Home Blog Page 399

सरकारी खर्चावर फिरुन देखाव्याचा फार्स निर्माण करत आहेत मा.श्री.अशाेकराव पाटील निलंगेकर यांची विराेधी पक्ष नेते फडणवीस यांच्यावर टिका

0

 

दगडू पिंगळे निलंगा/प्रतिनिधी

अतिवृष्टी व मांजरा तेरणा च्या पुराने शेतकरयांचे अताेनात नुकसान झाले आहे आघाडी सरकार शेतकर्यांच्या पाठीशी उभे आहे शासन लवकरच मदत थेट शेतकरयांच्या खात्यात पैसे टाकणार आहे विराेधी पक्ष नेते राजकारण करत आहेत सरकारी पैशावर फिरुन पुरस्थिती पाहण्याचा फार्स निर्माण करुन काेरडी तळमळ दाखवण्याचा प्रयत्न आहे सत्तेत नसल्याने बाेलाची भात बाेलाची कडी आशा शब्दात त्यांनी शेतकरयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत ज्यावेळी ते सत्तेत हाेते तेव्हा काही केले नाही आशा शब्दात काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मा.श्री.अशाेकराव पाटील निलंगेकर औराद शहाजानी येथिल तेरणा मांजरा नदी संगमावरील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आले आसता मंगळवारी म्हणाले
यावेळी माजी सरपंच माेहनराव भंडारे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबुराव भंडारे साेसायटी चेअरमन लक्ष्मण बाेडंगे , दयानंद चाेपने, काँग्रेस शहर अध्यक्ष पद्मसिंह पाटील उपसपंच महेश भंडारे खमर मुल्ला महेंद्र कांबळे पांडुरंग भंडारे असिफ पटेल बक्सु मुल्ला खाशीम मुल्ला व्यंकट दापके आदि उपस्थित हाेते…

आघाडी सरकार मधील मंत्री आमदार यांनी बारा महिने मिळत असलेला पगार शेतकर्‍याना घावा

0

 

उषा पानसरे  कार्यकारी मो. 9921400542

सर्जेराव जाधव भारतीय जनता पार्टी अ जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष यांची मागणी

मुखे मंत्री मा उद्धवजी ठाकरे साहेब
उप मुखे मंत्री अजित दादा पवार साहेब आपण पुढाकार घेऊन सर्व मंत्री मंडळ व आमदार यांचा पगार शेतकरी यांना दान मनुन द्या
दादा जनतेचाच पैसा आहे तोच द्या

महाराष्ट्रामध्ये ज्याच्या जिवावर आपण जगत आहोत त्या शेतकऱ्यांच् आज अतिवृष्टीमुळे पावसामुळे वाटुळ झालं व नुकसान झालेले आहे सातत्याने मंत्री आमदार आपण आपल्या मतदारसंघात गेल्यानंतर शेतकऱ्याचा पाठीशी उभा राहू शेतकऱ्यांचा असं करू शेतकर्‍यांचा तसं करून शेतकऱ्यांना वीज पाणीपुरवठा देऊ असे गोड भाषण प्रत्येक आमदार मतदार संघात करतात आज रोजी तुम्ही ज्या शेतकरी राजा च्या जीवावर जगत आहात सरकार म्हणून व विरोधक म्हणून खंबीरपणे उभा राहावा राज्यामध्ये बावीस जिल्ह्यांमध्ये हातातोंडाशी आलेला घास तूर मूग उडीद सोयाबीन कापूस फळबाग व बाजरी मका अशा पिकांच पिकांचे नुकसान झालेला आहे आमदार मंत्री हे टीव्हीवर बोलतात कोणता मंत्री विमा कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करू असे म्हणतात मतदारसंघात आमदार गेल्यानंतर मंत्री गेल्यानंतर पंचनामे करून निकष काढून नदीकाठच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ असे म्हणतात मंत्रीमहोदय आपण प्रत्यक्ष बांधावर न जाता शेतामध्ये घुसुंन पहा गुडघ्याइतके जातात का कमरा इतके चिखलात तुम्ही गेले होते
आमची माय 70 वर्षची घरची मंडळी आमची बहीण तिच्या गळ्यात फुटका सोन्याचा मनी राहिला नाही सगळे खरिपाची बी बियाणे आणण्यासाठी गहन टाकले व आमच्या माईला आमच्या बायकोला बहिणीनं चुलतीने मावशीने
कधी लाली तोंडाला लावली नाही कधी आमची बायको व जेवाण बहीण पार्लर मध्ये गेली नाही वेळे प्रसगी आईला पैसे मागताना बहिणीला मारले आईने आमच्या आर आर आबा भाषणात सांगत असत चित्रकूट बंगल्याच्या बाजूला जे लोक राहतात ना त्यांचे बाथरूम आहेत तर
महाराष्ट्र मधला राब राब राणार 100 एकर ऊस पिकवणार शेतकरी बरोबरी करू शकत नाही
आज आबाची आठवण येते

मंत्री महोदय आपण मनलात विमा कँपणीच्या आधिकारी याच्यावर गुंना दाखलकरु साहेब तुम्ही जर शेतकरी याचे पुत्र असले तर हिंमत दाखवा गुन्हा दाखल करा
मंत्री महोदय दादाजी हुशे साहेब चिखलात फिरा जरा आपण खूप हुशार मंत्री मनुन आपली ओळख आहे आपली वेगळी ओळख आहे महाराष्ट्र मध्ये जातात खोल चिखलामध्ये जाऊन पीक पाहणी आपण बांधावर उभा राहून करू नये नजर कायद्यामध्ये पंचनामे दाखवून शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी मदत द्या 50 हजार रुपये मदत देखील कमीच आहे आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आला आपणाला राज्य सरकार कडून एक लाख रुपये पेन्शन माजी आमदारांना महिन्याचा पगार एक लाख रुपये मिळतो आपण महाराष्ट्रातील सर्व आमदाराने एक विचार करून सातत्याने ज्याच्याजवळ आपण निवडून आला निवडून येत आहे आपण हक्काने शेतकऱ्यांना बोलताय मतदारसंघांमध्ये त्याच प्रमाणे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला पाहिजे कोणत्याही प्रकारचे निकष न करता राज्य सरकारने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी पुढाकार घेऊन सर्व मंत्री आमदार यांच्या यांचा बारा महिन्याचा पगार शेतकऱ्यांना अनुदान म्हणून जिल्हाधिकारी यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा आपल्या मनाचा मोठेपणा दाखवा अशी खंत व्यक्त करत आहेत मांडत आहे मी स्टेटमेंट दिले आपणाला निवेदन दिले हे आपल्याला वाईट वाटेल परंतु आपण सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक आहेत ज्याच्या जीवावर आपण विधानपरिषद विधानसभेमध्ये बसलाय त्या शेतकरी राजाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहायला पाहिजे आपणाला पगारी ची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही असं माझं मत आहे म्हणून आपण या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून मनाचा मोठेपणा दाखवून सर्व आमदारांनी मंत्र्यांनी देखील जिल्हाधिकारी यांच्या अकाउंटला जमा करून शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी सर्जेराव जाधव भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा दलित महासंघ प्रदेशाध्यक्ष पत्रकारांशी बोलताना सर्व आपलं दुःख त्यांनी व्यक्त करून शासनाला विनंती केलेले आहे

रेल्वे अंडरपास झाला नांदगावकरांसाठी डोकेदुखी

0

 

निलेश पगारे नांदगाव तालुका प्रतिनिधी (नासिक )

नांदगाव मागील महीन्यात ढगफुटी सदृश्य पावसाने येथील लेंडी नदीला आलेल्या पुराने हतबल झालेल्या नगरपालीकेचे अतिक्रमण तर वाहुन गेलेच परंतु त्यामुळे स्थायिक व्यावसायिकांचेही अतोनात नुकसान झाले त्यात गावाला जोडणारा रेल्वे अंडरपासमध्ये साचलेले पाणी पंधरा दिवस उलटले तरीही रेल्वे अथवा नगरपालीका प्रशासन कोणाकडुनही काढले जात नाहीये.आम आदमी पक्षाचे तरुण नेते विशाल वडघुले स्वत:च्या जिवाची पर्वा न करता केवळ नांदगावकरांच्या भल्यासाठी तीन तास त्या अंडरपासच्या पाण्यात उभे राहीले तरी प्रशासनाचे डोळे उघडले नाहीये.स्थानिक नेते सुध्दा या विषयावर मोैन आहेत.
परंतु प्रशासनाच्या या अनागोंदी वागणुकीचा रहीवाशांना त्रास होतोये.सर्वसामान्य जनता शालेय विद्यार्थी तसेच हमालवाडा ,अानंदनगर ,चांडक प्लाँट , विवेकानंदनगर ,मल्हारवाडी या भागातील लोकांना आपला जीव धोक्यात घालुन रेल्वे क्राँसिंग करुन गावात जावे लागत आहे.

नांदगावकर त्रस्त प्रशासन सुस्त अशी नांदगावकरांची परिस्थिती झाली आहे.अधिकारी येतात मंत्री येतात पाहणी करतात आश्वासने देतात आणि परत निघुन जातात परंतु परिस्थिती काही बदलत नाहीये.

नवरात्र उत्सव व गरबा महोत्सव साजरा करण्यास शेगाव येथे मनाई का.. हिंदुत्ववादी संघटनांचा प्रशासनाला सवाल

0

 

शेगाव: हिंदूंचा धार्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण नवरात्री उत्सव ,गरबा महोत्सव, साजरा करण्यास केवळ शेगाव शहरातच का मनाई करण्यात येत आहे ?असा सवाल शहरातील हिंदुत्ववादी संघटनांतर्फे विचारण्यात येत आहे.. याबाबत जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे तहसीलदार शेगाव यांच्या मार्फत सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, विश्व हिंदू परिषद,जय मातादी ग्रुप, शेगाव संघर्ष समिती, विविध संघटनांकडून पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्य मध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झालेला असून विशेषतः बुलढाणा जिल्हा सह विदर्भातील बहुतेक भागात कोरूना नामशेष झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सात आक्टोंबर घटस्थापनेपासून संपूर्ण राज्यातील धार्मिक स्थळे मंदिरे शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे पोलीस महसूल प्रशासनाने शेगाव येथे सार्वजनिकरीत्या नवरात्र उत्सव साजरा करण्यास तसेच दांडिया गरबा खेळण्यास मनाई करण्यात आलेली आहे. शेगाव शहर सोडून इतरत्र मात्र प्रशासनाकडून सार्वजनिक नवरात्र उत्सव आणि गरबा दांडिया उत्सव साजरा करण्यास कोरोना नियमांचे पालन करून सार्वजनिकरित्या साजरा करण्याची परवानगी प्रदान करण्यात आलेली आहे मात्र शेगाव येथे अशा प्रकारे उत्सव साजरा करण्यास प्रशासनाने बंदी आणलेली आहे हा एक प्रकारे शेगाव येथील हिंदू धर्म यावर प्रशासनाकडून अन्याय कारक कारवाई आहे संबंधितांनी या बाबीची दखल घेऊन शेगाव येथे सुद्धा कुरूना नियमांचे पालन करून नवरात्र उत्सव आणि गरबा दांडिया उत्सव साजरा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनावर सार्वजनिक नवरात्र गणपती उत्सव मंडळाचे अध्यक्ष शेखर नागपाल, विश्व हिंदू परिषद प्रखंड प्रमुख विजय राठी, विश्व हिंदू परिषद शहराध्यक्ष प्रवीण मोरखडे, जय मातादी ग्रुप चे सोमेश कांबळे, शेगाव शंकर समितीचे विजय कुमार मिश्रा , प्रेस क्लब शेगावचे प्रशांत खत्री आदी विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्या सह्या आहेत

एमएसईबी चौकातील अखेर तो खड्डा वंचितच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानातून बुजविला !

