्टेशन ला जामोद येथिल आरोपी सेवाराम बस्तीराम भुतडा वय 81 वर्ष यांचे विरूद्ध अप.नं. 887/021 कलम 354 (अ)506 भांदवीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास जळगाव जामोद पोलिस स्टेशनचे पी. एस. आय. आवारे मँडम ह्या करीत आहेत.
Surya marathi news

Google Pay वापरता ना, मग ही तुमच्या कामाची बातमि

0

 

SURYA MARATHI NEWS

:-google pay जे लोक त्यांचे वॉलेट घरी विसरत राहतात त्यांच्यासाठी Google Pay सारख्या UPI पेमेंट पर्यायांसह जीवन सोपे झाले होते. व ज्यांच्याकडे रोख रकमेची कमतरता आहे तर त्यांना देखील हे मदत करते.(News for google pay users )
तथापि, लोक कधीकधी त्यांचा पासवर्ड किंवा UPI पिन पन विसरतात .
तर याच्याशिवाय UPI पेमेंट प्लॅटफॉर्मवर व्यवहार करणे शक्य नसते. पन या अशा वेळी रोख रक्कम असणे खूप उपयुक्त आहे. तर
तुम्ही तुमचा पिन विसरला असाल किंवा सुरक्षेच्या कारणास्तव तो बदलू इच्छित असाल तर तुम्ही तुमचा UPI पिन देखील बदलू शकता. Google च्या मते, जर वापरकर्त्यांनी 3 पेक्षा जास्त वेळा चुकीचा UPI पिन टाकला तर त्यांना त्यांचा पिन रीसेट करावा लागेल किंवा पुढील व्यवहार करण्यासाठी 24 तास प्रतीक्षा करावी लागेल.
या काळात वापरकर्ते पैसे पाठवू किंवा प्राप्त करू शकत नाहीत. तथापि, जर Google Pay वापरकर्त्यांना खात्री असेल की ते त्यांचा पिन विसरले आहेत, तर ते त्यांचा UPI पिन अपडेट करू शकतात.
तुमचा Google Pay UPI पिन बदलणे अॅपवरून सोपे आहे, कारण नोंदणीकृत क्रमांक तुमच्या फोनशी कनेक्ट केलेला आहे. Google Pay वर तुमचा UPI पिन बदलण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप फॉलो करणे आवश्यक आहेत.
Google Pay उघडा. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा फोटोवर टॅप करा.
तुमच्या बँक खात्यावर टॅप करा. तुम्हाला संपादित करायचे असलेले बँक खाते निवडा. फॉरगेट UPI पिन वर टॅप करा.
तुमच्या डेबिट कार्ड क्रमांकाचे शेवटचे ६ अंक आणि शेवटची तारीख टाका. नवीन UPI पिन तयार करा. एसएमएसद्वारे प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा. Google Pay वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यातील शिल्लक आणि मागील व्यवहार पाहता येतात. तुम्ही दिलेल्या स्टेप्स फॉलो करून Google Pay वर तुमच्या खात्याची शिल्लक रक्कम देखील तपासू शकता.
Google Pay उघडा.
सर्वात वरती उजवीकडे, तुमचा फोटो टॅप करा.बँक खाते.तुम्हाला ज्या खात्याची शिल्लक तपासायची करायची आहे व त्यावर टॅप करा. जे शिल्लक पहा टॅप करा .तुमचा UPI पिन टाका.
Surya marathi news

साई मित्र परिवार च्या वतीने साई चरण पादुका व साहित्य दर्शन सोहळा

0

 

हिंगणघाट :- दि. 7,8,9 नोव्हेंबर 2021 ला शिर्डी वरून साई बाबांच्या पादुका तसेच इतर साहित्य दर्शनासाठी येथील काळी सडक, दरबार चौक, रहेमान पटेल फैल येथे येत आहे.
दि. 7 ला पालखीचे आयोजन संध्याकाळी 5 वा. कार्यक्रम स्थळपासून करण्यात आले असून दि. 8 ला श्री नरेंद्र नासिरकर यांच्या साई -सतचरीत्र चा संगीतमय कार्यक्रम सायं. 7 वा. व 9 ला अतुल गौळकर यांच्या भक्तीसंगीताच्या कार्यक्रमाचे सायं. 7 वा आयोजन करण्यात आले आहे तसेच दिनांक 10 नोव्हेम्बर 2021 ला सायंकाळी 5 वा महाप्रसाद सुरू होईल त्याचप्रमाणे साई साहित्याचे दर्शन दि. 8 व 9 ला सकाळी 9 ते सायं 10 पर्यंत भक्तांना करता येईल तरी संपूर्ण साईभक्तांनी कार्यक्रमला हजर राहण्याचे आमंत्रण येथील स्थानिक साई मित्र परिवार, डॉ मुजुमदार वार्ड/नेहरू वार्ड च्या वतीने करण्यात येत आहे .
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा