Home Blog Page 378

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावल येथील शासकीय योजनांच्या मेळाव्याचा हजारों नागरीकांनी घेतला लाभ

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्यानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा वकील संघ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय, यावल येथे आयोजित शासकीय योजनांच्या मेळाव्यास यावल, चोपडा, फैजपूरसह इतर भागातील हजारो नागरीकांनी उपस्थित राहून शासकीय योजनांची माहिती करुन घेतली, त्याचबरोबर शेकडो नागरीकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणही करुन घेतले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्यानिमित्त ग्रामीण भागातील नागरीकांना शासकीय योजनांची माहिती व्हावी, या योजनांचा लाभ मिळावा, नागरीकांमध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी याकरीता, या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन जळगावचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण न्या. एस. डी. जगमलानी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष दिलीप बोरसे, सचिव श्री. ए.ए.के.शेख, फैजपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलग, यावलचे तहसीलदार महेश पवार, गटविकास अधिकारी भाटकर, यावल तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे चेअरमन एम. एस भारंचे, यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील आदि उपस्थित होते. याठिकाणी शासनाच्या महसुल, नगरपालिका, क्रीडा, महिला व बालविकास, कृषि, आरोग्य, ग्रामीण विकास यंत्रणा, शिक्षण, विविध राष्ट्रीयकृत बँका, आपत्ती निवारण कक्ष, जिल्हा पोलीस दल, घरकुल विभाग, वाहतुक शाखा, परिवहन विभाग, आदिवासी विकास विभाग, समाजकल्याण विभागासह इतर ३० विविध विभागांचे माहितीपूर्ण स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलला भेट देणाऱ्या नागरीकांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येत होती. त्याचबरोबर पात्र लाभार्थ्यांना आवश्यक दाखले त्याचठिकाणी देण्यात आले. या मेळाव्यात आरोग्य विभागामार्फत कोविड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते याचा शेकडो नागरीकांनी लाभ घेतला. या मेळाव्यास विविध तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता नायब तहसिलदार आर के पवार नायब तहसीलदार आर. डी. पाटील, न्यायालयाचे के. के. लोंढे, व्ही. आर. तायडे, एस. एम. तेली, आर. व्ही. आमोदकर, जी. एस. लाड, डी. ए. गावंडे, एच. जी. सूर्यवंशी, पी. डी. पाटील, एस. जे. ठाकुर,एम. डी. जोशी, एम. एस. सपकाळे, एस. बी. काठोके, कार्यक्रमाचे सूत्रसंचालक यांनी केले आदींनी परिश्रम घेतले

“त्या” नेत्यासोबत सेक्ससाठी भाग पाडल, अंडरवर्ल्ड डॉनच्या साथीदाराच्या पत्नीचा खुलासा

0

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक)

SURYA MARATHI NEWS

मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Dawood ibrahim) कथित सहकारी रियाज भाटीवर (Riaz bhati) त्याच्या पत्नीने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.व पतीने आपल्याला त्याचे बिझनेस मेन पार्टनर्स आणि अन्य हाय-प्रोफाईल व्यक्तींसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी मजबूरी करून भाग पाडले, व असा आरोप तिने केला आहे.व मुंबई पोलिसांकडे (Mumbai police) तिने एक अर्ज केला आहे. की त्यात तिने बलात्काराचा (Rape) आरोप करताना एका क्रीडापटू आणि राजकीय नेत्याचे नाव सुधा घेतले आहे.
व २४ सप्टेंबर २०२१ या तारखेला हा अर्ज केला आहे. व तिने विशिष्ट कुठली तारीख, पत्ता किंवा ठिकाण या अर्ज मध्ये केले नसून जिथे या सर्व गोष्टी घडल्या, ते नमूद केलेले नाही. “पोलिसांनी FIR नोंदवावा, यासाठी मी प्रयत्न करतोय. व पण ते सहकार्य करत नाहीयत. मी सप्टेंबर महिन्यात अर्ज दिला आहे. आता नोव्हेंबर महिना उजाडला असे तिने सांगितले. मी अनेकवेळा वेगवेगळ्या पोलिसांशी संपर्क साधला. माझ्याकडे पैशाची मागणी करण्याता आली. व पण मी भ्रष्टाचाराला का खतपाणी घालू? असा मी माझ्या ठिकाणी योग्य आहे” असे ति महिला ला म्हटले आहे.व या बातमि पेपर ‘द प्रिंट’ने हे वृत्त दिलं आहे. Surya marathi news

मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी नेत्ररुग्नांची तुकडी सेवाग्रामला रवाना

0

 

मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून निरंतर रुग्णसेवा सुरू राहील – भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचे मनोगत

( चंद्रपूर ,घुग्घुस) प्रतिनिधि
रमेश सूध्दाला

घुग्घुस येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातून घुग्घुस परिसरातील वयोवृद्ध नागरिकांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी नेत्र रुग्णांची तुकडी सेवाग्राम येथे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार रवाना करण्यात आली.
याप्रसंगी बोलतांना भाजयुमोचे विवेक बोढे म्हणाले की आम्ही सतत असे सेवाभावी कार्यक्रम घेत आहोत. भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु केलेला हा उपक्रम, 171 गोर गरीब, गरजू वयोवृद्ध नागरिकांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून समारोप करीत आहोत. आता पर्यंत 200 च्या वर रुग्णांच्या मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया सेवाग्राम तथा डॉ. चेतन खुटेमाटे साहेबांच्या दावाखण्यात पार पडल्या आहेत. माजी अर्थ मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार हे ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ समजून निरंतर जनसेवा करीत आहेत. त्यांच्या माध्यमातून ही सेवा निरंतर सुरू राहणार आहे.
यावेळी भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे माजी ग्रामपंचायत सदस्य साजन गोहने, भाजपाचे बबलू सातपुते, मधुकर धांडे, सुभाष मशाखेत्री, अजय लेंडे, उमेश दडमल उपस्थित होते.

त्रिपुरा हिंसाचाराच्या विरोधात ऐ.मा. एम. आक्रमक

0

 

त्रिपुरा राज्यामध्ये मुसलमानावर जातीवादी संघटनांनी जो अमानुष अत्याचार केला त्याच्याविरोधात शेगाव येथील ऐ.मा.ऐम. पार्टी चे कार्यकर्ता आक्रमक झाले आहे.
यावेळी ऐ.मा.ऐम. शहराध्यक्ष तथा नगरसेवक वसीम पटेल यांच्या मार्गदर्शनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शेगाव तशिलदार यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले कारण की त्रिपुरा राज्यामध्ये बारा मशिदी जातीवादी संघटनांनी तोडल्या व स्थानिक मुसलमानावर अन्याय अत्याचार करत आहे त्याकरिता केंद्र शासनाने त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी व दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी शेगाव तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले
यावेळेस नगरसेवक वसीम पटेल व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

घुई येथे जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ भोजने यांच्या हस्ते धम्म ग्रंथाची समाप्ती

0

 

आज घुई येथे बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचा ग्रंथ प्रवरणा कार्यक्रम राजाभाऊ भोजने यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा महासचिव बी.के.हिवराळे, जिल्हा सचिव संस्कार सुरेश गव्हांदे, समता सैनिक दलाचे के. एम. हेलोडे, माजी जिल्हाध्यक्ष एच. डी.अजने, के.के. शेगोकार जिल्हा कोषाध्यक्ष,सुगदेव सोनोने प. स.उपसभापती , ह.भ. प रवींद्र महाराज गुरव, अनिल वाकोडे सरपंच शिरसगाव निळे,श्रीकृष्ण गवई माजी तालुकाध्यक्ष, सोपान लांजुळकर जिल्हा उपाध्यक्ष वंचित , जोतीराम सरदार जिल्हा उपाध्यक्ष संरक्षण विभाग ,दादाराव हेलोडे शहराध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा खामगाव ,गौतम इंगळे,उपसरपंच चिंचोली डी.एन. खंडारे ता.सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा चंद्रमणी भोजने सर्कल अध्यक्ष वंचित , देवा गाडेकर ग्रा. प सदस्य तरोडा डी राहुल इखारे ग्राप सदस्य शिरसगाव निळे ,उमेश इंगळे माजी उपसरपंच टाकळी विरो,प्रकाश गवई सरपंच येऊलखेड ,सह वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते

कॉंग्रेस आमदाराच्या मुलाची स्वता: वर गोळी झाडून केली आत्महत्या

0

 

अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक)

SURYA MARATHI NEWS

जबलपूर :  येथील बरगी काँग्रेस आमदार संजय यादव यांचा धाकटा मुलगा वैभव यादव (विभू) याने गुरुवारी स्वतःवर गोळी झाडून घेतत्या ले हळहळ वक्त होत असून सदर घटनास्थळावरून सुसाईड नोट सापडली असली तरी त्यात त्या आत्महत्येचे कारण लिहिलेले नाही.
विभूने सगळं गोष्ट छान लिहिलंय. आहे व त्यामुळे सर्व काही ठीक असताना त्याने आत्महत्या का केली, हे पोलिसांनाही अजुन समजू शकलेले नाही. तर
ही घटना घडली त्यावेळी आमदार वडील संजय यादव हे 15 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आदिवासी अधिवेशनाच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत सहभागी होण्यासाठी गेले होते आणि आई भोपाळला गेली होती. वैभवचा मोठा भाऊ काही कामानिमित्त घराबाहेर गेला होता, यावेळी वैभवने स्वत:ला खोलीत कोंडून घेतले आणि वडिलांच्या परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने स्वत:वरच गोळी झाडली.
आई, बाबा आणि भाऊ सगळे चांगले आहेत…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभवने आत्महत्येपूर्वी सुमारे चार पानांची सुसाईड नोटही ठेवली आहे. या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र त्याच्या सुसाईड नोटमध्ये वैभवने आई-वडील, भाऊ आणि मित्रांचे कौतुक केले आहे. यासोबतच वैभवने स्वत:वर गोळी झाडण्यापूर्वी त्याच्या काही मित्रांना मेसेजही पाठवला होता, ज्यामध्ये तो त्याच्या मित्राकडे जात असल्याचे लिहिले होते. तुम्ही सगळे खूप चांगले मित्र होता.

तुम्ही सर्व खूप छान आहात.
विभूने त्याच्या पाच मित्रांना टेक्स्ट मेसेज पाठवले होते. त्यात त्याने लिहिले की, “तुम्ही सर्व खूप चांगले आहात, स्वतःची काळजी घ्या. मी सुसाईड नोटमध्ये पुढे लिहिलं आहे की, “माझे आई-वडील आणि भाऊ सर्व ठीक आहेत. माझी त्यांच्याविषयी काही तक्रार नाही. मी आता माझ्या मित्राकडे येत आहे.” कुटुंबाला मानसिक धक्का
या घटनेनंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. विभू मानसशास्त्र शिकत होता. पुढील शिक्षणासाठी तो परदेशात जाणार होता. पण जीवनाचा हा प्रवास सुरू होण्यापूर्वीच त्याने संपवला. व त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच सर्वत्र शोककळा पसरली. व आमदार संजय यादव यांचे सांत्वन करण्यासाठी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आणि नेते रुग्णालयात पोहोचले. व तत्पर पोलिसांच्या पथकानेही या सर्व प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. व पोलीस आणि एफएसएलच्या पथकाने ताबड़तोब आमदार निवास गाठून घटनास्थळाची पाहणी केली.व पोलीस सर्व बाजूंनी तपास सुरु आहेत. Surya marathi news

भूमिपूजन व लोकार्पण सोहळा

0

 

दगडू पिंगळे
निलंगा प्रतिनिधी

निलंगा नगरपालिकेच्या वतीने निलंगा शहरात झालेल्या विविध विकासकामाचे लोकार्पण व नवीन कामाचे भूमिपूजन सोहळा दिनांक 12/11/ 2021 वार शुक्रवार रोजी सकाळी आठ वाजता निलंगा नगरीचे ग्रामदैवत श्री निळकंठेश्वराचे दर्शन घेऊन
अरविंद भाऊ पाटील निलंगेकर (प्रदेश सचिव भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र)यांच्या अध्यक्षतेखाली
माननीय आ. श्री संभाजीराव दिलीपराव पाटील निलंगेकर.
(महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा विधानसभा सदस्य निलंगा)यांच्या शुभ हस्ते
मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या भक्तनिवासाची लोकार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे.
मा.श्री. सुधाकर शृंगारे(लोकसभा सदस्य लातूर) माननीय. आमदार रमेश आप्पा कराड (अध्यक्ष भारतीय जनता पार्टी जिल्हा लातूर)
माननीय श्री राहुल केंद्रे जिप अध्यक्ष लातूर, सौ भारत बाई साळुंके जिप उपाध्यक्ष लातूर, संजय दोरवे, माजी सभापती तथा जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे
तरी यावेळी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे
बाळासाहेब ( श्रीकांत) शिंगाडे नगराध्यक्ष निलंगा
मनोज कोळ्ळे उपनगराध्यक्ष निलंगा समस्त सभापती नगरसेवक निलंगा इत्यादींनी केले आहे.

घर घर “दस्तक” योजने अंतर्गत संग्रामपूर शहरात कोविड लसीकरणा साठी जनजागृती

0

 

महसूल प्रशासन,नगर पंचायत प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन यांच्या वतीने आज संग्रामपूर शहरात प्रत्येक घरी जाऊन कोविड लसीकरणा साठी जनजागृती करुन नागरीकांना कोविड लसीकरण करण्यासाठी आव्हान करण्यात आले

शहरात प्रत्येक नागरीकांनी लसिकरण करुन घ्यावं नाही तर कोणत्याही शासकिय योजनेचा लाभ मिळणार नाही असे आव्हान सुध्दा करण्यात आले

या कोविड लसीकरण जनजागृती मोहिमेत संग्रामपूर च्या उपविभागीय अधिकारी कुबतेजश्री कोरे संग्रामपुर नगर पंचायत च्या मुख्याधिकारी    कु रेखा वाणी तहसिलदार
वरणगावकर पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत विखे संग्रामपुर मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष शंकर पुरोहित महसुल विभागातील मंडळ अधिकारी विनोद भिसे डॉ सरोदे न प चे कर्मचारी व संग्रामपूर मित्र परिवारचे सर्व सम्मांनीय सदस्यांनी यो मोहिमेत प्रशासनाला सहकार्य केले

मिलघाटातील धारनी नगर पंचायत चे आरक्षण सोडतो पुन्हा करण्याचे जिल्हाधिकारिच्या आदेश

0

 

अचलपुर,,(अशोक वस्तानी )

अमरावती जिल्ह्यातील अतिदुर्गम मिलघाटतील दोन वर्षापूर्वी स्थापना जालेल्या धारनी नगर पंचायर्चे ओ, बी, सी,पर्वर्गा चे आरक्षणची सोड़तीत ओबीसीचे पांच पैकी दोन जगा कमीहूँ खुल्या प्रवर्गत दोन जागेची वाढ जलयाने ओबीसी प्रवर्गतिल मतदारामधे नाराजी पाहता जिल्हाधिकारिने यबाबत दुबार सोडतिचे आदेश पाठविल्याने धारनी तिल इच्छुक राजकरण्याना चांगळेच फटके लागूं राजकरण तपले आहे जलेल्या सोडतीत दोन जगा ओबीसा कमी पड़लयाने नगरध्यक्ष ए कर्फ़ीच होणार व ओबीसीचे स्वप्न दुभंगल्या जाणार
यासरव घडमोदी पाहता कोनावरहि अन्याय होउ नए म्हणून जिल्हाधिकारिने पुन्हा ओबीसी सोडतो काढयाचे आदेश दिले है आदेश धर्णित धड़कताच धारणीनीतील राजकरण चांगळेच तपले आहे 12 नोहे. ला सदर सोडत होणार असून यामधे ओबीसी व खुल्या प्रवर्गतिल महिलाचीच लाटरी लागणार aahe

डी.टी. आंबेगावे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्ण व वृद्धांना फळं वाटप

0

 

उषा पानसरे  कार्यकारी संपादक मो,9921400542

नांदेड, किनवट : प्रेस संपादक व
पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्ण व वृद्धांना फळं वाटप करण्यात आले.
पत्रकारांच्या समस्या प्रभावीपणे सोडवणारी, त्यांच्या प्रत्येक अडचणीत धावून येणारी सामाजिकतेचे भान ठेवून सामाजिक कार्यक्रमात आग्रहाने सहभागी होणारी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ गेल्या काही वर्षापासून संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात संघटना कार्यरत असून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. या शासन मान्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे यांचा वाढदिवस आज दिनांक १० नोव्हेंबर २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने किनवट तालुका कार्यकारणीच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा व संथगार वृद्ध आश्रमात फळं वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
तसेच वाढदिवसाचे निमित्ताने किनवट तालुका कार्यकारणी पदाधिकारी व सदस्यांना प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे ओळखपत्र व नियुक्ती पत्र नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद भालेराव, तालुकाध्यक्ष आशिष शेळके, तालुका सचिव नसीर तगाले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.