Home Blog Page 398

पुन्हा माजी आमदार पुत्राचा अवैध रेती वाहतूक प्रकरणात पारडी(न) चे तलाठी जाधव यांचेवर घातक शस्त्रानीशी प्राणघातक हल्ला.

0

 

7 आक्टोंबर
हिंगणघाट :- राजकीय अभय असलेल्या माजी आमदार पुत्राने एक नव्हे तर आतापर्यंत तिनं वेळा तलाठी, मंडळ अधिकारी यांचेवर अवैध वाळू चोरी प्रकरणात घातक शस्त्रनिशी हल्ला केलेला आहे. प्रत्येक वेळेस राजकीय दबावतंत्राचा वापर करुन प्रकरण दडपल्या जात असतांना यावेळी मात्र विदर्भ पटवारी संघ उप विभाग शाखा हिंगणघाट यांनी प्रकरणातील आरोपीला अटक करण्याच्या मागणीसह पटवाऱ्यांचे उपविभागीय अधिकारी कार्याल्या समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले.
सविस्तर हकीकत अशी की, दिनांक 5-10-2021 ला पारडी (नगाजी) ता. हिंगणघाट येथील तलाठी श्री. रवींद्र जाधव हे ईपीक पाहणीला जात असतांना, मार्गाने रेती घेऊन जात असलेले ट्रॅक्टर तपासणी करिता थांबवले असता सौरभ तिमांडे यांनी अचानक एका गाडीत चार पाच गुंड प्रवृत्तीच्या इसमांना घेऊन हातात तलवार घेऊन तलाठी जाधव यांचेवर प्राणघातक हल्ला चढवीला असता प्राण वाचवण्या करिता जाधव यांनी घटना स्थळावरून पळ काढल्या मुळे ते थोडक्यात बचावले. घटनेची माहिती जाधव यांनी तहसीलदार मासाळ यांना कळविल्यानंतर तहसीलदार पोलीस ताफासह घटनास्थळी हजर झाले परंतु तोपर्यंत आरोपी घटनास्थळा वरून पसार झाले होते. घटनेची फिर्याद जाधव यांनी हिंगणघाट पोलीस स्टेशनला दाखल केली आहे.
पटवारी संघटनेने यां प्रकरणात बेमुदत धरणे आंदोलनाची भूमिका घेतलेली असुन पोलीस यंत्रणा आरोपीवर काय करावाई करणार याकडे पटवारी व जनतेचे लक्ष लागून आहे.
सूर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

कोरपावली येथील जवान सैन्यदलेतून आज सेवावृत्त

0

 

यावल (प्रतिनिधि) विकी वानखेडे

तालुक्यातील कोरपावली येथील रहिवासी भारतीय सैन्यदल सेवेमध्ये असलेले जवान श्री. नायक महेंद्र पंडित पाटील आज देशाची 20 वर्ष सेवा करून आज सेवानिवृत्त झाले . ते सदन दक्षिण पश्चिम कमांड व सिग्नल युनिट मध्ये होते त्यांनी जम्मु कश्मिर राजस्थान , गुजरात , महाराष्ट्रातील पुणे , आसाम , परत जम्मु कश्मिर अशी २० वर्षे सैन्यदल सेवावृत्त वाजवली . निमित्त त्यांचा ग्राप कोरपावली आणि ग्रामस्थ समाजबांधव सगळ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले आधी त्यांचे आगमन होताच मिरवणुकीत त्यांच्यावर कोरपावली गावच्या बसस्टँड पासून फुलांची उधळण करत फटाके फोडून डीजेच्या देशभक्तीवर गीतांच्या आणि भारत माता की जय, जय जवान,जय किसान, वंदे मातरम, अशा विविध घोषणाबाजी करून त्यांना मुख्यचौकात आणून प्रथम हजरतपीर गयबनशाह बाबा यांच्या दर्ग्यावर चादर चढवुन प्रार्थना करण्यात आली नंतर ग्रापच्या वतीने सेवानिवृत्त सैनिक महेंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला व पुढे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेससेवानिवृत्त सैनिक महेंद्र पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि भिमग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गावाचे प्रथम नागरिक सरपंच विलास नारायण अडकमोल, माजी सरपंच जलील सत्तार पटेल,ग्रामसेवक आर.टी. बाविस्कर,उपसरपंच प्रतिनिधी मुक्तार पिरण पटेल,नारायण अडकमोल, ग्राप सदस्य सत्तार तडवी,आरिफ तडवी,सिकंदर तडवी,जुम्म्म तडवी,दीपक नेहेते,सैनिकांचे वडील पंडित पाटील, भाऊ बाळू पाटील,माजी सरपंच महेंद्र नेहेते,अमोल नेहेते,शिवसेना शाखाप्रमुख भरत चौधरी, दिलीप पाटील सर,माजी सरपंच प्रेमचंद महाले,सुनील अडकमोल,रोहित अडकमोल, हर्षल महाले, राजू पाटील,भीमराव इंधटे, रईस पटेल,इम्रान पटेल, अँड रियाज पटेल , विरावलीचे ग्रा.पं सदस्य अँड देवकांत पाटील , ग्राप कर्मचारी किसन तायडे, सलीम तडवी,सह त्यांचे नातेवाईक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

