Home Blog Page 384

सावधान ,हे धोकादायक एप जर तुमच्या फोन मधे असेल तर लगेच डिलीट करा, अन्यथा, ?

0

 

Surya marathi news

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : या काही दिवसांपासून जगभरात नेटफ्लिक्सवरील Squid Game सिरीज चांगलीच लोकप्रिय ठरत होती. त्यानंतर आता Squid Game नावानं अनेक फेक अ‍ॅप या मार्केटमध्ये येत आहेत. तर
त्याद्वारे लोकांचा डेटा (Squid Game app dangerous for smartphones) आणि इतर खास माहिती मोबाइल मधुन चोरली जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर आता Google Play Store वरून या धोकादायक अ‍ॅप्सला हटवण्यात आलं आहे. युजर्सला स्मार्टफोन्स वापरताना सावधानता बाळगावी लागणार आहे.  तर हे धोकादायक अ‍ॅप फोनमध्ये कसे येतात? काही दिवसांपूर्वी गुगल प्ले स्टोरवर Squid Game Wallpaper 4K HD नावानं एक अ‍ॅप दिसत होतं. या अ‍ॅपला अनेक लोकांनी स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉलदेखील केलं होतं.

या अ‍ॅपच्या माध्यमातून युजर्सना खोट्या जाहिराती आणि एसएमएस सब्सक्रिप्शन पाठवलं जात होतं. त्यात काही युजर्सला ही गडबड लक्षात येताच त्यांनी या अ‍ॅपवरून तात्काळ साइनआउट केलं. 120W सुपरफास्ट चार्जिंगसह लाँच होणार Redmi Note 11 Pro, पाहा काय असेल किंमत या App च्या धोक्याची माहिती सुरक्षा कंपनी ESET चे विशेषज्ञ लुकास स्टेफानको यांना मिळाली त्यानंतर त्यांनी गूगलकडे तक्रार करून या (Squid Game app) ला प्ले स्टोर वरून हटवण्यास गूगलला भाग पाडलं आहे. परंतु ही अ‍ॅप गूगल प्ले स्टोर वरून डिलीट होईपर्यंत किमान 5 हजार लोकांनी या अ‍ॅपला डाऊनलोड केलेलं होतं.

Aadhaar Card: तुमच्या 5 वर्षाहून लहान मुलांच्या आधार कार्डसाठी असा करा अर्ज काय काळजी घ्याल? कोणतंही अ‍ॅप स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करण्याआधी त्या अ‍ॅपच्या मोर डिटेल्समध्ये जाऊन ती कंपनी तरी एक वेळा व्हेरिफाय आहे की नाही ते तपासुन घ्यावे त्याचबरोबर जे अ‍ॅप डाऊनलोड कराल ते याआधी किती लोकांनी डाऊनलोड केलं आहे याची खात्री करा. कुठल्याही अ‍ॅपला इन्स्टॉल करण्याआधी संबंधित App चे रिव्ह्यू वाचा. App डाऊनलोड केल्यानंतर विविध नोटिफिकेशन्स येतात, त्यामध्ये खाजगी डेटाची परवानगी असू शकते.

त्यामुळे ते नीट वाचूनच परवानगी द्यायला हवी. फेसबुक पेपर लीकमधून मोठा खुलासा,Facebookवरुन कमी होतेय तरुणांची संख्या,काय आहेत कारणं दरम्यान याच खाजगी डेटा प्रकरणावरून आता अ‍ॅपल आणि फेसबुकमध्ये वाद सुरू झाले आहेत. अ‍ॅपलच्या ऑपरेटिंग सिस्टम iOS14 या अपडेटमुळे फेसबुकच्या (Apples ad blocking feature hurts Facebook) पेजेसवर देण्यात येणाऱ्या जाहिरातींवर त्याचा परिणाम होत असल्याची तक्रार फेसबुकने केली आहे. तर फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मचा वापर करून युजर्सचा डाटा चोरून आणि त्याद्वारे टार्गेटेड ऑडियन्स तयार करत असल्याचा आरोप अ‍ॅपने फेसबुकवर वर केला आहे .

3 गाड़िया एकमेकिवर आदळल्या, या अपघातात तिघ्याचा मृत्यू, 5 गम्भीर जख्मी

0

 

SURYA MARATHI NEWS

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात चिखली-खामगाव रोडवरील वैरागड गावाजवळ आज सकाळी 3 वाहनामध्ये विचित्र अपघात झालाय. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर यात 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. तरी या
जखमींवर खामगाव आणि बुलडाणाच्या रुग्णालयात उपचार सुरु केले आहे या
वैरागड गावाजवळच्या छोट्या घाटातील वळणावर हा अपघात घडला आहे. या मालवाहू बोलेरो गाडीत सोयाबीन पोते घेऊन खामगावकडे जात असताना खामगावकडून चिखलीकडे जाणाऱ्या सुमो गाडीला जोरदार धडकली तर बोलेरोच्या मागून सुद्धा भरधाव येणारी बोलेरो वाहन धडकून हा विचित्र प्रकार मधे जोरात अपघात घडला. यातील सर्व जखमींवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.तर या
केमिकल्सची वाहतूक करणाऱ्या मोठ्या टँकरला ट्रकने मागून जबर धडक दिली असून . या अपघातात टँकर पलटी होऊन आग लागली. ही घटना मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाटात घडली. असून या अपघातात दोघा जणांचा मृत्यू जागिच झाला. असून

नेमकं काय घडलं?

केमिकल्स नेणाऱ्या मोठ्या टँकरला ट्रकने मागून जोरदार धडक दिल्यामुळे टँकर उलटून पेटला. या अपघातात दोघा जणांना प्राण गमवावे लागले, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यात राहुड घाटात हा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी वर दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.व या टँकरमध्ये ज्वलनशील पदार्थ होते, मात्र वेळीच आग विझवण्यात प्रशंसन ला यश आल्यामुळे पुढील मोठी अनर्थ टळला. आहे
Surya marathi news

केंद्र सरकारचा निर्णय हे कार्ड असेल तर 2 हजार मिळेल

0

 

 

देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पीएम PM किसान योजनेचा दहावा हप्ता जमा होणार लवकरच . या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून नियमांमध्ये महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. की या अनेक राज्यांतून फसवणुकीचे प्रकार समोर येत आहे म्हणून है आल्यानंतर केंद्र सरकारनं नियमांमध्ये बदल करण्याचा मोठा निर्णय घेतला. आहे व या
शेतकऱ्यांना रेशन कार्डचा नंबर अनिवार्य राहणार
केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार आता जर पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर रेशन कार्डची गरज लागणार आहे. अन्यथा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना रेशन कार्डचा नंबर अनिवार्य असणार आहे.
रेशन कार्डवर नाव असणाऱ्या त्या लोकांपैकी एकाला या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी देता येणार
केंद्र सरकारने नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करत या योजनेसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरु केली असून अजून सोपी केली आहे. सातबारा आधार कार्ड बँक पासबुक आणि प्रतिज्ञापत्र यांची हार्ड कॉपी जमा करणे शेतकरी ला अनिवार्य करण्यात आलं होतं. मात्र आता या कागदपत्रांची पीडीएफ फाईल तयार करून अपलोड करावी लागणार आहे त्यामुळे नोंदणी प्रक्रिया पहिल्यापेक्षा सोपी होईल. म्हणून या योजना मधे शेतकरी
पीएम किसान योजना नेमकी काय आहे?
या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळणार आहे. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक अकाऊंटवर जमा केली जाते. आतापर्यंत या योजनेतून शेतकऱ्यांना 9 हप्ते मिळाले असून लवकरच 10 वा हप्ता जमा होणार आहे.
अनेक राज्यातून एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांनी या योजनेचे पैसे लाटल्याचे प्रकार समोर आले होते. यावर उपाय म्हणून केंद्र सरकार पीएम किसान योजनेसाठी रेशन कार्ड क्रमांक बंधनकारक केला आहे. या लाभ सर्व शेतकऱ्यांना घ्यावे

प्रधानमंत्री घरकुल योजनेत भ्रष्टाचार चौकशीची मागणी अपंग घरकुल लाभार्थी प्रदीप मुकपिडवार

0

 

हिंगणघाट :- मा.जिल्हाधिकारी साहेब वर्धा यांना दिलेल्या निवेदनात घरकुल अपंग लाभार्थी प्रदीप कवडूजी मुकपिडवार राहणार डॉ मुजुमदार वार्ड हिंगणघाट यांनी सांगितले की, हिंगणघाट नगरपालिकेत प्रधानमंत्री अतिक्रमण घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे यादीची चौकशी करण्यात यावी व खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा . मी दिनांक 2006 मध्ये घरकुल साठी अर्ज दिला होता तेव्हा पण माझा घरकुल मध्ये नंबर नाही आला. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना 2016 मध्ये अर्ज केला त्याचा टोपण नंबर 455 आहे. मी 2021 मधील अतिक्रमण घरकुल यादी तपासणी केली तेव्हा पण माझा नंबर नाही आला. जे अतिक्रमण घरकुल यादी मध्ये नावे दाखवले आहे त्यांनी या अगोदर इतर घरकुल योजनेत लाभ घेतला आहे . तसेच काहीजनाचे पक्के घर असतानासुद्धा घरकुल मंजूर केले आहे. काही घरी नवरा-बायको तसेच आता मुलाच्या नावाने सुद्धा घरकुल योजनेत नाव आहे ही योजना गरिबासाठी आहे की पैसे देऊन घेणाऱ्या साठी अतिक्रमण योजनेची चौकशी करण्यात यावी व मला घरकुल देण्यात यावी अन्यथा मी आमरण उपोषण वर बसणार आहे अशी निवेदनातून माहिती दिली आहे. संबंधित माहिती मा.मुख्याधिकारी, मा.उपविभागीय अधिकारी हिंगणघाट ,मा आमदार समीर कुणावार, मा. माजीआमदार राजू तिमांडे, माजी आमदार अशोक शिंदे, पालकमंत्री सुनील केदार यांना दिली आहे.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

हवामानाचे अपडेट देत असताना अँकरला जेव्हा कळले की तिच्या पाठीमागे एक पॉर्न व्हिडीओ चालू आहे, काय आहे व्हिडीओमध्ये?

0

 

Surya marathi news

हवामानाचे अपडेट देत असताना अचानक प्ले झाला पॉर्न व्हिडीओ, टीव्ही अँकरचा व्हिडीओ व्हायरल!

अँकरला जेव्हा कळले की तिच्या पाठीमागे एक पॉर्न व्हिडीओ चालू आहे, तेव्हा तिला धक्काच बसला

टीव्ही लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान, हा प्रकार बऱ्याच वेळा असे काही घडते की त्यावर चर्चा होते आणि ते लाइव्ह असल्याने त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल होतो. असेच एक प्रकरण अमेरिकेतून समोर आले ज्यात एक न्यूज अँकर टीव्हीवर हवामानाच्या बातम्या वाचत असताना काही घडले ज्यामुळे खळबळ उडाली. ती बातमी वाचत असताना, स्क्रीनवर एक अश्लील व्हिडीओ चालू झाला.

काय आहे व्हिडीओमध्ये?

हा वास्तविक, ही घटना अमेरिकेतील एका स्थानिक वाहिनीची आहे. ‘डेली मेल’मधील एका रिपोर्टनुसार, या टीव्ही चॅनेलवरील हवामान माहिती कार्यक्रमात, एक महिला न्यूज अँकरने प्रेक्षकांना हवामानाबद्दल सांगत होती की व आणि तिच्या मागच्या पडद्यावर हवामान अपडेट दिले जात होते. अँकर समोरच्या स्क्रीनकडे बघत होती आणि पार्श्वभूमीत व्हिज्युअल्स दाखवले जात होते.

या दरम्यान, अँकर माहिती देत ​​असताना अचानक हवामानाच्या दृश्यांऐवजी त्याच्या मागे अश्लील व्हिडीओ प्रसारितहोण्यास सुरुवात झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अँकरला त्याच्या पाठीमागे काय चालले आहे हे देखील माहित नव्हते. जेव्हा कोणाला याबद्दल कळले तेव्हा ते दृश्य लगेच बंद झाले. पण तोपर्यंत या घटनेमुळे खळबळ उडाली होती कारण लोक ते थेट पाहत होते.
तरी या अँकरला जेव्हा कळले की तिच्या पाठीमागे एक पॉर्न व्हिडीओ चालू आहे, तेव्हा तिला धक्काच बसला. व हा तूर्तास तो व्हिडीओ बंद लवकरत बंद करण्यात आला आहे. तरी या अहवालानुसार, या दरम्यान चॅनेलला कॉल येऊ लागले आणि त्याला सांगण्यात आले की हवामान अद्यतनाऐवजी, त्याच्या स्क्रीनवर हा अश्लील व्हिडीओ प्ले होत आहेत. एवढेच नाही तर अनेक दर्शकांनी या वाहिनीबद्दल पोलिसांकडे तक्रारही केली. यानंतर हे प्रकरण पोलिसांच्या निदर्शनासही आले आहे.

प्रेक्षकांची मागितली माफी

दुसरीकडे, या संपूर्ण घटनेनंतर वाहिनीने आपल्या प्रेक्षकांची माफी मागितली आहे. वाहिनीने आपल्या एका निवेदनात म्हटले आहे की भविष्यात असे पुन्हा कधीही होऊ नये, आम्ही या दिशेने काम करत आहोत. पॉर्न व्हिडिओ कसा आला तसेच हे कसे घडले हे जाणून घेण्याचा आम्ही पन पूर्ण प्रयत्न करत आहे. तसेच याची पूर्ण तपासणी पोलिसांनी सांगितले की या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

NCB समीर वानखेड़े अडचणीत?

0

 

एनसीबी’चे पथक आज मुंबईत दाखल?

मुंबई : आर्यन खान प्रकरणात ‘एनसीबी’चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या २५ कोटींच्या लाचखोरीच्या आरोपाबाबत त्यांची ‘एनसीबी’च्या दक्षता विभागामार्फत चौकशी करण्यात येणार आहे.
तर ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंचाने केलेल्या लाचखोरीच्या आरोपांना बेदखल करण्याची वानखेडे आणि एनसीबी यांची मागणी विशेष न्यायालयाने सोमवारी फेटाळली.
अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपानंतर याप्रकरणी एनसीबीकडून दक्षता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी एनसीबीचे पथक आज, मंगळवारी मुंबईत येण्याची शक्यता आहे. आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची लाच मागण्यात आली होती, त्यातील आठ कोटी वानखेडे यांना देणार होते, असा आरोप साईल यांनी केला आहे.
‘एनसीबी’च्या गुन्ह्य़ासंदर्भातील साक्षीदार प्रभाकर साईल यांचे प्रतिज्ञापत्र आपण पुढील कार्यवाहीसाठी एनसीबीच्या महासंचालकांना पाठवत असल्याचे एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी रविवारी स्पष्ट केले होते. त्यानंतर याप्रकरणी एनसीबीचे महासंचालकांनी हे प्रकरण दक्षता विभागाकडे वर्ग केले असून याप्रकरणी दक्षता चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी सोमवारी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
दक्षता विभागाचे प्रमुख या प्रकरणात चौकशी करणार आहेत. त्यासाठी दक्षता पथक लवकरच मुंबईत येणार असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले. या चौकशीचे पर्यवेक्षक सिंग असतील. या प्रकरणात एनसीबीकडून न्यायालयात एक प्रतिज्ञापत्रही सादर करण्यात आले आहे. दरम्यान, आर्यन खान प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडेला सोमवारी चौकशीला बोलवले होते, पण ती चौकशीला आली नाही.
क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच साईल यांनी केलेल्या लाचखोरीच्या आरोपांबाबतच्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेत ते बेदखल करण्याची वानखेडेंची मागणी विशेष न्यायालयाने सोमवारी फेटाळली. पंच साईल यांनी के लेले आरोप तपासात अडथळे निर्माण करण्याचा आणि तपास यंत्रणेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा करत त्याच्या प्रतिज्ञापची दखल घेऊ नये, अशी मागणी वानखेडे यांनी केली होती. ती फेटाळताना एनसीबीच्या मागणीच्या आधारे सरसकट आदेश देता येऊ शकत नाही, असे न्यायालयाने प्रामुख्याने नमूद के ले.
या प्रकरणी अटके त असलेल्या आर्यन खान याची प्रकरणातून सुटका करण्यासाठी वानखेडे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी २५ कोटी रुपयांची मागणी के ल्याचा आरोप साईल यांनी केला आहे. त्याबाबतचे प्रतिज्ञापत्रही त्याने तयार केले आहे. त्या पार्श्वभूमीवर एनसीबी आणि वानखेडे यांनी सोमवारी विशेष न्यायालयात स्वतंत्र अर्ज करत त्यांचे हे प्रतिज्ञापत्र ग्राह्य़ धरू नये, अशी मागणी के ली होती.
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी मात्र एनसीबी आणि वानखेडे यांना या प्रकरणी दिलासा देण्यास नकार दिला. न्यायालयाने आपल्या आदेशात, एनसीबीने अर्जाद्वारे मागितलेला दिलासा पाहता त्यादृष्टीने सरसकट आदेश देता येणार नाही. किं बहुना अशा प्रकरणात संबंधित न्यायालय आवश्यक त्या टप्प्यावर योग्य तो आदेश देऊ शकते, असे स्पष्ट केले.
शिवाय आर्यनसह या प्रकरणातील अन्य काही आरोपींनी जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका के ली असून ती प्रलंबित आहे. एकू णच हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे एनसीबीच्या मागणीच्या अनुषंगाने हे न्यायालय कोणाताही आदेश देऊ शकत नाही, असेही न्यायालयाने प्रामुख्याने नमूद केले.
दबावाचा प्रयत्न : एनसीबी
तपास यंत्रणा आणि तिच्या अधिकाऱ्यांवर करण्यात आलेले आरोप खोटे, दिशाभूल करणारे आहेत. त्याद्वारे तपास यंत्रणेची प्रतिमा मलिन करण्याचा आणि दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा एनसीबीने विशेष न्यायालयात के लेल्या अर्जात के ला आहे. वानखेडे यांच्यासह तपास यंत्रणेच्या अन्य अधिकाऱ्यांची आतापर्यंतची सेवा निष्कलंक आहे. त्यांनी प्रामाणिकपणे आणि सचोटीने त्यांचे काम केले आहे. मुंबईला अमलीपदार्थमुक्त शहर बनवण्यासाठी हे अधिकारी अथक आणि अविरत काम करत आहेत. मात्र साईलसारख्या व्यक्ती या तपासात अडथळा निर्माण करण्याचा आणि तपास यंत्रणेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्य पुढे येऊ नये यासाठी तपास अधिकाऱ्यांवर हेतूत: अशा प्रकारचा दबाव टाकून त्यांचे मनोधैर्य कमी केले जात आहे. त्यामुळेच न्यायालयाने या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी एनसीबीने केली होती.
जावयाला अटक केल्यानेच लक्ष्य!
वानखेडे यांनी विशेष न्यायालयात केलेल्या अर्जात साईल याने त्यांच्यावर केलेल्या आरोपांचे खंडन केले. तसेच आपण या प्रकरणाचा निष्पक्ष आणि प्रामाणिकपणे तपास करत असून तो काहींच्या हितसंबंधांना धक्का पोहोचवणारा आहे. त्यामुळेच आपल्याला अटकेच्या धमक्या दिल्या जात असल्याचा दावा वानखेडे यांनी केला. नामांकित राजकीय नेत्याकडून आपल्याला व्यक्तिश: लक्ष्य केले जात आहे. एनसीबीने या नेत्याच्या जावयाला अटक केल्यानेच आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना लक्ष्य केले जात असल्याचा दावाही वानखेडे यांनी केला आहे. मात्र आपण निर्दोष असून ते सिद्ध करण्यासाठी कोणत्याही चौकशी व तपासाला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही यांनी अर्जात म्हटले होते, या प्रकरणातील आरोपी हे समाजातील उच्चभ्रू आणि प्रभावशाली कुटुंबातील असल्यानेही आपल्याला अटकेसारख्या कारवाईच्या धमक्या दिल्या जात असल्याचा दावाही वानखेडे यांनी केला आहे.
दिवसभरात काय घडले ?
– राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी, ”वानखेडे मुस्लीम असतानाही त्यांनी राखीव कोटय़ातून भारतीय महसूल सेवेत प्रवेश कसा मिळवला”, असा प्रश्न केला.
– दुसरीकडे वानखेडेंवर २५ कोटींच्या लाचखोरीचा आरोप करणारे पंच प्रभाकर साईल यांना मुंबई पोलिसांनी संरक्षण दिले.
– साईल यांनी केलेल्या आरोपानंतर याप्रकरणी एनसीबीकडून दक्षता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
मलिक-वानखेडे आरोप-प्रत्यारोप
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर सोमवारी आणखी काही आरोप केले. वानखेडे यांच्या जन्म दाखल्यावर वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचे दर्शवणारी दाखल्याची प्रतच मलिक यांनी सादर के ली. समीर यांचे आई-वडिल मुस्लीम होते मग त्यांनी राखीव कोटय़ातून भारतीय महसूल सेवेत प्रवेश कसा मिळविला, असा सवालही मलिक यांनी के ला. मात्र आपले वडील हिंदू तर आई मुस्लीम होती, असे प्रत्युत्तर वानखेडे यांनी दिले. मलिक यांनी वानखेडेंच्या पहिल्या लग्नाची छायाचित्रेही प्रसारित केली. त्यावर आपला २०१६ मध्ये घटस्फोट झाला आणि त्यानंतर अभिनेत्री क्रोंती रेडकर यांच्याबरोबर विवाह झाल्याचे वानखेडे यांनी स्पष्ट केले.
खासगी जीवनावरील हल्ले दु:खद : वानखेडे
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एक जन्मदाखला ट्वीटर हँडलवर प्रसारित करून तो समीर वानखेडे यांचा असल्याचा दावा केला आहे. त्यावर, वानखेडे यांनी, ”माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे ३० जून २००७ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले. माझे वडील हिंदूू आणि माझी आई झहीदा मुस्लिम होती. मी भारतीय परंपरेतील एक संमिश्र, बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे आणि मला माझ्या वारशाचा अभिमान आहे”, असे स्पष्ट केले आहे. २००६ साली विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत नागरी विवाह समारंभात डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी लग्न केल्याचे स्पष्टीकरण वानखेडे यांनी दिले आहे. २०१६ मध्ये वानखेडे आणि शबाना यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर २०१७ मध्ये मी क्रांती रेडकरशी विवाह केला. माझी खासगी कागदपत्रे ट्वीटरवर प्रसारित करणे अपमानास्पद आहे. मलिक यांच्या कृत्यांमुळे मी आणि माझे कुटंबिय मानसिक, भावनिक तणावाखाली आहोत. माझ्या खासगी जीवनावरील हल्ले दु:खद आहेत, असे वानखेडे यांनी म्हटले आहे.
‘ तक्रोर दाखल झाल्यास वानखेडेंवर कारवाई ‘
वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत जुजबी चर्चा झाल्याचे राज्याचे गृहमंत्री वळसे-पाटील यांनी सांगितले. वानखेडेंवरील आरोपांबाबत चौकशीची मागणी नवाब मलिक यांच्यासह काँग्रेस आणि शिवसेनेने के ल्याकडे गृहमंत्र्यांचे लक्ष वेधले असता, आपली या संदर्भात अद्याप मलिक यांच्याशी चर्चा झालेली नाही, पण कोणी तक्रोर दाखल के ल्यास चौकशी के ली जाईल, असे वळसे यांनी स्पष्ट के ले.
आरोप बेदखल करण्याची मागणी फेटाळली
क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच साईल यांनी केलेल्या लाचखोरीच्या आरोपांबाबतच्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेत ते बेदखल करण्याची वानखेडेंची मागणी विशेष न्यायालयाने सोमवारी फेटाळली. पंच साईल यांनी के लेले आरोप तपासात अडथळे निर्माण करण्याचा आणि तपास यंत्रणेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा करत त्याच्या प्रतिज्ञापची दखल घेऊ नये, अशी मागणी वानखेडे यांनी केली होती. पन
पंच साईल यांना पोलीस संरक्षण द्यावे व
वानखेडे यांच्यावर लाचखोरीचा आरोप करणारे पंच प्रभाकर साईल यांनी पोलीस आयुक्तालयात जाऊन जीवाला धोका असल्याने पोलीस संरक्षण देण्याची मागणी सुध्या मागणी केली. साईल यांची पोलीस संरक्षणाची मागणी मान्य तर झाली.पन लाचखोरीचा आरोप करणाऱ्या साईल यांना पोलीस संरक्षण देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री वळसे-पाटील यांनी दिली.
दबावाचा प्रयत्न करुण : एनसीबीने तपास यंत्रणा आणि तिच्या अधिकाऱ्यांवर करण्यात आलेले आरोप खोटे, आहे ही दिशाभूल करणारे आहेत. त्याद्वारे तपास यंत्रणेची प्रतिमा मलिन करण्याचा आणि दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा एनसीबीने विशेष न्यायालयात केला आहे.

फुलोरा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची संजीवनी ठरणार-मुलभूत क्षमता विकसनावर भर….!

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

चामोर्शी:-दिनांक २५,गट साधन केंद्र पंचायत समिती चामोर्शी येथे इयत्ता पहिली ते सातवीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे तालुका स्तरीय फुलोरा प्रशिक्षण टप्पा दोन आज पासून सुरू झाला.सदर प्रशिक्षण हे जिल्हा परिषद गडचिरोली चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे संकल्पनेतून आणि प्रेरणेतून सुरू आहे.या टप्प्यात प्रशिक्षणाचा लाभ ५२ शिक्षक घेत आहेत.प्रशिक्षण हे दिनांक २५ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत चालणार आहे.प्रशिक्षणाला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांचे नियंत्रणात प्रशिक्षणाचे सुलभक रमेश किरमिरे,प्रविण धुरके,राजू सोनटक्के हे गट शिक्षणाधिकारी नरेश म्हस्के यांचे मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देत आहेत.
प्रशिक्षणाला निवड केलेल्या शाळांचे उपक्रमशील मुख्याध्यापक व शिक्षक स्वच्छेने उत्तम सहकार्य करीत आहेत.तसेच गट साधन केंद्र चामोर्शी येथील साधनव्यक्ती चांगदेव सोरते,विवेक केमेकर, घनश्याम वांढरे,कालीदास डोंगरे,कु सरलक्ष्मी यामसनी,कु वंदना चलाख,विशेषतज्ञ सुशील गजघाटे,व सर्व संसाधन शिक्षक उपस्थित राहुन प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी सहकार्य करीत आहेत.
फुलोरा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध कृत्या, विद्यार्थी उपयोगी उपक्रम,शैक्षणिक साहित्य,आदर्श परिपाठ,भाषा गणित व इंग्रजी विषयातील संबोध,मुलांचा अध्ययन स्तर उंचावण्यासाठी अध्ययन-अध्यापन प्रक्रियेच्या माध्यमातून विविध खेळ,गाणी, गोष्टी इत्यादी सुलभ होण्याच्या दृष्टीने सुलभक मार्गदर्शन करीत आहेत.

अ‍ॅड.देवकांत पाटील व योगिता पाटील यांचा न्यू बचपन प्ले स्कूल व माळीच क्लासेस यावल यांच्यातर्फे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मान चिन्ह देत केला सत्कार …

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील यावल येथे माळीज क्लासेस सभागृहात दिनांक २४ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्यात विरावली येथिल समाजसेवक अ‍ॅड. देवकांत बाजीराव पाटील, अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन तथा ग्रामपंचायत सदस्य विरावली व त्यांच्या सौभाग्यवती सौ. योगिता देवकांत पाटील सचिव छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशन तथा सदस्य संजय गांधी समिती यावल यांचा न्यू बचपन प्ले स्कूल व माळीज क्लासेस चे संथापक अध्यक्ष श्री कैलास माळी सर यांनी व त्यांच्या सहकारी संचालक मंडळ यांनी
अ‍ॅड.देवकांत पाटील व योगिता पाटील यांच्या सामाजिक , शैक्षणिक ,राजकीय कार्याची दखल घेत छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन च्या माध्यमातून राबवलेले विविध उपक्रम त्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले नवनवीन नावीन्य पूर्ण प्रयोग याची दखल घेत तसेच कोरूना काळात केलेली जनजागृती , मास वाटप ,सॅनिटायझर वाटप, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्पर्धा,स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन शिबिर , बेसिक संगणक शिबिर , कोरोना काळात राज्यस्तरीय महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त घेतलेली ऑनलाईन स्पर्धा , तसेच रक्त तपासणी शिबिर ,रक्तदान शिबिरे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे ,वृक्ष लागवड ,वृक्ष संवर्धन , स्वछता विषयी जनजागृती स्मशान भूमीत साफ सफाई अभियान राबवणे नियमित पणे सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम घेणे सामाजिक क्षेत्रात नेहमी सर्वांना मदत करत राहणे राजकीय व्यासपीठाच्या माध्यमातून सामाजिक विषयांना हात घालत राहणे जनहिताचे सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गे लावण्याचे महत्त्वपूर्ण योगदान याची दखल घेत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मान चिन्ह शॉल पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक कैलास माळी तर सूत्रसंचालन सुधाकर बाऊस्कर यांनी केले.यामध्ये सामाजिक क्षेत्रातील माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील,नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे,ॲड.देवकांत पाटील तर शैक्षणिक क्षेत्रातील माजी प्राचार्य सुरेश वाघ,मुख्याध्यापक नितीन झांबरे,प्रा.नंदन वळींकार,सुनिल माळी,प्राचार्य एम. के.पाटील,स्निग्धा जोशी,सतिश मोरे आदींचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी डॉ.जागृती फेगडे,सुनिल देशमुख,गणेश देशमुखे, सुरेखा माळी , छत्रपती फाऊंडेशन संचालक पवन पाटील , हितेश गजरे ,गिरीष पाटील ,किशोर माळी आदी मान्यवर उपस्थित होते.सर्व उपस्थितांचे आभार कार्यक्रमाचे आयोजक कैलास माळी सर यांनी मानले

यावल येथे विविध घटनामध्ये मरण पावलेल्या नागरीकांच्या कुटुंबास शासनाच्या वतीने १० लाखांची आर्थिक मदत

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील विविध कारणांनी अपघातात अक्समात मृत्यु पावलेल्या कटुंबातील कुटुंब प्रमुखांना राज्य शासनाच्या वतीने मिळणाऱ्या योजनेच्या माध्यमातुन मिळणाऱ्या शासकीय आर्थिक मदत यावल येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात यावल रावेर क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी व चोपडा आमदार सौ .लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली.
यावल येथील पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास आमदार शिरिष चौधरी , आमदार सौ . लताताई सोनवणे , पंचायत समितीच्या सभापती सौ .पल्लवी चौधरी , उपसभापती योगेश भंगाळे , जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे , पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील , पंचायत समिती भाजपाचे गटनेते दिपक अण्णा पाटील , निवासी नायब तहसीलदार आर के पवार , पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी विलास भाटकर , ग्रामविस्तार अधिकारी हबीब तडवी, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले , पप्पु जोशी , संतोष खर्चे यांच्यासह आदी राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते .दरम्यान यावेळी रावेर आणी चोपडा मतदारसंघातील सहा लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत प्रत्येकी २० हजार रुपये प्रमाणे एक लाख रुपये , नैसर्गीक आपत्तीत मदतीअंतर्गत न्हावी येथील विज अंगावर कोसळुन मरण पावलेले हमीद तडवी यांच्या कुटुंबास चार लाख तर मालोद येथे अंगावर भिंत कोसळुन मरण पावलेल्या मुलीच्या कुटुंब प्रमुख दगडू भावडु तडवी यांना चार लाख आणी हिंगोणा येथील आत्महत्या केलेले शेतकरी किसन राणे यांच्या कुटुंबास १लाख रुपयांचे धनादेश अशा प्रकारे १० लाख रुपयांची मिळालेल्या शासनाच्या आर्थिक मदतीचे धनादेश वितरीत करण्यात आली .

मानसूनने सम्पूर्ण देशातुन घेतला निरोप: हवामान खात्याकडून माहिती

0

 

SURYA MARATHI NEWS

शेतकरी यांची चिंता कमी

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर: गेले काही दिवस पासून दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात नैऋत्य मोसमी वारे अडकून पडल्यानंतर, अखेर संपूर्ण देशातून मान्सूनने माघार घेतल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने आज केली आहे.

आज 25 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशातून मान्सून परतला असल्याची अधिकृत माहिती हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून माहिती दिली आहे. की गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच मान्सून इतके दिवस भारतात सक्रिय राहिला आहे.व खरंतर, जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्याच केरळात मान्सूनने दिमाखात आगमन केलं होतं. त्यानंतर दोनच दिवसात मान्सूनचा पाऊस मुंबईत येऊन धडकला होता.

 

 

अखेर मान्सूनच्या सुरुवातीला कोसळलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे मुंबईकरांची पुर्ण धांदल उडाली होती. अनेक रस्त्यावर पाणी साचून संपूर्ण मुंबईत पुरजन्य स्थिती निर्माण झाली होती. बऱ्याच लोकांनी मानसून सामना करावे लागले होते.

यंदा मान्सून सामान्य राहणार असून सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं संपूर्ण भारत झोडपून काढलं आहे.

6 ऑक्टोबरपासून वायव्य भारतातून सुरू झालेल्य पावसाने राज्यात थैमान घातलं आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य आणि उत्तर महाराष्ट्राला परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. यामुळे अकोला, नाशिक परिसरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये शेतकऱ्याचं अतोनात बऱ्याच पैकी नुकसान झालं आहे.

पुण्यानं लसीकरणात ओलांडला 50 लाखांचा टप्पा; पालिकेनं मोजले तब्बल एवढे कोटी दुसरीकडे, गेल्या दोन आठवड्यापासून राज्यात कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. हवामान खात्याने येत्या पाच दिवसांसाठी राज्यात कोणताही इशारा दिला नाही. पुढील पाचही दिवस राज्यात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात मात्र अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात तापमानाचा पारा देखील घसरला आहे. रविवारी शहरात 16.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर लोहगाव येथे 17.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.तरी शेकर्याची चिंता कमी झाली दिसत आहे .