0

 

भाजपाकडून खड्ड्यासाठी झाली होती स्टंटबाजी

तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्या नंतर प्रसिद्धी घेऊन विसरले

शेगाव :  शहरातून जाणाऱ्या खामगाव- अकोट या राष्ट्रीय महामार्गावर  दिवसांपासून शेगाव शहरातील एमएसईबी चौकातील पेव्हर ब्लॉक खचून त्याठिकाणी ही मोठा खड्डा पडलेला आहे. हा खड्डा रस्त्याच्या मधोमध असल्याने याठिकाणी दररोज अपघात होत आहे. असे असतांना भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा कडून दहा टोपले माती आणून हा खड्डा न बुजवता या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रतीकात्मक स्मारक उभारून सदर खड्डा ४८ तासात बुजवावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला होता. मात्र ४८ तास तर सोडा एक आठवडा उलटला तरी त्यांच्या इशाऱ्याची कुणीही दाखल घेतली नाही आणि तस कुठलाच आंदोलन हि केलं नसल्याने आज सोमवर दिनांक ४ ऑक्टोंबर रोजी दुपारी साडेचार वाजता वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत हा खड्डा श्रमदानातून बुजविला.

शेगाव शहरातून जाणाऱ्या खामगाव-बैतूल या राष्ट्रीय महामार्गावर शहरातील एमएसइबी चौकात या रस्त्यात मधोमध एक खड्डा पडलेला असून हा खड्डा बुजविण्यात यावा यासाठी मागील आठवड्यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी स्टंटबाजी करीत एका दगडाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे स्मारक संबोधून त्याला पुष्पहार अर्पण करीत सदर खड्डा तात्काळ बुजविण्यात यावा अन्यथा ४८ तासानंतर या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. यावेळी या कार्यकर्त्यांनी प्रसिद्धी ही लाटली होती. मात्र प्रसिद्धी प्राप्त करून ही मंडळी दिलेला इशारा आणि पडलेल्या खड्ड्याला विसरून गेले. त्यामुळे येथे दररोज अपघाताचे प्रमाण वाढल्याने आज सोमवार दिनांक ४ ऑक्टोंबर रोजी वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदानातून हा खड्डा बूजवीला आहे यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फक्त स्टंटबाजी केली का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडी शेगांव शहर उपाध्यक्ष मंगेश इंगळे,शेगांव शहर महासचिव आशिष खंडेराव, वंचित बहुजन आघाडी महिला शहर उपाध्यक्ष संगीता ससाने, निलेश वानखडे, प्रवीण विरघट,प्रवीण पहुरकर,दुर्गेश वानखडे,सोहनकुमार वानखडे,अभय शेंगोकार,कपिल वानखडे यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी शेगाव पालिकेतील राज्यकर्त्यांना चांगल्या कामाचे प्रशस्तीपत्र दिल्याबद्दल आश्चर्य

0

 

शेगांव//शेगाव नगरपालिकेवर गेल्या पाच वर्षापासून भारतीय जनता पक्षाची सत्ता असून या पाच वर्षाच्या कार्यकाळात येथील राज्यकर्त्यांनी विकासाचे समाधानकारक काम केल्याबद्दल ते गौरवास पात्र ठरतात अशी मल्लीनाथी करीत आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी या राज्यकर्त्यांची पाठ थोपटली आहे. यामुळे आमदार डॉक्टर कुटे यांच्या या वक्तव्याबद्दल आश्चर्य वाटते. आमदारांच्या या पाठबळामुळे पालिकेतील भ्रष्टाचार जनतेला दिसणार नाही काय असा प्रश्न आम्ही जनतेच्या वतीने आमदार डॉक्टर संजय कुटे यांना विचारत आहो. गेल्या पाच वर्षात पालिकेत राज्य करताना राज्यकर्त्यांनी सर्वत्र भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजवलेली आहे .प्रत्येक कामात स्वारस्य राखण्याच्या वृत्तीमुळे कामाची गुणवत्ता लोप पावली आहे ज्या ठिकाणी विकास गरजेचा आहे त्या अनेक वस्त्यांमध्ये आवश्यक गरजा व सोयी सवलती उपलब्ध नसताना फक्त स्वकियांच्या ले-आउट मध्येच पालिकेच्या निधीतून राज्य व केंद्र शासनाच्या निधीतून विकासाची गंगा पोहोचवण्याचे काम या राज्यकर्त्यांनी केलेले आहे. त्यामुळे पालिकेच्या निधीचा उपयोग फक्त स्वतःच्या मालकीची संपत्ती विकसित करण्यासाठी झाला असल्याने त्याबाबतही आमदार कुटे काही बोलले असते तर याबाबत जनता समाधानी झाली असती नेत्यांनी कार्यकर्त्यांचे गुणगान करायला कुणाचीच हरकत नसून जनतेच्या मनात काय आहे हे ओळखण्याची नितांत आवश्यकता आहे. यामुळे आमदार कुटे यांनी गेल्या पाच वर्षात झालेल्या कामांबाबत सखोल चौकशी करून त्यात किती प्रमाणात भ्रष्टाचार झाला याचाही तपास करायला हवा स्वच्छतेचे पारितोषिक मिळण्याचे डोंगारे पिटणारे राज्यकर्ते गावात किती घाण आहे हे फिरून बघितले तर सत्य परिस्थिती समोर येईल. विकासाच्या कामासाठी अनेक नगरसेवकांनी स्वतःच्या नातलगांच्या नावाने शहरात विविध ठिकाणी कमानी उभारल्या नगरपालिकेचा पैसा आणि स्वतःच्या नातलगांच्या उद्धार करायचा हा एक भाग एकीकडे, तर महापुरुषांच्या नावाने असलेल्या कमानींचे काम रखडले आहे तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नावे सार्वजनिक वचनालया ला ६०-७० लाखाचा निधी देऊ अशी घोषणा हवेतच विरली गेल्या तीन वर्षांपासून ही कामे प्रलंबित आहेत यालाच विकास म्हणायचे काय? निषेध म्हणुन नगराध्यक्षांचा पुतळा जाळल्याने प्रहारने अगतिकता केल्याचा मुद्दा पटविण्याचा प्रयत्न सुरू असून आधी आंदोलन का झाले याचाही खोलात विचार करण्याची गरज आहे. हिंदुत्वाचा ठेका घेतलेल्या पक्षाने हिंदूंच्याच भावना दुखावल्या. त्याचा जाब जंटमार्फत विचारण्याची वेळ आलेली आहे.हम करे सो कायदा अश्या अभिरभावत न प सत्ताधीकरी वागत आहेत.मांजर दूध पिते डोळे मिटून त्यामुळे तिला कोणी बघत नाही असे तिला वाटत होते परंतु राज्यकर्त्यांनी जे काही केले ते सगळे जनतेला माहीत असून वेळ आल्यानंतर जनताच त्यांना याचे उत्तर देईल हे न प सत्ताधार्यांनी लक्षात ठेवावे. प्रहारने नगराध्यक्षांचा पुतळा जाळला त्यावेळी तळफळाट करीत भाजपच्या महिला संघटनांद्वारे आरडाओरड करण्यात आली परंतु भाजपाचेच राज्यस्तरीय नेते असलेले प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व महीला कार्यकर्त्यांबद्दल जे उद्गार काढले त्यासाठी भाजपच्या महिला आघाडीने आंदोलन केले असते तर ते महिलांना समजू शकले असते. झोपेचे सोंग घेतलेल्या राज्यकर्त्यांना जागे करण्यासाठी प्रहार जवळ आंदोलनाशिवाय पर्याय नसून आतापर्यंत प्रहारने विविध आंदोलने करूनही राज्यकर्त्यांची कुंभकर्णी झोप अद्याप उघडलेली नाही.यामुळे आता मतदानाच्या माध्यमातून जनताच सत्तेच्या मस्तीत बेफाम झालेल्या सत्ताधारी मंडळीला वेसण घालनार व सत्तेच्या मस्तीत असणाऱ्या हत्तीरूपी न प सत्ताधारी यांच्यावर प्रहार संघटना अंकुश ठेवण्यासाठी जनहिताचे आदोलन करून जनतेचं मन जिंकण्याचे काम आगामी काळात प्रहारच्या माध्यमातून करू हे भाजपाच्या राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे.

 

कुटुंब संपविण्यासाठी जावयाने पेटवून दिले घर, घरगुती वादातून भांडण करून घर पेटवून दिले; सोनाळा पोलिसात गुन्हा दाखल, तर आरोपीला अटक, संग्रामपूर तालुक्यातील घटना…!

0

 

संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथे घरगुती वादातुन भांडण करुन घराला आग लावून कुटुंबास पेटवून देण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सोनाळा पोलीसांनी दि.४/ऑक्टोबर रोजी एकास अटक केली.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,टुनकी येथील कस्तुराबाई साहेबराव मंडासे वय ६०वर्षे रा.टुनकी यांनी सोनाळा पो,स्टे.ला आशी तक्रार दिली की,मी व व मुलगी नातवंडे अंबादास झाल्टे हा दारु दारु पिवून घरि आला व काही वेळा फोनवर बोलला ,त्यानंतर त्याला मोबाईल परत मागितला असता त्याने मला व मुलीला शिवीगाळ केली व मोबाईल जमिनीवर आदळुन फोडला.मोबाईल का फोडला असे विचारले असता त्याने मुलीला लाथाबुक्क्याने मारहण करुन जिवे मारुन टाकेल अशी धमकी दिली.व घर पेटवून देण्याची धमकी दिली.केवळ एवढ्यावरच न थांबता त्याने दि.३/ऑक्टोबर रोजी ६वा.दरम्यान घर पेटवावयाला सुरवात केली यात घरातील सर्व महत्वाची कागदपत्रे व जिवनावश्यक वस्तू जळून नुकसान झाले.सुदैवाने मुलीसह व नातवंडे घराबाहेर पडल्याने जिव वाचला. दिलेल्या तक्रारीवरुन सोनाळा पो.स्टे.मध्ये .गुन्हा दाखल करुन दि.४ ऑक्टोबर रोजी दुपारी २वा.दरम्यान अंबादास कैलास झाल्टे यास अटक करुन संग्रामपूर न्यायालयात हजर केले .पुढील तपास सोनाळा पो.स्टे.चे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक सोळंके हे करीत आहेत.

अखिल भारतीय छावा संघटनेने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

0

 

दगडू पिंगळे निलंगा/प्रतिनिधी

मसलगा: अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने निलंगा तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके यांच्या वतीने महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांना आज मसलगा येथे अतिवृष्टी व पूरपरिस्थितीची पाहणी करताना निवेदन देण्यात आले. मसलगा मध्यम प्रकल्प व मांजरा नदीमुळे मसलगा सोळ नदीकाठची शेतजमीन कायम बाधीत होते. त्यामुळे कायम बाधीत क्षेत्र म्हणून घोषित करा व सर्व अतिवृष्टीग्रस्त व पुरग्रस्थ शेतकर्‍यांना सरसकट 50 हजाराची मदत करावी असे निवेदन दिले.
यावेळी गुरुनाथ जाधव, बाबासाहेब पाटील, सतीष जाधव, ज्ञानेश्वर पिंड, प्रकाश जाधव, दिलीप जाधव, बालाजी पिंड, सुनिल पाटील, दिपक पिंड, दगडू आरेराव, हारीदास साळुंके, प्रल्हाद लोकरे आदी शेतकरी उपस्थित होते.

आदिवासी साहित्य व संस्कृतीचे थोर अभ्यासक व संशोधक व्यंकटेश आत्राम स्मृतिदिन आयोजित

0

 

आर्वी (वर्धा) तालुका प्रतिनिधी
प्रज्वल यावले

आदिवासी साहित्य व संस्कृतीचे थोर अभ्यासक व संशोधक आदिवासी महानायकाचा दुर्लक्षित इतिहास समोर आणणारे व भारताच्या स्वतंत्र चळवळीत आदिवासीचे योगदान लिहणारे इतिहासकार पत्रकार तसेच गोंडी -मराठी जंगोरायताड या पहिल्या पाक्षिकाचे संपादक , कवी जेष्ठ साहित्यीक व समाजसेवक दिवंगत व्यंकटेश आत्राम यांच्या 2 ऑक्टोबर स्मृतीदिनानिमित्य यांच्या अभिवादन कार्यक्रम सर्व पुरोगामी संघटनाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदिवासी साहित्यिका व समाजसेविका यशोदाताई आत्राम होत्या
यात संभाजी ब्रिगेडचे रोशन हिवाळे आदर्श एकता सामाजिक ग्रुपचे गौतम कुंभारे न्यु बॉईज पंचशील युवा ग्रुपचे सुरज मेहरे आशिषभाऊ उईके टिपू सुलतान सेना आर्वी शहर अध्यक्ष अबरार खान, महिला मुक्ति संघटन बंडूभाऊ पाचोडे , सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश भिवगडे, प्रांजली आत्राम प्रसन्न आत्राम हर्ष खडसे योगेश बावणे याप्रसंगी कार्यक्रमाला सुरेश भिवगडे यांनी प्रास्ताविकातुन व्यंकटेश आत्राम यांचे जीवनचरित्र मांडले
याप्रसंगी आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणारे व लोकसाहित्याच्या आदिवासी लोकगीत व संस्कृतीचे कार्य करणाऱ्या व्यंकटेश आत्राम यांचे काचनूर या गावी स्मारक निर्माण व्हावे अशी इच्छा यशोदाताई आत्राम यांनी व्यक्त केली
दिवंगत व्यंकटेश आत्राम विचारमंच आर्वी प्रांजली आत्राम यांनी आभार व्यक्त केले
दिवंगत व्यंकटेश आत्राम विचारमंच आर्वी

गांधी जयंती दिनानिमित्त केदार येथे अंगन वाडि चे भुमीपुजन सोहळा संपन्न

0

 

सुनील पवार. ता.प्र.

नांदुरा दि.२/१०/२०२१रोजी गट ग्रा.पंचायत दहिवडी केदार येथील अंगनवाडी चे भुमीपुजन सोहळा संपन्न झाला महिला बाल विकास निधी अंतर्गत मंजूर जिल्हा परीषद बुलढाणा गांधी जयंती दिनानिमित्त केदार येथील अंगनवाडी चे भुमीपुजन नियोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित जिल्हा परीषद चे सदस्य बलदेव राव चोपडे पंचायत समिती.सभापती सौ.सुनीताताई संतोष डीवरे. भा.ज.पा.नेते. शिवाजी पाटील. माजी. सभापती अनील इंगळे .शिवसेना. ता.संतोष डीवरे. रमेश पाटील. पत्रकार किशोर इंगळे दहिवडी चे ग्रामसेवक गाडे दहिवडी चे सरपंच सुषमाताई ढोले उपसरपंच विजय वाघ ग्रामपंचायत सदस्य. मुख्यध्यापक अरविंद जोशी काळुसे सर रामरतन बाजारे. संतोष बावसकर. गजानन वाघ. व सर्व गावकरी उपस्थित होते