Home Blog Page 405

ओ बी सी राजकीय आरक्षण कायम ठेवण्याबाबत भाजपाचे तहसीलदार यांना निवेदन

0

 

आघाडी शासनाने वेळोवेळी जाहीर केले की ओबीसीचे आरक्षण कायम झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात येणार नाहीत परंतु हे आरक्षण कायम ठेवण्याकरता शासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही. आता न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद पोटनिवडनुका जाहीर झाल्या आहेत तरी निवेदनाद्वारे आम्ही असे आव्हान करतो की, मुलीचे आरक्षणासाठी लागणारा इंपिरियल डाटा लवकरात लवकर तयार करून आरक्षण कायम ठेवावे व नंतरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात यावे अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल त्याची जबाबदारी सर्व शासनाची असेल.असे निवेदन नायब तहसीलदार भागवत साहेब यांच्याकडे देण्यात आले यावेळी नगर परिषद अध्यक्ष शकुंतला शकुंतला ताई पांडुरंग बुच , सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग बुच, विजुभाऊ टिळक, अमित देशमुख भाजपचे सर्व तालुका पदाधिकारी पदाधिकारी उपस्थित होते

वर्धा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील पेट्रोल पंप रद्द करा अनिल जवादे यांची मागणी

0

 

दिनांक 14 सप्टेंबर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी पवार यांची वर्धा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील प्रस्तावित पोलीस वेल्फेअर पेट्रोल पंप तात्काळ हटविण्याबाबत आणि त्या पंपाचे सुरू असलेले काम तात्काळ थांबविण्याबाबत यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी हा पंप तात्काळ थांबविण्याचे आश्वासन श्री अनिल जवादे यांच्या नेतृत्वात असलेल्या शिष्टमंडळाला देण्यात आले. शंकर गव्हाळे, आरती गव्हाळे बारामती यांचे अथक प्रयत्नाने मा शरदचंद्रजी पवार साहेब यांचेशी यशश्वि चर्चा घडुन आली. सोबत भंते शाकू बोधी धम्म झेन मास्टर , भन्ते राजरत्न, भन्ते मिलिंद, भन्ते नंद, महेश माकडे, गोपाल मांडवकर, दिनेश वाघ, चंद्रकांत भोयर,अजय मुळे, संदीप नांदुरकर हे उपस्थित होते
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

यावल बुऱ्हाणपुर अंकलेश्वर राज्य मार्गावरील खड्डेमय रस्ता दुरुस्ती मनसेच्या आंदोलनानंतर दुरूस्ती कामास सुरुवात

0

 

यावल (प्रतिनिधी ) विकी वानखेडे

अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रास्तारोको व श्राद्ध आंदोनलाने उशीरा का होईना जाग आल्याने आज राज्य मार्गावरील खड्डयांचे तात्पुरते दुरूस्ती करण कामास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातुन सुरूवात करण्यात आल्याने येथील वाहनधारकांमध्ये व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे धन्यवाद मानले आहे . दरम्यान काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा क्षेत्राचे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष किशोर नन्नवरे , विभागाचे अध्यक्ष आबिद कच्छी, तालुका उपाध्यक्ष शाम पवार ,आकाश चोपडे , प्रतिक येवले , कमलेश शिर्के , राज शिर्के,गणेश माळी , कुणाल बारी यांनी बुऱ्हाणपुर अंकलेश्वर राज्य मार्गावरील हडकाईच्या पुलावरील मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने या ठीकाणी अपघाताची शक्यता बळावल्याने वाहनधारकांना न्याय मिळावा या सामाजीक दृष्टीकोणातुन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते . या आंदोलनाची यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जहॉगीर तडवी यांनी तात्काळ दखल घेत तात्पुरत्या स्वरूपात या खड्डे पडलेल्या मार्गावर खडीकरणाव्दारे दुरूस्ती करण्यात येत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाची दखल घेतल्याने सर्व मनसेच्या पदधिकारी यांच्या वतीने आभार मानले जात असुन , तरी तात्काळ या मार्गावरील नादुस्त झालेल्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात यावे अशी ही आग्राहा ची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे .

धनाजी नाना महाविद्यालयात केळी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर जिल्हा कृषी कार्यालय व अपेडाच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा संपन्न

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यात दि.१३ सप्टेंबर सोमवार या दिवशी कृषी विज्ञान केंद्र,पाल(जळगांव -१), अपेडा, कार्यालय मुंबई व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने धनाजी नाना महाविद्यालय,फैजपूर येथे एक दिवसीय निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार शिरिष मधुकरराव चौधरी (आमदार,यावल/रावेर विधानसभा क्षेत्र) उपस्थित होते शेतकऱ्यांना संबोधित करताना केळी पिकाचे मूल्यवर्धन करून अधिक उत्पन्न प्राप्त करावे असे विचार त्यांनी आपल्या मार्गदर्शनात मांडले. उद्घाटन समारोहात कृषी विज्ञान केंद्रा तर्फे आधुनिक केळी लागवड तंत्रज्ञान या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.तांत्रिक चर्चासत्रात डॉ. के बी पाटील (केळी तज्ञ व उपाध्यक्ष जैन इरिगेशन सिस्टिम) यांनी केळी लागवडी संदर्भात निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान विषयी मार्गदर्शन केले तसेच डॉ. सी डी बडगुजर (प्रमुख शास्त्रज्ञ, केळी संशोधन केंद्र, जळगाव) यांनी निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर नाविन्यपूर्ण बाबी सह तंत्रज्ञानाची माहिती दिली या कार्यक्रमास अपीडा चे क्षेत्र अधिकारी लोकेश गौतम यांनी अपेडा संदर्भात निर्यातक्षम केळी उत्पादन विषयीचे भूमिका व महत्व विशद केले त्याचप्रमाणे निखील कुलकर्णी (व्यवस्थापक इंक्युबॅशन सेंटर कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव) यांनी कृषी क्षेत्रातील स्टार्ट बाबत मार्गदर्शन केले किरण जाधव यांनी विविध योजनांविषयी माहिती दिली तसेच केळी पिकापासून प्रक्रिया करावे असे आवाहन केले संभाजी ठाकूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय जळगाव यांनी विविध योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांनी अधिक उत्पादना करता शासकीय योजनांची मदत घ्यावी व उत्पन्न वाढवावे असे निवेदन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश महाजन (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख प्रभारी कृषी विज्ञान केंद्र पाल) यांनी केले.या कार्यशाळेस अजित पाटील(सचिव,सातपुडा विकास मंडळ,पाल), एम ए चौधरी(प्रकल्प संचालक,आत्मा),प्रभातचौधरी(सचिव,जनता शिक्षण मंडळ,खिरोदा),कुर्बान तडवी (उपविभागीय कृषी अधिकारी, जळगांव), सनी दमानिया(केळी निर्यातदार), परिसरातील केळी उत्पादक व प्रगतिशील युवा शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव पाटील यांनी केले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. धीरज नेहेते(शास्त्रज्ञ) शरद वाणी व कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे आभार अतुल पाटील(शास्त्रज्ञ) यांनी व्यक्त केले.

शेगाव येथे अन्याय विरुद्ध लढा नगर परिषद कार्यालयासमोर साकळी उपोषण

0

 

उपोषण कर्ते खळवाडी परिसर, दौलत पुरा, रामदेबाबा नगर, दोन मोरी येथील राहिवासी
गेल्या पंधरा दिवसापासून साकळी उपोषण करत आहेत.
आज बामसेफ च्या सहयोगी संघटना राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, लहुजी क्रांती मोर्चा, गुरु रविदास क्रांती मोर्चा आणि बुद्धिस्ट इंटर नॅशनल नेटवर्क च्या वतीने उपोषण कर्त्यांना भेट देऊन त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल त्रिव्र खंत व्यक्त केली आहे.
उपोषण कर्त्याच्या मागण्या पूर्ण न केल्यास sc, st, obc व मायनॉरिटी च्या विरोधात होत असलेल्या अन्याया बद्दल संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा उपोषण कर्त्याशी चर्चा करतांना मा. मधुकर गव्हांदे प्रदेश अध्यक्ष बुद्धिस्ट इंटर नॅशनल नेटवर्क महाराष्ट्र यांनी केला, या प्रसंगी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मा. इरफान दस्तगीर, लहुजी क्रांती मोर्चाचे मा. नागेश पाटेकर,राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघांचे मा. सतीश मोहोड गुरु रविदास क्रांती मोर्च्याचे मा. योगेश पांनझाडे, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या मा. संगीता मोहोड, मा. संध्या हिवाळे राष्ट्रीय किसान मोर्च्याचे मा. महेंद्र गवई बुद्धिस्ट इंटर नॅशनल नेटवर्क चे मा. विजयकुमार शेगोकार सामाजिक कार्यकर्ता मा. मोबीन शेख मा. संजय धुरंधर मा.अन्सार बाबु शहर अध्यक्ष राष्ट्रीय मुस्लिम मोर्च्या मा.मौलाना हबीब साहब अशरफी मा.मोहम्मद सलमान वासिम मा. सय्यद मंजूर सय्यद जावेद मा. दीपक भटकर गुरु रविदास मोर्च्या इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी भेट देऊन पाठींबा दर्शवीला

यावल शहराच्या सर्वांगीण विकास करायचा असेलतर येणाऱ्या निवडणुकीत पैसा , जातपात , धर्म , पक्ष न पाहता अभ्यासु उमेदवार निवडुन द्या : अतुल पाटील

0

 

यावल, ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

आगामी काळात होऊ घातलेल्या पालिका निवडणूकीत शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पैसा,जातपात, धर्म, पक्ष असे राजकारण न करता उच्च शिक्षित, अभ्यासू, सक्षम, दूरदृष्टी असलेल्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा विद्दमान गटनेता अतुल पाटील यांनी केले आहे. ते रविवारी दिनांक१२ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसा निमित्ता आयोजीत सत्कार सोहळा कार्यक्रमात बोलत होते.
येथे बेस्ट फ्रेंड वेल्फेअर तर्फे अतुल वसंतराव पाटील यांच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एमके फार्म हाऊसवर संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगन्नाथ शिक्षण प्रसारक मंडळ यावलचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी हे होते. या प्रसंगी अतुल पाटील यांच्या हस्ते केक कापून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर प्रगतशील शेतकरी प्रमोद नेमाडे, आदीवासी एकता मंचचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम. बी. तडवी,पी. ई. पाटील, जळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक सचिन पाटील, अभय देवरे, मनिष चौधरी, किरण तडवी, माजी नगरसेवक अताउल्ला खान, हकीम खान , अजय पाटील आदी उपस्थित होते.
येथे शहराच्या नगर परिषदच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकी मध्ये सन २०५०च्या जनगणनेनुसार प्रत्येक नागरिकास मुबलक पाणी मिळावे म्हणून शेळगाव बॅरेजवरून पाणी घेण्यात येणार असल्याचे नियोजन नगर परिषदच्या वतीने करण्यात आले आहे. असे नगरसेवक अतुल पाटील हे सत्काराचे उत्तर देतांना म्हणाले. या सत्कार सोहळा कार्यक्रमाचे प्रा. किरण दुसाने यांनी प्रास्ताविक केले.यावेळी पी.ई. पाटील, डॉ. वानखेडे, चंद्रकांत चौधरी, नगरसेवक सचिन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केलीत . प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक प्रा . मुकेश येवले, अॅड. देवकांत पाटील, नगरसेवक आभिमन्यू चौधरी, समीर मोमीन शेख, शेख असलम नबी, डॉ. सोहेल खान, सामाजीक कार्यकर्ते एजाज देशमुख, हाजी मो.फारुख शेख, ,भरत कोळी ,विजय मंदवाडे , जावेद पटेल, युनुस पटेल, नदीम पटेल, उमेश बोरसे, वढोदे सरपंच संदीप सोनवणे, गोलू माळी, आशिष पाटील, गणेश जोशी, गणेश महाजन, एम के पाटील आदी उपस्थित होते.

यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रोहीत पवार संकल्पनेतुन निघालेल्या स्वराज्यध्वज यात्रेचे पुजन व स्वागत

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील शहराच्या भुसावळ टी पाँईट चौकात आज कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहीत पवार यांच्या संकल्पनेतुन स्वराज्य ध्वज कार्यक्रमाअंतर्गत संपुर्ण राज्यात भ्रमण करणारे संदेश यात्रा मोहीमचे यावल शहरात स्वागत व पुजन करण्यात आले . आपला भारत हा समृद्ध व वैभवशाली ऐतिहासिक , सांस्कृतीक परंपरा असलेला देश आहे . कर्जत जामखेडचा खडर्याजवळचा शिवपट्टण किल्ला हा त्यापैक्की एक याच किल्ल्याजवळ हिंदवी खराज्यतील शेवटची लढाई झाली होती आणी शत्रुला धुळ चारत आपल्या शुर मावळ्यांनी त्यावर भगवा फडकवला होता. आता या किल्ल्याच्या आवारात प्रेरणा , ऊर्जा देणारा भव्य असा स्वराज्य ध्वजस्तंभ साकार होत आहे . देशभरातील सर्व महत्वाच्या ठीकाणी प्रातिनिधीक पुजन झाल्यानंतर साडेतिन मुहुर्तापैक्की एक असलेल्या दसऱ्याच्या मुुहुर्तावर या ध्वजाची प्रतिष्ठापना होवुन१५ ऑक्टोबर रोजी हा स्वराज्य ध्वज उभारला जाणार असुन या स्वराज्य ध्वजस्तंभाची उंची ७४ मीटरप, स्तंभाचे वजन १८टन , स्वराज्य ध्वजाचा आकार९६x६४ फुट तर स्वराज्य ध्वजाचे वजन हे ९० किलो आहे . याकरीता राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहीत पवार यांच्या संकल्पनेतुन संपुर्ण राज्यात सर्वसमावेशक ध्वजाचे पुजन सर्वांच्या हस्ते व्हावे , अशी लोकभावना असल्यामुळे महाराष्ट्र राज्यासह देशातील विविध ठीकाणी या ध्वजाचे पुजन होणार या दृष्टीकोणातुन ३७ दिवसाच्या या प्रवासात स्वराज्य ध्वज पुजन यात्रा ६ राज्या मुधुन१२ हजार किलोमिटर प्रवास करीत आज या ध्वजपुजन यात्रेचे यावल शहरात आगमन झाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले यांनी ध्वजपुजन यात्रेचे पुजन करून यात सहभागी असलेले नितिन खामगळ, नाना गवळी , ऋषी करभाजन, पंकज लोखंडे यांचे स्वागत केले यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे सुकदेव बोदडे ( नाना ) , डॉ हेमंत येवले , अमोल दुसाने, अब्दुल गनी खान , अरूण लोखंडे , किशोर माळी, यशवंत जासुद, निखिल पाटील , गौरव पाटील , पत्रकार अय्युब पटेल , पत्रकार सुनिल गावडे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

वाघोली जवळील पारधी लोकांनी घेतला निर्णय रोड नाही तर निवडणूकीवर बहिष्कार

0

 

हिंगणघाट तालुक्यातील वाघोली गावा जवळ लागून असलेल्या पारधी बेडा मार्गाची अंत्यत वाइट दशा झालेली आहे.सुमारे १००लोकांची वस्ती असलेला हा बेडा वाघोली ते खैराटी या मार्ग वर डाव्या बाजूला एक किलो मीटर अंतरावर वसलेला आहेत .पण जाण्यासाठी रोड खूप खराब असल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहेत .जर रात्रीला पाणी आला तर रोड ला लागलेला असलेल्या झाडाच्या शेतावरच मुक्काम करावा लागत आहेत .जर कोणी बिमार पडले तर खांद्यावर बसून आणावे लागत आहेत .पाण्याची टंचाई खुप मोठ्या प्रमाणात आहेत .तसेच कोणत्याही शासनाच्या योजना तिथे पोहचत नाही आहे .अजून त्याना घरकुल सारख्या योजनेचा लाभ मिळत नाही आहे .अशा परिस्तिथत त्यांच्या कडे लक्ष देणे प्रशासनाचे काम आहेत. जर आता आम्हाला रोड करून दिला नाही तर आम्ही येणाऱ्या सर्व निवडणुकीला कोणालाही मतदान करणार नाही.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

नंदोरी चौक येथे नव्या पोलिस चौकी स्थापन करण्यात यावी एकता प्रतिष्ठान प्रभाग 6 कडून निवेदन

0

 

नंदोरी चौक, अत्यंत दळणवळण आणि गर्दीचा चौक म्हणुन याची ओळख आहे.
बर्याच ग्रामिण भागाला जोडणारा रस्ता आणि याच रस्त्यावर येणारे विद्यालय, मंगल कार्यालय , वसतिगृह , बैंक इत्यादि संस्थाने आहेत ,
ह्याच ठिकानी दररोज भाजी मार्केट सुद्धा भरते इतक्या गर्दी च्या चौकाला मागिल काही दिवसांपासून ग्रहण लागल्याचे जाणवते.
गुन्हेगारीचे प्रमाण अधिक असल्याने जनता हताश झालेली आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द पोलिस बांधवांवर गोळीबार ह्याच चौक मध्ये झाला .
प्राध्यापिकेच जळित हत्याकांड तर संपुर्ण देशानी बघितले ते सुद्धा ह्याच प्रभागात घडले,
प्रभागातील प्रमुख नंदोरी चौक मध्ये दारुड्यांचे प्रमाण आणखी जुगार खेळणारे दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गांजा चि सर्रास विक्री होत असुन चाकु सुरी बाळगणारे सुद्धा वाढले आहेत. यामुळे जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रभागा मध्ये चोरीचे प्रमाण ही अधिक आहे, चोरट्यांनी श्रावस्ति बुद्ध विहार (प्रज्ञा नगर) फोडून दान पेटी चोरुन नेण्याचं उदाहरण तर ताजं आहे.
सोबतच घरगुती चोरीचे प्रमाण ही अधीक आहे , ह्याच प्रभागात असंख्य मंदिरे आणि विहार आहेत, राष्ट्रीय महामार्ग च्या पलिकडे एक नवीन हिंगणघाट निर्माण होत असुन त्या ठिकाणी शहर पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नंदोरी चौक येथे एक नवीन पोलिस चौकी स्थापन करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात मार्फत करण्यात आली,
निवेदन देताना
मनोहर कांबळे,प्रमोद हस्ते,भाऊराव कोटकर,उमेश शंभरकर,विजय राडे,संदेश थुल,साहील कांबळे,प्रज्वल मेंढे,हिमांशू रंगारी,अजीत कांबळे,वृषभ इंदुरकर,चेतन घुसे,अखिल धाबर्डे
इत्यादी उपस्थित होते
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

यावलच्या फालक नगर परिसरातील गटारीचे बांधकाम होत नसल्याने दृंर्गधीयुक्त पाणीचे व घाणीचे साम्राज्य नागरीकांमध्ये भिती नगर परिषद वर नाराजी

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील शहरातील विस्तारित वसाहतीमधील फालक नगर या परिसरातील डेंग्युच्या आजारामुळे एका तरुणाचा मृत्यु झाल्याने परिसरात नागरीकांमध्ये आरोग्याला घेवुन भितीचे वातावरण निर्माण झाले असुन , याच क्षेत्रातील काही ठिकाणी गटारींचे बांधकाम झाले नसल्याने दुर्गंधीच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने त्या ठीकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असुन , या विषयाला घेवुन परिसरातील नागरीकांमध्ये नगर परिषदच्या ढसाळ कारभारामुळे प्रचंड नाराजी पसरली आहे . या संदर्भातील वृत्त असे की, यावल नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील फालक नगर या कॉलनीतील फालक नगर बसथांबा ते आयशानगर मार्गावरील डी बी पाटील सर यांच्या घरा समोरील मोकळ्या जागेवर अनेक वर्षापासुन गटारीचे काम झाले नसल्याने त्या ठीकाणी दृर्गंधीचे घाण सांडपाणी जमा झाले असुन , या परिसरात डांसाचा उपद्रव वाढल्याने नागरीकांमध्ये आपल्या कुटुंबातील आरोग्याच्या दृष्टीने भितीचे सावट पसरले आहे . याबाबत यावल नगर परिषदकडे परीसरातील नागरीकांनी अनेक वेळा तक्रार करून देखील नगर परिषद प्रशासनाकडुन थातूरमातुर चौकशी वगळता कुठलेही कार्य झाले नसल्याची ओरड या ठीकाणच्या रहीवासांची आहे .सद्या यावल शहरात व परीसरात डेंग्यु या घातक आजाराची साथ पसरली असुन, नगर परिषदेने तात्काळ नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गांभीर्याने विचार करून तात्काळ या ठीकाणी गटार बांधावी अन्यथा या परिसरातील नागरीकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे .