Home Blog Page 406

शेख हमीद शेख वाहेद यांचाआपले सरकार सेतू केंद्र रद्द झाल्याने अपंग सागर तसरे दि. १५ बुधवार पासूनचे आमरण उपोषण समाप्त ……..

0

 

अमरावती – उषा पानसरे मुख्य कार्यकारी संपादिका

अमरावती जिल्हातील वलगाव येथील आपले सरकार सेतू केंद्र अपंग / महिला बचत गटास देण्याकरिता जिल्हाधिकारी अमरावती मार्फत जाहिरात निघाली होती. परंतु जाहिरातीतील शर्थी व अटीत अपात्र तसेच बनावटी कागदपत्रे बनविण्याऱ्या शेख हमीद शेख वाहेद यास आर्थिक देवाणघेवाणीतून आपले सरकार सेतू केंद्र देण्यात आल्याने वलगाव येथील पात्र उमेदवार अपंग सागर संजय तसरे दि. १५ बुधवार पासून पब्लिक पार्लमेंट च्या वतीने आमरण उपोषणास बसले होते. आज दि. 23 गुरुवार रोजी आपले सरकार सेतू केंद्राचे अधीक्षक चंद्रपाल मेश्राम यांनी रणजित भोसले उपजिल्हाधिकारी अमरावती यांचे पत्र आणून दिले तसेच सागर तसरेला ज्यूस पाजून उपोषण सोडवण्यात आले. त्या पत्रानूसार शेख हमीद शेख वाहेद यांचे आपले सरकार सेतू केंद्र रद्द करण्यात आले व पात्रतेचा कसोटीत अपंग सागर तसरेला आपले सरकार सेतू केंद्र देण्याचे आश्वासन दिले.
याबाबत सविस्तर असे कि महाराष्ट्र सरकारने गावातील नागरिकांना आवश्यक शासकीय सेवा मिळाव्या म्हणून आपले सरकार सेतू केंद्र गावागावात स्थापन करण्याचा निर्णय घेतला. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर शेख हमीद शेख वाहेद यांना आपले सरकार सेतू केंद्र देण्यात आले. या संबंधात अपंग सागर संजय तसरे यांनी माहितीच्या अधिकारात शेख हमीद शेख वाहेद यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची माहिती मिळविली असता शेख हमीद शेख वाहेद यांनी अपंग असल्याचे प्रमाणपत्र दि. २९/१२/२०२७ जिल्हा शल्य चिकित्सकाचे खोटे व बनावटी प्रमाणपत्र दाखल केल्याची माहिती संबंधित कार्यालयाकडून प्राप्त झाली. या विरोधात सागर ठाकरेने दि. १५ बुधवार पासून आमरण उपोषण सुरु केले होते. या उपोषणाची यशस्वी सांगता झाल्याने पब्लिक पार्लमेंटचे अँड. सिद्धार्थ गायकवाड, फूजैल सय्यद, मीनाताई नागदिवे सुषमा मोरे वहिदा नायक अविनाश गोंडाने श्रीकृष्ण तातड, अँड. रमेश तंतरपाडे यांनी सहकार्य केल्याबद्दल सागर संजय तसरे यांनीं आभार व्यक्त केले

निळाई वर्षभर वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साजरी करणार

0

 

आर्वी तालुका प्रतिनिधी
प्रज्वल यावले

” युगकवी वामनदादा कर्डक जनसामान्यांच्या आवाज :- प्रविण कांबळे ”

निळाई परिवाराकडून युगकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी वर्षानिमित्त माटोडा बैनोडा येथे कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते . यावेळी वामनदादा कर्डक यांच्या, गझल,कवीता, गीत, यांचा समावेश करीत कविनी आपल्या रचना सादर केल्या. सुरेश वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवि समेलनात शिला आठवले, करूना मुन, अहिल्याबाई रंगारी, अपेक्षा कांबळे. माणिक खोब्रागडे, रंगराज गोस्वामी, धम्मप्रचारक सुरेश भिवगडे, छत्रपाल तामगाडगे, सुर्यकांत मुनघाटे, नरेश पाटील, राजेंद्र कांबळे, मनोहर गजभिये,नरेद्रं पखाले मधुकर सवाळे यांनी सहभाग घेतला या कवी संमेलनाचे सुत्रसंचलन प्रवीण कांबळे संपादक निळाई त्रैमासिक यांनी केले. वामनदादा कर्डक यांच्या कवितेने कवी संमेलनाची सुरुवात झाली ” काय सांगू तुला मी भिम माझा कसा होता, लेकराला जशी माता भिम माझा तसा होता, यावेळी भिख्खु संघ भिक्खूनी आर्या पटाचारा, भन्ते धम्मरत्न टाकरखेडा व आर्यपूत्त धम्ममेध उपस्थित होता . धम्मप्रचारक सुरेश भिवगडे यांनी भाद्रपद पौर्णिमा यांचे महत्व समजावून सांगितले. सर्वप्रथम पंचशील बुद्धविहार बेनोडा येथे त्रिशरण पंचशील घेऊन मिरवणूक काढून चंद्रमनी बुद्ध विहार मोटोडा येथे सहभागी कवीचे स्वागत करण्यात आले. येथे या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन चंद्रमणी बुद्ध विहार मोटोडा बेनोडा उपासक उपासीका यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विहाराचे अध्यक्ष अतुल कांबळे तर आभार प्रदर्शन प्रविण कांबळे यावेळी गावातील चरणदास भगत, संकेत कांबळे, अनुसया वावरे, शशिकला विघ्ने, रामरावजी वावरे नारायण ढाणके. कुमुद कांबळे विशाल भगत धम्मा ढाणके. धीरज कांबळे समीर कांबळे मुकुंद वावरे प्रकाश गडलिंग अशोक भगत आनंद वंजारी, शकुंतला वावरे प्रतिभा पखाले अनिता भगत शोभा कांबळे ग्रा. प. सदस्य, प्रमिला कोल्हे सविता पखाले दीपिका कांबळे श्रीधर कांबळे मोनिका कांबळे अक्षरा कांबळे परी कांबळे खुशी कांबळे लक्ष्मण पखाले बबनराव मेंढे इमला मेंढे नंदा मोहोड सुनन्दा गजभिये मीना गडलिंग पुष्पा वावरे शांती वावरे पारबता वावरे कल्पना वावरे रेखा वावरे सविता पखाले चंदा कांबळे गीताबाई ढाणके रजनी कांबळे चंद्रकला नाखले सुजाता ढाणके रमा कांबळे संगीता भगत रमाबाई कांबळे शुभम भगत अमित ढाणके मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती

भूमिपुत्रांच्या पाठिंब्या कडे सर्वांचे लक्ष तर २८ सप्टेंबरला करणार पाठिंबा जाहीर :- राम पाटील बोरकर

0

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनीधी सेनगाव

होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोट निवडणुकांसाठी भूमिपुत्र लवकरच पाठिंबा जाहीर करणार असल्याचे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष राम पाटील बोरकर यांनी सांगितले होते या बातमीनंतर मात्र सर्व जिल्ह्याचे लक्ष हे भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या पाठिंबा कडे लागले होते येत्या २८ सप्टेंबरला रिसोड येथील भूमिपुत्र च्या कार्यालयात भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. विष्णुपंत भुतेकर साहेब व तसेच राज्याचे प्रवक्ते डॉक्टर जितेंद्र गवळी साहेब आणि भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर जी अवचार यांच्या प्रमुख उपस्थित पाठिंबा जाहीर करणार असून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना उपस्थित राहण्याचे आवाहन भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष राम पाटील बोरकर यांनी केले आहे

भारतरत्न डॉ .बाबासाहेबांचे अप्रकाशीत विचारधन हे विश्वाला कळणार कधी ? प्रकाशीत करण्याची भीम आर्मीची राज्य शासनाकडे मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

बाबासाहेबांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याची भीम आर्मीचे राज्यप्रवक्ते रमाकांत तायडे यांनी राज्यशासनाकडे केली जाहीर मागणी आहे.
अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महान विचार ह्या विश्वाला तारणारे महान क्रांतदर्शी विचार असून त्यांनी आपल्या महान ग्रंथातून , भाषणांतून , लेखातून वैश्विक मानवजातीला नेहमीच मार्गदर्शन केले असून त्यासंबंधी त्यांची विपुल साहित्यसंपदा उपलब्ध असून , महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांचे हे महान विचारधन जगाच्या अंतिम टोकापर्यंत नेण्यासाठी प्रकाशित करण्याचा विडा उचलला त्यानुसार १५ मार्च १९७५ रोजी राज्यशासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली असून , गेल्या ४४ वर्षांत शासनाने फक्त २२ खंड व ०३ सोअर्स मटेरियल इतकीच साहित्यसंपदा प्रकाशित केली आहे , त्यातच २००६ पासून ते आजतागायत म्हणजे *गेल्या १५ वर्षांत एकसुद्धा ग्रंथ प्रकाशित केलेला नाही. बाबासाहेबांच्या साहित्याला जगभरात प्रचंड मागणीअसून ,बाबासाहेबांच्याच साहित्याचा अभ्यास करून अनेक देशातील सरकारे आपल्या प्रजेच्या प्रश्नांची उत्तरे शोधून कार्यरत आहे तर बाबासाहेब लिखित “प्रॉब्लेम ऑफ रुपी” ह्या ग्रंथाच्या आधारावरच आपल्या देशाची सर्वोच्च बँक असणारी “रिझर्व्ह बँक” स्थापित झालेली आहे.
बाबासाहेबांचे विचार विश्वाला मार्गदर्शन करत असताना त्यांचे अप्रकाशित साहित्य मात्र सरकारी गोदामात धूळ खात पडले असून , *सरकारची ही अक्षम्य घोडचूक आम्ही कदापि सहन करणार नसल्याचे भीम आर्मीचे राज्यप्रवक्ते मा.रमाकांतजी तायडे यांनी सांगितले असून वेळप्रसंगी आम्ही भाई चंद्रशेखर आझाद यांच्या क्रांतीप्रेरणेतून उग्र आंदोलन छेडू , असा सज्जड दम सुद्धा मा.रमाकांतजी तायडे यांनी दिला आहे.

आर्वी शहर मे उर्स मुबारक

0

 

आर्वी तालुका प्रतिनिधी
प्रज्वल यावले

टिपू सुलतान ग्रुप आर्वी की ओर से हजरत सैय्यद अब्दुल हमीद क़ादरी उर्फ रबर वाले मामूजान रह.अलै. (आर्वी) बारगाह मे चादर पेश की गई उपस्थिति. तौसीफ खान अबरार खान शेख शाहरुख कादरी शोएब शेख तनवीर दर्पण भाई अजीब फारुकी शेख मारुक अहमद शेख जुनैद शहजाद शेख सलमान खान लोकेश भाई योगी भाई आवेश खान फैजान खान सोनू कुरैशी और सब पदाधिकारी उपस्थिति थे

प्रहार संघटनेच्या त्या “कृत्या ‘विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी-भाजपा महिला मोर्चा ची मागणी..

0

 

शेगाव: प्रहार संघटनेच्या वतीने नगरपालिकेचे कार्यालयासमोर नगराध्यक्ष यांचा प्रतिकात्मक पुतळा साडी नेसवून जाळण्याचा प्रयत्न म्हणजे महिलावर्गाची विटंबना होय या घटनेबद्दल प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्याला विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्ष महिला आघाडीतर्फे करण्यात आली आहे. शेगाव शहरात 19 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन करण्यात आले सध्या कोरूना प्रादुर्भाव वाढू नाही करिता नगरपालिकेने भागामध्ये खाजगी वाहनाद्वारे गणपती विसर्जन उभे केले होते या खासगी वाहनांमध्ये ठेवण्यात आलेले पाण्याच्या टाकी ह्या अतिशय घाणीने माखलेले असल्याने अशा घाण युक्त पाण्यामध्ये गणपती विसर्जन करून नगरपालिकेने गणपती मूर्तीचे विटंबना केल्याचा आरोप संघटनेने करून नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शकुंतला बुच यांचा प्रतीकात्मक पुतळा पुतळ्याला साडी नेसून प्रहार संघटनेच्या वतीने शेगाव नगरपालिका कार्यालयासमोर पुतळा जाळण्यात आला या घटनेचे तीव्र पडसाद भारतीय जनता पक्षाच्या वतीने 21 सप्टेंबर रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली व प्रहार संघटनेच्या कार्यकर्ते विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली या प्रमाणे आज 22 सप्टेंबर रोजी तहसीलदार शेगाव यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा तर्फे व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लेखी निवेदन दिले आहे व या निवेदनात म्हटले आहे की अशा प्रकारे साडी नेसून पुतळा जाळण्याचा प्रकार म्हणजे महिलांचा अपमान करणे होय या प्रकरणी प्रहार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते विरुद्ध गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनावर भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा डॉक्टर ज्योती भुतडा, बुलढाणा जिल्हा सरचिटणीस सौ कल्पनाताई मसणे, शेगाव शहर सरचिटणीस सौ.मंजू शर्मा नगरसेविका अलका खांजोडे मॅडम, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे , तालुकाध्यक्ष विजय भालतिलक, माजी शहराध्यक्ष डॉक्टर मोहन बानोले जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय लांजुळकर भाजपा किसान आघाडीचे माजी, अमित जाधव, नगरसेवक पुरुषोत्तमा हाडोळे भाजपाचे माजी नगरसेवक शांताराम बेडेकर, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

अलमपुर येथे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या.प्रेरणेने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म सप्ताह निमित्त ग्राम स्वच्छ ता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला

0

 

सुनिल पवार. नांदुरा. ता.प्र

ग्राम अलमपुर येथे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या प्रेरणेने देशाचे यशवि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म सप्ताह निमित्त ग्राम स्वच्छ ता अभियान हा कार्यक्रम राबविण्यात आला सदर कार्यक्रम हा भाजप ग्रामीण महिला आघाडी च्या वतिने व ग्रामस्थांच्या सहकार्याने घेण्यात आला या कार्यक्रमाला मा.सभापती तथा महिला ग्रामीण च्या अधक्षा.सौ अरचना ताई शिवाजिराव पाटिल. विमुक्त भटक्या सेलचे जिल्हा अधक्ष शत्रुघुन पाचपोर. मा.सभापती तथा भा.ज.पा.ता.अधक्ष शैलेश मिरगे. जि.सचिव. सौ. लासुरकार ताई. ता.उपाअध्क्ष. सौ.तायडे ताई. शिलाताई तायडे. भगवान आबा शेळके. कैलास डांगे. नारायण बाठे. महादेव डांगे. दिलिप शेळके. हरिभाऊ रिंगने. रमेश बगाडे. रमेश हातळकर. तसेच कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक संघटनेचे जिल्हा अधक्ष शिवाजिराव पाटील. यांनी केले व नियोजन भाजयुमो ता.उपाअध्क्ष सतिष गायगोळ. व सोषल मिडिया प्रमुख सागर सपकाळ. यांनी व कार्यकर्ते यशस्वी कार्यक्रम पार पाडला

उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे डॉ.रा.भ.उपाख्य अण्णासाहेब शेंडे यांची 92वी जयंती साजरी

0

 

आर्वी तालुका प्रतिनिधी
प्रज्वल यावले

वैद्यकीय अधिक्षक डॉ. मोहनजी सुटे यांनी अण्णासाहेब यांचा फोटोचे हरार्पण व पूजन केले. आणि उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी अण्णासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.अण्णासाहेबांचे कार्य सर्वश्रुत आहे. त्यांनी जिवंतपणी समाजाला सामाजिक स्थान मिळवून देण्यात स्वतः चे आयुष्य समर्पित केले. त्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,अँड.हरिदास बाबूजी आवळे, बॅरिस्टर खोब्रागडे यांच्याशी जवळचा संबंध आला. वर्धा जिल्ह्यातील सर्व सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये त्यांनी बौद्धविकार म्हणून आपल्या वाणीचे जनतेमध्ये छाप निर्माण केली.
अशा एका सामाजिक योद्धयाचे निर्वाण २अक्टोबर 2010 ला स्वतः चे घरी नांदपूर ता. आर्वी जि. वर्धा येथे झाले.
त्यांच्या जयंतीनिमित्त डॉ.वंदनाताई वावरे, डॉ.निरज कदम,डॉ.आशिष सोनी,डॉ.उज्वल देवकाते,डॉ.हेमंत पाटील,डॉ.नरेंद्र गुप्ता, राहुल शेंडे(समुपदेशक), सोनाली घुरडे,कोमलताई जवादे रुग्णालयातील ईतर कर्मचारी तसेच सुरेशभाऊ भिवगडे, नरेंद्र पखाले (शिक्षक) सारीपुत्र भगत, संजयभाऊ हिरवे, अरुणभाऊ भोगे तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

हिंगणघाट ब्राईट फ्युचर क्लब द्वारा आयोजित राष्ट्रीय फुटबॉल लिग स्पर्धा चे आयोजन व बक्षीस वितरण.

0

 

हिंगणघाट: ब्राइट फ्युचर क्लब हिंगणघाट तर्फे दिनांक 17 ,18 19 ,सप्टेंबरला फुटबॉल लिग स्पर्धा चे राष्ट्रीय स्तरावर आयोजन करण्यात आले या स्पर्धेत प्रथम पुरस्कार 7000 हजार व ट्रॉफी द्वितीय पुरस्कार 5000 हजार व ट्रॉफी ही स्पर्धा तीन गटात होती गटात होती 14 वर्षीय ,17वर्षीय मुले आणि खुले महिला गट . यामध्ये इतर राज्यातील फुटबॉल संघ सहभागी झाले होते ए.बी ग्रुप फुटबॉल क्लब ,शक्ती गर्ल्स स्पोर्टिंग क्लब , नागपुर टीम्स अन्सारी क्लब, चंद्रपूर, नाशिक, गोंदिया, वर्धा, आर्वी, बुलढाणा, कामटी तीन संघ मुंबई, दादाभाई क्लब वैकुंडपूर छत्तीसगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, कानपूर, हरियाणा, पंजाबमधून गॅलेक्सी 11 स्पोर्टिंग क्लब चंदीगड एकूण 26 संघ सहभागी झाले.

या स्पर्धेचे उद्घघाटन संगीता रांका यांनी केले, यामध्ये त्यांनी सर्व खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. आयोजकांनी सांगितले की, प्रथमच राष्ट्रीय स्तरावर मुलींच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. वीरांगना ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा अंबिका हिंगमिरे, श्रमिक समर्थ आणि बंधक कामगार संघटनेच्या, आणि चंद्रपूर वर्धा, गडचिरोली विधान परिषदेचे प्रमुख डॉ.रामदास आबंटकर, हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार , हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुधीर कोठारी हिंगणघाट नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, लेखक इरफान खान, मुझफ्फर हुसेन, सामाजिक कार्यकर्ते अविनाश
नवरखेले. पत्रकार नदीम सर , मोहसीन खान
कदिर बख्श. शिव सकाळ चे संपादक
उपस्थित होते , आगामी काळात ब्राइट फ्यूचर स्पोर्टिंग क्लबला सहकार्य करण्यास सांगितले.

14 वर्षीय मुलांमध्ये :-
1 पुरस्कार: अन्सारी क्लब नागपूर
2 पुरस्कार: किड्स ब्राईट फ्युचर

17 वर्षांखालील मुलांमध्ये
1 बक्षीस: किड्स ब्राइट फ्युचर क्लब हिंगणघाट
दुसरा पुरस्कार: अन्सारी क्लब नागपूर

आणि खुल्या महिला गटात
1 बक्षीस: किड्स ब्राइट फ्युचर क्लब हिंगणघाट
2 पुरस्कार: रझा स्पोर्टिंग क्लब
ला मिळाला
3 पुरस्कार दिल्ली संघाला देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश शर्मा यांनी केले. आयोजक हिंगणघाट ब्राईट फ्युचर क्लब राष्ट्रीय खेळाडू मुस्तफा बक्ष यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडला.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

निसर्गसाथी फाउंडेशन चा  फुलपाखरू महोत्सव’  निःशुल्क विविध स्पर्धांचे आयोजन

0

 

हिंगणघाट (२०/९) शहरात पर्यावरण तथा पशु पक्षी संवर्धनासाठी कार्यरत निसर्ग साथी फाउंडेशन चे वतीने यंदा शहरात आढळणारया फुलपाखराचे संवर्धन तथा जनजागृती होण्याचे दृष्टीने ‘ फुलपाखरू महोत्सव’ आयोजित करण्यात आला असुन या महोत्सवांतर्गत शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क चित्रकला, निबंध स्पर्धा, छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांनी आपले साहित्य ज्योतिर्लिंग टायपिंग एल आय सी आफीस जवळ,नेताजी किराणा दुकान,पराग बुक डेपो,सत्संग मेडीकल, अरविंद दहापुते गोमाजी वार्ड यांचे कडे २५ सप्टे पुर्वी पाठवावेत,तद्वतच आपले साहित्य https://forms.gle /3bnmzEYyZFSZvckf8 या लिंकवर पाठवुन स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन निसर्ग साथी फाउंडेशन चे वतीने प्रविण कडु,राकेश झाडे , गुणवंत ठाकरे, अरविंद दहापुते,रश्मी चंदनखेडे ,प्रा डॉ बालाजी राजुरकर, प्रभाकर कोळसे आदींनी केले आहे .
सूर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा