Home Blog Page 387

दिराकडून 42 वर्षीय बावजयिला’ अनैतिक संबंधाचे व्हिडिओ वायरल करण्याची धमकी”

0

 

SURYA MARATHI NEWS

पूणे:- पूर्वीसारखे अनैतिक संबंध ठेवायचे असे सांगून भावजयीला चक्क मारहाण करणार्‍या व अनैतिक संबंधाचे व्हिडीओ व्हायरल (Video Viral) करण्याची धमकी देणार्‍या दीराविरुद्ध वारजे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी कर्वेनगरमधील (Karve Nagar) ४२ वर्षाच्या विवाहितेने वारजे पोलीस ठाण्यात Warje Malwadi Police Station (३५३/२१) फिर्याद दिली आहे. की
हा प्रकार २० ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजता दरम्यान मधे घडला. आहे
फिर्यादी या त्यांच्या घरात असताना त्यांचा दीरने जबरदस्तीने त्यांच्या घरात आला.
आनी त्याने फिर्यादीचे हाताचे दोन्ही दंड पकडून फिर्यादी यांना पूर्वीसारखे आपले अनैतिक संबंध कायम ठेवायचे आहेत़ असे म्हणून फिर्यादीच्या गालावर हात फिरवला.
फिर्यादी यांनी विरोध करुन पतीला नाव तुझ नाव सांगेल, असे बोलल्यावर त्याने तुझ्या पतीस मारुन टाकीन अशी धमकी दिली. व
तसेच त्यांच्या गालावर चापट मारुन फिर्यादीला म्हणाला की तुझ्या मुलीला मी आत टाकली आहे.
त्या केसमध्ये मला मदत केली नाही तर तुझे आणि माझे अनैतिक संबंधाचे व्हिडीओ सगळीकडे व्हायरल (Video Viral) करील, अशी प्रकारची धमकी दिली. या धमकीमुळे त्यांनी आपल्या दीराविरुद्ध विनयभंगाची (molestation case)
तक्रार केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रायकर पुढील तपास करीत आहेत. SURYA MARATHI NEWS

31 वर्षीय विवाहिते सोबत जबरदस्तीने शरीर संबंध

0

 

पुणे : surya marathi news जिवलग मैत्री असताना खासगी फोटो काढून त्याला व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहिती सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध करुण (physical relation) ठेवून त्याने त्याचे व्हिडिओ पन काढले. व
त्यानंतर त्या तरुणाने आता बनावट फेसबुक अकाऊंट (Facebook Account) काढून त्यावर ते व्हिडिओ टाकून ते तिच्या नातेवाईक व मित्रांना पाठविले. व तसेच पतीला पाठवून तिची नाहक बदनामी करणार्‍या अमेरिकेतील तरुणाविरुद्ध पोलिसांनी बलात्कार (Rape) व विनयभंगाचा गुन्हा (molestation case) दाखल केला (Pune Crime) आहे.
राज ज्ञानेश्वर धोंडे (Raj Dnyaneshwar Dhonde) (रा. अंबर अपार्टमेंट, अमरावती. सध्या टेक्सास, अमेरिका) असे गुन्हा दाखल (Pune Crime) झालेल्याचे नाव आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०१५ पासून आतापर्यंत होत होता.
याप्रकरणी एका ३१ वर्षाच्या विवाहितेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात chaturshringi police station (गु. र. नं. ४६४/२१) फिर्याद दिली आहे. व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीसोबत घट्ट मैत्री करुन फिर्यादीचे मोबाईलमधील खासगी फोटो त्याच्या मोबाईलमध्ये फ़ोटो घेतले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादीसोबत जबरदस्तीने शरीर सुखाची संबंध ठेवून त्याचे व्हिडिओ काढले. व त्यानंतर त्याने फिर्यादीचे नावे फेक फेसबुक अकाऊंट तयार करुन त्यावर फिर्यादीचे नातेवाईक व मित्र यांना पाठवून फिर्यादीची विवाहिती ची बदनामी केली. तसेच फिर्यादीचे पती यांना सुद्धा शरीर संबंधाचे व्हिडिओ पाठवून फिर्यादीची बदनामी (Pune Crime) केली आहे. फिर्यादीने याची तक्रार सायबर पोलिसांकडे केली होती. सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) प्राथमिक तपास करुन तो चतु:श्रृंगी पोलिसांकडे (chaturshringi police) वर्ग केला आहे. पोलीस निरीक्षक लांबतरे तपास करीत आहेत. Surya marathi news

यावल नगर परिषदच्या आगामी काळात होवु घातलेल्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष पुर्ण ताकदनिशी उतरणार : अनिल चौधरी

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील नगर परिषदच्या होवु घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष पुर्ण ताकदनिशी सर्व जागा लढवणार असल्याची माहीती आज प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर विभागीय अध्यक्ष अनिल चौधरी यांनी यावल येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत दिली . यावल येथील यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते , यावेळी त्यांनी यावल नगर परिषदच्या नुतन साठवण तलावाच्या उभारणीत झालेल्या कथीत भ्रष्टाचारास आपण शहरातील जनते समोर घेवुन जाणार असल्याचे सांगुन प्रहारच्या हातात नगर परिषदची सत्ता आल्यास साठवण तलावात भ्रष्टाचार करणार्‍यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करू असे बोलुन यापुर्वी किती नगराध्यक्ष नगर परिषदेत होवुन गेलेत मात्र खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर यावल शहराचा विकास झाला आहे का ? असा प्रश्न यावेळी आपल्या समोर येतो , यावल शहराच्या विकासाचे व्हीजन घेवुन प्रहार पक्ष हे निवडणुक लढवणार असुन , येणाऱ्या निवडणुकीत यावलकर मंडळी अत्यंत गार्भीयांने विचार करून निर्णय घेतील कुणाच्या हातात नगर परिषदची सुत्रे सोपव्याची असे , या वेळी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले राज्यात महाविकास आघाडीचे शासन असुन आपला पक्ष यावल नगर परिषदच्या निवडणुकीत जर आपल्या पक्षाला समाविष्ठ करण्याची संधी मिळाली तर आपला पक्ष महाविकास आघाडी सोबत जाणार का असा प्रश्न पत्रकारांनी चौधरी यांना विचारले असता , यावल नगर परिषद वगळता ईतर ठीकाणी जर असा प्रस्ताव आला तर आम्ही आघाडीत शामिल होवु असे चौधरी यांनी सांगीतले , यावेळी पत्रकार परिषदेत नगर परिषदचे विद्यमान उपनगराध्दक्ष अभीमन्यु विश्वनाथ चौधरी ( हेंद्री), माजी नगरसेवक व प्रहारचे यावल शहराध्दक्ष तुकाराम बारी , मोहम्मद शेख हकीम, ( प्रहार अल्पसंख्यां तालुका अध्यक्ष ) , प्रहारचे यावल रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख अलीम शेख, प्रहार अल्पसंख्यांक चे जिल्हा उपाध्यक्ष हाजी हाकीम खाटीक , शेख शकील सर , यावल तालुका अध्यक्ष सुभाष सोनवणे , खलील शेख , रफीक टेलर , गोकुळ कोळी , नितिन कोळी , शेख निजाम , सागर चौधरी , तन्वीर मन्यार, युनुस खन्ना , उमर अली कच्छीआदी कार्यकर्ते मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते

शाहरुख खानचे मन्नत बगल्यावर एनसीबीचे अधिकारी आल्यावर शाहरुख काय म्हणाला

0

 

(Suryamarathinews)

आर्यन खानला( aryan khan) ची जामिन फेटाळल्याने शाहरुख ला आर्यन ला भेटण्यासाठी ऑर्थर रोड तुरुंगात गेला होता. पन 3 ऑक्टोबरपासून आर्यन खान (aryan khan)ला आधी एनसीबी अधिकारी आणि त्या नंतर न्यायालयीन कोठडीत आहे. आज एनसीबीची अधिकारी (NCB) टीम शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर (Mannat) गेली होती. तेव्हा शाहरुख खुपच हतबल झाल्याचे दिसला.
एनसीबी शाहरुख खानला (sharukh khan) ला नोटिस देण्यासाठी गेली होती. शाहरुखने स्वत: ही नोटीस घेतली. यावेळी मन्नत बंगल्यावर आलेल्या एनसीबी अधिकाऱ्यांना तुम्ही चांगले काम करत आहात, माझा मुलगा लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर यावा अशी अपेक्षा आहे, असे सांगितले.
आर्यन खानकडे aryan khan जर कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस असेल तर ते एनसीबीकडे जमा करावे, असे त्या नोटीसीमध्ये म्हटले आहे. शाहरुखच्या घरी व्ही व्ही सिंह गेले होते. त्यांनी म्हटले होते की, तपासाचे काही कागदोपत्री कारवाई राहिली होती. ती पूर्ण करण्यासाठी ते आले होते. आपले काम झाल्यावर अधिकाऱ्यांटी टीम मन्नतवरून निघाली.
आर्यन खान aryan khan याच्यासह अटकेत असलेल्या इतरांच्या न्यायालयीन कोठडीत आता ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आर्यन खानच्या जामीनासाठी गेल्या १६ दिवसांत ४ वेळा जामीन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.एनसीबीच्या मागणीनुसार मुंबई हायकोर्टात आता मंगळवारी आर्यन खानच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे सध्या तरी आर्यन खानला मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातच राहावं लागणार आहे.
आज बॉलिवूड किंग खान शाहरुख (Shahrukh Khan) आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये गेला होता. आर्यन-शाहरुख यांच्यात १५-२० मिनिटं संवाद झाला. चर्चेवेळी दोघांमध्ये काचेची भिंत होती. दोन्ही बाजूने इंटरकॉम होता. कुठल्याही सामान्य आरोपीच्या नातेवाईकांना भेटायला जातात तसं शाहरूखनं आरोपी आर्यनची भेट घेतली. त्याला कुठलीही विशेष ट्रिटमेंट दिली नाही. मुलाखतीची वेळ संपताच शाहरूख स्वत:चा बाहेर पडला. Surya marathi news

शहीद क्रांतिवीर बाबुराव शेळमाके यांच्या पुण्यतिथी दिनी काँग्रेस कार्यालयात शहीद दिन संपन्न

0

 

घुग्घुस प्रतिनिधी रमेश सुद्दाला,

घुग्घुस : इंग्रजांच्या जुलमी,अन्यायकारक अत्याचारी साम्राज्यवादी शासना विरोधात वयाच्या चोविसाव्या वर्षी पांचशे आदिवासी युवकांना सोबत घेऊन इंग्रजांशी बंड पुकारणाऱ्या क्रांतीवीर शहीद बाबुराव पुलेश्वर शेडमाके (राजगोंड) यांच्या शहिद दिनी 21 ऑक्टोबरला घुग्घुस काँग्रेस कार्यलयात संघर्षाचे सदैव स्मरण रहावे याकरिता शहीद दिन साजरा करण्यात आला.
क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी,
कामगार नेते सैय्यद अनवर, ज्येष्ठ नेते किशोर बोबडे,सुमेश रंगारी,गोगला शंकरजी, बालकिशन कूळसंगे, संजय कोवे,इर्शाद कुरेशी,कोंडय्या तलारी, सचिन कोंडावार, सुनील पाटील, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

स्वामी समर्थ मंदिर येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..

0

 

उषा पानसरे  कार्यकारी संपादक मो. 9921400542 असदपूर

रविवार दिनांक 17 ऑक्टोंबर रोजी डॉ. राणी चौधरी ,होमिओपॅथिक तज्ञ अमरावती यांनी श्री स्वामी समर्थ केंद्र रहाटगाव येथे निशुल्क आरोग्य तपासणी व औषधी वाटप शिबिराचे आयोजन केले. या शिबिरामध्ये ५० पेक्षा जास्त रुग्णांची आरोग्य तपासणी व होमिओपॅथिक औषधोपचार करण्यात आले. शिबिरामध्ये बोलताना डॉ. राणी चौधरी यांनी होमिओपॅथीमध्ये उपचार पद्धती बद्दल मार्गदर्शन केले. होमिओपॅथी ही अतिशय सशक्त व नैसर्गिक उपचार पद्धती आहे. या पॅथीमध्ये सगळ्या आजारांवर तसेच अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत औषधोपचार केले जातात. रुग्णांची शारीरिक आणि मानसिक अवस्था लक्षात घेऊन औषधी दिल्या जातात. शरीर आणि मन यांना आपण विभक्त करू शकत नाही. त्यामुळे आपल्या विचार शैलीचा आपल्या आरोग्यावर प्रचंड परिणाम होत असतो. म्हणून विचारांमध्ये सकारात्मकता, समतोल आहार ,नियमित व्यायाम, रोज सकाळी फिरायला जाणे या गोष्टी जर व्यवस्थित पाळल्या गेल्या तर निश्चितच आपले आरोग्य आपल्या हाती राहील असे डॉ. राणी चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले . तसेच श्री. स्वामी समर्थ केंद्राचे अध्यक्ष श्री. बोरखडे सर व सौ. बोरखडे मॅडम यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.

आद.भिमराव तायडे याच्या मार्गदर्शनाखाली नायगांव ता.नांदुरा येथे भगवान बुद्ध आणी त्यांचा धम्म ग्रंथ सांगता समारोह संपन्न

0

 

सुनिल पवार. नांदुरा. ता.प्रतिनिधि

आज दि.20/10/2021 वार बुधवारला मौजे नायगांव ता.नांदुरा येथे भगवान बुद्ध आणी त्यांचा धम्म या महान धम्मग्रंथाचा सांगता समारोह संपन्न झाला. सर्व प्रथम कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष आद.रुपाजी सपकाळ यांनी भगवान बुद्ध आणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमांना पुष्प अर्पण करुन दिप प्रज्वलनकरुन केली नंतर बौ.गजानन जाधव यांच्या हस्ते पूजापाठ घेण्यात आली.नंतर ग्रंथाचे वाचण ग्रंथ वाचक आद. संजय सपकाळ यांनी केले व भाषणाला सुरुवात झाली. प्रथम रमाई चरित्रावर बौ.शिवराम ईंगळे सर यांनी बहारदार गीत सादर केले.नंतर बौ.गजानन जाधव यांनी शीलाचे महत्त्व विषद करताना उपोसथ व्रताचेही महत्त्व सांगितले नंतर आद. भिमराव तायडे साहेबांनी नकारात्मक पंचशिलाचे सकारात्मक स्पष्टीकरण केले.यावेळी आद.भिमराव तायडे साहेबांच्या वतीने रमाबाई महीला मंडळाच्या पदाधिकारी यांना तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांच्या प्रतीमा भेट म्हणून देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला बौ.देविदास गाढे,संजय नरवाडे, किशोर गाढे,कडुजी सपकाळ, सापुर्डा सपकाळ, निबांजी वाघ,यांच्यासह बहुसंख्य उपासक उपासिका उपस्थित होत्या
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन आद. संजय सपकाळ यांनी केले.
शेवटी सरणत्तय घेऊन सांगता करण्यात आली

यावल राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने यावल तालसीलदार यांना केंद्र सरकार च्या विरोधात इंधन दर वाढ निषेधार्थ निदर्शने करत दिले निवेदन

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

 

आज दिनांक 20/10/2021 रोजी सकाळी 10 वाजेला यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात मिटिंग अयोजित केली होती .प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या सूचने प्रमाणे व जिल्ह्या राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तथा जि.प सदस्य रवींद्र पाटीलयांचे नेतृत्वाखाली यावल येथे कृषी उत्पन्न बाजार समिती पासून वाहन ढकल यावल तहसिल ऑफिस मध्ये नायब तहसीलदार राहुल सोनवणे व नायब तहसीलदार मुक्तार तडवी यांना निवेदन दिले सदर निवेदन केंद्र सरकारच्या विरेधात निषेधार्थ पेट्रोल,डिझेल,घरगुतीगॅस,खाद्यतेल इत्यादी जीवन आवश्यक वस्तू केंद्रसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले आहे.संदर्भात केंद्र सरकारच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने दिनांक 20/10/2021रोजी तहसीलदार यांना निवेदन दिले या प्रसंगी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी सहभागी झाले होते यात राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्ह्याअध्यक्ष रवींद्र पाटील अध्यक्ष ऍड देवकांत बाजीराव पाटील शहर युवक अध्यक्ष हितेंद्र गजरे जिल्हा युवक उपाध्यक्ष दीपक पाटील राजपुरी जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील तालुका समन्वयक किशोर माळी कार्याध्यक्ष किशोर पाटील तालुका उपाध्यक्ष पवन पाटील समाधान पाटील राष्ट्रवादीचे युवा नेते राजेश करांडे विद्यार्थी तालुकाध्यक्ष राकेश सोनार राहुल चौधरी धनराज पालक समीर तडवी विजय भोई भरत भोई छत्रपती फाउंडेशन संचालक गिरीश पाटील तात्या कोळी यशवंत अडकमोल युवराज भास्कर पाटील कैलास अडकमोल पटेल ुभम विटवे चंद्रकांत कोळी मुस्‍तुफा तडवी आदींसह तालुक्यासह शहरातील असंख्य कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते

स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या हस्ते प्रधानमंञी उज्वला गॅस वाटप

0

 

अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रयत्नाने डोणगांव येथिल शेकडो लाभार्थ्यांना गॅस वाटप

आज दिनांक २०.१०.२०२१ रोजी डोणगाव येथे रहमत नगर फक्रुद्दीन अली अहमद उर्दू हायस्कूल डोणगाव समोरच्या प्रांगणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयासमोर छोटेखानी गॕस वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टाले होते.प्रमुख उपस्थितीमध्ये सद्दाम शहा कट्टु शहा ग्रामपंचायत सदस्य डोणगांव,जिल्हा नेते भागवत जाधव तालुका अध्यक्ष प्रफुल्ल देशमुख,तालुका अध्यक्ष पक्ष नितीन अग्रवाल,तालुका अध्यक्ष विध्यार्थी आघाडी अमोल धोटे,श्री संत गजानन महाराज एच.पी.गॕस एंजन्सीचे संचालक अंकुश जाधव ,व्यवस्थापक अलिम भाई हे होते. या कार्यक्रमामध्ये डोणगाव येथील नागरिकांना प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत ब-याच लाभार्थ्‍यांना अजून पर्यंत १०० रुपयांमध्ये गॅस वाटप झालेले नव्हते.अध्यापर्यंत काही कुंटुबाला या योजनेचा लाभ मिळाला नव्हता त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार स्वाभिमानीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ही बाब स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ .टाले यांच्या लक्षात आणून दिली व लगेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने यासाठी श्री संत गजानन महाराज एचपी गॅस एजन्सी लेहनी च्या माध्यमातून तसेच डोणगाव येथील स्वाभिमानी एचपी गॅस पॉइंट यांच्या मदतीने गावातील पात्र लाभार्थींकडून प्रधानमंत्री उज्वला योजनेमार्फत गॕस वाटपासाठी कागदपत्रे गोळा करून ऑनलाइन करण्यात आले. त्यानंतर सतत गेल्या चार महिन्यापासून यासाठी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी पाठपुरावा करून शेकडो गॅस मंजूर करून आणले त्यामुळे डोणगाव येथील महिलांसाठी “धूर मुक्त चुल मुक्त” अभियान राबविले असून यामुळे घरातील धुरामुळे होणारे आजार कमी होतील कुंटुबाला प्रदुषणमुक्त वातावरण मिळेल.तसेच इंधनाचा वापर सुद्धा कमी होऊन वृक्षतोड थांबेल व निसर्ग चक्र सुरळीत राहण्यास मदत होईल.तसेच पुढील काळात सुद्धा डोणगांव मधिल उर्वरित पाञ लोकांना लाभ देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सातत्याने आम्ही प्रयत्नशील राहू व शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोचविण्यासाठी स्वाभिमानी चा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता मदत करणार आहे या प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत कोणत्याही कुटुंबाला अजून पर्यंत लाभ मिळाला नसेल तर त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते शी संपर्क साधावा आम्ही त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू सत्ता असो अगर नसो मात्र जनसामान्यांसाठी नेहमीच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व न्याय देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना ही कायम आघाडीवर असते सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे व त्यांचे समाधान करणे यातच आम्हाला सत्तेचा आनंद मिळतो असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी व्यक्त केले.डॉ.ज्ञानेश्वर टाले व प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते गॕस इतर साहीत्य वितरण करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस मिळालेल्या लाभार्थींच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते व त्यांनी या उपक्रमाचे कौतुक सुद्धा केले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले,तालुका अध्यक्ष विध्यार्थी आघाडी अमोल धोटे,तालुका अध्यक्ष पक्ष नितीन अग्रवाल,जिल्हा नेते भागवत जाधव, यांनी मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक युवानेते देवेंद्र आखाडे यांनी केले व सूत्रसंचालन गौतम सदावर्ते सर यांनी केले या कार्यक्रमासाठी सद्दाम शहा युनुश शहा,सलिम शहा,जावेद शहा,निलेश सदावर्ते,अयुब शहा यांनी परिश्रम घेतले यावेळी मोठ्या संख्येने उज्वला प्रधानमंञी योजनेचे लाभार्थी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष गणेश जुंनघरे,अरविंद दांदडे,अमोल वाघमारे. अभिमन्यू देशमुख, सतिष देशमुख, राजू पळसकर, रूशांक चव्हाण, मिनेश बाजड, मिथुन साळवे, सुरेश खरात, उत्तम खरात, कैलास उतपुरे, विष्णू आखरे, युसूफ खान पठाण, रामेश्वर वायाळ,संतोष टाले,संतोष नेमाडे, नकुल खोडके, इकबाल शहा,आलिम शहा आयुब शहा, जावेद शहा, इमरान आतार, जाहिद मौलाना, तालीब अली शहा, हुसेन शहा, शरीफ भाई उपसरपंच नागपूर, बंडू भाऊ खिल्लारे ग्राम पंचायत सदस्य नागपूर, देवानंद खोडके ग्रामपंचायत सदस्य नागपूर, सय्यद याकुब ग्रामपंचायत सदस्य नागपूर,अनिल जगताप. पदाधिकारी कार्यकर्ते, उपस्थित होती.

पातुर्डा    येथील सेन्ट्रल बँकेत शॉर्ट सर्किट मुळे आग,नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

0

 

पातुर्डा   येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत दि 19 ऑक्टोबर च्या रात्री 12 वाजता अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असता तेथील नागरिकांच्या सतर्कता मुळे मोठा अनर्थ टळला
सविस्तर असे की सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक    पातुर्डा बु ही येथील प्रकाश दवे यांच्या मालकीच्या वरच्या मजल्यावर असून दि 19 ऑक्टोबर ला रात्री 12 वाजता अचानक शॉर्ट सर्किट झाले व आग लागली आग उग्र रूप धारण करत असताना बँक समोरील अजय व्यास याना बँक मधून धूर निघताना दिसला असता त्यांनी बँक कर्मचारी गजानन देवकर याना ताबडतोब बोलवले व बँक उघडली तिथे पाहिले असता आग धीर धिरे उग्र रूप धारण करत होती आजू बाजूच्या अजय व्यास,प्रकाश दवे,कुशल दवे,योगेश तायडे,रमण सेवक,लातीश भुतडा या नागरिकांनी ती आग पाणीच्या साहाय्याने विजवली व मोठा अनर्थ टळला,नाहीतर ही बाब अजय व्यास याच्या लक्षात आली नसती तर सेंट्रल बँक संपूर्ण जळाली असती कारण बँकेत मोठं मोठ्या बॅटऱ्या आहेत व बँक चे कागदपत्रे आहेत या मुळे आग वाढली असती व जीवित हानी पण झाली असती मात्र व्यास यांच्या सतर्कतामुळे व बाजू च्या नागरिक मुळे ती विजविण्यास यश आले वृत्त लिहेपर्यंत कोणताही प्रकारचा पंचनामा न झाल्यामुळे बँक चे किती रु चे नुकसान आहे ते कळू शकले नाही मात्र बँक मधील सी पी यु,मॉनिटर,की बोर्ड,व प्रिंटर व काही महत्वाची कागदपत्रे हे पूर्णता जळाले आहे

दुसऱ्या दिवशी बँक काम काज बंद
शॉर्ट सर्किट मुळे आग लागली त्यात बऱ्याच वस्तु जाळल्या व काही प्रमाणात एलक्ट्री सिटी जळाली म्हणून दुसऱ्या दिवशी बँक चे सर्व काम काज बंद करण्यात आले

बँक मॅनेजर ची उदासीनता पातुरडा येथील सेंट्रल बँकेत रात्री 12 वाजता आग लागली ही बाब बँक चे कर्मचारी यांनी रात्रीच बँक मॅनेजर श्री घोंगे याना दिली मात्र त्यांनी दुसऱ्या दिवशी बँक मध्ये लवकर यायला पाहिजे होते मात्र असे झाले नाही बँक मॅनेजर हे रेग्युलर आपल्या वेळे नुसार बँकेत दाखल झाले,जसे काही झालेच नाही या मुळे त्याची बँक प्रति उदासीनता दिसून आली व किमान बँक मॅनेजर यांनी दुसऱ्या दिवशी लवकर यायला पाहिजे होते अशी चर्चा त्या ठिकाणी जमलेले नागरिक करत होते