Home Blog Page 402

बेनोडा ता. आर्वी येथील पोलीस पाटील यांच्या गैरवर्तणुकीमुळे होत असलेल्या वारंवार तक्रारीवर न्याय मिळत नसून आनंद वंजारी (माजी सरपंच) यांनी थेट राज्यपाल यांना एक पत्राद्वारे केली न्यायाची मागणी.अन्यथा आत्मदहणाची परवानगी द्या?

0

 

आर्वी तालुका प्रतिनिधी
प्रज्वल यावले

मिळालेल्या माहितीनुसार दि.४/५/२०२१ पासून बेनोडा गावातील पोलीस पाटील गावामध्ये गैरवर्तणुक ,गावामध्ये झगडे लावणे , गावातील शांतता बिघडविणे, व गावामध्ये दहशत करणे,गावामध्ये अवैध धंदयांना प्रोत्साहन देणे व इतर काही भ्रष्टाचाराचे प्रकार घडवीत असल्याबाबत आजपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने व अर्ज देत आलो. परंतु या आमच्या प्रकरणामध्ये कोणतीही दखल घेण्यात आली नाही, तसेच बेनोडा या गावचे पोलीस पाटील हे पद रिक्त करण्यात आले नाही. आनंद वंजारी (माजी सरपंच) तसेच गावातील अनेक ३० ते ४० नागरिकांनी पोलीस पाटील यांच्या होत असलेली गैरवर्तणुक,दबाव तंत्राचा वापर करणे, गावातील शांतता भंग करणे. इत्यादी सर्व बाबतीत तक्रारी केल्या आहेत.
यावर सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा योग्य न्याय मिळत नसल्यामुळे आणि सामान्य सामान्य माणसाचे जगणे मिश्किल झाले असून या पोलीस पाटील पासून गावातील लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे.
करिता या प्रकरणाबाबत वाचा फोडावी, व बोनोडा गावातील जनतेला न्याय मिळवून द्यावा.
न्याय न मिळाल्यास आनंद वंजारी (माजी सरपंच) यांनी संबंधित प्रशासनाकडे मागितली आत्मदहनाची परवानगी.

आ. पडळकर यांच्या वाढदिवसासाठी च्या शुभेच्छा देण्यासाठी निलंगा ते झरे गावाकडे 320Km चा सायकळीवरून केला ध्येयवेडा प्रवास

0

निलंगा/प्रतिनिधी

निलंगा येथील राहत असलेला संदीप दगडोजी वजीर याने आ. पडळकर यांच्या वाढदिवसासाठी च्या शुभेच्छा देण्यासाठी आज सकाळी 08. 00 वाजता निलंगा ते झरे शासकीय विश्राम ग्राहकडे निघाला असता त्या दरम्यान संदीपला त्यांच्या गावातील नागरिकांनी त्यांचा प्रवास सुखाचा अशा शुभेच्छा दिल्या तसेच आ. पडळकर साहेबांनी त्यांना फोन करून विचार पुंस केली आणि काही अडचण आल्यास फोन करण्यास सांगितले अशा प्रकारे सायकलीवरून केला ध्येयवेडा प्रवास

अभाविप वडनेर भोलजी सदस्य ता.नोदनी अभीयानाला सुरवात

0

 

सुनील पवार. नांदुरा. ता.प्र.

नांदुरा तालुक्यातील वडनेर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या वतीने भाग सह सयोजक दिनेश पाचपोर. नगर सयोजक रुतिक पाटिल याची सदस्य ता. नोदनी करून सदस्य ता नोंदणी ला प्रारंभ करण्यात आला या प्रसंगि भाग सह सयोजक दिनेश पाचपोर यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जगातील सर्वात मोठे छात्र संघटन असून गेल्या७५वष्रे पासून सर्व क्षेत्रात योगदान देत आहे अभाविप भारतातच नव्हे तर विदेशात हि आहे आज जवळपास एक करोड अभाविप चे कार्यकरते काम करत आहे असे मत व्यक्त केले तसेच ज्यास्थितजासत विद्यार्थ्यांना सदस्य ता नोंदणी करून अभाविप सोबत राष्ट्रकार्यात सहभागी होनेकरिता आवाहन केले

