Home Blog Page 388

सूनगाव ग्रामपंचायत प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष नागरिकांनी चक्क ग्रामपंचायत मध्ये टाकला कचरा

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ही मोठी ग्रामपंचायत ग्रामपंचायत लगतच असलेल्या वार्ड क्रमांक एक मध्ये ग्रामपंचायतचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष दिसत आहे तसेच या वॉर्डमध्ये नाली बांधकाम केलेले नाही व जागोजागी पाण्याचे डबके साचले आहेत व पावसाच्या पाण्याची व्यवस्था केलेली नाही येथील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही ग्रामपंचायतीने त्यावर कोणतीच दखल घेतली नाही तर ग्रामपंचायत प्रशासनाकडून 2 ते 3 सफाई कामगार कार्यरत असूनही ग्रामपंचायत कडून नाली मधील काढलेला कचरा उचल्या जात नाही रोडवरील कचऱ्याचे ढीग या वार्ड नंबर 1 मध्ये दिसत आहे व वार्ड नंबर 1 मध्ये रस्त्याची दुर्दशा ही फार खराब झालेले आहे तसेच घाणीचे साम्राज्य भरपूर आहे त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे यालाच त्रस्त होऊन वार्ड क्रमांक 1 मधील निखिल कतोरेअक्षय घोलप सुनील कापरे सुरेश कापरे यांनी या कचऱ्याच्या विल्हेवाटीचा बाबतीत सरपंच यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी याबाबत कोणतीच विल्हेवाट लावली नाही यालाच त्रस्त होऊन या नागरिकांनी रोडवरील कचरा हा चक्क ग्रामपंचायत मध्ये आणुन टाकलेला आहे यावरून ग्रामपंचायतच मुजोरीपणा निदर्शनास आला आहे व नागरिकांचा या बाबतीत असा आरोप आहे की वार्ड क्रमांक 1 मधील ग्रामपंचायत सदस्य सुद्धा ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 1 मधील स्वच्छतेकडे लक्ष देत नाही तरी वरिष्ठांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन व विचार करावा व योग्य ती कारवाई करावी

ट्रॅफिक बूथ लावण्यासाठी बहुजन समाज पार्टीची मागणी

0

 

घुग्घुस प्रतिनिधी
रमेश सुद्दाला,

बहुजन समाज पार्टी द्वारा आज दिनांक 19/10/2021 ला घुग्घुस पुलिस स्टेशन ला निवेदन देण्यात आले. नवीन बस स्टँड घुग्घुस छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चंद्रपूर व वणी महामार्गावर तत्काळ ट्रॅफिक बूथ लावण्यात यावे व एक ट्रॅफिक पुलिस अधिकारी नेमण्यात यावे अशी मागणी बहुजन समाज पार्टी द्वारा करण्यात आली, असून आज वणी चंद्रपूर महामार्गावर प्रवासी, शाळेतील मुले, मुली व गाव करी तसेच अनेक प्रकार चे जड वाहन टू व्हीलर, फोर व्हिलर, हायवा , अशे अनेक प्रकार चे जड वाहांना चे आवागमन मोठ्या प्रमाणात सुरू असताना तिथं गती रोधक ब्रेकर नआल्याने मोठा अपघात होण्याचे प्रमाण अधिक का अधिक वाढत आहे तरी बहुजनां च्या हितासाठी बहुजन समाज पार्टी द्वारा आज अशी मागणी करण्यात आली की तत्काळ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ट्रॅफिक बूथ व ट्रॅफिक नियंत्रणासाठी एक ट्रॅफिक पुलिस नेमण्यात यावे व होणाऱ्या जीव हानिस टाळावे ही विनंती करण्यात आले,
निवेदन देते वेळेस अध्यक्ष मोहन येमुर्ले, उपाध्यक्ष सिद्धार्थ रामटेके यांच्या हस्ते घुग्घूस पोलिस अधिकारी यांना देण्यात आले….

शिवाजी नगर परिसरात दारूसाठी पैसे न दिल्याने तरूणावर चाकूहल्ला; यावल पोलीसात एकावर गुन्हा

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून एकाने वासूदेव सुरेश पाटील (वय-३३) रा. यावल या तरूणावर चाकूहल्ला करून जखमी केल्याची घटना आज मंगळवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता शहरातील शिवाजी नगर परिसरात घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल पोलीसांच्या माहितीनुसार, वासुदेव सुरेश पाटील (वय-३३) रा. शिवाजी नगर, यावल हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. आज मंगळवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास वासुदेव पाटील हा घराच्या समोर उभा असतांना विलास उर्फ पिंटू सुकदेव सुर्यवंशी रा. शिवाजी नगर हा तिथे आला. विलासने वासूदेव पाटील यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावर वासूदेवने पैसे दिले नाही याचा राग आल्याने विलास सुर्यवंशी याने चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व हातातील चाकूने मानेवार व हाताच्या अंगठ्यावर वार करून जखमी केले. जखमी तरूणाला ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वासूदेव पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विलास सुर्यवंशी यांच्यावर आज सकाळी ११ वाजता यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील करीत आहे.

सांगवी-भालोद रस्त्यावर नवजात स्त्री जातीचे अर्भक सापडल्याने खळबळ; यावल पोलीसात गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील सांगवी ते भालोद रस्त्यावर एका शेताजवळ नवजात स्त्री जातीचे अर्भक सोडून अज्ञात मातेने पलायन केल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील सांगवी ते भालोद रस्त्यावरून काही शेतमजूर आज मंगळवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शेतात कामाला जात असतांना वाटेत असलेले हरी बोरोले यांच्या शेताजवळ एका लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला. यावेळी मजूरांनी पाहणी केली असता त्यांना नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. याघटनेमुळे यावल परिसरात खळबळ उडाली आहे. मजूरांनी तातडीने यावल पोलीसांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नवजात बालकाला उचलून तातडीने ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. याप्रकरणी शेतमजूर महिला लक्ष्मी धनराज भिल (वय-२६) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात माता पित्यावर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अजमल पठाण करीत आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीसाठी निलंगा तालुका मतदार संघातून मा. श्री. अशोकराव पाटील निलंगेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0

 

दगडू पिंगळे
निलंगा प्रतिनिधी

निलंगा मतदार संघाचे लाडके लोकप्रिय नेते, लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक मा. श्री. अशोकराव पाटील निलंगेकर साहेब यांनी निलंगा तालुका सोसायटी मतदार संघातुन उमेदवारी अर्ज दाखल केले या वेळी मा. आ. धीरज देशमुख , मा. आ.बाबासाहेब पाटील तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते.

वैभव वानखडे यांना अंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

0

 

सुनील पवार नांदुरा ता.प्रतिनिधि

माऊली फिल्म व शिव छत्रपती सामराज बहुउदेशिय सेवाभावी शिक्षण संस्था यांच्या वतीनेदिला जानारा.२०२१चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार वैभव वानखडे यांना३१आँकटोंबर ला अकोला येथे होणाऱ्या पुरस्कार समारंभात देण्यात येणार आहे वैभव वानखडे हे युवा भिमसेना या सामाजिक संघटनेचे संस्थापक अधक्ष आहेत त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला

जळगाव जिल्ह्यातील पहिल्यांदा चुंचाळे येथील ग्रामपंचायतीच्या दुसऱ्यांदा झालेल्या लोकनियुक्त सरपंच निवडणुकीत सुनंदा पाटील यांचा दणदणीत विजय

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

चुंचाळे तालुका यावल येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्याविरुद्ध उपसरपंचासह सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता व तो पारित देखील झाला मात्र, लोकनियुक्त सरपंच यांना अपात्र करण्यासंदर्भात ग्रामसभेची देखील मंजुरी आवश्यक असते. म्हणून आज जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्या आदेशाने आज दिनांक १८ ऑक्टोबर रोजी ११ वाजता पिठासिन अधिकारी पी टी देवराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्राम विस्तार अधिकारी हबीब तडवी , ग्रामसेवक प्रियंका बाविस्कर यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली व त्यांनंतर आता प्रत्यक्षात या सरपंचाविरूद्ध आणलेल्या ९ ग्रामपंचायत सदस्यांच्या अविश्वास ठरावाच्या विरूद्ध झालेल्या मतदानात आज ग्रामस्थांच्या मतदानास सुरूवात होवुन एकुण २२९२ मतदारांपैक्की११३० असे एकुण ५२ टक्के % मतदान झाले . यात सरपंच सौ सुंनदा पाटील यांना ६८४तर सदस्यांच्या गटाला एकुण २१६ मते मिळाली व २३० मतदान हे बाद झाली. यावल तालुक्यासह संपुर्ण परिसराचे लक्ष वेधणाऱ्या या लोकनियुक्त सरपंचपदाच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा पाटील यांनी विजय मिळवले आहे .

यावल तालुक्यातील चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्याविरुद्ध सदस्य व उपसरपंच यांनी अविश्वास प्रस्ताव येथील तहसीलदार महेश पवार यांच्याकडे दाखल केला होता. तेव्हा दिनांक ७ जुन२०२१ रोजी चुंचाळे ग्रामपंचायत येथे विशेष सभा बोलविण्यात आली होती व सरपंच पाटील यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव हा पारित झाला होता. तेव्हा लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास प्रस्ताव संमत झाल्यानंतर सदर अविश्वास प्रस्ताव हा ग्रामसभेतून देखील संमत होणे आवश्यक असते असा नियम असल्याने, तेव्हा जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्या आदेशाने यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना या संदर्भातील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या व या अनुषंगाने गावात आज १८ ऑक्टोंबर २०२१ रोजी विशेष ग्रामसभा बोलावुन अविश्वास संर्दभात मतदान घेण्यात आले. मतदान येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत एका मतदान केन्द्रावर प्रत्यक्षात जावुन ग्रामस्थांनी आपल्या मतदानाचा द्वक, या मतदानात एकुण २ हजार९२ पैक्की ११३० मतदारांनी मतदानात सहभाग घेतला .

तेव्हा चुंचाळे गावातील शाळेतील मतदान केन्द्रा बाहेर ग्रामस्थांची मोठी केली होती सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रीया सुरू होती .या विशेष ग्रामसभेच्या पिठासन अधिकारी म्हणुन कृषी अधिकारी पी.टी. देवराज यांनी काम पाहीले तर ग्रामसेवक यांनी त्यांना सहकार्य केले . या ग्रामसभेच्या माध्यमातून अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यात आले असुन यात ग्रामस्थांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करून मोठया मतदानाने विजयी माळ त्यांच्या गळयात घातली असुन , लोकनियुक्त सरपंच यांच्या विरुद्ध दुसऱ्यांदा मतदान करण्याची ही राज्यातील दुसरी तर जळगाव जिल्ह्यातील ग्राम पंचायत स्तरावरील ही प्रथमच कार्यवाही असून याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. यावेळी पोलीस निरिक्षक सुधिर पाटील व पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व पोलीस कर्मचारी यांनी आपला बंदोबस्त चोख ठेवला होता . चुंचाळे ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदावर दुसऱ्यांदा विजयी माळ घालुन आपल्याला निस्वार्थ सेवेची संधी उपलब्ध करून दिल्या बद्दल ग्रामस्थांचे मनस्वी आभार मानले .

नांदगाव अनुसुचित जाती विभाग तालुका काँग्रेस महीला अध्यक्षपदी सौ.सुनिता देहाडे आणि पुरुषगट तालुका देविदास दिवे तर शहरअध्यक्षपदी सौ.अल्का पगारे आणि पुरुषगट शहर रोहीत जाधव यांची निवड

0

 

निलेश पगारे नांदगाव तालुका प्रतिनिधी

मा.अनिलदादा आहेर (माजी आमदार) व युवानेते दर्शनभाऊ आहेर यांच्या हस्ते सौ.सुनिता विलास देहाडे यांचा नांदगाव तालुका काँग्रेस अ.जा.महीला अध्यक्ष आणि सौ.अल्का सुनिल पगारे यांची अ.जा.महीला शहराध्यक्षपदी नियुक्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.पुरुषगट अनुसुचित जाती विभाग तालुका अध्यक्षपदी देविदास दिवे तर शहर अध्यक्षपदी रोहीत जाधव यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष मनोज चोपडे यांनी नवनियुक्त महीला पदधिकारी व युवा पदाधिका-यांचे अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सदर निवडीचे नांदगाव तालुका काँग्रेसच्यावतीने सर्व पदाधिकारीच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.

पातुर्डा गावातील वार्ड क्रमांक 5 व 6 च्या नागरिकांनी संगीतराव भोंगळ यांच्याकडे तक्रार केली असता तात्काळ संगीतराव भोंगळ यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून तक्रार निकाली काढली.

0

 

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पातुर्डा बु गावातून होत असलेल्या नाली बांधकामाचे पाणी हे अपूर्ण राहिलेल्या नालीच्या जवळील पाणीपुरवठ्याच्या विहिरीजवळ तुंबून थांबले त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या विहिरीत अशुद्ध पाण्याचा विसर्ग होत होता.नागरिकांनी तात्काळ मा.जि.प.उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ(राजु पाटील) यांना फोनवरून तक्रार केली संगितराव भोंगळ यांनी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता संबंधित विहीर जागेवर भेट देऊन काम करत असलेल्या कृष्णाई कन्स्ट्रक्शन च्या अधिकाऱ्यांना फोन लावून जागेवर बोलावून घेऊन तात्काळ दूषित पाणी थांबून दुसऱ्या वळणावर वळवण्याचे सांगितले व प्रत्यक्ष कामाला सुद्धा सुरुवात करून दिली त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता काळे साहेब यांना फोनवर माहिती दिली व तक्रारी चे लवकरच निवारण करायचं सांगितले.
जोपर्यंत पूर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही भविष्यात सुद्धा आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आश्वासित उपस्थित असलेल्या गावकर्‍यांना केले उपस्थित नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह समाधान दिसत होते.

यावल पंचायत समितीच्या नुतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा शनिवार दि.२३ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार

0

 

 

यावल,(प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल पंचायत समितीच्या नुतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे याकरीता पंचायत समितीच्या सभापती पल्लवी पुरूजीत चौधरी व उपसभापती योगेश भंगाळे यांनी व पंचायत समितीच्या सदस्यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निमंत्रण दिले. पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी कार्यक्रमाचे निमंत्रित स्विकारले असल्याची माहिती सभापती पल्लवी चौधरी व उपसभापती योगेश भंगाळे यांनी दिली. या लोकापर्णसोहळ्यास यावल रावेर मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी , यावल चोपडा मतदारसंघाच्या आमदार लताताई सोनवणे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावल पंचायत समितीचे शासकिय कामकाज हे मागील अनेक वर्षापासुन अत्यंत जिर्ण झालेल्या जुन्या इमारतीत सुरू आहे. संपुर्ण राज्यात होवु घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आचारसंहिता लागण्यापुर्वीच हा पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या लोकापर्ण सोहळ्याचा कार्यक्रम करून घ्यावे लागणार आहे. दरम्यान, यावल पंचायत समितीची नुतन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी माजी आमदार स्व. हरिभाऊ जावळे यांच्यासह आमदार शिरीष चौधरी यांनी शासनाकडे सातत्याने प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ तथा तत्कालीन मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांच्याकडून इमारतीच्या उभारणीस निधी उपलब्ध करून भुसावळ येथील प्रमोद नेमाडे यांनी तात्काळ कमी वेळेत या प्रशासकीय इमारतीच्या उभारणीस वेगाने व चांगले कार्य केले.