Home Blog Page 413

साने गुरूजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा, शिक्षक व पत्रकारांना केले सन्मानित

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

यावल येथील साने गुरूजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त समाजाचे मार्गदर्शक शिक्षकांचा व लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकार यांचा आज रविवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतूल पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी अतूल पाटील म्हणाले की, शिक्षणातुन संघर्ष करण्याची जिद्द निर्माण होते, आपले हक्क मिळवण्याची शक्ती मिळते, लोकशाहीत शिक्षणातुन आपले मत मांडण्याची ताकत आपल्याला मिळते. यातुनच एक चांगला व्यक्ति निर्माण होतो. यामुळेच शिक्षकांबदल आपल्याला आदर आहे. आपल्या देशात न्यायालय आणि न्यायाधिश यांना सर्वोच्च मानले जाते. आपण त्यांच्यासमोर झुकतो. परंतू विदेशात जर न्यायालयात शिक्षक आले तर न्यायाधिश हे उभे राहून त्यांचा सन्मानासाठी आदराने झुकतात. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकाबद्दलची आदराची भावना निर्माण करणे हे पालकांची जबाबदारी असल्याचे मनोगत माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील यांनी व्यक्त केलीत.

साने गुरूजी विद्यालयाच्या आवारात आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राकेश कोलते , शालेय समितीच्या सभापती रेखा चौधरी, नगरसेवक शेख असलम शेख नबी, नगरसेवक अभीमन्यु चौधरी, नगरसेवक समिर शेख मोमीन, सामाजीक कार्यकर्ते दिलीप वाणी, गणेश महाजन, हाजी फारूक शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमात सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पण करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे मुख्यध्यापक एम. के. पाटील यांनी केले तर कार्यक्रमात पाहुण्यांचा परिचय व सुत्रसंचालन डी. एस. फेगडे यांनी केले तर आभार एम एस चौधरी यांनी मांडले .

एस एस एम विद्यालयात शिक्षक दिन व सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न    

0

प्रोग्रेसिव एजुकेशन सोसायटी हिंगणघाट द्वारा संचालित एस. एस. एम.विद्यालय, हिंगणघाट येथे शिक्षक दिन व सत्कार समारंभ कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सदस्य श्री संजयराव देशपांडे शाळेचे मुख्याध्यापक श्री प्र. ल.देशपांडे पर्यवेक्षक श्री भ.तु. धोंगडे सकाळ पाळी प्रमुख श्री रा.ता.कारवटकर पालक श्री भास्करराव नवघरे  प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन माता सरस्वती  व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व वंदनेने झाली श्री गावंडे व श्री झाडे यांनी स्वागत गीत व वैयक्तिक गीत सादर केले  यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.तसेच संस्थेचे सदस्य श्री संजयराव देशपांडे यांच्या हस्ते  शालांत प्रमाणपत्र परीक्षेत शाळेतून प्रथम आलेल्या कु. मोहिनी नवघरे या विद्यार्थिनीचा सत्कार संस्थेच्या वतीने मेडल देऊन करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री देशपांडे यांनी केले त्यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली व सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.श्री भास्करराव नवघरे यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी वेळेचे नियोजन फार महत्त्वाचे असते असे सांगितले.
यावेळी मार्गदर्शक शिक्षिका सौ हिंगमीरे यांनी गुरू शिष्य परंपरेचे महत्व सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सदस्य श्री संजयराव देशपांडे यांनी देशाची भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकाच्या सन्मानाचा दिवस हा शिक्षक दिन आहे. तसेच शिक्षक दिन हा शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करणारा दिवस आहे भारतात प्राचीन काळापासून गुरू शिष्य परंपरेला महत्त्व आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सौ नंदनवार यांनी व आभार पर्यवेक्षक श्री धोंगडे यांनी मानले कार्यक्रमाचा शेवट एकात्मता मंत्राने झाला.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

कोरोणाच्या संकटात आता साथीच्या रोगाचं थैमान यवतमाळ मध्यें डेंग्यू मलेरियाचे थैमान रुग्णांची संख्यात वाढ

