Home Blog Page 411

लोकशाहीर अन्नाभाऊ साठे नगरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रशासकीय मंजूर कामाना तात्काळ सुरवात करावी

0

 

सुनील पवार. नांदुरा ता.प्र

लोकशाहीर अन्नाभाऊ साठे नगरी वस्ती सुधार योजना हि.मागासवर्गीयांचे राहनिमान उच्चावे हा या योजनेचा उद्देश आहे त्या नुसार ह्या योजनेअंतर्गत विविध कामाना प्रशासकीय मंजुरी मिळालेली असून निधि सुध्दा उपलब्ध आहे प्रशासकीय मान्यता तसेच निधि उपलब्ध असताना एकाही कामाला सुरुवात झालेली नाही यावरुन मागासवर्गीयाप्रति मुख्य धिकारि यांचि भुमिका आकस असलेलि दिसुन येत आहे. तरी प्रशासकीय मान्यता व.निधि उपलब्ध असलेली कामे पंधरा दिवसाच्या आत सुरवात करावी अन्य था बहुजन समाज पारटी मलकापूर विधानसभा नांदुरा युनिट दारा लोकशाही मार्गाने आंदोलन करेल ह्यामध्ये धरने आंदोलन. रस्ता रोको उपोशन यांचा समावेश राहिल यामुळे नगरपरिषध प्रशासन जबाबदार राहील अशा आशयाचे निवेदन मुख्य धिकारि नगर परिषध नांदुरा यांना देण्यात आले आहे ह्या निवेदनावर सुशिल इंगळे. अनिल वाकोडे. शकिल भाई. देविदास गोरे संतोष तायडे इत्यादि कार्य करते यांच्या सह्या आहेत

कोरपावली ग्रामपंचायतीला कायमचे ग्रामसेवक मिळत नसल्याने गावातील विकास कामे व समस्या कशी सुटणार : सरपंच विलास अडकमोल

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

 

तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतीला कायमचा ग्रामसेवक मिळावा या मागणीचे निवेदन सरपंच विलास नारायण अडकमोल यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील यांच्याकडे दिले असुन लोकप्रतिनिधींना जर नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असलेले ग्रामसेवक मिळत नसेल तर आम्ही काय करावे असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला . दरम्यान कोरपावली तालुका यावल ग्राम पंचायतचे ग्रामसेवक प्रविण सपकाळे यांनी ग्रामपंचायतीच्या गोंधळलेल्या कारभारामुळे तात्काळ बदली करण्यात आली असुन , प्रविण सपकाळे यांच्या बदलीच्या जवळपास दोन महीन्यानंतर ही कोरपावली ग्रामपंचायतीला अद्याप कायमचे ग्रामसेवक मिळत नसल्याने सरपंच , उपसरपंच व त्यांच्या सहकार्यांना गावपातळीवर विकासकामे करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे . दरम्यान या संदर्भात आज कोरपावली ग्रामपंचायतीचे सरपंच विलासा नारायण अडकमोल यांनी आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ .निलेश शांताराम पाटील यांची भेट घेवुन आपल्या ग्रामपंचायतीला कायम गावाग्रामसेवक नसल्याने गावाच्या विविध विकास कामे करण्यात येत नसल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर गावातील ग्रामस्थ मंडळी कडुन नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याची माहीती त्यांनी गटविकास अधिकारी यांना दिली , यासंदर्भात आपण दोन दिवसा निर्णय घेवु असे आश्वासन याप्रसंगी गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील यांनी दिले असुन , या संदर्भात काही ग्रामसेवकांच्या कार्यपद्धती बद्दल तक्रारी देखील असुन आपण अशा बेशीस्त वागणाऱ्या ग्रामसेवकांना आपल्या पध्दतीने शिस्त लावणार असल्याचे सांगुन काही ग्रामसेवकांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली तसेच पंचायत समिती स्तरावर सहा ग्रामविकास अधिकारी आणी चार ग्रामसेवकांच्या जागा या अद्याप ही आपल्याकडे रिक्त असल्याच्या त्यांनी सांगीतले.

अँड.देवकांत पाटील यांची भारतीय मानवाधिकार न्याय व सुरक्षा परिषदेच्या उतर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड

0

 

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील यावल तालुक्यातील विरावली गावाचे रहीवासी अॅड देवकांत पाटील यांची जळगांव जिल्हाअध्यक्ष पदावरून पदोन्नती करण्यात आली असुन त्यांना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय मानवाधिकार न्याय व सुरक्षा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्की राजपूत यांनी अँड. देवकांत बाजीराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
भारतीय मानवाधिकार न्याय व सुरक्षा परिषदेचे जळगांव जिल्ह्यात संघटनेचे चांगले काम केल्या बद्दल दखल घेऊन प्रदेश अध्यक्ष विकी राजपुत यांनी अँड . देवकांत बाजीराव पाटील यांची बढती देत उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे .
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून मिळालेल्या जबाबदारीचे बद्दल विश्वास दर्शविला म्हणून आभार व्यक्त करत मिळालेल्या या संधी म्हणून सोनं करुन जिथे -जिथे मानवाधिकाररांचे उलंघन होऊन तिथे अन्याय होईल तेथे न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू. व मानवाधिकार बरोबरच त्यांचे संरक्षण करुन या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करू असे पाटील यांनी सांगितले.
पाटील यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष विकी राजपूत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले ,माजी नगराध्यक्ष अतुल पाटील ,काँग्रेस चे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे ,प. स. गटनेते शेखर सोपान पाटील जिल्ह्या परिषदेचे शिक्षण आरोग्य तथा क्रीडा सभापती रवींद्र पाटील , माजी उप सभापती दीपक पाटील , उंटावद वि का सा चे चेअरमन शशिकांत पाटील , मराठा सेवा संघ तालुका अजय पाटील , शरद राजपूत , गणेश राजपूत
,प्रकाश पाटील , त्याच बरोबर यावल वकील बार संघ अध्यक्ष धीरज चौधरी , सचिव निलेश मोरे व सर्व वकील सहकारी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.

तहसील कार्यालयात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न

0

 

आमदार कुणावार यांनी केले शासकीय निर्बंध पाळण्याचे आवाहन
हिंगणघाट दि.९ ऑगस्ट
येत्या गणेशोस्तवाच्या पार्श्वभूमिवर आज दि.९ रोजी
स्थानिक उपविभागीय कार्यालय सभागृहात शांतता समितीची सभा संपन्न झाली.यावेळी आमदार समीर कुणावार यांनी तालुक्यात कोरोना तसेच डेंगु,मलेरियासारख्या साथीचा रोगांचा फैलाव झाला असल्याने नागरीकांनी शासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.
उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी तसेच पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी गणेशोत्सव व तत्सम सणासुदीचे काळात शासकीय निर्बंध असल्याने ते पाळण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले,कोरोनाची तीसरी लाट येऊ पहात आहे,तीला रोखण्यासाठी नागरिकांना सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन न करता आभासी माध्यामातुन दर्शन व कार्यक्रम घेण्याचे आवाहन बैठकीचेवेळी करण्यात आले,भाविकांनी मास्क, सैनीटायजरचा वापर करीत सोशल डिस्टनसिंग पाळण्याच्या सुचना जनतेला देण्यात आल्या.
सदर बैठकीचे अध्यक्षस्थानी हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले या होत्या.यावेळी तहसीलदार श्रीराम मुंदड़ा,ठाणेदार संपत चव्हाण इत्यादि अधिकाऱ्यांसह शहरातील राजकीय पक्षाचे तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते.
बैठकीच्यावेळी नायब तहसीलदार पठाण,माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे,भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बिस्मिल्लाह खान,वणा संवर्धन समितीचे रूपेश लाजुरकर,नगरसेवक प्रकाश राऊत,माजी नगरसेवक अशोक रामटेके,सुनील डोंगरे,आशिष भोयर,गौरव तिमांडे,सामाजिक कार्यकर्ता तुषार हवाईकर,शंकर मुंजेवार, ज्वलंत मुन, समाज सेवक दिनेश कुमार वर्मा. इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

शेगांव येथील बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह अखेर खदाणीतील पाण्यात तरंगत आढळला।

0

 

शेगांव,,,आशाबाई नामदेव टवरे ही 55 वर्षीय महिला धनोकार नगर शेगांव येथून आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार पती नामदेव विश्वनाथ टवरे यांनी शेगांव शहर पोलीस स्टेशन ला दिनांक 29,08,2021रोजी दिली होती , सदर महिलेला शोधण्यासाठी त्या महिलेच्या पतीने आपल्या सर्व नातेवाईकांना विचारणा केली परंतु ही महिला नातेवाईकांकडे ही नसल्याने त्यांनी परीसरात शोध चालू केला तरीही महिला सापडली नाही,अखेर तब्बल अकरा दिवसांनी ही माहिला शेगांव येथील आशापुरी सा मिल जवळील इंदरमलजी मुरारका यांच्या मालकीच्या जगेतील खदानमधिल साचलेल्या पाण्यात आज दिनांक 8सप्टेंबर2021रोजी सकाळी अकरा वाजेदरम्यान या महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगत असतांना सापडला , सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन शेगांव शहर ला देण्यात आली,माहिती मिळताच पोलिस हेडकॉस्टबल गजेंद्र रोहनकार, कॉस्टबल नरेश तायडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सदर प्रेत पाण्यातून काढून शवविच्छेदन साठी सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालय शेगांव येथे पाठवण्यात आले, सदर घटना ही पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे।

जिल्ह्यात गणपती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करा जिल्हा पोलिसांचे आवाहन

0

 

कुठलाही नियमाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या

बुलडाणा पोलिसांनी शेगाव मध्ये रुटमार्च काढत यावर्षी चा गणेश उत्सव अतिशय साध्या पध्दत ने साजरा करा असे आवाहन केलं आहे कुठलीही अनुचित प्रकार न घडता कोरोना च्या नियमाचे पालन करावे शासनाने आखून दिलेल्या नियमाचे पालन करत गणेश उत्सव साजरा करा त्या मध्ये 4 फुटाच्या वर गणेश मूर्ती चि स्थापना नको अस सूचित करत शेगावात पोलिसांनी रूट मार्च काढला शहराच्या प्रमुख मार्गाने हा रूट मार्च काढण्यात आला तर गणेशोत्सव च्या स्थापणा वरून दक्षता घ्यावी अस आवाहन पोलिसाकडून करण्यात आल आहे

 

दुःखद बातमि स्वाभिमानीचे राणा चंदन कालवश

0

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा शाखेचे विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंद्रशेखर चंदन यांनी आज गुरुवार 9 सप्टेंबर रोजी पहाटे औरंगाबाद येथील सिग्मा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला, मृत्युसमयी त्यांचे वय 34 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात आई, 2 भाऊ, पत्नी व दोन मुली त्यात एक 3 वर्षाची व एक 1 वर्षाची आहे.

राणा चंद्रशेखर चंदन हे गत महिनाभरापासून किडनी विकार व स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त होते, बुलडाणा व नंतर औरंगाबाद येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. गत दोन दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटर अर्थात जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांची प्राणज्योत मालवली.

राणा चंदन हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे उजवी हात समजले जात होते, विविध शेतकरी व युवकांच्या आंदोलनात राणा आक्रमकपणे कायम आघाडीवर असायचा, रुग्णांसाठी व कोणत्याही सरकारी कामासाठी धावून जाणारा हा रस्त्यावरचा युवा कार्यकर्ता म्हणूनही राणाची ओळख होती. त्यामुळे त्याच्या आजाराचे वृत्त समजताच पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. संजय गायकवाड माजी आमदार विजयराज शिंदे, राजश्री पतसंस्थेचे संदीप शेळके यांच्यासह विविध नेते व मान्यवरांनी औरंगाबादला जाऊन राणाची भेट घेऊन उपचारासाठी आर्थिक मदतही केली, परंतु उपचाराचा मोठा भार हा सर्वस्वीपणे रविकांत तुपकर यांनी उचलला.. पण एवढे सर्व करूनही राणाचा आजार बळावतच गेला व अखेर त्याने या जगाचा निरोप घेतला.

राणा चंदन यांचे पार्थिव दुपारपर्यंत औरंगाबाद वरून बुलडाण्याला आणण्यात येणार असून, नंतर ते स्वाभिमानी हेल्पलाइन सेंटरच्या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. नंतर पार्थिवाला घरी नेऊन सायंकाळी 5 वाजता संगम तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

पत्रकारावर ब्लॅकमेलिंग करण्याचा आरोप करणारा ए. एस. के रेस्टॉरंट संचालक रवी कांबळे यांनी विष प्राशन केले

0

 

दि.८ ऑगस्ट
राष्ट्रीय महामार्गावरील उबदा येथील एका हाॅटेल व्यवसायीकाला अवैद्य धंन्दे करीत असल्याची धमकी देऊन पैश्याची मागणी केल्याप्रकरणी समुद्रपुर पोलिसात तक्रार दाखल केल्या नंतर यातील आरोप करणारा हाॅटेल संचालक रवि कांबळे याने शहरातील विरभगतसिंग वार्ड येथील निवासस्थानी विष प्राशन केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.
आज दि.८ रोजी रवी कांबळे याने विष प्राशन केल्यानंतर त्याला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचेवर उपचार सुरु आहेत.
या प्रकरणी स्थानिक प्रसार माध्यमांमध्ये सदर वृत्त प्रसारीत झाल्याने तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात सर्वत्र खळबळ माजली आहे
या हाॅटेल व्यावसायीकाने पत्रकारांनी ब्लकमेल करीत असल्याचा आरोप लावित समुद्रपुर पोलिसात दोन पत्रकारांविरोधात तक्रार दाखल केली.
यानंतर वर्धा येथील एका नांमवत दैनिकाच्या जिल्हा प्रतिनिधीने सुध्दा वर्धा पोलिसात खोटी तक्रार देऊन मला फसविण्याचा प्रयत्न असल्याचे निवेदन दिले.
उबदा येथील ए एस के रेस्टोरेंट हे येथील व्यवसायीक अनिकेत कांबळे यांच्या कुटूबियांच्या नावावरती असुन ते एका मोठ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत , हाॅटेल संचालक रवि कांबळे यांनी आज हिंगणघाट येथील निवासस्थानी विष प्राशन केल्याने जिल्ह्यात सर्वत्र खळबळ माजली आहे.
सूर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे

सांगवी खुर्द येथील किराणा दुकानाचे अतिक्रमणाच्या वादातुन महिलेची विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

तालुक्यातील सांगवी येथील अतिक्रमित टपरी पोलीस बंदोबस्तात काढत असतांना टपरीधारक महिलेने विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडल्यानंतर गावात खळबळ उडाली होती. यावल ग्रामीण रूग्णालयात महिलेला उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. भिमाबाई लक्ष्मण पाटील (वय-५५) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील सांगवी येथील विठ्ठल रूखमाईचे मंदीराजवळ रविंद्र लक्ष्मण पाटील रा. सांगवी खूर्द यांची लहान किराण्याची टपरी आहे. बाजूला मंदीर असल्यामुळे किर्तन सप्ताह व लग्न समारंभचे कार्यक्रम होत असतात. त्याचप्रमाणे सकाळी आरती होते त्यावेळी दुकानावर गर्दी होत असते. कोरोनाच्या काळाता नियमांचे उल्लंघन केले जात नाही. त्यामुळे स्थानिक रहिवाशी यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती. त्यानुसार ग्रामपंचायतीने किरणादुकान मालक रविंद्र पाटील यांना टपरी हटविण्याबाबत ३ मार्च, १६ मार्च आणि २२ मार्च रोजी अशा तीन नोटासा पाठविण्यात आल्या होत्या. परंतू आजपर्यंत त्यांनी किराणा टपरी हटविली नाही. त्यानुसार आज उपसरपंच आकाश धनगर यांनी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमित असलेले दुकान काढण्यासाठी आले. त्यावेळी दुकानदार रविंद्र पाटील यांची पत्नी भिमाबाई लक्ष्मण पाटील (वय-५५) यांनी विष घेवून दुकानासमोर झोपल्या. त्यामुळे अतिक्रमणाची कारवाई स्थगित करण्यात आले असून महिलेला यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील स्नेहल किसान नर्सरी समोर दुचाकी अनियंत्रित होऊन 1 जागीच मृत्यू तर 2 गंभीर जखमी

0

 

 

हिंगणघाट शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर 4 वाजताच्या दरम्यान स्नेहल किसान नर्सरी समोर सिबीझेड दुचाकी क्रमांक एम एस 40 ए.ए 8214 ने 3 व्यक्ती भरधाव वेगाने जात असताना अचानक त्यांची दुचाकी अनियंत्रित होऊन झालेल्या या भिषण अपघातात 1 जागीच मृत्यू तर 2 गंभीर जखमी झाले आहे. माहिती वरून हे 3 व्यक्ती गिमा टेक्सटाइल येथिल कामगार असल्याचे समजते. या अपघातात घटनास्थळी मुत्यू व्यक्तीचे रसत्याच्या कडेला असलेल्या कठड्याला जबर डोक आदळल्याने भेजा बाहेर निघून त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती हिंगणघाट पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक संपतजी चव्हान, पोलीस उपनिरीक्षक गिरधर पेंदुर,,दिपेश ठाकरे, अमोल लगड, वाहतूक पोलीस अझर खान, प्रदिप राठोड, पोलिस कर्मचारी नितीन राजपूत,दिपक मसके,अनिल केकपुरे, पवार, यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी व्यक्तीला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र अद्याप तरी मुत्यक व जखमी व्यक्तीची ओळख पटली नसुन पोलिसांकडून नावे शोधण्याचे काम सुरू आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा