Home Blog Page 408

राणा चंदन यांना मदत देतांनाचे उपकारी फोटोसेशन बंद करा… _दवाची व्यवस्था आहे.. केवळ दुवा द्या_

0

 

गेल्या आठवडाभरापेक्षा अधिक कालावधीपासून आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते राणा चंद्रशेखर चंदन मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर औरंगाबाद येथील सिग्मा हॉस्पीटलमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या टिमकडून उपचार सुरु आहेत.. त्यांच्या या
उपचाराचा खर्च कितीही असला तरीही ‘स्वाभिमानी परिवार’ राणा चंदन यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. परंतु राणांच्या या आजारपणात काही जण सहानुभूतिच्या नावाखाली प्रसिद्धीचा स्टंट करीत आहेत. राणा चंदन हे गेल्या 10 वर्षांपासून संघटनेत काम करीत आहे. राणा यांच्या अंगी स्वाभिमानी बाणा आहे.. तोच बाणा त्यांच्या परिवारानेही जपला आहे. स्वाभिमानाने आणि ताठ मानेने जगणाऱ्या चंदन परिवाराने कुणासमोर कधी हात पसरले नाहीत. कारण आमचे नेते राजूजी शेट्टी व रविकांतजी तुपकर हे राणा चंदन आणि त्यांच्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. ‘राणा चंदन पुन्हा तंदुरूस्त झाले पाहीजे, यासाठी पैशांचा डोंगर उभा करण्याची गरज पडली तरी करू’, या भूमिकेतून रविकांतजी औरंगाबादेत तळ ठोकून आहेत.
मात्र काही नेते राणा चंदन यांना तुटपूंजी आर्थिक मदत देत त्याचा गवगवा करीत आहेत. ‘बोटभर मदत आणि हातभर प्रसिद्धी’, करून आपल्या ओंगळवाण्या स्वभावाचे दर्शन लोकांना घडवित आहेत. संघटनेने किंवा राणा चंदन यांच्या परिवाराने आतापर्यंतही मदतीचे आवाहन केलेले नाही, तरीही काहींनी बळजबरीने मदत तर दिलीच परंतु त्याची सोशल मिडीयावर प्रसिद्धीही केली.. भारतीय संस्कृतिमध्ये दानाला महत्व आहे आणि सोबतच हे तत्वही आहे की,दुःखाच्या काळात उजव्या हाताने केलेले दान, डाव्या हातालाही कळू नये… पण मदत करणाऱ्या काही महाभागांनी आपल्या मदतीची विकृतपणे प्रसिद्धी केली. हा प्रकार अत्यंत किळसवाणा आणि राणा चंदन यांच्या परिवाराच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचविणारा आहे…
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे साहेबांनी राणा यांना भेट दिली, कुटूंबाला दिलासा दिला आणि मदतही केली, परंतु साहेबांनी या मदतीचा कुठलाही गाजावाजा केला नाही. डॉ. शिंगणे साहेबांचा हा आदर्श इतर नेत्यांनी जपला पाहीजे.. कुणाच्या गरिबीचा गैरफायदा घेवून स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजणे बंद करावे, अशा भावना जनतेमधून व्यक्त होत आहेत. राणा चंदन यांच्याविषयीची आपुलकी हा भाग वेगळा.. त्यांना भेटायला जाणे हे ही ठिक, मदत करणे हे पण स्वीकारार्ह परंतु केलेल्या मदतीचे ओंगाळवाणे प्रदर्शन करणे कितपत योग्य ? याचे आत्मपरीक्षण संबंधितांनी केले पाहीजे. मदत देतांनाच्या उपकारी फोटोसेशनचा आणि स्टंटबाजीचा निषेध करावा तेव्हढा कमी…!
जर हा प्रकार थांबविला नाही तर जे असला विकृतपणा करीत आहेत, त्यांना त्यांची मदत साभार पोहोचविली जाईल, असा पवित्रा संघटनेने घेतला आहे. सर्वांनी एक लक्षात ठेवावे की, रविकांतजी तुपकर कार्यकर्त्याला बळ आणि पाठबळ देणारा नेता आमच्याकडे आहे.. आमच्या स्वाभिमानाचा सन्मान राखावा आणि राणा चंदन यांना केवळ दुवा द्यावी, दवाची व्यवस्था आम्ही केली आहे. ही विनंती.

आपला – प्रदीप शेळके (स्वा.शे.सं. बुलडाणा)

यावल येथे शिक्षक दिनानिमित्त घरोघरी जावुन माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल पाटील व मित्रांनी शिक्षकांचा केला सन्मान

0

 

यावल( प्रातिनिधी )विकी वानखेडे

येथील नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील व त्यांच्या सहकार्यांनी ५ सप्टेंबर २०२१च्या शिक्षक दिनाचे औचित्य साधुन यावल शहरातील विविध भागात राहणारे गुरुजनांचे त्यांच्या घरोघरी जाऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आल्याचा आगळा वेगळा कार्यक्रम घडवुन आणला. शहरातील साधारणपणे ७८ शिक्षकांना तथा सेवानिवृत्त शिक्षक शिक्षीकांचे या शिक्षक दिनाच्या निमित्ताने सन्मानित करण्यात आले व त्या सन्मानित करण्यात आलेल्या गुरूवर्यांचे आशिर्वाद घेतले . यावेळी या अनोख्या शिक्षक सन्मानित कार्यक्रमात यावल नगरपरिषदेचे नगरसेवक व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्यासह सामाजीक कार्यकर्ते एजाज देशमुख , हाजी फारुख मोमीन, गणेश महाजन, आशिष पाटील सर, शब्बीर तडवी, गणेश जोशी, मोसिन कुरेशी, भरत कोळी, प्रशांत पाटील, उदय पाटील यांनी या सन्मानित कार्यक्रमात आपला सहभाग घेतला . अतुल पाटील व त्यांच्या सहकार्यांनी केलेल्या या सन्माना बद्दल सर्व शिक्षकांनी आनंद व्यक्त करून त्यांचे आभार मानले . यावेळी अतुल पाटील यांचे गुरू तथा आदीवासी तडवी भिल्ल एकता मंचाचे , महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम बी तडवी सर यांनी आपले शिष्य अतुल पाटील यांनी केलेले कार्य हे अतुलनिय असल्याचे म्हटले .

राष्ट्रीय महामार्ग क्र.४४ वर जाम ते नागपुर जाणा-या रस्त्यावर उभ्या असलेल्या स्कॉर्पियोवर प्लेझर वाहनाने धडक

0

 

समुद्रपूर :- दुपारी ३.१५ वाजताचे दरम्यान घडली.
सदर घटना नागपुर रस्त्यावरील हॉटेल संतराम जवळ घडली असून मोपेडचालक कु.तृप्ती विठ्ठलराव किनकर(२१) या युवतीला तसेच तीच्या आईला गंभीर दुखापत झाली.
घटनेच्या वेळी एम.पी.५०-बीसी ०८९० ही स्कार्पियो गाडी रस्त्याचे बाजुला उभी होती,यावेळी कु.तृप्ती ही आपल्या आईसह प्लेझर दुचाकी क्र. एम.एच.३२- एए ०३५० घेऊन लक्ष नसल्याने
उभ्या स्कॉपीओला मागुन
धडकली. त्यामधे मोपेड चालिका व मागे बसलेली तिची आई सौ. चेतना किनकर (४५) रा.शेडगाव
रस्त्यावर पडल्याने पायाला व तोंडाला जबर मार लागुन गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहीती प्राप्त होताच जाम महामार्ग पोलीस चौकीतील पोलिस उपनिरीक्षक दिलीप थाटे, पोलीस अमलदार पोहवा भारत
पिसुड्डे, नरेंद्र दिघडे, सुनिल भगत, गौरव खरवडे, पोना राहुल कुमरे, विनोद थाटे, प्रविण चव्हाण,
दिपक जाधव, किशोर लभाने, चामपोना जोती राऊत यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचुन जख्मी आई व मुलीस रूग्णवाहीकेद्वारा ग्रामीण रूग्णालय समुद्रपुर येथे दाखल केले.
पुढील तपास समुद्रपुर पोलिस करीत आहे. सदरची कार्यवाही महामार्ग पोलीस केंद्र जामचे प्रभारी अधिकारी
सहायक पोलिस निरीक्षक संतोष सपाटे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा.

प्रेमाच्या चहा’ मधे जखमी झालेल्या मोटवाणी व साथीदारांवर पोलिसांनी केले गुन्हे दाखल

0

 

हिंगणघाट ,दि.६
शहरातील मोहता चौक येथील ‘प्रेमाचा चहा’ येथे एका व्यावसायिकास प्राणघातक शस्त्राने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना दि.४ रोजी घडली असून त्याच दिवशी पहाटे आरोपिंना पोलिसांनी अटक केली असून ठाकुर पितापुत्रांना हिंगणघाट न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
या दरम्यान संतोष ठाकुर यांचे तक्रारीवरुन पोलिसांनी जखमी झालेल्या इंद्रजीत मोटवानीसह मनोहर बलवानी,सुमित आहुजा,पप्पू मोटवानी,देवू मोटवानी,जीतू मोटवानी यांचेवरही आता गुन्हा नोंद करीत कारवाई केली आहे.
संतोष ठाकुर यांचे स्थानिक पंजाब नेशनल बँक परिसरात एक दुकानाचा गाळा आहे,तो गाळा मोटवानी यांना भाडयाने दिला आहे, आरोपी संतोष ठाकुर यांनी हा गाळा खाली करुन देण्यासाठी मोटवानी बंधुकडे तगादा लावला होता,दुकान रिकामे करुन देण्याचे कारणावरुन मोटवाणी परिवाराचे सदस्यांना यास संतोष ठाकुर याने शिविगाळ केली,याचा जाब विचारण्यासाठी ठाकुर यांचे ‘प्रेमाचा चहा’ येथे गेलेल्या इंद्रजीत मोटवानी व सहकाऱ्यावर ठाकुर पितापुत्रानी प्राणघातक हत्याराने हल्ला चढविला.
सदर घटनेची तक्रार प्राप्त होताच शहर पोलिसांनी आरोपी विक्रम ठाकुर,संतोष ठाकुर व त्यांचा एक साथीदार अफसरखान पठान यास अटक केली असून कलम ३०७,२९४,३४ भादंवीनुसार गुन्हा नोंद केला.सदर प्रकरणी ठाकुर कंपनीच्या सदस्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे,
संतोष ठाकुर यानेसुद्धा मोटवानी व साथीदारांनी हल्ला केल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती, पोलिसांनी मात्र सदर तक्रार प्रलंबीत ठेवली होती,परंतु आता पोलिसांनी इंद्रजीत मोटवानी यांचेसह इतर ५ जनांवरती भादंवीच्या कलमांन्वये १४३,१४७,१४८,१४९,३२४,३२३,४५२,२९४,५०६ गुन्हा दाखल करण्यात आला.
सूर्य मराठीन्यूज साठी सचिन वाघे वर्धा

लवळे ग्रामपंचायतीच्या वतीने विदयार्थ्यांचा सत्करा समारंभ…. सरपंच निलेश भाऊ गावडे

0

 

लवळे ग्राम पंचायतीच्या वतीने लवळे गावातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्य १५० विदयार्थ्यांना सन्मानित करण्यात आले करोना काळत ज्यांचा माता पित्यांचे छत्र हरवले आहे त्या मुलाचा शिक्षणाचा खर्च करणार आहेत त्यासाठी लवळे ग्रामपंचायतीत शैक्षणिक निधी कमेटी स्थापन करण्यात आली आहे. ग्रामस्थांकडून त्यात लगेच एक लाख रुपये रक्कम जमा झाली. या कार्यक्रमासाठी उद्योजक नाथाजी राऊत, सरपंच निलेश भाऊ गावडे, डी वाय एस पी उत्तमजी तांगडे साहेब, अॉड उत्तम डोरे, जिल्हापरिषध सदस्य शंकरभाऊ मांडेकर,जे बी केमिकलचे एम डी श्रीधर जोशी, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष महादेव अण्णा कोंढरे, डॉ विजय सातव , उपसभापती विजय केदारी , कृषी अधिकारी आनंद राऊत, प्रभाकर राऊत , माजी विस्तार अधिकारी जयवंताबाई चांदिलकर, कृषी बाजार समितीचे उपसभपती दगडूनांना करंजावणे, डॉ अजित कुमार शितोळे, उधोजक श्रीकांत शितोळे, वसंतराव शितोळे, गणेश भाऊ गावडे, पोलीस पाटील संपत राऊत , माजी ग्राम विकास अधिकारी आल्हाट, तंटामुक्तीचे अध्येक्ष बाळासाहेब टकले,पोपट कळमकर, अमोल सातवअधीकारी व्ही. डी. साकोरे , उपसरपंच रणजित राऊत, ग्रामपंचायतीचा सदस्य वर्षा राऊत, किमया गावडे, नर्मदा टकले, सुजाता मोरे, साधना सातव, सायली सातव, श्रीमती राणीताई केदारी तसेच उपसरपंच राऊत यानीं प्रस्ताविक केले यावेळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी इतर कार्यक्रमाचेही नियोजन करण्यात आले या वेळी सरपंच निलेश भाऊ गावडे यानीं इतरांचा मतास सहमत होऊन कार्यक्रमाची सांगता केली

डोंगर कठोरा येथील अ .ध .चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक नितिन झांबरे सर शिक्षक महर्षी पुरस्काराने सन्मानित

0

 

यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अ .ध .चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज चे मुख्याध्यापक नितिन झांबरे यांचा एक उत्कृष्ठ शिक्षक म्हणुन मागील २१वर्ष पासुन ज्ञानदानाची सेवा देणारे मुख्यध्यापक यांना शिक्षक महर्षी या पुरस्काराने सन्मानित . आज भुसावळ येथे रोटरी क्लब ऑफ भुसावल ताप्ती व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमाने “सन्मान गुरुवार्याचा”अंतर्गत”शिक्षक महर्षी पुरस्कार २०२१”ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन नितिन भास्कर झांबरे यांना गौरविण्यात आले , भुसावळ येथील रॉटरी हॉल मध्ये संपन्न झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळया प्रसंगी नाशिक पदवीधर शिक्षक आमदार डॉ.सुधीर तांबे,भुसावळचे आमदार संजय सावकारे,अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन,ग.स.चे माजी अध्यक्ष तुकाराम बोरोले, डॉ.संजीव भटकर यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला . त्यांना मिळालेल्या या पुरस्कारा बद्दल अ .ध . चौधरी विद्यालयाचे संस्थेचे सर्व संचालक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तथा पत्रकार डी बी पाटील , पत्रकार राजु कवडीवाले , पत्रकार अय्युब पटेल, पत्रकार शेखर पटेल , पत्रकार अरूण पाटील ,पत्रकार सुनिल गावडे , सुधीर चौधरी सर , तेजस यावलकर , ज्ञानदेव मराठे , महेश पाटील , आर ई पाटील , सुनिल पिंजारी , पत्रकार नरेन्द्र सपकाळे, पत्रकार भरत कोळी , पत्रकार विक्की वानखेडे आणी दिपके नेवे आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्यात .

राज्यातील अपंगांनी कल्याण अपंग आयुक्त पुणे येथे घेराव आंदोलनमध्ये सहभागी व्हा…..जिल्हाध्यक्ष मयूर मेश्राम

0

 

अपंग नेते शेख अनिस पत्रकार यांच्या नेत्रूत्वत होणार आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी. हंसराज उके अमरावती

अमरावती ::– अपंग जनता दल ही एक सामाजिक संघटना असून या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य ची अपंगांची बुलंद आवाज श्री शेख अनिस पत्रकार यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अपंगांसाठी न्याय व हक्काचे कार्य सुरू असून ग्रामीण व शहरी भागातील गरीब गरजू अपंगांना शासनाच्या योजना व सवलतीचा लाभ मिळावे यासाठी शासना कडून नियमवाली बनविण्यात यावी व अपंगांचा जीवनाशक मागण्या साठी अपंग जनता दल (सामाजिक संघटना) महाराष्ट्र राज्य च्या वतीने दि. 09/09/2021 रोजी अपंग कल्याण आयुक्त पुणे येथे घेराव आंदोलनच अपंग नेते शेख अनिस पत्रकार याचा नेतृत्वात आयोजन करण्यात आले आहे तरी या आंदोलनाला महाराष्ट्रातील अपंगांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहावे असे आव्हान अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा अमरावती जिल्हा अध्यक्ष मयूर मेश्राम,महासचिव राजिक शाह. राहुल वानखेडे. शेख बबू,राहुल रामटेके,अजय वाहूरवाघ, अन्वर शाह. मुतालिक चाऊस. ये माहिती देतानी उपस्थित होते

प्राणघातक शस्त्राने जखमी केल्याबद्दल प्रेमाचा चहा संचालक संतोष ठाकूर ,विकी ठाकूर पितापुत्र सहित अफसर पठाण यास अटक

0

 

5 सप्टेंबर
हिंगणघाट शहरातील मोहता चौक येथील ‘प्रेमाचा चहा’ येथे एका व्यावसायिकास प्राणघातक शस्त्राने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना काल सायंकाळी 7.30 वाजताचे दरम्यान घडली.
याप्रकरणी प्रेमाच्या चहाचे संचालक संतोष गौतम(ठाकुर) पितापुत्रासह अफसर खान पठाण याला अटक करण्यात आली.
फिर्यादिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार संतोष ठाकुर यांचे स्थानिक पंजाब नेशनल बँक परिसरात एक दुकानाचा गाळा आहे,तो गाळा फिर्यादि मोटवानी यांना भाडयाने दिला आहे,तेथे मोटवानी यांचे प्रिन्सेस गारमेंट नावाने रेडीमेड कापड दुकान आहे.
आरोपी संतोष ठाकुर यांनी हा गाळा खाली करुन देण्यासाठी मोटवानी बंधु कडे तगादा लावला होता,दुकान रिकामे करुन देण्याचे कारणावरुन फिर्यादि इंद्रजीत प्रल्हाद मोटवाणी यास आरोपीने शिविगाळ केली,याचा जाब विचारण्यासाठी ठाकुर यांचे ‘प्रेमाचा चहा’ येथे गेलेल्या फिर्यादि इंद्रजीत मोटवानी व त्याचे मित्रांवर संतोष ठाकुर,मुलगा विकी ठाकुर,अफ़सर पठाण इत्यादिनी प्राणघातक शस्त्राने जखमी करीत हल्ला चढविला.
सदर घटनेची तक्रार प्राप्त होताच शहर पोलिसांनी आरोपी विक्रम ठाकुर,संतोष ठाकुर व त्यांचा एक साथीदार अफसरखान पठाण यास ताब्यात घेतले असून कलम 307,294,34 भादंवीनुसार गुन्हा नोंद केला.
सदर प्रकरणी संतोष ठाकुर यानी सुद्धा पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी एक तर्फी कारवाई केल्याचा आरोप संतोष ठाकुर यांनी केला आहे.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

साने गुरूजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा, शिक्षक व पत्रकारांना केले सन्मानित

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

यावल येथील साने गुरूजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त समाजाचे मार्गदर्शक शिक्षकांचा व लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकार यांचा आज रविवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतूल पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी अतूल पाटील म्हणाले की, शिक्षणातुन संघर्ष करण्याची जिद्द निर्माण होते, आपले हक्क मिळवण्याची शक्ती मिळते, लोकशाहीत शिक्षणातुन आपले मत मांडण्याची ताकत आपल्याला मिळते. यातुनच एक चांगला व्यक्ति निर्माण होतो. यामुळेच शिक्षकांबदल आपल्याला आदर आहे. आपल्या देशात न्यायालय आणि न्यायाधिश यांना सर्वोच्च मानले जाते. आपण त्यांच्यासमोर झुकतो. परंतू विदेशात जर न्यायालयात शिक्षक आले तर न्यायाधिश हे उभे राहून त्यांचा सन्मानासाठी आदराने झुकतात. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकाबद्दलची आदराची भावना निर्माण करणे हे पालकांची जबाबदारी असल्याचे मनोगत माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील यांनी व्यक्त केलीत.

साने गुरूजी विद्यालयाच्या आवारात आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राकेश कोलते , शालेय समितीच्या सभापती रेखा चौधरी, नगरसेवक शेख असलम शेख नबी, नगरसेवक अभीमन्यु चौधरी, नगरसेवक समिर शेख मोमीन, सामाजीक कार्यकर्ते दिलीप वाणी, गणेश महाजन, हाजी फारूक शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमात सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पण करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे मुख्यध्यापक एम. के. पाटील यांनी केले तर कार्यक्रमात पाहुण्यांचा परिचय व सुत्रसंचालन डी. एस. फेगडे यांनी केले तर आभार एम एस चौधरी यांनी मांडले .

एस एस एम विद्यालयात शिक्षक दिन व सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न    

0

प्रोग्रेसिव एजुकेशन सोसायटी हिंगणघाट द्वारा संचालित एस. एस. एम.विद्यालय, हिंगणघाट येथे शिक्षक दिन व सत्कार समारंभ कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सदस्य श्री संजयराव देशपांडे शाळेचे मुख्याध्यापक श्री प्र. ल.देशपांडे पर्यवेक्षक श्री भ.तु. धोंगडे सकाळ पाळी प्रमुख श्री रा.ता.कारवटकर पालक श्री भास्करराव नवघरे  प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन माता सरस्वती  व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व वंदनेने झाली श्री गावंडे व श्री झाडे यांनी स्वागत गीत व वैयक्तिक गीत सादर केले  यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.तसेच संस्थेचे सदस्य श्री संजयराव देशपांडे यांच्या हस्ते  शालांत प्रमाणपत्र परीक्षेत शाळेतून प्रथम आलेल्या कु. मोहिनी नवघरे या विद्यार्थिनीचा सत्कार संस्थेच्या वतीने मेडल देऊन करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री देशपांडे यांनी केले त्यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली व सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.श्री भास्करराव नवघरे यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी वेळेचे नियोजन फार महत्त्वाचे असते असे सांगितले.
यावेळी मार्गदर्शक शिक्षिका सौ हिंगमीरे यांनी गुरू शिष्य परंपरेचे महत्व सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सदस्य श्री संजयराव देशपांडे यांनी देशाची भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकाच्या सन्मानाचा दिवस हा शिक्षक दिन आहे. तसेच शिक्षक दिन हा शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करणारा दिवस आहे भारतात प्राचीन काळापासून गुरू शिष्य परंपरेला महत्त्व आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सौ नंदनवार यांनी व आभार पर्यवेक्षक श्री धोंगडे यांनी मानले कार्यक्रमाचा शेवट एकात्मता मंत्राने झाला.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा