Home Blog Page 379

मा. देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोपाचे गंभीर परिणाम नवाब मलिक यांना भोगावे लागतील- भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा

0

 

संकटात सापडलेले शेतकरी, महिलांवरील वाढलेले अत्याचार, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अशा गंभीर विषयांवर बोलण्यासारखे काही नसल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून कोणाला तरी उभे केले जाते. त्याच पद्धतीने अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नवाब मलिक बेछूट आरोप करत आहेत. पण भारतीय जनता पार्टी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या वादात ओढण्याचे गंभीर परिणाम मलिक यांना भोगावे लागतील, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी दिला.
ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा. सुधाकर भालेराव उपस्थित होते. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले आहे, असे मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी निदर्शनाला आणले.
ते म्हणाले की, राज्यात महापूर आला. अतिवृष्टी झाली. मराठवाड्यात ३८ लाख हेक्टरवरील पीक वाहून गेले, ११ लाख हेक्टर शेतजमीन खरडून गेली. शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळायची आहे. त्यांना पीक विमा मिळायचा आहे. विशेष जास्त पाऊस नसतानाही पूर का आला, याची अद्याप चौकशी झालेली नाही. कोरोनासाठी जे काही थोडे पॅकेज राज्य सरकारने जाहीर केले त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा अघोषित संप चालू आहे आणि २९ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे शेकड्यांनी वाढले आहेत. अशा गंभीर विषयांवर बोलण्यासारखे काही नसल्याने महाविकास आघाडीकडून बेछूट आरोप करणे चालू आहे.
त्यांनी सांगितले की, नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर बेछूट आरोप केले. पण वानखेडे यांच्या पाठीशी समाज उभा आहे. भारतीय जनता पार्टीही अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहील.
ते म्हणाले की, नीरज गुंडे हे चांगले सामाजिक कार्यकर्त आहेत. पण तरीही त्यांच्याविरोधात काही पुरावे आढळले तर चौकशी करा. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि कोणाच्या विरोधात काही पुरावे असतील तर बिनधास्त चौकशी करावी. पण प्रसिद्धी माध्यमांसमोर आक्रोश कशाला करता ? रोज तोंडाची वाफ का दवडता ?

( मुकुंद कुलकर्णी )
कार्यालय सचिव

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतरही भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो, जाणून घ्या समीकरण…

0

 

भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागल्यावर भारताचे आव्हान संपुष्टात आल्याचे म्हटले जात होते. पण तसे अजून म्हणता येणार नाही. कारण काही समीकरण अजूनही अशी आहेत की, ज्यामुळे भारतीय संघ अजूनही उपांत्य फेरीत पोहोचू शकतो.

दुबई, Semi Final : भारतीय संघाला न्यूझीलंडकडून लाजरवाणा पराभव पत्करावा लागला. पण या पराभवानंतरही भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. त्यासाठीचे एक समीकरण आता आता समोर आला आहे.
जाणून घ्या भारतीय संघाचे उपांत्य फेरीचे समीकरण…
भारताला विश्वचषकात पहिल्यांदा पाकिस्तान आणि आता न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आहे. भारताच्या आता लढती बाकी आहेत, त्यामध्ये टीम इंडिया आता अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाशी भिडणार आहे. या तिन्ही संघांबरोबर न्यूझीलंडचा संघही भिडणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांचे तीन सामने बाकी आहेत. नामिबिया आणि स्कॉटलंड हे क्रिकेट विश्वात तसे कच्चा लिंबू समजले जाणारे संघ आहेत. त्यामुळे हे दोन संघ भारत आणि न्यूझीलंडसारख्या दादा संघांना पराभूत करतील असे वाटत नाही. पण अफगाणिस्तानचा संघ हा कोणालाही धक्का देऊ शकतो. सध्याच्या घडीा अफगाणिस्तानचा संघ हा चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे अफगाणिस्तानने जर न्यूझीलंडला पराभूत केले, तरच भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी असेल. पण दुसरीकडे भारताला अफगाणिस्तानवर विजय मिळवावा लागेल. जर असे घडले तरी उपांत्य फेरीचे गणित हे रन रेटवर येऊन ठेपणार आहे. त्यासाठी भारताला या तीन सामन्यांमध्ये फक्त विजय मिळवून चालणार नाही, तर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर असे घडत गेले तर भारताचा अखेरचा सामना हा नामिबियाबरोबर आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ मोठा विजय मिळवू शकतो. पण त्यासाठी अफगाणिस्तानने न्यूझीलडला पराभूत करायला हवे आणि दुसरीकडे भारताने अफगाणिस्तानला पराभूत करायला हवे. त्यामुळे भारतासाठी आता अफगाणिस्तानचा संघ महत्वाचा ठरणार आहे.

पाकिस्तानचा संघ जवळपास उपांत्य फेरीत पोहोचला आहे. कारण आता तीनपैकी दोन लढती त्यांनी जिंकल्या तरी त्यांच्यासाठी उपांत्य फेरीच दरवाजे खुले होऊ शकतात. दुसरीकडे अफगाणिस्तानचा संघ यावेळी सर्वांनाच जोरदार धक्का देऊ शकतो. कारण अफगाणिस्तानचा संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे त्यांनी जर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांना पराभूत केले तर त्यांनाही उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी आहे आणि हे विसरून चालणार नाही.

ह्या” बॅकेत तुमचे खाते आहेत, तर फ्री मध्ये मिळेल 23 लाखांचा “लाभ”

0

 

SURYA MARATHI NEWS

आजच या बैंकेत जायुन सविस्तर माहिती घ्या जर तुमचे या बैंकेत पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक झालात तर तुम्हाला संपूर्ण 20 लाख रुपयांचा फ्री मध्ये लाभ मोफत मिळेल. व जर तुम्ही या विशेष ऑफर अंतर्गत नोकरी करत असाल तर तुम्हाला बँकेत पीएनबी माय सॅलरी खाते उघडावे लागेल. व इतकेच नाही तर यामध्ये बँकेकडून तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जाणार आहेत ते ही फ्री मधे व . आम्ही तुम्हाला या खात्याबद्दल तपशीलवार माहिती देणार आहोत
(Bank account benefits )
PNB या सुविधा पुरवणार आहे
PNB ने दिलेल्या माहितीनुसार, तुम्हाला तुमचा पगार अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करायचा असेल तर ‘PNB MySalary Account’ खाते उघडा. या अंतर्गत, जर एखाद्या व्यक्तीसोबत वैयक्तिक अपघात झाला असेल, तर विम्यासोबत ओव्हरड्राफ्ट (अतिरिक्त पैसे काढणे) आणि स्वीपची सुविधा देखील मिळेल.
जाणून घ्या 20 लाखांचा फायदा कसा मिळेल ?
PNB त्यांच्या पगार खातेधारकांना विमा संरक्षणासह इतर अनेक फायदे देत आहे. शून्य शिल्लक आणि शून्य त्रैमासिक सरासरी शिल्लक सुविधेसह PNB MySalary खाते उघडल्यावर, तुम्हाला 20 लाख रुपयांचे वैयक्तिक अपघात संरक्षण दिले जात आहे. म्हणजेच हे खाते उघडणे केवळ तुमचा फायदा आहे.
या खात्यात 4 कॅटेगिरी आहेत
यामध्ये 10 हजार ते 25 हजार मासिक वेतन असलेल्यांना ‘सिल्व्हर’ श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
25001 ते 75000 रुपये मासिक वेतन असलेल्यांना ‘गोल्ड’ श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
75001 ते 150000 रुपयांपर्यंत मासिक वेतन असलेल्यांना ‘प्रिमियम’ श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
150001 रुपयांपेक्षा जास्त मासिक वेतन असलेल्यांना ‘प्लॅटिनम’ श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
जाणून घ्या कोणाला किती फायदा होणार?
बँकेकडून ग्राहकांना ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाते.
सिल्व्हर श्रेणीतील लोकांना 50,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळेल.
ज्यांच्याकडे सोने आहे त्यांना 150000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल. व या
प्रीमियमधारकांना 225000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल. व या
प्लॅटिनम लोकांना 300000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळेल. तर आजच वेबसाइट ला जायुन सविस्तर माहिती जाणून घ्या
https://www.pnbindia.in/salary saving products.html या लिंकवर जाऊन तुम्ही तपशीलवार माहिती मिळवू शकता.
Surya marathi news

एकतर्फी प्रेमात तो झाला वेडा,लग्न ठरताच, वेडा “आशिक” ने तरुणाच्या आईवर गोळी अन्

0

 

 

SURYA MARATHI NEWS

देशात अनेक प्रकरण समोर येताना धक्कादायक घटना घडत आहेत. व याच दरम्यान मध्य प्रदेशमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. की
एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या एका आशिक तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. तरुणीचं लग्न ठरलं म्हणून त्याने तिच्या आईवरच गोळी झाडली आहे. गेल्या दीड वर्षांपासून तरुण मुलीसोबत बोलत होता. व त्याचं तिच्यावर एकतर्फी प्रेम होतं. मग मात्र कुटुंबीयांनी तिचं दुसऱ्या एका तरुणाशी लग्न ठरवलं. व लग्नाबाबत समजताच तरुण संतापला आणि त्याने रागाच्या भरात त्या तरुणीच्या घरी जाऊन गोंधळ घातला. व मग काय तरुणीची आई आणि इतर नातेवाईकांवर गोळ्या झाडल्या.
तरुणीच्या आई आणि नातेवाईकांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पोलिसांत देखील याबाबत तक्रार करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष आगश्या असं या तरुणाचं नाव असून त्याचं तरुणीवर गेल्या दीड वर्षांपासून प्रेम होतं. पण तिचं लग्न ठरल्याचं समजताच त्याने तरुणीच्या घरच्या लोकांवर जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेने परिसरातील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
‘तिचं’ लग्न ठरलं म्हणून ‘त्याने’ टोकाचं पाऊल उचललं
आरोपी संतोश आगश्या याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आझाद नगर पोलीस ठाणे परिसरातील श्रीनगरमध्ये एका तरुणाचं एकतर्फी प्रेम होतं. त्यामुळे त्याने तरुणीच्या घरी जाऊन गोळीबार केला. यामध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.व त्या घटना वरूण आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेने सुरु आहेत.व पोलीस अधिकारी इंद्रमणी पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. व या एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Surya marathi news

चुंचाळे येथे ३ बंधारे, वाघझीरा येथे १ बंधारे व मनुदेवी परिसरात १ बांधारे असा सुमारे ५० लाख रुपयांच्या निधिच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन चोपडा विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या हस्ते

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेड़े

तालुक्यातील वाघझीरा, चुंचाळे व सातपुडयाच्या पायथ्याशी असलेल्या जागृत देवस्थान मनुदेवी येथे भक्त निवास बांधणे (किंमत रुपये ५० लक्ष) या व्यतिरिक्त परिसरातील चुंचाळे येथे ३ बंधारे, वाघझीरा येथे १ बंधारे व मनुदेवी परिसरात १ बांधारे असा सुमारे ५० लाख रुपयांच्या निधिच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन चोपडा विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले .

 

या प्रसंगी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
चोपडा विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नानी विकासकामाच्या माध्यमातून खानदेश वासियांचे श्रद्धास्थान असलेल्या मनुदेवी मातेच्या दर्शनास येणाऱ्या हजारो भक्तांची भक्तनिवासाचे बांधकामानंतर निवासाची मोठी सोय होणार आहे. या अनुषंगाने पर्यटन विकास होऊन परिसरात लहानमोठ्या उद्योगांना चालना मिळणार असल्याचे माजी आ . प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले.
यावेळी कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा कृउबाचे सभापती तुषार पाटील, शिवसेने यावल तालुकाप्रमुख रविंद्र सोनवणे, आडगाव सरपंच अमिना तडवी उपसरपंच प्रतिभा पाटील, सुवर्णा पाटील, गोटू सोनवणे, सुभाष अप्पा साळुंके, पिंपरी सरपंच मोहन कोळी,विकास सोलंकी  सरपंच  (उर्फ  गोट्टू  सोलंकी)
भरत सर चौधरी. दिनेश साळुंके, सुधाकर पाटील, नितीन पाटील, निलेश साळुंके, दीपक कोळी, हरी कोळी, भास्कर पाटील, शांताराम पाटील, प्रकाश कोळी, विनायक पाटील, रशीद तडवी, योगेश पाटील, सूर्यभान पाटील सर, राजू तडवी, पटवारी आबा, आत्माराम पाटील, संजय कोळी, आशिष झुरकाळे, विनायक अप्पा पाटील, पुंडलिक पाटील, युवराज पाटील, सुरेश पाटील, आत्माराम पाटील, रवींद्र पाटील, गोरख पाटील, संजय कोळी, सीताराम साळुंखे, जीवन वाणी, भरत चौधरी गजू कोळी, सचिन पाटील, सुनील पाटील, सिकंदर तडवी, शशिकांत शिंदे, संजय कोळी . रमेश धनगर. लोटू धनगर.तसेच आदि मान्यवर उपस्थित होते.

उद्या- पाचोरा- भड़गाव तालुक्यातील हजारों शेतकरी सोबत जिल्हाधिकारी कार्यालय वर धड़कनार:- अमोल शिंदे

0

 

विकी वानखेड़े जळगाव जिल्हा प्रतिनिधि

उद्या म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी विविध मागण्यांसाठी पाचोरा व भडगाव या तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी मोर्चातून आपल्या समस्या घेयून या ठिकाणी मांडणार आहेत. व
माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वात, भारतीय जनता पार्टीच्या वतीने व भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा निघणार आहे.
मोर्चातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे
१)ऐन खरीप हंगामाच्या शेवटी रब्बीच्या सुरुवाती साठी पाण्याची गरज असतांना ट्रान्सफार्मर वीज पुरवठा खंडित करून पुन्हा जोडणी करीता सक्तीची वीज वसुली थांबवावी.
२)शेतीला वीज पुरवठा करणारे ट्रांन्सफार्मर नादुरुस्त झाल्यावर त्वरित बदलून मिळावे व त्यासाठी सक्तीचे वीज बिल वसुली करु नये.
३)रात्री अपरात्री होणाऱ्या शेती वीजपुरवठा धोरणात तात्काळ बदल करून रात्री ऐवजी दिवसा शेतीला नियमित वीज पुरवठा करण्यात यावा.
४)अतिपावसामुळे जाहीर झालेल्या तुटपुंज्या मदत ऐवजी त्यात वाढ करून दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई रक्कम जमा करावी.
५)पिक विमा योजना सन २०२०- २०२१ अंतर्गत कापूस, उडीद, मुंग, सोयाबीन, इ. नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांची रक्कम तात्काळ बँक खात्यात जमा करण्यात यावी.
६)सन २०१८ व सन २०१९ मध्ये आलेल्या चक्रीवादळ मुळे झालेल्या नुकसान भरपाईची प्रलंबित रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करावी
७)भडगाव तालुक्यात जून २०१९ मध्ये झालेल्या वादळी वारा व गारपिटीची तसेच मार्च २०२१ मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ बँक खात्यात जमा करण्यात यावी
८)पाचोरा व भडगाव तालुक्यात जनावरांवरिल लम्पी या आजाराचा वाढता प्रादुर्भाव बघता प्रत्येक गाव पातळीवर जाऊन गुरांचे लसीकरण करण्यात यावी.
वरील मागण्या मोर्चाच्या माध्यमातून शासन दरबारी मांडण्यात येणार असल्याचे अमोल शिंदे यांनी सांगितले तसेच या ठाकरे सरकार च्या सुलतानी निर्णयाने शेतकरी बांधव पूर्णपणे अडचणीत सापडले असून, शेतकऱ्यांच्या शेतातील वीज तोडणी असेल सक्तीची वीजबिल वसुली,सतत ट्रांसफार्मर बंद पडल्यावर होणारे हाल,मागील काळातील प्रलंबित नुकसान भरपाई,रात्री-अपरात्री अनियमित पद्धतीने होणारा शेतीला वीज पुरवठा,अतिवृष्टी काळात जाहीर केलेली तोडक्या मदती ऐवजी वाढीव मदत,तसेच जनावरांवरील लम्पी आजाराचा वाढता प्रादुर्भाव या सर्व बाबतीत या तालिबानी सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात सुलतानी निर्णय घेतल्याने यंदाची दिवाळीही शेतकरी बांधवांच्या आयुष्यातील अंधारमय अशी काळी दिवाळी ठरेल.असे सांगत अमोल शिंदे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस तथा जि.प. सदस्य मधुकर काटे, जिल्हाचिटणीस सोमनाथ पाटील विधानसभा क्षेत्रप्रमुख हिम्मतसिंग निकुंभ,शहराध्यक्ष रमेश वाणी, व या किसान मोर्चा पाचोरा तालुकाध्यक्ष विश्वास पाटील,भडगाव तालुकाध्यक्ष यशवंत पाटील,सरचिटणीस गोविंद शेलार,संजय पाटील, दीपक माने,भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, व शहराध्यक्ष समाधान मुळे,सुनील पाटील,भैया ठाकूर व सर्व आदी पदाधिकारी या उपस्थित होते

नेहरू युवा केंद्र व त्रिवेणी बालगोपाल गोफ भजनी मंडळ फैजपूर यांच्या संयुक्तविद्यमाने स्वच्छ भारत अभियानाचा समारोप व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगाव व त्रिवेणी बालगोपाल गोफ भजनी मंडळ फैजपूर यांच्या संयुक्तविद्यमाने स्वच्छ भारत अभियानाचा समारोप करण्यात आला व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतनिमित्त वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.स्पर्धांमध्ये गावातील अनेक विद्यार्थ्यांनी व त्रिवेणी बालगोपाल गोफ भजनी मंडळाच्या सदस्यांनी आपला उस्पूर्तपणे सहभाग नोंदविला.
त्यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छते विषयी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयी माहिती देण्यात आली. स्पर्धा झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रिय एकता शपथ देण्यात आली.
स्वच्छ भारत अभियानाचा समारोप व सरदार वल्लभभाई पटेल कार्यक्रम प्रसंगी फैजपूर येथील त्रिवेणी बालगोपाल गोफ भजनी मंडळाचे अध्यक्ष राहूल साळी,रोहन चौधरी,भावेश पाटील, शुभम पाटील, पुष्कर चौधरी इ. उपस्थित होते आणि कार्यक्रमाला त्रिवेणी गणेश मित्र मंडळाचे खजिनदार चेतन चौधरी सर हे पर्यवेक्षक म्हणून लाभले.तर कार्यक्रमाचे कामकाज नेहरू युवा केंद्र जळगावचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर व लेखपाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुका समन्वयक तेजस पाटील,पल्लवी तायडे, डिगंबर चौधरी यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी त्रिवेणी बालगोपाल गोफ भजनी मंडळ फैजपूर अध्यक्ष राहूल साळी, रोहन चौधरी व त्रिवेणी गणेश मित्र मंडळ फैजपूरचे कार्यकर्ते गणेश चौधरी, चेतन चौधरी, भावेश चौधरी, भूषण चौधरी, अनिरुद्ध पाटील,मोहित कोलते, संकेत चौधरी व नेहरू युवा यावल तालुका समन्वयक पल्लवी तायडे, डिगंबर चौधरी यांनी परिश्रम घेतले.

एंड्रोइड मोबाइल असेल तर कमवा घरबसल्या 2000 रुपये

0

 

SURYA MARATHI NEWS

माहिती पूर्ण वाचा

Sathi Bank Aaplication
आताच डाउनलोड करा
पण डाउनलोड करण्या आधी माहिती पूर्ण वाचा
Aap Link👍
https://banksathi.page.link/F9d5LrXNtmTefnyy8

रेफरल कोड टाकणे आवश्यक आहे
44420202

आपलिकेशन डाउनलोड झाल्या नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे
जो नंबर आधार कार्ड ला लिंक असला पाहिजे
लागणारी कागत पत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
अकाउंट नंबर
तुमची Kyc पूर्ण झाली की तुम्ही त्या aap मध्ये दिसणारे सर्व अकाउंट ओपन कराल तर तुम्हाला एका दिवसात जवळपास 2000 रुपये मिळतील

घरातून विचित्र आवाज येत असल्यान, सर्प मित्राला बोलावल, मग सत्य समोर काय आल,

0

 

साप आपल्या  जवळ पास आहे, अशी कल्पना करूनही अनेकांना भीती वाटते. अशात तुम्हाला जर असं जाणवलं की तुमच्यात घरातच अस नागाच्या फुत्कारण्याचा आवाज आला तर काय अवस्था होईल? मग असेच या सिंगापुरमधील एका महिलेसोबत असंच घडलं. तिला आपल्या घरातून सतत सापाच्या फुत्कारण्याचा आवाज येत होता (Snake in the House). यामुळे महिलेनं तातडीनं रेस्क्यू टीमला (Rescue Team) घरी बोलावलं. व या झेब्र्यानं हरणाच्या पाडसावर केला भयंकर हल्ला, हृदय पिळवटणारा घरातून येणाऱ्या या आवाजामुळे महिला इतकी घाबरली होती, की तिनं घरात तपासणी करून बघण्याआधीच रेस्क्यू टीमला बोलावलं.

महिलेचा फोन येताच रेस्क्यू टीम घरी पोहोचली. मात्र, हे प्रकरण काहीतरी वेगळंच निघालं. रेस्क्यू टीमला घरात साप आढळला नाही . मात्र जे काही दिसलं, ते पाहून महिला शरमली.

महिलेचा कॉल येताच रेस्क्यू टीम (Rescue Team) तिच्या घरी पोहोचली आणि सापाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, बराच वेळ त्यांना काहीच आढळलं नाही. अखेर त्यांनी कोब्रा नव्हे तर घरातून ती वस्तू शोधून काढली, ज्यातून हा आवाज येत होता. हा विचित्र आवाज महिलेच्या इलेक्ट्रिक टूथब्रशमधून (Electric Toothbrush) येत होता.

सकाळी हा ब्रश वापरल्यानंतर तिनं तो खाली ठेवला आणि यात पाणी गेलं. याच कारणामुळे ब्रशमधून विचित्र आवाज येऊ लागले. महिलेला अजिबातही अंदाज नव्हता की असा आवाज एखाद्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटमधूनही येऊ शकतो. लग्नाआधीच नवरदेवाला भेटण्यासाठी उतावळी झाली नवरी; सासूला पाठवला अजब मेसेज, महिलेच्या घरून जेव्हा रेस्क्यू टीमने इलेक्ट्रीक टूथब्रश काढला आणि तो ऑन, ऑफ करून पाहिला तेव्हा खात्री पटली की हे आवाज यातूनच येत होते. महिलेच्या घरात कोणताही साप आढळला नाही. या घटनेनंतर महिलेनं रेस्क्यू टीमची माफीही मागितली. ही घटना 2-3 महिन्यांपूर्वीची आहे,या मात्र सोशल मीडियावर पुन्हा एकदा या उधान ला चर्चेत आली आहे.

शेजाऱ्यांची जिरवण्यासाठी    सामुहिक बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा डाव आखला.

0

 

सासूने जावयाबरोबर शरीरसंबंध ठेवल्याचे उघड झाले.

शेजाऱ्यांची जिरवण्यासाठी सासू आणि जावयाने मिळून सामुहिक बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा डाव आखला.

परंतु, विज्ञानाने तपसात काम केले आणि डीएनए रिपोर्टमध्ये बलात्कार इतरांनी केला नसून सासूने जावयाबरोबर शरीरसंबंध ठेवल्याचे उघड झाले. खोट्या तक्रारीमुळे दोघांनाही दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या दोघांनी २०१४ साली खोटी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्याच्या आधारे पोलिसांनी त्यावेळी चार लोकांना अटक केली होती. पोलीसांत तक्रार दाखल झाल्यावर नियमाप्रमाणे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी बलात्कार झाला असण्याची शक्यता आहे, असे वैद्यकीय अहवालांत म्हटले होते.

बलात्काराची तक्रार देणाऱ्या महिला हवाई दल अधिकाऱ्याची केली कौमार्य चाचणी, चेन्नई येथील प्रकार

त्यावेळी फिर्यादी महिला आणि तिच्यासोबत असलेल्या जावयाचे कपडे व स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मात्र, स्वॅबच्या नमुन्यातील डीएनए हे एकाही आरोपीच्या डीएनएशी जुळले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी या महिलेच्या जावयाची चौकशी केली. त्याच्या डीएनएचे नमुने मात्र जुळल्याने पोलिसांनी अधिक सखोल तपास केला.
त्यावेळी आपले सासूबरोबर शारीरिक संबंध असल्याची कबुली जावयाने दिली.पाण्याचा नवीन हातपंप बसविण्यावरून झालेल्या वादामुळे आपल्या शेजारी राहणाऱ्या चार लोकांना अद्दल घडविण्याचे सासू व जावयाने ठरविले. त्या चौघांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याची खोटी तक्रार या महिलेने पोलिसांकडे केली.
हे सारे प्रकरण उजेडात आल्यानंतर या दोघांना अटक केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. बलात्काराची खोटी तक्रार करण्याची प्रकरणे कमी असली तरी अशा या घटनांतील आरोपींना कडक शिक्षा व्हावी तरी असे दिल्यास इतरांनाही जरब बसेल, असे या सत्र न्यायालयाने म्हटले आहे.
Surya marathi news