Home Blog Page 385

रुग्णालय परिसरात बिबट्या दिसताच नगरिकामध्ये खळबळ

0

 

SURYA MARATHI NEWS

वर्धा जिल्ह्यातील सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय परिसरात चक्क बिबट्या आढळल्याने
रुग्णालय खळबळ माजलीय. सकाळ दरम्यान मधे हा बिबट्या रुग्णालयाच्या छतावर कर्मचाऱ्याला दिसला.बिबट्या दिसताच रुग्णालय परिसरात नागरिका मधे खळबळ माजलीय. रुग्णालय प्रशासनाने सतर्कता बाळगत रुग्णालयाचे दरवाजे आणि खिडक्या बंद करत वनविभागासह पोलिसांना माहिती दिली. त्या वेळेस वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी येताच हा बिबट्या झाडावर बसला असल्याचे आढळले.काही वेळेतच कर्मचाऱ्यांनी त्याला हुसकावून लावले.मात्र तो या परिसरतीलच नालीत शिरला.मागील अर्धा तासापासून वनविभागचे कर्मचारी बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न करत आहे तर रस्त्यालगत असलेल्या नालीतच त्याने आडोसा घेतल्याने रुग्णालय समोरचा मुख्य रास्ता मार्ग बंद करण्यात आला आहे.

भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी प्रकाश चौधरी , सचिवपदी शब्बीर खान , उपाध्यक्षपदी सचिन नायदे यांची निवड

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाची सर्वसाधारण वार्षीक सभा सुशीला रमेश चौधरी विद्यालय किनगाव येथे संस्थापक अध्यक्ष अय्युब पटेल व प्रदेश सचिव जिवन मुरलीधर चौधरी यांच्या उपस्थीतीत संम्पन्न झाली, या सभेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार राजेंन्द्र एकनाथ पाटील हे होते बैठकीच्या सुरूवातीस कोरोनाच्या संकटमय काळात वृत्ता लेखणीचे कार्य करतांना अक्समातरित्या मरण पावलेले पत्रकार बांधव व त्यांच्या कुटुंबातील मरण पावलेल्यांना श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली, बैठकीत पत्रकारांच्या विविध समस्या व अडचणी संदर्भात सविस्तर धर्चा करण्यात आली . यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजय बनसोड यांच्या आदेशान्वये भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ, महाराष्ट्रच्या जळगाव जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली , यात जिल्हा ग्रामिण विभागाचे अध्यक्षपदी चुंचाळे येथील पत्रकार प्रकाश रामदास पाटील तर जिल्हा ग्रामिण उपाध्यक्षपदी किनगाव येथील पत्रकार सचिन रामकृष्ण नायदे यांची तसेच जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी पत्रकार आर.ई.पाटील आणी जिल्हा समन्वयकपदी हिंगोणा येथील पत्रकार रणजीत रमेश भालेराव व विभागीय संघटकपदी डांभुर्णी येथील पत्रकार मनोज सुकनाथ नेवे तर जिल्हा सचिवपदी हिंगोणा येथील पत्रकार शब्बीरखान सरवरखान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी बैठकीस अय्युब पटेल,सुनिल गावडे,जिवनचौधरी,शब्बीरखान,आर.ई.पाटील,मनोज नेवे,विकी वानखेडे,नितीन बडगुजर,अनिल न्हावी,सुनिल पिंजारी,रविंन्द्र आढाळे,रणजीत भालेराव,प्रविण मेघे,प्रकाश चौधरी,बाबूलाल पाटील,फिरोज तडवी,सचिन नायदे व महेश पाटील यांच्यासह इतर पत्रकार प्रामुख्याने उपस्थीत होते. बैठकीचे सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार महेश पाटील यांनी मानले .

शंभर दलितांनी गाव सोडून निषेध केला आहे.

0

 

 

अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील दानापूर या गावातील जातीय द्वेषातून होणार्या अत्याचाराच्या निषेधार्थ दानापूर येथील शंभर दलितांनी शुक्रवार 22 ऑक्टोंबरला गाव सोडून निषेध केला आहे. यावेळी या बांधवांनी गावालगतच्या पाझर तलावा जवळ मुक्काम करावे लागले असून, पून्हा गावात परतणार नाही असा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे गावातील त्यांच्या मालमत्तेच्या सरक्षणाची जबाबदारी ही प्रशासनाची राहील असे त्यांनी लेखी प्रशासनाला कळविले आहे. दानापूर येथील दलित बांधवाची दानापुर शेत शिवारात शेती आहे. याच शिवारात मुख्य सरकारी पांदणच्या एक शेत पलीकडे या दलितांची शेती आहे. परंतु गावच्या सवर्णांनी या दलितांना त्यांच्या शेतात जाणारा पिढीजात वहीवाटीचा रस्ताच बंद केला. त्यामुळे त्यांची मशागत व इतर शेती कामे खोळंबली. ऐन पेरणीच्या वेळी ट्रॅक्टर अडवुन त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप दलित बांधवांचा आहे.
या कारणाने दानापूर गावातील जातीय द्वेषातून होणार्या अत्याचाराच्या निषेधार्थ गावातील शंभर दलितांनी गाव सोडून निषेध केला होता.पण २३ ऑक्टोंबर रोजी उशिरा रात्रीच्या वेळस प्रशासनाच्या आश्वासना नुसार दलित बांधव घरी परतले . पण आज दिनांक 24 ऑक्टोंबर रोजी अकरा वाजताच्या आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र मुख्य महासचिव मनीष भाऊ साठे,यांच्या मार्गदर्शनात आजाद समाज पार्टीचे पद अधिकारी व कार्यकर्ते व भीम आर्मी चे पदाधिकारी व कार्यकर्ते या गावात जाऊन पीडितांना घटनेची माहिती घेऊन पीडितांना तुमच्या आजाद समाज पार्टी खंबीर पणे उभी आहे आणि पूर्ण आंबेडकरी समाज पुमच्या पाठीशी आहे अशे आश्वासन दिले त्यावेळी आजाद समाज पार्टीचे अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल डोंगरे, भीम आर्मी भारत एकता मिशन चे अमरावती जिल्हा अध्यक्ष रितेश तेलमोरे अमरावती शहर युवक अध्यक्ष सुमित थोरात, अमरावती शहर युवक महासचिव गौतम वले, अमरावती शहर युवक सचिव जंजिर सिंग टांक करण सिंग टांक व शेकडो कार्यकर्ते त्यावेळी हजर होते आणि आजाद समाज पार्टीच्या आणि भीम आर्मी च्या वतीने पीडितांना पोलीस सौरक्षन आणि गावामध्ये पोलीस चौकीची मागणी करण्याकरिता गावामधील संबंधित पोलीस स्टेशन ला जाऊन तिथल्या ठाणेदार यांच्याशी मागणी केली व तात्काळ ती मागणी मान्य केली त्यासोबत R P I ( गवई गट) R P I (आठवले गट) वंचित बहुजन आघाडी,दलित पँथर असे संपूर्ण पक्ष व संघटना एकत्र येऊन पीडितांचे सांत्वन करण्यात आले

आर्यन खान क्रुझ ड्रग्स पार्टी बाबत कुणाल जानिनेच NCB ला माहिती दिली?

0

 

SURYA MARATHI NEW

मुम्बई  आर्यन खान क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी एनसीबीने आर्यन खानसह आठ जणांना अटक केली. मात्र या कारवाईनंतर रोज आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. एनसीबीचा आर्यन खान प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यानं धक्कादायक आरोप केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटवर व्हिडीओ शेअर करुन चौकशीची मागणी केलीय.

या व्हिडिओमध्ये केपी गोसावी आर्यनचं कुणाशी तरी बोलणं करुन देताना दिसत आहे. तर शेजारी एक व्यक्ती खुर्चीत आरामात बसलेली दिसत असून ही व्यक्ती कुणाल जानी सारखी दिसत आहे. त्यामुळें एनसीबी कार्यालयात बसणारी ही व्यक्ती कुणाल जानीच असल्याची माहिती अशी चर्चा सुरु आहे.

संजय राऊत यांनी व्हिडिओ शेअर करुन चौकशीची मागणी केल्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनीही प्रतिवार केला आहे. संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या प्रतिक्रिया देताना मोहित कंबोज यांनी संजय राऊतजी हा व्हिडिओ डिलिट करु नका असे सांगत व्हिडिओतील काळ्या कपड्यातील व्यक्ती कोण आहे? कोणत्या पक्षाशी, राजकारण्याशी, सेलिब्रेटीशी, मंत्र्याशी तो संबंधित आहे? असे सवाल विचारले आहेत.
कोण आहे कुणाल जानी?
कुणाल जानी हा वांद्र्यातील हॉटेल व्यावसायिक असून मयत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मित्र आणि शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचा बिझनेस पार्टनर आहे. तसेच शाहरुख खानसोबतही त्याचे जवळचे संबंध असल्याचे म्हटले जाते.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
“आर्यन खानच्या केसमधील साक्षीदाराला चक्क कोऱ्या कागदावर एनसीबीनं स्वाक्षऱ्या का करायला लावल्या, सही करायली लावली हे धक्कादायक प्रकार आहे.पैशाची मागणी केल्याचेही काही रिपोर्टस समोर येत आहेत असं समजलं.मुख्यमंत्री ठाकरे म्हणालेले की ह्या केसेस या महारष्ट्राला हा सर्ड्यंत्र बदनाम करण्यासाठी आहेत. असा प्रश्न निर्माण होत तर नाही

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि महाराष्ट्र पोलिसांनी याची स्वत:हून दखल घेत चौकशी करावी”, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत आर्यन खान के.पी.गोसावीच्या फोनवरुन कुणाशी बोलतोय हा प्रश्न निर्माण झालाय.
एनसीबीला खोटे ठरविण्यासाठी आता व्हिडीओ क्लिपचा आधार : दरेकर
एनसीबीच्या समीर वानखेडे यांच्या विरोधात पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut)यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओ क्लिपसंदर्भात दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांकडे दिली. एक व्हिडीओ क्लिप सोशल मिडियावर ट्वीट करुन त्या आधारे अनुमान लावणे, हे एका जबाबदार खासदाराने वागणे चक्क चुकीचे वाटते. हा व्हिडिओ क्लिपची सत्यता पडताळून जर ते खरे असेल तर त्यावर भाष्य करणे योग्य होईल. कोणी तरी व्हिडिओ क्लिपमध्ये ‘सत्यमेव जयते’ बोलत असेल व त्या आधारे अनुमान लावणे हे चुकीचे आहे. आपण बोलतोय ते खरे आहे, हे दाखवण्यासाठी त्या गोष्टी क्रिएट केल्या जात नाहीत ना? असा संशयही दरेकर यांनी व्यक्त केलाय.

प्रभाकर साळीचे नेमके हा आरोप काय? सविस्तर वाचा?

आर्यन खान प्रकरण दाबण्यासाठी 25 कोटींची डील झाली होती. त्यापैकी 8 कोटी समीर वानखेडेंना मिळणार होते, के.पी गोसावी, सॅम, पूजा दादलानीमध्ये डील होणार होती, असा दावा प्रभाकर साईल यांनं केला आहे. 50 लाख के.पी गोसावीसाठी एका व्यक्तीकडून घेतले होते. 38 लाख सॅम यांना दिले होते, तर माझ्याकडून एनसीबीने 9 कागदांवर सह्या आता पर्यन्त घेतल्या असा आरोप प्रभाकर साईल यांनी माहिती दिली की माझ्या जीवाला समीर वानखेडेंकडून धोका असल्याचा आरोप देखील प्रभाकर साईल यानं केकेला आहे.

प्रभाकर साईल कोण?

प्रभाकर साईल हा के.पी गोसावीचा बॉडीगार्ड आहे. आर्यन खान प्रकरणात किरण गोसावी( kiran gosavi) सह प्रभाकर साळी याचं नाव देखील साक्षीदार म्हणून एनसीबीकडून सांगण्यात आलं आहे. 12 जुलैपासून प्रभाकर साईल गोसावीचा बॉडीगार्ड आहे.

भुजबळांनी नांदगावचा नाद सोडावा संजय राऊत यांचा भुजबळांना टोला

0

 

निलेश पगारे नांदगाव तालुका प्रतिनिधी

खा.संजय राऊतांचा नांदगाव दौरा भुजबळांवर केलेल्या टिकेने चांगलाच चर्चेत आला आहे.जनतेच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर असणारे जनसेवक आमदार म्हणुन सुपरिचीत सुहास अण्णा कांदे यांनी अतिवृष्टी व पुरग्रस्त नागरिक व शेतक-यांसाठी अनुदानावरुन भुजबळ साहेबांवर आक्रमक पवित्रा घेऊन दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली होती.त्यानंतर सुहास कांदेंनी अनेक आरोप केले होते या गोष्टींवर खा.संजय राऊत पडदा टाकतील व नांदगावच्या जनतेच्या प्रश्नांवर समस्येवर बोलतील असे जनतेला अपेक्षा होती परंतु संजय राऊतांनी त्या वादाला आग देऊन भुजबळांनी नांदगावचा नाद सोडावा,शिवसेनेच्या कृपेनेच भुजबळ साहेब राजकारणात अाहेत.आज लाल दिव्याची गाडी नाशकात आहे उद्या ती नांदगावात राहील असे सांगुन संजय राऊतांनी भविष्यात वेळ आली तर सुहास कांदेंना मंत्रीपद देऊ असे आश्वासीत केले.शिवसैनिकांनी नांदगावात भगवा फडकवला आहे तो आता पडु देणार नाही असे सांगीतले पण ज्यांना स्वत:ला कधी मंत्रीपद मिळाले नाही ते अण्णांना मंत्रीपद देण्यास सफल होतील का हे तर वेळच सांगेल अभी तो दिल्ली दुर है.मागील एक वर्षाच्या कालावधीत सुहास अण्णा कांदे यांनी केलेले कार्य वाखाणण्या जोगे आहे पुढील कालावधीत जनतेच्या अडचणींसाठी कितपत कार्य करतील हे तर दिसेलच पंकज भुजबळांनी त्याच्या कार्यकालात केलेली कामेही विसरुन चालणार नाही.पालकमंत्री भुजबळांना विरोध टिका करुन नांदगाव मतदारसंघाचा गड सांभाळण्यास शिवसेनेला पुढिल चार वर्षात कितपत यश मिळते यावर पुढील पंचवार्षिक अवलंबुन आहे.पालकमंत्री म्हणुन छगन भुजबळ जनतेच्या मनात टिकुन राहतात की जनसेवक म्हणुन सुहास अण्णा कांदे राज्य करतात याचे चित्र आता पुढिल पाच वर्षात स्पष्ट होईलच परंतु या काळात जनतेचे प्रश्न मार्गी लागावे हीच सदीच्छा.

पंचायत समितीच्या नुतन प्रशासकीय ईमारतीचा लोकापर्ण सोहळा पालकमंत्र्यांच्या उपस्थित संपन्न झाला

0

 

कार्यक्रमावर काँग्रेस व राष्ट्रवादीने टाकला होता बहीष्कार

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

येथील पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. तर भाजप व शिवसेनेचे नेते आणि पदाधिकार्‍यांनी याला उपस्थिती लावली.

यावल येथे पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. या कार्यक्रमास चोपडा मतदार संघाचे आमदार सौ .लताताई चंद्रकांत सोनवणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ रंजना प्रल्हाद पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा परिषद सदस्य सौ सविता भालेराव, सौ नंदा सपकाळे, पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, उपसभापती योगेश भंगाळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, कार्यकारी अभियंता सुधीर धीवरे, मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद जिवराम महाजन, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुषार पाटील, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुजित चौधरी, यावलच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा कोळी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणे, माजी तालुकाप्रमुख कडू पाटील, नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. नरेंद्र वामन कोल्हे, माजी जिल्हा परिषद सदस्य भरत महाजन, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सुनील फिरके, नरेंद्र नारखेडे आदी मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित होते.

लोकापर्ण सोहळा कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी यांनी केले. याप्रसंगी बोलतांना माजी मंत्री गिरीश महाजन यांनी माजी आमदार ( कै.) हरीभाऊ जावळेंची आठवण काढून शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी धडपडणारे, सतत पाठपुरावा करणारे कै . हरीभाऊ जावळे नेहमी शेतकर्‍यांसाठीच झटत असत. कोरोना विषाणूच्या महामारीनंतर अस्मानी संकटाने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले असतांना राज्य शासनाने वीजबिल वसुली मोहीम तीव्र केली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग कमालीचा त्रस्त झाला असुन प्रसंगी आत्महत्या करीत असल्याचे देखील प्रकार घडत आहे . यामुळे राज्यातला शेतकरी वर्ग वैतागला असल्याचे आ . गिरीष महाजन म्हणाले. तर हरीभाऊ जावळे सातत्याने राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रासाठी पाठपुरावा करत असून यासाठी प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिवंगत हरीभाऊ जावळे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते पुढे म्हणाले की, शेतकर्‍याच्या पोटाला जात, पात, धर्म नसतो. शेतकरी जिवंत राहीला पाहीजे म्हणून आपण शेतकर्‍यांच्या प्रश्नांसंदर्भात गांभीर्याने असून शेतकर्‍यांच्या विजबील सह, भारनियमनबाबत पाठपुरावा करणार आहे. फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यावर अनेकांचे रोजगार अवलंबून असून सेवा देणारे उपक्रम सुरु रहावे यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे आश्वासन ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून दिले.

यावेळी माजी जि.प. सदस्य हर्षल पाटील, कृषी उत्पन्न चे माजी सभापती कृषी भुषण नारायण चौधरी, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, कृउबाचे संचालक राकेश फेगडे, भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, कांचन फालक, गोपालसिंग पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष निलेश गडे, किशोर कुलकर्णी, शिवसेनेचे पप्पू जोशी, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, सागर देवांग, निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार, गटविकास अधिकारी व्ही.एन. भाटकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश इंगळे यांनी केले. तर पं.स. सदस्य दीपक अण्णा पाटील यांनी आभार व्यक्त केले. दरम्यान आजच्या या पंचायत समितीच्या नुतन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमावर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी प्रोटोकॉलचा भंग झाल्याचा आरोप करत बहिष्कार टाकला. या संदर्भात आमदार शिरीष चौधरी व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश यावले आणि त्यांचे सहकारी या कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत.

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी (Ramdas athvale) केला वानखेडेंच्या जातीचा उल्लेख; म्हणाले…

0

 

SURYA MARATHI NEWS

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केला समीर वानखेडेंच्या जातीचा उल्लेख केला आहे.

आर्यन खान aryan khan प्रकरण रोज नवनवे वळण घेत आहे. आर्यन खान प्रकरणातील पंच असलेल्या प्रभाकर साईलने समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. तर, नवाब मलिक यांनी देखील वानखेडेंवर आरोप केले होते. या प्रकरणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. समीर वानखेडे हे मागास जातीतील अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना मंत्री नवाब मलिक यांनी लक्ष्य केले आहे, असं आठवले यांनी म्हटलंय.
रामदास आठवले म्हणाले, “समीर वानखेडे हे मागास जातीतील अधिकारी आहेत. म्हणून त्यांना नवाब मलिक यांनी लक्ष्य केले आहे. समीर वानखेडे यांनी मलिक यांच्या जावयाला अटक केली होती, त्यामुळे ते समीर वानखेडेंवर( samir wankhede )आरोप करत आहे. प्रत्यक्षात मात्र, समीर वानखेडे आपले कर्तव्य बजावत होते,” असंही ते म्हणाले. दरम्यान, अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे यांची नोकरी जाईल, त्यांना तुरूंगात पाठवू या राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे अल्पसंख्याक कल्याणमंत्री नवाब मलिक यांच्या इशाऱ्याबाबत आठवलेंनी वानखेडेंची नोकरी की, मलिकांचे मंत्रिपद जातयं हे पाहुया, असं आठवले म्हणाले.

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीतील अंमली पदार्थाच्या मोठ्या प्रमाणातील सेवनाचा मुद्दा समोर आला. आर्यन खानवरील aryan khan कारवाईत बिलकुल पक्षपातीपणा नसून, त्याच्या विरोधात भक्कम पुरावे असल्यानेच न्यायालय त्याला जामीन देत नसावे. सक्त वसूली संचालनालय, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या छापेमारीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई ही होणारच असल्याचे आठवले म्हणाले. Ramdas athavle

 

मनसेचा दणका गांगापूर येथे नवीन ट्रान्सफर

0

 

वडनेर — गांगापूर येथील विद्युत ट्रान्सफॉर्मर 20-25 दिवसापासून जाळले होते वारंवार सूचना देवूनही विद्युत वितरण कंपनी कानाडोळा करीत होते त्यामुळे गावातील नळ बंद होते व पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती चालू झाली होती.ही बाब तालुका संघटक जयंता कातरकर यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी वीज वितरण कंपनीला नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्या संदर्भात निवेदन दिले व दोन दिवसात नवीन ट्रान्सफॉर्मर बसविले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देताच एकच दिवसात नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले व आज नळ योजनेची लाईन चालू होवून नळाला पाणी बघताच गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.सर्व गावकऱ्यांनी जयंता कातरकार यांचे आभार मानले.मनसे नेहमीच जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरून प्रयत्न करीत आहे.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात “25 कोटिची” मागणी, व्हिडिओ आला समोर,

0

 

SURYA MARATHI NEWS

मुंबई : आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील धक्कादायक वीडियो समोर आला आहे व एक साक्षीदार किरण गोसावीच्या सहकाऱ्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.की
या प्रकरणात एनसीबीने त्यांना खोट्या पंचनाम्यावर सही करायला लावली होती, असा आरोप प्रभाकर साईल यांनी केला आहे. तसेच हे प्रकरण दाबण्यासाठी 25 कोटी रुपयांमध्ये डील केल्याचा आरोप केला आहे.

आर्यन खान aryan khan आणि नवाब मलिक navab malik दोन वेगळे विषय – गृहमंत्री

प्रभाकर साईल हा गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून काम करत असल्याचे सांगतात. ते म्हणतात, ”क्रूझवर झालेल्या छापेमारीवेळी ते किरण गोसावीसोबत होते. त्याने सॅम आणि गोसावी नावाच्या व्यक्तीला एनसीबी NCB कार्यालयाजवळ भेटताना पाहिलं. हे प्रकरण दाबण्यासाठी २५ कोटी रुपयांमध्ये डील झाली होती. त्यापैकी 8 कोटि समीर वानखेडे सरांना द्यायचे आहे आणि उरलेले आपल्याला वाटून घ्यायचे आहेत, असे किरण गोसावी यांनी फोनवर बोलत होते. त्यानंतर एका ठिकाणाहून मला ५० लाख रुपये घ्यायला पाठविले होते. ते पैसे मी त्यांना आणून दिले. त्यानंतर त्यांनी माझ्याकडे एक पिशवी देऊन ती सॅमला द्यायला सांगितली होती. किरण गोसावी (kiran gosavi)स्वतः पत्नीसोबत बाहेर गेले होते.” असे खळबळजनक आरोप या व्हिडिओमधून केला आहे. मात्र, सूर्या मराठी न्यूज़ या व्हिडिओची पुष्टी करत नाही.
surya marathi newe

दिवाळीच्या पुर्वी शेतकऱ्यांना  मिळणार सहा हजार एवजी बारा हजार गिफ्ट

0

 

SURYA MARATHI NEWS

सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे. दिवाळीपूर्वी केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची रक्कम दुप्पट करू शकते.

जर हा प्रस्ताव मान्य झाला तर शेतकऱ्यांना वार्षिक चक्क 6000 ऐवजी 12000 रुपये मिळतील दिवाळी गिफ्ट .(Diwali gift for farmers)
जर किसान योजनेची रक्कम दुप्पट झाली तर शेतकऱ्यांना हप्ता (पीएम किसान हप्ता) 2000 रुपयांवरून 4000 रुपयांपर्यंत वाढेल. 2021 च्या दिवाळीपूर्वी केंद्रातील मोदी सरकार याची घोषणा करू शकते.
शेतकऱ्यांना गिफ्ट मिळणार !
खरं तर, अलीकडेच, बिहारचे कृषिमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची दिल्लीत भेट घेतली आणि त्यानंतर माध्यमांना सांगितले की पीएम किसान सन्मान निधी (पीएम किसान) ची रक्कम दुप्पट होणार आहे. तेव्हापासून पीएम किसानची रक्कम दुप्पट करण्याची शक्यता वाढत आहे की सरकारने त्यासाठी पूर्ण तयारी केली आहे.
भारत सरकारच्या पीएम किसानसाठी मोबाइल अॅप(Mobile app)
तुम्ही त्याचे तपशील पीएम किसानच्या ऑनलाइन पोर्टल www.pmkisan.gov.in किंवा मोबाइल अॅपद्वारे तपासू शकता. त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी, NIC (National Informatics Center) ने एक मोबाईल अॅप ( mobile App) विकसित केले आहे.
तुम्ही अशा प्रकारे नोंदणी करू शकता
तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसच्या CSC काउंटरला भेट देऊन नोंदणी करू शकता. यासाठी तुम्ही किसान पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेब पोर्टलला भेट देऊन तुमचे नावही नोंदवू शकता. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही PM Kisan GOI मोबाईल अॅपद्वारे देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता.
यासाठी तुम्ही ‘Google Play Store’ वर जाऊन ते डाउनलोड करा. हे लक्षात घेण्यासारखे आहे की त्याची भाषा आपल्या स्थानिक भाषेत अनुवादित केली जाऊ शकते.
भारत सरकारच्या पीएम किसानसाठी मोबाइल अॅप
तुम्ही पीएम किसानच्या ऑनलाइन पोर्टल www.pmkisan.gov.in किंवा मोबाईल अॅपद्वारे त्याचे तपशील तपासू शकता. त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी एनआयसी (नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर) ने एक मोबाईल अॅप विकसित केले आहे.

SURYA MARATHI NEWS