Home Blog Page 383

१४ वर्षीय मुलीवर एकाच दिवसात तिन वेळा बलात्कार ?शेवटी नराधम आता म्हणतोय…

0

 

SURYA MARATHI NEWS

या राहुरी तालूक्यातील उत्तर दिशेकडे असणाऱ्या एका गावात एक अल्पवयीन मुलगी आपल्या कुटूंबासह या गावत राहत आहे.
आरोपी अर्जून परदेशी नामक तरूणाने त्या मुलीवर एकाच दिवशी तिन वेळा जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना नूकतीच उघडकीस आली. सदरया मुलगी व तिचे नातेवाईकानी पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात चक्कर मारत आहेत.

पन या राहुरी तालूका हद्दीत उत्तर दिशेकडे राहुरी फँक्टरी परिसरात इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेणारी ही १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटूंबासह राहत आहे. सुमारे एक महिना पूर्वी सदर मुलगी रात्री साडेदहा वाजे दरम्यान जेवण उरकल्यानंतर कचरा टाकण्यासाठी घरातून बाहेर निघाली व बाहर गेली होती.
त्यावेळी आरोपी अर्जून दिपक परदेशी हा पेंटर काम करणारा तरूण त्या मुलीला म्हणाला तूझी आई इथे लपून बसली. माझ्या बरोबर चल. मी दाखवतो. असे म्हणत त्याने त्या अल्पवयीन मुलीचा हात धरून तिला जबरदस्तीने एका रूममध्ये नेले. व
त्या ठिकाणी त्याने त्या मुलीचा विनयभंग करून सलग एक नाही तर वतिन वेळा बलात्कार केला. त्यानंतर तिला चाकू दाखवून सदर प्रकार कोणाला सांगितला तर तूला व तूझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही. असा धमकी दिली

व असा आरोप सदर मुलगी व तिच्या नातेवाईकांनी केला आहे. तरी देखील त्या मुलीने सदर प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला. व त्यांनी अर्जून परदेशी याला सदर घटनेचा जाब विचारला. केली

त्या वेळेस तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी सदर मुलीवर व तिच्या कुटूंबावर गुन्हा दाखल करू नये म्हणून दबाव टाकला. आम्ही स्टॅम्प पेपरवर सर्वकाही लिहून देतो. तूमचा सर्व खर्च देतो.
मुलीला पपई खाऊ घाला. म्हणजे तिला गर्भ राहणार नाही. असे सांगून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. व अशी माहिती सदर मुलगी व तिच्या नातेवाईकांनी दिली.
परंतु त्या घटने नंतर अर्जून दिपक परदेशी हा वारंवार त्या मुलीचा पाठलाग करु लागला. या सर्व प्रकाराला घाबरून आज दिनांक २७ ऑक्टोबर रोजी सदर मुलगी व तिच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

तसेच मला न्याय मिळावा. व अशी हाक सदर मुलीने पोलिस प्रशासनाला दिली आहे. पोलिस प्रशासन सदर मुलीला न्याय मिळवून देणार का? असा राहुरी गावात याचीच चर्चा आता संपूर्ण तालूक्यात सुरू आहे.

Surya marathi news

नांदगाव विधानसभा मतदार संघात माननीय नामदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यविषयक शिबिरे

0

 

निलेश पगारे नांदगाव तालुका प्रतिनिधी

नांदगाव साकोरे येथे महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न मा ना श्री छगनराव भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव तालुक्यात आरोग्य व शैक्षणिक दृष्ट्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले शिबिराचे उद्घाटन सौ विशाखाताई भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य सदृढ व टिकून राहण्यास हवे महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आजारा बाबत आपल्या समस्या लवकर कोणाकडेच सांगत नाही व त्यामुळे महिलांना तनाचे व गर्भाशयाचे कॅन्सर होतात आणि प्रसंगी त्यांना आपला जीव ही गमवावा लागतो , आरोग्याच्या तपासण्या करण्यास महिला टाळाटाळ करतात म्हणून या सर्व बाबींचा विचार करून मेमोग्राफी व पॅपस्मिअर व्हॅन गावा गावात नेऊन महिलांची तपासणी व्हावी व त्यांचे आरोग्य अबाधित राहावे या उद्देशाने नांदगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व रोटरी क्लब मालेगाव मीडटाऊन रोटरी क्लब अमरावती मीडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिरे आयोजित करण्यात आली आहे त्याचा पहिला प्रयोग हा साकोरे गावात घेण्यात आला, त्यात 178 महिलांची तपासणी करण्यात आली त्यानंतर वेगवेगळ्या प्रमुख गावांमध्ये अशा प्रकारच्या शिबिरांची आयोजन करण्यात येणार आहे तसेच सदर कार्यक्रमात मोफत नेत्र तपासणी करून चष्मे देण्यात येणार आहे 370 लोकांची विद्यार्थ्यांसह तपासणी करण्यात आली त्याचबरोबर लॉक डाउन काळामध्ये विद्यार्थ्यांची अध्यापनाची परवड लक्षात घेऊन ग्रामीण भागातील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना क्लासेस ची व्यवस्था नसल्यामुळे पुणे येथील आपणा क्लासेसच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन मोफत क्लासेस ची सेवा मिळवून देण्याची ही व्यवस्था राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे त्याचेही प्रात्यक्षिक साकोरे गावातील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत देण्यात आले आहे तसेच शुक्रवार रोजी बोलठाण आणि जातेगाव येथील शाळेतही प्रात्यक्षिक देऊन ऑनलाइन क्लासेसची व्यवस्था करून देण्यात येणार आहे तालुका अध्यक्ष विजय पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, नांदगाव मतदार संघाने आमच्यावर आतापर्यंत भरभरून प्रेम केले आहे आपण राजकीय सत्ता येणे जाणे चालूच असते परंतु ज्या समाजाचं आपल्यावर खरे प्रेम असते त्यांचे आपण देणे लागतो या उद्देशाने आम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे आणि यापुढेही करत राहणार तरी या सर्व आरोग्य आणि शैक्षणिक सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे विशाखा ताई भुजबळ यांच्याकडून भाषणातून उपस्थितांना संबोधित करण्यात आले महिला विधानसभा अध्यक्ष डॉ नीलिमा अहिरे यांनी आपल्या भाषणातून महिलांनी आरोग्याची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे महिला या आपल्या कुटुंबाचा मुख्य कणा आहे त्यांच्याशिवाय कुटुंब हे अपूर्ण असते असे संबोधित केले महिला तालुका अध्यक्ष योगिता पाटील यांनी आपल्या दारात आलेल्या आरोग्याच्या संधीचा सर्व महिलांनी फायदा घ्यावा असे सांगितले मटका रोटरी क्लब मालेगाव सदस्य दीपक शेलार यांनी मॅमोग्राफी यांच्या बाबतीत विधानसभा अध्यक्ष विनोद भाऊ शेलार यांनी विशेष परिश्रम घेऊन इतपर्यंत येण्यास भाग पाडले असे सांगितले व आपण सर्व नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा अशी विनंती केली त्यानंतर सौ विशाखा ताई भुजबळ यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉ ज्योती सिंग, दीपक शेलार प्रमोद वाघ रोटरी सदस्य मालेगाव, योगेश पाटील माजी नगराध्यक्ष मनमाड, घनश्याम सुरसे उपसरपंच साकोरा, दत्तू भाऊ पवार युवक जिल्हा उपाध्यक्ष , राजेंद्र लाठे ता अध्यक्ष सामाजिक न्याय सेल, राजाभाऊ सावंत न्यायडोंगरी गटप्रमुख, देविदास पगार साकोरा गट प्रमुख, किरण भाऊ बोरसे ग्रापं सदस्य साकोरा मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रवींद्र सुरसे यांनी केले प्रसंगी अमित पाटील, देवदत्त सोनवणे, दया जुन्नरे विद्यार्थी शहर प्रमुख नांदगाव, उपसरपंच घनश्याम सुरसे,किरण बोरसे ग्रा प सदस्य, योगेश बोरसे युवक जिल्हा कार्याध्यक्ष, सुनील सुरसे शिवाजी सोनवणे, वृषभ बोरसे, चंद्रकला बोरसे महिला ता. उपाध्यक्ष, छाया बोरसे, निर्मला सुरसे,अलका हिरे यांनी विशेष परिश्रम घेतले व ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी श्री सरोदे व कर्मचारी सोमनाथ उडकुडे, समाधान वाघ,तसेच रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी ही सहकार्य सहकार्य केले. शेवटी अमित पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

आता विना इंटरनेट ही वापरा व्हाट्सप,काय आहे प्रोसेस

0

 

SURYA MARATHI NEWS

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : गेल्या
वर्षापासून एकूणच संवाद साधण्याच्या, एकमेकांच्या संपर्कात येणे व (Communication) राहण्याच्या माध्यमांमध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. व या पार्श्वभूमीवर WhatsApp, टेलिग्राम (Telegram) आदी Apps चा वापर मित्र, कुटुंबीय, नातेवाईक आदींशी कनेक्ट राहण्यासाठी प्राधान्याने केला जात आहे. तरी

यात WhatsApp ला युजर्सची विशेष पसंती मिळत आहे. तर या कोणत्याही स्मार्टफोनवरून WhatsApp चा वापर करण्यासाठी इंटरनेटची (Internet) सख्त गरज असते, इंटरनेटविना WhatsApp वापरता येतच नाही. असा प्रश्न निर्माण बऱ्याच वेला होताना दिसत आहे . तरी अनेकदा डेटा पॅक संपल्यामुळे किंवा रेंज नेटवर्क प्रॉब्लम नसल्यामुळे WhatsApp सह अन्य Apps वापरण्यास खुप अडचणी येतात. मात्र हा प्रश्न आता कायमस्वरूपी संपणार आहे.

कारण एका ट्रिकद्वारे तुम्ही इंटरनेटविना देखील WhatsApp चा खुलेआम वापर करू शकता. विना इंटरनेटविना WhatsApp वापरण्यासाठी एक खास सिमकार्ड (Sim card) खरेदी करावं लागेल. हे सिम कार्ड वापरून तुम्ही इंटरनेट नसतानाही WhatsApp अगदी सहजपणे वापरू शकणार आहात. इंटरनेटविना WhatsApp वापरासाठी आता एक खास सिमकार्ड उपलब्ध आहे.

चॅटसिम (Chat sim) असं या खास सिमकार्डचं नाव आहे. व तुमच्या फोनमध्ये सिमकार्ड असलं, तरी हे सिमकार्ड अतिरिक्त खरेदी करावं लागणार आहे. व नेहमीच्या सिमकार्डच्या तुलनेत चॅटसिम या विशेष सिमकार्डची किंमत जास्त असली, तरी त्याचे फायदे अनेक आहेत.
चॅटसिम सिमकार्डची किंमत 1800 रुपये असून, त्याची वैधता एक वर्षासाठी असते.

व तसंच हे सिमकार्ड तुम्ही देशा-परदेशात कुठेही वापरू शकता. विशेष म्हणजे हे सिमकार्ड तुम्ही ज्या दिवशी खरेदी करता, त्यादिवसापासून एक वर्षापर्यंत याचा वापर तुम्ही करु शकता. त्यानंतर तुम्हाला हे सिमकार्ड रिचार्ज करावं लागेल. तुम्ही चॅटसिमचा वापर सुरू केल्यानंतर WhatsApp वापरण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज पडणार नाही.

चॅटसिम सिमकार्ड खरेदी करणं अत्यंत सोपं आहे. हे सिमकार्ड तुम्ही ऑनलाइन (Online) किंवा कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाइटवरून खरेदी करू शकता. तसंच हे सिमकार्ड ऑर्डरदेखील करू शकता. सिमकार्ड मिळाल्यानंतर ते स्मार्टफोनमध्ये इन्सर्ट करणंही खूप सोपं आहे. चॅटसिममुळे इंटरनेटविना WhatsApp चा वापर शक्य झाल्याने तुम्ही मित्र, व कुटुंबियांसोबत अगदी सातत्यानं कनेक्ट राहू शकता.

Surya marathi news

या गावामध्ये बरेच वर्षापासून दलित कुटुंबावर अन्याय अत्याचार

0

 

SURYA MARATHI NEWS

वंचित बहुजन आघाडी कारंजा शहर व तालुका कारंजा लाड जिल्हा वाशिम अमरावती जिल्ह्यामधील चांदुर रेल्वे तालुक्यात दानापूर या गावामध्ये बरेच वर्षापासून दलित कुटुंबावर अन्याय अत्याचार होत आहे आणि ही लोक ह्या अत्याचाराला कंटाळून ते गावकरी गाव सोडण्या पर्यंत मजल मारतात हे या महाराष्ट्राच्या सभेचे साठी अत्यंत निंदनीय बाब आहे नुकतीच या प्रकरणाची दखल अनुसूचित जाती आयोग याने घेतली असून त्या पीडित कुटुंबांना काही आर्थिक मदत सुद्धा जाहीर केली आहे परंतु प्रश्न मदत करण्याचा किंवा नाही करण्याचा हा प्रश्न नाही प्रश्न हा आहे की फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात असे प्रकार घडतात अशोभनीय बाब आहे या महाराष्ट्राच्या मातीत अनेक थोर संतांनी जन्म घेऊन ह्या महाराष्ट्राचे नाव लौकिक केले व महाराष्ट्राचे नाव संपूर्ण देशांमध्ये लौकिक करण्याचं काम या थोर संतांनी आपल्या विचारधारेतून केले अशा थोर संतांच्या भूमीमध्ये अशा प्रकारचे प्रकारण घडणे म्हणजे थोर संतांच्या विचारधारेला मूठमाती देणे असाच होईल हा महाराष्ट्र घडविण्यासाठी ज्या संतांनी आपले आयुष्य पणाला लावलं त्यामध्ये प्रामुख्याने संत नामदेव महाराज संत तुकोबा राया संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज असे अनेक महापुरुषांची नावे घेता येतील परंतु या महापुरुषांच्या विचारधारेला काळिमा फासण्याचे कृत्य दानापूर या गावामध्ये घडले जर का कोणी ह्या महापुरुषांच्या विचारधारेला काळिमा फासण्याचे कृत्य आणि कार्य करत असतील अशा मनुवादी विचारधारेच्या लोकांना क शासन झाले पाहिजे या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी कारंजा शहर व तालुका कारंजा लाड जिल्हा वाशिम यांच्या वतीने तहसील कार्यालयाला देण्यात आले यापुढे असे प्रकार महाराष्ट्रामध्ये घडणारच नाही असा प्रतिबंध महाराष्ट्र शासनाने करावा अशी आम्ही अपेक्षा महाराष्ट्र शासनाकडून बाळगतो जेणेकरून पुरोगामी महाराष्ट्राचे नाव या देशांमध्ये बदनाम होणार नाही याची दखल महाराष्ट्र शासनाने तात्काळ घेऊन या प्रकरणातील सर्व आरोपीवर प्रशासन करावे व त्यांना प्रतिबंधित करावं हीच अपेक्षा आम्ही सर्व निवेदन करते बाळगतो वंचित बहुजन आघाडी या सर्व प्रकरणाचा जाहीर निषेध करतो उपस्थित कार्यकर्ते किशोर उके नागेश पाटील ऍड कुंदन मेश्राम शेषराव चव्हाण देवराव कटके गणेश मस्के दिलीप रोकडे गौरव जामणिक सागर धोंडसे श्रीकांत बागडे नितीन चौधरी विलास डोंगरे निलेश मनवर प्रवीण मडामे बंटी भाऊ बोरकर शामराव कांबळे दीपक बांबर्डे सुरज डोंगरे लेखन इंगळे प्रफुल डोंगरे सुनील भटकर बबन वानखडे गणेश वर राजू भगत ज्ञानेश्वर कोळकर नितीन गोडसे तारसिंग राठोड निरंजन इंगळे सिद्धार्थ वाकोडे रवी राठोड हंसराज इंगळे पपुवाले शालीकराम निमगडे विजय महाजन प्रवीण देशमुख रमजान पपुवाले शे रफिक शे मोहम्मद सचिन ढोके मयूर राऊत भारत जाधव राम चव्हाण अजहर खान शामराव सावंग भाऊराव मोहळ ऍड पंकज सावडे ऍड दिलीप भगत ऍड मनवर साहेब आदी मान्यवर उपस्थित होते

भाजप नेत्याने महिला खेळाडूवर बलात्कार केला, व फोटो दाखवून ब्लॅकमेल करने ,पोलिसांनी त्या नेत्याला अटक केली

0

 

SuRYA MARATHI NEWS

भाजपच्या एका नेत्यावर आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर बलात्कार केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण झारखंडमधील आहे. भारतीय जनता पक्षाचे पश्चिम सिंगभूम मीडिया प्रभारी संजय मिश्रा (Sanjay Mishra) यांच्यावर है बलात्काराचा आरोप आहे. या आरोपानंतर चक्रधरपूर पोलिसांनी मिश्रा यांना अटक करून तुरुंगात पाठवन्यात आले आहे .

 

सदर या घटनेबाबत डीएसपी दिलीप खलको यांनी सांगितले की, तपासादरम्यान प्रथमदर्शनी पीडितेने केलेले आरोप खरे असल्याचे निष्पन्न झाले आहे. तरी पीडितेने अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोपही खरा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

तरी गेल्या एप्रिल महिन्यापासून संजय मिश्रा या महिला खेळाडूला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार बलात्कार करत असल्याचे वृत्त आहे. संजयने महिला खेळाडूचे आक्षेपार्ह छायाचित्र काढले होते. हेच चित्र दाखवून तो दररोज महिला खेळाडूला ब्लॅकमेल करायचा आणि स्थानिक हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर वारंवार बलात्कार करायचा. मात्र, ही बाब संजयच्या पत्नीला समजल्याने पति- पति या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले.

 

तरी या दुसरीकडे, तुरुंगात जाण्यापूर्वी संजय मिश्रा यांनी व्हिडीओ स्टेटमेंट जारी करून सत्याचा पराभव होऊ शकत नाही, असे म्हटले होते. व या निवडणुकीतील प्रतिस्पर्ध्यांनी माझ्या विरोधात वातावरण निर्माण केले आहे. माझा प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. प्रशासनाने दोघांचे कॉल डिटेल्स काढून तपासावे. व सत्य समोर आल्या शिवाय राहणार नाही.
Surya marathi news

 

नोव्हेंबर महिन्यात बैंक 17 दिवस बंद राहिल ?

0

 

Surya marathi news

तुम्हीही नोव्हेंबर महिन्यात बँकेशी संबंधित काम करणार असाल तर आधी ही बातमी सविस्तर वाचा.

या धनत्रयोदशी, दिवाळी, भाईदूज, छठ पूजा, गुरु नानक जयंती अशा अनेक सुट्ट्या नोव्हेंबर २०२१ मध्ये येणार आहेत. व अशा परिस्थितीत, संपूर्ण महिन्यात एकूण 17 दिवस बंद असतील. या महिन्यात सलग अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत, त्यामुळे तुम्हालाही काही कमी महत्त्वाच्या गोष्टींचा निपटारा करावयाचा असेल, तर त्या त्वरित निकाली लावून घ्या.
नोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नोव्हेंबर महिन्यासाठी अधिकृत बँक सुट्ट्यांची यादी जारी केली आहे, त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात 17 सुट्ट्या आहेत. या दरम्यान भारतातील अनेक शहरांमध्ये बँका सतत बंद राहतील. या 17 दिवसांच्या सुट्टीमध्ये साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे.
RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवारी तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत, RBI ने 1, 3, 4, 5, 6, 10, 11, 12, 19, 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय महिन्यातील चार रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवार सुट्ट्या आहेत. 7, 14, 21 आणि 28 नोव्हेंबरला रविवारी देशभरात बँकांना सुट्टी असेल. त्याचबरोबर 13 नोव्हेंबरला दुसरा शनिवार आणि 27 नोव्हेंबरला चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
सुट्टीची यादी-
दिवाळी पूजेच्या निमित्ताने 4 नोव्हेंबरला बंगळुरूवगळता सर्व राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, डेहराडून, गंगटोक, जयपूर, कानपूर, लखनौ, मुंबई आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 नोव्हेंबरला गोवर्धन पूजेच्या दिवशी बँका बंद राहतील.
गंगटोक, इम्फाळ, कानपूर, लखनौ आणि शिमला येथे 6 नोव्हेंबर रोजी भाई दूज, चित्रगुप्त जयंती, निंगोल चकोबा या दिवशी बँकांमध्ये सामान्यपणे काम होणार नाही.
पाटणा आणि रांचीमध्ये 10 नोव्हेंबरला छठपूजेनिमित्त बँका बंद राहणार आहेत. त्याचवेळी 11 नोव्हेंबर रोजी छठ पूजेच्या निमित्ताने पाटण्यात बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.
12 नोव्हेंबरला वांगला उत्सवानिमित्त शिलाँगमधील सर्व बँका बंद राहतील.
19 नोव्हेंबरला गुरुनानक जयंती आणि कार्तिक पौर्णिमेला आयझॉल, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.
22 नोव्हेंबरला कनकदास जयंतीला बंगलोरमध्ये बँका बंद असणार.
23 नोव्हेंबरला सेंग कुत्स्नमच्या निमित्ताने शिलाँगमधील बँका बंद राहतील. बैंक मधील आपल सर्व काम करून घ्यावे नाही तर 17 दिवसाने काम होईल

Surya marathi news

लॉटरी विक्रेता कडून दीड लाखाची मागणी करत 19 हजारांची खंडणी उकळली? हवालदार वर गुन्हा दाखल

0

 

SURYA MARATHI NEWS

ठाणे – येथील एका लॉटरी विक्रेत्याकडून जुगार अड्डा चालविण्यासाठी दर महिना दीड लाखांची मागणी करत १९ हजारांची खंडणी उकळणारा ठाणे येथील गुन्हे शाखेच्या युनिट एकचा पोलीस हवालदार राजेंद्र पाटीलविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा सोमवारी रात्री दाखल झाला.
यामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. की
सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार विश्वास मांजरेकर (४१, रा. राबोडी, ठाणे) यांचा ठाणे परिसरात लॉटरी विक्रीचा व्यवसाय आहे. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी युनिट एकचे पोलीस हवालदार पाटील यांनी त्यांना तसेच त्यांच्या मित्रंना जुगार खेळतांना पकडले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची अंगझडती घेऊन त्यांच्या खिशातील नऊ हजारांची रोकड काढल्याचा आरोप आहे. त्यानंतर १२ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पुन्हा पाटील हे मांजरेकर यांच्याकडे गेले. व ‘तुम्ही जुगार खेळा तुम्हाला कोणी हात लावणार नाही, फक्त आपल्याला रोज पाच हजार रुपये द्या लागतील ‘ असे त्यांनी सुनावले. त्यावर मांजरेकर यांनी जुगार खेळण्यालाच स्पट नकार दिला. त्यानंतर १६ ऑक्टोंबर रोजी मांजरेकर यांच्याकडे पाटील यांनी पैशांची मागणी केली. त्यांनी नकार दिल्यानंतर त्यांचा मित्र दत्तू शेलार यांना मोटारसायकलीवर युनिट एकच्या कार्यालयात नेले. याच मित्रला सोडण्यासाठी ठाण्यातील रेमंड कंपनीतून त्यांनी दहा हजारांचे कपडे घेतले.
हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्येही असल्याचे मांजरेकर यांनी नौपाडा पोलिसांना सांगितले. पाटील यांनी ७ ते १६ ऑक्टोंबर या काळात खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत दीड लाखांच्या खंडणीची मागणी केली. तसेच नऊ हजारांची रोकड आणि कपडे घेण्यासाठी दहा हजारांची रोकड दिल्याची तक्रार २५ ऑक्टोंबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. पुढील तपास करत आहै

Surya marathi news

संबंधितांवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी! दिव्यांग व्यक्तीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.

0

 

संग्रामपूर तालुक्यातील ग्राम कोलद (काटेल) येथील दिव्यांग तरुणावर व त्याच्या परिवारावर हल्ला करून गावातून हाकलून देऊ! अशा लोकशाही विघातक कृत्याच्या निषेधार्थ तालुक्यातील मंडळींनी काल दि. 25 ऑक्टोबर ला मा.तहसीलदार संग्रामपूर ह्यांच्या मार्फत मा.जिल्हाधिकारी बुलढाणा ह्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले असे आहे की, दोषींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार कार्यवाही करण्यात यावी. ह्या आशयाचे निवेदन देऊन येत्या 8 दिवसात दोषींवर कार्यवाही करावी अन्यथा उपोषणास बसू असा आक्रमक इशारा कोलद येथील दिव्यांग तरुणाने दिला आहे.सदर निवेदन हे मा.गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, मा.पोलीस अधीक्षक व उपअधीक्षक बुलडाणा व मलकापूर, मा.उपविभागीय आयुक्त अमरावती ह्यांना प्रतिलिपीत देण्यात आले आहे.

विवाहितेवर लग्नाच्या आठ दिवसानंतर अनैसिर्गिक अत्याचार:पतीविरोधात यावल पोलीसात गुन्हा दाखल

0

 

तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल : शहरातील विवाहितेला पतीकडून अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीविरोधात यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यास अटक करीत येथील न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
.याबाबत माहिती अशी की, यावल शहरातीलएका परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय विवाहिता आपल्या पतीसह राहते. लग्नाच्या आठ दिवसानंतर पतीला दारूचे व्यसन जडले.दारूच्या नशेत घरी येवून पत्नीशी अनैसर्गिककृत्य करून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच विवाहितेने लव्हमॅरेज केले म्हणुन लग्नात हुंडा मिळाला नाही म्हणून आता दिवाळी करीता माहेरहून कार, रोख रक्कम व सोन्याची अंगठी आणावी या करीता विवाहितेचा छळ केला. विवाहितेला हा अत्याचार सहन न झाल्याने त्यांनी यावल पोलीस ठाणे गाठले. विवाहितेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गर्शदनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक अजमल खान पठाण, पोलिस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले करीत आहे. त्यास अटक करीत येथील न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सासऱ्याची “सुनेवर नजर” बऱ्याच वेळा बलात्काराचा प्रयत्न, शेवटी बापाला वेतागलेल्या मुलाची आत्महत्या’

0

 

Surya marathi news

देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान नोएडामध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. या सासऱ्याची आपल्याच सुनेवर वाईट नजर असल्याची एक संतापजनक घटना आता समोर आली आहे. तरी
त्याने कित्येकदा आपल्या मुलाच्या पत्नीची छेड काढली. असून तिच्यावर वारंवार बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. या धक्कादायक बाब म्हणजे वडिलांच्या अशा वागणुकीला वैतागून मुलानेच आत्महत्या केली. पण तरी देखील सासऱ्याला काहीच फरक पडला नसून तो अजूनही सुनेने त्रास देत असल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, नोएडामधील सेक्टर 49 क्षेत्रातील सर्फाबाद गावात ही लज्जास्पद घटना घडली आहे. ही सुनेने याप्रकरणी पोलिसांत धाव घेत आपल्या सासऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. माझे वर अनेकदा बलात्काराचा प्रयत्न झाला असून फसवणूक झाल्याचं सुनेने म्हटलं आहे. पोलीस अधिकारी बृदा शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोरखा गावामध्ये राहणाऱ्या एका महिलेचं लग्न हे सर्फाबाद गावातील यशपाल नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं. पन या
सासऱ्याची वाईट नजर, अनेकदा सु सुनेची काढली छेड
महिलेचा गंभीर आरोप आहे की, तिच्या सासऱ्याची तिच्यावर वाईट नजर असून त्याने अनेकदा छेड काढली आहे. तसेच बलात्काराचा देखील प्रयत्न केला. महिलेने याबाबत आपल्या पतीला देखील माहिती दिली होती. यानंतर पतीने आपल्या वडिलांना याबाबत जाब विचारला. त्यांच्यामध्ये पत्नीवरून मोठा वाद देखील झाला. पुढे या वादाचं रुपांतर मारामारीमध्ये झालं. पण तरी देखील सासऱ्याने आपकी नजर सुने वर ठेवली तरी सासरे आपलं वागणं बदललं नाही. त्याने सुनेना तसाच त्रास देणं सुरू ठेवलं.
सासऱ्याच्या वागण्याचा कंटाळून पतीने उचललं टोकाचं पाऊल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आपल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे सासऱ्याच्या वागण्याचा कंटाळून पतीने टोकाचं पाऊल उचललं आणि गळफास घेऊन आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. पतीच्या मृत्यूनंतर देखील काही वेळा सासऱ्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्याला वैतागून महिला माहेरी निघून आली. सासरा सूरज यादव यांचे विरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा कसुन अधिक तपास करत आहेत. तरी एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे