Home Blog Page 404

पैशाच्या व्यवहारातून एका महिलेला मानेवर कटरने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न

0

 

हिंगणघाट :- संत तुकडोजी वार्ड सरकारी दवाखान्या जवळ शिवसेना कॉटर येथे काल दिनांक 16. सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वा चे दरम्यान फिर्यादी महिला नामे रंजना मारोतराव मरसकोल्हे वय 37 वर्षे हिने आरोपी रितिक नितिन रघाटाटे वय 21 याचेकडून 75000/- रु उसने घेतले होते ते त्याने परत मागितले असता तिने मजुरीचे काम करून देईन असे म्हटले असता आरोपीने तिला अश्लील शिविगाळ केली व चर्चा करण्यासाठी तिला त्याचे घरी बोलावले.फिर्यादी ही आरोपीचे घरी गेली असता 5.45 ते 6.00वा.चे दरम्यान आरोपीने तिला घरात आल्या आल्या 2-3 थापड मारल्या त्यावेळी घरात हजर असलेले आरोपीचे आईवडील मध्ये गेले असता त्यांना सुद्धा आरोपीने धक्का बुक्की करत घराबाहेर काढले व दरवाजा आतून बंद करून घेऊन फिर्यादीला स्वतः जवळील कटरने मानेच्या डाव्या बाजूवर वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व स्वतः दरवाजा उघडून घराबाहेर येऊन पळून गेला रक्तबंबाळ अवस्थेतील फिर्यादी हिला प्रथम हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथून तिला सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये रेफर केले गेले घटनास्थळी भेट देऊन आरोपीला शोधून ताब्यात घेतले असून यातील फिर्यादी हिचे DD बयान सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतल्यानंतर आज सकाळी 5.35 वा अप क्र 841/21 कलम 307,342,294,323 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे जखमींची प्रकृती स्थिर आहे . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपेश ठाकरे हे करत आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लसीकरणा करिता स्वतंत्र मोहीम राबवा-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ची मागणी

0

 

शेगाव: कोरोना महामारी पासून बचाव करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लसीकरण करिता स्वतंत्र मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडी शेगाव तालुका शाखेतर्फे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांना तहसीलदार शेगाव यांच्या माध्यमातून आज 17 सप्टेंबर रोजी निवेदन पाठविण्यात आले आहे या निवेदनामध्ये कोरोना महामारी ची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्ररीत्या लसीकरण मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर तालुका अध्यक्ष संकेत जगताप उपाध्यक्ष सौरव लांजुळकर संघटक आकाश पुरी सरचिटणीस विठ्ठल तायडे शुभम पांढरे योगेश घोडे मोहन गजघाणे प्रशांत बारगड युवराज चव्हाण यांच्या सह्या आहेत.

हिंगणघाट विधानसभाक्षेत्रात पंतप्रधान मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सेवा समर्पण सप्ताहाचे आयोजन

0

 

17 सप्टेंबर
भारताचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस सेवा समर्पण सप्ताह म्हणून आमदार समीर कुणावर यांच्या कार्यालयात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समीर कुणावर यांनी माननीय प्रधानमंत्री यांनी गेल्या सात वर्षात जनतेची सेवा विविध योजनांच्या माध्यमातून थेट शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचविली तसेच त्यांचे समर्पणाची चर्चा संपूर्ण जगात चर्चिल्या जात आहे अशा महान तपस्वी व्यक्तीच्या वाढदिवसाच्या निमित्त गेल्या सात वर्षात जनधन योजना प्रधानमंत्री आवास योजना उज्वला योजना आयुष्यमान भारत योजना शेतकरी सन्मान योजना मुद्रा योजना यासारख्या अनेक योजनांवर आमदार समीर कुणावर यांनी प्रकाश टाकला तसेच प्रधानमंत्री यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे सर्व जगभर कौतुक होत असल्याचे सांगताना काश्मीरचे 360 कलम असो देश सुरक्षा सोबत कुठलीही तडजोड न करण्याच्या प्रधानमंत्री यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा सेवा समर्पण सप्ताह 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर विधानसभा मतदार संघात साजरा करण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा महामंत्री किशोर दिघे, जिल्हा परिषद गट नेता नितीन मडावी, जिल्हा परिषद सभापती मृणालताई माटे, जिल्हा परिषद सभापती माधवराव चंदनखेडे, भाजयुमो प्रदेश सचिव अंकुश ठाकूर, तालुका अध्यक्ष संजय डेहणे, आकाश पोहाणे, नगराध्यक्ष बबीताताई तूमाने, सभापती शारदाताई आंबटकर, सो सुरेखाताई टिपले, ओम प्रकाश जी राठी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष गंगाधरराव कोल्हे, महिला मोर्चा अध्यक्ष अनिताताई मावळे ,सौ अरुणा ताई हेमके, अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाध्यक्ष बिस्मिल्ला खान,
वामन चंदनखेडे, तुषार आंबटकर, अंकुश खुरपडे ,माजी नगराध्यक्ष गजु राऊत ,शीलाताई सोनारे, बालु इंगोले, सुनील डोंगरे, शहर युवा मोर्चा शहर अध्यक्ष सोनू पांडे, गौरव तांबोळी, किशोर नेवल, शिवाजी आखाडे, योगेश बोंडे, विलास अंबरवेले , रवी रोहणकर, विनोद विटाळे, पंकज देशपांडे, नरेंद्र पोफळे , भाग्येश देशमुख ,स्नेहल करोडे, नितीन वाघ, सुरेश वखरे, मधुकर महाजन सुनील सरोदे, दामू माटे, डॉक्टर विजय पर्वत, भोजराज साठवणे भाजपाचे नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य शक्ती केंद्रप्रमुख सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुभाषजी कुंटेवार यांनी केले. आभार प्रदर्शन आकाश पोहाणे यांनी केले.
सूर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त संतनगरी शेगाव येथे विविध कार्यक्रम संपन्न

0

 

भारताचे लाडके तथा यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्य शहर भाजपातर्फे प्रधान मंत्री घरकुल योजनेत लाभ मिळालेले लाभारथ्री सौ सुरेखा नारायण बावस्कार, श्री विलास शामराव लहाने, श्री केशव पुंडलिक वाढोकर, सौ राजकन्या सुरवाडे या सर्व लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कृषी सन्मान सन्मान योजनेचा लाभ धारक रत्नाकर काठोळे, मोहन लहाने, देविदास पांडे, शेतकरी यांचा सत्कार करण्यात आला, प्रधानमंत्री उज्वल गॅस लाभ धारक महिला संगीता मुरेकर, दादा धांडे या महिलांचा सत्कार करण्यात आला. तरी सदर कार्यक्रमास नगराध्यक्ष सौ शकुंतला ताई बुच, उपनगराध्यक्ष सौ सुषमाताई शेगोकार, गट नेते शरदसेठ अग्रवाल, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे, पांडुरंग बुच, संजय कलोरे, विविध पुरुषोत्तम हाडोळे, नितीन शेगोकार, राजू शेगोकार दीपक ढमाळ, कमलाकर चव्हाण, आघाडी अध्यक्ष तथा सर्व भाजपा बूथ प्रमुख, शक्ती केंद्रा प्रमुख तसेच सर्व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. सूर्या न्यूज मराठी शेगाव तालुका प्रतिनिधी शेगाव अर्जुन कराळे

कोळन्हावी येथे आज जिल्हा परिषद सदस्या सौ . अरूणाताई पाटील यांच्या उपस्थित कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम संपन्न

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

राज्यात कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभुमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क व दक्ष झाली असुन , तालुक्यात मोठया वेगाने लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबविली जात असुन, तालुक्यातील कोळन्हावी येथे आज कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम जिल्हा परिषदच्या सदस्या सौ.अरूणाताई रामदास पाटील व यावल तालुका खरेदी विक्री सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन तथा संचालक आर.जी.नानासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सौ.मंजुषा विकास (गोटु) सोळंके.. (सरपंच) व सरपंचपती व ग्रा.प.सदस्य विकास (गोटु) जगन्नाथ यांच्या प्रयत्नाने आज दिनांक १५/०९/२०२१ वार बुधवार रोजी कोळन्हावी गावासाठी कोविड १९ लसीकरणच्या पहिला डोस १८ वर्षावरील सर्व वयोगट यांनी प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला.
किनगाव प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.मनिषा महाजन यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सौ. उषा पाटील (आरोग्य सहाय्यीका) सौ.सोनल चौधरी (समुदाय आरोग्य अधिकारी )
सौ.मंगला सोनवणे (आरोग्य सेविका)
जिवन सोनवणे ( आरोग्य सेवक)
दिपक तायडे ( आरोग्य सेवक)
चंद्रकांत सपकाळे सौ.जनाबाई ठाकरे (मदतीनीस)श्रीमती.सुनिता सोळंके (आशावर्कर)श्रीमती.रजनी सपकाळे (आशावर्कर)दिपक ज्ञानेश्वर सोळंके (संगणक परिचालक ग्राम पंचामत कोळन्हावी.)राजु सोळंके (शिपाई)
केतन सोळंके (मदतीसाठी)
व अंगणवाडी सेवीका व इतर शिक्षकवृंद या केलेल्या लसीकरणाच्या कार्यक्रमास यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सर्वांचे कोळन्हावीतील ग्रामस्थ मंडळी विशेष आभार मानले .

किनगावच्याI आदीवासी शिक्षिका रझीया तडवी यांना श्री स्वामी समर्थ ग्रुप व मौलाना आझाद फाउंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव येथील नेहरू विद्यालयाच्या शिक्षीका रझिया इतबार तडवी या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत .जळगाव येथे श्री स्वामी समर्थ ग्रुप व मौलाना आझाद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत पुरस्कार वितरण सोहळ्यात रझीया इतबार तडवी यांना २०२१ चे आदर्श सन्मानपत्र प्रदान करण्यात येवुन त्यांचा गौरव करण्यात आला.श्री स्वामी समर्थ गृप व मौलाना आझाद फाऊंडेशन जळगाव यांच्या वतीने रविवार दि.१२ रोजी रतनलाल सी.बाफना गो सेवा अनुसंधान केंन्द्र(गो शाळा)कुसुंबा,जळगाव येथे जिल्हा परिषदच्या अध्यक्ष सौ . रंजनाताई प्रल्हाद पाटील, डॉ . पुनम पाटील , जिल्हा कृषी अधिकारी सौ . मुक्ताताई कोकाटे , जिल्हा क्रिडा अधिकारी सौ . रेखा देविदास पाटील , आयोजक सौ . ज्योती मनोज पाटील ( श्रीस्वामी समर्थ ग्रुपसंचालीका ) मौलाना आझाद फाउंडेशन जळगावच्या समनव्यक बुशरा शेख , सौ . हर्षाली राजीव पाटील , सौ . प्रतिक्षा मनोज पाटील यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थित आयोजीत या कार्येक्रमात रझिया तडवी यांना सन्मांनीत करण्यात आले रझिया तडवी या यावल तालुक्यातील किनगाव बुद्रूकचे उपसरपंच लुकमान कलंदर तडवी यांच्या पत्नी आहेत.रझिया तडवी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे समाज बांधव विद्यालयाचे मुख्याध्यापक पी .एस . गोसावी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह सर्वत्र शिक्षीका रझीया तडवी यांच्या अभीनंदन व कौतुक होत आहे.

नगरपालिका कर्मचाऱ्याला शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी वरून नगरपालिका कर्मचारी संघटना कडून लेखणी बंद आंदोलन

0

 

हिंगणघाट दि.१६ सेप्टेंबर
नगरपालिकेच्या स्वास्थ विभागाची सेवानिवृत्त महिला कर्मचारी तसेच तिच्या मुलाने वेतनाची रक्कम कमी मिळत असल्याच्या दावा करीत पालिकेच्या लेखाविभाग तसेच आस्थापना विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांना शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.
ही घटना काल दि.१५ सेप्टेंबरला घडली असून यावेळी सदर कर्मचारी व मुलगा दारुचे नशेत असल्याचे सांगण्यात येत असून आरोपींवर कारवाई करण्याचे मागणीसाठी आज गुरुवार रोजी
पालिका कर्मचाऱ्यांनी कामबंद आन्दोलन केले.
सदर प्रकरणी संबंधितावर कारवाई व्हावी,अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष प्रेम बसंतांनी तसेच पालिका प्रशासनाकडे केली.
महिला कर्मचारी त्रिवेणी नक्के व पिंकू मारवे यांनी काल दि.१५ व दि.९ रोजी कर्तव्यावरील कर्मचाऱ्याशी सातव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम कमी का काढली असे विचारीत कार्यालयातील कर्मचाऱ्यास अश्लील शिविगाळ केली मारहाण करण्याची धमकीही दिली,यावरून संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्यावतीने आज एक दिवसीय कामबंद आंदोलन सुरुवात केले.
महिला कर्मचारी व तीचा मुलगा यांनी दारुच्या नशेत कार्यालयात धुमाकुळ घातला,नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी यांच्यानावे शिविगाळसुद्धा केली, शासकीय कामात अडथळा निर्माण केला,अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी हिंगणघाट पोलिस ठाण्यातही केली.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

राज्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना महाराष्ट्रातील आगामी निवडणुका पुढे ढकलण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने यावलचे तहसीलदार महेश पवार यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा प्रलंबीत असतांना महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, वाशिम, पालघर, नागपूर येथील निवडणुका राज्यातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे महा विकास आघाडी शासनाच्या नाकर्तेकपणामुळे जाहीर झाल्या आहे. जर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी शासना वेळीच इंपेरिकल डेटा न्यायलयास दिला असता तर आज आमच्या ओबीसी बांधवांनावर निवडणुकीतुन हद्दपार होण्याची वेळ आली नसती पण या शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या महाविकास आघाडी शासनाने जाणुन बुजुन वेळ काढुन घ्याचे होते. म्हणुन त्यांनी न्यायालयात इपेंरिअल डेटा दिला नाही. यामुळे ओबीसी जातीचे आरक्षण संपुष्टात आले. या शासनाने मागासवर्गीय आयोगची नेमणुक करून सुद्धा कोणतीही कार्यवाही केली नाही. याकरीता ओबीसी समाजाच्या वतीने भारतीय जनता पक्षातर्फ जाहीर निषेध करण्यात येत असुन जोपर्यंत ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण लागु होत नाही तो पर्यंत स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घेण्यात येवु नये, असे निवेदन यावलचे तहसीलदार महेश पवार यांना देण्यात आलेल्या आहे.

या निवेदनावर भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे , जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण समिती सभापती रवीन्द्र (उर्फ छोटु ) पाटील , जळगाव जिल्हा सहकारी बँकेचे संचालक गणेश नेहते, कृउबाचे माजी सभापती व संचालक नारायण चौधरी, यावल पंचायत समितीचे उपसभापती योगेश दिलीप भंगाळे, जिल्हा परिषद सदस्या सविता भालेराव, भाजयुवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस राकेश फेगडे, भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी व उज्जैनसिंग राजपुत, बाळासाहेब फेगडे, अतुल भालेराव , भाजपाचे शहराध्यक्ष डॉ. निलेश गडे आदी पदाधीकारी यांच्या स्वाक्षरी आहेत.

यावल येथील शिक्षकाची गळफास घेवून आत्महत्या; पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

शहरातील समर्थ नगरात राहणारे शिक्षक विशाल बाबुराव गवळी (वय-३६) यांनी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज बुधवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल बाबुराव गवळी (वय-३६) रा. दहीवद ता. शिरपूर जि. धुळे ह.मु. स्वामी समर्थ नगर यावल, हे गेल्या १२ वर्षांपासून यावल तालुक्यातील टेंभीकुरण येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. दरम्यान काल मंगळवारी १४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पत्नी आई-वडील व मुलासह जेवण करून रात्री झोपले. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करायचे कारण नेमके कळू शकले नाही. हा प्रकार आज बुधवार १५ सप्टेंबर रोजी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. पतीचा मृतदेह पाहून पत्नीने हंबरडा फोडला होता होता. त्यांचा मृतदेह उतरून यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी डॉ. शुभम तिळके यांनी त्यांचे शवविच्छेदन केले. याप्रकरणी यावल पोलिसांत लखीचंद पवार यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे. त्यांनी पत्नी प्रसुतीसाठी १ महिन्यापुर्वी प्रसुतीसाठी गेल्या होत्या. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि १ महिन्याची मुलगी, सात वर्षाचा मुलगा आहे.

ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी आ.कुणावारांच्या नेतृत्वात आंदोलन.

0

 

हिंगणघाट दि.१५ सप्टेंबर
ओ.बी.सी. समाजाच्या हक्काचे राजकीय आरक्षण tv तत्काळ लागू करण्यात यावे मागणीसाठी आज दि.१५ रोजी भाजपाच्यावतीने विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांचे नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.यावेळी नगरपालिका अध्यक्ष प्रेम बसंतांनी,माजी जि.प.अध्यक्ष नीतिन मडावी, भाजयुमोचे प्रदेश सचिव अंकुश भाऊ ठाकूर, भाजपा जिल्हा महामंत्री किशोर दिघे,पंचायत समिति सभापती सौ.शारदा आंबटकर,
समुद्रपुर प.स.सभापती सौ.सुरेखा टिपले,माजी पंचायत समिति सभापती गंगाधर कोल्हे,भाजपा तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे,संजय डेहणे,आशिष पर्बत इत्यादि पदाधिकारी उपस्थित होते.
आज ११ वाजताचे दरम्यान स्थानिक भाजपा जनसंपर्क कार्यालयातून मोर्चाचे आयोजन करण्यात आले,सदर मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.येथे ओ.बी.सी समाजाला राजकीय आरक्षणापासुन वंचित ठेवणाऱ्या राज्य शासनाचा घोषणाबाजी करीत जोरदार निषेध करण्यात आला.
आमदार समिर कुणावार यांनी तहसील कार्यालयासमोर मोर्चाला संबोधित करतांना ओ.बी.सी. समाजाला राजकीय आरक्षण मिळत नाही तो पर्यंत शासनाने निवडणुका घेवू नये अशी मागणी केली.
याप्रसंगी भाजपाच्यावतीने उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनाले यांचेमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नावे निवेदन देण्यात आले.
सदर आन्दोलनाचेवेळी शंकर मुंजेवार,नगरसेवक राजू कामडी,चंद्रकांत मावळे,सौ.रविला आखाड़े,सौ.शुभांगी डोंगरे,सौ.शारदा पटेल,योगेश फुसे,गणेश उगे,भाजयुमो चे सोनु पांडे , समुद्रपूर चे माजी नगराध्यक्ष गजानन राऊत, जि प सदस्य रोशन चौके, वामनराव चंदनखेडे, पंचायत समिती सदस्य वसंतराव घुमडे, बालू इंगोले, अंकुश खुरपडे ,विनोद विटाळे, सुभाष जी कुंटेवार, भाग्येश देशमुख, कवीश्वर इंगोले, विठु बेनीवार, योगेश बोंडे ,नितीन वाघ, विशाल गौळकर, विक्की राऊत, अमोल चौधरी ,सुनील सरोदे ,अक्षय हरगुडे, सचिन सोनटक्के, पंचायत समिती सदस्य वैशाली ताई पुरके, अरुणा हेमके, प्रतिभा नव्हाते ,शिवाजी आखाडे, नगरसेवक मारुती साठे, अमन काळे, समाजसेवक अमोल खंदार, सुनील डोंगरे, अर्चनाताई मावळे, ज्ञानेश्वर भागवते ,इत्यादिसह शेकडो पक्षकार्यकर्ते उपस्थित होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा