Home Blog Page 397

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या संकेत वाघेचा श्रेयस वाचनालयाने केला सत्कार

0

 

(हिंगणघाट)
अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संकेत वाघे यांनी २६६ वा क्रमांक प्राप्त करून नेत्रदिपक यश संपादन केल्याबद्दल श्रेयस वाचनालय आणि संशोधन केद्रांच्या वतीने वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.डाॕ.चंद्रकांत नगराळे आणि वाचानालयाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संकेतच्या निवास्थानी जाऊन त्याचा गौरव चिन्ह आणि पुष्प देऊन सत्कार केला.आपले मनोगत व्यक्त करतांना संकेतनी आपण देशसेवा करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भाग घेण्याचा निर्णय घेतल्याचे मत व्यक्त केले.आत्मविश्वास,दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी असेल तर काहीही अशक्य नाही असा तो म्हणाला.यावेळी प्रा.जयंत दाणी,प्रा.शैलेंद्र गजभिये,प्रा.सचिन हिवरकर ,प्रा.मून,प्रा.लोहकरे ,प्रा.भटकर ,प्रा.झाडे,शशीमोहन थुटे यांची उपस्थिती होती.सत्कार समारंभाचे सँचालन व आभार प्रदर्शन प्रा.जयंत दाणी यांनी केले.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

किनगाव परिसरात भुरट्या चोरटयांचा धुमाकुळ शेतकऱ्यांच्या शेती अवजारांनी होत चोरी पोलीसानी रात्रीची गस्त वाढवावी : शेतकऱ्यांची मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

मागील दोन वर्षांन पासून संपुर्ण देशात कोरोना संसर्गाच्या या भयंकर महामारीमुळे शेती व उद्योग व्यवसायांवर मोठे विपरीत परिणाम झाले असुन , यामुळे सर्वसामान्या पासुन तर अन्नदाता शेतकरी बांधवांवर ही कठीण वेळ आलेली आहे. यातच शेतीला तर निसर्गाने ही मोठी हानी पोहचवली असुन यावर्षी शेतीला लावलेला खर्चही निघने कठीन झाले आहे आणी अशा परीस्थीतीत जर शेतकऱ्यांच्या शेतातून ८ दिवसात दोन वेळा विजपंपाच्या केबल वायरींची चोरी झाली तर त्या शेतकऱ्यांची परीस्थीती काय होईल असाच एक प्रकार किनगाव येथील शेतकरी संदीप चुडामण पाटील,सिताराम महाजन,चंदू टेलर व किनगांव बुद्रूक ग्रा.प.मालकीचे मोटकरे शेत
यांच्या बाबतीत घडला संदीप पाटील यांचे गट नं.१३ सह सिताराम महाजन,चंदू टेलर व ग्रा.प.चे मोटकरे शेत यांचे चुंचाळे रस्त्यावर शेत आहेत गेल्या आठवड्यात यांच्या शेतातून अंदाजीत २० हजार रूपये किंमतीची विजपंपाची केबलवायरी चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या मात्र बागायत शेतीला पाण्याची आवश्यकता असल्याने वरील सर्व शेतकऱ्यांनी विज पंप सुरू करण्यासाठी नवीन २० हजार रूपयांच्या वायरी आणल्या व त्या लावून शेतीपिकांना पाणी देण्यास सुरूवात केली मात्र दोन दिवस होत नाहीत तोपर्यंत दि.८ रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पुंन्हा या केबल वायरी चोरून नेल्या आधीच शेतीत पुरेसे उत्पंन्न येईल कीनाही याची खात्री नसतांना आठ दिवसात जर दोनवेळा केबल वायरींची चोरी होत असेल तर शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडल्या शिवाय राहणार नाही किनगावसह परीसरात भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झालेली असुन चोरांना पोलिसांचा धाक वाटत नाही की काय?असा प्रश्न निर्माण होत आहे शेतकरी दिवसरात्र शेतीत मेहनत करून एक एक रूपया जमा करतो आणी चोर मात्र हजारो रूपयांच्या शेतीपंपाच्या केबल वायरी चोरून नेतात म्हणून किनगावसह परीसरातील या भुरट्या चोरांनवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त राबवावी अशी मागणी परीसरातील शेतकरी करीत आहेत.

कवच कुंडल अभियांनास हिंगणघाट शहरात चांगला प्रतिसात

0

 

हिंगणघाट – नगर परिषद, हिंगणघाट व उपजिल्हा रुग्णालय, हिंगणघाट व पंचायत समिती, हिंगणघाट अंतर्गत हिंगणघाट शहरातील संत ज्ञानेश्वर वॉर्ड येथे दिनांक 8/10/21 व दिनांक 9/10/21 रोजी माऊली मंदिर, शहालंगडी रोड येथे अभियान राबविण्यात आले त्यामध्ये दोन्ही दिवशी ज्या नागरिकांनी आद्यपहि लसीकरण केले नाही अस्या नागरिकाना नगर परिषद हिगणघाट ने सर्वे करून त्याना मोबाईल वरून संपर्क सादुन व लाउस स्पीकर वरून माहिती देऊन व स्थानिक नगरसेवक यांची मदत घेऊन मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात आली व त्यामध्ये 430 नागरिकांचे लसीकरण झाले जनजागृती साठी व लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी नगर परिषद हिंगणघाट चे मुख्याधिकारी श्री. अनिल जगताप, श्री. निलेश शिंदे, प्रशासकीय अधिकारी, श्री. प्रविण काळे, पथक प्रमुख, श्री. कुचेकर मॅडम, तालुका आरोग्य अधीकारी, श्री. जाधव साहेब, पंचायत समिती, हिंगणघाट श्री. चाचारकर सर, आरोग्य अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, हिंगणघाट संगीता वाघमारे, नगरसेविका, श्री. कमलेश (बंटी) वाघमारे, व महेंद्र नक्के, दीपक ठाकरे, अनिल झाडे, गिरडकर, आरोग्य कर्मचारी व नगर परिषद व पंचायत समिती च्या कर्मचारि यांनी अथक परीश्रम घेतले.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

महाविकास आघाडी सरकारच्या वतीने 11/10/2021 रोजी निलंगा बंद चे अवाहन करत मा. उपविभागीय अधिकारी निलंगा याना निवेदन

0

 

दगडू पिंगळे निलंगा/प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकारच्या वतीने पुढील मागण्यासाठी
1) लखीमपूर येथे शेतकऱ्यांना मंत्री पुत्रास अटक करावी व मंत्री मिश्रा ची हकालपट्टी करावी
2) प्रियंका गांधी व विरोधी नेत्यांना बेकायदेशीर थांबून अधिकाऱ्यावर कारहावी करावी.
3) शेतकरी विरोधी तिन्ही काळे कायदे रद्द करावेत
4) केंद्रीय तापसयंत्रणांचा थांबवावा इत्यादी मागण्या पूर्ण करण्यासाठी दि.11/10/2021 रोजी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने निलंगा बंद मा. उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
यावेळी अशोकराव पाटील निलंगेकर(काँग्रेस कमिटी सरचिटणीस),अभय दादा सोळुंके (काँग्रेस कमिटी सचिव), विजयकुमार पाटील, अविनाश दादा रेशमे(शिवसेना तालुका अध्यक्ष), इस्माईल लदाफ,ईश्वर पाटील, दयानंद चोपणे, लक्ष्मण कांबळे, सुनील पाटील इत्यादी उपस्थित होते.

भालोद येथील मयत सेवानिवृत्त सैनिकाच्या वयोवृध्द पत्नीला निवृत्ती वेतन मिळवुन देण्यासाठी सैनिक महेन्द्र पाटील यांचा प्रयत्नांना यश

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

सन २०१९ ला यावलचे वीर जवान सैनिक संतोष कोळी यांच्या आईना विरावली येथील रहिवासी व सद्या सीमा सुरक्षा बल, टेकनपुर ग्वालियर येथे कार्यरत सैनिक महेंद्र पाटील यांनी स्वखर्च करून पेंशन मिळवुन देण्यात मदत क करून न्याय मिळवुन दिले होते, त्या घटनेची विस्तृत बातमी यावल तालुक्यातिल सारे पत्रकार बंधुनी आपल्या लेखणीतुन ही माहीती नागरिकापर्यंत पहोचवली होती . अशाच प्रकारे यावल तालुक्यातिल भालोद येथिल स्व. एस एच चौधरी हे सिव्हील आर्मी मध्ये अलहाबाद ,नई दिल्ली येथे कार्य करून कलकत्ता येथुन सन१९९७ मध्ये सेवानिवृत्त झाले होते आणि त्यांना दरमहा पेंशन ही सुरु होते. परंतु चौधरी यांचे मागील ६ महीने आधी वृद्धपकाळाने निधन झाले. त्या नंतर त्यांचे सेवानिवृती वेतन बंद झाले होते आणि ते निवृत्ती वेतन त्याचे परिवारतील सदस्य त्यांचे पत्नी श्रीमती नेमिता चौधरी यांना नियमांनुसार मिळणार होते. परंतु स्व. एस एच चौधरी यांचे पत्नी श्रीमती. नेमिता चौधरी या निरक्षर आणि वयोवृद्ध ( ८०वय) व सोबत मुलगा राजेश चौधरी हे गावात शेती व्यवसाय करतात तरी त्याना पुढील फॅमिली सेवानिवृत्ती वेतन संबंधी पत्रव्यहार कसे काय करावे लागतात हे ही या परिवाला प्रक्रिया ची माहिती नव्हती. भालोद येथिल स्व. एस एच चौधरी यांचा मुलगा राजेश चौधरी हे यावल येथे आले असता त्याना एलआईसी चे वीमा सल्लागर मुकेश सुरेश घोडके हे भेटले असता त्याना राजेश चौधरी यांनी सैनिक महेन्द्र पाटील यांना संबधी आपली समस्या सांगितली तेव्हा मुकेश घो़डके याना २०१९ चे पेंशन चे संबंधी बातमी चा आठवण करत सैनिक महेंद्र पुंडलिक पाटिल यांचे शी संपर्क केला त्या वेळी सैनिक महेंद्र पाटील यांनी घटना आणि स्वर्गीय एस एच चौधरी माजी सैनिक यांचे कुटुंबांनी संदर्भ भालोद येधिल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण शशीकांत चौधरी याना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार (मुन्ना भाऊ) पाटील विरावली यांचे मार्फत भालोद येथिल या परिवार बद्दल शहनिशा करून घेत तत्काळ सारे कागदपत्रे आणि काही दाखले हे मुकेश घोडके यांचे बंधु जितेंद्र घोडके व विशाल कायस्थ यांच्या मार्फत तत्काळ सारे कागदपत्र मेल केले. त्या कागदपत्रांच्या सहायाने बीएसएफ मधे सहाय्यक उपनिरिक्षक / क्लर्क महेंद्र पाटील यांनी सारे कागदपत्रांच्या आधारे आणि या आधीच्या वर्ष २०१९ ला यावलचे वीर जवान सैनिक संतोष कोळी यांच्या आईना मिळवून दिलेल्या पेंशनच्या अनुभवानुसार आवेदन तयार करून सारे कागजाद सोबत जोडून मैल द्वारे यावल येथील तहसील चे कर्मचारी संतोष पुंडलिक पाटील यांना पाठवून श्रीमती नेमिता चौधरी यांच्या मार्फत मान्य तहसीदार ऑफिस ला सत्यापीत करून सारे पूर्ण कागदपत्रे ही मुंबई, आर्मी ऑफिस इलहाबाद(प्रयागराज ), नई दिल्ली येथे पाठवून दिले व सोबत मुंबई येथे कार्यरत यावलचे हितेश गजरे यांचे भाऊ पंकज हिवरे यांनाही बेलापुर मुंबई येथील पेंशन कार्यालयात या कामी संपर्क करण्यास सांगितले ही सारी कार्यवाही १५ दिवसात पूर्ण झाली. व शेवटी ८ दिवसंपूर्व येथील स्व. एस एच चौधरी त्यांचे पत्नी श्रीमती नेमिता चौधरी यांचे खात्यात सारे रक्कम जमा झाली आहे. या कार्यकरिता सैनिक महेंद्र पाटील यांचे नगरसेकवक प्रा मुकेश येवले माजी उपनगराध्यक्ष व नगरसेकवक यांनी कौतुक केले आहे. दरम्यान आज यावल येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभाहॉल मध्ये सेवानिवृत्त मयत सैनिकाच्या कुटुंबास न्याय मिळुन दिल्याबद्दल सैनिक महेन्द्र पाटील यांचा भालोद चे जेष्ठ शेतकरी शशीकांत चौधरी यांच्या हस्ते कृउबाचे सभापती तुषार पाटील , संचालक नारायण चौधरी , पप्पु जोशी , मुकेश घोडके , राजेश चौधरी यांच्या उपस्थित सत्कार करण्यात आले .

तीन वर्षाच्या बालिकेवर २५ वर्षाच्या तरूणाने अत्याचार

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

तालुक्यातील दहिगाव येथे तीन वर्षाच्या बालिकेवर २५ वर्षाच्या तरूणाने अत्याचार केल्याचा अतिशय घृणास्पद प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून या नराधमाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, यावल तालुक्यातील दहिगाव येथे काल सायंकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान भाडेकराच्या तीन वर्षाच्या बालिकेवर २५ वर्षाच्या नराधमाने अत्याचार केल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दहीगाव येथे एक मजूर कुटुंब आपल्या एक मुलगा आणि एक मुलीसह राहते. ते एका घरात भाड्याने राहत असून घर मालकाचा मुलगा कैलास प्रल्हाद पाटील (वय२५) याने काल सायंकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान, त्यांच्या तीन वर्षाच्या मुलीला दहा रूपये देण्याचे आमीष दाखवून घरात नेले. आणि तिच्यावर अत्याचार केला. बालिकेची आई घरी आली असता तिला हा सर्व प्रकार समजला. तिने कैलासच्या कानशिलात लगावली असता तो तेथून पळून गेला.

दरम्यान, या प्रकारामुळे संबंधीत कुटुंबाला भयंकर धक्का बसला असून त्यांनी आज यावल पोलीस स्थानक गाठून फिर्याद दिली. यानुसार कैलास प्रल्हाद पाटील (वय२५, रा. दहीगाव, ता. यावल) याच्या विरूध्द भादंवि कलम ३७६, ३७६-अ, ३७५, ३५४, तसेच पोक्सो कायद्यातील कलम ३, ४ आणि ८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले यांच्या आदेशावरून पोलीस हेड कॉस्टेबल अस्लम खान यांनी दहिगाव येथे जावुन आरोपी हा पळवुन जाण्याच्या बेतात असतांना त्यास अटक करण्यात आली आहे . या कामी त्यांना दहीगाव येथील गृहरक्षक दलाचे जनार्दन महाजन यांनी सहकार्य केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक विनोद मधुकर खांडबहाले हे करीत आहेत.

उपशिक्षणाधिकारी जैन यांची चारबन शाळेला भेट…

0

 

गजानन सोनटक्के

जळगांव जा.प्रतिनिधी:-

बुलडाणा जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी उमेश जैन यांनी जळगांव जामोद तालुक्यातील चारबन शाळेला आज दि.8 ऑक्टोबर शुक्रवारी अकस्मात भेट दिली यावेळी शाळेला विविध भेटवस्तू देणगी स्वरूपात देणाऱ्या दाणदात्यांचा त्यांनी सत्कार केला. बुलडाणा जि.प.चे उपशिक्षणाधिकारी जैन,जळगांव जा. पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नारायण फाळके,खेर्डा केंद्रप्रमुख केशरसिंग राऊत,मंगेश भोरसे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांनी आदिवासी,डोंगराळ भागातील जि.प.शाळा चारबन ला आकस्मित भेट दिली.शाळेच्या संपूर्ण परिसर कमालीचा स्वच्छ व विद्यार्थ्यांचा नीटनेटकेपणा पाहून शिक्षकांचे कौतुक केले.यावेळी चारबन शाळेला पंखे,इन्व्हर्टर, बॅटरी,भेट देणाऱ्या खेर्डा येथील अमोल सौदागर यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात समाजातील विविध लोकांना पुढे येऊन शाळांना मदत करण्याचे आवाहन उपशिक्षणाधिकारी जैन यांनी केले.गटशिक्षणाधिकारी फाळके यांनी शाळेचा चढत्या आलेखावर आपल्या भाषणातून प्रकाशझोत टाकली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदिवासी स्वागत गीताने उपस्थितांची मने जिंकली.यावेळी जैन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अधिकाऱ्यांसह प्रमोद भंसाली,मुख्याध्यापक दांडगे सर,उमाळे सर,मोसंबे सर,गावित मॅडम यांची उपस्थिती होती.प्रास्ताविक संचालन व आभार दीपक उमाळे यांनी मानले.

विलास भाटकर यांनी यावल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी म्हणून प्रभारी पद स्विकारली

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांची नुकतीच यावलहुन कळवण जिल्हा नाशिक येथे बदली झाल्याने रिक्त झालेल्या पदावर भुसावळचे गटविकास अधिकारी विलास भाटकर यांच्याकडे पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी म्हणुन पदभार स्वीकारला आहे.

यावेळी यावल पंचायत समितीचे उपसभापती योगेश दिलीप भंगाळे , भाजपाचे उज्जैनसिंग राजपुत , पंचायत समितीच्या सदस्या कलीमा सायबु तडवी, ग्राम पंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे , कनिष्ठ अभियंता प्रविण भारंबे यांच्यासह कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी तसेच तालुका ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष रुबाब तडवी , सचिव पुरूषोत्तम तळेले , आर टी बाविस्कर , ग्रामसेव हितेन्द्र महाजन राजू तडवी ,त्यांचे स्वागत केले आहे . प्रभारी गटविकास अधिकारी विलास भाटकर हे मागील तिन वर्षापासुन भुसावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणुन कार्यरत आहे. दरम्यान विलास भाटकर हे मुळ वढोदा तालुका मुक्ताईनगर येथील रहिवासी असुन , त्यांनी सन१९९३ साली म्हणजे सुमारे २८ वर्षापुर्वी यावल पंचायत समितीमध्ये ते कृषी विस्तार अधिकारी म्हणुन कार्यरत होते. आज वितास भाटकर यांनी यावल पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी पदाची सुत्रे स्विकारताच सर्व विभागाच्या अधिकारी यांची तात्काळ बैठक घेवुन कामाचा आढावा घेतला.

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या निंबादेवी धरण हे पुर्ण क्षमतेने भरल्याने घटस्थापना व नवरात्रीच्या पहील्या दिवसाचे औचित्य साधुन विधीवत जलपूजन करण्यात आले.

0

 

 

यावल, (प्रतिनिधी)विकी वानखेडे

निंबादेवी धरणाचे यावल पंचायत समितीचे गटनेते तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य शेखर सोपान पाटील व हुमाशिका पराग पाटील यांच्या हस्ते विधीवत जलपूजन करण्यात आले. यावल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निंबादेवी धरणावर संपन्न झालेल्या कार्यक्रमास दहीगाव ग्राम पंचायतचे सरपंच अजय अडकमोल, उपसरपंच किशोर महाजन , मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष विक्की पाटील , नायगाव ग्राम पंचायतचे उपसरपंच रामदास पाटील , विधिध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन विश्वास पाटील , नरेन्द्र देशमुख , राजु तडवी , अल्लाउद्दीन तडवी ,सातोद येथील प्रसन्ना महाजन , विकास पाटील , सावखेडा सिमचे माजी सरपंच सामिर तडवी , माजी उपसरपंच सैफ्फुल्ला तडवी , सावखेडा सिम ग्रामपंचायत सदस्य उस्मान तडवी, जिवराम बडगुजर , किरण पाटील , मुरलीधर कोळी , भगवान कोळी व सातपुडा मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते . यावेळी परिसरात सुख शांती भरभराटी व पाण्याची कायम मुबलकता राहु द्यावी अशी प्रार्थना भोनक मातेला करण्यात आली .

विदर्भ विकास आघाडी हिंगणघाट कडून लखीमपूर खेरी हिंसाचाराचा जाहीर निषेध

0

 

हिंगणघाट:- केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार हे शेतकऱ्यांच्या विषयी संवेदनशील नाही . केंद्र सरकार उन्मत्त होऊन हुकूमशाही असल्यासारखे वागत आहे . केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने आपल्या कारच्या खाली शेतकरी आंदोलकांना चीरडल्यानंतर त्या ठिकाणी हिंसाचार निर्माण झाला. यावरून असे वाटते की केंद्र सरकार हिंसाचाराला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. त्यामुळेच लखिमपुर सारखी घटना घडलेली दिसते .उत्तर प्रदेश चे योगी आदित्यनाथ यांचे सरकार सुद्धा शेतकर्‍यांच्या बाजूने न्याय देण्यास असमर्थ ठरत आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांचे सरकार या दोन्ही सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. उत्तर प्रदेशातील लखिमपुर खेरी येथील शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे यांनी जाहीर निषेध नोंदविला आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 11 ऑक्टोबर रोजी देशातील सर्व संघटनांनी भारत बंदचे आव्हान दिलेले आहे. त्या बंदच्या समर्थनार्थ विदर्भ विकास आघाडीचे पूर्ण समर्थन आहे. या द्वारे आम्ही हिंगणघाट मधील संपूर्ण संघटना आणि पक्ष यांना असे जाहीर आव्हान करतो की शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्या करिता आणि तीनही काळे कायदे रद्द व्हावे. याकरिता सर्व संघटनांनी 11 ऑक्टोबर च्या बंदमध्ये सामील व्हावे.असे निवेदन तहसीलदार साहेबांद्वारे माननीय राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले. निवेदन देताना विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे यांचेसोबत महेश माकडे, दिनेश वाघ, चंद्रकांत नगराळे, रोशन पाटील, अजय मुळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा