Home Blog Page 401

महागाव येथील पुल समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी वंचितचे जिल्हाध्यक्ष,तालुक्काध्यक्षासहीत १४ ग्रामस्थ बसले शेगाव तहसिल समोर आमरण उपोषणाला.

0

 

शेगाव तालुक्यातील मौजे महागाव येथील बोर्डी नदीवर त्वरीत पुलाची निर्मीती व्हावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकशे,ता.अध्यक्ष दादाराव अंभोरे यांचेसह चौदा गावकरी म.गांधी जयंती पासुन शेगाव तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.दरम्यान शेतकरी संघटनेचे प्रशात डीक्कर, आ.संजय कुटे यांचे शिष्टमंडळ,तसेच जि.प बांधकाम विभागाचे अभियंता बुरुजे साहेब,गुळदे साहेब यांनी भेटी दील्या.
शेगाव तालुक्यातील जवळा या गावालगत ‘महागाव’ हे एक लहानसे खेडेगाव असुन या गावची लोकसंख्या साडेचारशे-ते पाचशे च्या आसपास आहे. स्वातंत्र्यानंतरही हे खेडे मुलभुत सुविधांपासुन वंचित असुन आतापर्यंत या गावाला साधा पुल सुद्धा नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ अनेक सोयी सुविधापासुन वंचित आहे. दरम्यान नदीतील पुराच्या पाण्यातुन उमेश महादेव डाबेराव हे आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी जिवनावश्यक वस्तुची पोतडी डोक्यावरुन वाहुन नेत असतांना पाय घसरुन अपघात झाला.नागपुर येथे उपचारादरम्यान त्या तरुणाचा मृत्यु होऊन सदर व्यक्तीचे घरातील सदस्य उघड्यावर पडले आहेत. ही गंभीर बाब सोबतच अनेक समस्यांचा पाढा गावकर्‍यांनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकशे,ता.अध्यक्ष दादाराव अंभोरे यांचे समोर वाचला असता. चौकशे यांनी शेगाव तहसिल कार्यालयात पंधरा वीस दिवसापुर्वी पुल प्रश्न मार्गी लावावा यासाठी निवेदन सादर करुन.शासनाकडून योग्य पावले न उचलल्यास गांधी जयंतीपासुन आमरण उपोषणाचा ईशारा दिला होता.शासनाला दिलेल्या निवेदनाप्रमाने जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकशे,ता.अध्यक्ष दादाराव भोजने,विशाल गोविंदा सावदेकर,रविंद्र समाधान वासनकार,सागर बाबुराव डोंगरे, धम्मपाल भास्कर सावदेकर,अरविंद साहेबराव सावदेर,गजानन गणेश बहिर,दिपक केशव सावदेकर,योगेश गजानन कोल्हे,राहुल भिमराव सावदेकर,सचिन गजानन सावदेकर,राजु बाबुराव डोंगरे,केवलसिंग धनसिंग पवार नागोराव अशोक सावदेकर बळीराम सुगदेव कोल्हे.हे आमरण उपोषणाला बसले आहेत. या वेळी वंचितचे जेष्ठ नेते रामकृष्ण रजाने, शरद वसतकार,जिल्हा महासचिव अॅड. अनिल ईखारे,जिल्हा महीलाध्यक्षा विशाखा सावंग,जि.उपाध्यक्ष चंद्रभान कळंबे, जि.उपाध्यक्ष मनोहर सनगाळे मामा, जळगाव जा. तालुक्का अध्यक्ष संतोष गवई सर,मोहन पाटील,प्रकाश गवई,कैलाश दाभाडे, ता.महासचिव शिवाजी गुरव,प्रमोद भारती, समाधान खंडेराव, नगरसेविका प्रितीताई शेगोकार, तालुक्काध्यक्षा मनोरमा सावदेकर शहराध्यक्षा संगीता ससाने ,उदय सुरवाडे ता. प्रसिद्धी प्रमुख पंडीत परघरमोर यांचेसह शेकडो महिला पुरुष ग्रामस्थासह वंचित बहुजन आघाडीच्या असंख्यकांची उपस्थीती होती.

अर्थसत्तेचे ‘लक्ष्य’ गाठण्यासाठीच म.से.सं.ने स्थापन केली ‘जिजाऊ बँक’!

0

 

उषा पानसरे  कार्यकारी संपादक .
मो.9921400542

अमरावती : ‘जिजाऊ बँक’ ही केवळ मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲड.पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संकल्पनेतून स्थापन करण्यात आली असून, सर्वसामान्य व मुख्य सामाजिक प्रवाहाबाहेरील घटकांना अर्थसत्तेत आपले स्थान निश्चित करण्याचे त्यामागील उद्दिष्ट आहे; असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे महासचिव इंजि.मधुकर मेहकरे यांनी केले. मराठा सेवा संघाच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते.

गुरुवारी मराठा सेवा संघाच्या सर्व कक्षांची आढावा बैठक जिजाऊ प्रतिष्ठान, मराठा नगरी, रहाटगाव येथील इंजि.सचिन चौधरी सभागृहात संपन्न झाली. यावेळी मराठा सेवा संघाच्या सर्व कक्षप्रमुखांसह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी मराठा सेवा संघाचे महासचिव मधुकर मेहकरे यांनी संवाद साधला. यावेळी संघटनेच्या मागील दोन वर्षांचा आढावा मांडण्यात आला. याप्रसंगी मेहकरे यांनी प्रामुख्याने जिजाऊ बँकेच्या कामकाजासंबंधी सूचना केल्या. ते म्हणाले, की पुरुषोत्तम खेडेकर यांनी पुढाकार घेऊन ‘जिजाऊ बँक’ स्थापन केली. सर्वसामान्य बहुजनांना अर्थसत्तेकडे नेण्याचा त्यामागील एकमेव उद्देश आहे. त्यामुळे बँकेचा कारभार सुरळीत व व्यवस्थित चालावा, अशा सूचना जिजाऊ बँकेच्या संचालकांना त्यांनी यावेळी दिल्या. आढावा बैठकीला मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष इंजि.अरविंद गावंडे, मराठा उद्योजक कक्षाचे राज्याचे सचिव शिवाजीराव झोंबाडे, जिजाऊ ब्रिगेड चे राज्य पदाधिकारी कीर्ती माला चौधरी , सीमा ताई बोके जिल्हा अध्यक्ष, मनाली तायडे .मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अश्विन चौधरी, जिल्हा सचिव संजय ठाकरे, जिल्हा प्रवक्ता चंद्रकांत मोहिते, संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेचे जिल्हाध्यक्ष भोजराज चौधरी, शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रभाकर झोड, जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शुभम शेरकर, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे डॉ.तुषार देशमुख, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निलंगा येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत

0

दगडू पिंगळे निलंगा/प्रतिनिधी

निलंगा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने शनिवारी दौऱ्यावर असलेले राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने काँग्रेस कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात केले यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, प्रदेश काँग्रेस सचिव अभय साळुंके, प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया सरचिटणीस हरिराम कुलकर्णी,जिल्हा बँकेचे संचालक संभाजी सुळ, निलंगा तालुका काँग्रेस अध्यक्ष विजयकुमार पाटील, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मधुकरराव पाटील, शहर निलंगा काँग्रेसचे अध्यक्ष
गोविंद शिंगाडे सतिश पाटील वडगावकर, शिरूर अनंतपाळ तालुका अध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, संजय बिराजदार, पंकज शेळके, हमीद शेख काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

साई क्रिटीकेअर हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ

0

दगडू पिंगळे निलंगा/प्रतिनिधी:

आज निलंगा येथे सकाळी 10.30 वाजता साई क्रिटीकेअर हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर (सहअध्यक्ष विट्ठल-रुक्मिणी समिती, पंढरपूर)यांच्या अध्यक्षतेखाली सहकारमहर्षी मा.दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी मा. अशोकराव पाटील निलंगेकर(सरचिटणीस काँग्रेस कमिटी महाराष्ट्र),मा. अभयदादा सोळुंके(सचिव प्रदेश काँग्रेस कमिटी महाराष्ट्र),डॉ. हनुमंत किणीकर(न्यूरॉसर्जन सह्याद्री हॉस्पिटल लातूर),मा.लिंबनमहाराज रेशमे(सदस्य लातूर जिल्हा नियोजन समिती),सौ. शोभा जाधव(उपविभागीय अधिकारी निलंगा) निलंगा तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील प्रतिष्ठित नागरिक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते इत्यादी उपस्थित होते.

यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांची नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे बदली झाल्याने त्यांचा कौटुंबिक स्वरूपात निरोप देण्यात आला.

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

यावेळी डॉ. निलेश पाटील यांनी सांगितले की, कोरोनासारख्या महामारी संसर्गाच्या संकटात पंचायत समितीच्या माझ्या सर्व सहकारी अधिकारी व कर्मचारी यांनी कुटुंब प्रमुख म्हणुन दिलेली प्रत्येक शासकीय कार्यात साथ ही माझासाठी महत्वाची होती. पुढील शासकीय सेवेकरीता आयुष्यात प्रेरणादायी ठरणार आहे, असे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी सांगितले.

यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणुन डॉ निलेश पाटील हे मागील दोन वर्षापासुन कार्यरत होते. दरम्यान तत्काकालीन गटविकास अधिकारी म्हणुन यावल येथे सेवेत असलेले वाय.पी. सपकाळे यांची अचानक बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर बऱ्याच दिवसापर्यंत कायमस्वरूपी गटविकास अधिकारी मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर ग्रामीण क्षेत्राच्या विकासाचे कार्य मंदावले होते. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणुन डॉ. निलेश पाटील यांनी यावल पंचायत समितीची सुत्रे स्विकारल्या नंतर विकासाच्या प्रलंबित कामांना गती मिळाली होती.

याप्रसंगी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, गटशिक्षणाधिकारी नईम शेख, कृषी अधिकारी डी.पी. कोते, कृषी विस्तार अधिकारी धिरज हिवराळे शाखा अभियंता, इंगळे साहेब. विजतंत्री अधिकारी आर. पी. देशमुख, कार्यालयीन कक्ष अधिकारी सरवर तडवी यांच्यासह ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष रुबाब तडवी, ग्रामसेवक हितेंद्र महाजन,राजू तडवी. रविंद्र बाविस्कर, मजीत तडवी, कार्यालयीन कर्मचारी मिलींद कुरकुरे, अझहरोद्दीन फारूकी, जावेद तडवी,चैतन चौधरी.आदी कार्यक्रमास उपस्थित होते .

प्रेरणा वस्ती स्थर संघाकडून दिनेश वर्मा विरोधात निवेदन

0

 

आज दिनांक 1 ऑक्टोबर 2021 ला प्रेरणा वस्ती स्तर संस्था व शहर स्तरीय संघ च्या वतीने उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, ठाणेदार यांना दिनेश वर्मा नावाच्या व्यक्तीने संस्थेत व सदस्यांच्या घरी जाऊन धमकवण्याच्या प्रकरणी निवेदन देण्यात आले.
प्रेरणा वस्ती स्तर संस्था रामनगर वॉर्ड हिंगणघाट येथे गटाच्या माध्यमातून बेघर व वृद्ध लोकांना सेवा दिली जाते परंतु काही दिवसांपासून दिनेश वर्मा नावाच्या व्यक्तीकडून वृत्तपत्रांमध्ये खोट्या बातम्या देऊन प्रत्यक्ष चालकांना धमकावून मानसिक त्रास देण्यात येत आहे मुख्याधिकारी नगर परिषद यांच्या नियमानुसार निवाऱ्याचा सर्व आर्थिक व्यवहार हा नगर परिषदेला दिलेली आहे , तरी निवाऱ्यातील वयोवृद्ध लोकांना नाहक त्रास देत निवाऱ्यामध्ये रात्री बेरात्री पुरुषांना आणणे व महिला चालकांना फोन करून उद्धट भाषेत बोलुन मानसिक त्रास देण्याचा पराक्रम दिनेश वर्मा या समाजकंटकाने केला आहे . स्वतःला सामाजिक कार्यकर्ता समजणारा दिनेश वर्मा, प्रेरणा वस्ती स्तर संस्थांचे अध्यक्ष व सभासद यांच्या निवास स्थानी जाऊन अभद्र व गलिच्छ वागणूक दिल्या प्रकरणी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे तक्रार दिली तसेच मुख्याधिकारी नगरपालिका, उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय हिंगणघाट येथे निवेदन सादर करण्यात आले व कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी निर्मला भोंगाडे सचिव, शारदा भाले अध्यक्ष, प्रज्ञा नगराळे उपाध्यक्ष, विना बडे, अर्चना दुरबुडे ,चंद्रकला राऊत ,मंजू खानखुरे ,अनु मानकर, वर्षा लांजेवार शक्ती शहर स्तर संघ अध्यक्षा, सविता गायमुखे, मंगला कावळे, वैशाली कावळे,उषा कडू, सुकेशनी मुन, रेखा मुंजमवार, पुष्पा ठाकरे,जयश्री मेंडूले, शांता दुर्गे, शिला बोरकर, सिमा मेश्राम, सिंधू दखणे,राजश्री बाम्बोडे,शिला राजूरकर, संगीता भाजीखाये,दीपाली सुरकार कल्याणी इटनकर, माया फुलकर, भगत, रेडलावार इत्यादि सदस्य गण व विविध सामाजिक संघटना चे पदाधिकारी उपस्थित होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

बोडखा येथे विनापरवानगी सुरू असलेला एचडीपीई पाईपचा प्लांटबंद करा

0

 

दोन वर्षापासून बोडखा गावातील ठाकरे नामक ठिबक स्प्रिंकलर विक्रेता विनापरवानगी एचडीपीई पाईप चा प्लांट चालवत आहे त्यामुळे विनापरवानगी सुरू असलेला हा प्लांट तात्काळ बंद करण्यात यावा याकरिता बोडखा गावातील पत्रकारअमोल ठाकरे व तालुक्यातील नागरिकांनी प्रभारी तालुका कृषी अधिकारी गवई यांनाशुक्रवार 24 सप्टेंबर रोजीलेखी तक्रार दिली

सदर दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की बोडखा गावात रहदारीच्या ठिकाणी ठिबक स्पिंकलर विक्रेता ठाकरे यांच्या जागेत विनापरवानगी एचडीपी पाईप बनविण्याचा प्लांट सुरू आहे ठिबक स्पिंकलर पाईप बनविण्याचा प्लांट अनधिकृतरित्या बोडखा गावामध्ये कुठलीही परवानगी न घेता सुरू आहे तसेच हा प्लांट सुरू करताना गावातील आजूबाजूंच्या स्थानिक नागरिकांची ना हरकत घेतली आहे का सदर ठिकाणी जो अवैधरीत्या जो प्लांट सुरू आहे त्या ठिकाणी महावितरणचे सी एल मीटर व्यावसायिक मीटर बसविण्यात आले आहे का की घरच्याच डी एल मीटर वर हा नॉनआय एस ओ एच डी पी ई पाईप बनविण्याचा प्लांट सुरू आहे संबंधित प्लांट चालक या सुरू असलेल्या प्लांट चा कर रिटर्न भरतो का जो माल या प्लांट मधून विक्री करण्यात येतो त्याचे बिल ग्राहकांना देतो का सदर प्लांटला कृषी आयुक्त कार्यालयाची परवानगी नसताना हा प्लांट कसा सुरु आहे ज्या ठिकाणी हा प्लांट सुरू आहे त्या ठिकाणी एचडीपी पाईप चे मटेरियल आहे त्यावर सी एम एनंबर आहे का याची सखोल चौकशी करण्यात यावी व अवैधरित्या सुरु असलेला एच डी पी ई पाईपचा प्लांट तात्काळ बंद करण्यात यावा अशी तक्रार अमोल ठाकरे एकनाथ दुतोंडे रवींद्र अवचार यांनी तालुका कृषी अधिकारी गवई यांच्याकडे केली आहे

प्रभारी तालुका कृषी अधिकारी यांना लेखी तक्रार देतांना अमोल ठाकरे आदी

यावल नगर परिषद अतिरिक्त साठवण तलावाच्या भ्रष्ठाचाराची न्यायलयीन चौकशी व्हावी : गटनेते अतुल पाटील यांची मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील नगराध्यक्ष सौ नौशाद तडवी यांनी केलेले अतिरिक्त साठवण तलाव भ्रष्ठाचाराचे आरोप हास्यास्पद असुन त्यावर भारतीय जनता पक्षाने भ्रष्ठाचाराच्या आरोपा विषयाची सखौल माहीती न घेता नगराध्यक्ष यांना दिलेले समर्थन म्हणजे बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना असेच म्हणावे लागेल , अशी प्रतिक्रिया आज यावल येथील नगर परिषदचे गटनेते अतुल पाटील यांनी अतिरिक्त साठवण तलाव भष्ठाचारा विषयी सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभुमीवर घेतलेल्या पत्रकार परिषरेत व्यक्त करण्यात आली . यावल नगर परिषदच्या माध्यमातुन शहराला येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याची उणीव भासु नये या दृष्टीकोणातुन सत्ताधारी गटाचे गटनेते तथा नगरसेवक अतुल पाटील यांच्या मार्गदर्शन व नेतत्वाखाली नगराध्यक्ष सौ . नौशाद मुबारक तडवी व त्यांच्या सहकारी सर्व नगरसेवकांनी मिळुन विकासाचा विधायक दृष्टीकोण समोर ठेवुन गावाला येणाऱ्या कालखंडामध्ये मुबलक पाणीपुरवठा व्हावा याकरीता सर्यतीचे पर्यंत करून नगर परिषदला सुमारे १ कोटी ७६ लक्ष रुपयांचे अतिरिक्त साठवण तलावास मंजुरी मिळवली व सदरचे काम पुर्णत्वास आले असता, चार दिवसापुर्वी नगराध्यक्ष सौ . नौशाद मुबारक तडवी व त्यांच्यासह चार नगरसेवकांनी जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्याकडे सदरचे साठवण तलावाच्या कामात मोठा भ्रष्ठाचार करण्यात आल्याची लिखित तक्रार केली असुन , याविषयाला आता राजकीय वळ्ण मिळाले असुन , काल भारतीय जनता पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद मध्ये या अतिरिक्त साठवण तलावात झालेल्या भ्रष्ठाचाराची चौकशी व्हावी या नगराध्यक्ष यांच्या मागणी समर्थन देण्यात आलेत, याच विषयाला घेवुन आज सकाळी ११ वाजता सत्ताधारी गटातील गटनेते तथा नगरसेवक अतुल पाटील यांनी त्यांच्या गटातील सर्व ११ नगरसेवकांना सोबत घेवुन घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष सौ . नौशाद तडवी यांनी केलेल्या अतिरिक्त साठवण तलावातील उभारणीत झालेल्या कामात भ्रष्टाचारा विषयी गंभीर आरोप लावुन याची तात्काळ चौकशी व्हावी अशी मागणीच जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्याने नगर परिषदच्या वर्तुळात एकच खळबळ उडवुन दिली असुन , याच विषयाला घेवुन अतुल पाटील यांनी आज उपनगराध्यक्ष अभीमन्यु चौधरी , नगरसेवक प्रा . मुकेश येवले , राकेश कोलते , शेख असलम शेख नबी , समिर शेख मोमीन , नगरसेविका सौ . देवयानी धिरज महाजन , सौ .रेखा युवराज चौधरी , सौ . पोर्णीमा राजेन्द्र फालक, शिला श्रीधर सोनवणे , सौ . कल्पना दिलीप वाणी , सौ .रूख्माबाई भालेराव ( महाजन ) यांना सोबत घेवुन , सदरील अतिरिक्त साठवण तलावाच्या उभारणी कामात मोठया प्रमाणात झालेल्या भ्रष्ठाचाराच्या आरोपांना फेटाळुन लावले असुन , नगराध्यक्ष सौ नौशाद तडवी यांच्या संपुर्ण देखरेख व आदेशाव्दारे पुर्णत्वास आलेल्या तलावाची त्यांनीच भ्रष्ठाचार झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करावी हे संपुर्ण विषय हायस्पद तर आहेच पण यातुन यावल शहराच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या नगरसेवकांच्या विश्वासाची प्रतिमा मलीन करण्याचा हा एक प्रकारे राजकीय षड्यंत्र असल्याची माहीती या वेळी पत्रकार परिषद मध्येे देवुन या सर्व प्रकाराची उच्चस्तरिय न्यायलयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी ही आपण जिल्हाधिकारी यांच्या कडे करणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलतांना गटनेते अतुल पाटील यांनी दिली .

अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी पाहणी केली.

0

 

निलंगा/ प्रतिनिधी दगडू पिंगळे

राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी निलंगा तालुक्यातील गौर येथे आज सकाळी वरिष्ठ अधिकारी सहकार्यांसह जाऊन, अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली, ग्रामस्थ, शेतकरी यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना दिलासा दिला .
अपघातग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याच्या परिभाषेत बसणारे हे अभूतपूर्व संकट असल्यामुळे शासन त्या दृष्टीने निश्चितपणे विचार करील अशी ग्वाही दिली. नदीकाठच्या शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी या दृष्टीने विमा कंपन्यांनी कार्यवाही करावी असे निर्देश याप्रसंगी दिले आहेत.

ग्राम सवाद संघटणेची वणी विधानसभा आमदार मा.संजीव रेड्डी बोदकुलवार यांच्या मार्फत ऊर्जा मंत्री मा.नितिनजी राऊत यांणा दिले निवेदन.

0

 

उषा पानसरे
कार्ययकारी    संपादिका
मो.9921400542

मारेगाव :- स्ट्रीट लाईट बिल हे ग्रामपंचायत ने न
भरता हे पूर्वी प्रमाणे प्रशासनानेच भरावे असे मारेगाव तालुक्यातील ग्राम संवाद सरपंच संघटना यांची मागणी आज रोज मंगळवार दि.२८/९/ २०२१ मारेगाव येथील शेतकरी सुविधा केंद्र मारेगाव येथे वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुलवार साहेब यांच्या मार्फत महारस्ट्राचे ऊर्जा मंत्री मा.नितीनजी राऊत साहेब यांना निवेदन देऊन सार्वजनिक स्ट्रीट लाईट बिल हे पूर्वी प्रमाणे प्रशासनाने भरावे असी मागणी ग्राम संवाद सरपंच संघटना मारेगावच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट तालुका सचिव सुरेश लांडे तालुका उपाध्यक्ष यादवराव पांडे सरचिटणीस पांडुरंग नन्नवरे कोषाध्यक्ष जगदीश ठेंगणे सरचिटणीस प्रवीण नाणे विनोद आत्राम रामचंद्र जवदे रविराज चंदणखेडे जनार्धन गाडगे पप्पू विखणकर दिलीप आत्राम गजानन ठाकरे सौ. नीलिमा थेरे प्रेमिला आदेवार सुरेखा चिकराम वैशाली परचाके व आदी सरपंच उपसरपंच उपस्थित होते.