Home Blog Page 403

संजय गांधी निराधार समितीच्या यावलच्याअध्यक्षपदी शेखर पाटील यांची निवड करण्यात आली आहे

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील सौखेडासिम येथील सामाजीक कार्यकर्ते तथा यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांची संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे . दरम्यान त्यांची निवड संदर्भात यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी तथा चोपडा यावल मतदारसंघाच्या आमदार सौ लताताई सोनवणे यांनी नामनिर्दशीत केलेल्या पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपन पाटील यांच्या नांवाला जळगाव जिल्हाचे महा विकास आघाडीचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना . गुलाबराव पाटील यांच्या शिफारसीने जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांनी त्यांची संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी निवडीचे आदेश पारीत केले आहे . दरम्यान या समितीच्या ईतर समितीचे सदस्यांमध्ये राजु अरमान तडवी , सौ . योगिता देवकांत पाटील , ( रा .विरावली ता . यावल )ज्ञानेश्वर श्रीधर बऱ्हाटे, तुषार (उर्फ मुन्ना ) पाटील ( विरावली ता . यावल ) दिनकर सिताराम पाटील ( दोणगाव ता . यावल ), नितिन काशीनाथ महाजन, सैय्यद जावेद अली अहमद महमंद अली ( मारूळ ता . यावल ) ,संदीप प्रभाकर सोनवणे ( वढोदे ता . यावल ), सुभाष गेंदा साळुंके ( चिंचोली ता . यावल ) तर शासकीय प्रतिनिधी म्हणुन तहसीलदार महेश पवार तथा गटविकास अधिकारी राहणार असुन , शेखर पाटील यांची निवड झाल्या बद्दल आमदार शिरीष चौधरी , जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील , यावल तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर नारायण सोनवणे , धंनजय शिरीष चौधरी , यावल पंचायत समितीचे उपसभापती योगेश भंगाळे ,काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान ,हाजी गफ्फार शाह, मारूळ चे जिया सर , कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल, ग्रामीण कॉंग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील पटेल , अभय महाजन , धिरज कुरकुरे, उमेश जावळे , राजु करांडे, विक्की पाटील ,

कृषी विद्यार्थिनींनी दिली शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी ॲपची माहिती.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

चामोर्शी: दिनांक २८,शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या पिकाची नोंद आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करण्यासाठी शासनाने ई-पीक पाहणी हे मोबाईलवरील ॲप विकसित केले आहे. शेतकर्‍यांच्या सातबारावर त्यांनी पेरलेल्या पिकांची नोंद असणे आवश्यक असते. शेतक-यांच्या सातबारावर पिकांची नोंद घेण्यास होणारा विलंब किंवा चुकीच्या पिकाची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यास हे ॲप उपयुक्त ठरणार आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्या माध्यमातून
केवळ रामजी हरडे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी साक्षी वांढरे,लोचना कोटांगले व पायल मुनगेलवार यांनी नाचणगाव (देवळी) येथील शेतकरी रामदास बारसागडे, जीवनदास सोनटक्के, मनोज बारसागडे, धनराज लटारे, मुखरू येग्गावार, मनोहर कोहळे व एकनाथ कोठारे इत्यादी. शेतकऱ्यांना ई पीक पाहणी अँप वर पिक पेरा कसा भरायचा व ई-पीक पाहणी चे फायदे समजावून दिले. एका मोबाईल वरून २० शेतकऱ्यांच्या पिकांची नोंद घेता येते. पीक पाहणी अँप शेतकऱ्यांना उपयोगात आणण्यासाठी अतिशय सोपे आहे. शेतकरी कधीही त्यांच्या खरीप व रब्बी पिकांची नोंद ठेवू शकतो.

वार्ड नंबर 1 मध्ये ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जामोद

सूनगाव मधील वॉर्ड 1 मधील नागरिकांनी वेळोवेळी ग्रामपंचायत येथे निवेदन देऊनही वॉर्ड नंबर 1 मधील ग्रामपंचायत समोरील रस्ता बांधकामाबाबत ग्रामपंचायत ला येथील नागरिकांनी वेळोवेळी निवेदन दिले आहे परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने त्यावर कोणतीच दखल घेतली नाही या रोडची अवस्था ही फार बिकट झाली आहे सांडपाण्याच्या नाल्या ची व्यवस्था येथे केलेली दिसत नाही व पावसाचे पाणी या रोडवर साचत आहे हा रस्ता अर्ध्यावरच कॉंक्रिटीकरण केलेला आहे

व त्यावर सुद्धा पावसाचे पाणी साचलेले आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी उतरून घरात साचत आहे अशीच परिस्थिती वॉर्ड नंबर एक मधील धावळे यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी साचलेले आहे व त्यांनी ग्रामपंचायत ला वेळोवेळी सांगून सुद्धा कोणत्याच प्रकारची सांडपाण्याची व्यवस्था केलेली नाही तरी ग्रामपंचायत ही जाणीवपूर्वक वार्ड नंबर 1 मध्ये दुर्लक्ष करीत आहे असा येथील नागरिकांचा आरोप आहे व ग्रामपंचायत प्रशासनाने येथील सांडपाण्याची व पावसाच्या पाण्याची नाली बांधकाम करून व्यवस्था करावी व रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली

ए . बी ग्रुप द्वारा ७. ए. साईट फुटबाॅल सामने .

0

 

 

हिंगणघाट दि.२८ स्थानिक ए .बी .ग्रुपच्यावतीने
दि २५,२६,२७ सेप्टेंबर दरम्यान फुटबाॅल टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले.शहरातील टाका ग्राउंड येथे सदर टूर्नामेंटचे आयोजित करण्यात आले होते. शहरातील सामाजिक कार्यकर्ते मलक यासीन यांच्या अध्यक्षते खाली सदर टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले.
स्थानिक ए.बी. ग्रुपची संचालक मानसिंग किटे यांच्या हस्ते प्रथम बक्षीस ११ हजार रुपये व शील्ड. F . C. ब्लुज वर्धा यांना देण्यात आले.
मलक यासीन यांच्या शुभहस्ते दुसरे बक्षीस ७ हजार व शिल्ड फ्रेंन्डस क्लब हिंगणघाट यांना देण्यात आले. तीसरे बक्षीस पत्रकार इकबाल पहेलवान यांचे हस्ते ५ हजार रुपये व शील्ड स्थानिक ए. बी .ग्रुप ला देण्यात आले .या कार्यक्रमाचे संचालन नदीम शेख यांनी केले.
स्पर्धेच्या यशस्वितेसाठी शेख शरीफ, एजाज ,नावेद, शाहरूख, परवेझ,मुख्तार ,राहील शेख अहेफाज खान ,इत्यादिनी सहकार्य केले.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

वर्धा जिल्ह्याचे भावी नेतृत्व अशोक शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशांत राऊत मित्रपरिवार कडून वाढदिवसाचा जन्मोत्सव

0

 

हिंगणघाट विधानसभेचे सर्वाधिक लोकप्रिय नेते माजी राज्यमंत्री, अशोक भाऊ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. ईश्वराकडे
तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्याची कामना करतो. शिंदेच्या रुपात वर्धा जिल्ह्याला सशक्त आणि निर्णायक नेतृत्व मिळालंय. असं ज्ञानेश्वर राऊत यांनी आयोजित शिंदेंच्या जन्मोत्सव सोहळ्यात म्हणाले. काही दशकांपासून आपल्या हक्कांपासून वंचित असलेल्या शेकडोवधी गरिबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडून केवळ त्यांना समाजात सन्माननीय स्थान मिळवून दिलं तसेच एका प्रजावत्सल नेतृत्वाचं उदाहरण देखील शिंदेंनी महाराष्ट्रासमोर मांडलं’, येवळच काय तर आता नुकताच शिंदे साहेबांचं काँग्रेसमध्ये पदार्पण करून वर्धाजिल्ह्यात सत्ता परिवर्तनाचे वारे वाहू लागले, त्यामुळे जिल्ह्यातून तरूणाईकडून शिंदे साहेबांना 59 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छाचे उधळण बँड पथकासह आतिषबाजी त्यांचा घरासमोर पाहायला मिळाली, या जन्मोत्सवात यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच मान्यवर यासह ज्ञानेश्वर उर्फ प्रशांत एकनाथजी राऊत मित्र परिवार शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

जळगाव जामोद तालुक्यातील तीन छायाचित्रकार सन्मानित

0

 

जळगाव जामोद तालुक्यातील छायाचित्रण व्यवसाया बरोबर सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या तीन छायाचित्रकार व पत्रकाराना कलात्मक योगदान व सेवाभावी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

संदीप भोपळे
संदीप भोपळे

रविवारी दि 26 सप्टेंबर ला मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाना या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या तपोवन भवानी मंदिर येथे संपन्न झालेल्या ‘सोहळा मैत्रीचा क्षण आनंदाचा 2021’ या उपक्रमा अंतर्गत जळगांव जामोद तालुक्यातील प्रसिद्ध पत्रकार व छायाचित्रकार आश्विन राजपूत यांनी जलसंधारण, पर्यावरण, व उंबरदेव ते कुवरदेव ह्या सातपुडातील वन वाचवण्यासाठी केलेले भरीव कार्यासाठी,तर धानोरा महासिध्द येथील ग्रा.पं. सदस्य ,पत्रकार व फोटोग्राफर संदीप भोपळे यांनी कोरोना काळात विविध उपक्रमात, रक्तदान शिबिरात सक्रिय सहभाग ,तसेच जलसंधारण व पर्यावरण जोपासल्याबद्दल , त्याचप्रमाणे मानेगावचे तरुण उपसरपंच, पत्रकार तथा फोटोग्राफर शिवाजी पेसोडे पाटील सामाजिक उपक्रम राबवित ग्रामपंचायत अविरोध निवडूनक करून उपसरपंच बनण्याबद्दल ,व गावातुन अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शिवाजी पाटील

सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असा ह्या पुरस्कार च स्वरूप असून राज्यभरात 44 लोकांना हा सन्मान देण्यात आला
मुक्ताईनगर तालुक्यातील 11 छायाचित्रकार समितीनी हा राज्यस्तरीय सोहळा आयोजित केला होता व महाराष्ट्र मध्यप्रदेश येथून हजारो छायाचित्रकार सह राज्यभरातील फोटो व सिने इंडस्ट्रीतील दिग्गज या कार्यक्रमाला हजर होते.
सुप्रसिद्ध छायाचित्रकार व प्रशिक्षक उदय देसाई सर, मिलिंद देशमुख सर,विनोद देशपांडे सर इत्यादी मान्यवरांनी या पुरस्काराचे वितरण केले .
या तिन्ही छायाचित्रकार व पत्रकारांनी आपले काम सांभाळून सामाजिक भान जपत कार्य केल्याने जळगाव जामोद तालुक्यात तीन पुरस्कार आल्याने सर्वस्तरातून यांचे कौतुक होत आहे.

भगतसिंह जगुन बघा जीवनाचं सोनं झाल्यासारखे वाटेल -अभयसिंह

0

 

२३ व्या वर्षी देशासाठी फासावर जाणारे भगतसिंह,बालपणात काही वर्षाचे असतांना जालियनवाला हत्याकांडात मृत्यूमुखी पडलेल्या भरातवासीयांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांचे रक्त एका बाटलीत भरून आणणारे भगतसिंह,मानवतावाद निर्माण करणारे भगतसिंह,इंग्रजा विरोधात लढता लढता या देशातील आस्तिक वादाला नाकारून पुरोगामी नास्तिकवादाची मुहूर्त मेढ रुजवणारे भगतसिंह आणि आज त्यांच नाव घेणारे आपण खरच त्यांच्या नाव घ्यायच्या लायकीचे आहोत का? हा प्रश्न आपणच आपल्याला विचारावा?
मित्रांनो भगतसिंह यांच्या बलिदानाचा फार फायदा झाला असे मला बिलकुलच वाटत नाही.कारण तसे असते तर आज या देशात मोठ्या प्रमाणात अराजकता माजलेली नसती. देशासाठी फासावर जाणाऱ्या भगतसिंह यांची देशभक्ती कुठे आणि याच देशात राहून निव्वळ स्वतःच्या स्वार्थासाठी भ्रष्टाचार करून खोटं बोलून देश विकण्या पर्यंत धाडस करणारे काही राजकीय पदाधिकारी कुठे,आपल्या भारतवासी बांधवांसाठी स्वतःचा धर्म बाजूला ठेवणारे भगतसिंह कोठे आणि दुसऱ्याच्या धर्माला कनिष्ठ ठरवत वेगवेगळ्या धर्मात धार्मिक वाद निर्माण करणारे कुठे, आझादीही मेरी दुल्हन हैं । म्हणणारे भगतसिंह कोठे आणि याच आझाद भारतात युवती व स्त्रियांवर बलात्कार करणारे कुठे ,अगर इस देश को सुधारणा हैं तो नौजवान कॊ राजनीती मे आना चाहीये। असे म्हणणारे भगतसिंह कोठे आणि आणि रामराहिमच्या आसाराम रामपाल यांच्यावर गुन्हे दाखल होऊन सुध्दा त्यांचे समर्थन करणारे तरुण कोठे, भारताचा विकास व्हावा आणि हा विकास भारत स्वतंत्र झल्याशिवाय शक्य नाही म्हणुन राजकारण बाजूला ठेवून प्रामाणिक पणे लाला लजपतराय यांच्याशी समजूतदार पणा दाखवणारे भगतसिंह कोठे आणि सत्ता भोगणारे प्रचंड खोटं बोलणारे सत्ताधारी व त्यांचा विरोध खंबीरपणे न करता येणारे इतर विरोधी बाकावर बसणारे कोठे,अरे स्वतःचा धर्म लाथाडून ( पगडी आणि केस व दाढी करून) इतिहास रचणारे भगतसिंह कोठे आणि आमच्या प्रत्येकाच्या गावात आणि शहरात आपल्या विविध धर्माच्या स्मशान भुम्या बांधण्यासाठी आग्रही असणारे आपण कुठे, बहिऱ्या सरकारला जाग यावा म्हणून ब्रिटिश असेंबलीत बॉंम्ब स्फोट करणारे भगतसिंह कोठे आणि आणि सरकारचे चुकीचे निर्णय,बंधने,कायदे मुकाट पणे सहन करणारे आपण कोठे, मी नास्तिक का झालो?,हे पुस्तक लिहून पुरोगामी विचारसरणी निर्माण करणारे भगतसिंह कोठे आणि प्रचंड अंधश्रद्धा पाळणारे आपण कोठे.

मित्रांनो अशी हजार उदाहरणे देता येतील भगतसिंह यांच्या देशभक्ती ची आणि आपण याला १००% विरोधाभासाचे जीवन जगत आहोत.देश भक्ती ही देशावर आलेल्या संकटाच्या वेळी वापरणं शिका ना की आपल्याच स्वकीयांच्या जाती पातीच्या माणसाचं भले करण्या साठी.
भावांनो आपण भगतसिंह यांचे एवढे जरी विचार अंगीसात केले तरी आपण हा देश दंगल मुक्त,भ्रष्टाचार मुक्त,अंधश्रद्धा मुक्त,आणि गरिबी मुक्त उभा करू शकतो आणि एवढीच आपल्या तरुण मित्रांकडून भगतसिंह जयंती निमित्त अपेक्षा.

*इन्कलाब जिंदाबाद*

*अभयसिंह*
९४२३७६१९०८

संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने शेतकऱ्यांचा भारत बंद

0

 

 

हिंगणघाट :- संयुक्त किसान मोर्चाचे नेतृत्वात देशातील 500 पेक्षा जास्त संघटना एकत्र येऊन दिल्लीच्या सीमेवर शांततामय मार्गाने केंद्र सरकारने केलेले जुलमी कृषी कायदे रद्द करण्याबाबत आंदोलन करीत आहे. आतापर्यंतचे या आंदोलनात जवळपास 600 हून अधिक शेतकरी हुतात्मे झाले. या सरकारने फक्त शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे केलेले आहे असे नाही तर देशातील 75 टक्के जनतेच्या आयुष्यावर दुष्परिणाम होतील असे विद्यार्थी, कामगार ,बेरोजगार, छोटे व्यापारी, मजदूर यांच्या दैनंदिन आयुष्यावर कुटाराघात करणारे कायदे पाशवी बहुमताच्या जोरावर सभागृहात चर्चा न करता संविधानिक प्रक्रियेला डावलून दांडगाईने बळजबरी संसदेत मंजूर करून घेतलेली आहे. संसदेत पक्षाला मिळालेल्या पाशवी बहुमताच्या जोरावर हे सरकार जनहितविरोधी कायदे करीत आहे निर्णय घेत आहे याचा निषेध म्हणून देशातील विद्यार्थी, कामगार, मजदूर, कर्मचारी अशा सर्व संघटना एकत्र येऊन या सरकारचा विरोध करीत आहे. केंद्रातील भाजप सरकारने सार्वजनिक संपत्तीची विक्री करणारी जनविरोधी निर्णय घेतलेले आहे. पेट्रोल डिझेल व गॅस सिलेंडरच्या झालेल्या प्रचंड दरवाढीने सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. नवीन कामगार कायद्यातील बदलामुळे कामगार देशोधडीला लागले आहे. या सर्व बाबींना विरोध करण्याकरिता संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजी भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे. संयुक्त किसान मोर्चा च्या आंदोलनाला दहा महिने पूर्ण होऊनही या सरकारने शेतकऱ्यांच्या गैरसोईचे कृषी कायदे रद्द केलेले नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या बाता मारणारे हे सरकार स्वामीनाथन आयोगा द्वारे निश्चित केलेले समर्थन मूल्य C2+50 या सूत्राला लागू न करून शेतकऱ्यांच्या शेतमालाला कायद्याचे संरक्षण दिलेले नाही. ” कोंबडा आरवतो फार – पण काही देत नाही” असे हे घोषणांचा रतीब जनतेपुढे मांडत असलेले सरकार शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या जिवावर उठलेले आहे. पाम तेल आयातीचे निर्णयामुळे सोयाबीनचे दर या सरकारने निम्म्यावर आणलेले आहे या सरकारचा आम्ही धिक्कार करतो. संयुक्त किसान मोर्चा द्वारे दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजी भारत बंद चे आयोजन करण्यात आलेले आहे . महाराष्ट्र राज्यातील परिस्थिती व छोटे व्यापारी यांचा विचार केला असता अडचणीत असलेल्या व्यापारी व छोटे दुकानदार व सर्व सामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजी किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ भारत बंदमध्ये सहभागी असल्याचे या निवेदना मार्फत आम्ही जाहीर करतो. संयुक्त किसान मोर्चा ने केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीनुसार तीनही कृषी कायदे रद्द करण्यात यावे व शेतकर्‍यांच्या शेतमालाच्या किमतीला कायद्याचे संरक्षण द्यावे म्हणजे किमान समर्थन मूल्य हा कायदा पारित करावा. असे या शिष्टमंडळाने निवेदन दिले आहेत या शिष्टमंडळाचे नेतृत्व अनिल जवादे यांनी केले त्यांच्या सोबत महेश माकडे, दिनेश वाघ, जयंत धोटे, अजय मुळे, गोपाल मांडवकर, भारत पाटील, जीएस भगत, गोकुल पाटील, राजेंद्र पाटील , रामुजी सोगे इत्यादी संयुक्त किसान मोर्चा चे पदाधिकारी उपस्थित होते.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

चोपडा ब-हाणपूर अंकलेश्वर रस्ता तात्काळ दुरुस्ती करण्यात यावा

0

 

यावल प्रतिनिधी  विकि  वानखेड़े

बऱ्हाणपूर   अंकलेश्वर रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा या मागणीची निवेदन आज सोमवारी पंचायत राज समितीचे अध्यक्ष संजय रायमूलकर यांना जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र सुर्यभान पाटील यांनी दिले आहे.

जळगाव जिल्ह्यात आज दि.27 सप्टेंबर रोजी पंचायत समिती तीन दिवसांसाठी दाखल झाली आहे. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची महत्त्व पूर्ण बैठक आज सकाळी साडेदहा वाजता शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे शिक्षण क्रीडा व आरोग्य सभापती रवींद्र सुर्यभान पाटील यांनी चोपडा बऱ्हाणपूर अंकलेश्वर रस्ता तात्काळ दुरुस्ती करण्यात यावा यासंबंधीचे निवेदन पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार संजय रायमुलकर यांना दिले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की चोपडा बऱ्हाणपूर अंकलेश्वर हा महामार्ग अतिशय महत्त्वाचा आहे.

तसेच मध्यप्रदेश येथे जाण्यासाठी हा मार्ग उपयुक्त सोयीचा आहे.दोन वर्षात रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडलेले आहे. खड्ड्यांमुळे अनेकांचे अपघात होऊन जीव गमावलेला आहे. या रस्त्या तात्काळ नवीन करण्यात यावा अशी आग्रहाची मागणी सभापती रविंद्र पाटील यांनी पंचायत राज समितीचे अध्यक्ष संजय रायमुलकर यांना केली. सोबत जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील होते. पंचायतराज अध्यक्ष रायमूलकर यांनी सांगितले की आपण केलेली मागणी ही जनहिताची असून तात्काळ या मागणीची दखल घेतली जाईल असे आश्वासन दिले.

यासाठी पंचायत राज समिती चे अध्यक्ष संजय रायमुलकर यांना निवेदन

जागतिक फार्मासिस्ट दिनानिमीत्त रेडक्रॉस मेडिसीन बॅंक मार्फत आसराबारी आदीवासी पाडा वड्री येथे औषधीचे वाटप

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

आज जागतिक फार्मासिस्ट दिनानिमीत्त यावल तालुक्यातील कुपोषणग्रस्त बालकाच्या दुदैवी मृत्युमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्वाचे लक्ष वेधणारे आदीवासी आसराबारी पाडा येथे रॅपटाकोस कंपनीमार्फत मिळालेल्या रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीच्या औषधी, प्रोटीन/विटॅमीन पावडर, रक्तवाढीच्या औषधी, इत्यादी औषधीचे वाटप करण्यात आले.
या सामाजीक बांधीलकीच्या माध्यमातुन राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला रेडक्रॉसचे मानद सचिव विनोद बियाणी, वैद्यकिय अधिकारी डाॅ. एस.बी.सोनवणे, जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा, सहाय्यक योगेश सपकाळे, अनवर खान, यावल तालुक्यातील उपकेंद्राचे वैद्यकिय अधिकारी डाॅ. राहूल गजरे उपस्थित होते.
यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेल्या आसराबारी पाडा हे ऊसतोड कामगार राहत असलेले ४०० आदिवासी लोकांची लोकवस्ती आहे. याठिकाणी लहान मुले कुपोषित असल्याचे प्रमाण जास्त आहे. अशा सर्व बालकांना, गर्भवती महिलांना व इतरांना या औषधींचे वाटप डाॅक्टरांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले.
या उपक्रमाला जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. पंकज आशिया, डाॅ. प्रमोद पांढरे, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, रक्तकेंद्र चेअरमन डाॅ. प्रसन्नकुमार रेदासनी, आपत्ती व्यवस्थापन समिती चेअरमन सुभाष सांखला यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच यावलचे रेडक्रॉस स्वयंसेवक सारंग बेहेडे, राहुल पाटील, गोल्डन चव्हाण वड्री गावाचे सरपंच अतुल भालेराव, ग्रां.प्र. सदस्य आर.के. चौधरी सर व सर्व आशा वर्कर्स यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.