Home Blog Page 400

न्यूजपोर्टल आणि डिजिटल मीडियाची भविष्यातील दिशा

0

 

अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक)

भारत सरकारने विविध समाज माध्यम मंचाचा वापर करणाऱ्या सामान्य जनांच्या डिजिटल माध्यमांवर प्रकाशित साहित्यविषयक तक्रारींचे निवारण करणे तसेच त्यांच्या हक्कांचे उल्लंघन होत असेल तर त्याची जबाबदारी निश्चित करणे शक्य व्हावे यासाठी 25 फेब्रुवारी 2021 पासून नवे माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि माध्यमांसाठी आचार संहिता) नियम 2021 अधिसूचित केले आहे.

केंद्र शासनाच्या या नवीन कायद्यानुसार न्यूजपोर्टल आणि डिजिटल मीडियाची भविष्यातील दिशा यावर चर्चा करण्यासाठी रविवारी रात्री ८ वाजता न्यूजपोर्टलधारकांचा ऑनलाईन महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे विधिज्ञ डॉ. कल्याणकुमार मार्गदर्शन करणार आहेत. मुख्य वक्त्यांच्या मार्गदर्शनानंतर प्रश्नोत्तर सत्र होणार आहे. हा गूगल वेबिनार सर्व डिजिटल वृत्त माध्यमांसाठी व संबंधित व्यक्तींसाठी उपयुक्त राहील. तसेच निमंत्रित मान्यवर देखील सहभागी होत आहेत. या वेबिनारचे आयोजक वेबसाईट निर्मिती क्षेत्रातील काव्यशिल्प डिजिटल मीडिया आहे.

– डॉ. कल्याण कुमार यांचा परिचय
डॉ. कल्याण कुमार हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) आणि अमेरिकेच्या येल विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. झारखंड राज्यातील जमशेटपूर येथे जन्मलेल्या डॉ. कल्याण यांचे शिक्षण मध्यप्रदेश, बिहार, दिल्ली व महाराष्ट्र या चार प्रमुख राज्यांसह अमेरिकेत झाले आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात “लेबर हिस्ट्री” या विषयात पी.एचडी. पूर्ण केली. त्यानंतर अमेरिकेत उच्च शिक्षण घेतले. ते नागपूर उच्च न्यायालयात मानवाधिकार, कामगार आणि डिजिटल मीडिया कायद्याचे अभ्यासक आहेत. कामगार आणि आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात याचिकांच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम करीत असतात.

केव्हा : रविवार, २६ सप्टेंबर
किती वाजता : ७:४५ – ९:४५ PM
कुठे : Google Meet
लिंक: https://meet.google.com/zqp-jtvc-bva
आयोजक : kavyashilpdigital.com

राज्यस्तरीय महिला बॉक्सिंग स्पर्धेत हिंगणघाट चा ऑल इंडिया बॉक्सिंग संघ जाहीर

0

 

चंद्रपूरच्या भद्रावती इथे आयोजित बुधवार, दिनांक, 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2021 दरम्यान होणाऱ्या महिलांच्या खुल्या व किलो गटामध्ये राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी हिंगणघाटचा ऑल इंडिया बॉक्सिंग संघ जाहीर झाला आहे.
या स्पर्धेत कामगिरीच्या आधारावर निवड करण्यात आलेल्या हिंगणघाटच्या बी, सी, सी, क्रीडा संकुलन येथील ऑल इंडिया बॉक्सिंग संघाच्या नेहा सातघारे 63किलो, (हिंगणघाट), प्रीती वानखेडे 70किलो, (हिंगणघाट), अंकिता जगताप 54किलो,(हिंगणघाट) व पायल गावंडे 50किलो,(सेलू शेकपूर बाई) यांची राज्यस्तरीय महिला बॉक्सिंग स्पर्धेत खेळाडू म्हणून निवड झाली आहे.
ऑल इंडिया बॉक्सिंग संघाचे प्रशिक्षक,नदिम शेख, तसेच समाजसेवक, राकेश शर्मा यांचे खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन लाभले, यासह हिंगणघाटचे पोलीस निरीक्षक, संपत चव्हाण यांनी अभिनंदन केले असून भ्रमणध्वनिवरून माजी राज्यमंत्री, अशोक शिंदे यांनी देखील अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

ओबीसी आरक्षणबाबत भाजपची भूमिका विरोधी -प्रा.हरी नरके

0

 

शेगाव येथे समता परिषदचे प्रबोधन शिबिर

शेगाव: केंद्रातील मोदी सरकारने ओबीसींचे आरक्षण संपवुन टाकण्याचा कट रचलेला आहे. राज्यातही भाजपचे सरकार होते तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारे प्रयत्न केलेले नाहीत.भाजपचा ओबीसी आरक्षणाला आतून विरोध आहे हे कागदत्रनिशी मी सिद्ध करू शकतो.त्यामुळे त्यांची प्रत्येक कृती ही ओबीसींचे विश्वासघात करणारी ठरत आहे. ही बाब अशीच सुरू राहिली तर ओबीसी समाज हा भारतीय जनता पक्षापासून दूर जाऊन त्याचा फटका त्यांना राजकारणात बसेल असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा.हरि नरके यांनी बोलतांना केले.
येथील वर्धमान जैन भवन मध्ये समता परिषदेचे एकदिवसीय प्रबोधन शिबिर 25 सप्टेंबर रोजी पार पडले.याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गेल्या सात वर्षात ओबीसी बाबत अनेक वेळा खोटी विधाने केली आहेर. ते हुकूमशाही वृत्ती चे पंतप्रधान असल्याने मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना ते पूर्ण स्वातंत्र्याने निर्णय घेऊ देत नाहीत ओबीसींच्या आरक्षणाचा हक्क हा ओबीसीसाठी आता आरपारची लढाई ठरलेली आहे. केंद्र सरकारने इम्पीरियल डाटा च्या नावाने नौटंकी चालवली आहे. व न्यायालयातही त्यांनी अनेक वेळा खोटे प्रतिज्ञापत्र देऊन समाजाची दिशाभूल केली आहे. ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा डाव हा भारतीय जनता पक्षाची कूटनीती असून यामुळे ओबीसींना फक्त मतदानासाठी त्यांचा उपयोग करून घेत बालवाडीचे राजकारण खेळत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला ओबीसी समाजात अनेक समाज आलेले आहेत त्यामुळे आरक्षणामुळे त्यांचा आर्थिक विकास होईल गेल्या सात वर्षात मोदी सरकारने मागासवर्गीयांचे दोन लक्ष कोटी रुपये इतर योजनांमध्ये वळविले तर ओबीसींच्या आर्थिक विकासासाठी सहकार्य करणारे दहा टक्के निधी हा आर्थिक मागास वर्गासाठी वरती केल्याने त्याचे परिणाम ओबीसीला भोगावे लागतात मोदी यांनी गेल्या सात वर्षात सरकार त्यांना अनेक चुका केलेले आहेत त्यात नोटबंदी जीएसटी यासारखे विषय असून ओबीसींना त्यांचे हक्क मिळवून दिल्याशिवाय आमचा लढा थांबणार नसल्याचे त्यांनी यावेळी प्रतिपादित केले सरकार सीबीआय या संस्थांचा दुरुपयोग करून पक्षातील व विरोधक असलेल्या नेत्यांना दाबू पाहत आहे हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले
या शिबिर कार्यक्रमाचे अध्यक्ष समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब भुजबळ तर उदघाटक बुलढाणा जि प अध्यक्ष सौ मनीषाताई पवार, प्रमुख वक्ते जेष्ठ विचारवंत प्रा हरी नरके सर, उत्तम कांबळे,माजी आ लक्षमणराव तायडे, माजी आ. कृष्णराव इंगळे, तोताराम कायंदे,समता परिषदचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ खरात,रवीभाऊ सोनवणे प्रदेश सरचिटणीस, अॅड सुभाष राऊत विभागीय अध्यक्ष मराठवाडा, प्रा अरविंद गाभणे विभागीय अध्यक्ष पश्चिम विदर्भ,जळगाव जा.मतदारसंघाच्या च्याकाँग्रेस पक्षनेत्या डॉ स्वातीताई वाकेकर,माधुरी ताई राणे, जयश्री ताई शेळके,शेगाव चे माजी नगराध्यक्ष साहेबराव कलोरे,माधवराव हुडेकर, संतोष खांडेभराड जिल्हा अध्यक्ष, दत्ता खरात जिल्हा अध्यक्ष, मनोज भोपळे, अविनाश उमरकार , अजय तायडे, गजानन इंगळे,अरविंद शिगांडे, श्रीकांत कलोरे,वैभव घाटोळ, दिपक निमकरडे,प्रदीप सातव,अनंता लहासे आदींची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.शिबिरास राज्यभरातून ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते.

संकेत वाघे प्रवास आणि प्रवासातील प्रेरणादायी वाटचाल !

0

 

प्रारंभ : हिंगणघाट ते नागपूर, नागपूर ते पुणे आणि मुलाखतीसाठी पुणे ते दिल्ली. असा विहंगम प्रवास करीत जगातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या परिक्षेपैकी एक अशी भारतीय लोकसेवा आयोगाची म्हणजेच UPSC ची परीक्षा(आपल्या सामान्य जनांच्या भाषेत IAS ची परीक्षा) आज माझा रूममेट, निकटवर्तीय मित्र, भाऊ, आदरणीय संकेत बळवंत वाघे हा UPSC 2020 च्या परीक्षेत भारतातून 266 च्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला…
नागपूर येथे रामकृष्ण मठात सोबत असतांना तसेच पुण्यात एकाच रूमवर एकत्र सोबतीला असतांना प्रत्यक्ष डोळ्यामोरून पाहिलेली त्याची ही यशस्वी वाटचाल आणि हा व्यक्ती भविष्यात लवकरच IAS पदाला गवसणी घालेलच हा त्याच्याप्रती असलेला विश्वास आज सत्यात उतरला.
रामकृष्ण मठ नागपूर येथे असतांना रामकृष्ण परमहंस माँ.शारदा आणि स्वामी विवेकानंद यांच्या पवित्र सानिध्यात त्यांच्या शिकवणीत, त्यांच्या कृपेच्या आशीर्वादाच्या छत्रछायेखाली काढलेले ते दिवस आयुष्याची एक नवी पहाट उजळावी असेच होते. आश्रमातील महाराजांचे वेळोवेळी झालेले मार्गदर्शन आयुष्याची एक निश्चित दिशा ठरवन्यात आणि त्यावर मार्गक्रमण करण्यात वेळोवेळी खुप मोलाची भूमिका पार पाडली.बालपणापासूनच उच्च बुद्धिमत्तेची देणगी लाभलेला हा विद्यार्थी. शालेय तसेच माध्यमिक शिक्षणातील अभ्यासात उत्तम कामगिरी करत पदवी(B.Sc) शिक्षणासाठी नागपूर येथील प्रतिष्ठित नामांकित अशा ‘शासकीय विज्ञान संस्था(स्वायत्त) नागपूर येथे त्याने प्रवेश घेतला. पदवी शिक्षण घेत असतांना महाविद्यालया अंतर्गत तसेच राज्यस्तरीय वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धेत स्वतःतील कलागुणांचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत आणि त्या स्पर्धा जिंकत विविध पारितोषिकांचा तो मानकरी ठरला. पुढे तेथेच याने M.Sc physics या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल..आपल्या कॉलेज जीवनातील संस्मरणीय असे ते दिवस तो आनंदाने जगला… तिथेही अभ्यासात आपलं सर्वोत्कृष्ट देऊन तो Institute of science मधून B.Sc – M.Sc मध्ये उच्च(प्रथम) श्रेणीत उत्तीर्ण झाला..लागलीच महाविद्यालयाचा चा उत्कृष्ट विध्यार्थी पुरस्कार( Institute of science best student award) सोबतच नागपूर विद्यापीठाचा उत्कृष्ट विध्यार्थी पुरस्कार( RTMNU Best Student award) अशा सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित होऊन आधीच प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उरात बाळगून असलेला हा विद्यार्थी पुण्याच्या वाटेने निघाला.
पुणे ( Upsc अभ्यास सुरुवात
पुण्यात जाताच ज्ञानप्रबोधिनी येथे Upsc Facilitation Batch 2019 च्या कोर्स ला प्रवेश घेऊन लगेच क्षणाचाही विलंब न करता अभ्यासाला सुरुवात केली.पदवी शिक्षणाला असतांनाच UPSC परिक्षेबद्दल हवी तेवढी माहिती गोळा करत करत पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण होईतोवर नागपूर येथेच अभ्यास करून अभ्यासाची पार्श्वभूमी व्यवस्थितरित्या तयार करून ठेवली होती. त्यामुळे पुण्यात जाऊन रीतसर अभ्यास करण्याचा मार्ग त्याच्यासमोर मोकळा होता. निश्चितच ज्ञानप्रबोधिनी येथे झालेल्या प्रवेशामुळे त्याच्या या अभ्यासाच्या प्रवाहाला एक निश्चित अशी वेगळी नवी दिशा मिळाली यात काही शंका नाही. तेथील गुरुजनांनी केलेलं सर्वोत्तम मार्गदर्शन तसेच इतरही बाहेरील गुरुजनांकडून,मित्र परिवाराकडून मिळालेला मार्गदर्शन हा त्याला त्याच्या वाटचालीत अभ्यासात त्याला फार मोलाचं ठरलं..त्याहूनही अधिक म्हणजे त्याने स्वतः घेतलेले परिश्रम त्याचा स्वतःचा अभ्यास आणि आपल्या ध्येयाप्रती असलेली नितांत ओढ ही त्याला इकडे तिकडे बाहेरील मनोरंजनाच्या दुनियेत भरकटण्यापासून एक ढाल बनून सतत त्याच्या सोबत होती.. पहिला Attempt :
दैनंदिन अभ्यासात कुठेही खंड न पडू देता काही महिने नियोजनबद्ध अभ्यास केला आणि त्या अभ्यासाच्या जोरावर 2019 ची UPSC पहिली prelims दिली हा त्याचा पहिला Attempt होता.. तेव्हा त्याचा अभ्यास बघून सर्वांनाच वाटत होतं की prilims नक्कीच निघेल..त्याचा पण स्वतःवर पूर्ण विश्वास होता. फक्त आता निकालाची तेवढी वाट होती Result लागला आणि त्यात भाऊ पहिल्याच प्रयत्नात prelims उत्तीर्ण..ही खूप त्याच्यासाठी तसेच आम्हा सर्व मित्रमंडळीकरिता सुखद बातमी होती..परंतु त्याच्या आयुष्यात ह्या महत्वाच्या टप्प्यावर एक विघ्न येणं बाकी होत. त्यावर्षी अस झालं की सरकारने सर्व सरकारी सेवेत देशातील आर्थिक मागास प्रवर्गासाठी 10 टक्के आरक्षण लागू केला होता…त्यात याने परीक्षा फॉर्म हा EWS प्रवर्गातून भरला असल्या कारणाने याला वेळेवर EWS चे प्रमाणपत्र काढणे गरजेचे होते आणि ते वेळेत आयोगाकडे पाठवणे अत्यंत आवश्यक होते.. परंतु आपल्या शासकीय व्यवस्थेच्या दिरंगाईमुळे ते प्रमाणपत्र वेळेत मिळू शकले नाही…आणि ते प्रमाणात्र जमा करण्याची वेळ निघून गेली अशात UPSC ने ज्यांची EWS प्रमाणपत्रे वेळेत जमा झालेली नाही त्यांना UPSC mains च्या परीक्षेला न बसू देण्याचा म्हणजेच तेथून वगळण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे त्यावेळेस बरेच वादविवाद झाले.शेवटी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुद्धा गेलं तरी परंतु निर्णय हा UPSC च्या बाजूनेच लागला आणि तो एक अनमोल attempt मुख्य परीक्षा न देताच त्याच्या तसेच त्याच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांच्या हातातून निघून गेला.( नाहीतर हा 2nd attempt देण्याची वेळच अली नसती त्यावेळेस त्याच्या मनाची झालेली अवस्था खरंच डोळ्याने बघवेना झाली होती… मनात सुरू असलेले ते असंख्य विचारांचे वादळ ह्याने इतरांना त्याची जाणीव न होऊ देता स्वतःच मनातल्या मनात थोपवून धरले… पण ते मित्रांपासून कुठे लपून रहायच!..आम्ही सर्वांनी बरंच समजावलं आणि शेवटी त्याने मनाला धीर देत त्या विदीर्ण परिस्थितीतुन काढता पाय घेत पुढाच्या तयारीला लागलेल बर म्हणून ते विचार जे व्हायचं होत ते झालं म्हणून तिथेच सोडून दिले व पुन्हा जोमाने आता 2020 च्या प्रयत्नासाठी अभ्यास सुरू झाला.अजून एक आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे ह्याने या संपूर्ण प्रवासात स्वतःचा आर्थिक खर्च एका दुसऱ्या अकॅडमी मध्ये शिकवणी वर्ग घेऊन स्वतःच पूर्ण केला.
दुसरा Attempt(prelim) : पुढे काही महिन्यांतच कोरोनासदृश्य जागतिक महामारी सुरू झाली आणि आम्ही सगळे तिथेच अडकून पडलो पुणे सगळं बंद पडल होत.. तेव्हा तशा अत्यंत बिकट परिस्थितीत सुद्धा या पठयाने अभ्यासाची साथ मात्र सोडली नाही आणि अभ्यासाने ह्याची..अभ्यास तसाच सुरू होता. पुण्यातून बाहेर घरी जाण्याची आमची धडपड सुरूच होती.. आणि एकेक म्हणतां सगळेजण काही दिवसांत आपआल्याला गावी सुखरूप निघून गेलो..आणि घरी राहून अभ्यास केला.(माझं पण 2020 चा पहिलाच प्रयत्न होता
महामारीची परिस्थिती पाहता आयोगाने UPSC सेंटर बदलाची संधी विद्यार्थ्यांना दिली आणि सेन्टर नागपूर निवडून घेतल..योगायोगाने आमचं दोघांचं सेंटर हे एकच होत
पुढे काही दिवसांत Upsc prelims 2020 ची परीक्षा नियमांचे पालन करीत पूर्ण झाली आणि काही महिन्यात निकाल लागला इथेही पठ्याने बाजी मारली आणि prelims परीक्षा पास झाला..
(माझं काय झालं ते विचारू नका परिपूर्ण अभ्यास करून दिला attempt पण… सोडा) आणि पुढे mains चा अभ्यास इथेच नागपूर मध्ये राहून करायचा निर्णय त्याने घेतला.आणि एक खोली भाड्याने घेऊन त्यात मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली.. बाकीचे सगळे मित्र आपापल्या घरी होते..मी मात्र काही दिवसांनी परिस्थिती आटोक्यात आल्याचे पाहता पुण्याला निघून गेलो… त्यादरम्यान आमचं फोन वर बोलणं व्हायचं…विचारलं
मी : हॅलो ” संकेत दा काय म्हणतो कसं चाललंय अभ्यास?..
संकेत दा : अरे एकदम मस्त!! फक्त एकट एकट करमत नाही तेवढंच.. पुण्यात किती मस्त होत ना आपलं..सगळे एकत्र खूप बर वाटत होतं..
मी : हो ना रे..खरंच खुप आठवण येते त्या दिवसांची.
संकेत दा: तू सांग तू काय म्हणतो..
मी : मी पण एकदम छान..mains झालं की भेटू परत पुण्यात.
संकेत दा: हो नक्कीच!
मी : बर मग काळजी घे..करा अभ्यास..भेटू लवकरच bye..
संकेत दा: तू पण काळजी घे bye.
अशी एकमेकांची विचारपूस करीत कधीकाळी बोलणं व्हायचं..तेव्हा त्या संवादात याच्या बोलण्यातुन mains च्या तयारीला जो जोश लागतो तो सर्वांगाने झळकत होता…आधीपासूनच पूर्ण विश्वास होता की ह्या प्रयत्नात तर हा नक्कीच mains पास होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरेल आणि शेवटचा निकाल यशपूर्ण असेल..आणि त्या कालावधीतील आमच्यात होणाऱ्या संवादातून त्याच्याप्रती असलेला माझा तो विश्वास एकदम पक्का झाला होता.
मुख्य परीक्षा(Mains) Mains चा सेंटर रायपूर(छत्तीसगड) ला टाकलं होत…”नागपूर वरून जवळ पण पडते आणि तेवढी मुबंई सारखी वर्दळ पण नसते रस्त्यावर म्हणून”…आता इथे पण देवाला ह्याच पण पहायचाच होता बहुदा.. अजून एक विघ्न परीक्षेच्या दिवशीच आला… मुख्य परीक्षेचा पहिलाच GS I चा पेपर आणि परीक्षा सेंटर वर जातांना ह्याचा मोबाईल गाडीत कुठेतरी पडला आणि तो हरवला गेला.. विचार करा या प्रसंगी काय मनस्थिती असेल त्याची.. तरी सुद्धा वेळेचे आणि प्रसंगाचे महत्त्व ओळखून त्याने लगेच पोलीस स्टेशन गाठले तिथे रीतसर तक्रार दाखल करून मोबाईल ची सेवा बंद केली..आणि आपला पेपर देण्याकरिता निघून गेला.
“खर सांगायच झालं तर अशा प्रसंगांना हाताळण्यासाठी मनाची स्थिरता खूप लागते.चलबीचल न होता वेळेवर काय तो निर्णय घेवून आपल्या इच्छितस्थळी इच्छित कर्मकार्याला मार्गस्थ होणं हे ही जमायला हवं!!”…आणि हे त्याने यशस्वीपणे केलं आणि तो पेपर सुद्धा उत्तमरीत्या सोडवून आला. पुढे काही दिवसांत mains परीक्षा संपली आणि लागोलाग काही महिन्यांत निकाल पण लागला आणि mains परीक्षा उत्तीर्ण होऊन आपला आपला पठ्ठा मुलाखतीला पात्र ठरला… निकाल लागला आणि जेव्हा हे कळलं की संकेत mains उत्तीर्ण झाला म्हणून तेव्हा सर्वांना आनंदाचा सुखद धक्का बसला….फार बर वाटल आणि आता सगळ्यांच्या मुखातून एकच वाक्य ऐकायला मिळायचं…
अम्म्म “ते इंटरव्ह्यू काय संकेत भाऊच्या डाव्या हाताचा खेळ आणि हो खरंच ज्यांना ज्यांना संकेत दा चा सहवास लाभलंय किंवा ज्यांनी त्याला जवळून बघितलंय त्या सर्वांना ह्याचा अनुभव निश्चितपणे आलेला असेल.
Interview ( दिल्ली) :
मुख्य परीक्षेचा निकाल लागल्यावर लगेच काही दिवसांतच त्याची पाऊले पुण्याकडे वळली आणि मुलाखतीला सामोरे ठेवून पुढची अभ्यासाची तयारी सुरू झाली… नंतर काही दिवसांत Mock interview देण्यासाठी दिल्ली गाठली… तिथे वेगवेगळ्या संस्थांमध्ये mock interview देऊन आपल्या तयारीला परिपूर्ण केलं.. शेवटी interview चा दिवस आला आणि आता पुन्हा एकदा नशिबाने या टप्प्यावर सुद्धा पण पाहायचा विचार केला होताच आता एक नवीनच विघ्न समोर उभ येऊन ठाकल होत. दिल्लीला गेल्यावर तिथे अचानक त्याच्या कानाला इन्फेक्शन झाल आणि उजव्या कानाचा पडदा फाटला…लगेच डॉक्टरकडे गेला तिथे डॉक्टर ने सांगितल की कानाचा ऑपरेशन करावं लागेल…आणि हे सगळं घडलं interview च्या 4 दिवसा अगोदर.. समजू शकता मुलाखतीला 4 दिवस बाकी फक्त आणि हा एवढा मोठ्ठा प्रसंग अंगावर धावून आलेला… परंतू ती वेळ आता करो या मरो अशा स्थितीत येऊन ठेपली होती. शेवटी तो तसाच interview ला गेला उजव्या कानाने खूपच कमी ऐकू येत होत..तिथे गेल्यावर त्याने इंटरव्ह्यू पॅनल मधील मॅडम ला आधीच सांगितलं की मॅडम ‘कानाला इन्फेक्शन झालेलं आहे त्यामुळे तुम्ही थोडं जोरात बोला तेव्हा तिथे सर्वांनी समजून घेऊन सहकार्य केलं आणि हे सुद्धा विघ्न टळून interview झाली एकदाची हुश्शहहहह!
इंटरव्ह्यू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मी त्याला फोन केला तेव्हा..
मी : हॅलो..काय म्हणतो! कसा झाला इंटरव्ह्यू?
संकेत दा : काही नाही रे एकदम निवांत झाला..
मी : हो का ! किती वेळ चालला
संकेत दा : 25 मिनिटे चालला असेल बहुदा.
मी: अरे व्वा ! मस्त गेला असेल ह…!
संकेत दा : मस्त तर नाही म्हणता येईल..पण गेला ठीक ठाक..बघू आता पुढे काय होईल ते… Result आल्यावर काय ते समजेल..
हा एक मात्र नक्की खुप जण म्हणतात की UPSC इंटरव्ह्यू खुप कठीण असते म्हणून पण मुळात तस काही नसते..एकदम मैत्रीपूर्ण संवाद चालतो..म्हणजे आधी थोडी भीती असते मनात पण त्यांचं ते गोड गोड बोलणं ऐकून भीती एकदम नाहीशी होते…
Mock इंटरव्ह्यू मध्ये जरा जास्तीच करतात..म्हणजे असे काही प्रश्न विचारतात की मुलांना घाबरवून सोडतात एकदम…परंतु तिथे तस काही होत नाही..एकदम निवांत होते इंटरव्ह्यू…
मी : भारीच ह!!! चला आपलं भाऊ कलेक्टर होणार आता..
निकाल कधी लागेल मग?…
संकेत दा : लागेल सप्टेंबर च्या शेवट शेवट.
मी : हो का!! यार पुण्यात आपल्या मधून जवळचा तिथे तुला कुणीच नाही सोबतीला..सगळे गावाकडे आहेत..मी पण दोन महिने झाले गावकडेच अडकलोय.. मी results च्या दिवशी तिथे राहिलो पाहिजे यार तुला उचलून धरायला खांद्यावर.
संकेत दा : हो ये लवकर मग..
मी : हो 26 Sept. चा माझं पेपर झालं की लगेच 27 ला निघतो पुण्याला तोपर्यंत result लागायला नको.
संकेत दा : काही सांगता येत नाही.. लागू पण शकते..
एवढं बोलणं झालं, भेटू आल्यावर इकडे… एवढं बोलून ठेवला फोन आम्ही दोघांनीही आणि
आज 24 Sept लाच अचानक माहिती पडलं result लागला म्हणून आणि निकाल बघतो तर काय आपले संकेत भाऊ UPSC परीक्षा AIR 266 Rank ने परीक्षा उत्तीर्ण झालेले .. मनाला खूप आभाळभरून आनंद झाला..डोळ्यासमोर एकदम जुन्या आठवणी ताज्या झाल्या मन कस तृप्त झालं..पण तिथे निकालाच्या दिवशी पुण्यात त्याच्या सोबत राहून त्याच्या आनंदात सहभागी होण्याची ईच्छा ही मात्र अपूर्णच राहिली,मी माझ्या मनाला : बर काही होत नाही वैभव जातोय ना 27 ला तर भेट होईलच तेव्हा उचलून धर खांद्यांवर म्हणजे झालं समाधान
सारांश.
यश अपघात नाही. हे कठोर परिश्रम, चिकाटी, शिकणे, अभ्यास, त्याग करणे आणि सर्वात जास्त, आपण काय करत आहात किंवा काय करायला शिकत आहात याचे प्रेम” ….
यश मिळवण्याचे कोणतेही गुपिते नाही. हे तयारी करण्याचे, कठोर परिश्रम आणि अपयश होण्यापासून शिकण्याचे परिणाम आहे.
खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा संकेत दा आता आजपासून तुझ्या आयुष्यातील नवीन प्रवासास सुरुवात झाली.
तू झालास आता आम्ही पण येऊ तुझ्या पाठोपाठ मार्गदर्शनाचा, निखळ मैत्रीचा आणि शुद्ध अविरत प्रेमाचा हात मात्र असाच आम्हा सर्व मित्रांच्या सदैव सोबत असू दे
श्री रामकृष्ण परमहंस, माँ.सारदा, स्वामी विवेकानंद यांचा आशीर्वाद असंच सदा तुझ्या सोबत राहूदे हीच मनापासून प्रार्थना

तुझाच प्रिय मित्र
वैभव म्हस्के
रामकृष्ण मठ नागपूर ते पुण्यात सोबत असणाऱ्या आम्हा सर्व सहकारी मित्र परिवाराकडून तुझं खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी विशेष शुभेच्छा” तळटीप: तस पाहता वरील प्रवास खूपच संक्षिप्त स्वरुपात मांडलेला आहे. कारण संपूर्ण प्रवासाच वर्णन करायचं झालं तर यावर एक पुस्तकच छापवी लागेल एवढं मी लिहू शकतो आणि लिखाणात तारखेचा उल्लेख मुद्दामच टाळलेला आहे( ते दिवसच असे भराभरा निघून गेले की तारीख तो कागद पे ही रह गयी यारो
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट शहरातील संकेत वाघे युवकाने रचला इतिहास

0

 

मध्यमवर्गीय कुटुंबातील संकेत वाघे या २५ वर्षिय युवकाने 2021 केंद्रिय सेवा आयोगाच्या प्रतिष्ठेच्या परीक्षे मध्ये २६६ वे स्थान मिळविल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संकेत चे बालपणापासुन बारावी पर्यंतचे शिक्षण हिंगणघाट येथेच झाले. वर्ग 1ते 5 रत्न विद्यानिकेतन मधून केले, वर्ग 5 ते 10 महेश ज्ञानपीठ मधून शिक्षण केले, वर्ग 11 ते 12 वी सायन्स मोहता शाळेतून केले ,12 वि नंतर नागपूर येथील विवेकानंद विद्यार्थी भवन रामकृष्ण मठ रहिवासातून स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रभाव व त्यातून देश सेवा अध्यात्म याचे भान म्हणून UPSC चा निर्णय घेतला, बारावीनंतर पूर्ण शिक्षण स्वतःच्या भरोशावर स्कॉलरशिप व खाजगी नोकरी करून शिक्षण घेतले,B,S,C सायंसची पदवी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नागपुर 2013 ते 2016 या दरम्यान घेतली.
एम.एससी. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नागपुर येथे 2016 ते 2018 घेतले. संकेतला मठाचा व मित्रांचा खूप साथ मिळाला कोणतीही शिकवणी न लावता स्वतःच अभ्यास केला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 93 व्या वर्धापनदिनी बेस्ट स्टुडंट पुरस्कार मिळाला, 2018 साली पुण्याला ज्ञान प्रबोधिनी येथे केंद्रीय प्रवेश परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली, नंतर पुण्यात खाजगी शिक्षक म्हणून कार्य केले.
संकेतचे वडील बळवंत यादवराव वाघे यांचे हिंगणघाट येथे किराणा दुकानाचा व्यवसाय असुन आई शीला गृहिणी, भाऊ स्वप्निल वाघे बँक कर्मचारी व शिक्षक आहे.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

नवारेडा शेत शिवायात विज पडून दहा वर्ष रूद्राक्ष अखंडे याचा दूर्देर्वी मृत्यू तर महीला व मूलगी गंभिर अवस्थेत जखमी

0

 

उषा पानसरे मूख्य कार्यकारी सपादक

चिखलदरा परिसरात वादळी वार्‍यासह ठिक ठिकानी काही भागात विजेच्या गडगडाटा सह पाउस चालू !नवारेडा ( उपातखेडा परसापूर जवळ ) दूपारी एक वाजता गावातील शेतकरी महीला मूलासह खादान परिसर डोगंराकडे शेतात गेली असताना सौ.शेवंती अखडे वय 40 कूमारी किर्ती सूरेश एखंडे वय 11 हे विज अंगावर पडल्याने गंभिर जखमी झाले तर त्याचांनउ वर्षीय मूलगाद्राक्ष अखंडे हा जागीच मृत्यू पावला नवाखेड मध्ये दूःखाची वातावण पसरले असुन गरिब कूटूंब आहे शेती लागवडीच्या पध्दती करत होते त्या शेतीच्या पिकाच्या रखवाली करिता मशागतीसाठी शेतात गेल्याने त्याच्यावर काळाच्या घाला घालून अंगावर पडलेल्या विजे मूळे शेतकरी शेतमजूराना जिव गमावावा लागला या आदीवासी कूटूंबावर दूःखाचा डोगंर कोसळला असून त्याना पूढील उपचारासाठी उप जिल्हा रूग्णालय अचलपूर येथे हलविण्यात आले असुन त्याच्यावर उपचार सूरू असल्याचे येथिन शिवसेना कार्यकर्ते कूशल गायन यानी सांगितले गावावर शोकाकळा पसरली

ग्रामपंचायतील ग्राम रोजगार सेवक ग्रामपंचायतीत कायमस्वरूपी सेवेत घ्या; ग्रामरोजगार सेवा संघटनेचे यावल तहसीलदारांना व गट विकास अधिकारी यांना निवेदन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

राज्यातील ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवकांना ग्रामपंचायतमध्ये कायमस्वरूपी सेवेत घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवा संघाच्या वतीने यावल तहसीलदार आर. के. पवार यांना आज शुक्रवार २४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवकांची २८ हजार १४४ एवढी संख्या आहे. शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत ग्रामसभेतून ग्राम रोजगार सेवकांची ग्रामसभेद्वारे नियुक्ती केले आहे. त्यानुसार राज्यात २००६ पासून आतापर्यंत २८ हजार १४४ रोजगार सेवक शासनाच्या प्रशासकीय खर्चात यांच्या निधीतून ६ टक्के मानधनावर काम करत आहे. गेल्या १५ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर ग्राम रोजगार सेवक म्हणून काम करतात. प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत पॅनेलच्या माध्यमातून नवीन ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांची निवड होते. पण राज्यात बरेच ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाल्यावर सूडबुद्धीने ग्राम रोजगार सेवकांवर खोट्या प्रोसिडिंगद्वारे कामावरून कमी करून जाणीवपूर्वक अन्याय केला जातो. त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून ग्रामरोजगार सेवकांना मानसिक मानसिक त्रास होऊन अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे ग्रामरोजगार सेवकांना ग्रामपंचायत म्हणजे कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे, ही मागणी मान्य न झाल्यास राज्यातील सर्व ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवक २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सर्व तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला आहे.

या निवेदनावर खुशाल पाटील, बाळू तायडे, दिपक कोळी, ईश्वर अडकमोल, अनिल ढाके, लुकमान तडवी, कैलास सोळंकी, राजेंद्र पाटील, ईश्वर सपकाळे, मेहमूद तडवी, सर्फराज तडवी, घनश्याम पाटील, मेहरबान तडवी, विजय सपकाळे, अल्लाउद्दीन तडवी, अनिल अडकमोल यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

लासुरा बु येथे भक्तविजय ग्रंथांची सांगता

0

l

शेगाव तालुक्यातील ग्राम लासुरा बुद्रुक येथे मागील काही दिवसापासून
श्रावण मासानिमीत्य भक्तीविजय ग्रंथांचे आयोजन करण्यात आले होते ते श्रवण करण्यासाठी गावातील प्रचंड भाविक येत होते त्या अनुषंगाने आज 23 सप्टेंबर रोजी या भक्ती ग्रंथाची सांगता करण्यात आली यावेळी ग्रंथाचे आयोजन रवि पाटील , ग्रंथ वाचक शिवाजी जवंजाळ, ग्रंथ विशेषक हरिभक्त परायण जानरावजी महाराज गावचे सरपंच अरविंद आवारे निरंजन जवंजाळ सुधाकर पाटीलसुरेश भाऊ मोरखडे आधी भाविक उपस्थित होते, यावेळी गावातील सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असे आमचे प्रतिनिधी आनंद जवंजाळ यांना ग्रंथ आयोजकांनी माहिती दिली .
जनतोध्दार शेगाव प्रतिनिधी आनंद जवंजाळ

हिंगणघाट डीबि पथकाने मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन आरोपीस केली अटक

0

 

हिंगणघाट दि.24 सप्टेंबर शहरातील तसेच समुद्रपुर येथील मोटरसायकल चोरीप्रकरणी दोन चोरटयांना हिंगणघाट पोलिसांचे डीबी पथकाने अटक केली असून त्यांचेकडून चोरीच्या दोन मोटरसायकली जप्त करण्यात हिंगणघाट पोलिसांना यश मिळाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, शहर पोलिसात अप क्र. 398/2021
कलम 379 भादंवि अन्वये दि. 27 एप्रिल रोजी मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बराच शोध घेऊन अद्यापपावेतो सुगावा लागला नसल्याने सदर चोरीचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे
सोपविण्यात आला होता.
यात डीबी पथकाने शोध घेऊन दोन्ही आरोपीस जेरबंद केले.
सदरच प्रकरणी ठाणेदार संपत चव्हाण यांनी डी.बी. पथकाला सदरचा गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. हिंगणघाट पोलिसांनी सदर गुन्ह्यातील आरोपी व चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा शोध घेतला असता सदर गुन्हयातील आरोपी नामे शेख मोहसीन शेख सलीम(25) रा.हिंगणघाट तसेच इसराईल उर्फ शाहीद रसुल खान पठाण(24) रा. समुद्रपुर या दुक्कलीस ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्यांना इंगा दाखविताच त्यांनी समुद्रपुर येथूनसुद्धा एक मोटरसायकल चोरल्याबाबतची कबुली दिली.
त्यांचेकडुन दोन्ही गुन्हयातील मोटरसायकली जप्त करण्यात आल्या.समुद्रपुर येथील दि. 06 ऑगस्ट रोजी दाखल असलेला
अप क्र. 291/2021 कलम 379 भादंवि चा गुन्हादेखील यावेळी उघडकिस करण्यात आला.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, ठाणेदार संपत
चव्हाण यांचे मार्गदर्शनात डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे,
सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर यांनी केली आहे.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

सम्राट अशोक चौकाच्या पूर्वेकडील सिमेंट कमानीचे काम त्वरित थांबवा भीम नगरातील नागरिकांची मागणी

0

 

अर्जुन कराळे शेगाव प्रतिनिधि

शेगांव : स्थानिक भीम नगरातील आणि सम्राट अशोक नगरातील नागरिकांनी सम्राट अशोक चौकाच्या पूर्वेकडील सिमेंट कमानीचे काम त्वरित थांबवावे याकरिता नगराध्यक्ष शकुंतला ताई यांना निवेदन दिले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की शेगाव शहरातील भीम नगर आणि सम्राट अशोक नगरातील बुद्ध विहार च्या बाजूला नगर परिषद अंतर्गत शहरी रुग्णालयाच्या लगत असलेल्या चौकातील पूर्वेकडील बाजूने नगरपालिका प्रशासनाने खोडसाळपणे जाणीवपूर्वक या ठिकाणी सिमेंट कमानीचे काम सुरू केले आहे. यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकीय फायद्यासाठी हा प्रकार या ठिकाणी घडत असल्याचे भीम नगरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला कळविले आहे.

संबंधित कमानीच्या नावाला या भागातील नागरिकांचा विरोध नसून त्या कमानीचे बांधकाम या ठिकाणी न करता दुसऱ्या उचित ठिकाणी करावी अशी नागरिकांची मागणी आहे.
गुरुवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी भीम नगर येथील युवकांनी प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून सम्राट अशोक चौकातील त्या कमानीला सम्राट अशोक कमान असे नाव देण्यात यावे आणि सद्यपरिस्थितीत सुरू असलेल्या कमानीला दुसऱ्या उचित ठिकाणी हलविण्यात यावे अशी मागणी केली आहे.

दिलेल्या निवेदनावर शितिज निर्वाण, संदेश शेगोकार, दीपक शेगोकार, अजय शेगोकार, अमोल शेगोकार, संदीप खंडेराव, समाधान शेगोकार, संतोष शेगोकार स्वप्नील शेगोकार, राष्ट्रपाल शिरसाठ, अक्षय इंगळे,नागेश वानखडे, विनोद इंगळे, अनिल कांबळे, राहुल मोरे, अतिश सुरवाडे, वैभव निर्वाण, राहुल हेलोडे,विनोद तायडे,सागर हिवराळे यासह आदींच्या सह्या आहेत.