0

हंसराज उके अमरावती

अमरावती-: दिनांक ४सप्टे २०२१ कोरोना संकट असतानाच आता यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यू मलेरियाने डोके वर काढले आहे यवतमाळ येथील वसंतराव नाईक जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी
मोठ्या संख्येने गर्दी दिसुन येत आहे विशेषतः हे प्रमाण लाहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळुन आले आहे त्यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले
यवतमाळ जिल्ह्यात ६६ प्राथमिक आरोग्य केंद्र व ४३५ उपकेंद्र आहेत याठिकाणी आता पर्यंत ३४१७ ईलायझा आणि रॅपीड टेस्ट केल्या त्यापैकी १८१ रुग्ण डेगुचे आढळून आल्याची नोंद आरोग्य विभागात आहे परंतु या पेक्षा किती तरी जास्त रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत या मध्ये २ ते १८ वयोगटातील मुलांमध्ये डेंग्यूचे , टायफाईड, आणि मलेरियाच्या आजारांची लक्षणे आढळुन येत असल्याने
सगळीकडे रुग्णालय हाऊस फुल झाल्याचे चित्र झाल्याचे दिसून येते आहे…..

जिल्हा परिषदेची अनुसूचित जमातीची रखडलेली विशेष शिक्षक भरती तात्काळ राबवा अन्यथा आंदोलन : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचा ईशारा

0

 

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील अखिल भारतीय आदिवासी विकास परोषदेचे शिष्टमंडळाने दिनांक २ / ९/२०२१ रोजी जळगांव जिल्हा जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांची भेट घेऊन मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनामार्फत डिसेंबर २०१९ मध्ये आदिवासींची विशेष पदभरती राबविण्यात आली होती, त्याद्वारे जळगांव जिल्हा परिषदेमध्ये देखील आदिवासी प्रवर्गाच्या शिक्षक भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली होती, परंतु ही भरती कोरोना संसार्गाच्या काळापासून अद्याप पर्यंत राबविण्यात आलेली नाही,
मा.नागपूर खंडपीठाने आदेश निर्गमित केल्यानंतर सातारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर आणि रायगड या जिल्हा परिषदेद्वारे संबंधित विशेष पदभरती राबविण्यात आली परंतु अद्याप नागपूर खंडपीठाने आदेश देऊन ही जळगांव जिल्हा परिषदेने ती पूर्ण केली नाही,
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेमार्फत अद्याप पर्यंत अनेक वेळा निवेदनांद्वारे ही भरती जिल्ह्यात का राबविण्यात आली नाही याचा खुलासा जिल्हाधिकारी व त्यांचे मार्फत जिल्हा परिषदेचे आयुक्त, शिक्षणाधिकारी यांना विचारण्यात आला होता परंतु कोणतेही प्रत्युत्तर जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा परिषदेकडून आम्हाला अद्याप प्राप्त झालेले नाही, तरी हे शेवटचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत संबंधित सर्व विभागांना देण्यात येत असून येत्या ८ दिवसांत आदिवासी जमातीच्या विषेश पदभरती बाबत मा. नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास आदेशाची अवमानता समजून संबंधित सर्व विभाग प्रमुखांविरोधात जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येऊन जोवर भरती होत नाही तोवर आमरण उपोषण करून आंदोलन छेडण्याचा ईशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेद्वारे देण्यात आला,
यावेळी जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांना निवेदन देताना उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख करण शेवाळे, धुळे जिल्हाध्यक्ष प्रविण पावरा, जळगांव जिल्हा कार्याध्यक्ष लियाकत तडवी हे प्रामुख्याने उपस्थित होते.

महिलेच्या नावाने सोशल मिडियाच्या माध्यमातून (हनी टॅप) श्रीमंतांना जाळ्यात अडकविणारा पुरुष आरोपी यवतमाळ पोलीसांच्या जाळ्यात

0

 

हंसराज उके अमरावती

सोशल मिडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून चक्क दोन कोटी रुपयांची फसवणूक
झाल्याचु तक्रार प्राप्त होताच अवघ्या २४ तासांच्या आत गुन्ह्याचा उलगडा गुन्ह्यातील आरोपी निशपंन्न करून फसवणूकिची हस्तगत करण्यात यवतमाळ पोलीसांना यश आले सोशल मिडियाच्या माध्यमातून यवतमाळ येथील एका तरुणीने दिल्ली येथील नामांकित
डाॅक्टरा सोबत मैत्री पुर्ण संबंध प्रस्थापित करुन त्यांचे कडुन दोन कोटी रोख रक्कम मौल्यवान दागिन्यांची भेट स्विकारली त्यानंतर स्वतः चे अकाउंट अचानक बंद केल्याने स्वताची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्याने थेट
यवतमाळ गाठत पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ येथे समक्ष येऊन आपलीं आपबिती सांगितली सदर तक्रारी चे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी त्वरित उपविभागीय पोलिस अधिकारी यवतमाळ व सायबर सेल घटनेची शाहनिशा करुन आरोपी निशपंन्न करण्याबाबत निर्देशीत केले. त्या अनुषंगाने सायबर सेल यवतमाळ यांनी तक्रार दार यांची फसवणूक करणाऱ्या महिलेची माहिती घेऊन तांत्रिक विश्लेषण केले असता डाॅक्टरची फसवणूक करणारी महिला नसुन तो पुरुष असल्याचे प्राथमिक माहिती प्राप्त झाली प्राप्त
माहितीच्या आधारे अधिकारी व कर्मचारी यांचे पथक गठित करून
अरुणोदय सोसायटी एका
घरी किरायाने इसमाच्या घरी धाड टाकली असता सदर ठिकाणी आरोपी नामे संदेश अनिल मानकर नावाच्या इसमा कडुन १७२७००० अक्षरी
एक कोटी बाहत्तर लाख सात हजार रुपये निधी व
चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चार विविध कंपन्यांचे मोबाईल
फोन असा एकूण १७८०६१९८अक्षरी एक कोटी अठ्यात्तर लाख सहा हजार एकशे अठ्यानु रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यवतमाळ पोलीसांना यश आले सदरची कार्यवाही डॉ दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ के एन धरने अप्पर पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी
बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पुरी सायबर सेल सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन करेवाड पोलीस हवालदार
गजानन डोंगरे पोना विशाल भगत उल्हास कुरकुटे कविश पाळेकर पोलीस कॉन्स्टेबल महम्मद भगतवाले सलमान शेख पंकज झेंडेकर पंकज गिरी सर्व पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी यशविरीत्या कार्यवाही पार पाडली नागरिकांनी सोशल मिडियाचा वापर करताना अन ओळखी व्यक्तीवर विश्र्वास ठेवून त्यांना एन्टरटे करण्याची कितीही मोठी किंमत मोजावी लागु शकते हे या घटनेतुन स्पष्ट होत असल्याने नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन यवतमाळ पोलीस करण्यात आले

महिला मुख्याध्यापिकेच्या अथक प्रयत्नातून साकारली आदर्श उर्दू शाळा

0

 

प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना जिल्हा बीड कडून जि प उर्दू शाळा मोमिनपुरा मधील शिक्षकांचा कार्य गौरव

बीड दि.०४ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाच्या शात्रेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेल्या दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ च्या शासन निर्णया नुसार ५ सप्टेंबर च्या निमित्ताने सबंध महाराष्ट्रभर शिक्षक कार्य गौरव करून थँक अ टीचर अभियान राबवले जात आहे. प्रत्येक शिक्षकाचे कार्य हे ज्ञानदानाचे असल्याने ते पवित्र व आदर्शवत असेच असते. परंतु केवड्याचा सुगंध जसा संपूर्ण जंगलात सुगंध पसरवून जातो, तसा आपल्या कार्याच्या सुगंधाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोमिनपुरा उर्टू माध्यम केंद्र अशोक नगर ही शाळा बीड जिल्ह्यामध्ये आदर्श व शासनाचे १००% उपक्रम राबविल्यानंतर शाळेची रुपडे कशी बदलू शकते हे दर्शविणारे मॉडेल स्कुल ठरले आहे. म्हणूनच प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची विभागीय उपाध्यक्ष श्री पांडुरंग उनवणे, जिल्हाध्यक्ष श्री धनंजय कुलकर्णी, जिल्हा सचिव श्री अविनाश काळे, महिला कार्याध्यक्षा सय्यद मुमताज बाजी, उर्दू विभाग प्रमुख मिर्झा हसनात, बीड तालुकाध्यक्ष सय्यद जिलानी संपर्कप्रमुख श्री राजाराम लकडे ,कोषाध्यक्ष श्री उत्तरेश्वर बजगुडे,उपाध्यक्ष श्री शेख ऐनुद्दीन बशीरोद्दीन शाळेला भेट देऊन त्यांचा कार्य गौरव नुकताच केला. याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोमीनपुरा बीड ही शाळा उत्कृष्ट शाळा म्हणून सध्या चर्चेत आहे आणि यामागे आहे ती एक महिला मुख्याध्यापिका श्रीमती आलिया बाजी आणि त्यांचा सहकारी शिक्षक वृंद!! अथक परिश्रम ,उत्कृष्ट समन्वय ,शिस्त ,आदर्श प्रशासन विद्यार्थ्याप्रती असलेली बांधिलकी या सर्वांचा उत्कृष्ट समवाय या शाळेत प्रवेश करताच अनुभवास येतो.
या शाळेतील नीटनेटकेपणा शिक्षकांमधील उत्साह व आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर एक वेगळाच अनुभव देणारा आहे. सुंदर माझे कार्यालय, बाला उपक्रम, कुंडीतील सुंदर वनराई, प्रत्येक वर्गखोली डिजिटल तंत्रज्ञानाने तयार केलेली, सुसज्ज वाचनालय व शाल्रेय पोषण आहारातील गुणवत्ता व दर्जा,अशा एक ना अनेक बाबी पाहून यामागे असलेल्री शिक्षकांची समर्पण, त्याग व आपल्या व्यवसायात प्रती असलेली निष्ठा यांचे दर्शन घडवते.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आलिया बाजी, त्यांचे सहकारी श्री मोमीन सर व सर्व महिला शिक्षिका यांनी अत्यंत ताकतीने या शाळेचे काम उभे केलेले पाहण्यास मिळाले. त्यांच्या या कार्याचा गौरव प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना जिल्हा बीड च्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आलिया बाजी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा सत्कार करून करण्यात आला. याप्रसंगी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री धनंजय कुलकर्णी यांनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव व सर्वतोपरी सहकार्य प्रहार शिक्षक संघटना सातत्याने करत राहील असे जाहीर केले तर विभागीय उपाध्यक्ष पांडुरंग उनवणे यांनी अशा शिक्षकांच्या व शाळेच्या पाठीशी प्रहार शिक्षक संघटना नेहमीच उभी राहील असे वचन दिले. महिला
कार्याध्यक्षा सय्यद मुमताज बाजी यांनी महिला शिक्षकांनी अशाच प्रकारे उत्कृष्ट कार्य बजावून समाजाच्या उभारणीत हातभार लावावा अशी अपेक्षा व्यक्‍त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेची उर्दू विभाग प्रमुख मिर्झा हसनात सर यांनी केले तर आभार प्रदर्शन संघटनेचे बीड तालुका अध्यक्ष श्री सय्यद जिलानी यांनी मानले.

तालुक्यातील जामुनझीरा येथे अर्धवट शिजलेले अंडी प्रकरणी आज पंचायत समितीचे उप सभापती योगेश भंगाळे यांनी गावाला जावुन परिस्थितीची पाहणी करून आदिवासींच्या समस्या जाणून घेतल्या.

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

.दरम्यान या संदर्भात यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या जामुनझीरा या आदीवासी वस्तीवर एकात्मीक महीला व बालविकास विभागाच्या माध्यमातुन डॉ एपीजे अब्दुल कलाम अमृत पोषण आहार योजनेअंतर्गत ६ महीने ते ६ वर्ष वयोगटातील बाळांना व गरोदर मातांना विविध पौष्टीक आहार आंगणवाडी सेविकेंच्या हस्ते पुरविण्यात येत असते असे ,दरम्यान काल दिनांक ३ सप्टेंबर रोजी जामुनझीरा येथील सेविका अंतीबाई प्यारसिंग बारेला म्हणुन कार्य करीत असलेल्या जामुनझीरा गावात आंगवाडी सेविकेने बाळांना अर्धवट शिजवलेले बॉईल अंडी वाटप केल्याने गावातील संतत्प आदीवासी बांधवांनी यावल येथील एकात्मीक महीला व बालविकास कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांची भेट घेवुन या संदर्भात तक्रार दिली असुन , या अनुषंगा पंचायत समितीचे उपसभापती योगेश दिलीप भंगाळे यांनी आज दिनांक ४ सप्टेंबर रोजी सकाळी जामुनझीरा या आदीवासी गावाला भेट दिली व आदीवासी बांधवांच्या समस्या व अडचणी जाणुन घेतल्या , या वेळी त्यांच्या सोबत एकात्मिक महीला व बालविकास कार्यालयाच्या सौखेडा सिम विभागाच्या पर्यवेक्षिका पी एस पाटील , मोहराळा येथील सामाजीक कार्यकर्ते लहु रामभाऊ पाटील गावातील पोलीस पाटील हिरा पावरा , बिलारसिंग पावरा हे सोबत होते, यावेळी सदरच्या आंगणवाडी सेविका अंतीबाई बारेला यांच्या विरूध्द करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांच्या कड्डन पोषण आहार वितरणाची जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात काढुन घेण्यात आली असुन , नसीमा तडवी यांच्याकडे पोषण आहार वाटपाची जबाबदारी देण्यात आली असल्याची माहीती पर्यवेक्षिका पी एस पाटील यांनी दिली .

कापुसतळणी येथील कृषी केंद्राचा प्रताप सोयाबीन पिकावर फवारणीसाठी शिफारस नसलेली औषध दिल्याचा प्रकार.

0

 

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

प्रहार उपतालुकाप्रमुख अरुण शेवाणे यांच्या प्रयत्नाला यश.
कीटकनाशक तपासणी शास्त्रज्ञ समिती अहवाल निष्कर्षावरून औषध विक्रेता व कंपनीवर फौजदारी होणार.
कापूसतळणी येथील शेतकरी मधुकर देविदास काळे यांचे सराय मौजे मधील आठ एकर शेतात दि.१७ जूनला पेरणी केलेलं सोयाबीन पिक विक्रमी उत्पन्न असलेल्या फुलोल्या स्थितीत कापुसतळणी येथील सागर ॲग्रो सर्विस या कीटकनाशक दुकान दाराच्या सल्याने पिकांवर फवारणी केली. सात – आठ दिवसानंतर पिकाची पाहणी केली असता संपूर्ण फुलाची गळ झाल्याचे दिसून आले. ही बाब कीटकनाशक विक्रेता लक्ष्मीकांत राठी यांना सांगितले. परंतु श्री राठी यांनी सदर बाबीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून आठ दिवस वेळ मारली. खरंतर औषध विक्रेता यांनी सदर औषध कंपनीला माहिती देऊन सदर शेताची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देऊन उपाययोजना करणे अपेक्षित होते. परंतु औषध विक्रेत्यांनी तसे केले नाही म्हणून शेतकऱ्यांनी ही बाब परिसरातील शेतकऱ्यांना सांगितले असता ४०-५० शेतकऱ्यांनी गावातील शेतकऱ्यांचा कैवारी प्रहार संघटना उपतालुकाप्रमुख अरुण शेवाणे यांची भेट घेतली व श्री शेवाणे यांनी क्षणाचाही विलंब न करता सदर शेतात जाऊन पिकाची पाहणी केली आणि लगेच तालुका कृषी अधिकारी यांना दि.२७/८/२०२१ ला निवेदन दिले आणि दि. ३/९/२०२१ पर्यंत सदर पिकाची पाहणी शास्त्रज्ञां करून दोषींवर कारवाई करणे तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी हेक्टरी 30 क्विंटल भरपाई मिळावी अन्यथा दि.३/९/२०२१ ला सदर शेतात अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता त्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी यांनी दिनांक २/९/२०२१ ला समिती गठित करण्यात आली या समितीमध्ये डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथील कीटकनाशक शास्त्रज्ञ कु. सोनल नागे, सदस्य तसेच एम .जी .कोरे (ता.कृ.अ.) सदस्य, ए.बी .राठोड (कृ.अ.प.स.) सदस्य सचिव, जी. आर. मोरे (कृ.अ.) एम .एम. जाधव(कृ.स.), तक्रार कर्ता अरुण शेवाणे, औषध विक्रेता लक्ष्मिकांत राठी , आदामा कंपनीचे प्रतिनिधी प्रशांत मोरे,पंच संजय हिंगे, प्रशांत सरदार, गजानन हरणे, शेतकरी सत्यम काळे आदींच्या समक्ष पाहणी झाली. समितीचा निष्कर्ष असा की, क्लोरोपायरीफॉस+सायपरमेथ्रीन हे औषध सोयाबीन पिकासाठी शिफारशीत नसल्यामुळे सोयाबीन पिकाचा संपूर्ण फुलोऱ्याची गळ झाली आणि भविष्यात उत्पन्न होऊ शकणार नाही अशाप्रकारे औषध विक्रेता दोषी असल्याचे सिद्ध झाले. म्हणून औषध विक्रेता व कंपनी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे व शेतकऱ्यांना हे. 30 क्विंटल ची मदत मिळावी अशी मागणी तक्रार कर्ते अरुण शेवाणे व शेतकऱ्यांनी केली आहे.

धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रताप दादा अडसड यांना प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांचे उर्वरित घरकुलाचा निधी मिळावा, व मंजूर झालेल्या डी पी आर चे अनुदान निधी त्वरित मिळावे घरकुल लाभार्थी व मा क प शिष्टमंडळांनी घेतली भेट

0

नगरपंचायत कार्यालय नांदगाव खंडेश्वर समोर 25, 26, 27 2021 रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वा घरकुल लाभार्थी यांच्या वतीने राहुटी आंदोलन करण्यात आले 27 तारखेला एल्गार सभेतून आंदोलनाची सांगता करण्यात आली होती. त्यावेळी विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रताप दादा अडसड यांनी आंदोलन कर्त्याशी फोनवरून संवाद साधला व शब्द दिला की प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाच्या पैशाचा लवकरात लवकर पाठपुरावा करणार व त्याबाबतचे मला निवेदन द्या असे फोन वरुण आमदार साहेबांनी सांगितले होते त्या आशयाचे निवेदन मा क प शिष्टमंडळ व प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी यांनी आमदार यांच्या निवासस्थानी जाऊन निवेदन दिले

उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांनी कुटकी येथील शेतात केली अँपवर ई पिक नोंद

0

 

महाराष्ट्र शासनाचा माझा सातबारा माझी पिकनोंद, ई पिक पाहणी मोहिमे अंतर्गत हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनाले यांनी शेतकऱ्यांना स्वतः पिकाची नोंद करता यावी याकरिता कुटकी येथील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ऍपचे प्रत्यक्षिक करुन दाखविले यावेळी घोडमारे उपविभागीय कृषी अधिकारी हिंगणघाट,मेश्राम तालुका कृषी अधिकारी हिंगणघाट, समाशेर पठाण नायब तहसीलदार हिंगणघाट, संजय भोंग मंडळ अधिकारी अल्लीपूर, तलाठी दिपक अंधारे, अभिष रामटेके, कृषिसहाय्य्क कु. पवळ सरपंच माधुरी बोभाटे शेतकरी श्रीकांत महाजन, कृषीमित्र कापसे आणि गावकरी उपस्थित होते. या उपक्रमाचा पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आपल्या शेतातील पिकांची नोंद अपद्वारे स्वतःच करावी असे आव्हान उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी शेतकऱ्यांना केले
सूर्या मराठीन्यूज साठी सचिन वाघे वर्धा