साई मित्र परिवार व हिंगणघाट शहरवासी यांच्याकडून संकेत वाघे चे जंगी स्वागत

0

 

हिंगणघाट दि.२९
भारतीय लोकसेवा आयोगाच्या २०२० परीक्षेत भारतातून संकेत वाघे याने २६६ वा क्रमांक प्राप्त करीत हिंगणघाट शहराचाच नव्हे तर वर्धा जिल्ह्याचाही गौरव वाढविला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची प्रतिष्ठित समजली जाणारी स्पर्धा परीक्षा पास करुन संकेत वाघे याने मिळविलेल्या नेत्रदीपक यशाने हिंगणघाटकर अत्यंत आनंदी दिसुन येत असून संकेतचे शहरात जंगी स्वागत करण्यात आले.
आज दि.२९ रोजी संकेतच्या स्वागतपर शहरात साई मित्रपरिवार तसेच शहरातील नागरिकांच्यावतीने ढोलताशांच्या गजरात विजयी रैलीचे आयोजन करण्यात आले.
शहरात आगमन होताच सकाळी १० वाजताचे दरम्यान शिवाजी पार्क येथिल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून संकेत बळवंतराव वाघे याची वाजत गाजत मिरवणूक निघाली. या दरम्यान त्याचे अनेक संस्थासंघटनांकडून हारतुरे देऊन अभिनंदन करण्यात आले.
स्थानिक जयस्तंभ चौक येथे संकेत वाघे याचे हस्ते महात्मा गांधी यांचे प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली.
संकेत वाघे याचे शालेय शिक्षण हिंगणघाट येथेच झाले असून पुढील शिक्षण रामकृष्ण मठ येथे राहून घेतले आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

अमरावतीतील युवक व अचलपूरातील युवतीच्या उपस्थितीवरून युवकांचा धुमाकुळ

0

 

उषा पानसरे दि. २९ जि.प्रतिनिधी

परतवाडा शहरातील जयस्तंभ चौक ते गुजरीबाजार या मार्गावरील टेकाडे
कॉम्प्लेक्स येथे ८ ते ९ रुम राहण्यासाठी भाड्याने दिल्या जातात.
या रुमवर अमरावती शहरातील एक युवक व अचलपूर शहरातील एक
युवती दोघेही दुपारी ११ ते १२ च्या सुमारास आले असता काही युवकांना
ही माहिती मिळताच त्यांनी लॉजवर जाऊन काचाचा टीटेबलची तोडफोड
केली असता टेकाडे कॉम्प्लेक्सचे संचालक उज्वल टेकाडे यांनी तत्काळ
पोलिसांना माहिती दिली. पोलिस दाखल होत अमरावती येथील
युवकाला ताब्यात घेतले तर अचलपूरातील ती युवती हल्ला
करणाऱ्या युवकांसोबत निघून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शहरातील मध्यभागी असणाऱ्या टेकाडे कॉम्प्लेक्स मध्ये
लॉज स्वरुपात रूम भाडयाने दिल्या जातात मात्र मिळालेल्या माहितीनुसार या लॉजवर मोठया प्रमाणात युवक
युवतीचे येणे-जाणे असुन या लॉजचा व्यापार देह विक्री करण्यासाठी होत
असल्याचे माहिती पुढे आली. आज एक युवक-युवती या लॉजवर
दिसताच काही युवकांनी यावर आक्षेप आहे

उज्वल टेकाडे लॉजीग नियामावलीचे पालन नाही

टेकाडे कॉम्प्लेक्स मध्ये उज्वल टेकाडे यांनी रूम भाड्याने देत कॉट
प्रमाणे उपलब्ध केलेले आहेत मात्र याकरीता नपप्रशासन व इतर
परवानगी आवश्यक आहे. लॉजींग नियमाचे कुठलेच पालन टेकाडे
यांनी केल्याचे दिसुन येत नाही. विष म्हणजे या ठिकाणी एखादी
घटना झाल्यास राहणाऱ्या लोकांना सुरक्षीत स्थळी बाहेर निघण्यासाठी
योग्य व्यवस्था नाही. त्यातच रजिस्टर नोंदणी केली जात नाही
त्यामुळे या ठिकाणी देह व्यवसाय केल्या जातो असा संशय निर्माण
होणे स्वाभावीक आहे. विद्याथ्याचा समावेश आहे. तर एक
रुम लंबसाठी देण्यात आल्याचे टेकाडे म्हणाले तर या घटनेच्या
अनुषंगाने त्या युवकासोबत असणाऱ्या युवतीने कुठलीच तक्रार
न दिल्याने त्या युवकाला सोडून देण्यात आले आहे. तर टेकाडे यांच्या
विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती
पोलिसांनी दिली.

Rooms Available
देवे आहे

टेकाडे कॉम्प्लेक्सवर कारवाई करतांना ठाणेदार सदानंद मानकर व पोलिस कर्मचारी, अज्ञात युवकांनी केलेली तोडफोड
पोलिसांचे दुर्लक्ष उघड, शहरातील लॉजची तपासणी केव्हा ?
पोलिस यंत्रणेकडुन नेहमी, लॉजींग, हॉटेल आदिंची माहिती घेत चौकशी केली जाते. जेणेकरून लॉजवर मुक्कामी

असणाऱ्या संशयास्पद गुन्हेगारांचा शोध घेतल्या जाऊ शकेल. मात्र या घटनेमुळे पोलिसांचे दुर्लक्ष उघडकीस आले आहे.
कारण टेकाडे कॉम्प्लेक्स मध्ये बराच दिवसापासुन लॉज चालविल्या जात आहे. शहरात अनुचित घटना घटत असतांना
लॉज तपासणी कडे पोलिसांचे दुर्लक्ष गंभीर स्वरूपाचे आहे. कारण काही वर्षापूर्वी अचलपूरातील व्यापायावरील
झालेल्या हल्ल्यात देशी कट्टयाचा वापर करण्यात आला होता त्यातील आरोपी लॉजवर मिळवून आले होते हे विशेष.

नोंदवित उज्वल टेकाडे यांच्या समवेत
वाद घालत तोडफोड केली. या
कॉम्प्लेक्स मधील लॉज
हा
अधिकृतरित्या चालविल्या जात नाही.
त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांच्या

नोंदी घेतल्या जात नाही. केवळ देहविक्रीचा व्यवसाय केल्या जात

शिवाजी चौक ते बँक कॉलनी रोडवरील साचलेल्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त

0

निलंगा/प्रतीनिधी

मागील सततच्या पडलेल्या जोरदार पावसामुळे शिवाजी चौक ते बँक कॉलनी रोडवरती पाणी साचल्यामुळे ये- जा करणाऱ्या नागरीकांना व वाहन चालकाला रोडवरील असलेले खड्डे दिसत नसल्याने त्यांना ये – जा करण्यासाठी या मार्गावरील नागरीकांना व वाहनचालकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
या संदर्भात नगरपालिकेला वारंवार कल्पना देऊन सुद्धा नगरपालिकेने दखल घेतली नसल्यामुळे नागरिकांना व वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

दुकान फोडण्याचा प्रयत्न असफल चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद .

0

 

उषा पानसरे  कार्यकारी संपादक मो.9921400542

कॉम्प्लेक्सच्या गॅलरीत झोपलेल्या इसमाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून दुकान फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना महागाव तालुक्यातील मुडाणा येथे आज (ता.२३)रात्री पावणे तीनच्या सुमारास उघडकीस आली आहे मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार मुडाणा येथे गौळ रोडवर असलेल्या पांडे कॉम्प्लेक्समध्ये द्वारका किराणा ,खुशी बुट हाऊस, भावेश कलेक्शन ही दुकाने आहेत मध्यरात्री नेहमीप्रमाणे कॉम्प्लेस गॅलरीत झोपलेल्या अरविंद भिमटे या इसमाला शटरचा आवाज आल्याने तो खडबडून जागी झाला त्याने अंगावरील ब्लॅंकेट काढून पहिले असता त्याला अज्ञात चोरटे हातात धारदार शस्त्र घेऊन दुकान फोडत असल्याचे निदर्शनास आले .त्यामुळे तिथून पळ काढला त्यातील तिघांनी धारदार शस्त्र घेऊन पाठलाग केला मात्र तोपर्यंत तो अरविंद भिमटे यांनी गावातील काही नागरिकांना घटनेची माहिती दिल्याने आरडाओरड झाली तोपर्यंत चोरटे तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले अज्ञात चोरटे यांची संख्या चार असल्याने सांगण्यात येत आहे घटनेची फिर्याद महागाव पोलिस स्टेशनला देण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .

संजय गांधी निराधार समितीवर सदस्यपदी ग्रामपंचायत सदस्या सौ .योगीता पाटील यांची निवड ग्रामस्थ महीलांनी केले स्वागत

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

 

विरावली येथील रहिवासी छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनच्या सचिव सौ योगिता देवकांत पाटील यांची संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका सदस्यपदी निवड होताच विरावली ग्रामपंचायतीच्या परिवर्तन पॅनलच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य सौ शोभा युवराज पाटील, शकुंतला विजयसिंह पाटील, हमिदा टेनु तडवी व अ‍ॅड.देवकांत बाजीराव पाटील ग्राम पंचायत सदस्य तथा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष यावल यांनी व विरावली ग्रामपंचायत सदस्यांनी व गावातील जेष्ठ महिला कमलाबाई पाटील , प्रतिभा पाटील , कल्पना पाटील ,कृष्णा पाटील आदी नी सौ योगिता देवकांत पाटील यांचा सत्कार करत अभिनंदन केले .
सौ योगिता देवकांत पाटील यांनी
संजय गांधी निराधार योजनत त्यांची मा.जिल्ह्याधिकारी अभिजित जी राऊत साहेब यांनी नियुक्ती केल्या बद्दल मा.ना. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यावल तालुक्यातून विरावली गावाला पहिल्यादाच एका उच्च शिक्षित महिला प्रतिनिधीला च्या नावाला शिफारस केल्याबद्दल यावल -रावेर विधानसभेचे आमदार मा. शिरीष दादा चौधरी व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष शेखर सोपान पाटील यांनी निवड केल्या बद्दल आभार मानत विरावली गावसह परिसरातील तालुक्यातील सर्व निराधार महिला ना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू असे योगिता देवकांत पाटील यांनी सांगितले .यावल तालुक्यातील सर्वसामान्य गोर- गरीब-गरजू निराधार लोकांच्या हिता साठी काम करण्याची जबाबदारी दिल्या बद्दल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील , जळगांव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मा. संदीप भैय्या पाटील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा मुक्ताईनगर विधान सभेचे आमदार चंद्रकांत पाटील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जि प सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मुकेश येवले विधानसभेचे क्षेत्र प्रमुख अनिल साठे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रवींद्र सोनवणे यांचे आभार मानले आहे . सौ योगिता पाटील यांचे नियुक्ती बद्दल विरावली गावसह सह तालुक्यातून सामाजिक व राजकीय क्षेत्रातुन
सौ पाटील यांना मान्यवरांनी अभिनंदन सह पुढील भावी वाटचालीस हार्दीक शुभेच्या दिल्या आहेत .

यावलच्या अतिरिक्त साठवण तलावाच्या कामात पावणे दोन कोटी रुपयाचा भ्रष्टाचार… पाच नगरसेवकांचा आरोप.. जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे तक्रार

0

 

अधिकारी व कंत्राटदारावर कारवाईची मागणी

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील नगरपालिके द्वारा शहरास पाणीपुरवठा करणारा अतिरिक्त साठवण तलाव बांधण्यात आला त्यात कंत्राटदारांनी व अधिकाऱ्यांनी सुमारे पावणे दोन कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचा आरोप खुद नगराध्यक्षा नौशाद तडवी यांचेसह पाच नगरसेवकांनी जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत यांचेकडे सोमवारी निवेदनाद्वारे केला आहे. दोषीवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही निवेदनात केली आहे. नगरपालिकेच्या कामाच्या भ्रष्टाचाराची तक्रार खुद नगराध्यक्षांनी केल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी पूर्वीच्या साठवण तलावा लगतच नगरपालिकेने सुमारे दोन कोटी 84 लाख रुपयाचा अतिरिक्त साठवण तलाव बांधला आहे या कामात संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी सुमारे 1 कोटी 80 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप येथील नगराध्यक्ष तडवी यांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांचेकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे निवेदनात नियोजनबाह्य निविदा काढणे, साठवण तलावाची जागा न मोजता घाईघाईने कामास सुरुवात करणे, अंदाजपत्रकानुसार तसेच आराखड्यानुसार तलावाचे काम न करणे, कामात झालेल्या बदलाची वरीष्ठाकडून मंजुरी घ्यावी अशा सूचना असतानाही तलावाचा आराखडा कमी करून मोठ्या रकमेचा अपहार करणे सोयीचे जावे हे नियोजन बद्ध करण्यात पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी, अभियंता, कंत्राटदार तसेच काही नगरसेवक यांचा समावेश असल्याची ही तक्रारीत नमूद आहे. मस्त
निवेदनात मुख्याधिकारी, अभियंता, कंत्राटदार त्यांच्या जवाबदारीची व तलावाच्या कामाच्या प्रतवारीची चौकशी करून त्यांचेवर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर नगराध्यक्ष नौशाद तडवी, नगरसेवक मनोहर सोनवणे, रजीयाबी गुलाम रसूल, सै. युनुस सै. युसुफ, शे. सईदाबी हारुन , शमशाद बेगम यांच्या सह्या आहेत.

यावल कला , वाणीज्य व विज्ञान महाविद्यालयात निबंध स्पर्धा संपन्न प्रथम क्रमांक तबस्सुम तडवी व्दीतीय दुर्गा वाघ

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागामार्फत ‘ओझोन दिन’ निमित्त ‘झोन वाचवा -निसर्ग वाचवा’, या विषयावर प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निबंध स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत महाविद्यालयातील एकुण १८ विद्यार्थी स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला.

यात प्रथम क्रमांक – तबस्सुम रज्‍जाक तडवी (तृतीय वर्ष कला), द्वितीय -दुर्गा अशोक वाघ (तृतीय वर्ष विज्ञान), तर तृतीय हेमांशू महेंद्र नेवे (तृतीय वर्ष वाणिज्य) क्रमांक मिळवून स्पर्धेत यश मिळवले.

तसेच उत्तेजनार्थ म्हणून तडवी अंजुम छबु (द्वितीय वर्ष कला) व रविंद्र वसंत कोळी(द्वितीय वर्ष कला) यांची निवड करण्यात आली. ह्या स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा. ए पी पाटील, डॉ. सौ. सुधा खराटे, डॉ. एच जी भंगाळे, प्रा. एस. आर. गायकवाड, मिलिंद बोरघडे यांनी केले. परीक्षक म्हणून प्रा. डॉ. एस. पी. कापडे व प्रा. डॉ. पी.व्ही.पावरा यांनी काम पाहिले. या निबंध स्पर्धेचे आयोजन रसायन शास्त्र विभाग प्रमुख प्रा. आर. डी. पवार यांनी केले. यशस्वीतेसाठी श्री प्रमोद कदम, अनिल पाटील, संतोष ठाकूर यांनी परिश्रम घेतले.