Home Blog Page 396

किनगाव येथे एका तरूण शेतमजुराची आपल्या घरात गळफास घेवुन आत्महत्या पोलीसात घटनेची नोंद

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव खुर्द येथे एका तरूणा शेतमजुराची गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असुन , या घटनेची बाबत पोलीसात नोंद करण्यात आली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथील साईबाबा मंदीर परिसरात राहणारे भगवान रघुनाथ पाटील वय४० वर्ष या तरूणाने आज दिनांक ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १ , ३० वाजेच्यापुर्वी आपल्या राहत्या घराच्या छताच्या पडतीला साडीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे सदरची घटना घडली त्यावेळेस मयत भगवान पाटील हे पत्नी व मुलगा शेतीकामास गेले असता एकटेच घरात होते , मागील चार वर्षापुर्वी देखील पाटील यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे प्रयत्न केल्याची माहीती समोर आली आहे याबाबतची खबर गावातील पोलीस पाटील दिलीप साळुंके यांनी पोलीसात दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन , मयताचे मृतदेह यावलच्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ . बी बी बारेला यांनी केले असुन तपास पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे . मयत भगवान पाटील यांच्या कुटुंबात पत्नी , आई , वडील , एक मुलगा असा परिवार असुन त्यांनी आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ट होवु शकले नाही .

परसाडे येथील आदिवासी समाजातील कार्यकर्ते राजु तडवी यांची यावल तालुका संजय गांधी निराधार समितीच्या अशासकीय सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

0

 

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

 

परसाडे तालुका यावल येथील आदीवासी कुटुंबातील सामाजीक कार्यकर्ते तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श ग्रामसेवक मजीत अरमान तडवी यांचे बंधु राजु तडवी यांची संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शिफारसीने तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशाद्वारे गठीत करण्यात आलेल्या समितीच्या मागसवर्गीय अनुसुचित जाती जमातीच्या अशासकीय सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

दरम्यान राजु तडवी यांची संगांयोच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरिष चौधरी, काँग्रेसचे जिल्हा परिषदचे गटनेते तथा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील, शिसेनेचे तालुका अध्यक्ष रविन्द्र सोनवणे, आर के चौधरी, नावरे गावाचे माजी सरपंच समाधान पाटील, परसाडे ग्रामपंचायत सरपंच बबीता तडवी, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, कॉंग्रेस शहराध्यक्ष कदीर खान, आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष बशीर तडवी आदीनी त्यांच्या निवडीचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले आहे.

लखीमपूर शेतकरी हत्याकांडा विरोधात महाविकास आघाडी तर्फे घुग्घुस बंद

0

 

घुग्घुस (प्रतिनिधि)
रमेश सद्दाला

उत्तरप्रदेश येथील लखीमपूर (खैरी) येथे केंद्र शासनाच्या तीन काळ्या कायद्या विरोधात शांततेत आंदोलन करून घरी परत जात असताना भाजप नेते व केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चढवून त्यांना ठार केले.
ज्यांच्यावर देशाच्या सुरक्षेची जवाबदारी आहे त्याच गृहमंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांचा अमानुष हत्याकांड घडवून आणला.
आणि या नृशंस नरसंहाराला पाठीशी घालण्याचा पातक केंद्रातील मोदी शासन व उत्तर प्रदेश येथील योगी शासनाने केला.
हत्याकांडातील आरोपींना बेड्या घालण्या ऐवजी विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच अटक केली.

या हितलरशाही केंद्र शासनाच्या विरोधात महाराष्ट्रातील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचा आवाहन केला होता.

या आंदोलनाला प्रतिसाद देत घुग्घुस येथील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत्यांनी एकत्रित येत घुग्घुस बंदचे आवाहन केले होते.
या पक्षाच्या आवाहनाला व्यापारी वर्गांने सकारात्मक प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात दुकाने उघडलीच नाही.

काही तुरळक प्रमाणात उघडलेल्या दुकानांनी महाविकास आघाडीचे बाईक रैली येताच आप – आपली दुकाने बंद केली.

शहरातील चौका – चौकात आघाडीच्या नेत्यांनी मोदी व योगी शासनाचा निषेध व्यक्त केला.
सदर आंदोलन काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजूरेड्डी, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर,
शिवसेनेचे शहर प्रमुख सतीश बोंडे, बाळु चिकणकर, युवा सेना तालुका प्रमुख हेमराज बावणे,गणेश शेंडे, तर राष्ट्रवादीचे सत्यनारायण डकरे, तालुका अध्यक्ष तालुका अध्यक्ष मागास विभाग, इस्लाम अब्बासी,सतीश जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले याप्रसंगी काँग्रेसचे किशोर बोबडे, निरंजन डंभारे,नुरुल सिद्दिकी, लखन हिकरे, प्रेमानंद जोगी, शेख शमीउद्दीन, इर्शाद कुरेशी, विशाल मादर, देव भंडारी,कपिल गोगला, शुभम घोडके,जुबेर शेख,विजय माटला, बालकिशन कुळसंगे, सुनील पाटील, वस्सी शेख,आरिफ शेख,सुधाकर जुनारकर, योगेश ठाकरे,
शिवसेनेचे बंटी घोरपडे, योगेश भांदकर, रघुनाथ घोंगळे, वेदप्रकाश मेहता,महेश शेंडे,लक्ष्मण बोबडे, शहंशाह शेख, निखिल मोहितकर, खुशाल जगताप, हर्षल बांदूरकर, सतीश गोहोकर, रेहांत शेंडे,विकी चिवंडे,सुरज खोंडे,
व राष्ट्रवादीचे बंडू झाडे ,संजय भालेराव,कमाल उद्दीन, व
मोठया संख्येने तीन ही पक्षाचे पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.

नंदोरी गावात खुलेआम अवैध दारू विक्री

0

 

 

नंदोरी गावातील मुख्य चौकात होते दारू पिणार्यांची गर्दी

नंदोरी गावातील बाजार चौकात अवैध दारूचा महापूर

 

नंदोरी गावातून सर्वसामान्याना जाणे आता अडचणीचे होत आहे. या ठिकाणी असलेल्या मुख्य बाजारपेठ चौरस्ता जागेत खुलेआम अवैध देशी – विदेशी दारुची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे ही जागा अवैध धंदे करणाऱ्यासाठी फार महत्त्वाची ठरत आहे.
सध्या या ठिकाणी अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अवैधरित्या थाटलेल्या या दुकानाच्या आसपास तळीरामांची गर्दी दिसून येते. या तळीरामाच्या त्रासाला अनेक महिलांना सामोरे जावे लागते. तात्पुरता आडोसा तयार करून या ठिकाणी हे अड्डे सुरू करण्यात आले आहेत. या दारु विक्रीकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाचे हेतूपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक काही पोलीस कर्मचारी या अवैध दारू विक्रेत्यांना मदत करतात असे बोलले जात आहे
या देशी व विदेशी दारूमध्ये काही बनावटी दारूची विक्री होत असल्याचे मध्यपींमध्ये दबक्या आवाजात बोलले जात आहे.या दारु पोहोचविणाऱ्या तस्करांचेही पोलिसांबरोबर चांगले संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच भर चौकातून जात असलेली त्यांची वाहने पोलीसांकडून कधीच अडविली जात नाहीत.
नंदोरी गावात अवैध दारू विक्रेत्यांचा आपसी मतभेद सुरू असल्याचे असे गावात चर्चा आहे मागील काही दिवसापासून मोठे अवैध दारू तस्करांनी नंदोरी या गावात आश्रय घेतल्याचे पण सांगण्यात येत आहे या अवैध दारू तस्करांचे आपसी मतभेदांमुळे गावातील शांतता भंग होण्याच्या मार्गावर आहेत तरी पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे लक्ष देण्याची गरज आहे

निलंगा तालुक्यात मुसळधार पाऊस, दोन शेतकरी गेले वाहून

0

 

दगडू पिंगळे निलंगा प्रतिनिधी

निलंगा तालुक्यातील मदनसुरीसह सबोतालच्या परिसरातील रामतीर्थ, अंबुलगा (वि), हाडोळी, रामलिंग मुदगड, हत्तरगा (हा) इत्यादी ठिकाणी दुपारपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने ओढे, नदी-नाले भरून वाहत आहेत. या पावसामुळे मदनसुरीतील ओढ्याला मोठा पूर आला आणि हा ओढा ओलांडत असताना संजय माने व शैलेश माने या दोन शेतकऱ्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने शेतकरी वाहून गेले. मात्र सुदैवाने त्यांचा जीव वाचला.

महाराष्ट्र बंद’मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे!: नाना पटोले (NANA PATOLE)

0

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक)
प्रदेशाध्यक्षांसह काँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलन करणार

मुंबई, दि 10 ऑक्टोबर 2021

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना अत्यंत क्रूरपद्धतीने गाडीखाली चिरडून मारले. या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीने सोमवारी ११ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तसेच काँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलनही करणार आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारच्या बंदमध्ये सर्वशक्तीनिशी उतरून बंद यशस्वी करावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले(nana patole) यांनी केले आहे.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (ajay mishra)यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून त्यांची हत्या केली. या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारची भूमिका अत्यंत बेजबाबदार राहिली आहे. उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्था नसून रामराज्याच्या नावाखाली तालीबानी राजवट सुरु आहे. निष्पाप लोकांना दिवसाढवळ्या गाडीखाली चिरडून मारले जात आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी(priynka gandhi) यांनी या नरसंहारचा निषेध करत शेतकऱ्यांना भेटण्यास जात असताना त्यांना अडवण्यात आले. त्यांना बेकायदेशीर ताब्यात ठेवले न नंतर अटक केले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल(bhupesh baghel) यांनाही शेतकऱ्यांना भेटण्यास जाऊ दिले नाही. काँग्रेसच्या खासदाराला पोलिसांनी धक्काबुक्की केली. लखीमपूर खेरी प्रकरणात उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारने लोकशाही व संविधानाचा गळा घोटला आहे.

भारतीय जनता पक्ष हा शेतकरी विरोधी पक्ष असून शेतकऱ्यांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या भाजपा विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी व लखीमपूर खेरी येथील पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीने हा बंद पुकारला आहे. शेतकरी जगला तरच हा देश जगेल त्यामुळे राज्यातील जनतेने व व्यापा-यांनीही अन्नदाता बळीराजाच्या हक्कासाठी उस्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केले आहे.
Surya marathi news

निलंगा पोलिसाची दमदार कामगिरीमुळे गुऱ्हाळ खून प्रकरणातील आरोपीला 72 तासात अटक

0

दगडू पिंगळे निलंगा प्रतिनिधी

दि. – 6 ऑक्टोंबर 2021 रोजी निलंगा पोलीस ठाणे येथे गुऱ्हाळ ता. निलंगा या ठिकाणी वयोवृद्ध महिला नामे शेषाबाई मोतीराव दूधभाते वय 80 वर्ष या दुपारी दोन वाजता च्या सुमारास त्यांच्या शेतामध्ये शेती काम करण्याकरता गेली असता त्या ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमाने चाकूने त्यांचा गळा कापून खून केला असल्याची माहिती पोलीस स्टेशन निलंगा यांना प्राप्त झाली त्यानंतर घटनास्थळी माननीय पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी निलंगा डॉक्टर दिनेश कुमार कोल्हे साहेब पोलीस निरीक्षक शेजाळ सपोनि कुदळे पोलीस उपनिरीक्षक राठोड पोलीस उपनिरीक्षक अक्कमवाड पोलीस उपनिरीक्षक मुळीक पोलीस उपनिरीक्षक गरजे,पोलिस उपनिरीक्षक तसेच पोलीस स्टेशनचा स्टॉप यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली व जखमी हिस उपजिल्हा रुग्णालय निलंगा या ठिकाणी उपचार कामी दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी ते तपासून दाखल पूर्व मयत घोषित केले त्यानंतर मयत यांचा मुलगा नामे माधव मोतीराव दूधभाते वय 52 वर्ष व्यवसाय प्राध्यापक राहणार गुराळ तालुका निलंगा ह.मु.मुक्काम पोस्ट सारडा कॉलनी अक्षय गॅस एजन्सी च्या पाठीमागे परळी नाका गंगाखेड तालुका गंगाखेड जिल्हा परभणी यांनी दिलेल्या जबाबा वरून पोलीस स्टेशन निलंगा गुन्हा रजिस्टर नंबर 286/21 कलम 302 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्ह्यातील अज्ञात पाहिजे आरोपीचा शोध डॉग स्कॉड, फिंगरप्रिंट, स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन चे तीन पथक आरोपीचा शोध घेणे कामी व गोपनीय माहिती काढणे कामे रवाना केले आज दि. 9 ऑक्टोंबर 2021 रोजी मिळालेल्या गोपनीय माहिती वरून संदीप आनंदा भोसले राहणार गुराळ यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले आर्थिक विवेचनातून व पैशाची गरज असल्याने गावातील वयोवृद्ध महिला शेषाबाई दूधभाते तिच्यावर लक्ष ठेवून शेतात एकटी असतांना धार धार हत्याराने गळ्यावर वार करून तिच्या गळ्यातील सोन्याच्या दोन पोत घेऊन गेला. सदर आरोपीस नमूद गुन्ह्यात अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचे मार्गदर्शन लाभले आरोपी शोध कामी निलंगा पोलीस स्टेशन चे अधिकारी उप विभागीय आधिकारी डॉक्टर दिनेश कुमार कोल्हे, पोलीस निरीक्षक शेजाळ, सपोनि कुदळे, सपोनि डमाळे, सपोनि कामत, पोलीस उप निरीक्षक राठोड, अक्कमवाड, मुळीक, गर्जे, क्षिरसागर, महिला पोलीस उप निरीक्षक गायकवाड तसेच पोलीस स्टेशन चे अंमलदार बनाटे, बेग, सूर्यवंशी, चव्हाण, मजगे, सोमवंशी, माने, मुळे, बेबडे, नागमोडे, काळे व स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सूर्यवंशी, कोतवाड, राजू मस्के, माधव बिल्लापट्टे, नकुल पाटील यांनी परिश्रम घेतले.

महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी विरोधी केन्द्र सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद महाराष्ट्र बंद

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथे उद्या सोमवार रोजी राज्यातील महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी विरोधी केन्द्र सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद महाराष्ट्र बंद आवाहन दि. ११ ऑक्टोबर सोमवार महाराष्ट्र बंद उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी या गावातील शेतकऱ्यांना केंद्रातील पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या सरकार च्या मंत्र्याच्या गाडीखाली चिरडून र्निदयीपणे मारण्याचा प्रकार हा अत्यंत निंदनीय व तीव्र चिड आणनारा आहे.

आपले भारत हे कृषी प्रधान देश असतांना या देशांमध्ये भारतातीलच शेतकरी गेली अनेक महिन्यापासुन आपल्या न्याय हक्कासाठी केंद्रातील मोदी सरकारकडे शांततेत आंदोलन करूण आपले म्हणने सरकार पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहे पंरतु वेळो वेळी हे आंदोलन भारतीय जनता पक्षाचे केन्द्रातील सरकार च्या माध्यमातुन दाबण्याचा व आंदोलनास भरकटविनयाचा प्रयत्न करीत आहे.

पंरतु यामध्ये पुर्णत:यश आलेले नाहीत.शेतकरी आंदोलन साम,दाम, दंड, भेद, वापरून देखील संपत नसल्यामुळे दहशतीद्वारे शेतकऱ्यांना संपविण्याचा घाट आता भाजपा सरकारने चालविला आहे.अशा वेळी महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे रहाणे गरजेचे असून या निर्देयी कृतयााचा निषेध म्हणून दि. ११ ऑक्टोबर सोमवार रोजी महाराष्ट्र बंद पाळण्यात यावा असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने आमदार शिरीष चौधरी यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,व शिवसेना, यांच्या तर्फे बंदचे आवाहन प्रभाकर आप्पा सोनवणे
गटनेता जिल्हा परिषद जळगांव तथा तालुकाध्यक्ष काँग्रेस प्रा.मुकेश येवले सर(नगरसेवक तथा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी ),रविभाऊ सोनवणेतालुका प्रमुख शिवसेना यांनी केले आहे .

चिमुकल्यासह देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या महीलेचा रेल्वेखाली चिरडुन दुर्देवी मृत्यु

0

 

निलेश पगारे नांदगाव तालुका प्रतिनिधी (नासिक)

नवरात्री निमित्त देवीच्या दर्शनासाठी आज सकाळी नांदगाव येथील चांडक प्लाँट भागातील दोन महीला आपल्या तीन चिमुकल्यासह रेल्वेे अंडरपासमध्ये पाणी असल्याने रेल्वे रुळ ओलांडत असतांना महाराष्ट्र एक्सप्रेस आल्याने रेल्वेखाली चिरडुन स्वाती रविंद्र शिंदे या महीलेचा दुर्देवी मृत्यु झाला.सदर महीला गरीब होतकरु रवि शिंदे यांच्या पत्नी होत्या.रेल्वे प्रशासन व नांदगाव नगरपालिकेच्या भोंगळ काराभारामुळे बनविण्यात आलेल्या अंडरपासमुळे हा दुर्दैवी मृत्यु झालेला आहे त्याचे शल्य मनाला टोचल्याने आपण नगरसेवक असुन न पा च्या अट्टाहासामुळे येथील जनतेचा पुरामुळे उद्भवलेल्या येण्या जाण्याच्या समस्या साेडवु शकलो नाही अशी खंत व्यक्त करत या वाँर्डातील नगरसेवक नितिन जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला.जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणारे नितीन जाधव यांनी असा राजीनामा देणे नगरपलिकेस काळे फासण्यासारखे आहे म्हणुनच त्वरीत अंडरपासचा प्रश्न मिटवा नाहीतर नगरपरीषद बरखास्त करा अशी संतप्त प्रतिक्रीया नांदगावमधील जनतेकडुन केली जात आहे.

यावल येथे मा. कांशीराम साहेब यांची 15 वी पुण्यतिथी साजरी

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

 

डी. एस. फोर तसेच बामसेफ व बी. एस. पी. चे संस्थापक मा. कांशीराम जी यांचा 15 वा परिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला. बोरावल गेट परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी चौकात साजरा करण्यात आला. तरी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मा. कांशीराम साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

तसेच या कार्यक्रमांस निळे निशाण संघटनेचे ता. अध्यक्ष विलास भास्कर तसेच रोजगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष युवराज सोनवणे, तसेच निळे निशाण संघटनेचे जिल्हा उपअध्यक्ष अशोक तायडे तसेच संघटनेचे युवा ता. अध्यक्ष विशाल तायडे, तसेच शाखा अध्यक्ष अट्रावल भूषण संपकाळे, कैलास लोहार, ए. के. तायडे, विष्णू लोखंडे, राजू अडकमोल, भरत अडकमोल, विवेक तायडे, अविनाश भास्कर, अशोक मच्चीवाले, किशोर अडकमोल, सागर गजरे, राहुल गजरे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज सोनवणे यांनी केले तर उपस्थित मंडळींचे आभार विलास भास्कर यांनी मानले.