जळगांव जामोद तालुक्यात अतिवृष्टी व वादळी वारामुळे झालेल्या नुकसान ग्रस्त शेताची,,, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसच्या सचिव तथा जळगांव जा मतदार संघाच्या पक्षनेत्या डॉ. सौ.स्वातीताई वाकेकर यांनी केली पाहणी…..

0

 

गजानन सोनटक्के

जळगांव जा तालुक्यातील कुरणगाड,तरोडा,गाडेगांव, सुकळी परिसरात तील गावात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला असल्याने शेतातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याने सदर शासन स्तरावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई तात्काळ देण्याचा साठी पाठवपुराव करणार असल्याचे आश्वासन डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर यांनी कुरणगाड महसुल मंडळाच्या कार्यक्षेत्रात कुरणगाड, तरोडा, सुकळी,गाडेगांव,सह तालुक्यातील आदी गावातील क्षेत्रात अचानक अतिवृष्टी पावसामुळे सदर शेत क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या तोंडाशी येणारा पीक हे या वादळी वारा व अतिवृष्टीमुळे हिरावून गेले असल्याने या वादळी वारा अतिवृष्टीमुळे शेत क्षेत्रातील सोयाबीन,मका,कापूस,उडीद, ज्वारी, या सह आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच शेतातील जवळपास च्या नदी नाल्याना आलेल्या पाण्याच्या पुरा मुळे शेतात पाणी शिरल्याने शेत जमीन खरडून गेली असल्याने लागवडीसाठी असलेले शेताचे देखील मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून शेतात पाणी साचले असून उभे पीकांची नासाळी झाली आहे या परिसरातील नुकसान ग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत करण्यासर्भात राज्य शासन दरबारी पाठवपुराव करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळुन देण्यासाठी कॉग्रेस पक्ष प्रयत्न करणार असून सदैव शेतकऱ्याच्या पाठिंसी खंबीर पणे उभे राहणार असल्याचे यावेळी शेत शिवारातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधला.
यावेळी तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर,संरपच राजुभाऊ सित्रे,माजी पं.स.सदस्य गजानन बोदळे,युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील,विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद सपकाळ,रामभाऊ जाणे,युवक काँग्रेसचे सरचिटणीस शिवदास जाने अविनाश आटोळे,अशोक गिरी,दादाराव आटोळे,सलीम शहा,हकीम भाई,वैभव गवई,ज्ञानेश्वर पांडुरंग जाणे,गणेश जाणे,अरुण जाणे,शिवा जाणे,अजय जाणे,वैभव जाणे,समाधान जाणे,लक्ष्मण जाणे,नकुल जाणे,कुरणगाड सरपंच पती संदेश आठवले,विठ्ठल आटोळे, मोहन आटोळे, राजेश आठवले,संदिप मोरखडे,अर्जुन अवकाळे,तेजराव कोठे,सुरेश आटोळे,अशोक जळमकार आदींचा उपस्थित होती….
यावेळी जळगांव जामोदच्या तहसीलदार मँडम,कुरणगाड चे ग्रामसेवक पवार साहेब,कृषी सहाय्यक भगत साहेब, तलाठी सराफ साहेब ,ग्रामसेवक समाधान जाणे,उपस्थित होते….

सावली( वाघ)येथे आ.समिर कुणावार यांचे शुभहस्ते व्यायाम शाळेचे लोकार्पण

0

 

हिंगणघाट दि.७ ऑक्टोबर
गावाच्या विकासकामासाठी मी सदैव आपल्या पाठीशी असून कोणत्याहीवेळी मी आपल्या सेवेत तत्पर राहिल असे आश्वासन आमदार समिर कुणावार यांनी सावली येथील आगे बढ़ो व्यायाम शाळेच्या लोकार्पण समारोहाचेवेळी सावली(वाघ) जि.प.मतदारसंघातील गावकऱ्यांना दिले.
काल दि.६ रोजी सावली (वाघ) येथील आगे बढो व्यायाम शाळेचा लोकार्पण सोहळा सावली ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आला होता,याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितिन मडावी,सरपंचा सौ.छाया सुभाष राऊत,प.स.सदस्या सौ.मंजूषा ठक,उपसरपंच अनिल ठक तसेच आगे बढो व्यायाम शाळेचे अध्यक्ष विनोद विटाळे इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार समीर कुणावार यांचे शुभहस्ते व्यायाम शाळेचे फीत कापून रितसर लोकार्पण करण्यात आले.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सावली(वाघ) जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य नितिन मडावी यांनी मतदारसंघात आमदार समिर कुणावार यांचे प्रयत्नाने अनेक विकासकामे करता आली असून आमदार कुणावार मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी कधीही कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन केले.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

काचनगाव येथे काँग्रेस कमिटीची स्थापना

0

 

अल्लिपुर :- काचनगाव येथे काँग्रेस कमिटीची स्थापना करण्यात आली. यावेळी अध्यक्ष सतिश अं कापसे , उपाध्यक्ष प्रणय साखरकर , सचिव विजय ढगे , कोषाअध्यक्ष मंगेश खोडे , महासचिव शामरावजी कुभांरे , संघटक संतोष आत्राम , यांची निवड करण्यात आली. व इतर सदस्यगन गजानन देउळकर , प्रविण कन्नाके , शुभम खोडे , अविनाश खोंड , वैभव माहुरे , गोपाल रघाटाटे , योगेश रघाटाटे , सुनिल हिंगे , कार्तीक साखरकर , संजय आत्राम , किशोर मेघरे , वैभव पवार , धिरज खोंड , दसरत महाजन , सुभाष महाजन , दिनेश धरर्मूल , आदिची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित बालु महाजन तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी हिंगणघाट , अंकुश कापसे माजी सरपंच काचनगांव , श्रीराम साखरकर संजय गांधी निराधार समिति सदस्य , मान्यवरांनी निवडी बद्दल अभिनंदन केले. तसेच अध्यक्ष सतिश अंकुश कापसे यांनी रंणजित कांबळे देवळी पुलगाव आमदार , चारुलता टोकस महाराष्ट्र उपाअध्यक्ष , मनोज चांदुरकर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष , राजु धोटे समाज सेवक , रामदासजी काटकर , विलासजी अवचट , नथ्थुजी खोडे ( गुरुजी) , अध्यक्ष यांनी वरीष्ठाचे आभार मानले .
सुर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

नांदगावी चोरट्यानी किराणा दुकान फोडुन सुकामेव्याची केली चोरी

0

 

निलेश पगारे नांदगांव तालुका : (प्रतिनिधी)

शहरातील प्रभाग एक मधील शांतीबाग या सदन वस्तीत एका रात्री तीन ठिकाणी बंद घराच्या चोऱ्या झाल्या असून किराणा दुकान फोडुन दुकानातील सुकामेवा काजु,बदाम,गावरान तूप आदी सह रोख रक्कम व चोरट्यांनी तीन दुचाकी देखील
लंपास केल्या आहे .या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे .घटनास्थळी नांदगांव पोलिसांनी पहाणी करुन पंचनामा केला.
दि ५ रोजी मध्यरात्री शहरातील शांतीबाग या वस्तीमध्ये भारत गॅस गोडाउन जवळील नावंदर किरणां दुकानाचे शटर उचकुन चोरट्यांनी आत प्रवेश करुन आतील काऊंटर मधून २० हजार रुपयांची चिल्लर
,काजु ५० किलो, (अंदाजे किं. ४० ह.रु)
बदाम ३०कि लो(अंदाजे किं. ३२ ह .रु)
गावरान तूप २० किलो( अंदाजे किं.१२ ह. रु )आदी १ लाख २ हजार रूपयांचा एैवज चोरी करुन
भामट्यांनी तेथून बाजूच्या गल्लीत जाऊन कंपाउडच्या भिंती चढून
गोविंद मोगल यांच्या घराच्या मागील बाजूने लोखंडी जाळी काढून आत घुसुन घरातील कपाटातील २५०० रु रोकड,दिड तोळे सोने दागिने( 45 ह रु किंमतीचे) एकुन ४७५०० रुपयांचा माल लंपास केला तेथून बाहेर निघून चोरटे शेजारी एस. पी. पाटील यांच्या घराची झाडा झडती घेतली पण तेथून ते रिकाम्या हाताने परतले नंतर जवळील कचेश्वर मुंडे,व दिगंबर मुंडे (रा. खिर्डीसाठे ) यांच्या मालकीच्या घरासमोरील दोन प्लेटीना नं
(Mh41/AY 6662),
(Mh 15/GN 8165 ) आदी तीन दुचाकी घेऊन पसार झाले.
शहरातील शांतीबाग येथील घरांची व दुकानाच्या चोरीच्या घटना स्थळी पोलीस उप अधिक्षक समिरसिंग साळवे, पो नि. अनिल कातकाडे
सा. पो. नि दिपक सुराडकर ,पोलीस कर्मचारी, आणि नाशीकचे डाॅग स्काॅड ने माग काढले, आणि फिंगर प्रिंट चे ठसे देखील घेण्यात आले .

प्रतिक्रिया :नागरिकांना कोणी संशयीत आढळल्यास पोलिसांना कळवा तसेच राञीच्या वेळी एकमेकांच्या संपर्कात राहुन तसे काही अाढळुन आल्यास अलर्ट रहा नांदगांव चोरीच्या घटनेचे आरोपी लवकरच जेरबंद होतील

यंदा ही कोविड१९च्या नियमांचे काटेकोर पालन करीत नवरात्र उत्सव साजरे करावे : पोलीस निरिक्षक सुधीर पाटील

0

 

यावल( प्रतिनिधि) विकी वानखेडे

येथे उद्या पासुन होणाऱ्या नवरात्र उत्सव व गट स्थापनेच्या पार्श्वभुमीवर यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व महावितरणचे सहाय्यक अभीयंता महेश वावरे यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक संपन्न झाली . यावल येथील पोलीस स्टेशनच्या आवारात दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उद्यापासुन सुरू होणारे नवरात्र उत्सव आणी घटस्थापनाच्या पार्श्वभुमीवर यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील व नुकतेच यावल येथे बदलुन आलेले महावितरणचे सहाय्यक अभीयंता महेश वावरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली . या बैठकीला शांतता समितीचे जेष्ठ सदस्य हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, चंद्रकांत गंगाधर देशमुख , राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले , हाजी ताहेर शेख चाँद , पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार पाटील ,प्रमोद नेमाडे , गोपाळसिंग पाटील , इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील , माजी नगरसेवक गुलाम रसुल गुलाम दस्तगीर , काँग्रेसचे कदीर खान यांच्यासह दुर्गा उत्सव मंडळाचे कार्यकर्ते प्रामुख्याने या बैठकीला उपस्थित होते . यावेळी पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी सांगीतले की मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी कोरोना विषाणु संसर्गाचा प्रार्दुभाव कमी झाला असला तरी कोविड१९चे नियम मात्र कायम ठेवण्यात आले असल्याची माहीती देवुन सर्व मंडळाचे पदाधिकारी यांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करीत नवरात्र उत्सव साजरा करावा असे आवाहन केले .

सोन्यासाठी केला महिलेची खुन

0

 

दगडू पिंगळे निलंगा/ प्रतिनिधी:

तालुक्यातील गु-हाळ गावात आज दुपारी ३ वाजता बाहेरगावावरून घरी येऊन शेषाबाई मारूती दुधभाते वय ६५ वर्षे या आपल्या शेतात आल्या बाजूच्या शेतात दबाधरून बसलेल्या अज्ञात आरोपीने सदरील महिलेच्या जवळ येऊन गळ्यातील सोन्याची बोरमाळ मंगळसुञ कानातील असे एकून चार तोळे सोने हिसका मारून काढून घेतले. महिलेने आरडाओरडा करताच आरोपीने त्याच्या हातातील लोखंडी सुरीने गळा कापून आरोपी बाजूच्या तळीखेड वाटेने उसातून पळून गेला आहे. लातूर जिल्ह्यात आरोपी पकडण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली असून सध्या परीसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून बाजूच्या शेतात काम करणारे शेतकरी धावून आले असता सदरील आरोपी पळून गेला आहे.प्रत्यक्षदृषी पहाणा-यानी सदरील व्यक्तीच्या अंगावर काळा पँन्ट व पांढरा शर्ट होता असे सांगितले आहे.

मनसेची उपोषण मंडपास भेट व जाहीर पाठिंबा

0

 

सुनिल पवार ..नांदुरा ता.प्र.

नांदुरा:- तालुक्यातील ग्राम भोटा येथे जि.प.शाळेमधील दोन शिक्षकांना कार्यमुक्त न करता नियमबाह्य पद्धतीने बदली करण्यात आली या विरोधात ग्राम भोटा येथील जि.प. शाळा समिती व गावकरी पंचायत समिती नांदुरा येथे आमरण उपोषणाला बसले आहेत जो पर्यंत दोन शिक्षक कायमस्वरूपी रुजू होणार नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे उपोषण कर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.उपोषण कर्ते जि.प.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवचरण कि.पारस्कर, सरपंच प्रविण कोकाटे, उपसरपंच तेजराव भोटकर, भिमराव ना.भोटकर, संजय भोटकर, रामकृष्ण पारस्कर,महादेव पारस्कर,शिवहरी पारस्कर, सचिन पारस्कर आदी उपोषणाला बसले आहेत.
यावेळी या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
यावेळी माजी पं.समिती उपसभापती नांदुरा संतोष बाप्पू देशमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जेष्ठ नेते माजी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सपकाळ, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष, शिवचरण पारस्कर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव राहुल चोपडे यांनी उपोषणाला भेट दिली.
व जाहीर पाठिंबा दिला.

बस आणि दुचाकीच्या अपघातात तिघे ठार

0

ऋषी जुंधारे तालुका प्रतिनिधी वैजापूर

वैजापूर: वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे नाशिक औरंगाबाद महामार्गावर पालेजा पेट्रोल पंपाजवळ बस आणि दुचाकीच्या अपघातात तिघे जण ठार झाले.मंगळवारी सायंकाळी ५वाजेच्या दरम्यान औरंगाबाद नाशिक बस क्र(एम एच १४ बी टी ३३४४) औरंगाबादवरून वैजापूरकडे जात असतांना समोरून येणाऱ्या दुचाकीशी (एम एच २० एफ एन ४१७२)धडक झाली . अपघातात दुचाकीवरील तिघे जण ठार झाले.अमोल भाऊसाहेब ठुबे(वय २३ रा.पोखरी ता.वैजापूर),सोमनाथ साहेबराव निकम (वय ३२रा.शिऊर ता.वैजापूर),कडूबा ज्ञानेश्वर ठुबे(वय२२ रा.पोखरी) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत दुचाकीला धडक दिल्यानंतर बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने काही अंतरावर बस रस्त्याच्या खाली उलटली.चालकासह काही प्रवाशांना किरकोळ मार लागला सुदैवाने सर्व ४३प्रवाशी सुखरूप बाहेर काढले गेले.या अपघाताची वैजापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.जखमी बसचालक विकास सुर्यवंशी यांच्यावर वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत .