Home Blog Page 407

यावल चोपडा रोडवर अज्ञात वाहनाने मोटर सायकलच्या भिषण अपघातात साकळीच्या तरूणाचा जागीच दुदैवी मृत्यु

0

 

यावल ( प्रतिनिधि)विकी वानखेडे

तालुक्यातील साकळी येथील एका तरुणाचा अज्ञात वाहनाने धडक देवुन झालेल्या भिषण अपघातात मृत्यु झाल्याची घटना घडली आहे . या संदर्भात मिळालेल्या माहीतीनुसार आज दिनांक २१ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास यावल चोपडा मार्गावरील साकळी गावापासुन दोन किलोमिटर लांब असलेल्या भारत तोलकाटयाच्या जवळ साकळी येथील राहणारा रोहीत अरूण कोळी वय२६ वर्ष हा आपल्या मोटरसायकल क्रमांक एमएच १४जेएन २६८५ वाहनाने साळ्ळीकडुन किनगावकडे जात असतांना एका अज्ञात वाहनाने मोटरसायकला धडक देवुन झालेल्या भिषण अपघातात गंभीर दुखापत होवुन जागीच मरण पावल्याची दुदैवी घटना घडली आहे . दरम्यान मरण पावलेल्या रोहीत कोळीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असुन , याबाबत कैलास कोळी यांनी यावल पोलीसात खबर दिल्याने अपघाताची नोंद करण्यात आली , अपघाताची माहीती कळताच पंचायत समितीचे सदस्य दिपक अण्णा पाटील ,दिपक नागो पाटील पिक सोसायटी चेअरमन काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान , वढोदे गावाचे सरपंच संदीप सोनवणे यांच्यासह साकळी गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने या ठीकाणी उपस्थित होते . सदरच्या अपघातात मरण पावलेला तरूण रोहीत कोळी हा अरूण कोळी यांचा एकुलता एक मुलगा होता .

जिल्हा परिषद/पंचायत समिती असोसिएशनच्या तालुका अध्यक्षपदी शेखर पाटील यांची निवड

0

 

यावल ( प्रतिनिधि) विकी वानखेडे

श्री छत्रपती शाहू महाराज सभागृह जिप जळगाव येथे राज्याचे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे पाटील यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली
महाराष्ट्र महिला अध्यक्ष डॉ निलम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशन महाराष्ट्र राज्य अंतर्गत जळगांव जिल्हा कार्यकारिणी तथा तालुका अध्यक्षांची निवड जिल्हाध्यक्ष यांचे तर्फे जाहीर करण्यात आली असुन ,
जिल्हा कार्यकारिणीत प्रमुख सल्लागार म्हणून जिप अध्यक्ष ना.सौ . रंजनाताई प्रल्हाद पाटील यांचेसह
शिवसेना गटनेते तथा जिप सदस्य नानाभाऊ महाजन इतर जिल्हा परिषय सदस्यांत पवन सोनवणे,सुरेखा पाटील,हिंमत पाटील, पल्लवी सावकारे,नंदा सपकाळे, कैलास सरोदे,अनिता गवळे, गजेंद्र सोनवणे, प्रभाकर सोनवणे (मोहाडी), सरोजिनी गरुड,सौ माधुरी अत्तरदे, प्रमिला पाटील,अनिल देशमुख,दिलिप पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे,मा.जिप सदस्य आर.जी.नाना पाटील वगैरे जि .प. व पं.स.सदस्यांत प्रतिभा बोरोले रावेर,प्रविण पाटील अमळनेर, अशोक पाटील पारोळा, अनिल महाजन एरंडोल,अमर पाटील जामनेर, सुभाष पाटील पाचोरा, रामकृष्ण पाटील भडगाव, शिवाजी सोनवणे चाळीसगांव यांची उपस्थिती होती. दरम्यान जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असोसिएशन यावल तालुका अध्यक्षपदी यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांची निवड करण्यात आली , या निवडी बद्दल त्यांचे असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितिन चौधरी , काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदीर खान , नईम शेख , काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे, विक्की पाटील , कोरपावली सरपंच विलास अडकमोल, उपसरपंच हमीदाबी पटेल , सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील पटेल, धिरज कुरकुरे, कोरपावलीचे सामाजीक कार्यकर्त मुक्तार पटेल , रमेश पाटील , अभ्य महाजन आदींनी त्यांचे शुभेच्छा देवुन अभीनंदन केले आहे.

पालिका पथकाकडून जनावराच्या कोंडवाड्याला दार अस्तित्वात नसल्यामुळे बंदिस्त केलेले मोकाट जनावरांना सोडण्यात आले

0

 

हिंगणघाट दि.२० सप्टेंबर शहरात मोकाट जनावरांनी धुमाकुळ घातला असून मुख्य मार्गासह प्रत्येक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
स्थानिक नागरीकांनी ओरड केल्यानंतर पालिका प्रशासनाने मोकाट फ़िरणाऱ्या जनावरांना ताब्यात घेण्याची मोहीम आज दि.२० पासून सुरु केली, आज पालिकेचे कर्मचारी रस्त्यावर मोकाट फ़िरणाऱ्या गाईवासरांना ताब्यात घेताना आढळले,अचानक या मोकाट जनावरांच्या मालकांना कारवाईबद्दल माहिती मिळताच आपले पशुधन सोडविण्यासाठी धाव घेतली.
आठवड्यापुर्वीच पालिकेने याची जाहिर सुचना लाऊडस्पिकरद्वारे शहरातील सर्व भागात दिली होती,परंतु जनाची नाही तर मनाचीसुद्धा लाज न बाळगणाऱ्या पशुधन मालकांनी याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले.
परंतु आता कारवाईची चाहुल लागताच घबराट निर्माण झाली आहे.
या मोकाट फिरणाऱ्या गाईवासरांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून अनेक नागरिकांना गंभीर अपघातास सामोरे जावे लागते,
अशावेळी या मोकाट जनावरांच्या मालकांवरती जबर दंड आकारावा,अशी नागरिकांची मागणी आहे.
पालिकेच्या पथकाने आज दि.२० रोजी कारवाई केली असली तरी जनावरांच्या कोंडवाड्याला दार अस्तित्वात नसल्याने आज मात्र बंदिस्त कैलेल्या मोकाट जनावरांना सोडून देण्यात आल्याची माहिती मिळाली.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

यावल शहरात हिवताप , खोकळा आणी डेंग्युसदृष्य रुग्णांच्या संख्ये प्रचंड वाढ होत असुन नगर परिषद प्रशासन जागृत व सर्तक राहावे

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

कोरोना संसर्गाचा जिवघेणा गोंधळ अद्याप संपलेला नसतांना शहरात व परिसरात मागील काही दिवसांपासुन हिवताप , खोकळा , डेंग्युसदृष्यच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असुन, यावलच्या ग्रामीण रुग्णालयात ओपीडी संख्या मोठया प्रमाणात वाढत असुन यात लहान मुलांचा मोठा सहभाग दिसुन येत आहे, ग्रामीण रुग्णालयापासुन तर खाजगी दवाखान्यात रुग्णांची प्रचंड गर्दी दिसुन येत आहे . दरम्यान यावल शहर व परिसरासह तालुक्यात सर्वत्र डेंग्युच्या सदृष्य आजाराने थैमान घातले असुन , दिवसंदिवस या रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर वाढत असुन , यावल नगर परिषदच्या वतीने तात्काळ युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविणे , नागरीकांमध्ये आरोग्याविषयी दवंडी व्दारे जनजागृती करणे , महीन्यातुन किमान दोन वेळा जंतुनाशक धुर फवारणी करणे , शहरात रुग्णांची झपाट्याने वाढ होत असुन , आरोग्य विभागाच्या माध्यमातुन घरोघरी जावुन प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करणे त्याचबरोबर शहरातीत काही प्रभागामध्ये वरहांची संख्या प्रचंड प्रमाणावर वाढली असुन ती तात्काळ कमी करावी अशा विविध नागरीकांच्या आरोग्याशी निगडीत प्रश्नावर तात्काळ यावल नगर परिषदने लक्ष केन्द्रीत करावे अशी मागणी नागरीकांकड्डन होत आहे . दरम्यान डेंग्यु सदृष्यरुग्ण तसेच हिवताप व खोकला अशा साथीच्या आजारात वाढ होतांना दिसत असुन यावल तालुक्याचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ . फिरोज तडवी यांनी नागरीकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन आवाहन केले आहे.

नावरे व वडोदा रस्त्यावर दुचाकींचा अपघात दोघ जखमी

0

 

यावल ता प्रतिनिधी विकी वानखेडे

, यावल आज संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास नावरे गावाच्या जवळ भर रस्त्यावर दुचाकींचा अपघात अधण्यात वाहनाच्या अपघात घडला असता दोघ जखमी अवस्थेत रस्त्यावर दिसून आल्याने रस्त्यावरून वर्दळ सुरू असताना त्यांच्या मदतीला कोणीही थांबवू येत नव्हते उस्मान दगडू तडवी व त्याचा मित्र जावेद तडवी रा सकळी उस्मान तडवी त्याच्या तोंडातून रक्त येत होते तो रक्तबंबाळ अवस्थेमध्ये रस्त्यावर दिसून आले त्यातील एकाला त्याच्या मित्राला देखील जबर मार लागलेला होता कोणतेही वाहन थांबत नव्हते अशा वेळेस स्वराज फाउंडेशनचे अध्यक्ष भरत चौधरी सर याठिकाणी आले व त्यांनी एपीआय खैरनार साहेब यांच्याशी संपर्क साधून तिकडून येणारी सुमधुर फाउंडेशनची ॲम्बुलन्स स्वराज फाउंडेशनचे अध्यक्ष भरत चौधरी सर यांनी तात्काळ सम्पर्क साधून मदत कार्य केले ॲम्बुलन्स मध्ये उस्मान तडवी व त्याचा मित्र या दोघांना यावल सिव्हिल मध्ये उपचारासाठी दाखल केले यावेळेस नावरे येथील पोलीस पाटील भूषण पाटील यांनी देखील मदत केली व जखमींना यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्या वेळी डॉ वैद्यकीय अधिकारी व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी तात्काळ उपचार सुरू केल्याने त्यांच्या प्रकृतीत सुदारणा झाल्याचे सांगण्यात आले,

नांदुरा येथे शिव मल्हार मंगल कार्यालयात धनगर समाज महासंघाचि बैठक संपन्न

0

 

सुनील पवार. नांदुरा. ता.प्र.

नांदुरा येथिल शिव मल्हार मंगल कार्यालयात धनगर समाज महासंघाचि बैठक संपन्न झाली अधक्ष स्थानि महासंघाचे माजी प्रदेशाअधक्ष श्रीरामजी पुंडे तर प्रमुख उपस्थिति धनगर समाजाचे नेते शरदभाऊ वसतकार. जि.प्रमुख मनोहरभाऊ पाचपोर. महिला आघाडी जि.प्र.चंदाताई पुंडे. धशगर समाज मंडळ नांदुरा. अधक्ष महादेव बोरसे. साहेबराव फासे. निंबाजी बाजोडे. मधुभाऊ कवळे अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीत श्रीराम भाऊ पुंडे यांनी नविन नियुक्त्या जाहीर केली त्यात मल्हार सेना राज्य कार्य कारनि वर शत्रूघून पाचपोर धनगर समाज महासंघ जि.उपाअध्क्ष. नांदुरा प्रमुख कैलास डांगे. तर मल्हार सेना प्रमुख एँड नंदु खोदले.नवनिर्वाचित पदाधिकारी याचा सत्कार करण्यात येउन भावि कार्यासाठी शुभेच्छा दिल्या

भाजयुमोने रक्तदान करुन साजरा केला पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस.

0

 

हिंगणघाट दि.१९ ऑगस्ट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच दि.१७ सप्टेंबर रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचेवतीने स्थानिक मारोती वार्ड येथील दुर्गा माता मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
उपरोक्त रक्तदान शिबीराचे उद्घाटन आमदार समिरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी माजी जि. प. अध्यक्ष नितीन मडावी, भाजपा जिल्हा महामंत्री किशोर दिघे इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजयुमोचे प्रदेश सचिव अंकुश ठाकुर, जि.प.सभापती मृणालताई माटे ,नगरसेवक सोनु गवळी, सुनिल डोंगरे, नगरसेविका शारदाताई पटेल, जिल्हा महामंत्री युवा मोर्चा कवीश्वर इंगोले, बजरंग दल तालुका अध्यक्ष विक्रम ठाकूर, माजी युवा मोर्चा अध्यक्ष हिंगणघाट सौरभ पांडे, तालुका अध्यक्ष युवा मोर्चा विठू बेनीवार, भाजपा तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
जागतिक कोरोना महामारीच्या संकट काळात रूग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत आहे. याकरीता रक्तदानाची गरज लक्षात घेता भारतीय जनता युवा मोर्चाच्या हिंगणघाट शाखेने या रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. रक्तदान हे गरजू रुगणांना जीवनदायी ठरणार असून या लोकोपयोगी कार्यासाठी आमदार समिर कुणावार यांच्या कार्यातूनच प्रेरणा मिळाली, भविष्यातही अशाच प्रकारे आमच्या हातुन सामाजिक कार्य घडत राहिल. अशी ग्वाही भाजयुमोचे प्रदेश सचिव अंकुश ठाकुर यांचेकडून यावेळी देण्यात आली.
याप्रसंगी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांना जन्मदिनानिमित्त उदंड व उत्तम आरोग्य लाभावे यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली. रक्तदान शिबीराला तज्ञ डॉक्टरमंडळी व चमूचे सहकार्य लाभले.
शिबिराच्या यशस्वितेसाठी भाजयुमो हिंगणघाट शहर अध्यक्ष सोनु पांडे, संघटन महामंत्री गौरव तांबोळी, महामंत्री अतुल नंदागवळी, स्वप्निल शर्मा, लिलाधर मांडवकर, उपाध्यक्ष भुषण आष्टनकर, मुकेश सिसोदिया, तुषार हवाईकर, नितीन नांदे, सोशल मीडिया प्रमुख योगेश्वर जिकार, सचिव रितिक दांडेकर, निखिल हिवंज, अक्षय हारघोडे, निरज सैनी, बाबु चौहान, बाबु सतेजा, संपर्क प्रमुख सुरज युवनाथे, राहुल दारुणकर,सतीश खोंडे इत्यादि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
सूर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे वाढदिवसाचे औचित्य सादुन निमगाव सर्कल मधे उपसभापती यांच्या निधितुन कामे

0

 

सुनील पवार. नांंदुरा ता.प्र

आज दि.१८सप्टेंबर रोजी पंतप्रधान जन्म सप्ताह चे औचित्य साधून जि.प.निमगाव सर्कल अंतर्गत निमगाव येथे. मा.उपसभापती प्रभाकर भाऊ वानखडे यांच्या स्थानिक निधितुन कोळी समाजाच्या मागनिवरुन शिव मंदिराला सौरक्षन भिंत तसेच झिंगाभोई यांच्या मागनिवरुन झिंगाभोई वस्ती ला पानिपुरवठा लाईन चा शुभारंभ करण्यात आला हा कार्यक्रम महिला आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला महिला आघाडी च्या अध्यक्षा मा. सभापती सौ.अरचना शिवाजिराव पाटील. उपसभापती प्रभाकर वानखडे. सौ.लासुरकार ताई. गनेश भोपळे. निमगाव सरपंच मिराताई दिनकर कूवारे. बाबुराव शिवलकर. प्रशांत वडोदे उपस्थित होते

साधनव्यक्ती चांगदेव सोरते यांना “इंटरनॅशनल आयडल अवार्ड-२०२१” ने नाशिक येथे सन्मानित.

0

 

आयुषी कुलकर्णी कार्यकारी संपादीका

गडचिरोली:-दिनांक १८,गडचिरोली सारख्या आदिवासी,दुर्गम व नक्षलग्रस्त जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील गट साधन केंद्रात कार्यरत असलेले उपक्रमशील विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल निर्माण फाऊंडेशन नाशिक च्या वतीने ‘इंटरनॅशनल आयडल अवार्ड’-२०२१ ने नाशिक येथे इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सल क्विन मिस शिल्पी अवस्थी,आफ्रिकन अभ्यासक तथा सक्रिय समाजसेवक सान्सी ना बिडान,निर्वाण फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश आंबेडकर,आरती हिरे,विमल बोधरे,डॉ सुरेश देशमुख यांच्या शुभहस्ते
प्रदान करण्यात आले आहे.
चांगदेव सोरते यांनी शाळा बाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी प्रभावी आणि परिणामकारक कार्य केले आहे.सोबतच नियमित विद्यार्थी-शिक्षक यांना आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून शैक्षणिक सहाय्य करण्याचे मौलिक कार्य केले आहे.आतापर्यत अनेक शिक्षक प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.महाराष्टातील बारा जिल्ह्यातील शिक्षण परिषदांना त्यांनी जवळपास सत्तर ते ऐंशी हजार शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे.त्यामुळे त्यांना आतापर्यंत अनेक संस्था व संघटनांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहेत.त्यामध्ये गुरू गौरव,भामरागड भुषण,आयकाॅन ऑफ साऊथ गडचिरोली,प्रेरक अधिकारी,गुणवत्तेचे शिलेदार, आदर्श साधनव्यक्ती,राज्य स्तरीय अध्यापक पुरस्कार,बालरक्षक सारखे इत्यादी पुरस्कार देऊन सोरते यांचा गौरव केल्या गेला आहे.
त्यांनी आपल्या सन्मानाचे श्रेय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली,विद्यार्थी शिक्षक पालक,अधिकारीगण,आप्तेष्ट व मित्रपरिवार यांना दिले आहे.

भाजपा पोहना सर्कलच्या वतीने आमदार समीर कुणावार यांच्या शुभ हस्ते अपंग तरुणाला एक लाखाची आर्थिक मदत

0

 

पोहना येथील गरीब अपंग तरुण सुजित खुशाल राऊत वय २५ वर्ष या तरुणाचा गेल्या पाच वर्षा आधी दुचाकीने अपघात झाला होता त्यामध्ये त्याच्या पायाला जबर दुखापत झाली . गरीबीची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे व्यवस्थित इलाज होऊ शकला नाही . शासकीय दवाखान्यात दोन-तीनदा ऑपरेशन करूनही तो व्यवस्थित चालू शकत नाही पण पोहणा येथेच राहत असल्यामुळे सतत माधवराव चंदनखेडे यांच्या नजरेत येत होता त्याचा अपंगत्व माधवराव चंदनखेडे यांना पावल्या गेलं नाही हा अपंग मुलगा चालायला लागला पाहिजे असा विचार सतत त्यांच्या मनात होता तेव्हा त्यांनी डॉक्टर उमरे नागपुर यांच्याशी संपर्क साधला व या तरुणा बद्दलची माहिती त्यांना दिली त्यावर त्यांनी हा मुलगा दुरुस्त होऊ शकतो असे सांगितले.
लागणारा खर्च करण्याची ताकद त्या कुटुंबात नसल्यामुळे माधवराव चंदनखेडे यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पार्टी पोहना सर्कल च्या वतीने भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून सेवा समर्पण ही भावना जपत आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते त्या गरीब अपंग तरुणाला एक लाख रुपये रोख मदत देण्यात आली व पुढील खर्चाची सुद्धा मदत आपण करू असे आश्वस्त करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, भाजपा जिल्हा महामंत्री किशोर जी दिघे, शिक्षण सभापती मृणालताई माटे, पंचायत समिती सभापती शारदाताई आंबेडकर, पंचायत समिती सभापती सुरेखाताई टिपले, माजी सभापती गंगाधर राव कोल्हे, तालुका अध्यक्ष आकाश पोहाणे, तालुका महामंत्री भाग्येश देशमुख, तुषार आंबटकर, सुरेश वखरे ,नितीन वाघ, चंदू भाऊ माळवे, सुनील सरोदे यासह अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा